गूगल ट्रेंड्स : महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री कोण?

अर्थातच माझ्याकडे आत्ता चिकार वेळ आहे, किंवा आहे ते काम करायचा चिकार आळस आहे (आणि खिशाला हे परवडतंय) म्हणून केलेले हजामपट्टीचे धंदे.

तर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका आणि त्यांचे निकाल येऊन काही दिवस लोटले आहेत. एरवी एवढ्या दिवसांत मुख्यमंत्री कोण होणार, हे ठरतं. शपथविधीची तयारी वगैरे सुरू होते. पण ह्या वेळेस महाराष्ट्रात शपथविधीच्या तयारीच्या ऐवजी मीम्स, विनोद पसरायला लागले आहेत. म्हणून हे किडे. गूगल ट्रेंड्सवर कोणाला जास्त मतं दिसत आहेत.

हे ट्रेंड्स फक्त महाराष्ट्रातले आणि गेल्या सात दिवसांतले आहेत. २८ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०१९ ह्या काळातली ही विदा. ह्यातून काही समजतं आहे असा दावा नाही. पण गंमत, किडा म्हणून बघायला मजा येते.

१. देवेंद्र फडणवीस मोठे का शरद पवार?

इथे सरळच शरद पवारांचं पारडं जड आहे. लोकांना पवारांची रात्री जेवढी आठवण येते, तेवढी मामुंची दिवसाही येत नाही, असं दिसत आहे.

२. भाजप का राष्ट्रवादी?

सरळच भाजप राष्ट्रवादीपेक्षा तिप्पट लोकप्रिय आहे.

३. भाजप, शिवसेना, काँग्रेस का राष्ट्रवादी काँग्रेस?

चारही मोठ्या पक्षांची तुलना केली तर दोन्ही काँग्रेस तळात आहेत. मात्र शिवसेना आणि भाजपची 'कांटे की टक्कर' दिसत्ये. तरीही सातत्यानं शिवसेना भाजपपेक्षा किंचित वरचढ दिसत आहे.

४. म्हणून प्रश्न, मामु का पेंग्विन?

मामुंपेक्षा पेंग्विन किंचित मागे असला तरी फार मागे नाही.

४अ. मामु, पेंग्विन का संपादक महाशय?

राऊत जोरात मामु कोमात!

५. युती का आघाडी?

युती का आघाडी असं विचारलं तर विदा किती विश्वासार्ह असा प्रश्न पडत आहे. (हे का, ह्याचं उत्तर कोणी विचारलं तरच देईन.) पण त्यात आघाडी जरा जोरात आहे.

सध्या गूगल ट्रेेंड्समधून समजणार नाही असा पडलेला प्रश्न - माणूस का पक्ष? मुख्यमंत्री का संपूर्ण मंत्रीमंडळ? माणसं का धोरणं? तुम्हाला काय काय तुलना करावीशी वाटते? तुम्ही ह्याचा अर्थ काय लावाल?

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

मजेदार प्रकरण आहे.
पण हे कसं बघतात?
A) गूगलने काही ट्रेन्डस अगोदरच प्रकाशित केलेले असतात ?/
Dirol आपण प्रश्न विचारल्यावर गूगल उत्तर शोधते?
माझी आवड/अपेक्षा बाजूला ठेवून फक्त विदाशास्त्र आधारित विचारतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संगणकावर सगळ्या आलेखांच्या उजव्या बाजूला वर आणि फोनवर आलेखांच्या खाली Google Trends असं दिसेल. त्यावर क्लिक करा. इथे दिलेली विदा दिसेल.

तिथे बदल करण्याची सोयही दिसेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

स्मायली आपोआप आली. 'बी' अक्षर) याची चुईंगगम/बबलगम खाणारी स्मायली झाली!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे का, ह्याचं उत्तर कोणी विचारलं तरच देईन.
का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फोनवर आहे, लॅपटाॅप उघडला की लिहिते. तोवर हा रुमाल.

वरचा युती का आघाडी हा शेवटचा आलेख, वारंवार शून्यापर्यंत खाली येतो. त्यातले बदल अगदी अचानक होणारे आहेत; हे बहुतेकदा small sample statisticsमुळे होतं. त्यात दिवस-रात्र असा बदल इतर आलेखांत दिसतो तसा दिसत नाहीये.

फक्त तेवढाच आलेख बघितला तर कदाचित अशी शंका येणार नाही. म्हणून त्यासोबत काँग्रेस पक्षाचे ट्रेंड्सही बघा. (काँग्रेस पक्षाची विदा म्हणजे काय ते खाली लिहिलं आहे.) म्हणजे आकाराकडे बघून काय शंका येतात, हे कदाचित आणखी स्पष्ट समजेल.

हे आकडे कमी असण्यामागे काही कारण असू शकतं. गूगल ट्रेंड्समध्ये बाकीच्या टर्म्स इंग्लिशमध्ये शोधल्या तेव्हा गूगलनं आणखी पर्याय दिले; भाजप हे शब्द (search term) का भाजप ह्या राजकीय पक्षाबद्दल माहिती हवी आहे, असे पर्याय आले. ह्याचा अर्थ गूगलला भाजप म्हणल्यावर काय शोधायचं हे समजलं आहे. त्यामुळे स्पेलिंगच्या चुका, कदाचित इतर भाषांमध्ये शोधणंसुद्धा ह्या विदेत मोजलेलं असेल. कचरा कमी आणि खरोखरचे शोध जास्त.

दुसरं, शोधणारे लोकही कदाचित इंग्लिशमध्ये शोधाशोध जास्त करत असतील; त्यामुळे Indian National Congress ह्या राजकीय पक्षाबद्दल शोधणं आणि 'आघाडी' ह्या शब्दाचा शोध ह्यांत थेट संबंध दिसेलच असं नाही. (मी तेवढं गणित करून संबंध आहे का, हे तपासलेलं नाही. खरं तर तसा परस्परसंबंध, correlation दिसायला पाहिजे. पण किमान सध्या तरी ही विदा संकलनातली मर्यादा आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

९ नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्री कोण हे ठरलं नाही तर जुनी विधानसभा बरखास्त होईल आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल. तर गेल्या सात दिवसांत - ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर ह्या काळात - महाराष्ट्रातल्या लोकांनी किती वेळा मुख्यमंत्री आणि राष्ट्रपती राजवट ह्या संज्ञा (इंग्लिशमध्ये) किती वेळा शोधल्या.

कालचा, ६ ऑक्टोबरचा उच्चांक होता - ९. निव्वळ आकड्याकडे बघू नका. आजचा ७ नोव्हेंबरचा उच्चांक आहे १८. कालच्या दुप्पट. सात दिवसांची सरासरी ४ आहे. ह्या हिशोबात काल दुप्पट आणि आज चौपटीपेक्षा जास्त लोकांनी राष्ट्रपती राजवट लागू होईल अशीही शक्यता मनात धरायला सुरुवात केली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वरच्या आलेखासाठी देवनागरीमध्ये 'राष्ट्रपती राजवट' असं टंकल्यावर गूगलनं हे भाषांतर दिलं. ही संज्ञा गूगलला समजली; म्हणूनही हे आकडे छोटे असले तरी अधिक विश्वासार्ह आहेत. त्यांत भसाभसा बदल होत नाही हे आणखी एक कारण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

राष्ट्रपती राजवट == भाजप राजवट ??? Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असं गूगल आणि मी दोघंही म्हणत नाही!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण ट्रेंडिंग आहे म्हणजे पॉप्युलर किंवा जास्त शक्यतेचा असं म्हणता येणार नाही ना?
जास्त सर्च > कारण जास्त मिडिया कव्हरेज.
मग निष्कर्ष कसा काढणार?
-----------
काय प्रश्न आहे ते ठरवून मगच विदा बघायचा असतो म्हणजे उपयोग होतो असं ऐकलं आहे.
विदा बघून त्यावरून निष्कर्ष काढले तर ते भलतेच येतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ट्रेंडीग आहे म्हणजे फार तर पॉप्युलर आहे, असं म्हणता येईल. ही लोकप्रियता किंवा पॉप्युलॅरिटी कुठून आली हे ह्या ट्रेंड्समधून समजणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री होण्याची शक्यता जास्त आहे का नाही, ह्याबद्दल काहीच म्हणता येणार नाही; पण लोकप्रियता जास्त असेल तर बार्गेनिंग पावर किंवा उपद्रवक्षमता अधिक आहे असं म्हणता येईल.

इथे दिलेला राष्ट्रपती राजवट आणि मुख्यमंत्री हा आलेख ठरवीक तारखांपुरताच आहे. आजचे आकडे बघितले तर राष्ट्रपती राजवटीबद्दल शोध सरासरीच्या सहापट झाले आहेत; आणि मुख्यमंत्रीपदाचा शोध फारच तेजीत आलेला आहे. इथल्या आलेखात सुरुवातीला जी तेजी आहे, १ नोव्हेंबरला ११ वाजता, तिच्या दुप्पटीच्या आसपास आकडे दिसत आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काय प्रश्न आहे ते ठरवून मगच विदा बघायचा असतो म्हणजे उपयोग होतो असं ऐकलं आहे.
विदा बघून त्यावरून निष्कर्ष काढले तर ते भलतेच येतात.

- अस्वल.
@अस्वल, विदाशास्त्र वापरून काय अनुमान निघतं किंवा आकड्यांची मोजदाद काय दाखवते हे ध्येय आहे.
पटलं आहे.
आपल्याला उत्तरं विश्वसनीय वाटतात का महत्त्वाचं नाही.
एक शास्त्रीय अभ्यास आहे , त्यावर आपला प्रभाव न टाकता शोध घेत आहे.
मी काही अवांतर टैमपास प्रतिसाद टाकलेत ते सोडून द्यायचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपल्याला उत्तरं विश्वसनीय वाटतात का महत्त्वाचं नाही.
एक शास्त्रीय अभ्यास आहे ,

अं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कौल नोंदवण्यात काही फाटे असतील तर वेगळी उत्तरे येतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आलेली उत्तरं नंतर प्रत्यक्षात खरी उतरतील असे विदाशास्त्र शोधणे हेच अंतिम ध्येय असणार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही आणखी एक गंमत पाहा. मुख्यमंत्री, राष्ट्रपती राजवट आणि अयोध्या प्रकरणाची तुलना.

तिथे टंकताना मी ह्या गोष्टी टंकल्या - Chief Minister, राष्ट्रपती राजवट आणि अयोध्या ... अयोध्या हा शब्द पूर्ण करतानाच गूगलनं पर्याय दाखवला Ayodhya Dispute (Topic). तो निवडला. मुख्यमंत्रीपदाच्या साठमारीत अयोध्येचा काहीही संबंध नाही; मात्र तत्कालीन विषय आहे. लोकांना मुख्यमंत्री कोण ह्याची उत्सुकता अधिक का बाबरी-मशीद-वाद, ह्याचं उत्तर आजच्या दिवसापुरतं ह्या आलेखातून देता येईल.

ह्या आलेखातली विदा वाहती असेल; म्हणजे २-८ नोव्हेंबर एवढीच मर्यादित नसेल. गेल्या सात दिवसांत काय आणि किती शोधलं गेलं हे सातत्यानं बदलत राहील.

आलेख वाहता असल्यामुळे मुद्दाम नोंदी -
आलेखात स्पष्ट दिसत आहे की ८ नोव्हेंबरला सकाळी लवकर ५-८ ह्या वेळात फार कुणाला अयोध्येची आठवण नव्हती, मुख्यमंत्री ५-७ आणि अयोध्या १. सकाळी ९-१०च्या सुमारास अयोध्या पुढे गेली. रात्री ११ वाजता, मुख्यमंत्री - ३ आणि अयोध्या - १००. हे अयोध्या-वादाचे आकडे एवढे मोठे आहेत की बाकीचं काही दिसत नाहीये. सरासरीसुद्धा त्या आकड्यांनी धुतली गेली आहे, मुख्यमंत्री - २, अयोध्या - ३.

येत्या दोनेक दिवसांत अयोध्या प्रकरणाचा ज्वर महाराष्ट्रातून उतरतो आहे का, ही गोष्ट भाजपेयी लोकांसाठी महत्त्वाची असेल. ८ नोव्हेंबरच्या आधी मुख्यमंत्री ह्या संज्ञेत महाराष्ट्रातल्या लोकांना जास्त रस होता, सातत्यानं मुख्यमंत्र्यांचे आकडे अयोध्येपेक्षा २-३ पट किंवा जास्त होते. अयोध्येचा ज्वर येत्या काही दिवसांत उतरला आणि ह्या आलेखात पुन्हा मुख्यमंत्री ह्या संज्ञेचा शोध पुन्हा वर आला तर अयोध्या हा निवडणुकीचा मुद्दा नाही, असं म्हणता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१० नोव्हेंबरच्या रविवारी अयोध्याकांडाचा सुपडा साफ झालेला दिसत आहे. उदाहरणार्थ, त्या दिवशी सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री पुन्हा अयोध्येच्या तुलनेत (मराठीतले) चौपट झालेले दिसत आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एक हजार+ वाचने, फक्त दोघांचेच प्रतिसाद?
--------------
उद्या जर का 'करिअर कोणते फायदेशिर' याचे विदा विश्लैषण खरे उत्तर देऊ लागले तर त्या आल्गोरिदमवाल्याकडे हजार रु भरूनही कौल घेणाऱ्यांच्या रांगा लागतील.
फंडामेंटल रिसर्चमधूनच अप्लाईड प्रॉडक्टस येत असतात ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमचे फारच गैरसमज आहेत; त्यांतल्या काहींचं निराकरण -

इथे चार सदस्यांचे प्रतिसाद आहेत!

हे संशोधन नाही - हा निव्वळ टाईमपास आहे. समारंभांना जमून पुरुष निवडणुकीच्या राजकारणावर आणि स्त्रिया कौटुंबिक राजकारणावर गप्पा मारतात, त्यापेक्षा जरा निराळं; पण गप्पाटप्पा छापच आहे. संशोधन किंवा रीसर्च एवढे स्वस्त नसतात. संशोधन आणि धाग्यातला मजकूर ह्यांत एकच साम्य आहे - माझी व्यक्तिगत मतं इथे नाहीत. त्यालाही अपवाद आहेच - मामु आणि पेंग्विन अशी (विनोदी) टोपणनावं संशोधनात वापरली जात नाहीत.

हा विषय मूलभूत संशोधनाचाही नाही; उपयोजित विज्ञान किंवा applies science, तंत्रज्ञान, आणि सामाजिक शास्त्र (humanities) ह्यांच्याशी संबंधित आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.