मुंबई कोलाज: बाबा उसका बॉडीमे घुस गयेला हय्!

झालं असं की मी माझ्या फायनॅन्शियल ऍडव्हायझरला एक बारीक शंका विचारायला फोन केला.
(हे असं बोललं की आपण करोडोंत खेळत असल्याचा फील येतो... असो)

तर हा मनुक्ष अस्सल मुंबईकर.
एका बाबांचा निस्सीम भक्त.
बाबांना जाऊन काही वर्षं झालेली वगैरे.
त्याच बाबांचा अवतार 2.0 मुंबईत येणार असल्याने हा सध्या प्रचंड एक्सायटेड!

आणि त्याची चूक-बरोबर श्रद्धा ह्या पोस्टचा मुद्दा नाहीयेच...
मुद्दा वेगळाच हय!

तो त्याच्या चेंबूरी-सिंधी-चटपटीत बंबैय्या हिंदीत बोलला,
"निलेश भाय थोडा बिझी हूँ दो दिन
xxxxxx बॉम्बे आ रहे है
बाबा उसका बॉडीमे घुस गयेला हय्!"

अयाई गं...
मुंबईचा आख्खा धेडगुजरी फ्लेवर शब्दोशब्दी ठासून भरलाय ह्या वाक्यात!

गुगल ड्राइव्हमध्ये खोल खोल कुठेतरी लपून ठेवलेला एक्सचा टॉपलेस फोटो अवचित समोर यावा
आणि छातीत एक आठवणीची बारीक कळ उमटावी...
तसा "मिसिंग मुंबई"चा बारीक ऍटॅक आला मला...

एक एक शब्द नीट बघूया जरा यातला.

उसका:
मुंबईकर तसंही "आपके" / "उनके" वगैरे आदरार्थी भाव कोणालाच देत नाहीत.
अगदी "उसके"ही नाही!
"उसका"तला शेवटचा आकार हा खास मुंबईचाच.
उदाहरणार्थ:
"उसके गाडीमे जायेंगे" म्हणा
आणि आता...
"अरे सेजल उसका गाडीमे जायेंगा ना" म्हणा
दुसऱ्या वाक्यात खाट्टकन् तो...
शनिवारी रात्री तीन मुलं आणि दोन मुली छान तयार होऊन, कल्याण / वाशी किंवा मिरारोडवरून, वडलांच्या मिनतवाऱ्या करून घेतलेली वॅगन-आर घेऊन मरीन ड्राइव्हला जाण्याचा फील आपोआप येतोना...
तो "उनके" किंवा "उसका"मध्ये नाहीना येऊ शकत बॉस!

बॉडीमे:
हा शब्द तर स्पीक्स फॉर इटसेल्फ!
"माझी चोर-बॉडी आहे रे चुत्या!"
हे वाक्य छातीच्या फासळ्या दाखवत म्हणणारा एकतरी किडकिडीत पत्र्या पोरगा प्रत्येक नाक्यावर असतो.
आणि मजा म्हणजे सम हाऊ हा चोर-बॉडीवाला बारक्या हटकून मारामारीत पुढे असतो.
सिंगल फासळी आणि डेअरींगचं कायतरी अजब कनेक्शन आहे कसं कोण जाणे.

घुस:
सकाळची विरार-चर्चगेट लोकल आणि वसई स्टेशन... पिरियड!

गयेला:
हे आयेला / गयेला चा तर मुंबईला कॉपीराईट घेता यावा आरामात.
मुंबईची टपोरी लँग्वेज दाखवण्यासाठी लाखो पिक्चर्सनी क्लिशेड केलेलं.
पण बऱ्याच दिवसांनी ऐकलं...
आणि काही क्लिशेड गोष्टींना:
उदारणार्थ नवाजुद्दीनच्या शिव्या, मरीन ड्राइव्ह, अजय-अतुलच्या ढोल यांना पर्याय नाही हे पटलंच.

हय्:
इकडे सगळा गेम त्या एंडच्या पाय मोडक्या "य्" वर आहे.
म्हणजे तुम्ही "बाबा उसका बॉडीमे घुस गयेला..." बोलून शुद्ध "है" बोललात तर ते पाया सूप, सीख पराठा, मटन बिर्याणी खाऊन नंतर पियुष मागवण्यासारखं आहे.
सो "हय्"च

...
...
...

बाबा उसका बॉडीमे घुस गयेला हय्!

मुंबुड्या आय लव्ह यु SSS!!!

-नील आर्ते

Baba

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

सॉलिड!

गुगल ड्राइव्हमध्ये खोल खोल कुठेतरी लपून ठेवलेला एक्सचा टॉपलेस फोटो अवचित समोर यावा
आणि छातीत एक आठवणीची बारीक कळ उमटावी...

ह्याबद्दल तोहफा कुबूल करो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शुक्रिया Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सगळ्या अमराठी लोकांवर मराठीची सक्ती करण्याजागी मुंबईया हिंदीची सक्ती केली पायजेलाय्!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अगदी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपून एक बार लोनावला का हॉटेल में बैठेला। ओर्डरमें थोडी गलती हुयेली।
"आप लोग बंबईसे ?"
"क्यों ?क्या हुवा?"
" अपना एक वेटरको पीटा था।"
"अरे ,घाबरू नको, ओर्डर जरा लवकर आण."
---------------
नील तूने ये क्या किया!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा हा Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा एक मित्र पेट्रोल पंपावर ओरडलेला ... भैय्या पचास रुपय का देनाना

मस्त लिखेला हय लेख

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभार Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"अरे सेजल उसका गाडीमे जायेंगा ना" म्हणा

हे नाव फक्त आणि फक्त मुंबईकराच्याच डोक्यात येउ शकते. मस्त. मुंबापुरीतल्या दिवसांची आठवण झाली.

- ओंकार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे नाव फक्त आणि फक्त मुंबईकराच्याच डोक्यात येउ शकते.

आणि इतरांच्या डोक्यात जाऊ शकते. नव्हे, जातेच.

(किंबहुना, मुंबईकर डोक्यात जातात.)

- (केवळ जन्माने मुंबईकर, पुणेरी अमेरिकन) 'न'वी बाजू.

#मुंबईबनेगापाकिस्तान #WhereEveryProspectPleasesAndOnlyManIsVile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्यातल्या पुणेकर हाफला माझ्या मुम्बैकर हाफचे गाववाले लोकांच्या डोक्यात जातात हे ऐकून आसुरी आनंद झालाय!

-मुम्बई-पुणे ड्युअल सिटीझन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दोन दोन डगरींवर पाय ठेवताय. यु मस्ट बी बॉर्न इन मुंबई क्काय खरय ना???
कारण काय्ये पुण्यात जन्मलेले चुकूनही स्वत:ला हाफ मुंबईकर म्हणवणार नाहीत. नोप. पुणेका सिर्फ नामही काफी है Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो ना!
पुणेकर नसलो तरी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

You can take a man out of Mumbai but can't take Mumbai out of a man वगैरे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमचे म्हणणे, A man (or, for that matter, a woman) should not be taken out of Mumbai, in the first place.

..........
भगवान बुद्धांसंबंधी एक कथा ऐकलेली आहे. (नेमकी हीच कथा गुरू नानकांच्या संबंधातसुद्धा ऐकलेली आहे. परंतु, काहीही म्हणा, सर्व धर्म सारखेच; त्यामुळे, असो.)

एकदा भगवान बुद्ध (किंवा गुरू नानक) आपल्या शिष्यांसमवेत गावोगाव हिंडत असताना एका गावी मुक्कामास येतात. गावातले लोक त्यांचे चांगले आदरातिथ्य, मानपान वगैरे करतात, त्यांच्या अन्नाची चांगली व्यवस्था करतात, वगैरे. मुक्कामाअखेरीस ते गाव सोडताना भ.बु. (किंवा गु.ना.) म्हणतात, "हे गाव उद्ध्वस्त होऊन त्यातील लोक जगभर देशोधडीस लागोत."

शिष्य आश्चर्यचकित होतात, परंतु काही बोलत नाहीत.

काही दिवसांनंतर, दुसऱ्या एका गावच्या मुक्कामी, तेथील रहिवासी त्यांना अत्यंत वाईट वागवतात, त्यांना हिडीसफिडीस करतात, त्यांचा पदोपदी अपमान करतात, त्यांना कदान्न देतात, वगैरे. मुक्कामाअखेरीस ते गाव सोडताना भ.बु./गु.ना. म्हणतात, "हे गाव सुरक्षित राहतो नि भरभराटीस येवो."

या वेळेस मात्र शिष्यांना राहवत नाही, नि ते दोन्ही वक्तव्यांमागील कारणमीमांसा विचारतात.

भ.बु./गु.ना. म्हणतात, पहिल्या गावातले लोक सज्जन होते. त्यांचे गाव उद्ध्वस्त होऊन जर ते देशोधडीस लागले, तर ते जगभर विखुरतील, नि जेथे जातील, तेथे आपला चांगुलपणा घेऊन जातील नि पसरवतील. त्याउलट, दुसऱ्या गावातले लोक दुष्ट होते. त्यांचे गाव जर सुरक्षित राहिले नि भरभराटीस आले, तर त्यांना कधी गावाबाहेर जाण्याची गरज पडणार नाही, नि त्यांचा दुष्टपणा त्यांच्या गावापुरता सीमित राहील.
..........

आम्ही म्हणतो, उर्वरित जगाने नेमके काय पाप केलेय, की त्यांच्यावर मुंबईकर लादले जावेत?

#मुंबईसुरक्षितराहिलीचपाहिजे #मुंबईपाकिस्तानातविलीनझालीचपाहिजे #मुंबईभोवतीकुंपणबांधा

..........

(अधिक विचाराअंती, उपरोक्त कथा गुरू नानकांबद्दलच असावी, अशी आमची खात्री होऊ लागली आहे. परफेक्ट सरदारजी लॉजिक आहे.)

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुंबईकरांना लादून घेतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुंबईकर लगेच पुढे सरकतात, उरकतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा एक तामीळ मित्र मुम्बईत जॉबसाठी शिफ्ट झाला आणि पहिलं लोकल वाक्य शिकला:

पुढे चला!

(बहुतेक विविध कन्डक्टर / पोलीसांचं ऐकून्)
त्याची आठवण झाली Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Fools rush in where angels fear to tread.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...'घासलेट की लैन में खडा रैके खालीपीली बोंब कायकू मार रहेला हय्' हे वाक्य बंबैया हिंदीचे प्रातिनिधिक म्हणून सांगितले जायचे. ही व्हर्जन २.० दिसते. (व्हर्जन १.०च अधिक रोचक होती.)

तसे म्हटले तर मुंबईकर मराठीसुद्धा थोडी विचित्रच बोलतात. 'मी आलेलो, मी गेलेलो' वगैरे. म्हणजे, मुंबईकरांना (कदाचित तेवढी एक गुजराती वगळल्यास) कोठलीच भाषा धड बोलता येत नाही की काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा एक मुंबईकर सहकारी 'काय म्हणता?' ऐवजी 'काय बोल्ता?' असे विचारतो....

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(जिथे गरूडसुद्धा १-४ ह्या वेळात भरारी घेत नाहीत त्या) पुण्यातल्या हिंदीपेक्षा मुंबैची मराठी/गुजराती/इंग्रजी/हिंदी पुष्कळ सुसह्य आहे हो न.बा.
पुणेरी हिंदी ऐकून कानांना फोड येतील अशी उदाहरणं ऐकली आहेत.
दोष पुणेकरांचा नाही म्हणा (कधी असतो?), हिंदीचा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

पुणेरी हिंदी ऐकून कानांना फोड येतील अशी उदाहरणं ऐकली आहेत.

आश्चर्य वाटले नाही. (अवांतर: पुणेरी हिंदीच कशाला, इंग्रजीसुद्धा.)

दोष पुणेकरांचा नाही म्हणा

अर्थातच नाही! पुणेकर आपण होऊन हिंदी बोलण्याचा प्रयत्न (अथवा दावा) करण्याच्या भानगडीत सहसा पडत नाहीत. त्यामुळे, तसाच प्रसंग गुदरल्यास नाइलाजाने हिंदी वापरावी लागलीच, तर ती भयानक उमटल्यास तो पुणेकरांचा दोष नक्कीच म्हणता येणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुणेकर आपण होऊन हिंदी बोलण्याचा प्रयत्न (अथवा दावा) करण्याच्या भानगडीत सहसा पडत नाहीत.

आजकाल हे काही राहिलेले नाही. रूपाली किंवा वैशाली येथे खादाडी करायला गेलेले पुणेकर तेथील वेटरांशी हिंदीत बोलू लागतात तेव्हा ‘पुढच्या वेळी माझ्या टेबलावर बसू नये‘ अशी धमकावणी देण्याची पाळी येते आजकाल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पुणे बदलले, म्हणायचे. (आणि, नॉट नेसेसरिली फॉर द बेटर.)

आपण म्हणता, ते जर खरे असेल, तर ही आत्यंतिक दुर्दैवाची बाब आहे.

कालाय तस्मै नमः|

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0