यलोस्टोन राष्ट्रीय उद्यान - उत्तर अमेरिका खंडातला सर्वात मोठा ज्वालामुखी

महाराष्ट्रात ज्वालामुखी नवीन नाही. सह्याद्रीच्या रांगा ज्वालामुखीच्या उद्रेकातूनच तयार झालेल्या आहेत हे आपण शालेय भूगोलातच शिकलेलो आहोत. पण हा ज्वालामुखी आता मृत आहे. निदान गेली ६५ लाख वर्ष या ज्वालामुखीचा उद्रेक झालेला नाही असं मानलं जातं. उत्तर अमेरिका खंडातला यलोस्टोन उद्यानात असणारा ज्वालामुखी अतिशय वेगळा दिसतो. हा ज्वालामुखी अजूनही जिवंत आहे असं समजलं जातं. अनेक ठिकाणी दिसणारा धूर, पाण्याची कारंजी आणि सल्फरचा वास ही याची लक्षणं आहेतच. शिवाय या भागात सतत भूकंपाचे हादरे बसतात. भूगर्भातल्या तापमानजन्य घडामोडींपैकी अर्ध्या घटना या Caldera मधे घडतात.

Caldera म्हणजे स्पॅनिश भाषेत कढई, अन्न शिजवण्याचं भांडं. यलोस्टोन उद्यानाच्या ठराविक भागात पृष्ठभागावर दिसणारं पाणी उकळतं असतं, काही ठिकाणी उष्ण चिखलाची पात्र दिसतात, तप्त लाव्हा पृष्ठभागापासून खाली काही किलोमीटर अंतरावरच आहे. या उष्णतेमुळे या भागाला Yellowston caldera / यलोस्टोनची कढई असं नाव दिलेलं आहे. पृथ्वीच्या पोटात चालणाऱ्या या जलौष्णिक घडामोडींमुळे पृष्ठभागावर आपल्याला वेगवेगळ्या घटना दिसतात, उदा: गरम पाण्याची कारंजी, ठराविक भागांमधून बाहेर पडणाऱ्या वाफा, रंगीत तलाव, उकळता चिखल इत्यादी. पृष्ठभागाखाली नक्की काय चालतं ते या पुढच्या कार्टूनवरून समजेल.

(फोटो यलोस्टोनमधेच घेतलेला आहे.)

जमिनीत काही किलोमीटर खाली तप्त लाव्हा आहे. यलोस्टोनच्या पठाराच्या पृष्ठभागाच्या फारच जवळ हा लाव्हा आहे. वर पाऊस आणि बर्फरूपात जे पाणी जमा होतं, ते जमिनीला असणाऱ्या भेगांमधून खाली झिरपतं. लाव्हाच्या वरच्या बाजूला अनेक ठिकाणी हे पाणी साचतं आणि लाव्हातल्या उष्णतेमुळे हे पाणी उकळतं. उकळल्यावर पाण्याचं आकारमान वाढून ते दगडांमधे जे नैसर्गिक पाईप्स आहेत त्यातून वर येतं. पृष्ठभागावर या पायपांचं तोंड किती रूंद आहे आणि आजूबाजूला दगड आहे का माती यावरून त्या ठिकाणी तळं होतं का कारंजं हे ठरतं. अनेक ठिकाणी जमिनीतून फक्त कार्बन डायॉक्साईड, सल्फर डायॉक्साईड, हायड्रोजन सल्फाईड* असे वायू वर येतात, ती असतात fumarole किंवा जमिनीखालची धुरांडी.

*हाच तो सडक्या अंड्यांचा वास असणारा वायू. यलोस्टोनच्या या भागात अनेक ठिकाणी सल्फर आणि हायड्रोजन सल्फाईडचा वास येत रहातो.

यलोस्टोनमधलं Old faithful नावाचं कारंजं सर्वाधिक प्रसिद्ध आहे. आणि त्याचं कारण आकार नसून नियमितता आहे. दर ८८ मिनीटांनी (सरासरी आकडा, ही रेंज ४४ ते १२५ मिनीटं आहे) हे कारंजं सुरू होतं. तीस-पस्तीस मीटर उंचीपर्यंत पाणी उडवतं आणि काही मिनीटांत पुन्हा तिथून वाफ, धूर यायला सुरूवात होते. इतर काही कारंज्यांमधून अन्यथा वाफ येतेच असं नाही, पण मुख्य म्हणजे Old faithful ची नियमितता या कारंज्यांकडे नाही. दिवसाउजेडी दर ९० मिनीटांनी Old faithful चा 'पिसारा' बघायला पर्यटकांची गर्दी जमा होते.

या भागातल्या अन्य कारंज्यांमधे Grotto geyser, Grand geyser, Giant Geyser आणि Castle Geyser हे cone geysers आहेत. भूगर्भातून पाणी बाहेर येतं तेव्हा त्याबरोबर कॅल्सियम कार्बोनेट आणि इतर क्षारही येतात. पाणी वाहून फायरहोल नदीत मिसळतं पण क्षार तिथेच कारंज्याच्या मुखाशी जमा होतात. या ढिगाऱ्याची उंची प्रत्येक वेळी कारंजं उडल्यानंतर वाढत जाते; त्या उंचीवरून कारंजं किती जुनं आहे याचा अंदाज घेता येतो. हेच ते cone geyser. Old faithful च्या आजूबाजूला फार क्षार दिसत नाहीत, याचा अर्थ ते तुलनेने तरूण आहे. ग्रोटो आणि कास्टल कारंजी बरीच जुनी आहेत. (मोठे फोटो पहाण्यासाठी फोटोवर क्लिक करा.)

Old faithful - शांत असताना Old faithful - सुरू होताना
Old faithful - पूर्ण 'पिसारा' Old faithful चा 'पिसारा' बघायला जमलेले पर्यटक
तात्पुरतं बंद होत आलेलं कारंजं आणि बाजूचे क्षार अचानक सुरू झालेलं कारंजं आणि पर्यटक
Giant geyser - जाने २०१० नंतर एकदाही उडलेलं नाही Grotto geyser - शांत असताना दिसणारी क्षारांची रचना
नेमका परतीच्या वाटेवर ग्रोटो कारंजं सुरू झालं मुख्य कोन आणि आजूबाजूने होणारा वर्षाव
मागची कारंजी शांत होताना ग्रोटो
ग्रोटोच्या जोडीने ग्रँडही सुरू होतो Norris या सर्वात अशांत भागातला आणि उंचीने सर्वात मोठा पण अतिशय अनियमित Steamboat geyser
आणि हा सर्वात जुना समजला जाणारा Castle geyser चा कोन त्या भागातलं सामान्य दृष्यः धूर, गवत, झाडं, रंग आणि पर्यटक
Norris भागाचा पॅनोरामा तिथलंच एक कारंजं आणि गरम पाण्याची तळी

उद्यानाच्या नैऋत्येला असणाऱ्या Old faithful आणि पश्चिमेच्या Norris भागात अशी कारंजी दिसतात. तर वायव्येच्या Mammoth hot spring भागात अतिशय कमी पाणी आणि कमी वेगाने वहाणारे झरे दिसतात. पाण्याचा वेग कमी असल्यामुळे तिथे क्षारांचा संचय वेगाने होतो आणि काही वेगळ्या प्रकारच्या रचना दिसतात.

लाईमस्टोनचा केशरी ढिगारा
तोच तो ढिगारा किंवा Orange mound
संथ प्रवाहामुळे तयार झालेल्या इतर रचना

साधारण अंडाकृती आकार असणाऱ्या यलोस्टोन कढईच्या आग्नेय भागात चिखलात दिसणाऱ्या रचना आहेत. याला mud pots आणि sulphur caldron अशी अनुक्रमे नावं आहेत. या भागातही हायड्रोजन सल्फाईचा सडका आणि सल्फरचा वास येत रहातो. अगदी उकळत्या चिखल आणि सल्फरच्या बाजूलाही गवत आणि झाडं दिसतात. त्यांचे काही फोटो:

सल्फरची किटली ड्रॅगनचं तोंड - फार आवाज करत वाफ बाहेर टाकतं
जमिनीतलं धुरांडं चिखलाच्या तळ्याशेजारचा सल्फर
उकळता चिखल सल्फर आणि उष्णतेमुळे मेलेली झाडं.

प्रचंड घडामोडी आत्तापर्यंत पाहिलेल्या फोटोंमधे दिसल्या तरी सर्वात सुंदर आहेत ते गरम पाण्याचे झरे. पृष्ठभागावर असणाऱ्या खळग्यांमधे खालून गरम पाण्याचा प्रवाह येऊन हे झरे किंवा तळी तयार होतात. या खळग्यांच्या कडेला असणाऱ्या उथळ भागात उष्णताप्रेमी जीवाणूंच्या वसाहती असतात. झऱ्यांचं सौंदर्य खुलतं ते या जीवाणूंमुळेच. लुटा लुत्फ नैसर्गिक रंगांचा:

या भागातलं पाणी बॅटरी अ‍ॅसिडपेक्षा किंचित कमी पण भयंकर अ‍ॅसिडीक आहे. सगळीकडे लाकडी पट्ट्यांचे बोर्डवॉक्स आहेत.
Beauty parlour pool Morning glory- प्रत्यक्षात याचे रंग सातपटीने अधिक चांगले दिसतात.
Crested pool - सर्वात तप्त
नॉरीस भागातलं एक तळं Grand Prismatic या सर्वात प्रसिद्ध झऱ्याचा परिसर आणि फायरहोल नदी

आमच्या दृष्टीने हे खरं यलोस्टोन उद्यान. हे सगळं दीड दिवस पाहून शेवटी कंटाळा आला, चालून, उभं राहून पाय दुखायला लागले आणि सल्फरमुळे घशात खवखवही झाली. चालताना एखाद्या तळ्याच्या दिशेने वारा आपल्याकडे आला की तात्पुरत्या उष्णतेने बरं वाटायचं पण हातही नाकाकडे जात होता. अशा प्रकारचे निसर्गाची रूपं अन्यत्र फार ठिकाणी दिसत नाहीत. आणि आज यलोस्टोन जसं दिसलं तसं उद्या दिसेल याची खात्री नाही. यलोस्टोनचं पठार भूगर्भीय घडामोडींमुळे अतिशय अशांत आहे. तिथे दररोज भूकंपाचे हादरे बसतात (त्यातले बरेचसे जाणवत नाहीत). याचं मुख्य कारण plate tectonics, भूखंडांच्या हालचाली. यलोस्टोनमधे Continental Divide आहे. या सर्व घडामोडींमुळे अमेरिकेच्या या भागात ज्वालामुखी आहे, रॉकी पर्वत आहे, लाल रंगाचे दगड मधेच वर आलेले आहेत.

पण यलोस्टोन उद्यान म्हणजे फक्त भूगर्भीय घडामोडींचं दर्शन एवढंच नाही. यलोस्टोनमधे बायसन, एल्क असे जंगली प्राणी दिसले, मोठ्ठा यलोस्टोन तलाव आहे, यलोस्टोन, फायरहोल, गिबन या नद्या आहेत, त्यांची कुरणं आणि धबधबेही आहेत आणि ज्यामुळे या भागाला फ्रेंचांनी Roche Jaune आणि पुढे इंग्लिशमधे यलोस्टोन असं नाव मिळालं तो यलोस्टोन नदीवरचा "ग्रँड कॅन्यन"ही आहे. त्याचे फोटो (बँडविड्थ खपली नाही, संस्थळ आणि वाचक झोपले नाही तर) पुढच्या भागात.

field_vote: 
4.4
Your rating: None Average: 4.4 (5 votes)

प्रतिक्रिया

वॉव

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वॉव

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वाह! भारी आहे पिताश्म! सुंदर फोटो आणि माहीती.
इथे जाणं रिस्की नाहीय का? अचानक तीव्र भुकंप किँवा ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर पर्यटकांना सुरक्षीत ठिकाणी नेण्यासाठी काय अरेंजमेँट आहे?
लेखाला रेटीँग Top 20 Top 5 असं का दिसतय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो आणि लेख अतिशय आवडले. बर्‍याच दिवसांनी काहीतरी अनोखं पहायला मिळालं. फोटोंची वर्णनं , एकंदर त्यामागची शास्त्रीय माहिती रंजक पद्धतीने आली आहे. हेव्याबरोबरच कौतुकही वाटले. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

काही वर्षांपूर्वी बीबीसीवर सुपरव्होल्कॅनो नावाचा डॉक्युड्रामा पाहीला होता ते आठवले. यलोस्टोन एकंदर डेंजर झोन आहे.

फोटो आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. पुढील भागांच्या प्रतीक्षेत आहे. यलोस्टोनमधले थोड्या आडवाटेवरचे काही ट्रेल्सही सुरेख आहेत. खासकरून सूर्यास्ताच्या सुमारास अनेक वन्य प्राणी पाहता येतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यलोस्टोनच्या सफरीची ही चित्रे पाहून मला मी तीनचार महिन्यांपूर्वी आइसलंडला गेलो होतो त्याची आठवण झाली.

हा देश असाच भूगर्भीय चमत्कारांनी भरलेला आहे. युरेशियन प्लेट आणि अमेरिकन प्लेट ह्यांच्यामध्ये जो सांधा आहे तो अटलांटिक महासागराखालून आइसलंडच्याहि खाली जातो आणि त्यामुळे दोन प्लेटमधील चढाओढीमुळे जमिनीला पडलेल्या प्रचंड भेगा, ज्वालामुखी, गरम पाण्याची कारंजी आणि झरे, प्राचीन उद्रेकांचे उरलेले अवशेष, धबधबे अशा गोष्टींची आइसलंडमध्ये रेलचेल आहे. भूगर्भीय उष्णता जमिनीत फार खोल नसल्याने रेकयाविक हे राजधानीचे शहर (वस्ती २,३०,०००) आणि अन्य वस्ती (एकूण ३,२०,०००) ह्यांना घरे वगैरेसाठी त्या गरम पाण्याचीच उष्णता पुरविली जाते. अखेरच्या हिमयुगाचे शेवटचे अवशेष अशी प्रचंड icefields मध्यभागात पसरली आहेत.

'गीझर'ह्या शब्दाचाहि उगम ह्या देशातच आहे. रेकयाविकपासून काही अंतरावर 'गेसिर Geysir' नावाची एक जागा आहे. हे नाव पडण्याचे कारण म्हणजे जगातील पहिला 'गीझर' येथे युरोपीय वायकिंग्जनी आइसलंडमध्ये ९व्या शतकात नॉर्वेमधून येऊन वस्ती केली तेव्हा त्यांना दिसला. अशा भूगर्भीय वैशिष्ट्याला तेव्हापासून गेसिर-गीझर असे नाव मिळाले आणि आपल्या बाथरूममधील गीझरलाहि तेच नाव मिळाले.ह्या 'गेसिर'नामक स्थानी १ चौरस किमी क्षेत्रात कित्येक लहानमोठे गीझर्स, गंधकाच्या गरम पाण्याचे हौद, वाफा सोडणारी छिद्रे असा निसर्गाचा खेळ पाहाण्यास मिळतो.

ह्या गेसिर नावाच्या जागेत सर्व गीझरांचा पितामह असा मूळचा 'गेसिर' अगदी कालपरवापर्यंत म्हणजे इ.स. २००० पर्यंत अत्यंत नियमितपणे दर ४-५ मिनिटांनी गरम पाण्याचा फवारा हवेत उडवण्याचा चमत्कार दाखवत होता. त्या वर्षी काही ज्वालामुखी उद्रेकाने त्याची अंतर्गत रचना बदलली आणि आता तो दिवसातून एखाद्या वेळेसच कारंजे उडवितो. पण त्याच्याच शेजारी 'स्ट्रोक्कूर' नावाच नावा गीझर निर्माण झाला आहे आणि तो अत्यंत नियमितपणे दर तीनचार मिनिटांनी सुमारे ५०-६० मीटर गरम पाण्याचे कारंजे हवेत फेकत असतो.

मजजवळ आइसलंडमध्ये मी घेतलेली अशी अनेक चित्रे आहेत, ती नंतर केव्हातरी पाहू. सध्या मूळच्या गेसिरची तीन चित्रे आणि स्ट्रोक्कुरचे एक चित्र अशी येथे दाखवीत आहे.

मूळचा गेसिर.

गेसिर नुसता धूर सोडत आहे.

गेसिरच्या गरम पाण्याचा हौद.

स्ट्रोक्कुर गेसिर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आईसलंडबद्दल फार कुतूहल आहे. विशेषतः तिथे ज्वालामुखीजन्य राख आकाशात पसरून विमानसेवा वगैरे ठप्प पडली होती तेव्हापासून. आर्थिक दिवाळखोरीमुळे ही उत्सुकता थोडी अधिक वाढलीच.

यलोस्टोनमधल्या व्हिजीटर सेंटर्समधे आईसलंडच्या गीझर्सबद्दलही माहिती मिळाली. आणि तिथल्या ऊर्जास्रोतांबद्दलही. तिथे दिलेल्या माहितीप्रमाणे, अशा प्रकारे ऊर्जानिर्मिती केल्यामुळे आईसलंडमधे अशा प्रकारच्या काही भूऔष्णिक फीचर्सला कायमचं नुकसानही झालेलं आहे. यलोस्टोनमधेही अशा प्रकारे ऊर्जानिर्मिती होते, पण त्यांच्या मते त्यांनी अशा कोणत्याही फीचर्सना हानी पोहोचणार नाही याची काळजी घेतली आहे.

नंदनः रस्त्यावर आणि बोर्डवॉकांवर फिरून, फोटो काढूनच पायांचे तुकडे पडले. शिवाय बायसनमुळे झालेल्या ट्रॅफिक जॅममधेही (होय, बायसन रस्त्यांवर आले की ते हलायला वेळ लावतात. शिवाय आमच्यासारखे शटरबग पर्यटक फोटो काढून आणखी वेळ लावतात) वेळ गेला त्यामुळे आडवाटांवर फिरण्याएवढा वेळ या भेटीत मिळाला नाही.

आत्ताच टीव्हीवर यलोस्टोनमधल्या प्राणीजीवनावर एक कार्यक्रम पाहिला. त्यानुसार तिथे मे महिन्यातही छोटे प्राणी वगैरे दिसू शकतात. पुढच्या वेळेस त्या सुमारास यलोस्टोनला भेट देता येईल. त्या कार्यक्रमानुसार यलोस्टोनच्या ज्वालामुखीत एवढा लाव्हा आहे की पुरता बाहेर आला तर पूर्ण ग्रँड कॅन्यन भरून जाईल. अचानक असा उद्रेक उन्हाळ्यात झाला तर मनुष्यहानी होण्याची बरीच शक्यता असेल. हिवाळ्यात फक्त प्राणीहानीच होईल; तेव्हा उद्यान मनुष्यांसाठी बंद असतं. भूकंपाच्या धक्क्याने फार त्रास होऊ नये. उद्यानात बर्‍याच मोकळ्या जागा आहेत आणि तिथे भूकंपाचा फार त्रास होऊ नये (असा माझा अंदाज).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदिती, फारच सुंदर लेख! १० पैकी १० मार्क!
ह्या नैसर्गिक गीझरचा अभ्यास भूवैज्ञानिक फार बारकाईने करत असले पाहिजेत कारण यांच्यात होणार्‍या बदलांवरून भूगर्भात होणार्‍या बदलांचाही अंदाज येऊ शकत असेल. उदा. जावा/सुमात्रा नजिक भूकंप (नंतर सुनामी), आईसलँडमधे ज्वालामुखिचा उद्रेक नंतर इंडोनेशिया,हैटी, चिले, जपान भूकंपांची मालिका यासगळ्यामधे काही ना काही संबंध असू शकेलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-------------------------------------------

लेख, छायाचित्रे व प्रतिसाद फार आवडले. कधीतरी यलोस्टोन पार्क बघण्याची इच्छा आहे. ती 'राहून गेलेल्या गोष्टीं'मध्ये जमा होऊ नये अशी आणखी एक इच्छा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

"नॅशनल जिऑग्राफिक" जर मराठी भाषेत प्रकाशित होऊ घातले तर त्या प्रथम अंकात अदितीचा हा लेख प्राधान्याने संपादक मंडळ घेतील इतका तो सर्वांगसुंदर {आणि अर्थातच माहितीपूर्ण} उतरला आहे. 'सुपरव्होल्कॅनो' बद्दल बर्‍यापैकी माहिती होती पण यलोस्टोन कॅल्डेराही त्या गटात येतो हेही या निमित्ताने समजले.

बॅण्डविड्थचे खपणे आणि संस्थळाची सुषुम्नावस्था याविषयी काही सांगू शकत नाही, पण इतकी मौलिक माहिती आणि तितकेच सुंदर फोटो पाहायला मिळणार असतील तर इथला वाचकवर्ग निश्चित झोपणार नाही याची हमी मिळेल, अदिती. [यलोस्टोन नदीविषयीही उत्सुकता निर्माण झाली आहे....नदीचे फोटो आत्ताच 'गूगल इमेज' मध्ये पाहिले...अतिशय देखणी वाटली, शांतही. पण त्यावरील भाष्य डॉक्टरीणबाईकडून अपेक्षित आहे.]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो आणि माहिती दोन्ही आवडले.
पक्षी जसे पाहायला जाता येत नाही, ते आपल्याला दिसावे लागतात - तसंच इथं दिसतंय. एकूण रोज आपल्या भवताली आपल्याला शिस्त आणि व्यवस्था हवी असली (आणि ती सोयीची असली) तरी अनेकदा अशी अनिश्चितता जास्त रोचक ठरते, हे पुन्हा एकदा जाणवलं Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखन आवडले.
अवांतर: आगीत तेल असं का म्हणत असावेत याचा अंदाज आला तू तिथं जाऊन आल्याचं कळल्यानं. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्रिकेतल्या 'बघायलाच हव्यात' अश्या काही गोष्टी मी ठवलेल्या होत्या. त्यात नेमकी हीच गोष्ट बघायची राहिली त्याची खंत पुन्हा उफाळून आली आणि इतकी डिट्टेलवार माहिती - चित्रे वाचून-बघुन खंत काहीशी कमीही झाली :).

**अवांतर स्वगतः आता एवढ्या(च)साठी त्या आम्रिकेत पुन्हा पाय ठेवण्याचे प्रयत्न करण्यापेक्षा ही चित्रे काय कमी आहेत?! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काय अफलातून छायाचित्रे आहेत गं अदिती. लेख खूप माहीतीपूर्ण आहे. माझ्या मुलीला याचे भाषांतर करुन सांगेन. तिला खूप आवडेल.
तू अशीच भटकंती करोस व आम्हाला अशीच मेजवानी मिळत राहो ही सदिच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त फोटो आहेत अदिती! तू तिथे जाऊन आल्यामुळे इतरांप्रमाणेच मलाही तुझा हेवा वाटला हे कबूल करते. तिथल्या वन्य प्राण्यांबद्दल काही लिहू शकशील का?
पूर्वी बी.बी.सी.वर एक डॉक्युमेंटरी पाहिल्यापासून त्याबद्दल कुतुहल निर्माण झाले होते.
यूट्युबवर डॉक्युमेंटरीची लिंक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख माहितीपूर्ण. दिसायला पार्क सुंदर नसले तरी भूगर्भातील रोचक बाबी आवडल्या, पुढील लेख वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूपच सुंदर फोटो अन अनोखी माहिती.
पण तिथे फिरताना, अदिती, तुम्हा लोकांना अचानक उद्रेक होण्याची भिती नाही का वाटली ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0