दूध , आंदोलन वगैरे वगैरे : २ आणि अंतिम

दुग्ध व्यवसाय कॉटेज इंडस्ट्री छाप होता त्यावेळी दुधाचे कलेक्शन मुख्यतः सहकारी दूध संघ, छोट्या खाजगी डेअऱ्या आणि सरकारी डेअऱ्या यांच्याकडे असे. एक तर या अतिशय मर्यादित स्वरूपाच्या असत आणि तिथे व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान हे जुनाट आणि कमी दर्जाचे असे. बऱ्याच सहकारी साखर कारखान्यांच्या छत्राखाली दुधाच्या डेअऱ्या पण चालू झाल्या. मॉडेल सहकारी साखर कारखान्याप्रमाणेच. साखर कारखान्यांप्रमाणेच इथेही राजकीय उद्देश जास्त असे आणि अजूनही आहे. त्यामुळे दर्जा, नवीन प्रॉडक्टसवर काम, कार्यक्षमता वगैरे या गोष्टी दुय्यम. यात दूध देणारे आणि घेणारे या दोघांचेही हितसंबंध (हा शब्द इथे नकारात्मकदृष्ट्या वापरलेला नाहीये.) असल्याने आणि इतर पर्याय नसल्याने या गोष्टी फारशा एफिशियंटली होत नसूनही एकंदर गाडी चालू राही. (थोडं विषयांतर : सहकारी साखर कारखाने. दूध संघ, पेपर मिल्स यांतील भ्रष्टाचार, गैरव्यवहार यांबद्दल शहरी लोकांमध्ये एक प्रकारची तुच्छता, घृणा आढळते. गैरव्यवहार, भ्रष्टाचार काही सन्मान्य अपवाद वगळता खरेच आहेत. तरीही इतर पर्याय नसणाऱ्या ग्रामीण भागांत, सहकारामुळे होणारे चांगले सामाजिक परिणाम आणि बहुसंख्यांना त्यातून मिळणारी एक प्रकारची सोशल सिक्युरिटी या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं अन्याय्य वाटतं. अर्थात हे माझं वैयक्तिक मत.)

खाजगी डेअऱ्या चालू झाल्यावर यांत बदल झाला. पर्याय उपलब्ध झाला. मार्केट मागणी-पुरवठा ठरवू लागलं. सुरुवातीच्या काळात मिळणाऱ्या थोड्या जास्त दरामुळे आणि वेळेवर मिळणाऱ्या पैशांमुळे उत्पादक खाजगी डेअऱ्यांकडे आकृष्ट झाला. जशा खाजगी डेअऱ्या वाढू लागल्या तशी स्पर्धेमुळे उत्पादकाला एक प्रकारची बार्गेनिंग पॉवर मिळाली. मग त्यातही गैरव्यवहार सुरु झाले. एका क्युसीच्या अधिकाऱ्याच्या शब्दांत "जब हमारी मिल्क रिक्वायरमेंट बढती है, वैसे मार्केट मे व्हेजिटेबल ऑइल की बहार आती है". दुधाचं सगळं अर्थकारण आता फॅटच्या टक्क्यावर घुटमळत असल्यानं दुधात वनस्पतीजन्य तेल बेमालूम मिसळून स्निग्ध पदार्थांचं प्रमाण वाढवणं हे प्रकार वाढतात. (हे तांत्रिक दृष्ट्या कसं करतात मला माहीत नाही.) सुदैवानं याची चाचणी होऊ शकते आणि दर्जाच्या बाबतीत सजग असणाऱ्या डेअऱ्या यावर पुरेसा ताबा ठेवतात.

या सगळ्या भानगडींमधून दोन प्रकार उद्भवले. एक तर शक्यतो शहरी ग्राहक किंवा मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना पुरवठा करणाऱ्या डेअऱ्या अत्यंत कठोर कच्चा-माल-दर्जा-नियंत्रण आणि उत्पादनाचा उच्च दर्जा सांभाळून आंतरराष्ट्रीय दर्जा सांभाळतात. (अवांतर माहिती : भारतातली अनेक मोठ्या व आंतरराष्ट्रीय दर्जा सांभाळणाऱ्या मोठ्या डेऱ्यांशी अनेक राजकारणी लोकांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध आहे.)पण दुसरा एक वर्ग, जो कसं-बी-काय-बी-कुठून-बी करून गाडी हाणत आहे. या अशा प्रकारातील डेअऱ्यांची उत्पादनं शक्यतो कमी किंमतीची आणि वितरण मुख्यतः छोटी शहरं आणि ग्रामीण भागांत सापडतात.

काही विशिष्ट भ्रष्टाचाराचे रोचक प्रकार बघायला मिळतात. दुधाचे टँकर कागदोपत्री नासवून वगैरे. जास्त लिहीत नाही.

गायीचे दूध हा एक तसा जुना पण आता पुनरुज्जीवित झालेला मोठा विषय. पारंपरिक डेअरी व्यवसायात गायीच्या दुधात फॅट टक्केवारी कमी असल्याने त्याची एकंदरीत किंमत कमी असे. (उत्पादक, प्रोसेसर आणि ग्राहक तिघांनाही.) उत्पादनही त्या मानानं कमी. परंतु गेल्या काही वर्षांत नवीन उगवलेला प्रकार म्हणजे गायीच्या दुधाचे वाढलेले महत्त्व. आयुर्वेदात वगैरे गायीच्या दुधाचे महत्त्व, सुपरिणाम, वगैरे सांगितलेले आहेत. तो बहुधा असेलच. (मी या विषयात जाणकार नाही त्यामुळे काही लिहीत नाही. मी फक्त व्यवसाय दृष्टीने लिहीत आहे.) मुख्यतः समाजमाध्यमांमधून गायीच्या दुधाच्या महत्त्वाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर गेल्या काही वर्षांत झाला आहे." होल्स्टीन किंवा जर्सी गाय या गायी नाहीतच, त्या गायीसारख्या दिसणाऱ्या आणि दूध देणाऱ्या, विदेशी, सस्तन प्राणी आहेत." हे नवीन पोस्ट ट्रूथी वास्तव व्हाटस अप विद्यापीठाच्या माध्यमातून 'शास्त्रीय दृष्ट्या' सिद्ध झालेले आहेच. समाजमनात त्याला पुरेशी मान्यताही मिळालेली आहे. म्हैस व विदेशी गायी A१ प्रकारचं दूध देतात. आणि या दुधामुळे मधुमेह ते कर्करोगासारख्या भयानक व्याधी जडतात म्हणे. फक्त देशी जातीच्या गायीच A२ प्रकारचं दूध देतात आणि या प्रकारचं दूध अत्यंत गुणकारी आहे, वगैरे माहिती सध्या जोरात आहे. (मला यांतील खरंखोटं माहीत नाही. असेलही कदाचित. जसं गोल्ड स्पॉट हे पेय पूर्वी झिंग थिंग का होतं, किंवा कोक पिऊन उत्साह कसा येतो हे मला कधी कळलं नाही तसंच हे पण कळत नाही.)

पण यामुळे गायीचं A२ प्रकारचं दूध बाजारात दुप्पट-तिप्पट किंमतीला उपलब्ध आणि लोकप्रिय झालं आहे. बऱ्याच विक्रेत्यांना "हे नक्की A२ दूधच आहे, हे कशावरून?" असं विचारलं असता गुळमुळीत उत्तरं मिळतात. A२ दूध हे तेच आहे, याची चाचणी कुठे करून मिळेल असा शोध घेतला तेव्हा एखादीच प्रयोगशाळा सापडली. मग हे सर्व उत्पादक कसं काय A२ म्हणून हे दूध विकतात याबद्दल संदेह निर्माण झाला. एकंदरीत या बाबतीत कुठलेही ठोस QC टेस्ट पॅरामीटर उपलब्ध नसल्याने या बाबतीत गैरव्यवहार करायला भरपूर संधी आहे असं आजचे चित्र. (अवांतर : एका मध्यम आकाराच्या डेअरीच्या परिचित फॅक्टरी मॅनेजरला, "तुम्ही का नाही A२ दूध पॅक करून विकत?" असं विचारलं असता त्याचं उत्तर गमतीशीर होतं. "आमची तयारी आहे. बरीच लोकं येतातही त्या प्रकाचे दूध आम्हाला देण्यासाठी. आम्ही त्यांना सांगतो की हे दूध नक्की A२ असणारं आहे असं प्रयोगाशाळेमध्ये चाचणी करवून त्याचा रिपोर्ट घेऊन या." हे सांगितल्यावर अजून कुणी परत आलेला नाही.)

गायीच्या तुपाचं तेच. लेबलवर "देसी गाय का (दूध से बनाया) शुद्ध घी" आणि "गाय का (दूध से बनाया ) देशी शुद्ध घी" या दोन्ही मजकुरांतील गडबड साधारणपणे ग्राहकाच्या लक्षात येत नाही. देशी, गाय आणि घी हे तिन्ही किवर्डस दोन्हीकडे असल्याने भाबडा शहरी ग्राहक सहज गंडू शकतो. (मंडळी, एकदा विकत घेतलेल्या तुपाच्या पॅकचं लेबल बघा. )

संप, उत्पादक, उत्पादनाची कॉस्ट आणि प्रॉडक्टला मिळणारी किंमत हे गणित माझ्या आकलनापलीकडचं आहे. वेगवेगळ्या भागांत उत्पादकता, ऋतूमान, दर वेगळे. या विषयी कुणी तज्ज्ञानं सखोल वस्तुनिष्ठ भाष्य करण्याची आवश्यकता आहे.

एक नक्की, गायीच्या दुधाच्या उत्पादकाची अलीकडे आलेल्या गोवंशहत्याप्रतिबंधक कायदयाने वाट लागली असावी असं सामान्यज्ञान सांगतं. (मी यात पक्षीय भूमिका घेत नाहीये. बऱ्याच राज्यांमध्ये गोहत्याबंदी कायदा काँग्रेसच्या काळात पास झाला होता. अंमलबजावणी होत नसेल कदाचित. पण असो.) गाय आणि दूध या गोष्टींकडे व्यवसाय-इंडस्ट्री असं न बघता केवळ भावनिक दृष्टिकोनातून बघत राहिलो तर हा व्यवसाय कसा टिकू शकेल? प्राणी भाकड झाल्यावर मालकाला फक्त खर्च आणि खर्च. भाकड झालेलं जनावर कसाईखान्यास विकण्याची बंदी. हे म्हणजे एखाद्या स्मॉल स्केल इंजिनिअरींग कारखान्याला एखादं मशीन कायमचं अनुत्पादक झाल्यावर ते विकण्यास, भंगारमध्ये टाकण्यास बंदी आणि त्याच्या देखाभालीचा खर्च चालू ठेवण्याची कायमची जबाबदारी मालकावर असं झालं. अशा प्रकारांमुळे हा व्यवसाय टिकू शकेल का कधीही? मग दूध उत्पादकावर ही जाचक अट का? यामुळे आधीच टेकीला आलेले दूध उत्पादक अजून कमी होणार नाहीत का?

मोजक्या लोकांची भावनिक, धार्मिक संवेदनशीलता हवी की व्यवसाय आणि व्यावसायिक टिकणे हवे हा विचार आता होण्याची आवश्यकता आहे.

(या लेखात अमूल व चितळे या ब्रॅण्ड्सबद्दल काहीही लिहिलेलं नाही. कुणी तज्ज्ञ /अभ्यासकानं या विषयावर लिहिल्यास फार बरं होईल.)

डिसक्लेमर : लेखक शिक्षणानं किंवा व्यवसायानं दुग्ध व्यवसायाशी संबंधित किंवा तज्ज्ञ नाही. वरील मतं ही सामान्य निरीक्षणं आहेत, अंतिम सत्य वगैरे नाहीत. ही निरीक्षणं बरोबरच आहेत असा कुठलाही दावा नाही. कुणी ही निरीक्षणं चूक आहेत असं सप्रमाण दाखवून दिल्यास लेखक ही मतं बदलण्यास तयार आहे.

संदर्भासहित किंवा संदर्भ सोडून ही मतं पुनर्प्रकाशित केल्यास आ. ज.ना. (म्हणजे आम्ही जबाबदार नाही.)

(व्यवस्थापकीय नोंद - प्रमाण लेखनाच्या काही दुरुस्त्यांसह लेख पुनःप्रकाशित केला आहे.)

field_vote: 
0
No votes yet

अमूलमध्ये मी प्रोजेक्ट करत होतो तेव्हा अमूलच्या लोकांकडूनही "सण आला की दुधाची आवक कमी होते, कारण उत्पादक शेतकरी खाजगी हलवायांना जास्त भावाने दूध घालतात" अशी तक्रार ऐकली आहे.

अमूलवर मात्र सभासद शेतकरी आणून घालेल तितके दूध घेतलेच पाहिजे असे बंधन आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

" होल्स्टीन /जर्सी गाय ही गाय नाहीच , तो एक गायीसारखा दिसणारा आणि दूध देणारा एक विदेशी सस्तन प्राणी आहे " हे नवीन पोस्ट ट्रूथी वास्तव व्हाटस अप विद्यापीठाच्या माध्यमातून ' शास्त्रीय दृष्ट्या ' सिद्ध झालेले आहेच .

इन विच केस, जर्सी/होल्स्टीन गायींचे मांस हे तांत्रिकदृष्ट्या 'गोमांस' ठरू नये, अत एव हिंदूंस निषिद्ध नसावे, नाही काय?

सदाशिव पेठेत ष्टेकहौसे झालीच पाहिजेत!!!!!!

( मी यात पक्षीय भूमिका घेत नाहीये . बऱ्याच राज्यांमध्ये गोहत्याबंदी कायदा हा काँग्रेस च्या काळात पास झाला होता . अंमलबजावणी होत नसेल कदाचित .पण असो.)

सवांतर गंमत: पाकिस्तानात जी दारूबंदी आहे, ती जनरल झियांची भेट नव्हे. रादर, त्याअगोदर भुट्टोंच्या कारकीर्दीत आणण्यात आलेली आहे. (भुट्टोंच्या पडत्या काळात धार्मिक विरोधी पक्षांना शांत ठेवण्यासाठी लागू करण्यात आली.)

भुट्टो स्वतः मजबूत प्यायचे. 'हाँ, मैं शराब पीता हूँ. लेकिन अवाम का खून नहीं पीता.' हे त्यांचे जाहीर विधान लई फेमस आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक2
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भाजपांच्या काऊबॉइज ना जर्सी गाय व देशी गायीतला असला तरल फरक जाणवणं
ही अपेक्षा ठेवणं अंमळ अवघड आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

सदाशिव पेठेत स्टेक हौस ?तुम्ही म्हणता तर लावायला हरकत नाही , पण खाणार कोण ? बाकी भुट्टो असं म्हणाले असले तर प्रामाणिक राजकारणी म्हणून त्यांना पाकिस्तानरत्न द्यायला हवं होतं . पण फासावर लटकवलं हो त्यांना

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचतो आहे.

म्हैस व विदेशी गायी या A १ प्रकारचे दूध देतात . आणि या दुधामुळे मधुमेह ते कॅन्सर सारख्या भयानक व्याधी जडतात म्हणे . फक्त देशी जातीच्या गायीच A २ प्रकारचे दूध देतात आणि या प्रकारचे दूध अत्यंत गुणकारी आहे वगैरे माहिती सध्या जोरात आहे .

विंदांचं 'एटू लोकांचा देश' आठवलं Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

///

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गायीच्या दुधात चार कार्बन अणुंची साखळीवाले रेणू असतात, म्हशीच्या दुधात सहा. परदेशी गायीच्या दुधातही सहा असेल. हा जो फरक आहे त्यास A1 किंवा A2 म्हणत असावेत. परंतू A1मुळे रोग होऊ शकतात हे जरा जादा वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कसले रेणू ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओमेगा-३ आणि ओमेगा-६ फॅटी अॅसिड्सबद्दल बोलत आहात का? माझी ऐकीव माहिती, ओमेगा-६ अधिक चांगलं असतं आणि गायीच्या दुधात ओमेगा-६ असतं. बापट, त्याबद्दलही लिहाल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

A 1 आणि A 2 ही चर्चा प्रोटीनबद्दल आहे . फॅटी acid बद्दल वाद नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खाद्यतेलात नाही का बदाम, ओलिव,खोबरे, शेंगदाणे,तीळ, करडइ इत्यादिच्या तेलात रेणूतल्या कार्बन अणूंची संख्या वेगवेगळी सहा ते तीस असते तसं.
( पचायला हलकं - जड त्यावर ठरतं.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आचरट बाबा , नेचर हे रिसर्च जर्नल सध्यातरी संशोधन क्षेत्रात अत्यंत दबदबा असलेले , आदरणीय मानले जाते ( असेच दुसरे जर्नल म्हणजे सायन्स )
यामध्ये या विषयावर २०१७ मध्ये प्रकाशित झालेल्या आर्टिकलची ही लिंक. हे वाचणे . यातील निष्कर्ष कॉपी पेस्ट करत आहे . या पेपरचे निरूपण करण्याकरिता रा रा मिलिंदराव पदकी यांना आवतण . ( मालक मंडळी बोलवा मिलिंदरावांना याकरता . रा बा यांच्या जवळच राहतात हे . )
https://www.nature.com/articles/nutd201716
Conclusions:
The evidence for milk and, particularly A1 β-casein, as a primary dietary trigger for type 1 diabetes is intriguing although causation remains unproven. The ecological evidence across populations is particularly strong. Exclusive breastfeeding is widely regarded as being protective against type 1 diabetes in early infancy, but its benefits may be lost if the mother supplements breast milk with cows’ milk formula, or if the duration of breastfeeding is too short. It is also conceivable that some dietary triggers might cross into breast milk. These factors might contribute to the inconsistencies in the reported associations between breastfeeding and type 1 diabetes. Latitude acting as a proxy for vitamin D exposure has been suggested as a potential causal factor, but hypotheses linking vitamin D as a causative trigger in type 1 diabetes have been unrewarding. Thus, we suggest that factors such as vitamin D may act as influencing or modifying factors, but not causal factors. Furthermore, the geographical variability and the chronological changes in type 1 diabetes incidence suggest that changes to influencing factors and permissive gut factors may have altered (for example, gut microbiome profiles), contributing to the increasing incidence of type 1 diabetes.

If A1 β-casein is indeed the dominant causal trigger, then the apparent inconsistent and therefore puzzling results with previous milk studies may be explained. For example, the widespread geographical variation in A1 to A2 β-casein ratio of milk products combined with variable β-casein content of infant formulas, a consequence of different casein to whey ratios of the formulations, may complicate the interpretation of the data.

There are particular challenges associated with prospective studies investigating milk per se as causative of type 1 diabetes. These challenges relate to the ubiquity of milk in the diets in developed countries and the long-term nature of any trials. Influencing factors include the potential protective effects of breastfeeding and its duration, and whether or not all bovine milk is excluded from the diet of the mother as well as the baby. However, the potential role of A1 β-casein as a causative trigger for type 1 diabetes could be resolved by prospective studies in genetically at-risk individuals, using milk diets from birth that do not contain A1 β-casein, but which contain β-casein of the A2 type exclusively.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण3
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तिकडचे लोक रेकमेंड करणार आणि इकडचे हो हो करणार.
डाइबेटिस कशाने होतो किंवा होतच नाही हे अजून सिद्ध झालेले नाहीच.
आता मुळात कमी दूध देणाऱ्या देशी वशिंडवाल्या गायी पाळणारच कोण?
(मेडसन संशोधन - निष्कर्ष यात बराच पैसा गुंतलेला आहे आणि त्या चक्रात बरेचजण फायदा करून घेत आहेत.)
अवांतर -
# काविळ - जॅान्डिस याचे A,B,C,D वगैरे फरक करून प्रत्येकाची वेगळी औषधे इन्जेक्शने, पण इकडे या सर्वांवर एकच औषध कसे काय लागू पडते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गायींना वशिंड असतं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नसतं?????

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अनेक देशी ब्रीड च्या गायींना (आणि बैलांना पण ) वशिंड असते . उदाहरणार्थ : गीर , कांकरेज वगैरे .
अवांतर माहिती : ( गाईन मधील ) देशीवाद्यांचं असं म्हणणं आहे की : वशिंडातच सूर्यनाडी असते . त्यामुळेच त्या दुधात औषधी गुणधर्म असतात .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वशिंड - काही वेगळा अर्थ आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बायकांना अॅडम्स अॅपल (मराठी?) नसतं आणि गायींना वशिंड नसतं (बैलांना वशिंड असू शकतं, पण बैल दूध देत नाहीत) असं मी आत्तापर्यंत समजत होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वशिंड - पाठीवर मानेपाशी असणारा उंचवटा. परदेशी गायी बैलांस नसतो. हा अर्थ.
( कृष्णाची चित्र पाहा सर्व गायींना दाखवली आहेत.
नबा, त्यात बैल, वळू असतीलच. कळपात गायी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. gettimages link
आता यावरून बऱ्याच शक्यता नबा वर्तवतीलच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोक पिऊन उत्साह कसा येतो

कोकमध्ये कॅफीन असतं. कॉफीच्या ज्या बियांमधून कॅफीन काढून घेतात, कॅफीनमुक्त कॉफीसाठी, ते कॅफीन कोकमध्ये मिसळलं जातं. कॅफीनमुक्त कोकमुळे एरवी उत्साह येणार नाही. मात्र जाहिराती, पियर प्रेशर किंवा इतर काही कारणांमुळे प्लासिबो परिणाम होऊ शकतो.

बापट, लेख उत्तम. नेचरमधला पेपरही दिलात ते उत्तम. पण अर्धवट माहिती देऊन सोडून का देता? 'हे नंतर कधी तरी' असं म्हणत तुम्हीच मुद्दे काढलेले आहेत. त्यावर लिहा की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

++'हे नंतर कधी तरी' ++
या सदरातील बातम्या फक्त कट्टा करताना , वाचिक अभिनय करून सांगितल्या जातील . तर आपण कधी चुकून माकून भारतात आलात आणि कट्टा झाला , आणि तेव्हाही तुमचा या विषयातील इंटरेस्ट जागृत असला तर सांगीन ( तुमच्या देशात मी यायची सुतराम शक्यता नाही, म्हणून तुम्ही भारतात आलात तरच वगैरे. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चिडू नका हो, द्या की थोडी प्लसिबो माहिती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमच्या देशात मी यायची सुतराम शक्यता नाही,

यापेक्षा, तुमच्या घरी मी येण्याची सुतराम शक्यता नाही, हे पटलं असतं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

कारण बापट माझ्याच देशात राहतात. Tongue

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अरेच्या , माझा समज की तुम्ही नंदनवनाचे नागरिक !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जिथे मोदी,
जिथे अमित शहा,
जिथे रिलायन्स,
जिथे अदाणी,
जिथे नोटबंदी,
जिथे जीएसटी,
जिथे गोरक्षण,
तिथेच नंदनवन.

चाल - जहां पांव में पायल, हाथ में कंगन हो माथे पे बिंदीया.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कॅफिन शारिरिक क्रिया सौम्य करतं ( /चहातलं निकोटिन वाढवतं)
# सरकारी इस्पितळात ओपिडीमध्ये ददेतात ते APC चे पुडे! अॅस्पिरिन+ फिनासेटिन+ कॅफिन. स्वस्त आणि निम्मे पेशंट किंवा निम्मे रोग यानेच बरे होतात.

ओमिगा - अल्फा हे सर्व अचरटपणा आहे. याने काही होत नसावे. खाऊन जिरवण्याची व्यवधानंच गायब झाल्याने रोग होतात. पूर्वी लढायांसाठी बळच लागायचं. ५०-६० किलो वजनाने गडी कसे लढणार? सकाळी सिरिअल पोहा, दुपारी फ्रुट, संध्याकाळी हाफ चपाती खाऊन?
राजस्थानातल्या वीरांची लोखंडी चिलखतं घालून जड तरवारी कशा फिरणार ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझी मतं पोरकट वाटली किंवा पटलेली नसावीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पोरकट किंवा अपटनिय वगैरे नाही . खरं तर कळलं नाही ....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अति सुपाच्य आहार घेत राहिल्याने अन्नातले मोठे रेणू मोडण्याची शरिराची क्षमता हरवत चालली असेल. असं थोडक्यात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> गाय आणि दूध या गोष्टींकडे व्यवसाय-इंडस्ट्री असं न बघता केवळ भावनिक दृष्टिकोनातून बघत राहिलो तर हा व्यवसाय कसा टिकू शकेल? प्राणी भाकड झाल्यावर मालकाला फक्त खर्च आणि खर्च

भाकड गायींना गोरक्षकांच्या घरी (गायी) मरेपर्यंत ठेवल्या पाहिजेत तेव्हाच या बिनडोक लोकांचे डोके ताळ्यावर येईल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काँग्रेस आणि भाजप मध्ये काय फरक आहे?

काँग्रेसी स्वयंघोषित समाजवादी तर भाजप गोंधळलेले समाजवादी .

काँग्रेस आणि भाजप मध्ये काय साम्य?

देशाने सात दशके हलाखीच्या गरिबीत काढले त्याचे कारण हे जग भर fail झालेला समाजवाद हे अजून यांना समजले नाही.
९० नंतरच्या लिबरॅलिझशन मुळे थोडी बरी परिस्थिती आली हे सुद्धा यांच्या डोक्यात शिरत नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काँग्रेसी स्वयंघोषित समाजवादी तर भाजप गोंधळलेले समाजवादी .

हे कोणीही खरे समाजवादी नाहीतच. निव्वळ मतांवर डोळा ठेवून ते असले समाजवादी निर्णय घेतात.
भाजप आणि गोंधळलेले ? भाजपाकडे पक्का प्लान असतो. त्याप्रमाणेच सर्व काही चाललेले असते. राजकारणात ते कॉन्ग्रेसच्याही पुढे गेलेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.