इटालियन कनेक्शन

मह्याचा डीपी बेस्ट आहे. पिसाचा मनोरा कलतोय आणि मह्या त्याला जमीनदोस्त करायला अजून ढकलतोय असा. पण डीपी काढायला मह्या इटालीला गेला ती स्टोरी अजून जास्त बेस्ट आहे.

तर मह्याचं अॅप्रेझल झालं तेव्हा त्याच्या बाॅसिणीनं सांगितलं की काहीतरी नवीन गोष्ट शिकतोयस असं दाखवलं तर पुढच्या वर्षी प्रमोशन होऊ शकेल. त्यांची कंपनी औषधं एक्स्पोर्ट करते. सिनियर ऑफिसर झाल्यावर पोलंडमधे पॅरंट कंपनीच्या काॅन्फरन्सला जायला मिळतं दर वर्षी. तर बाॅसिण प्रमोशनचं बोलली आणि मह्या ऑलरेडी हवेत गेला.

रविवारी सकाळी क्रिकेट खेळायला जातोच तर त्याच्यानंतर युन्व्हर्सिटीत काहीतरी कोर्स करायचा असं मह्यानी ठरवलं. भेंजो म्हणजे माझीपण संडे दुपारची झोप संपणार, कारण मह्या मलापण त्या कोर्सला नेणार.

पहिले मह्याला इंटरेस्ट होता ते इंपोर्ट एक्स्पोर्ट डाॅक्युमेंटमध्ये. पण तिथे सगळे अंकल लोक असतात असं कळलं. मग काय तर फाॅरेन लॅन्ग्वेज. भेंजो युन्व्हर्सिटीत पोलंडची भाषा नाही शिकवत म्हणे. कोणीतरी म्हणालं की रशियन त्यातल्यात्यात सारखी आहे, आणि म्हणून मह्यानी रशियनला अॅडमिशन घेतली.

वहीपेन घेऊन पहिल्या लेक्चरला गेलो. टीचर स्मार्ट होत्या. पहिले लिपी शिकवायला सुरुवात केली. काय ती लिपी. एस लिहितात सी सारखा, एन लिहितात एच सारखा, आणि आर लिहितात पी सारखा. माझं डोकंच चालेना भेंजो. साईडला पाहिलं तर मह्यापण तसाच कन्फ्यूज दिसत होता.

लेक्चर संपलं. मी बोललो, "भेंजो हे मला नाही जमणार." मह्यापण हो बोलला. मग आम्ही इकडेतिकडे चौकशी केली. अरेबिकची लिपी अजून कठीण आहे असं कळलं. फ्रेंच, जर्मन आणि स्पॅनिशच्या अॅडमिशन फुल झाल्या होत्या. शेवटी इटालियनला अॅडमिशन मिळाली कारण तिथे कोणीच अॅडमिशन घेतली नव्हती. आम्ही दोघेच स्टुडंट.

पुढच्या रविवारी लेक्चर सुरू झाली. तसा चांगला टाईमपास व्हायचा. भाषापण थोडीफार जमत होती. आणि वर्गात आम्ही दोघेच म्हणजे टवाळ्या करायचा स्कोपच नव्हता.

तीन महिन्यांनी आमचे प्रोफेसर हसत हसत आले. कोणत्यातरी इटालियन युन्व्हर्सिटीने आमच्या विद्यापीठाबरोबर काहीतरी एमोयू केला होता आणि दोन-दोन स्टुडंटना स्टुडंट एक्स्चेंज म्हणून पंधरा दिवस त्या दुसऱ्या युन्व्हर्सिटीत पाठवणार होते.

आम्ही खूष भेंजो. प्रोफेसरना ऑफ तास मागितला आणि मस्त बिअर मारून सेलेब्रेट केलं. घरी सांगितलं (बिअरचं नाय) तर घरीपण सगळे खूष.

मग एका महिन्यानी इटालीला गेलो, थोडं इटालियन बोललो, सीनरी बघितली, वाईन प्यायलो, पास्ता खा खा खाल्ला, आणि रविवारी पिसाला जाऊन डीपीपण काढला भेंजो.

(सत्य घटनेवर आधारित)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

मस्तच. अजून रंगली असती. इटलीच्या पोरीबिरींवर लिहायला हवं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

झकास! रोमन हॉलिडे येतोय पुढच्या भागात? डब्बल प्रमोशनच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile मस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता ह्या कथेत सिंधुआजी पाहिजेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.