माझी झोळी

दिसतात मलाही जखमा इतरांच्या वर्मावरच्या
जरि पेरत नाहि तरीही मी मीठ बाळगुन आहे

काचेच्या घरांतुनी मज बेघरावरी हो वर्षा
मऊ त्या दगडांपेक्षा मी वीट बाळगुन आहे

स्वप्नांच्या तुटण्याचा जे आवाज ऐकुनी हसती
त्यांचेही रडणे कानी मी नीट बाळगुन आहे

मी हार समजतो ज्याला त्या कर्तृत्त्वाच्या राशी
ते मोजत मोजत म्हणती 'मी जीत बाळगुन आहे'

केलेली दाने विसरुन, कर्जाचे घेउन ओझे
झगडून वाहण्याची ही मी रीत बाळगुन आहे

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मी हार समजतो ज्याला त्या कर्तृत्त्वाच्या राशी
ते मोजत मोजत म्हणती 'मी जीत बाळगुन आहे'

आवडले

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

खडे मीठ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वा ! वा !! साहेबांनी आता चक्क कविता विभागावर स्वारी केली. छान !
आपल्या अगोदरच्या लेखमालिका पुर्ण करायचं मनावर घ्या की !
आजकाल गायबच झाला आहात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अर्थगर्भ मौनातुनि मी अस्तित्व बाळगुन आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वप्नांच्या तुटण्याचा जे आवाज ऐकुनी हसती
त्यांचेही रडणे कानी मी नीट बाळगुन आहे

हा मतला (? मतलाच ना) देखील मस्त.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

छान कविता...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पद्म.

गझल..कविता... आवडली...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0