काही कोडी (नवीन कोडं: २३ ऑगस्ट)

इंटरनेट न वापरता सोडवलीत तर उत्तम Smile

कोडे ४ या कमेंटमध्ये आहे
कोडे ४

कोडे 1.

हे कोडं एका सत्यघटनेवर आधारित आहे.

नोव्हेंबर १९७१

स्थळ: पोर्टलॅंड, अमेरिका

पोर्टलँडहून सिएटलला जाणाऱ्या एका फ्लाईटचं वन वे तिकीट घेण्यासाठी एक माणूस विमानतळावरच्या तिकीट काउंटर वर पोचला. त्याने त्याचं नाव "कूपर" असं सांगितलं. त्याने काळा गॉगल घातलेला होता आणि त्याच्या हातात एक काळी बॅग होती.

काही वेळाने त्याची फ्लाईट आली. विमानात आपल्या सीटवर बसल्यानन्तर त्याने आपली सिगारेट पेटवली (त्या काळी विमानात धूम्रपानावर बंदी नव्हती) आणि फ्लाईट अटेंडंट कडून व्हिस्की मागवली.

विमान टेकऑफ झाल्यांनतर त्याने एअर होस्टेसला एक चिठ्ठी दिली. तिला वाटलं की याने ओळख वाढवण्यासाठी आपला फोन नंबर दिला असेल. तिने ती चिट्ठी न वाचताच आपल्या पर्समध्ये टाकली.

चिट्ठीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तो जवळ जाऊन तिच्या कानात कुजबुजला

"मॅडम, ती चिठ्ठी वाचा. माझ्याकडे बॉम्ब आहे."

त्या एअर होस्टेसने भुवया उंचावल्या आणि ती चिठ्ठी वाचली.

मग ती कूपरच्या बाजूच्या रिकाम्या सीटवर जाऊन बसली. तिने त्याला बॉम्ब दाखवायला सांगितले.

त्याने शांतपणे आपली ब्रीफकेस उघडली आणि त्यातले आठ छोटे लाल सिलेंडर तिला दाखवले. मग त्याने त्याच्या मागण्या तिला सांगितल्या.

"मला २००,००० अमेरिकन डॉलर्स आणि दोन पॅराशूट पाहिजेत. जेव्हा विमान सिएटलला उतरेल तेव्हा विमानतळावर एक पेट्रोलचा ट्रक विमानात इंधन भरण्यासाठी तयार पाहिजे."

फ्लाईट अटेंडंटने त्याच्या मागण्या पायलटला सांगितल्या. पायलटने रेडिओद्वारे जमिनीवर संपर्क करून परिस्थिती सांगितली. आपातकालीन परिस्थिती असल्यामुळे विमान कंपनीच्या प्रेसिडेंटनी पैसे देण्याचे कबूल केले. प्रेसिडेंटने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना कूपरच्या मागण्या मान्य करा आणि त्याला विरोध करू नका असे सांगितले.

Source: fb.com/MarathiKhel

ही सगळी चर्चा होत असताना विमानात बसलेल्या इतर प्रवाशांना "तांत्रिक बिघाडामुळे फ्लाईट उशिरा पोहोचेल" असे सांगितले गेले. पैसे आणताना आणि पॅराशूटची तयारी करताना दोन तास विमान आकाशात घिरट्या घालत होते. विमानतळावर F.B.I. अधिकारीदेखील पोचले होते.

विमान उतरल्यानन्तर कूपरला पैसे आणि पॅराशूट देण्यात आले. विमानात पुन्हा इंधन भरण्यात आले.

सर्व प्रवाशी उतरल्यानन्तर त्याने पायलटला विमान मेक्सिकोला नेण्यास सांगितले. विमान त्याला घेऊन पुन्हा हवेत उडाले! आता विमानात फक्त तिघेजण होते - पायलट, कूपर आणि एक फ्लाईट अटेंडन्ट.

काही वेळानंतर कूपरने विमानाचे मागचे इमर्जन्सी दार उघडले. हातात पैशाची बॅग घेऊन रात्रीच्या अंधारात त्याने खाली उडी मारली. दुसरे पॅराशूट त्याने आपल्या सीटवरच ठेवले होते.

तेव्हापासून आजपर्यंत F.B.I. त्याचा शोध घेत आहे. पण अजूनही तो माणूस कोण होता आणि त्याचं पुढे काय झालं हे कोणालाच ठाऊक नाही.

या कोड्यामध्ये तुम्हाला तो कोण होता याबद्दल काही माहिती द्यायची नाहीये. ते काम तर F.B.I. ला पण जमलं नाहीये Smile

तुम्हाला फक्त एवढाच अंदाज लावायचा आहे की त्याने दोन पॅराशूट का मागवले होते? (एकच पॅराशूट वापरायचं असताना)

वरती दिलेल्या माहितीचा वापर करा आणि आपली कल्पनाशक्ती वापरा.

कोडे 2. शाब्दिक (यातलं दुसरं सगळ्यात अवघड आहे)

kode3

कोडे 3. तिसरं "दहा नाण्यांचं कोडं" या कमेंटमध्ये आहे -

http://aisiakshare.com/comment/170880#comment-170880

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कूपरने एकच फॅराशूटची मागणी केली असती तर फॉल्टी पॅराशूट देऊन कूपरची गोची केली असती.
एफबीआयच्या मते कूपरच्या दोन पॅराशूटच्या मागणीचा उद्देश त्याला फ्लाइट अटेंडंटला घेऊन उडी मारण्याचा असावा. जर त्याने तसे काही केल्यास एफबीआय त्याला तसेच सोडले नसते व कसून तपास केला असता.
त्यामुळे फ्लाइट अंटेंडंटचा जीव धोक्यात घालू नये म्हणून चांगले दोन पॅराशूट्स दिले गेले.
परंतु कूपरने एकट्यानेच उडी घेतल्यामुळे एफबीआय जास्त खोलात शिरून शोध घेतला नसावा. (पैसे गेले तरी चालेल परंतु फ्लाइट अटेंडंटचा जीव गेला नाही याबद्दल सर्व संबंधितानी सुस्कारा सोडला असेल.)
संदर्भ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त! यानिमित्ताने कधी नव्हे ती आपली कमेंट ही आली Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. विमानात बॉंम्ब अाहे. जर कूपरने तो कार्यान्वित केला असेल किंवा ठराविक वेळेनंतर तो फुटणारा असेल, तर वैमानिक व हवाई सुंदरीस जीव वाचवावा लागेल. वैमानिकाने इजेक्ट बटन दाबताच त्याला सीटलाच असलेले पॅराशूट वापरता येईल, पण हवाई सुंदरीस मात्र वेगळे पॅराशूट लागेल. त्यासाठी दोन पॅराशूट्स मागितले.
२. हवाई सुंदरीने डोके चालवून दुसरे पॅराशूट वापरून बॉंम्ब त्यालाच लटकवून समुद्रावर सोडूम द्यावा, असे कूपरच्या मनात असावे. या प्रवासात जंगल / समुद्र येतो का ते माहीत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पॅराशूट्स हायजॅकरने मागितली आहेत. पायलट किंवा क्रूने नाही. पायलट आणि क्रू जीव कसा वाचवेल याचा विचार करून हायजॅकर थोर मन दाखवेल असं वाटत नाही.

बाकी,

वैमानिकाने इजेक्ट बटन दाबताच त्याला सीटलाच असलेले पॅराशूट वापरता येईल, पण हवाई सुंदरीस मात्र वेगळे पॅराशूट लागेल.

सिव्हिल एअरलाईनरमध्ये असं काही पॅराशूट कुठेही जोडलेलं किंवा सुटं नेलेलं / ठेवलेलं नसतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> पायलट आणि क्रू जीव कसा वाचवेल याचा विचार करून हायजॅकर थोर मन दाखवेल असं वाटत नाही.
जर कुणाचाही जीव न घेता हवे ते (म्हणजे पैसे) मिळत असतील, तर कशाला हत्या करा, असा रास्त विचार हायजॅकरने केला असेल. शिवाय जीव घेऊन अाणखी एक गुन्हा केल्यामुळे एफ बी अाय जास्त नेटाने मागे लागेल. यात हायजॅकरचे थोर मन वगैरे काही नाही.

खालच्या प्रतिसादातून: मी कुठे म्हणालो, की पॅराशूटस् वैमानिकाने मागितली?

प्रवासी विमानात पॅराशूट असतात अशीच माझीही गैरसमजूत होती, ती दूर केल्याबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जर कुणाचाही जीव न घेता हवे ते (म्हणजे पैसे) मिळत असतील, तर कशाला हत्या करा, असा रास्त विचार हायजॅकरने केला असेल. शिवाय जीव घेऊन अाणखी एक गुन्हा केल्यामुळे एफ बी अाय जास्त नेटाने मागे लागेल. यात हायजॅकरचे थोर मन वगैरे काही नाही.

पटणेबल..

मी कुठे म्हणालो, की पॅराशूटस् वैमानिकाने मागितली?

खरंय. पण मला आधी मुख्यतः पायलट आणि होस्टेसच्या कल्याणाचा / सेफ्टीचा विचार त्यात दिसल्याने तसं चुकून वाटलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपल्या कल्पनाशक्तीला दाद! खऱ्या उत्तराइतक्याच या दोन्ही शक्यता रोचक आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इजेक्ट बटण आणि सीटला जोडलेलं पॅराशूट या दोन्ही गोष्टी एअरलायनरमध्ये नसतात. शिवाय सीटला जोडलेलं सोडाच पण अन्यही एकही पॅराशूट विमानात ठेवलं जात नाही.

शिवाय

तर वैमानिक व हवाई सुंदरीस जीव वाचवावा लागेल. वैमानिकाने इजेक्ट बटन दाबताच त्याला सीटलाच असलेले पॅराशूट वापरता येईल, पण हवाई सुंदरीस मात्र वेगळे पॅराशूट लागेल. त्यासाठी दोन पॅराशूट्स मागितले.

पण.. इथे तुम्ही दिलेल्या मजकुरात दोन पॅराशूटची मागणी हायजॅकरकडून झाली आहे, पायलटकडून नव्हे. (मूळ घटनेत हायजॅकरने चार पॅराशूट मागितली आणि त्याला ती पुरवली गेली होती. तुम्ही बहुधा सुलभतेसाठी त्याची दोन केलीत. Wink )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पायलटकडे पण पॅराशूट नसते!!? असं का ?

का बोटीप्रमाणेच विमानाचा कॅप्टन ही प्रवाशांबरोबरच मरावा असं expectation असतं?

---

हो, चाराची दोन केली Smile मला ते प्रायमरी आणि रिझर्व्ह पॅराशूट काय प्रकार असतो हे कळलं नव्हतं. कोडं जास्त कॉम्प्लिकेटेड व्हायला नको म्हणून दोनच पॅराशूट!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पायलटकडे पण पॅराशूट नसते!!? असं का ?
का बोटीप्रमाणेच विमानाचा कॅप्टन ही प्रवाशांबरोबरच मरावा असं expectation असतं?

यावर सर्वांनी आपल्याला काय वाटतं ते व्यक्त करावं. रोचक ठरेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...माझीही ममव समजूत विमानात भरपूर पॅराशुटे असतात, नि विमान कोसळू लागले, तर ती तमाम पॅसेंजरांना खिरापतीसारखी वाटली जातात नि मग सर्व प्रवासी लायनीने विमानाच्या पंखावर चढून, आपापल्या इष्टदैवताचे नाव घेऊन (किंवा, नास्तिक असल्यास, कोणाचेही नाव न घेता) खाली उडी मारतात, अशीच होती.

परवापरवाच कोणीतरी भ्रमनिरास केला. (तोही किती विश्वासार्ह होता, कोणास ठाऊक.) म्हणजे, हल्लीची जी जेट विमाने असतात, ती ज्या उंचीवरून उडतात, तेथून पॅराशूटने उडी मारल्यास, बाहेरील (१) हवेच्या कमी दाबाने, आणि (२) कडाक्याच्या थंडीने पाशिंजर जागच्याजागी मरेल (म्हणजे, बाहेरच्या कमी दाबामुळे सर्वच प्रवासी विमानाचे दार उघडताक्षणी बाहेर खेचले जाऊन आकाशात फेकले गेले नाहीत तर), त्यामुळे पॅराशूटचा तेथे उपयोग नसतो, वगैरे.

पण... पण... पण... मग विमान कोसळू लागले, तर सर्वांनीच मरणे अपेक्षित असते काय? खरे काय ते तुम्हीच सांगा ना, गविकाका!

..........

फार कशाला, लहानपणी तर माझी समजूत आपण विमानात बसलो की आकाशातून उलटे (बोले तो, खाली डोके वरती पाय असे) चालू लागतो, अशी होती. आणि, कोणीतरी विमानाने इंग्लंडला गेले हे ऐकून बरेच दिवस इंग्लंड आकाशात आहे, असे समजत होतो. पण आमचे काय घेऊन बसलात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तर गवि यांच्यासाठी अजून एक प्रश्न.....

सुरक्षासंबंधी जानकारी मध्ये "केबिन में हवा का दबाव कम होनेपर" जे मास्क खाली येऊन त्यातून ऑक्सिजन मिळणार असतो तसे घडून* प्रवाशांचे प्राण वाचल्याची उदाहरणे घडली आहेत का?

सेकंडली विमानास भोक पडले तर विमानाच्या आतला हवा का दबाव ऑलमोस्ट शून्य (३५ हजार फुटावर ०.१ बार होईल असं जालावर दिसतंय) होईल का? आणि त्यामुळे मनुष्ये फुटून जाणार नाहीत का?

*हाच प्रश्न कारमधल्या एअर बॅगविषयी पण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

*हाच प्रश्न कारमधल्या एअर बॅगविषयी पण आहे.

बीन देअर, डन दॅट. त्यामुळे, होय. एस्पेशियली दुसऱ्या वेळेस, साइड एअरबॅगच्या बाबतीत.

बाकी, (१) ऑक्सीजन मास्क आणि (२) विमानास भोके पडणे यांबद्दल अनुभवाअभावी आपला पास.

(तरीसुद्धा, विमानास भोके पडल्यास, आतल्या आणि बाहेरच्या हवेच्या दाबांतील फरकामुळे प्रवाशांअगोदर विमान फुटेल, असे वाटते. (आत्यंतिक गवगवा केलेल्या 'कॉमेट' या आद्य ब्रिटिश प्रवासी जेटमालिकेबद्दल कृपया गूगलून पाहा.) त्यानंतर मग प्रवासी फुटून मरतात, की जमिनीवर आदळल्याने, हा तपशील माझ्या मते आत्यंतिक गौण आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाय हो. प्रेशर डिफरन्शिअल हे विमान फुटलेले नसताना मॅक्सिमम असेल. विमानाला भोक पडले तर ते कमी होत जाईल.

>>यानंतर मग प्रवासी फुटून मरतात, की जमिनीवर आदळल्याने, हा तपशील माझ्या मते आत्यंतिक गौण आहे

गौण तर आहेच. पण ३०००० फुटावर सुमारे उणे २७-३० से तापमानास साध्या कपड्यांत बहुधा रक्त फ्रीज होऊन जमिनीवर आदळण्यापूर्वीच मृत्यू येत असेल. पक्षी माणशी एक असे प्याराशूट वाटले तरी जगण्याची शक्यता कमी असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मोठे भोक पडून क्षणार्धात पूर्ण प्रेशर गेल्यास (!!) मास्क वगैरेंचा उपयोग नाही. हळूहळू प्रेशर लॉस होत जाऊन तेवढ्या काही मिनिटांत ऑलरेडी वेगाने विमान खाली आणण्याची (१० हजार फुटांपेक्षा कमी उंचीपर्यंत) प्रक्रिया चालू असणे या जनरली घडणाऱ्या घटनाक्रमात ते मास्क उपयोगी पडतात (दोन तीन मिनिटं तग धरण्यासाठी).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहितीबद्दल धन्यवाद !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अहो ते गवि म्हणजे साक्षात 'गगनविहारी' पायलट' आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

अहो ती दाद मला नाहीये. नीट बघा. वयामुळे तुमचं हल्ली ना... जाऊदे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जाऊ दे... नको.
सांगून टाका एकदा, वयामुळे काय काय बदल झालेत ते ! गल्ली चुकल्याबद्दल स्वारी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

पायलटच्या भागातून विमान लॅंड होताना पहायचे असेल तर पहाता येईल का? मागे एकदा इंडीगो / गोएअर मध्ये विचारले होते, पण नकार मिळाला होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाहता येणार नाही. 2001 नंतर बंदच झाले.

आता तर बाहेरून दार उघडताही येत नाही (ऍक्सेस कोड शिवाय). आणि कोणी तो एअरहोस्टेसला धमकी देऊन मिळवला आणि टाकला तरी आतला पायलट क्रू तोही ऍक्सेस कोड आतून ओव्हरराईड करू शकतो आणि दार उघडण्यापासून थांबवू शकतो.

लहान विमान (C-152, C-172 वगैरे) जॉयराईडसाठी घेतल्यास पाहता येईल कॉकपिटमधून लँडिंग.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. काही विमानातील सीटसमोरील टीव्हीवर दिसते.

२. https://www.youtube.com/watch?v=_AGPtaRmBO0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

धन्यवाद गवि, थत्ते साहेब. बहुतेक हे प्रत्यक्ष पाहणे शक्य नाही. विमान उतरताना, दिशा, रनवे दिसतो का पाहण्याचा प्रयत्न केला अाहे, पण अाकाशातून एकदा दोनदाच रनवे दिसला होता. वरील व्हिडीओमध्ये अॉटो पायलटच विमान नेव्हीगेट करत असल्यासारखे वाटले. कदाचित मानवी जजमेंटवर हे करण्याची गरज तंत्रज्ञानामुळे संपली असावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोकहो, शाब्दिक कोड्यामधला दोन नंबरचा प्रश्न सुद्धा पहा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१-
१. पाल. 'जगू शकत नाही'मागचं कारण म्हणजे ते अन्नचक्र वगैरे.
२. माझं घर म्हणजे मुंबई असा अर्थ घेतला तर भय्या जमात. जाम डार्क ह्यूमर बर्का प्रणवराव.
३. धूळ. भारतातल्या सगळ्याच क्लीनर लोकांची इकोशिष्टम धुळीवर अवलंबून आहे.
बाकी काय हवा तो अर्थ लावता येईल.

२-
१. नवीन फेमिनिस्ट मुलगी?

३-
पास.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ए बुल्ल्या, तुला विचारलं का कोणी?

@14 टॅन

1-

भारीच!! तुमची कल्पनाशक्ती जोरदार आहे. एखादे कोडे बनवून द्या आम्हाला (पेजसाठी) Smile

2-
हम्म, यात "बनवतात/देऊन टाकतात" हे क्लू मॅच होत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बनवतात/देऊन टाकतात" हे क्लू मॅच होत नाही

अहो, 'बनवतात'लाही वेगळे अर्थ आहेत की! तसा विचार करुन पहा. WinkWink
--
तुमच्या दुसऱ्या प्रतिसादात मी दहा नाण्यांचं कोडं पाहिलं. त्या कोड्याचं उत्तर मी आधी पाहिलेलं आहे, म्हणून पास दिला. पण, अगदी तर्कानेच सोडवायची अशी बरीच कोडी माहित आहेत मला: उदा. हे पहा: 'अमेरिकन मॅथेमॅटिकल मंथली' मध्ये बऱ्याच वर्षांपूर्वी हे प्रसिद्ध झालं होतं.

तुमच्याकडे अगदी समान दिसणारी आठ नाणी आहेत. त्यातील एक नाणे खोटे आहे, आणि इतर कुठल्याही नाण्यापेक्षा ते वजनाला हलके आहे. (इतर नाणी अर्थातच समान वजनाची आहेत.) तुमच्याकडे एक, दोन पारड्यांचा तराजू आहे, पण एकही वजन नाही. तो तराजू फक्त दोनदाच वापरुन खोटे नाणे ओळखता येईल का?

(गणिती लोकांसाठी: ह्यात खोटे नाणे जड असेल तर उत्तर कसे येईल? नाण्यांची संख्या आणि उपलब्ध प्रयत्न ह्यांतले नाते सांगा.
ह्यात नाणे फक्त खोटे आहे, हलके किंवा जड नाही हे सांगितल्यास कमीत कमी किती प्रयत्न लागतील? )

ह्याचं उत्तर बरंच सोपं आहे, मी जेव्हा पहिल्यांदा वाचलं तेव्हा मला आलं होतं. हे सोडवणाऱ्यांसाठी ह्या कोड्याचं मोठं रुपही आहे. ते नंतर टाकेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ए बुल्ल्या, तुला विचारलं का कोणी?

तराजू दोनदा वापरून 9 नाण्यांमधलं हलकं नाणं ओळखता येतं. तराजूच्या न वापरांत 3^न इतक्या नाण्यांतलं हलकं नाणं ओळखता येतं.

जर खोटं नाणं हलक्याऐवजी जड अाहे ही माहिती दिलेली असेल तर पद्धतीत तत्त्वतः काही फरक पडत नाही. उत्तरात पारडं वर ऐवजी पारडं खाली एवढाच बदल करावा लागतो.

खोटं नाणं हलकं की जड हे माहीत नसेल तर बहुधा अजून एक तुलना करावी लागते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तर अचूक आहे.

कोड्याचं मोठं रुप हे:
बारा सारखी दिसणारी नाणी आहेत, एक खोटे आहे. त्या नाण्याचे वजन इतर नाण्यांपेक्षा जास्त की कमी हे माहित नाही. ह्यावेळी तराजू फक्त तीनदा वापरता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ए बुल्ल्या, तुला विचारलं का कोणी?

फक्त तीन वेळा याबाबत खात्री आहे का? कारण केवळ चार नाणी असतील तरीही कुठचं नाणं वेगळं आहे हे ओळखायचं असेल तर किमान दोन तुलना करायला लागतात, व हलकं आहे की जड आहे हे सांगायचं झालं तर तीन तुलना लागतात. कोड्यात नाणं कुठचं ते ओळखायचं आहे की जड की हलकं हेही सांगायचं आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दोन्ही प्रश्नांची उत्तरं 'होय' आहेत.
(हे कोडं डोक्यात सोडवू शकत असाल, तर you belong up there with Erdös.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ए बुल्ल्या, तुला विचारलं का कोणी?

दुसर्या प्रश्नाचं उत्तर हो, म्हणजे नाणं जड की हलकं हेही सांगायचं आहे. बरोबर?

लहानपणी या प्रकारचं कोडं सोडवलं होतं. त्यात काही नाणी तराजूत टाकायची, पारडी असमतोल असतील तर काही नाण्यांची पारड्यात अदलाबदल, आणि काही नाण्यांची बाहेर शिल्लक नाण्यांशी अदलाबदल करायची अशा स्वरूपाचं उत्तर होतं. पण इथे सगळं केल्यावर चार नाणी संदिग्ध राहात आहेत. म्हणून खात्री करून घेत होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कागदाचा वापर न करता नाही जमलं, बऱ्याच केसेस कन्सिडर कराव्या लागतात. आधी सोपं व्हर्जन सोडवावं म्हणून ३ नाणी, ४ नाणी, ... ११ नाणी अशा सिक्वेन्स ने सोडवायचा प्रयत्न करायला पाहिजे असं वाटतंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी नाण्यांना 3, 3 आणि 2 अशा ग्रुपमध्ये विभागून घ्या.

तराजू वापरून 3 आणि 3 नाणी दोन पारड्यात टाका. जर एखादे पारडे हलके असले तर त्यातल्या नाण्यांची 1, 1, 1 अशी विभागणी करा. आणि त्यातल्या दोन ग्रुप चे वजन करा. (बाकीचं लॉजिक लिहिलं नाही)

--

एखादे नाणे जड असले तरी सगळ्या स्टेप याच असतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आठऐवजी 9 नाण्यांचंही 3,3,3 अशी विभागणी करून याच पद्धतीने उत्तर काढता येतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जे लोक मला बनवतात, जे लोक मला देऊन टाकतात - ही दोन्ही वाक्य तुमच्या उत्तरात कशी बसतात... फेमिनिस्ट लोकांना कोण "देऊन टाकतात"?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ट्रोल करणे- आपले करून झाल्यावर आपल्या समविचारी मित्रांनाही सुचवणे- इ. इ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ए बुल्ल्या, तुला विचारलं का कोणी?

1. हवा
2. ओळख??
3. कटाक्ष

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

3. कटाक्ष

भारी आहे हे उत्तर! अपेक्षित उत्तरामध्ये "करडा" हे विशेषण शब्दशः घेतलं आहे, पण तुम्ही अलंकारिक (फिगरेटिव्ह) अर्थ घेऊन मजा आणली.

2. ओळख??

नाही, या उत्तरात सर्व क्लू चपखल बसत नाहीत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमच्या कोड्यांची उत्तरे द्यायला त्या 'सामना' मधल्या छोकऱ्यालाच बोलवावे लागेल.
कुणीतरी अशी पटापट, गंमत आम्हां सांगेल काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

अफवा हे उत्तर आहे का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

जमलं! अभिनंदन!

अफवा याशिवाय अजून एक उत्तर म्हणजे थापा (थापा मारणे इ.)

ही दोन उत्तरं सोडून अजून एक तिसरं उत्तर पण आहे - ते उत्तर म्हणजे एक वस्तू आहे (physical object).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चे उत्तर ‘हवा’ अाहे का?
बाय द वे, उत्तरे कधी सांगणार अाहात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तर ‘हवा’ अाहे का?

हो, आमचं अपेक्षित उत्तर हेच आहे.

उत्तरे कधी सांगणार अाहात?

 • नानावटी यांचं पहिल्याचं उत्तर बरोबर आहे.
 • तिरशिंगराव यांनी सांगितलेलं उत्तर (अफवा) सोडून त्याच प्रश्नाचं अजून एक बरोबर उत्तर यायचं बाकी आहे.
 • घासकडवी यांनी सांगितलेलं उत्तर (कटाक्ष) सोडून त्याच प्रश्नाचं अजून एक बरोबर उत्तर यायचं बाकी आहे.

कोणी उत्तर देण्याआधीच मी उत्तर सांगण्यात मजा नाही. वाटल्यास आपल्या मित्रांना फॉरवर्ड करून त्यांची मदत घ्या:) तरीही नाही आलं तर मला व्यनि करा (बाकीच्यांना स्पॉईलर नको म्हणून)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोड्यांची उत्तरं आली नाहीत की फार डिप्रेशन येतं हो त्यामुळे धागा उघडला नव्हता.
दोन चित्रांमधले सहा फरक ओळखा छाप कोडी बरी वाटतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टेन्षण घेऊ नका अचरटबाबा! तुमच्यासाठी हे कोडं घ्या -

दहा नाण्यांचं कोडं

कोडं सोडवायला एक रुपयाची किंवा दोन रुपयाची दहा नाणी लागतील. कोडं सुटल्यावर फोटो इथे पोस्ट करू नका. इतरांना स्वतःहुन सोडवण्याचा आनंद घेऊ द्या Smile

@इतर लोक्स - तुमच्याकडे भारतीय करन्सी नसली तर तुमच्या देशातल्या नाण्यांचा डायमीटर सांगा - मग मी सांगतो किती आकाराचा चौकोन काढायचा.

--

हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना एक टीप - नाणे एक मिलीमीटर सुद्धा रेषेबाहेर गेले नाही पाहिजे. उदा. इथे जसं दाखवलं आहे तसं चालणार नाही

coin1

coin2

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाणी एकमेकांवर रचून चाललं असतं, आमी कुठे म्हटलं की अमुकच प्रकारे नाणी हलवा.. , बघा तुम्ही नेहमी सपाट विचार करता, थिंक आउट ऑफ बॉक्स.. असा कॉर्पोरेट ट्रेनिंग फेम लॅटरल थिंकिंगचा भाग आहे का काही?

कारण कोडं किंवा ऍक्टिव्हिटी करायला देऊन पोपट करणारे खूप गेम्स अशा ठिकाणी असतात. ट्रेनिंगमुळे दोन दिवस सुट्टी मिळते आणि तिथे जेवण छान असतं. त्याबदल्यात मेख माहीत असूनही ट्रेनराचा पोपट न करता खुद्द पोपट बनून सौजन्य दाखवण्यातच सभ्यपणा आहे.

त्याविषयी लिहायला पाहिजे. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लॅटरल थिंकिंगचा भाग आहे का

नाही, एका वर एक रचून वगैरे आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग प्रकार नाही. साधं कोडं आहे पण सोडवायला एकदम सोपं असं नाही. वेळ लागतो Smile

त्याबदल्यात मेख माहीत असूनही ट्रेनराचा पोपट न करता खुद्द पोपट बनून सौजन्य दाखवण्यातच सभ्यपणा आहे.

LoL!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनेक प्रकारे बसताहेत कॉइन्स. फोटो टाकणं शक्य नाहीये पण खास एकमेव रचना असं उत्तर नसावं. बसताहेत दोन तीन प्रकारे.

फायनल उत्तरांच्या प्रतीक्षेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला फोटो व्यनि करून पाठवा (किंवा तुमचा वॉट्सअप नंबर). कोड्याच्या अटी तंतोतंत पाळल्या - नाण्यांचा व्यास आणि चौरसाच्या बाजूची लांबी - तर फक्त एकच डिझाईन (उत्तर) बरोबर आहे (आणि त्याला ९०, १८०, २७० डिग्री मधून रोटेट करून येणाऱ्या इतर डिझाइन्स सुद्धा)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शिंपल कोडं निघालं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

या कोड्यातली इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे उत्तर हे पूर्णपणे असिमीट्रिक आहे (कोणत्याही प्रकारची symmetry नाहीये).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी उत्तर दिले आहे पण ते प्रणव यांना मान्य नाही. संध्याकाळी मान्य होईल असे वाटते.

वर प्रणव यांनी जे चित्र टाकले आहे ते माझ्याच उत्तरातले आहे. त्यांना गणिताने समजावले आहे. माझ्याकडे प्रॉपर ड्रॉइंग सॉफ्टवेअर नसल्याने एक्सेल मध्ये चित्र काढले. बघू त्यांना गणित पटते का ते !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नितीन थत्ते यांनी सॉफ्टवेअरच्या साहाय्याने वर्तुळ काढून पाठवलेलं उत्तर बरोबर आहे. त्यांचे अभिनंदन!

आधी त्यांचं उत्तर चुकीचं आहे असं मला वाटलं होतं कारण त्यांची डिझाईन वेगळी होती. जिथं जिथं या कोड्याबद्दल वाचलं होतं तिथे तिथे एकच उत्तर बरोबर आहे असं सांगितलं होतं! पण मग थत्ते यांचं गणित बरोबर आहे असं व्हेरिफाय केलं.

मग माझ्या लक्षात आलं कि २५ मिलीमीटर डायमीटर च्या दहा नाण्यांना "अपेक्षित उत्तराच्या" डिझाईनमध्ये बसण्यासाठी चौरसाची बाजू मिनिमम ८४.४ मिमी पाहिजे. कोडं बनवताना लोकांना चौरस काढायला सोपा जावा म्हणून मी ८४.४ ला राउंड ऑफ करून ८५ केलं, आणि इथेच माझं चुकलं!

ज्यांना या कोड्याचं अपेक्षित उत्तर पहायचं आहे (स्पॉयलर अलर्ट!, आधी स्वतः प्रयत्न करा मगच उत्तर पहा) त्यांनी इथे क्लिक करा https://www.youtube.com/watch?v=I-SpRl-AxI0

--

तळटीप - ज्यांना "अपेक्षित" उत्तराच्या गणितामध्ये रस आहे त्यांनी हा पेपर पहावा (मी अजून वाचलेला नाही) The Optimal Packing of Ten Equal Circles in a Square by Claas de Groot, Ronald Peikert, and Diethelm Würtz

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी सॉफ्टवेअर वापरून चित्र काढलं नाही कारण माझ्याकडे ड्रॉइंग काढण्याचे सॉफ्टवेअर नाही.
मी एक्सेलमध्ये चित्र काढून प्रणव यांना पाठवले. ते अगदीच क्रूड होते.

पण ते मी प्रणव यांना पाठवण्यासाठीच काढले होते. कोडे मी कागदावर गणित करूनच सोडवले होते. एक्सेल चित्र नंतर काढले. माझे उत्तर ८५ मिमी चौरसासाठी आहे. त्यावर कोडे अगदीच सोपे निघाले असा प्रतिसाद मी सुरुवातीलाच दिला.

मी दिलेले उत्तर इथे पाहता येईल.

https://drive.google.com/file/d/1C-Y2MQc57ODwUZJ2yb9LtjGFMKoRB2Lp/view

यात काही चूक दिसत असेल तर सांगावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एक्सेल हे सॉफ्टवेअर असं मला म्हणायचं होतं. पण तसं तुम्ही गणितानेच सोडवलं आहे !

तुमचं उत्तर बरोबर आहे, हे मी माझ्या पुरतं व्हेरिफाय केलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाकी पुढचा पत्त्याचा गेम फारफार पूर्वी एका विकांती टाकतो असं म्हणून महिनाभर तुम्ही आम्हाला शेंडी लावली आहे असं निरीक्षण नोंदवतो. मात्र अजूनही गोल्फ हा आमच्याकडे सुपरहिट चालू आहे. अन्य खेळ मागे पडलेत तूर्तास.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिती आहे पण सध्या आम्ही दोघे फार बिझी झालोत आणि विडीओ एडिटिंग ला वेळच मिळत नाहीये. पण आम्ही ज्या खेळाचा व्हिडीओ टाकणार आहोत त्या बद्दल माहिती तुम्हाला व्यनि करतो - म्हणजे तुम्ही आत्तासुद्धा तो खेळ खेळू शकाल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गुड. व्हिडीओ नंतर आला तरी चालेल. Smile

आभार्स.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

new-puzzle

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तु अर्जुन आहेस का?

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तु अर्जुन आहेस का?

लुस्क गुड..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फक्त रावण ह्याला 'हो' उत्तर देईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ए बुल्ल्या, तुला विचारलं का कोणी?

कै कळले नै.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@आचरटबाबा
काय कळलं नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशा या अर्जुन, रावणाला, बीफ आवडतं का, हे एकदा विचारलं पाहिजे. हो म्हणाले तर जबरदस्तीने खावे लागेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.