बाजू.. एक घेणे..

ही बाजू घेणं किंवा ती बाजू घेणं असा बायनरी चॉईस बहुतांश वेळा नसतोच कुणाला.

पण कोणतीतरी एक बाजू घेणं, आणि कोणतीच बाजू न घेणं हे दोन चॉईस मात्र बहुतांश केसेसमध्ये असतात.

न्यूट्रल, डिप्लोमॅटिक, अनबायस्ड आणि मग आपापल्या बाजूनुसार सेक्युलर, फेक्युलर, सिक्युलर, कुंपणावरचे, शेपूटघालू असे बरेवाईट शब्द या उदासीन असणाऱ्या लोकांना लाभतात.

याखेरीज मग सिलेक्टिव्ह निषेध, सिलेक्टिव्ह निषेध पण बाजू मात्र कोणतीही एक न धरणे, सिलेक्टिव्ह सपोर्ट, एकच बाजू एकनिष्ठपणे धरणे, व्हॉटअबाउटरी (तेव्हा कुठे होतात?) हे अनेक प्रकार अगदी रोजच्या वातावरणात मिसळलेत. ऑनलाइन पेपर्समधल्या बहुतेक सगळ्याच कॉमेंट्स इतक्या विषारी रागाने भरलेल्या दिसतात की अनामिक राहण्याचा पहिला फायदा म्हणजे शिवराळ आणि शाब्दिक हल्लेखोरी असं आहे की काय अशी शंका यावी.

यात कॉमन पॉईंट असा की बाजू कोणतीही असो, समोरच्याचा चावा घेणे, लचका तोडणे यासाठी एक बाजू पक्की घेतलेली असणं गरजेचं असतं. न्यूट्रल राहू इच्छिणारं किंवा सामोपचार, मध्यममार्ग असं काही लिहिणारं कोणी व्यक्त झालं की त्यालाही दोन्ही इतर बाजूनी एकत्र येऊन फटके पडतात.

-कोणतीतरी एक बाजू घेणं हे कोणतीच बाजू न घेऊन त्रयस्थ राहण्यापेक्षा बरं असतं का?

-की कोणतीतरी एक बाजू घेणं हे अपरिहार्यपणे एकांगी अतएव पूर्वग्रहदूषितच असलं पाहिजे अशी समजूत दिसते?

-न्यूट्रल राहणं ही एक इतर बाजूंइतकीच वजन (weightage) असलेली बाजू असते का? असावी का?

-न्यूट्रल असणं (एक बाजू न घेणं) म्हणजे आसपासची स्वतःला अमान्य पण सत्य परिस्थिती केवळ डोळे बंद करुन नाकारणं आणि डिनायल मोडमध्ये जाणं आहे का?

-"आपण नेहमी कोणतीतरी एक बाजू घेतली पाहिजे (we must take sides) कारण तटस्थता ही नेहमी अन्याय करणाऱ्याला मदत करते, अन्यायग्रस्ताला नाही." असं प्रसिद्ध वचन आहे. ते पटतं का?

-जी बाजू मला जिवंत ठेवते ती माझी बाजू असं म्हणणारे लोक काही चुकीचं करतात का?

-फार झाली तटस्थता, साली आता चुकीची का ठरेना, पण बाजू घेण्याची वेळ आली आहे, असं कधी वाटतं का?

-तटस्थ भूमिका असं काही खरंच असतं का? की एका बाजूला पाठींबा असतो पण तशी जाहीर भूमिका घेणं टाळण्यासाठी तटस्थता ही जाहीर भूमिका घेऊन त्या बाजूला झुकणारं निवेदन केलं जातं?

-तुम्ही कधी ठामपणे एक बाजू घेता का?

प्रश्न उलटसुलट आहेत, पण ते आहेत.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

माझा मते बरेच लोक कृष्ण धवल द्वैतात अडकतात. राम किंवा रावण, विरोधक किंवा समर्थक, पाप किंवा पुण्य, चांगले किंवा वाईट, ,मित्र किंवा शत्रू..... if you are not with us, you are with them असे काहीसे गणित असते. अशी विभागणी त्यांना सोयीची जाते. मला फलज्योतिषाबाबत असेच लोक विचारतात तुम्ही नेमके कोणाच्या बाजूचे? एखाद्या गोष्टीला समर्थन वा विरोध यो दोनच बाजू नसून चिकित्सा नावाची वेगळी बाजू पण आहे. चिकित्सा ही दोन्ही पातळयांची करावी लागते. शिवाय त्याला विविध बाजू आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मला फलज्योतिषाबाबत असेच लोक विचारतात तुम्ही नेमके कोणाच्या बाजूचे?

मान्य. मीही विचारलेय पूर्वी.

एखाद्या गोष्टीला समर्थन वा विरोध यो दोनच बाजू नसून चिकित्सा नावाची वेगळी बाजू पण आहे. चिकित्सा ही दोन्ही पातळयांची करावी लागते. शिवाय त्याला विविध बाजू आहेत.

पण त्यातून प्रत्यक्ष actionable काही निष्पन्न होतं का?

(काहीतरी actionable निष्पन्न झालंच पाहिजे यावरच कदाचित वाद होऊ शकतो म्हणा.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण त्यातून प्रत्यक्ष actionable काही निष्पन्न होतं का?

चर्चेतून निष्पन्न झाले नाही तरी विचारांचे पुनरावलोकन होते. तसेच ती वाचणाऱ्याला काही नवीन गवसत असू शकत. एखादे निर्णायक उत्तर देणे अवघड आहे हे तर समजते. सगळ्या गोष्टींची निर्णायक उत्तरे मिळतातच असे नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

सगळ्या गोष्टींची निर्णायक उत्तरे मिळतातच असे नाही.

खरे आहे, सहसा असे नीरीक्षण आहे की पुरुषांना एखादी समस्या सांगीतली की ते लगेच त्यावर तोडगा सुचवतात, निदान तसा प्रयत्न करतात. याउलट बायका ऐकून घेतात, शांतपणे, pensive, meditative मूडमध्ये जातात. एकदम उत्तर देण्याची घाई करत नाहीत. कदाचित हा 'लीडरशिप/ नेतृत्वगुणामधील' मूलभूत स्त्री-पुरुष भेद असू शकेल. माझे विदा बिंदू अल्प असू शकतात/आहेत.
.
तेव्हा सगळ्या गोष्टींची निर्णायक उत्तरे मिळतातच असे नाही. - हे मान्य करणे हे महत्वाचे असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

कारण तटस्थता ही नेहमी अन्याय करणाऱ्याला मदत करते, अन्यायग्रस्ताला नाही." असं प्रसिद्ध वचन आहे. ते पटतं का?

होय पटते ते वचन. त्याला 'मूकसंमती' असेही म्हणतात. जेव्हा एखाद्यावर डोळ्यादेखत अन्याय होतो तेव्हा जर तुम्ही निषेध केला नाहीत (जो मीही कधी करत नाहीच), तेव्हा अन्यायालाच प्रोत्साहन मिळतं. उदा - ऑनलाइन बुलिंग/ट्रोलिंग, ट्रंपतात्यांची दादागिरी तसेच स्पष्ट असा वंशभेद. अशा उदाहरणात ते लोकं गप्प रहातात जे सहमत असतात. मग आपणही गप्प राहीलो तर असा समज होणारच की आपण त्याच 'गप्प रहाणारऱ्या व सहमति असणाऱ्या' गटातील आहोत.
पण आपल्यावर शिव्यांची गटारगंगा वळू नये म्हणुन बहुसंख्य लोक गप्पच रहाणे पसंत करतात. म्हणजे आपला स्वत:च्या इगोचे पारडे हे न्यायप्रियतेपेक्षा जड ठरते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

बहुतांशी तटस्थ हे खरे तटस्थ नसतातच. मनांतल्या मनांत, त्यांनी एक बाजू घेतलेलीच असते. पण असे सोंग घेणारे सगळेच दांभिक असतात असेही नाही. लोकलज्जा, मित्रांचे सर्कल न दुखावण्याची खबरदारी, आपली इमेज, अशी अनेक कारणे असू शकतात.
खरं तर, कुठलीही बाजू घेण्यापूर्वी त्याची चिकित्साही झालीच पाहिजे. कित्येक बातम्या ही खऱ्या खोट्याची बेमालुम सरमिसळ असते. त्यातले सत्य किती, हे कळणेच बरेचदा दुरापास्त असते. अशा वेळी, ही तटस्थपणाची झूल उपयोगी असते.
पूर्वग्रह सुद्धा एखादी भूमिका घेण्याचा मागे असू शकतात.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

माझे बाबा मला व्हॉट्सॅप वर बऱ्याच बातम्या, चमत्कार पाठवत असतात. बरेचसे फेक न्युज मधेही मोडतात. पण अगदीच आरोग्यास घातक नसेल तर मी सल्ला द्यायला जात नाही की "बाबा हे खोटे आहे." पण हां हार्ट ॲटॅक आल्यावर अमके करा अन श्वास रोखा नाहीतर खोटे खोका/शिंका वगैरे संशयास्पद गोष्टी दिसल्या की मात्र लक्षात आणून देते - की या फेक आहेत Smile

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

कोणती बाजू घ्यायची हे कालच्या ठरावानंतर मोठे कोडेच पडले नेत्यांसह इतर प्रसिद्ध लोकांनाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यात कॉमन पॉईंट असा की बाजू कोणतीही असो, समोरच्याचा चावा घेणे, लचका तोडणे यासाठी एक बाजू पक्की घेतलेली असणं गरजेचं असतं.

असच काही नाही. तळ्यात मळ्यात करणारेही काही असतात. ते कधी कुठल्या? कुणाच्या बाजूने बोलतील हे ब्रम्हदेवालाही कळणे कठीण. परंतु अशी लोक सहसा कृतीशून्य असतात. त्यामूळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे शहाणपणाचे.

मला वाटते तटस्थ असणे म्हणजे अन्याया कडे डोळेझाक करणे नाही. निर्णय घेताना जो 'चूक-बरोबर', 'योग्य-अयोग्य', 'सत्य-असत्य' याच निकषांवर विचार करतो आणि ज्याचे ममत्व अथवा शत्रुत्व त्याच्या निर्णयावर परिणाम करत नाहीत त्याला तटस्थ म्हणायला पाहिजे.

पण सहसा असे कुणीच असत नाही.

अद्न्यानापोटी, अपुऱ्या माहितीच्या आधारवर किंवा भावनाभरात कुठली बाजू घेण्यापेक्षा तट्स्थ असणे श्रेयस्कर. पण तटस्थ रहाण्यामूळे कुठल्या अन्यायाला अथवा गैरवर्तनाला वाव मिळत असेल तर विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

**********

राम का गुनगान करिये |
रामप्रभू की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिये ||

अभिव्यक्त होऊन बाजू घेतली नसली तरी कुठे तरी मनातल्या मनात ती आपण घेतलेली असतेच. कधीकधी पॉलिटीकली करेक्ट बोलावे लागते दुसर्‍याला वाईट वाटू नये, हितसंबध बिघडू नयेत म्हणून. माणूस तटस्थ तेव्हाच राहू शकतो जेव्हा कमालीची अनास्था वा अनभिज्ञता असते. बर्‍याच वेळा पूर्वग्रह दूषित असणे, चुकीच्या वा अर्धवट तत्थ्यांमुळे, ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या अभावामूळे माझ्या बाबतीत बाजू घेण्यात चूका होतात, अगदी आजही. पण जसजशी नवीन तत्थ्ये, विश्लेषणं समोर येत गेली, ज्ञान आणि अनुभव वाढत गेलं, स्वतःमधला खास करून कन्फर्मेशन बायस (आपल्या सोयीचे तेवढेच फॅक्ट्स उचलून धरणे) बाजूला सारायचा प्रयत्न केला तेव्हा अगोदर घेतलेली बाजू काळाच्या ओघात बदलल्याचाही अनुभव आहे. कमालीच्या पोलराइझ्ड सोशल प्रश्नांवर जेव्हा विरुद्ध बाजूने मत येते तेव्हा शाब्दीक वाद होणं/एकमेकांना दुखवणं हे स्वाभाविकपणे होते (अगदीच शिवराळ भाषा वापरली नाही तरीही.. जशी मी काश्मीर-३७० प्रश्नावर सार्कास्टीक भाषा वापरली.. जे मला टाळता आले असते). त्यामूळे अभिव्यक्त न होणे हाच पर्याय बहुतांश निवडतात. पण "सभ्यतेच्या चौकटीत" दोन विरुद्ध बाजूंच्या विचारांचा टकराव झाला पाहिजे. हेल्दी डिबेट्स हे चांगले लक्षण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही चर्चा
वाचून ह्या धाग्याची आठवण झाली.

सध्यपरिस्थितीत बाजू घेणं म्हणजे शेंडी तुटो किंवा पारंबी तुटो ह्या लेवलला गेलं आहे.
काळं/पांढरं, भाजप/काँग्रेस, संघ/देशद्रोही - साली लेबलं लगेच लावली जातात.

मला वाटतं त्यामुळे १० किंवा २० वर्षांपूर्वी जे मत "टोकदार पण संयत" म्हटलं जात असे ते आता "मुळमुळीत आणि पोलिटिकली करेक्ट" म्हटलं जाईल.
उ.दा काश्मीर आणि ३७०चं उदाहरण घेऊ. समजा मी असं मत मांडलं की-
मला सरकारचा अ हा मुद्दा पटतो कारण क्षयज्ञ.
मला सरकारचा ब हा मुद्दा पटला नाही कारण की अमुकतमुक वगैरे.
सरकारने क ह्या गोष्टीचा चुकीचा वापर केला आहे.

तर सरकारसमर्थक मला माझ्या ब/क मतावरून झोडणार.
विरोधक मला अ ह्या मतावरून झोडणार.

प्रत्यक्षात मी कुंपणावर आहे का? नाही. मी स्पष्टपणे विरोध आणि सहमती दर्शवली आहे, त्याची कारणं देऊन.

पण एकतर आमचं नाहीतर त्यांचं - अशी विभागणी अपेक्षित असेल तर माझ्या मताला नेहेमी कुंपणावरचं संबोधून त्याला हडतहुत केलं जाईल.
मग बाजू घ्यावी का आणि कशी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ठीक... अस्वलजी..

एखाद्या निर्णयाच्या संभाव्य परिणामांबद्धल स्पष्ट असे चित्र उभे रहात नसेल तर ती व्यक्ती कुंपणावर राहू शकते. जसजशे परिणाम समोर येत जातील त्यानुसार ते आपली भूमिका "प्रामाणिकपणे" बदलतील. हे मी मान्य करतो.

निश्चित अशी बाजू घेणार्‍यांची एखाद्या निर्णयाच्या संभाव्य "एकंदर" (नेट-नेट) परिणामांचे निश्चित असे चित्र असते. या अपेक्षित परिणामांच्या तीव्रतेवरून टोकाचा/मवाळ विरोध वा समर्थन होत असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पहिल्या वाक्याबद्दल सहमत- जसे नवे तपशील उघड होतात, आपलं आकलन वाढतं तशी आपली भूमिका बदलत जाणं हे स्वाभाविक आहे.
.
दुसरं वाक्य समजलं नाही- उलगडून सांगाल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संभाव्य परिणामांची एखाद्याला जेव्हा पक्की खात्री असते. कन्विक्शन - एकंदर फायदा(नुकसान) होण्याएवजी नुकसान (फायदा) होण्याची शक्यता अधिक अशी पक्की खात्री वाटते तेव्हा (आणि ओपिनिअन परस्पर विरोधी आणि तीव्र असतात)
आणि कधी कधी नोन-अननोन पेक्षा अननोन-अननोन फॅक्टर्स जास्त असू शकतील असे वाटते तेव्हा काही जण अन्कफर्टेबल असू शकतात अशा निर्णयाशी कारण त्यामुळे रिस्क फॅक्टर वाढतो. असो, हे जस्ट माझं निरिक्षण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0