नोकरीविषयक अनुभव

एखाद्या कंपनीत आपण नोकरी करतो. ती कंपनी आपल्याला काही मोबदला देते. तो मोबदला नक्की कशाकशाचा असतो? श्रमाचा , त्या कंपनीशी निष्ठ रहाण्याचा की इन जनरलच what we bring to the table त्या त्या गोष्टींचा?

जसे मी आतापर्यंत जिथे जिथे काम केले तिथे, मला त्या कंपनीच्या रायव्हल्स चा राग येई किंवा क्वचित जर रायव्हल्स पुढे गेले तर आपल्या कंपनीचे काय वगैरे विचार मनात येत्. मी ती कंपनी क्वचित लिन्कडिन वर लाइक करे. लोकांशी बोलताना, कंपनीचे कौतुक करे. पण दुसरी कंपनी जॉइन केली की मग मागील कंपनीतिल तृटी लक्षात येत Sad . जसे प्रेम आंधळे असते तशीच कंपनीशी निष्ठा ही आंधळ्यागतच असे.

आजकाल तर सर्वांचाच कामाची कंपनी सरासरी दर चार-साडेचार वर्षाला बदलण्याचा ट्रेन्डच हे म्हणा. त्यामुळे निष्ठाही दर साडेचार वर्षाला बदलते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अर्थात असेही होते की कंपनीत जर हलकट/फडतूस सहकारी असतील तर मग ती कंपनी सोडल्यावर हायसे वाटते. कंपनीचाच इन जनरल राग येतो. गेल्या कंपनीत किमान ३ लोकं तरी रेसिस्ट होती. अनेक रीतीने आपले racism, subtle अथवा बटबटीत रीतीने प्रकट करीत. कंपनीत असताना माझ्या तितकेसे लक्षात आले नाही. त्रास खूप होई पण समहाऊ तो वर्णभेद आहे हे लक्षात आले नाही. पण नवी कंपनी जॉइन केल्यावर मात्र ते लक्षात आले.

कंपनीशी आंधळी निष्ठा-बिष्ठा बाळगण्याचे एकंदरच कारण नसते असे लक्षात आलेले आहे. तेआपल्या मजुरीचे मोल देतात आणि आपण फक्त मजुरी करायची. हा फक्त एक सरळ व्यवहार असतो. आपणही तेवढेच द्यायचे आणि एकदा गेटमधुन बाहेर पडले की काम विसरुन जायचे असा सोप्पा (पण आचरणात आणायला अवघड) नियम असतो. आणि तरीही आपण रहातो तो देश, आपण काम करतो ती कंपनी आदिविषयी आपल्याला इतकी निष्ठा (ममत्व?) का असते? खरे पहाता उद्या आपण गाडीखाली चिरडुन मेलो तर, कंपनीचा तीळमात्र फरक पडणार नसतो आणि देशालाही - आणि हे आपल्यालाही माहीत असते.

सर्वांनी आपापले नोकरीविषयक अनुभव या धाग्यात मांडले तर आवडतील. विशेषत: मला तुमचे व कंपनीचे dynamics कसे असते. त्यावरुन तुमच्या स्वभावाचा कोणता पैलू दिसून येतो ते जाणुन घ्यायला आवडेल.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

दुरुन डोंगर साजरे. कंपन्या, खाजगी संस्था इ. इ. सगळीकडे हीच बोंब आहे. वरच्या पदावर काम करणारे शक्यतो (अति) च्युत्या असतात. त्यांचे तद्दन भिकार ह्विजनं ऐकून मुस्काट फोडू वाटतं

कावलेला टूच्चेश

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

मला असे सरसकटीकरण करता येणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

दुरुन डोंगर साजरे. कंपन्या, खाजगी संस्था इ. इ. सगळीकडे हीच बोंब आहे. वरच्या पदावर काम करणारे शक्यतो (अति) च्युत्या असतात. त्यांचे तद्दन भिकार ह्विजनं ऐकून मुस्काट फोडू वाटतं

कावलेला टूच्चेश

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

पैसा मिळवण्यापुरती नोकरी करावी असं म्हण्ण्यात तथ्य असलं तरी नोकरीच्या ठिकाणी आपला बराच वावर असतो. त्यादरम्यान कित्येक गोष्टी, घटना घडतात. जी जोडलं जाण्याची जाणीव (attachment) निर्माण होते ती ह्या घटनांमुळे होत असावी.उदाहरण म्हणुन DDLJ हा चित्रपट घेउ. त्यातल्या सिमरनसाठी युरोपमधली ट्रिप लै कटकटिची त्रासदायक तरीही धमाल, रोमांचक वगैरे झालेली आहे. रेल्वे सुटणं, मग कधी पायी तर कधी कारमधून असा बेअभरवशाचा प्रवास. सोबतीला जरा टारगट, वैताग आणणारा, पिडणारा पण नंतर तिला आवडायला लागलेला असा राज, सिनेमाचा नायक आहे.
नंतर सिमरनचं कुठंशिक पंजाबात लग्न ठरतं. असं समजू की लग्न फायनल होतं. (आता पिक्चरची कथा जरा बाजूला ठेवू)आणि तो खरोखरच त्या "कुलजीत्"सोबत लग्न होतं. संसार ठाकठिक चालतो. आणि कित्येक दश्कांनी काही कारणानं, एखाद्य अजून ट्रिपला ती साधारण त्याच भागातून...स्वित्झर्लंड वगैरे मधून मध्यमवयीन झाल्यवर किम्वा रिटायरमेण्टवाल्या वयात फिरु लागते. तिला तो प्रवास, त्यातली धांदल, हसणं खिदळणं आठवत असेलच की. तिथं "निर्जीव रस्त्याशी कसलि बांधिलकी? त्यावरुन फक्त इकडून तिक्डं जावं" असं म्हणून कसं चालेल? घटना घडल्यात ना तिथं कित्येक, लक्षात राहण्यासारख्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जी जोडलं जाण्याची जाणीव (attachment) निर्माण होते ती ह्या घटनांमुळे होत असावी.

डिट्टो. काहीजण पटकन अटॅच होतात काहीजण अलिप्त राहू शकत असावेत. पण आता अनुभव वाढल्याने मलादेखील अलिप्त (एकंदरच आयुष्यात) रहाणे जमू लागलेले आहे. थँक गॉड!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

गेटमधून बाहेर पडले की काम संपले असे आता कुठे आहे असे वाटत नाही. वर्क लाईफ balance ऐवजी आता वर्क लाईफ integration असे ऐकायला मिळते.

खरे पहाता उद्या आपण गाडीखाली चिरडुन मेलो तर, कंपनीचा तीळमात्र फरक पडणार नसतो आणि देशालाही - आणि हे आपल्यालाही माहीत असते

फरक तसा कोणालाही पडणार नसतो. कंपनी तासाभरात विसरून जाईल आणि ज्यांना फरक पडणार आहे असे आपल्याला वाटते ते थोड्या जास्त वेळेनंतर विसरून जातील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

https://blog.rescuetime.com/dan-schawbel-workplace-loneliness/
वरच्या विषयाशी निगडित हे वाचलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अतिश, तुम्ही नेहमी छान ब्लॉग्स देता.

“Despite the illusion of 24/7 connection, in reality, most workers feel isolated from their colleagues, their organization and its leaders.”

“What they crave most—and what research increasingly shows to be the hallmark of the highest-performing workplace cultures—is a sense of authentic connection with others.”

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

निष्ठा कसली आलीय बोडख्याची? मी नोकरीचा धंदा करतो. म्हणजे दहा क्लायंट असण्याऐवजी माझा एकच क्लायंट ( = एम्प्लॉयर) असतो. त्याच्या क्षेमकुशलाची मला शक्य आहे तितकी काळजी घेतो. निष्ठा कसली डोंबल बाळगायची?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ह्म्म्म म्हणजे तुम्हाला अलिप्त किंबहुना इनडिफरन्ट रहाणे जमते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

माझं काम सल्लागाराचं आहे. कंपनीच्या आतून (सध्या) किंवा बाहेरून (पूर्वी) मी सल्ला देतो. अलिप्त / इन्डिफरन्ट राहिलं नाही तर सल्ला देणं अवघड होऊन बसेल. त्रयस्थता हा सल्लागाराचा मोठा गुण असतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ओह बरोबर!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

गवतखाऊ वृत्ती ,गवताप्रमाणे वाढणे, कधी झाड होण्याची स्वप्ने नव्हती. अर्थात काही नोकरीचा आणि शाळेचा उपयोग करून घेण्याची अक्कल नसल्याने दोन्हीकडचा शेवटचा दिवस फार आनंदाचा होता.
जाण्यायेण्याची सोय, उत्तम कॅन्टीन यामुळे इतर विचार केला नाही.
नोकरीत स्किलसेट असल्याशिवाय उड्या मारता येत नाहीत. तिथे बुच बसते. टार्गेट, मार्केटिंग छाप नोकरी प्रकारात मात्र भरपूर वाव असतो शिड्या चढायला. म्हणजे शिडीबंदी नसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसाद आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशा बहुतांश ठिकाणी मला त्या संस्थांशी बांधिलकी वाटत नाही. सगळ्याच संस्थांमध्ये काही माणसांशी जमतं, काहींशी जमत नाही. शिक्षणाच्या बाबतीत बॉस आवडत नाही तर बदला संस्था, असं करणं कठीण असतं. नोकरीच्या बाबतीत ते बरं आहे; पकाऊपणा फार वाढला तर नोकरी बदला. बिनडोक*, अननुभवी आणि किमान सहृदयता नसणारी माणसं डोक्यावर चढवलेली असतील तर अशा ठिकाणी मी टिकू शकत नाही; बुद्धीमत्ता, अनुभव आणि सहृदयता या तीन गोष्टी किमान पाहिजेतच.

*बिनडोक म्हणजे फक्त पाचवी नापास नव्हे. ऑक्सफर्ड विद्यापीठातून सांख्यिकी विषयात पीएच.डी. केलेला बिनडोक इसमही बघून झाला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Smile
अगं 'नौकरी' और 'नखरा' साथमे नही चलते.
वाक्य ऐकलं नाहीस का? पण कोणी सांगावं कदाचित तुला वेगळा अनुभव येइल.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशा बहुतांश ठिकाणी मला त्या संस्थांशी बांधिलकी वाटत नाही. सगळ्याच संस्थांमध्ये काही माणसांशी जमतं, काहींशी जमत नाही.

बरोबर आहे. संस्था ही फेसलेस इंटीटी आहे. तिथं बांधिलकी मानणे अवघड आहे. पण एखाद्या संस्थेशी फक्त transactional नातं ठेवणार अशी वृत्तीही मला पटत नाही. माझ्या टीममध्ये - कंपनी दमडी मोजते तेवढं करून पाचच्या ठोक्याला चालू पडणार - अशा व्यक्तीला मी नक्कीच घेणार नाही.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कंपनी दमड्या मोजत्ये म्हणून काम करणं, हा प्रकार मला अजूनतरी जमत नाही. मला आवडणारं काम असेल, आजूबाजूची आणि मुख्य म्हणजे डोक्यावरची माणसं आवडत असतील तर नोकरी करण्याचा माज सध्यातरी चालतोय.

मात्र अधूनमधून 'अमक्या कामाचा विचार करण्याचे मला पैसे मिळत नाहीत, त्याचा विचार मी करत नाही' अशी स्वतःलाच झापडं लावण्याची गरज पडते. विद्यापीठीय संशोधनाची पार्श्वभूमी आणि नफ्यासाठी चालवली जाणारी आस्थापना यांत फरक असायचाच. ते वळायला वेळ लागणार, असं दिसतंय.

एक मित्र + माजी सहकर्मचाऱ्यानं दीडेक वर्षांपूर्वी एक नोकरी सोडली. कारण 'ही विदा मिळवण्यासाठी जे मार्ग वापरले ते अमेरिकेत बेकायदेशीर असल्याचं अजून ठरवलेलं नाही', असं त्याला सांगण्यात आलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>कंपनी दमडी मोजते तेवढं करून पाचच्या ठोक्याला चालू पडणार >>

जपानी/ चिनी/इतर कंपन्यांना स्पर्धेत पुढे राहायचं असतं त्यांना कामाच्या माणसाला, कंपनीचं भलं करणाऱ्यास वर घ्यायचं असतं.
भारतीय कंपन्यांत मालक आपला एकेक बिनडोक माणूस डिपार्टमेंटला ठेवतो त्याचं काम फक्त मालकाकडे/वरच्या बॅासकडे चुगल्या करणं असतं. तिथे शिडी नसतेच आणि गद्धामजुरी अपेक्षित असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नोकऱ्या निवडताना मी बराच सिलेक्टिव्ह राहिल्याने अजूनतरी गंडक्या ठिकाणी काम करण्याचा अनुभव आलेला नाही. कॉलेजपेक्षा नोकरीतले वरिष्ठ अधिक शिकवत गेले. शिवाय मला मी जे काम करतो ते अजूनही इंटरेस्टिंग वाटत असल्याने कुठल्याही मानसिक द्वंदात आजवर तरी सापडलो नाही. पाट्या टाकतोय असेही कधी वाटले नाही. काम केलेल्या सगळ्या ठिकाणी उत्तम लोक भेटले, आधीच्या बॉसबरोबर आम्ही खूप सिनेमे पाहिले आणि त्याचा खिसा बराच रिकामा केला. केलेल्या कामाचं मूल्यमापन स्वतःशी करून पदरात उत्तम पैसे कसे पाडावेत हे आमच्या आधीच्या एका मॅनेजरने शिकवले. शिवाय मार्केट आणि गुंतवणुकीकडे त्याच मॅनेजरने वळवलं, जे मी ममव भीतीने कार्पेटखाली सारून बसलो असतो. सध्याच्या एका सहकर्मचाऱ्यामुळे शास्त्रीय संगीतातल्या अनेक सूक्ष्म बाबी कळत आहेत. आम्ही ठरवून आठवड्यातून चारेकतास खूप चांगली चर्चा करत असतो. उडदामाजी काळे गोरे असतातच, पण फाट्यावर मारता आलं की झालं. स्वतःविषयी इतरांचं इम्प्रेशन जरा वाकवता आलं की "वो ऐसाच है" असं म्हणत इतर लोक काही गोष्टी थोपवायच्या बंद करतात.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

नशिबवान नील लोमस.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्हाला तुमचा जॉब आवडत नाही का? मग एक छानसं गृहकर्ज घ्या. जॉब आवडू लागेल.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हाहाहा खो खो लोल __/\__

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

हसू नका.

मी गेल्या वर्षी आता रिटायर* व्हावे असा विचार करत होतो. पण त्याच काळात काही कारणाने अनेक वृद्धाश्रम पाहिले. त्यांमध्ये धर्मादायटाइपचे तसेच "फॉर प्रॉफिट" असलेले असे दोन्ही प्रकारचे वृद्धाश्रम पाहिले. त्यातल्या डिसेंट वाटणाऱ्या वृद्धाश्रमांत राहण्याची कॉस्ट पाहून उरलेली ३-४ वर्षे व्यवस्थित नोकरी करण्याचा निर्णय घेतला.

*रिटायर म्हणजे घरी बसणे नव्हे; रेग्युलर फुलटाइम नोकरी न करता फ्री लान्स कामे वगैरे करावी असा विचार होता.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ओह चांगला विचार आहे थत्ते. आपल्याला शुभेच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

2012 साली 5-6 महिन्यांच्या कालावधीमध्ये 2 कंपन्यात काम केलं. त्यातल्या एका कंपनीचा अनुभव हा माझ्यासाठी भयावह दु:स्वप्न होतं तर दुसऱ्या कंपनीतला अनुभव अतिशय निरशा आणणारा होता त्यावर एकदम विस्ताराने लिहावं असं कधीपासून मनात आहे. खरं तर कर्वेनगरच्या पोस्टनंतर लगेचच लिहिणार होतो. पण तेव्हा उगाचंच सिक्वेल लिहिल्यासारखं नको लिहायला म्हणून नाही लिहिलं. तुमची ही पोस्ट पाहून पुन्हा त्या आठवणी उफाळून वर आल्या. जमलं तर लवकरच लिहीन म्हणतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नेकी और पूछ पूछ!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

माझ्या नोकरीचा अनुभव एकच आहे. गेली कित्येक वर्ष मी एकच नोकरी करते, कारण काम, इथलं काम फार वेगळं आहे. जात पात धर्म राज्य देश सगळ्याला पार करत एक मूळ मानवी स्वभाव, मानवी संबंध, स्वार्थ, अहंकार, वासना, पराकोटीचा द्वेष सगळं सगळं अनुभवयाला मिळाला, खूप लोकांची आयुष्य बसल्याजागी हाती आली, मला आता कोणत्याच घटनेनं अंगावर शहारा येत नाही. असं असू शकतं किंवा यापेक्षा ते भयानक होतं असं बघता येतं. आता वाटतं लोकं जातीपातीच्या रकान्यात उगाच विभागली आहेत, त्यांना मानवी स्वभावात विभागलं पाहिजे. ते समाजाच्या दृष्टीनं फार बरं. तसेच स्त्री म्हणजे छळवाद पुरुषी प्रधान समाज या सरधोपट व्याख्येलाही बदलून बघावं. आणि एक झालं मी या नोकरीनं फार एकटी पडले. फार काही समजून आल्यानं कशातच नावीन्य राहिलं नाही. बाकी नोकरीत पैसे आहेत, स्थान बऱ्यापैकी आहे. जाच वगैरे असेलही. माझ्याच लक्षात आलं नाही.असंही असेल. बाकी मला हे काम आवडतं. कामाच्या बाबतीतच विचार करायचा झाला तर मी दुसरं कोणतं काम करण्यापेक्षा मी पूर्णवेळ लेखन करेन. त्यात पैसे मिळो ना मिळो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

नेमकं करता काय? नोकरी कसली करता?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

आपणही तेवढेच द्यायचे आणि एकदा गेटमधुन बाहेर पडले की काम विसरुन जायचे असा सोप्पा (पण आचरणात आणायला अवघड) नियम असतो.>>> हे पटलं.. मी सुद्धा हाच प्रयत्न करतो...

आमचे H O D म्हणतात, "बच्चें किसीके होते नहीं और होने भी नहीं चाहिये... बस काम करो और निकलो.."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पद्म.