कापडाचोपडाच्या गोष्टी

बरेच दिवसांपासून वेशभूषेचा इतिहास या विषयाला धरून काहीतरी लिहायचं मनात होतं.
वेशभूषेचा इतिहास शिकताना समाज, राजकारण, अर्थशास्त्र, विज्ञान अश्या सर्व गोष्टींच्या इतिहासाला समजून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. थोडक्यात आपले कपडे हे आपल्या जगाची कहाणी सांगतात असं म्हणता येईल. हे सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं असतं ते मला फार गमतीशीर आणि महत्वाचं वाटतं.
तर तेच सगळं 'जे जे आपणास ठावे ते ते दुसर्‍यांसी सांगावे' यास्तव वेशभूषेच्या इतिहासावर आधारित एक सदर लिहिते आहे. सकळ जनांना शहाणे करून सोडण्याचा दावा अजिबात नाही पण कदाचित काही माहितीत भर पडेलही. Smile
जानेवारी २०१८ पासून लोकमतच्या सखी पुरवणीमध्ये हा विषय घेऊन सदर सुरू केले आहे. दर महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी हे सदर येईल. सदराचे नाव आहे ‘कापडाचोपडाच्या गोष्टी’. थोडी गम्मत, थोडी माहिती असे काहीसे स्वरूप आहे या सदराचे.
संपूर्ण लेख इथे टाकत नाहीये कारण लेखमाला संपल्यावर त्याचे पुस्तक करायचे मनात आहे. इथे लोकमतच्या लेखांच्या लिंका देते आहे.

१. "माणसाच्या मूलभूत गरजा तीन - अन्न, वस्त्र आणि निवारा हे आपण शाळेत असताना पाठ केलेले आहे. या तिन्ही गरजांचा इतिहास म्हणजे अख्ख्या मानवजातीचा इतिहास आहे. राजकीय, सामाजिक, वैज्ञानिक सर्व प्रकारच्या स्थित्यंतरांचे प्रतिबिंब या इतिहासात पडलेले दिसते. विविध कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर माणसांचे स्थलांतर होते. अशा स्थलांतरानंतर जी देवाणघेवाण होते त्यातून कपड्यांचा इतिहास नवे वळण घेत जातो."
- २९ जानेवारी २०१८ ला प्रसिद्ध झालेला लेख : 'हे सर्व कुठून येते?'

२. "आजच्या जगाचा विचार केला तर अंगाभोवती वेगवेगळ्या प्रकारे कापडाचे वेढे घालून बनवायची वस्त्रं ही केवळ भारतीय उपखंडात किंवा भारतीय उपखंडात मूळ असलेल्या लोकांच्यातच दिसतात. त्यामुळे भारतीयांनाच केवळ ही भन्नाट आयडिया सुचलेली आहे असा गैरसमज व्हायला भरपूर वाव असतो."
- २७ फेब्रुवारी २०१८ ला प्रसिद्ध झालेला लेख 'नेसूचे आख्यान'

३. अंगाभोवती कपडे गुंडाळून वस्त्रे तयार करण्याची आयडिया फक्त भारतीय उपखंडातली नसली तरी अंतरीयाचे किंवा कमरेवर बांधलेल्या वस्त्राचे काष्टा घालून दुटांगीकरण हे मात्र केवळ भारतीय उपखंडातच दिसून येते.
- २७ मार्चला प्रसिद्ध झालेला लेख 'साडी नेसणं...'

४. उगाचच शरीर झाकून ठेवण्याला नकार देणारी, शरीराचे आकार-उकार स्पष्ट करणारी वस्रं ही आपल्या भारतातच अस्तित्वात होती. ऐकायला, वाचायला गैरसोयीचं वाटलं तरीही हे आपल्याच महान संस्कृतीत घडलं..
२४ एप्रिलचा लेख झाकपाक

५. नवीन प्रदेश पाहून, तिथल्या नवीन आणि मजेमजेच्या गोष्टी प्रवासी लोक आपल्या बरोबर घेऊन येतात. नवीन आलेल्या पद्धती आणि स्थानिक पद्धतींचा मिलाप होतो आणि संस्कृतीची कथा नवं वळण घेते.. ३० मे रोजी प्रसिद्ध झालेला लेख 'आपलं काय काय म्हणायचं?'
दुव्यावर सगळ्या इमेजेस घ्यायचा त्यांनी कंटाळा केलाय तस्मात इमेजेस बघायच्या असतील तर इपेपर ला पर्याय नाही.

६. "ब्रिटिश भारतात आले तोपर्यंत भारताच्या वस्त्नकलेनं खूप प्रगती केलेली होती. भारतभरात प्रदेशानुसार कापड विणण्याचे प्रकार, त्यावरची नक्षी, कलाकुसर, कापड रंगवण्याची भारतीय साधनं आणि प्रक्रि या या सर्व गोष्टींचं प्रचंड वैविध्य होतं. काश्मिरी शालींबरोबरच याही सगळ्याची युरोपातून आलेल्या व्यापार्‍यांना भुरळ पडली. "
भारतीय वारसा - २६ जून

७. "एखाद्या संस्कृतीशी जोडलेली प्रतीकं, चिन्हं यांची देवाणघेवाण होणं हे अपरिहार्य आहेच,काही प्रमाणात!ते स्वागतार्हही आहे. नक्की किती आणि काय योग्य आणि अयोग्य याविषयी मात्र अजून संभ्रम आहेत."
थांब सेलिना बिंदी लावते! - ३१ जुलै

८. रोमानिया देशाचं फॅशनला वाहिलेलं एक मासिक.बिहोरच्या लोकांबरोबर त्यांच्या पारंपरिक भरतकाम कलेसाठी उभं राहिलं. आयुष्यभर भरतकाम करणा-या हातांनी आपल्या सुया, कात्र्यांनीशी लढायचं ठरवलं. बिहोरचे लोक अणि हे मासिक यांनी एकत्र येऊन बिहोर फॅशनचा एक ब्रॅण्ड तयार केला. आपल्या हातांनी बनवलेल्या सगळ्या पारंपरिक वस्तू योग्य नफा आकारून, पण तरीही सामान्य माणसाला परवडेल अशा किमतीत ऑनलाइन विकायला सुरूवात केली. थोड्याच दिवसात दणदणीत विक्रीचा एक उच्चांक गाठला गेला.
बलाढ्य दुष्टाचा पराजय आणि इतर गोष्टी - २८ ऑगस्ट

९. युरोपातले उच्च खानदानी लोक आणि सत्ताकेंद्र यावर फॅशनच्याद्वारे नियंत्नण ठेवण्याची चौदाव्या लुईची योजना होती. उच्च अभिरूची, चोखंदळ,शानदार राहणीमान, विलासी जीवन या गोष्टींचं केंद्र फ्रान्स असलं पाहिजे अशी त्याची इच्छा होती. उंची आणि महागडी कापडं,कपडे, आभूषणं आणि इतर वस्तू फ्रान्समध्ये बनवल्या जाव्यात हे त्यानं घडवून आणलं.
कूत्यूरोद्योग- २५ सप्टेंबर

वाचा आणि प्रतिक्रिया कळवत राहा.

- नी

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तुझा दुसरा लेख अजून वाचलेला नाही. इथे डकवलेस की जरूर वाचले जातील.

नवा लेख प्रकाशित झाला की प्रतिसादही दे आणि धागाही अपडेट कर. म्हणजे लक्षात येईल. आणि या लेखनाचं पुस्तक निघण्यासाठी शुभेच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हो अपडेट करत जाईन लोकांना इंटरेस्ट असेल तर.

या लेखनाचं पुस्तक निघण्यासाठी शुभेच्छा. - थँक्स!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- नी

तुमचं लिखाण आवडलं. तुमचा विषय रोचक आहेच शिवाय तो खुलवून सांगण्याची हातोटीही छान आहे. ह्या लिखाणाचं पुस्तक कराल अशी आशा आहे. लेखमालिकेसाठी शुभेच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

தநுஷ்

लेखन खास वाटल नाही. खुप सुधारणा आवश्यक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

नक्की काय प्रकारची सुधारणा आवश्यक ते तपशिलात लिहिल्यास मला काही उपयोगही होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- नी

सहमत आहे. परंतु तुमचा इतिहास पहाता सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे.

तरी पाहू जमल्यास करु दोन चार सुचना

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ2

पारंपरिक भारतीय वस्त्रे ही विणलेलीच आहेत. शिवलेली वस्त्रे भारतात उशीरा आली. याचे कारण प्राचीन भारतीयांना शिवणकला ज्ञात नव्हती हे आहे काय? बहुधा नसावे. कारण हडप्पात प्राण्यांच्या हाडापासून बनवलेल्या सुया मिळाल्या असे वाचले आहे. तरीही, शिवलेली वस्त्रे फारशी प्रचलीत होती, असे वाटत नाही.

हवामान हे एक कारण लेखात दिले आहे. परंतु, त्यामागे आर्थिक कारणदेखिल असावे. एखादा कपडा शिवला की तो फक्त ती व्यक्तीच वापरू शकते. नेसूचे कापडमात्र घरातील इतर व्यक्तीदेखिल वापरू शकतात. तेवढीच बचत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विणलेलीपेक्षा गुंडाळलेली म्हणूया. शिवलेले असो वा गुंडाळलेले कपडे त्याचे कापड हे (चामडे वगळता) मागावर वा सुयांवर विणलेलेच असते.
आपल्याकडे शिवणकला तेवढ्या मोठ्या प्रमाणात विकसित झाली नाही. याचे कारण तलम कापडासाठी कापसाची मुबलकता आणि हवामान असे असावे असा एक अंदाज आहे.
तसेच अंग झाकणे व त्याला जोडून आलेल्या सभ्यतेच्या कल्पना या गोष्टीही आहेतच.

आर्थिक कारण हा मुद्दा नाही कारण समाजात अति श्रीमंत ते अति गरीब असे सर्व स्तर सर्व काळात होतेच की.
आर्थिक कारण असते तर निदान राजघराण्यातले लोक तरी शिवलेले कपडे वापरताना दिसले असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- नी

या संदर्भात, बचत हा मुद्दा फार महत्त्वाचा वाटत नाही. तुलनेसाठी उधळमाधळ करणारा पाश्चात्त्य समाज बघता येईल; त्यांच्याकडे शिवलेले कपडे वापरण्याचं प्रमाण बरंच जास्त होतं. आजही गरीब किंवा निम्नमध्यमवर्गीय घरांमधून आलेल्या पाश्चात्त्यांची उधळमाधळ कमी दिसते. उदाहरणार्थ, वस्तू पुरवून-पुरवून वापरणं; अन्न वाया न घालवणं; वापरलेल्या वस्तूंचा आपल्याला उपयोग नसेल तर इतरांना देणं आणि पर्यायानं आपणही इतरांनी वापरलेल्या वस्तू वापरणं.

उलटपक्षी, सभ्यतेच्या आणि शरीरप्रदर्शनाच्या कल्पना न बदलता, शिवलेल्या कपड्याला कमी कापड पुरतं आणि गुंडाळायचं असेल तर कापड जास्त लागतं. त्यातही, गुंडाळलेलं कापड दिसायला निदान बरं दिसेल आणि दिनचर्या बदलावी लागणार नाही हे गृहीत धरलं आहे. उदाहरणार्थ, लांब टांगा टाकत किंवा सायकलवरून जायचं तर विजारीला कापड कमी लागतं, दुटांगीकरण केलेल्या धोतराला जास्त. साधारण एकसारख्या दिसणाऱ्या शिवलेल्या स्कर्टाला कमी कापड पुरतं, स्कर्ट गुंडाळायचा असेल - wrap around - तर जास्त कापड लागतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खरंय हे पण आर्थिक मुद्दा बघायचा भारतीय पारंपरिक अर्थव्यवस्था आणि अर्थव्यवहारांकडेही बघावे लागेल. केवळ पैसे/नोटा/नाणी हे विनिमयाचे साधन होते का? निदान बेसिक वस्त्रांच्या बाबतीत याचा अभ्यास करावा लागेल. आपल्याकडे बार्टर सिस्टीम होती. कापूस उगवणारा शेतकरी आणि कापड विणणारा कोष्टी हे दोघेही बलुतं व्यवस्थेचा भाग होते. त्यामुळे आजच्या आणि इतिहासातल्या परिस्थितीची इतकी सहज तुलना करून चालणार नाही असे वाटते. तसेच वस्तू उपलब्ध असण्याचे प्रमाण (हातमाग-पॉवरलूम , हातशिलाई ते शिवणाचे मशिन वगैरे) हा ही एक महत्वाचा मुद्दा आहे.

आता पुढचा लेख पूर्ण करायला जाते. वरच्या सगळ्या गोष्टींवर जमल्यास लेखमालेत भाष्य करेनच.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- नी

उलटपक्षी, सभ्यतेच्या आणि शरीरप्रदर्शनाच्या कल्पना न बदलता, शिवलेल्या कपड्याला कमी कापड पुरतं आणि गुंडाळायचं असेल तर कापड जास्त लागतं.

याबद्दल एक शंका आहे.

गांधीजी पंचा नेसायचे. त्यामागे, 'माझ्या देशबांधवांना नेसायला कपडा नाही, सबब मी कपड्याची बचत करावी' असा काहीसा फंडा होता.

गांधीजींनी पंचाऐवजी बॉक्सर शॉर्ट्स घातल्या असत्या, तर त्यांचे उद्दिष्ट अधिक प्रभावीरीत्या साध्य झाले असते, किंवा कसे?

दुसरा मुद्दा म्हणजे, शिवायच्या कपड्याला भले ही कापड कमी लागत असेल. परंतु शिलाईचे काय? तो अतिरिक्त खर्चसुद्धा विचारात घ्यावयास नको काय?

(अर्थात, भारतासारख्या देशात (मॅन्युअल) लेबर कॉस्ट ही एकूण किमतीत उलथापालथ करणारी गोष्ट नसावीही कदाचित. शिवाय, लेखिका म्हणतात त्याप्रमाणे बलुतेदारी/बार्टर सिस्टिममध्ये ते हिशेब वेगळ्या बेसिसवर होत असतील वा होत नसतीलही कदाचित. परंतु हे गृहीतक जागतिक पातळीवर ताणता यावे काय?)
..........

(बाकी, सभ्यतेचा मुद्दा इग्नोरला आहे. गांधीजी पंचा नेसोत वा बॉक्सर शॉर्ट्स घालोत वा टॉवेल गुंडाळोत; आमच्या लेखी ते सभ्यच आहेत.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गांधीजींच्याबद्दल तपशिलात लिहिणार आहे. त्यामुळे आत्ता लिहित नाही. फक्त सभ्यता हा शब्द तुम्ही म्हणता त्या अर्थाने आलेला नाही. सभ्यता हा शब्द सन्स्कृती, मॉडेस्टि या अर्थानेही वापरला जातो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- नी

फक्त सभ्यता हा शब्द तुम्ही म्हणता त्या अर्थाने आलेला नाही. सभ्यता हा शब्द सन्स्कृती, मॉडेस्टि या अर्थानेही वापरला जातो.

ठीक. (संस्कृती अशा अर्थाने मराठीपेक्षा तो शक्य तोवर, अधिक करून हिंदीत वापरला जातो.किंबहुना, कदाचित त्याचमुळे तो त्या अर्थाने वापरलेला असू शकतो हे लक्षात आले नाही. पण ठीक आहे, ग्रांटेड.)

(बाकी, गांधीजी मॉडेस्ट असण्यास प्रत्यवाय नसावा. (परंतु हेही अवांतर झाले. असो.))

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

>>शिवलेले असो वा गुंडाळलेले कपडे त्याचे कापड हे (चामडे वगळता) मागावर वा सुयांवर विणलेलेच असते.

सुयांवर विणलेले कापड म्हणजे निटिंग केलेले का? एक सुलट दोन उलट वगैरे (मोजे, स्वेटरसदृश?*) ते तर खूपच अलिकडे भारतात आले असावे. (औरंगजेब टोप्या विणून पैसे मिळवीत असे म्हणतात. पण ते क्रोशे असावे का? दोन सुयांनी विणलेले तितके जुने नसावे)

भारतीय पारंपरिक कपडे शिवलेले नसतात. धोतर, साडी, मुंडासे/पागोटे, पंचा, लंगोट, कंचुकी इत्यादि. शिवलेल्या कपड्यांतले सुद्धा पारंपरिक कपडे निटिंग केलेले नसतात. स्वेटर ऐवजी बंडी/जाकीट. हातमोजे/पायमोजे तर नसतातच.
भारतात कापड म्हणजे मागावर विणलेलेच असावे.
---------------------------------------------------------------
अवांतर : कापड चोपड यातील चोपड म्हणजे चोपडायच्या गोष्टी उर्फ अळिता, उटी वगैरे सौंदर्यप्रसाधने का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सुयांवर विणलेले कापड म्हणजे निटिंग केलेले का? -- हो.

विणलेली आणि शिवलेली असे दोन गट त्यांना अभिप्रेत होते. त्यातला गोंधळ स्पष्ट करण्यासाठी लिहिलेले ते वाक्य आहे. शिवलेल्या वस्त्रांचे कापड हेही विणलेलेच असते.
पारंपरिक वस्त्रे सुयांवर विणलेली आहेत असा कुठेच दावा नाही.

भारतीय पारंपरिक कपडे शिवलेले नसतात -- हे अर्धसत्य आहे.

कापड चोपड यातील चोपड म्हणजे चोपडायच्या गोष्टी उर्फ अळिता, उटी वगैरे सौंदर्यप्रसाधने का? -- तसा अर्थ घेऊ शकता पण कापडचोपड असा एक जोडशब्द वापरला जातो मराठीत. ज्यात मूळ शब्दाला वजन यावे म्हणून दुसरा , पहिल्यासारखाच नाद असलेला शब्द जोडला जातो. दुसऱ्या शब्दाला अर्थ असेलच असे नसते. मी वापरताना तश्याच प्रकारे वापरते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- नी

वाचतो आहे!

मला टायसंबंधी एक प्रश्न आहे. तो योग्य वेळी विचारेनच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मला टायसंबंधी एक प्रश्न आहे. तो योग्य वेळी विचारेनच.

प्रतीकात्मकता, लांबी, दिशादर्शकत्व (होकायंत्रसदृश गुणधर्म) आदींबद्दल काय?

(हिंट: उगाच नाही काही त्याला कंठ-लंगोट म्हणत! असो.)
..........

'सदृश'चा खुलासा (समझने वाले को इशारा, इ.इ.):

फारा वर्षांपूर्वी मागे एकदा दुबईमार्गे भारतात आलो होतो. अटलांटाहून दुबईपर्यंतचे विमान डेल्टा या अमेरिकन विमानकंपनीचे होते. (त्यापुढले दुबईहून मुंबईला जाणारे विमान हे कोठल्यातरी स्वस्त, टंपडू कंपनीचे होते, परंतु ते येथे महत्त्वाचे नाही. तर ते एक असो.)

तर लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांत प्रवाश्यांच्या करमणुकीकरिता प्रत्येक प्रवाश्याच्या खुर्चीसमोर सहसा एक एलसीडी स्क्रीन उपलब्ध असतो, आणि त्यावरील उपलब्ध पर्यायांत सहसा विमानाचा एकंदर उड्डाणमार्ग तथा विमानाची त्या उड्डाणमार्गावरील तात्कालिक स्थिती दर्शविणारा एक नकाशाही असतो१अ, हे लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय विमानप्रवासाचा अनुभव असणाऱ्या मंडळींच्या गोटांत बहुधा सर्वज्ञात असावे१ब. त्याप्रमाणे, दुबईला जाणाऱ्या डेल्टाच्या आमच्या उड्डाणातही असा नकाशा उपलब्ध होता. मात्र...

नकाशा बनविताना दिशेच्या संदर्भासाठी त्यात कोठेतरी उत्तरेची दिशा दर्शविणारा एक छोटासा बाण अंतर्भूत करावा, असा एक संकेत आहे. सहसा सर्वच नकाशांत तो पाळला जातो, आणि लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांतले उपरोक्त नकाशेही त्याला सहसा अपवाद नसतात. मात्र...

अटलांटाहून दुबईला जाणाऱ्या डेल्टा या अमेरिकन विमानकंपनीच्या आमच्या उपरोक्त विमानातील नकाशात तसा तो नव्हता. त्याऐवजी... होल्ड युअर ब्रेथ... नकाशात मक्केची जागा ठळक करून त्याशेजारी मक्केची दिशा दर्शविणारा एक छोटासा बाण होता. आता बोला!

(ही ष्टोरी मी येथे का सांगितली, हे ज्या सुज्ञास समजले, त्यास या धाग्यातील या प्रतिसादाचे तथा विशेषतः या ष्टोरीचे औचित्य लक्षात आले असेलच. असो.)

१अ त्याव्यतिरिक्त, उड्डाणाची तात्कालिक उंची, त्या उंचीवरील तात्कालिक बाहेरचे तापमान, विमान ज्या भागातून उडत आहे तेथील तात्कालिक स्थानिक वेळ, गंतव्यस्थानाची तात्कालिक स्थानिक वेळ, आणखी किती वेळ उड्डाण बाकी आहे, अशी काही उपयोगी आणि बरीचशी तद्दन निरुपयोगी माहिती असते. तर असो.

१ब आजकाल कोणी वाटेल तो - युअर्स ट्रूली इन्क्लूडेड - उठून लांब पल्ल्याचा आंतरराष्ट्रीय विमानप्रवास करत असल्याकारणाने, हे ज्ञान बहुधा जागतिक असावे असे मानावयास प्रत्यवाय नसावा. चालायचेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

गडबड करा, लवकर लेख टाका. अच्युत गोडबोले आणि एखादी सहलेखिका "अंगात" नावाचं पुस्तक पाडण्याआधी तुमचं पुस्तक येऊ द्या

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी5
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

केवढी ही गोडबोल्याची दहशत. नीरजा, मनावर घेच गं.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रोफल ROFLROFLROFLROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लॉल! त्यांच्या एका पुस्तकावरचा ब्लर्ब पहिला आत्ता - "पहिलीपासून शाळेत पहिला नम्बर" असा cringy bio लिहायची काय गरज देव जाणे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त लेखन.

जाता जाता: पेशवाई काळात देशावरील सर्वसामान्य ब्राह्मणांचे शिरस्त्राण काय होते? रामजोशी पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे पगडी की अजून काही? पुणेरी पगडीचाच तो एक प्रीकर्सर असावासे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ब्राह्मणी रूमाल. तपशील नंतर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- नी

धन्यवाद, तपशिलांच्या प्रतीक्षेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उपक्रम स्तुत्य.

रोमन/इजिप्शन वस्त्रांचे फोटो जालावरून फ्री इमिजिज ठीक आहे परंतू
भारतात अथवा इतर देशांत फिरून काही फोटो घेतले असतील तर ते विकिकॅामन्सवर टाकून त्याच्या लिंक्स वापरणे पुस्तकासाठी योग्य ठरेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला ह्या प्रश्नाचे उत्तर निश्चित माहीत नाही की प्राचीन - मुस्लिमपूर्व - भारतामध्ये शिवलेले कपडे वापरण्याची पद्धत होती काय आणि असल्यास कितपत होती. ह्याला एकमेकांविरुद्ध उत्तरे संभवतात. तुमच्या अभ्यासामध्ये काही उत्तर सापडले असल्यास ते मला कळावे अशा हेतूने हा प्रतिसाद लिहीत आहे.

शिवलेले कपडे वापरण्याची पद्धत प्राचीन भारतात होती असे मानायला आधार म्हणजे सुई आणि धागा ह्या दोन्ही वस्तु भारतात २००० वर्षांपासून माहीत होत्या असे दाखविणारे उल्लेख आढळतात. उदाहरणार्थ कालिदासाने 'मणौ वज्रसमुत्कीर्णे सूत्रस्येवास्ति मे गति: ||' (रघुवंश १.४) आणि 'गच्छन्तीनां रमणवसतिं योषितां तत्र नक्तं रुद्धालोके नरपतिपथे सूचिभेद्यैस्तमोभि: |' (मेघदूत पूर्वमेघ ४०) असे सूत्र आणि सूचि ह्यांचे उल्लेख केले आहेत. 'सिव् (४ प)' असे 'शिवणे' ह्या अर्थाचे क्रियापद आणि त्यापासून निर्माण झालेले 'सीवन, सेवन, स्यूति' असे शब्द ठाऊक आहेत. आपटेकृत संस्कृत-इंग्लिश शब्दकोषामध्ये 'शिंपी' ह्याचे संस्कृत समानार्थी शब्द 'सौचिक, सूचिक' असे दाखविले आहेत आणि 'शिंपीकामा'ला 'सूचिकर्मन्' म्हटले आहे. तरीपण माझ्या मर्यादित वाचनामध्ये 'सीवन, सेवन, स्यूति, सौचिक, सूचिक, सूचिकर्मन्' हे शब्द मला कोठेच वापरलेले आढळलेले नाहीत.

वात्स्यायनाच्या ’कामसूत्रा’मध्ये 'विद्यासमुद्देश' नावाच्या प्रकरणात सुसंस्कृत व्यक्तीला माहीत असायला हव्या अशा ६४ कलांच्या यादीमध्ये 'सूचीवानकर्माणि' ह्या कलेचा उल्लेख आहे आणि टीकाकार यशोधर (१३वे शतक) आपल्या 'जयमङ्गला' नावाच्या टीकेमध्ये ह्याचे स्पष्टीकरण 'सूचीवानं त्रिविधं - सीवनम्, ऊतनम्. विरचनम्, तत्राद्यं कञ्चुकादीनाम्, द्वितीयं त्रुटितवस्त्राणाम्, तृतीयं कुथास्तरणादीनाम्" असे देतो. (अर्थ - सूचीवानकर्म तीन प्रकारचे असते, शिवणे, रफू, विणणे, पहिले कंचुकी इत्यादींसाठी, दुसरे फाटलेल्या वस्त्रांसाठी, तिसरे कुथ (झूल), आस्तरण (गालिचा अथवा चटई) इत्यादींसाठी.) येथेच पुढे शेखरक, आपीडन ह्यांचा उल्लेख आहे. पैकी शेखरक म्हणजे पागोटे, पगडी इत्यादि शिरोभूषणे, आपीडन म्हणजे त्यावरचे नान प्रकारचे शिरपेच.

ह्यावरून असे दिसते की स्त्रियांची कंचुकी (आणि पर्यायाने कंचुक, जो पुरुष वापरत असत) हे शरीराच्या वरच्या भागाचे वस्त्र शिवलेले असे. ’वारबाण’ नावाचे वस्त्र पुरुष वापरत असत, ज्याचा अमरकोशातील अर्थ ’चिलखत’ असा आहे पण अन्यत्र त्याला overcoat असाहि अर्थ दाखविलेला दिसतो.

शिवणकलेशी संबंधित इतके शब्द उपलब्ध असतांना स्त्री-पुरुषांच्या शरीराच्या वरच्या भागाच्या कपड्यांचे उल्लेख मात्र जवळजवळ दुर्मिळ आहेत असे का हे माझे विचारणे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुईच्या अग्राइतक्या भूखंडाचा उल्लेख नाहीका?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

हे उल्लेख उत्तरकालीन प्रक्षेप असू शकतील.

भारतीय/हिंदू संस्कृती (किंवा पौराणिक) म्हणून जे कपडे मानले जातात त्यात शिवलेले कपडे दिसत नाहीत. आज चोळी ही पारंपरिक समजली जात असली तरी पूर्वी ती तशी नसावी. अमर चित्र कथा हे स्टॅण्डर्ड म्हणता येणार नाही पण त्यातील महिला चोळी घातलेल्या दाखवलेल्या नसतात. शिवाय कुणा वडार समाजातील व्यक्तीचे आत्मचरित्र वाचले होते त्यात त्या लेखकाची वहिनी चोळी घालत असे म्हणून कुटुंबातील लोक नाराज होते असे त्यांनी नोंदवले आहे. तेव्हा शिवलेली चोळी ही परंपरेतील वस्त्र नसणार. बाकी साडी, धोतर, लंगोट, मुंडासे हे न शिवलेले असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

वा!
तुमच्याकडे तपशिलांचा खजिना आहे.
स्त्रियांच्या वरच्या भागाच्या कपड्यांचे उल्लेख खूप कमी आहेत याचे एक कारण असावे ते म्हणजे गुप्त काळापर्यंत तरी छाती आच्छादण्यासाठी वेगळे काही शिवलेले प्रकरण वापरणे हे तसे खूप कमी होते. निदान तसे काही वापरले जाण्याचे संदर्भ तरी फार कमी मिळतात. उत्तरीय वा शालीने शरीराचा वरचा भाग झाकून घेणे आणि फारतर स्तनपट्टा वापरणे हेच जास्त आहे.
तुमच्या प्रश्नाचे अजून ठोस उत्तर देण्यासाठी खूप जास्त तपशिलात अभ्यास करावा लागेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- नी

३. अंगाभोवती कपडे गुंडाळून वस्त्रे तयार करण्याची आयडिया फक्त भारतीय उपखंडातली नसली तरी अंतरीयाचे किंवा कमरेवर बांधलेल्या वस्त्राचे काष्टा घालून दुटांगीकरण हे मात्र केवळ भारतीय उपखंडातच दिसून येते.
- २७ मार्चला प्रसिद्ध झालेला लेख 'साडी नेसणं...'

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- नी

मला वाटते की महाराष्ट्रीय मध्यमवर्गी समाजामध्ये १९५०च्या दशकापर्यंत स्त्रियांनी नऊवारी नेसणे हीच मान्य प्रथा होती. पाचवारी आलेली होती पण जुन्या आणि पारंपारिक विचारांच्या घरांमध्ये तिला अजून मान्यता मिळाली नव्हती. माझी आई, अनेक काकू आणि आत्या, अन्य त्यांच्याच वयाच्या 'सवाष्ण' म्हणून बोलविण्याच्या टाइपच्या स्त्रिया सर्रास नऊवारीतच असत. १९५०-५५ नंतर लहान वयाच्या काकू, आत्या पाचवारीत दिसू लागल्या. अशा घरांतील स्त्रिया समारंभांना जातांना शेलाहि पांघरून जात.

त्या काळातील उच्चशिक्षित स्त्रियांमध्ये इरावती कर्वे आणि दुर्गा भागवत ह्या नेहमी नऊवारी नेसत. आमच्या गणिताच्या प्राध्यापिका मधुमालती आपटे ह्या पाचवारीत असत.

त्या दशकामध्ये 'सकाळ' हे पत्र अद्यापि ना.भि परुळेकरांच्या ताब्यात होते आणि वाचकांच्या पत्रव्यवहारांमधून अनेक वाद खेळले जात. त्यांमध्ये 'सकच्छ की विकच्छ' हा वाद काही महिने चालल्याचे मला आठवते. (असाच दुसरा गाजलेला वाद म्हणजे 'अंबाडा की वेणी'. पंगतीत वाढतांना वेणी आमटीत बुडायची शक्यता असते असा मुहतोड मुद्दा अंबाडापक्षाने उपस्थित केला होता.)

एक मनोरंजक आठवण. माझ्या कॉलेजच्या पहिल्या वर्षामध्ये दिसायला सुंदर दिसणारी आमची एक वर्गभगिनी नऊवारीमध्ये कॉलेजात यायची. तेव्हाहि ते लक्षणीय होते कारण अन्य सर्व कॉलेकजकन्या पाचवारीमध्ये असत. (अर्थात इतकेच, काही तुरळक स्कर्टमधल्या मुली सोडल्या तर जीन्स, पंजाबी सलवार-कमीज कोणी कल्पनेतहि पाहिला नव्हता.) ह्याचे कारण असे होते की तिचे वडील जुन्या कर्मठ विचारांचे होते आणि नऊवारीतच कॉलेजात गेले पाहिजे ह्या अटीवर तिला कॉलेजप्रवेशाला मान्यता वडिलांनी दिली होती. काही दिवसांनंतर हितचिंतकांच्या सल्ल्यावरून वडिलांनी निर्बंध शिथिल केला आणि अन्य चारचौघींसारखी तीहि पाचवारीत दिसू लागली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पंगतीत वाढतांना वेणी आमटीत बुडायची शक्यता असते असा मुहतोड मुद्दा अंबाडापक्षाने उपस्थित केला होता.

हा हा हा हा हा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमच्या तिसऱ्या लेखामध्ये भारतीय संस्कृति पश्चिमेकडे गांधारापर्यंत पोहोचली होती असा उल्लेख आहेच. त्याबरोबरच ती पूर्वेकडे कंबोडिया, थायलंड, लाओस, वियेतनाम, मलेशिया, इंडोनेशियापर्यंत पसरली होती हेहि माहीत आहे. ज्याला Brahminical Hinduism म्हणता येईल असा हिंदु धर्म १५व्या शतकापर्यंत त्या भागात चांगला जिवंत होता आणि शेकडो मंदिरांचे आणि शिल्पांचे अवशेष ह्यावरून त्या कालापर्यंत पुरुष आणि स्त्रिया ह्यांची वेषभूषा कशी होती ह्याचे उत्तम दर्शन घडते. त्यासाठी पुढील काही चित्रे पहा:


सूर्यवर्मन दुसरा आणि मन्त्रिगण. अंगकोर वाटमधील भित्तिशिल्प (Bas relief)
गजारूढ सूर्यवर्मन् दुसरा आणि सैन्य

बाजार - बायोन मंदिर, बाहेरची गॅलरी

पाकसिद्धि, तेथेच

अप्सरा

अप्सरा

ख्मेर आणि चम्पा सैनिकांमधील हातघाईची लढाई, बायोन मंदिर, बाहेरची गॅलरी

सैन्यासोबत निघालेले कुटुंब, बरोबर त्यांचे दोन कुत्रेहि आहेत.

सूकरमांस, शेजारी रिब्ज उघड्या विस्तवावर शेकत आहेत

आसन्नप्रसवा स्त्री
 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे सगळे आहेच. परंतू लेखमालेचा प्रिमाइस वेशभूषेचा इतिहास हाच असला तरी फोकस तपशील वा इतिहास सांगणे हा नाही. शरीर सजवण्याच्या इतिहासाकडे अनेकविध कोनांमधून कसे कसे बघता याची रिसर्चर्स नसलेल्या, माझ्यासारख्या सामान्य माणसांना ओळख करून देणे हा उद्देश आहे.
तसेच १००० शब्दमर्यादा असलेल्या लेखामधे इतक्या तपशिलात जाऊन लिहिणे शक्यही नाही.
केवळ ड्रेपड गार्मेंटस हा विषय एका मोठ्या पुस्तकाचा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- नी

लेख आणि प्रतिसाद आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

४. उगाचच शरीर झाकून ठेवण्याला नकार देणारी, शरीराचे आकार-उकार स्पष्ट करणारी वस्रं ही आपल्या भारतातच अस्तित्वात होती. ऐकायला, वाचायला गैरसोयीचं वाटलं तरीही हे आपल्याच महान संस्कृतीत घडलं..
२४ एप्रिलचा लेख झाकपाक

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- नी

गुड !! तुमच्या लेखनात अंमळ सुधारणा दिसत आहे.

टिकवून ठेवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

आवडलं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लंगडा आला रे

५. नवीन प्रदेश पाहून, तिथल्या नवीन आणि मजेमजेच्या गोष्टी प्रवासी लोक आपल्या बरोबर घेऊन येतात. नवीन आलेल्या पद्धती आणि स्थानिक पद्धतींचा मिलाप होतो आणि संस्कृतीची कथा नवं वळण घेते.. ३० मे रोजी प्रसिद्ध झालेला लेख 'आपलं काय काय म्हणायचं?'
दुव्यावर सगळ्या इमेजेस घ्यायचा त्यांनी कंटाळा केलाय तस्मात इमेजेस बघायच्या असतील तर इपेपर ला पर्याय नाही.
इपेपरची इमेज द्यायची आहे पण इथे इमेज कशी द्यायची ते विसरले.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- नी

ह्या दुव्यावर इ-पेपरचं पान दिसेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्व भाग आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहाव्या आणि सातव्या लेखाचा दुवा दिला आहे.
६. "ब्रिटिश भारतात आले तोपर्यंत भारताच्या वस्त्नकलेनं खूप प्रगती केलेली होती. भारतभरात प्रदेशानुसार कापड विणण्याचे प्रकार, त्यावरची नक्षी, कलाकुसर, कापड रंगवण्याची भारतीय साधनं आणि प्रक्रि या या सर्व गोष्टींचं प्रचंड वैविध्य होतं. काश्मिरी शालींबरोबरच याही सगळ्याची युरोपातून आलेल्या व्यापार्‍यांना भुरळ पडली. "
भारतीय वारसा - २६ जून

७. "एखाद्या संस्कृतीशी जोडलेली प्रतीकं, चिन्हं यांची देवाणघेवाण होणं हे अपरिहार्य आहेच,काही प्रमाणात!ते स्वागतार्हही आहे. नक्की किती आणि काय योग्य आणि अयोग्य याविषयी मात्र अजून संभ्रम आहेत."
थांब सेलिना बिंदी लावते! - ३१ जुलै

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- नी

संपल नाही का अजून कापड फाडणं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

आठव्या व नवव्या लेखाचे दुवे
८. रोमानिया देशाचं फॅशनला वाहिलेलं एक मासिक.बिहोरच्या लोकांबरोबर त्यांच्या पारंपरिक भरतकाम कलेसाठी उभं राहिलं. आयुष्यभर भरतकाम करणा-या हातांनी आपल्या सुया, कात्र्यांनीशी लढायचं ठरवलं. बिहोरचे लोक अणि हे मासिक यांनी एकत्र येऊन बिहोर फॅशनचा एक ब्रॅण्ड तयार केला. आपल्या हातांनी बनवलेल्या सगळ्या पारंपरिक वस्तू योग्य नफा आकारून, पण तरीही सामान्य माणसाला परवडेल अशा किमतीत ऑनलाइन विकायला सुरूवात केली. थोड्याच दिवसात दणदणीत विक्रीचा एक उच्चांक गाठला गेला.
बलाढ्य दुष्टाचा पराजय आणि इतर गोष्टी - २८ ऑगस्ट

९. युरोपातले उच्च खानदानी लोक आणि सत्ताकेंद्र यावर फॅशनच्याद्वारे नियंत्नण ठेवण्याची चौदाव्या लुईची योजना होती. उच्च अभिरूची, चोखंदळ,शानदार राहणीमान, विलासी जीवन या गोष्टींचं केंद्र फ्रान्स असलं पाहिजे अशी त्याची इच्छा होती. उंची आणि महागडी कापडं,कपडे, आभूषणं आणि इतर वस्तू फ्रान्समध्ये बनवल्या जाव्यात हे त्यानं घडवून आणलं.
कूत्यूरोद्योग- २५ सप्टेंबर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- नी