टेस्ला आणि इलॉन मस्क - भाग 2.

मस्कचा सीक्रेट प्लॅन!

2008 साली टेस्लाची 'रोडस्टर' नावाची स्पोर्ट्सकार विक्रीला आली. आणि अर्थातच त्या गाडीवर उड्या पडल्या. 80 सालच्या सुमाराला सोनीचा वॉकमन घ्यायला लोकांनी खिशातून भरमसाठ पैसे काढून दिले तसंच काहीसं. गाडीची किमान किंमत होती एक लाख दहा हजार डॉलर. पण हे दाढीचे, हे मिशीचे म्हणत दीड लाखांपर्यंत सहज जात होती. लोकांनी तेवढे दिलेही एवढं काय होतं तिच्यात?

- पोर्शा किंवा फेरारीसारख्या तितक्याच किमतीच्या गाड्यांपेक्षा अधिक चांगलं अॅक्सेलरेशन. 0 ते 100 ताशी किमी चार सेकंदांच्या आत.
- इंजिनाचा अतिशय कमी आवाज.
- टोयोटा प्रियससारख्या गाडीपेक्षाही जास्त चांगलं माइलेज.
- बॅटरीवर चालणारी असल्यामुळे 'पर्यावरण जपणारी' अशी प्रतिमा.
- इतर कुठल्याही लक्झरी स्पोर्टकारइतकीच दिसायला चांगली आणि तितक्याच फीचर्स.
- एका चार्जवर सव्वादोनशे मैलाहून अधिक प्रवास.
- या प्रकारची पहिली गाडी आपल्याकडे असण्याची कूल व्हॅल्यू.

रोडस्टर

ज्या लोकांना गाडीसाठी दीड लाख डॉलर्स काढून देणं परवडतं अशांसाठी खरंतर माइलेज महत्त्वाचं नव्हतं. पण हे सगळे गुण एकत्र असलेली गाडी, ही नक्कीच स्टेटस सिंबल होती. त्याकाळी टेस्ला अगदी मोजक्या गाड्या बनवू शके, म्हणून त्या मोजक्या गाड्यांतून जास्तीत जास्त फायदा काढणं महत्त्वाचं होतं.

या पार्श्वभूमीवर मस्कने एक जाहीर पोस्ट टेस्लाच्या साइटवर लिहिली. 'कोणाला सांगू नका बरं का, आमचा हा सीक्रेट प्लान आहे!' अशा काहीशा गमतीदार स्वरात ती पोस्ट लिहिलेली आहे. त्या पोस्टच्या शेवटी तो सारांश सांगतो

Build sports car
Use that money to build an affordable car
Use that money to build an even more affordable car
While doing above, also provide zero emission electric power generation options

Don't tell anyone.

संपूर्ण पोस्ट इथे वाचता येईल.

या सगळ्याला जी एक गमतीदार 'वर्ल्ड डॉमिनेशन' थीम आहे ती फारच छान आहे. पण त्या विनोदापलिकडे जाऊन इतर अनेक महत्त्वाचे मुद्देही तो मांडतो. "ही रोडस्टर फारच मस्त कार असेल, पण जगाला नवीन स्पोर्ट्स कारची गरज आहे का? ही कार तयार केल्याने कार्बन फुटप्रिंट कमी होईल का?" या प्रश्नाचं तो थोडक्यात "नाही" असं प्रामाणिक उत्तर देतो. मात्र, आख्ख्या जगाने जर आइस (ICE - Internal Combustion Engine - सध्याचं पेट्रोलच्या गाड्यांचं इंजिन) इंजिनं वापरणं सोडून बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या घेतल्या, तर प्रचंड फरक पडेल असं तो म्हणतो. त्यासाठी पहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे "तुम्ही गाडीच्या इंजिनात इंधन जाळलं काय, किंवा वीज निर्मिती करणाऱ्या प्लांटमध्ये इंधन जाळून वीज निर्माण केली काय, शेवटी इंधन जाळावं लागणारच. कार्बनचा हिशोब तोच होणार, नाही का?"

तूर्तास सौर, वायू, आणि जल ऊर्जा वापरल्या जात नाही असं गृहित धरू. त्यामुळे कोळसा, तेल किंवा नैसर्गिक वायू जाळून तुम्ही ऊर्जा निर्माण करणार. कुठलातरी हायड्रोकार्बन तुम्ही जाळणार. आणि त्यातून ऊर्जा निर्माण करण्यासाठी साधारण तितकाच कार्बन डायॉक्साइड (सर्वसाधारणपणे सध्या नुसतं 'कार्बन' म्हणतात) तयार होणार. तेव्हा वरकरणी हा युक्तिवाद बरोबर वाटतो. त्यात नक्की डावं-उजवं ठरवण्यासाठी तांत्रिक बाबतीत शिरावं लागतं. अगदी तज्ञांनीच विचार करावे असे बारकावे सोडले, तरीही सामान्य माणसाला कळेल असा युक्तिवाद सोपा आहे.

जेव्हा आपण नैसर्गिक वायू जाळून वीज निर्माण करतो, तेव्हा त्या इलेक्ट्रिक प्लांटची एफिशियन्सी असते 60%. ट्रान्समिशन लॉस आणि इतर लॉसेस गृहित धरले तर 52.5% इतकी रासायनिक ऊर्जा विद्युत ऊर्जेत बदलता येते. आता साधारण टेस्लाच्या गाडीच्या बॅटरीत ती साठवली, तर तिच्यापासून सुमारे 86% ऊर्जा प्रत्यक्ष गाडी हलवण्यासाठी वापरता येते. सगळं गणित केल्यावर आकडा येतो 1.14 km/MJ. म्हणजे आपण मूळ सुरू केलेल्या ठराविक रासायनिक ऊर्जेत बॅटरी असलेली गाडी 1.14 किमी जाते. याउलट आइस इंजिनं सुमारे 20% रासायनिक ऊर्जा गाडी हलवण्यासाठी वापरू शकतात. शिवाय मुळात क्रूड ऑइलचं पेट्रोल करणं, ते वाहून नेऊन सर्वत्र पोचवणं यात काही खर्च येतातच. शेवटी हिशोब असा येतो, की टोयोटा कॅमरीसारखी गाडी (हे 2006 सालच्या आकड्यांवर आधारित आहे) तितक्याच ऊर्जेत फक्त 0.28 किमी जाते. टोयोटा प्रियस, जी गॅलनला 54 मैल (लीटरला ~25 किमी) देते ती या ऊर्जेत फक्त 0.56 किमी जाते. थोडक्यात, मूळ हायड्रोकार्बनचा, किंवा इंधनाचा विचार केला तर टेस्लाच्या गाड्या तेवढ्याच ऊर्जेत सर्वसाधारण घरगुती गाड्यांच्या चौपट अंतर जातात आणि भरपूर माइलेज देणाऱ्या प्रियससारख्या गाड्यांच्या दुप्पट अंतर जातात. तेव्हा 'कुठेतरी ऊर्जा जळतेच' हा युक्तिवाद थिटा पडतो.

यापलिकडे अर्थातच हे खरं आहे की आत्ता आपल्याला जी वीज मिळते त्या सगळ्याच विजेसाठी कोळसा किंवा तेल किंवा नैसर्गिक वायू जाळावा लागत नाही. साधारणपणे वेगवेगळ्या देशांत 20 ते 25% वीज ही आजच कुठचाही कार्बन न जाळता मिळते. गेल्या वीस वर्षांतली सौर आणि पवन ऊर्जेतली वाढ बघितली तर हे प्रमाण अजूनच सुधारणार आहे हे उघड आहे. तसंच तेलाच्या किमती कधी आकाशाला भिडतील हे सांगता येत नाही. मात्र सौर ऊर्जा अजून कित्येक शतकं, सहस्रकं उपलब्ध असणार. तेव्हा कोणी प्लान करो वा ना करो, आइस इंजिनं जाऊन बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या येणार हे निश्चित. ज्या काळात सर्वच महाप्रचंड कार कंपन्या, आणि जनमतही 'इलेक्ट्रिकच्या गाड्या म्हणजे खेळण्यातल्या गाड्या' या दृष्टीने विचार करत होते तेव्हा मस्क आणि टेस्लाने पुढच्या दहा वर्षांचं नियोजन केलं. आता इतर कंपन्या 'आम्हीपण, आम्हीपण काढू अशाच गाड्या' म्हणत आहेत, तोपर्यंत टेस्लाने प्रचंड प्रगती केलेली आहे. इलेक्ट्रिक गाड्या नक्की चांगल्या का, आणि टेस्लाने नक्की प्रगती काय केली आहे हे पुढच्या भागांत पाहू.

मात्र सोनीने वॉकमन सुरुवातीला अतिश्रीमंतांना चढ्या किमतीत विकले. त्यानंतर उत्पादन वाढवून ते किंचित कमी किमतीत श्रीमंतांना विकले. असं करत करत पहिली काही वर्षं 'वॉकमन म्हणजे सोनीचा' या पातळीपर्यंत पोचले. किंबहुना वॉकमन हे सोनीचं ट्रेडनेम असलं तरी त्या प्रकारच्या उत्पादनांनाच वॉकमन हे नाव पडलं. त्यानंतर अर्थातच काही वर्षांतच इतर कंपन्यांनीही तशीच उत्पादनं बाजारात आणली. आणि शेवटी त्या उत्पादनातला 'कूल' भाग निघून जाऊन ती एक सामान्य वस्तू झालेली होती. त्या कूलपणाला पुन्हा जागृत करण्यासाठी अॅपलचा आयपॉड यावा लागला. आणि त्यांनीही सोनीप्रमाणेच पहिली काही वर्षं चांदी केली. कुठल्याही उत्पादनाच्या - संकल्पना ते कमोडेटायझेशन या पायऱ्यांमध्ये सुरुवातील पावलं उचलणाऱ्या कंपनीचा फायदा होतो, आणि इतरांना त्यांना गाठण्यासाठी धावावं लागतं. पहिल्यांदा सुरुवात करणारा नेहेमी जिंकतोच असंही नाही. पण शर्यतीत ती वेळ अजूनपर्यंत तरी टेस्लावर आलेली नाहीये.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (4 votes)

प्रतिक्रिया

वाचतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अत्यंत रोचक. धन्यवाद.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दोन्ही भाग वाचले. तांत्रिक माहिती, वाचनीयता आणि मालिकेची लय - हे सारे जुळून आले आहे. पुढील भागांची वाट पाहतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्तं!
टेस्लाने कार विकण्याच्या पद्धतीतही बदल घडवले आहेत असं वाचलं आहे. त्याबद्दलदेखील येऊ द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हा भाग देखील माहितीपुर्ण आणि रंजक झाला आहे. पुढचे भाग पटापट येऊद्यात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रोचक मालिका हो. खासकरुन फक्त स्तुती न करता तुम्ही इतर मुद्द्यांना पण लक्षात घेऊन मांडणी करताय ते आवडलं.

कुठल्याही उत्पादनाच्या - संकल्पना ते कमोडेटायझेशन या पायऱ्यांमध्ये सुरुवातील पावलं उचलणाऱ्या कंपनीचा फायदा होतो, आणि इतरांना त्यांना गाठण्यासाठी धावावं लागतं.

हे इथेही होईल असं का वाटतं? सोनी वॉकमनचं उदाहरण थोडं फिट बसत नाही कारण एक तर त्यांनी सुरुवात केलेली. इथे सुरुवात इतरांनी केली होती आधीच. त्याचबरोबर टेस्लाने बरेचसे पेटंट्स वापरासाठी खुले केलेले आहेत आणि इतर कंपन्या स्वत:च संशोधन वगैरे करत आहेतच मग इतरांना गाठायला खूप वेळ लागेल असं का होईल ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सदैव शोधात..

लेखमाला रोचक तशीच द्न्यानवर्धक आहे. आवडते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

कार अंतराळात सोडल्यापासून मस्क या व्यक्ती बद्द्ल कुतुहल होतेच.
ही लेखमाला चालू केल्याबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हात वर करून प्रश्न विचारणारे विद्यार्थी आवडतात यांना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अतिशय वाचनीय आणि माहितीपूर्ण आणि मुख्य म्हणजे समतोल लेखन आहे. वाचनमात्र असणाऱ्यांनाही प्रतिक्रिया द्यायला भाग पाडणारे!

प्रत्येक भागात आधीच्या भागांचे (व लेखमाला संपल्यावर सगळ्या भागांचे) दुवे द्यावेत ही विनंती. पहिला लेख शोधुन वाचावा लागला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!