ठाणा प्रिमियर लीग

मह्या आणि मी छोट्या शिशुपासूनचे दोस्त, पण काल मी पळून गेलो नसतो तर त्याने मला जाम बदडला असता.

थोडी लांब स्टोरी आहे भेंजो. पाच नंबर बिल्डिंगमधली निकिता मह्याला आवडते. म्हणजे दुरून उसासे टाकण्याइतपत. (साला तिचं नाव बोलता यावं म्हणून इतिहासाच्या पुस्तकातला ख्रुश्चेव्हचा पॅरा घोकत बसायचा - निकिता ख्रुश्चेव्हनी स्टॅलिनचा पंथ संपवला का कायतरी.) तर तिला इम्प्रेस कसं करायचं? मह्या तसा चारचौघांसारखा. शिक्षण, नोकरी सगळं ठीकठाक पण शाईन मारण्यासारखं काही नाही. हां, पठ्ठ्या क्रिकेट मस्त खेळतो भेंजो. कव्हर ड्राईव्ह अगदी उजव्या हातानी खेळणाऱ्या लारासारखा. आणि ऑफस्पिनपण बरी टाकतो.

तर ठाणा प्रिमियर लीगची घोषणा झाली आणि मह्याच्या स्वप्नांना भेंजो पंखबिंख फुटले. निकिताचा मामा स्टेडियमचा पदसिद्ध का काय सेक्रेटरी. त्यामुळे ती लाॅन्गऑनच्या नाहीतर फाईनलेगच्या वर प्रेसबाॅक्समध्ये बसून प्रत्येक मॅच बघणार हे नक्की.

तर मह्या आणि मी बाळकुम बाॅम्बर्सच्या ट्रायलला गेलो भेंजो. तो ट्रायलला आणि मी नुसता टाईमपासला. मह्या चांगला खेळला. "त्याचं नाव काय रे?" मला तिथल्या कोचनी विचारलं, पण मी वडापाव खात होतो तेवढ्यात बाजूला बसलेला बंडू बोलला, "राम्या ठाकूर."

आता ही उपस्टोरी अशी. आमच्या वर्गात दोन महेश ठाकूर. मग ओळखायचं कसं तर तीर्थरूपांच्या नावानी. तर आमचा मह्या राम्या आणि दुसरा मह्या हणम्या.

तर बंडूने मह्याचा नावपत्ता सांगितला. एवढ्यात मह्या ग्लोव्हज वगैरे काढून आला आणि आम्ही डबलसीट घरी गेलो.

चार दिवसांनी मह्याचा फोन आला "भेंजो लोकल केबल लाव पटकन." मी टीव्ही लावला तर एक सुबक बुटकी मह्याच्या बाबांचा इन्टरव्ह्यू घेत होती.

"सर, तुम्ही बाळकुम बाॅम्बर्सचे सर्वात सिनियर खेळाडू आहात. तुम्हाला याबद्दल काय सांगायचं?"
"हे बघा," मह्याच्या बाबांनी घसा खाकरला. "मी सेहेचाळीस वर्षांचा आहे पण अजूनही फिट आहे. आणि नवरातिलोव्हा नव्हती का जिंकली विम्बल्डन डबल्स पन्नासाव्या वर्षी?"
सुबक बुटकी वळली आणि कोट-टायमधल्या एकाकडे तिने माईक दिला.
"सर्वसमावेशक विकास हे आमच्या कंपनीचे ध्येय आहे. म्हणून आमच्या बाळकुम बाॅम्बर्सच्या संघातही आम्ही समाजातील अनेक घटकांना समाविष्ट केले आहे."

मह्याचा परत फोन आला. "भेंजो तो बंडू एक मूर्ख, पण तुला नको कळायला?"
"म्हंजे?" मला खरंच काही कळलं नव्हतं.
"त्यानी माझं नाव सांगितलं राम्या ठाकूर म्हणून. आज सकाळी पत्र आलं रामचंद्र ठाकूरना, बाळकुम बाॅम्बर्ससाठी निवड झाल्याचं. त्यांचे मित्र, ते पत्रकार देसाई, तेव्हा आमच्याकडेच होते. मग आता इन्टरव्ह्यू आणि काय. बाबा खूष झालेत जाम, आता मी काय सांगू त्यांना? जाऊदे, त्यांनाच खेळूदे उद्या." मह्या अगदी रडकुंडीला आला होता. पण आता काय करणार भेंजो.

तर पहिली मॅच काकांनी पॅव्हिलियनमधून पाहिली, परवा बाळकुम बाॅम्बर्सना बाय मिळाला, आणि काल त्यांचे तीन प्लेअर्स बसलेली रिक्षा उलटली आणि तिघांनाही प्लास्टर्स लागली म्हणून काकांना डायरेक्ट फायनलमध्ये खेळायचा चान्स.

मह्या आणि मी बघायला गेलो. मी मॅच बघत होतो आणि मह्या निकिताला. बाळकुम बाॅम्बर्सनी पहिली बॅटींग केली आणि वीस ओव्हरात एकशेसहा रन केल्या. काकांना बॅटींग मिळाली नाही. मग तलावपाळी टायगर्स नव्वदला सहा होते तेव्हा स्ट्रॅटेजिक टाईमआऊटमध्ये त्या सर्वसमावेशक कोट-टायवाल्यानी प्रेसची लोकं बघून कोचला दम दिला, आणि सोळावी ओव्हर टाकायला काकांना बोलावलं.

काका स्लो बाॅल टाकतात. म्हणजे सलीम मलीकपेक्षा स्लो. आणि ते मनगट आणि बोटं चित्रविचित्र फिरवतात पण बाॅल सरळच जातो. चांगली गोष्ट एवढीच की ते वाईड किंवा नोबाॅल टाकत नाहीत.

तर त्यांच्या पहिल्या बाॅलला बॅटसमन आडवा शाॅट मारायला गेला, आणि बॅट पूर्ण फिरल्यानंतर रमतगमत आलेल्या बाॅलने मिडलस्टम्पला जरासं हलवून बेल कशीबशी पाडली. पुढच्या बाॅलला बॅट लागली पण बाॅल हवेत गेला आणि मिडविकेटने धावत येऊन कॅच घेतला. तिसरा बाॅल चुकून फूटमार्कमधे पडून वळला आणि अंपायरने एलबीडब्ल्यू दिला. काकांनी हॅटट्रिक घेतली होती. चौथ्या बाॅलला अकरा नंबरचा बॅटसमन क्रीझ सोडून पुढे आला आणि स्टम्प आऊट झाला. बाळकुम बाॅम्बर्स ठाणे प्रिमियर लीग जिंकले होते, आणि विजयाचे शिल्पकार होते, बाळकुमचे मलिंगा, रामचंद्र ठाकूर!

बक्षीससमारंभाला मॅन ऑफ द मॅचला निकिताच्या हस्ते ट्राॅफी दिली आणि प्रेससाठी काका आणि निकिताचा सुहास्य वगैरे फोटो काढला तेव्हा मी कलटी मारली. पळून गेलो नसतो तर मह्यानी नक्की बदडला असता भेंजो.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

वाईल्ड कार्ड एन्ट्री म्याच आवडली हां.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वडवली वॅरियर्स, चितळसर चीताज, गायमुख गन्स, ओवळा एसेस, उथळसर उनोज वगैरे टीम्स कल्पनाचक्षूंसमोर दिसल्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाचपाखडी पँथर्स.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राबोडी रायडर्स, खूंख्वार खोपटकर्स, मानपाडा मार्व्हल्स, चेंदणी चार्जर्स..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सगळं ठाणे पश्चिम स्वतःला नौपाडा म्हणवतं. अशी एकी कुठेही सापडणार नाही; मोदीजींनाही जमणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आता पाचपाखाडी ने आपली चूल वेगळी मांडली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हेच का ते अच्छे दिन! आमच्या काळी असं नव्हतं. पूर्वीचं ठाणं राहिलं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

राबोडीत नाही तो नौपाड्यात असं साधं आता राहिलं नाही. रुणवाल,किंवा इतर चकाचक वस्तीत राहणाऱ्यांना नौपाडा उल्लेख आवडत नाही.
पुण्यातल्या पेठा आणि ठाण्यातलं नौपाडा हे एक राहणीमान आणि विचारसरणी ठरवत. नौपाड्यातही आता घरात/सोसायटीत/टॉवरमध्ये? हा फरक झालाच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सिंधू आज्जीना अंपायर म्हणून बोलवा. सगळं ठीक होईल.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमेझीन्ग!
पन्कज भोसलेच्या लोहार आळीतल्या ठाण्यावर एक अप्रतिम कथांची सिरीज आहे.
त्याची थोडीशी आठवण झाली.

टेंबी टेरीफीक्स Smile
जांभळी जम्पर्स Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोकमान्य आळी. आमचे पपू बापू लोकमान्य आळीत राहायचे. अहिल्यादेवी बागेसमोर.

ठाण्यात लोहार आळी कुठे आहे? मी विसरले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

स्टेशन रोड , माझे ग्रंथ भांडार च्या बाजूचा रस्ता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हल्ली शंभर शब्दांत कथेचा प्राण कोंबण्याची प्रथा आली आहे - शशक /सोळा आण्याची गोष्ट या नावाने. तसलं काही या कथेचं केलं नाही. धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्तं गोष्ट!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !