राजीव गांधी, भा नौ पो विराट, लक्षद्वीप, सुट्टी वगैरे...

राजीव गांधींनी आय एन एस विराट विमानवाहु नौकेचा टॅक्सी सारखा वापर केला होता, असा आरोप मोदींनी केल्यानंतर जालावर थोडी शोधाशोध केली. त्यात खालील माहिती मिळाली:

डिसेंबर १६, १९८७

गेल्या वर्षी डिसेंबरअखेरीस राजीव गांधींनी आपली मित्रमंडळी व सोनिया गांधींचे कुटुंबीय यांच्या समवेत अंदमानमध्ये सुट्टी साजरी केली होती. यंदाच्या वर्षी त्यासाठी राजीव गांधी यांनी लक्षद्वीपमधल्या एका निर्मनुष्य बेटाची निवड केली आहे. सुरक्षारक्षक, कंत्राटदार व काँग्रेसचे नेते पंतप्रधानांच्या या सहलीसाठी विशेष मेहनत घेत आहेत… सध्याच्या कार्यक्रमानुसार पंतप्रधान व त्यांच्यासोबतचे पाहुणे ख्रिसमसनंतर एक आठवडा येथे व्यतित करणार आहेत.

अभियंते आणि कामगार हेलीपॅड, तात्पुरती निवासयोजना आदी उभारण्यात मग्न आहेत. नारळ व मासे वगळता बाकी प्रत्येक गोष्ट मुख्यभूमीवरून म्हणजे २०० ते ४०० किलोमीटरवरून आणावी लागत आहे, ज्याद्वारे आधुनिक सोयीसवलती देता येतील. या सगळ्या गोष्टी हवाई मार्गाने आणण्यात येत आहेत. यामध्ये आचारी, पाणी, जनरेटर्स आणि सुरक्षारक्षक व अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

डिसेंबर २८, १९८७

सामान्यांसाठी बेटांवर जाण्याचा मार्ग बंद
पंतप्रधानांच्या निर्मनुष्य अशा आर्चिपेलागोतल्या बेटावरील सहलीसाठी मुख्यभूमीपासून लक्षद्वीपपर्यंतची माणसांची वाहतूक अक्षरश: बंद करण्यात आली आहे. ज्या कोणाला लक्षद्वीपला जायचं आहे त्यांना पंतप्रधानांची सहल संपेपर्यंत थांबावे लागणार आहे. जानेवारी १५ पर्यंतचं सगळ्या बोटींचं तिकिट वितरण बंद करण्यात आलं आहे.

जानेवारी २४, 1988
किमान आठ विदेशी नागरिकांचा समावेश पंतप्रधान व त्यांच्या कुटुंबीयांच्या नववर्षाच्या या सहलीमध्ये होता. या सगळ्या ताफ्यामध्ये पुरूष, महिला व मुलं मिळून २४ जण होते. विविध गोष्टींसाठी या २४ जणांची खातिरदारी करण्यासाठी ७० कर्मचाऱ्यांची फळी सज्ज होती. बंगारामच्या सर्व बाजुच्या सुरक्षेसाठी लक्षद्वीप पोलिस व मध्यप्रदेशच्या विशेष पोलिस पथकासह १,२०० पोलिसांची फौज बंगाराम बेटाच्या परीघावर तैनात होती.
नौदलाची २४ तास नजर या परीसरावर सुरक्षेच्या दृष्टीनं होती. विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्यानुसार या सहलीसाठी चोख बंदोबस्त पुरवण्यासाठी भारतीय नौदलाच्या आएनएस विराट, आएनएस विंध्यगिरी, आएनएस तारागिरी व आएनएस मगर या युद्धनौका सज्ज होत्या.

बातम्यांमध्ये विराट किंवा अन्य युद्धनौकेवर पार्टी करण्यात आल्याचं म्हटलेलं नाही. मात्र, राहुल गांधी यांनी ते राजीव गांधींसोबत विराट वर गेल्याचं कबूल केलं आहे. तसेच, नेहरू पंतप्रधान असताना त्यांच्यासमवेत इंदिरा गांधी आणि बालवयातले संजय आणि राजीव गांधी युद्धनौकेवर असल्याची प्रकाशचित्रं पाहिली. हे सर्व वाचल्यावर काही प्रश्न मनात आले:

१. पंतप्रधानांच्या कुटुंबियांना युद्धनौकेवर प्रवेशाची अनुमती असते का? असावी का?

२. पंतप्रधानांच्या सुटीकरता एवढा खर्च करावा का? त्यांच्या संरक्षणाकरता विराट आणि सोबत अन्य युद्धनौका तैनात करणं हा नक्कीच खर्चिक मामला असावा. शिवाय मुख्य भूमीवरून सगळी सामुग्री द्वीपांवर नेणं हे पण स्वस्त नसावं.

३. पंतप्रधानांचं संरक्षण करताना राष्ट्राची सुरक्षा कमजोर झाली असावी का?

जाणकारांच्या आणि अन्य सदस्यांच्या मतांच्या प्रतीक्षेत.

===========================================================================
संदर्भ:
https://www.indiatoday.in/magazine/indiascope/story/19880131-idyllic-vac...

https://www.tv9bharatvarsh.com/loksabhaelections/nehrus-grandsons-rajiv-...

https://news.google.com/newspapers?nid=P9oYG7HA76QC&dat=19871230&printse...

https://www.indiatoday.in/elections/lok-sabha-2019/story/ins-viraat-raji...

https://indianexpress.com/article/explained/30-yrs-ago-rajiv-gandhi-in-l...

https://www.indiatoday.in/elections/lok-sabha-2019/story/rahul-gandhi-in...

https://www.loksatta.com/elections-news/indian-express-archives-30-years...

field_vote: 
0
No votes yet

१. पंतप्रधानांच्या कुटुंबियांना युद्धनौकेवर प्रवेशाची अनुमती असली, तरी त्यांच्या कुटुंबीयांनी युद्धनौकेवर जाऊ नये. नैतिकदृष्ट्या ते योग्य नाही, असं मला वाटतं.

२. पंतप्रधानांच्या सुटीकरता झालेला खर्च त्यांच्याकडून वैयक्तिकरित्या भरून घ्यावा. आणि अशा प्रसंगात शासकीय कर्मचारी, सेनादले यांना कमला लावू नये.

३. राष्ट्राची सुरक्षा सदैव महत्वाची. कोणत्याही कारणाने त्याला बाधा येईल असं वर्तन कुणीही करू नये. पंतप्रधानपदावरील व्यक्तीने याविषयी अधिक आग्रही आणि सतर्क असायला हवं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. ह्या सगळ्या प्रकरणांत काय प्रोटोकॉल, पद्धती, रीतीभाती आहेत?
२. पंतप्रधान वगैरे लोकांना औपचारिक सुट्टी वगैरे असते का? असली तर किती असते, नसली तर का नसते?
२अ. अशा सुट्ट्या घेताना राष्ट्रीय सुरक्षितता, युद्ध, दहशतवादी हल्ला किंवा असे काही महत्त्वाच्या गोष्टींकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज असते, तेव्हा कोणत्याही पंतप्रधान सुट्टीवर गेल्याची उदाहरणं आहेत का?

माझी फार काय, काहीच मतं नाहीत. कशातली काही माहिती नसताना काय मतं बनवणार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे मोदी नाहीत म्हणून तुमची मतं नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

चला बुवा. देशासमोरचे सगळे प्रश्न मिटून आता असल्या गोष्टींवर निवडणूक-निवडणूक खेळली जात्ये हे पाहून नेहरू-गांधी-पटेल वगैरे सुखात असतील जिथे असतील तिथे.

बाकी जाता जाता हेदेखील वाचलं असेलच.
'मोदी सरकार'च्या दौऱ्यांवर ३९३ कोटी खर्च!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

लेखात विचारलेले प्रश्न आणि तुमचा प्रतिसाद, यान्चा नक्की काय सम्बन्ध?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

मागे अडाणीच्या ढुंगणावरचा केस एक मायक्रोमीटरने हलला तरी तुमच्या करता तो लै मोठ्ठा इश्श्युऊ असायचा. आता अख्खि नौका नेलीय की हो! ती ही सुरक्शा दलाची!
=========
तुमच्या घरी मलाही ओळखीची नसलेली १५-२० मंंडळी पाठवतो. चालतंय का? काय होतंय. असल्या गोष्टींची चर्चा वैगेरे करणार नसाल तर रोजच पाअठवतो. चालतंय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

१९८७ साली राजीव गांधींनी हा आणि ह्याहून मोठा गुन्हा केला असेलही.
-
पण २०१९ च्या निवडणूकीशी ह्याचा काय संबंध?
भविष्यकाळाचा विचार करायची कुवत नाही तर निदान वर्तमानात तरी रहा!

असंच बोलायचं तर मग २०७८ च्या निवडणूकीतही कुणीतरी १९६० साली झालेल्या गुन्ह्यांबद्दल रान पेटवून त्याचा इश्यू करत राहील.
म्हणजे इतिहास उगाळून त्याचा काहीतरी मुद्दा बनवायचा. धूळफेक.

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१९८७ साली राजीव गांधींनी हा आणि ह्याहून मोठा गुन्हा केला असेलही.

असेलही, किंवा नसेलही. मात्र, हा (असल्यास) राजीव गांधींचा सर्वात मोठा गुन्हा नव्हे. (किंबहुना, राजीव गांधींनी आपला सर्वाधिक मोठा गुन्हा १९८७ साली केला नाही. आणि त्या (सर्वाधिक मोठ्या) गुन्ह्याच्या तुलनेत हा (१९८७ साली केलेला-न केलेला) गुन्हा काहीच नव्हे.)

राजीव गांधींनी आपला सर्वाधिक मोठा गुन्हा १९४४ साली केला. त्या वर्षी ते जन्मास आले. आणि, त्याहीपेक्षा महत्त्वाचे, नेहरू-गांधी घराण्यात जन्माला आले. असतात काही जण असे!

असो चालायचेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखात विचारलेले प्रश्न आणि तुमचा प्रतिसाद, यान्चा नक्की काय सम्बन्ध?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

लेखात विचारलेले प्रश्न आणि तुमचा प्रतिसाद, यान्चा नक्की काय सम्बन्ध?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

२०१९च्या निवडणूकीचा ह्या लेखातल्या प्रश्नांशी जेवढा संबंध आहे तेवढाच.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

२०१९च्या निवडणूकीचा ह्या लेखातल्या प्रश्नांशी शून्य सम्बन्ध आहे.

तस्मात, विषयास धरुन चर्चा करू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फारच माहितीपूर्ण!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

बरेचदा लिहिलेली ही गोष्ट आहे.

कॉलेजात माझा एक मित्र होता, आश्विन. रस्त्यातून चालताना आमच्यापैकी कोणीही काय तरी चारगटपणा केला की तो मोठ्यानं, रस्त्यावर ओरडायचा, "ओ ही माझ्याबरोबर नाहीये हो." रस्त्यावरच्या कोणाचंही आमच्याकडे लक्ष नसायचं, ते आश्विनमुळे सगळे बघायला लागायचे.

सुरुवातीला तो असा ओरडायचा तेव्हा मला लाजल्यासारखं व्हायचं. 'घालून घालून सैल होईल', ही संतोक्ती पुढे खरी ठरली. मग मीही मुद्दाम आचरटपणा करायचे, तो ओरडायचा आणि मी खिदळत बसायचे.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

२०१९च्या निवडणूकीचा ह्या लेखातल्या प्रश्नांशी शून्य सम्बन्ध आहे.

हेच- हेच जर भाजपच्या प्रवक्त्याने माईकवरून ओरडून सांगितलं तर मी ऐसीअक्षरेवर फाईव-ष्टार वाटेन.
पण ते असं बोलणार नाहीत, सबब फाईव-ष्टार मिळणार नाही.

१- ह्याचाही लेखातल्या प्रश्नांशी काहीच संबंध नाही- तुमच्या प्रश्नाचं उत्तर आधीच दिलं Biggrin

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण २०१९ च्या निवडणूकीशी ह्याचा काय संबंध?

चौकीदार चोर मंतो राजा, पण राजा तुझं खानदानच चोर है... कळला संबंध?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

इतिहास उगाळत बसणे योग्य नाही, हे खरे.
परंतु पूर्वी केलेल्या चुका परत होऊ नयेत, म्हणून इतिहास विसरून देखिल जाऊ नये, असं मला वाटतं.

---- आणि एकाने झाले गेले विसरून जायचे. मनाचा मोठेपणा की काय तो दाखवायचा. परंतु त्याच वेळी दूसऱ्याने त्याचा खराखोटा भूतकाळ उकरून गावभर अक्षता वाटायच्या, हे कितपत योग्य वाटते?

सर्वांनी स्वत:च्या वर्तणुकीला सभ्यतेचे निकष लावले, तरच त्याला काही अर्थ असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********
तोरा मन दर्पन कहलाए |
भले-बुरे सारे करमोंको - देखे और दिखाए ||

>>परंतु पूर्वी केलेल्या चुका परत होऊ नयेत, म्हणून इतिहास विसरून देखिल जाऊ नये,

पहिल्या अर्ध्या भागासाठी प्रशासकीय लेव्हलवर प्रोटोकॉल सुधारणे, अंमलबजावणीकडे लक्ष देणे या गोष्टी करायच्या असतात ना? की निवडणूक रॅलीमध्ये त्या सांगायच्या असतात? निवडणूक रॅलीत सांगण्याचा एक फायदा दिसतो तो म्हणजे पुढे सत्तेवर येणाऱ्यांना "आपण कायकाय फायदे घेऊ शकतो याचे ज्ञान करून देणे". सध्याचे पंप्र* तसे फायदे घेणारे नसतीलही पण पुढच्याचे काय सांगावे? तर कर्मधर्मसंयोगाने पुढे केव्हा राहुल गांधी किंवा देवेगौडा पंतप्रधान झालेच तर त्यांना या गोष्टी करता येऊ नयेत अशी काही तरतूद गेल्या पाच वर्षात केली आहे काय?

पहिल्या अर्ध्याभागाचे उत्तम उदाहरण जनता पक्षाच्या अल्पजीवी सरकारने घालून दिले आहे. इंदिरा गांधींनी घटनात्मक तरतुदींचा गैरवापर करून स्वत:ची सत्ता टिकवण्यासाठी आणीबाणी लादली. जनता पक्षाने सत्तेवर आल्यावर तसे भविष्यात करताच येऊ नये अशी घटना दुरुस्ती करून घेतली.

*सध्याच्या पंतप्रधानांनी आपल्या कुटुंबियांशी काहीच संबंध ठेवलेले नाहीतसे** दिसते. केवळ त्यांच्या फायद्यापुरते फोटो-ऑप करण्यासाठी त्यांना कुटुंबाची आठवण येते.
**नोटबंदी झाल्यावर मी कामानिमित्त माझ्या म्हाताऱ्या आईपासून दूर रहात असतो तर मी माझ्या कुणा मित्राला किंवा शेजाऱ्यापाजाऱ्यांना "माझ्या आईला मदत करा, तिच्याकडे काही नोटा असतील तर त्या बदलून घ्यायला मदत करा" अशी विनंती केली असती. [माझ्या हाताखालच्या माणसांना सांगितले नसते]. तसे काही पंतप्रधानांनी केले नाही. त्या अर्थी त्यांना कुणी जवळचे मित्र नसावे असे वाटते. किंवा आईला रांगेत उभे करायला लावून प्रसिद्धीसाठी त्याचा वापर केला असे म्हणावे लागेल. तर मुद्दा हा की सध्याचे पंप्र आपल्या कुटुंबियांशी संबंध ठेवून असते तर त्यांनीही कदाचित तसेच केले असते. भ्रष्टाचाराचा अभाव म्हणजे संधीचा अभाव अशी केस असू शकेल.

यातून एक प्रश्न अजून उभा राहतो की सध्या पंप्र ज्या निवडणूकीच्या रॅलीज करत आहेत त्या कुठल्या ना कुठल्या अधिकृत कामाला जोडून आहेत काय? तशा असतील तर ते त्या अधिकृत दौऱ्यावर म्हणून येतात आणि निवडणूक रॅली करतात हाही गैरवापर नाही काय? तसे नसेल तर "एकही दिवस सुटी न घेणारे पंप्र" त्या रॅलीच्या दिवशी सुटीवर असतात काय?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

प्रशासकीय पातळीवर नक्कीच सुधारणा करायला पाहिजे. पण मला वाटते या बाबतचे नियम नक्कीच अस्तित्वात असणार. नियम इतरांसाठी आहेत. त्यांनी नियमानूसार वर्तन करावे. मला मात्र ते नियम लागु होत नाही. अशी मनमानी करण्याची सवय अनेकांना असते. त्यामुळे प्रकरण अधिक गंभीर होते.
उपरोल्लेखित प्रकरण 'नियमभंग' इतकेच मर्यादित नाही, तर अधिकाराचा गैरवापर करणे आणि सरंजामशाही वृत्तीचे प्रतिक आहे. सर्वसामान्य जनता, ज्यांनी त्यांना भरभरून मते देऊन सर्वोच्च स्थानी पोहोचवले, त्यांना त्यांच्या बेजबाबदार वर्तनाबद्दल सांगणे मला तरी गैर वाटत नाही. फक्त हे जेव्हा घडले, त्याचवेळी बोलायला हवे होते. त्याचा किती उपयोग झाला असता माहिती नाही. परंतु आजकाल जनता नक्कीच पूर्वीपेक्षा अधिक सजग/जागरूक झालेली आहे. नविन अधिकारी लोकांना बदनामीची भिती असेल तर ते अशा वर्तनापासून दूर राहतील.

शेवटच्या अर्ध्या भागात तुम्ही जे म्हणता त्याच्याशी मी सहमत होऊ शकत नाही. संधीचा अभाव नाहीये. लोक आपले चेले, पित्तु , हुजरे आणि चमच्यांच्या कल्याणाची देखिल काळजी घेताना दिसतात. अगदी रक्ताचे नातेवाईकच असण्याची काही जरूरी नाही. सत्ता टिकविण्यासाठी ते आवश्यक असते म्हणे. पण प्रश्न वृत्तीचा आहे, संधीचा नाही. एखाद्या घराचं दार उघडे दिसले, तर संधीसाधु आत घुसेल, आणि त्याचा कार्यभाग साधेल. परंतु जो खरा सत्प्रवृत्त आहे, त्याला या संधीचा फायदा घ्यावा असे कधीच वाटणार नाही.

तुम्ही इथे एकापेक्षा जास्तं मुद्ध्यांची सरमिसळ केलेली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********
तोरा मन दर्पन कहलाए |
भले-बुरे सारे करमोंको - देखे और दिखाए ||

>>लोक आपले चेले, पित्तु , हुजरे आणि चमच्यांच्या कल्याणाची देखिल काळजी घेताना दिसतात. अगदी रक्ताचे नातेवाईकच असण्याची काही जरूरी नाही. सत्ता टिकविण्यासाठी ते आवश्यक असते म्हणे.

रक्ताच्या नातेवाईकांसाठी पंप्र काही करत नाहीत हे ते नेहमीच "दाखवत" आले आहेत. आईच्या नावे कंपन्या काढून कमिशन घेत नाहीत वगैरे ठीक पण आईला बँकेच्या लायनीत उभे राहण्यास भाग पाडण्याची खरे तर काही गरज नाही. तितकी सेवा मी वर म्हटल्याप्रमाणे मित्रांकरवी केली तर काही हरकत नव्हती. परंतु तिथे प्रसिद्धीचा सोस आडवा येतो.

बाकी चेले, पित्तू यांची भर केली जात आहे असा "आरोप" अगोदरच झालेला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अनेक मुद्द्यांची तुम्ही सरमिसळ करताय...

१) पुत्र कर्तव्य
२) सामाजिक बांधिलकी
३) कौटुंबिक कर्तव्य, बांधिलकी
४) प्रामाणिक व्यवहार
५) आर्थिक व्यवहार
६)मैत्री, नातेसंबंध
७) प्रसिद्धीचा सोस
इ. इ.
परंतु इथे चर्चेचा विषय आहे -- अधिकाराचा गैरवापर करणे , राष्ट्रीय साधन संपत्तीचा वापर खासगी कामासाठी करणे -- मी याच विषयाच्या अनुषंगाने उत्तर लिहीले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********
तोरा मन दर्पन कहलाए |
भले-बुरे सारे करमोंको - देखे और दिखाए ||

मी जे आई-नोटाबदली उदाहरण दिले आहे त्यात पदाचा कुठला गैरवापरसुद्धा गरजेचा नाही. परंतु प्रतिमासंवर्धन आणि प्रसिद्धीचा सोस यामुळे तेवढेही सामान्य कर्तव्य (थोर हिंदूसंस्कृतीतील मातृऋण वगैरे) केले जात नाही.

बाकी चार आणि पाच हे अगोदरच संशयाच्या घेऱ्यात आले आहेत. आणि त्यावर योग्य तो खुलासा करण्यापेक्षा भलत्याच मुद्द्यांवर बचाव करण्याचा प्रयत्न होत आहे.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पहिल्या अर्ध्या भागासाठी प्रशासकीय लेव्हलवर प्रोटोकॉल सुधारणे, अंमलबजावणीकडे लक्ष देणे या गोष्टी करायच्या असतात ना?

हो का?
मुद्दाम गुप्त देण्यासाठी असं केलंच नव्हतं असं म्हटलेत का मोदी??
प्रशासन समजावायला थोडेच ते सांगत होते?
साल्यांनो तुमचे खानदानच राषःट्रीय सुरक्शेचे धिंडोडे काढणारे होते किंवा देश मेला तरी चालेल इतके हलगर्जी होते - असं मोदींना म्हणायचंच नाही हे कशावरुन?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मढी उकरताना राजीव गांधींची वीरगळ शिळा सापडली, ' त्यावरील सूरज चांद बघून गप्प बसावे ना? पण नाही, ते खरं करण्याचा विडाच उचलला ह्या लोकांनी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ती मढी नाहीत. जिवंत भूतं आहेत. आजही देशाची लचके तोडताहेत. कोणाचा बाप भ्रष्टाचारी तर कोणाचा आजोबा भुरटा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हुश्श ! आले ब्वॉ अजो परत.

आता तरी ऐसीचा बोर्ड हलता राहील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अतिशय रोचक बोललात थत्ते. एकदा तुमची आणि अजोंची चर्चा वाचायची आहे.
तेवढे झाले की मग तुमचा मित्र गब्बर यांना बोलवा.
मग ऐसी कसं ज्वलंत , धगधगत राहील .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही घ्या....

http://aisiakshare.com/node/1944

यात इतरही लोकांनी भाग घेतला आहे. अजोंनी घडवलेली चांगली चर्चा म्हणून ही वानगीदाखल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.