लघुकथा - प्रेमाची लांबी

प्रेमाची लांबी
---------------------------

नवरा बायको कशावरूनही भांडतात. पण त्याचं अन तिचं कशावरून बिनसलं हे कळलं, तर तुम्हाला गम्मतच
वाटेल.

तिला टीव्हीवरच्या मालिका बघून तसलेच दागिने घालावेसे वाटत .’ लाडकी बायको’ ही तिची सध्याची जाम आवडती मालिका होती .

एके दिवशी- मालिका चालू असताना तो आला. त्या दिवशी लाडकीने लांब मंगळसूत्र घातलं होतं. डिझायनर !
ती म्हणाली ,” अहो, मलाही असंच मंगळसूत्र हवं. नवऱ्याचं प्रेम जेवढं जास्त तेवढं मंगळसूत्र लांब असतं !”
तो हसत म्हणाला, “अस्सं ? मग तर तुला गळ्याला घट्ट बसेल एवढंसच मंगळसूत्र करायला हवं !”

त्यावर ती अशी काही रुसली म्हणताय.

शेवटी तो रुसवा काढायला त्याला ते लांब मंगळसूत्र करावंच लागलं . तेव्हा कुठे तिच्या प्रेमाची लांबी जागेवर आली.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लांबी आणि फ्रीक्वेन्सी यांचे प्रमाण व्यस्त असते, असे कायसेसे पदार्थविज्ञानात घोकल्याचे आठवते. त्यात कितपत तथ्य असावे?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणजे लघुकथेची लांबी वाढली असती (लांबी भरणे हा वाक्प्रचार पेंटींग च्या लायनीत येतो ) तर मला अस म्हणायच होत की लघुकथा रंगवुन जर तुम्ही लांबी वाढवली भरली असती तर माझ्यातला वाचक कथेतल्या बाई सारखा रुसला असता
ही एवढी परीपुर्ण काव्यात्म लघुकथा आहे की एक शब्द ही यात वाढवला असता
तर तीचा प्रभाव संपुन ती रंगहीन झाली असती.
म्हणजे इतपतच एक आवंढा गिळला गेला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

रुसवा काढायचे मार्ग बऱ्याच लोकांना माहीत नसतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'प्रेमाची लांबी' या शीर्षकाखाली मचाकही लिहिता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मग इथे आम्ही नेमके काय सुचविले आहे असे वाटले तुम्हाला, गुरू?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लौल, बराबर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मचाकही म्हणजे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मराठी चावट कथा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

चावट कथांचा उपगट का मराठी साहित्यातला उपगट?
बाकी चावट गोष्टींचा(खीखीखी)*१ तोंडी संग्रह फार मोठा असेल. तो वाटसपमधून प्रसारित होत असणार. ऐसी किंवा इतर छापील सभ्य माध्यमात येणे कठीणच आहे.
#१. मंगळागौरीच्या जागरण गाणी खेळात खीखीखीला भरपूर वाव असे. पण सध्या दुसऱ्या दिवशी सुटी नसल्याने संकोच होत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0