मद्रास कॅफे: भारताच्या विएतनामची अस्वस्थ करणारी कहाणी

अनेक सर्व शक्तिमान देशांच्या अहंकाराची थडग चिमुकल्या आणि लौकिकर्थाने कमजोर देशांमध्ये सापडतात. औरंगझेब आणि त्याच्या उद्दाम सरदारांची ज्याप्रमाणे महाराष्ट्रात सापडतात तशी.. सर्व शक्तिमान अमेरिकेला तर या नियमाने अनेक वेळा तडाखा दिला आहे. मग ते विएतनाम युद्ध असो किंवा इराक युद्ध असो. रशिया सारख्या प्रचंड लष्करी बळ असणार्‍या देशाचे पण अफगाणिस्तान मध्ये वस्त्र हरण झाले आणि त्याना तिथून माघार घ्यावी लागली. कीबहुना या अफगाण युद्धाने रशियन कमजोर अर्थव्यवस्थेवर इतका ताण पडला की तत्कालीन सोविएत यूनियन चे विघटन होण्याला जी अनेक कारण कारणीभूत ठरली त्यात या अफगाण युद्धाचा क्रम बराच वरचा आहे. १९६२ मध्ये भारताचा दारुण पराभव करणार्‍या चिनी लाल सैन्याला १९७९ मध्ये विएतनाम मध्ये दारुण पराभव स्वीकारावा लागला.

या नियमाला सिद्ध करणारा अपवाद सापडणे तसे कठीण. अगदी आपला भारत देश पण. कालच शूजीत सरकार या अफलातून दिग्दर्शकाचा 'मद्रास कॅफे' हा १९८७ मधील भारतीय लष्कराच 'विएतनाम' प्रभावी पणे चित्रित करणारा चित्रपट पाहिला आणि लष्करी बळावर आजूबाजूच्या चिमुकल्या देशाना चिरडून टाकु हा गंड बाळगण्याचे भीषण परिणाम दोन्ही देशाना कसे भोगावे लागतात याची अजुन एकदा आठवण zआलि.

आंतरराष्ट्रीय घटनांच्या पार्श्वभूमीवर चित्रपट बनण्याची वेळ भारतीय चित्रपट सृष्टीत जवळ जवळ नाहीच. ( माझया मते निव्वळ युद्ध पट या श्रेणीत मोडत नाहीत. त्यामुळे बॉर्डर आणि हकिकत हे बाद). कबीर खान चा 'काबुल एक्सप्रेस' हा नियम सिद्ध करणारा अपवाद. 'मद्रास कॅफे' हा शूजीत सरकार या दिग्दर्शकाचा दीर्घ कारकिर्दीतला हा केवळ तिसरा चित्रपट. त्याच्या पहिल्या 'यहाँ' चित्रपटात धागधगत्या काश्मीर च्या पार्श्वभूमीवर एक भारतीय मेजर आणि एक काश्मीरी मुलगी यांच्यातली प्रेम कहाणी तरल पणे मांडली होती. विकी डोनर हा स्पर्म डोनेशन वर खुष्खुशीत भाष्य करणारा त्याचा दुसरा चित्रपट बॉक्स ऑफीस वर पण चांगलाच चालला होता. विकी डोनर नंतर मोठे स्टार घेऊन सर्व सामन्यांची मनोरंजनाची मागणी पूर्ण करणारा चित्रपट बनवण्याची सेफ बेट घेण्याची संधी सोडून त्याने भारताने श्रीलंका प्रश्नात केलेला हस्तक्षेप व त्या पार्श्वभूमीवर राजीव गांधींची झालेली हत्या हा चाकोरीबाहेरचा विषय निवडून त्याने आपले वेगळेपण सिद्ध केले.

कहाणी सुरू होते ती रॉ ही भारतीय गुप्तहेर संघटना मेजर विक्रम सिंग या आपल्या अधिकार्‍याला तमिळ प्रश्नात वाढणारे अण्णा (प्रभाकारन या तमिळ दहशतवाद्यावर बेतलेल पात्र ) चे वर्चस्व कमी करून त्याला जाफना या तामिळ बहूल भागात एक दुसरा राजकीय पर्याय उभा करण्याच्या कामगिरीवर पाठवते. विक्रम सिंग जेंव्हा श्रीलंकेत प्रवेश करतो तेंव्हा सलामिलाच त्याला अनेक भारतीय शांती सेनेतील सैनिकांचे मृतदेह दिसतात. आपल्या पुढयात काय वाढून ठेवल आहे याची चुणूक विक्रम सिंग ला मिळते. अण्णा ला राजकीय पर्याय उभा करताना त्याला हे ही जाणवते की फितुरी आणि दगाबाजी यानी भारतीय राजकीय आणि लष्करी उद्दिष्टांचा कणाच मोडून काढला आहे.

तरीही विक्रम सिंग आपले सर्वस्व पणाला लावून देशासाठी लढतो. पण त्याला त्याची किंमत आपल्या वैयक्तिक आयुष्यात मोजावी लागते. तरीही विक्रम सिंग तमिळ दहशतवादी संघटनेची पाळमुल खणुन काढण्याच आपल काम चालूच ठेवतो. ही तमिळ संघटना श्रीलंके मध्ये शांती सैन्य पाठवणार्या आपल्या माजी पंतप्रधान ला मरणार आहे अशी त्याला खात्री पटत चालली आहे. दरम्यान अंतर्गत फितूरि, श्रीलंका सरकारचे असहकाराचे धोरण, तामिलांचा कडवा प्रतिकार आणि झालेली बेसुमार हानी यामुळे भारत आपली फौज माघारी घेते.विक्रम सिंग आपल्या नेत्याची हत्या टाळण्यात यशस्वी होतो? अण्णा ला राजकीय पर्याय उभा राहतो? विक्रम सिंग चे पुढे काय होते? या प्रश्नांची उत्तर सत्य घटनेवर आधारित असलेला चित्रपट ( संबंधित निर्माते आणि दिग्दर्शक याचा इनकार करत असले तरी)देतो. आणि ही उत्तर नक्कीच आपला राष्ट्रीय गर्व वाढवणारी नाहीत.

चित्रपट सर्वच आघाडीवर सरस आहे. कुठलेही पात्र विनाकारण घुसडलेले वाटत नाही. ना मनोरंजक गाणी, ना कॉमिक रिलीफ ना अंगप्रदर्शन त्यामुळे मनोरंजन हा शुद्ध हेतू बाळगून जाणार्‍या पब्लिक ने इकडे न गेलेलेच बरे. विक्रम सिंग ला त्याच्या कामात मदत देणारी पत्रकार नर्गिस फाखरी ने चांगली केली आहे. ' Criticizing my national policies doesn't make me anti national" हा तिचा संवाद बरेच काही सांगून जातो. व्यवसायिक गुप्तहेर अधिकार्‍याच्या भूमिकेत जॉन अब्राहम चक्क शोभून दिसतो. माठ अभिनेता म्हणून ओळखल्या जाणार्‍या या अभिनेत्याने प्रोड्यूसर म्हणून वेगवेगळे विषय निवडून चांगलीच चमक दाखवली आहे. शंतनू मोइत्रचे क्रेडिट्स च्या वेळी येणारे मौला हे गाणे अप्रतिम. युद्दगरस्त श्रीलंकेला कॅमेरया मध्ये अप्रतिम पणे बद्ध करणार्‍या कॅमरा मन ला सलाम.

पण चित्रपटाचे खरे नायक आहेत ते प्रचंड रिसर्च करून पटकथा लिहिणारी सोमनाथ डे आणि शुभेन्दु भट्टाचार्य ही जोडगोळी व दिग्दर्शक शूजीत सिर्कार. जर विकी डोनर ची पुण्याई नसती तर कदाचित हा चित्रपट पडद्यावर आला असता की नाही याबद्दल शंका घ्यायला वाव आहे.

चित्रपट हे मॅक्रो पातळीवर नसले तरी माइक्रो लेवल ला खूप मोठे बदल घडवून आणू शकतात हे माझे मत. एसी कॅबिन मध्ये बसून भरल्या पोटी भारताने पाकिस्तान वर त्वरित हल्ला चढवून पाकिस्तान नष्ट करावा अशी स्टेटस फेस्बूक वर अपडेट करणार्‍यांपैकी काही लोका ना तरी युद्ध हे किती वाईट असते आणि आपले काहीच स्टेक वर नसताना प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढणार्‍याला किती तरी गमवावे लागते याची जाणीव होऊन त्यानी युद्धखोरीची वांझ भावना बदलली तरी मद्रास कॅफे हा १०० कोटी कमावणार्या इतर चित्रपट पेक्षा यशस्वी होईल.

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

'मद्रास कॅफे' १०० कोटीचा (आणि आता तर २०० कोटींचा) धंदा करो किंवा न करो, वरच्यासारखे एक परीक्षण या चित्रपटाला कोटीमोलाचे आहे.
मनोरंजन हा शुद्ध हेतू बाळगून जाणार्‍या पब्लिक ने इकडे न गेलेलेच बरे.
इथे खरी मेख आहे. इच्छा नसतानाही इथे 'टाईम प्लीज', 'दुनियादारी' या चित्रपटांचा विचार मनात येतो. विचार करायला लावणारे काहीही हल्ली लोकांना नको असते. ( हे मार्कंडेय काटजूंच्या 'नव्वद टक्के भारतीय मूर्ख आहेत' या विधानासारखे 'स्वीपिंग स्टेटमेंट झाले आहे खरे, पण काटजूंसारखे ते मागे घ्यावे असे मला तूर्त तरी वाटत नाही!) काबुल एक्सप्रेस या चित्रपटाच्या बाबतीतही मला नेमके असेच वाटले होते.
निदान अशा चित्रपटांना बर्‍यापैकी रसिकाश्रय मिळावा, या चित्रपटांमध्ये केलेली गुंतवणूक भरुन निघावी आणि असे चित्रपट बनवण्यासाठी निर्माता-दिग्दर्शकांना प्रोत्साहन मिळावे अशी अपेक्षा या 'नव्वद टक्के मूर्खांच्या देशात' करणे अवाजवी ठरु नये!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

काटजूंनी आजच आपल्या विधानाबद्दल माफी मागितली आहे. थोडे आधी तुमचे 'समर्थन प्राप्त झाले असते' (जमलं मटामराठी?) तर त्यांच्यावर ही वेळ का आली असती? (ह. घ्या हो.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

परीचय आवडला. विकी डोनर काही मला आवडला नव्हता. बघु हा कसा वाटतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बघायला पाहिजे.
आमच्या वर्गातल्या तमिळ अण्णांनी फेसबुकावरून वगैरे बरीच बोंबाबोंब सुरू केली आहे, हीरो आणि व्हिलनची (प्रभाकरन् आणि राजीव गांधी) अदलाबदल केली आहे म्हणून म्हणे!
श्रीलंकन तमिळ प्रश्न, शांतिसेना वगैरे प्रश्नांबद्दल माहिती देणारे एखादे मराठी/इंग्रजी पुस्तक कोणी सुचवेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशा चित्रपटांना सुजाण प्रेक्षकांनी खरंच आश्रय दिला पाहिजे.
आपण नेहमी काश्मीर व नॉर्थ ईस्ट भारताच्या ताब्यात राहील का नाही, याची चिंता करतो. पण दक्षिणेकडील राज्यांनी अनेक वेळा या फुटिर वृत्तीचा उघड पुरस्कार केला आहे. आत्ता हे बघाना, एलाटीटीई ला अतिरेकी म्हणायलाही हे लोक विरोध करत आहेत. चित्रपटाची तामिळ वर्जन रिलिज करायला आडकाठी करताहेत. भविष्यात केंद्रात कणखर नेता नसेल तर काय होईल त्याचे हे भीषण चित्र आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

पिच्चरबद्दलची उत्सुकता वाढवणारे परीक्षण. पिच्चर पाहिल्या जाईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चांगल्या, वेगळ्या चित्रपटाची प्रभावी ओळख. लेखकांना क्रेडिट देणंही आवडलं. विजय तेंडुलकर म्हणत की लेखकाने लिहिलेलं असतं त्याचं श्रेय दिग्दर्शकाला मिळताना दिसतं. (दिग्दर्शकाच्या कष्टांचं श्रेय अभिनेत्यांना मिळतं हेही तितकंच खरं)

एसी कॅबिन मध्ये बसून भरल्या पोटी भारताने पाकिस्तान वर त्वरित हल्ला चढवून पाकिस्तान नष्ट करावा अशी स्टेटस फेस्बूक वर अपडेट करणार्‍यांपैकी काही लोका ना तरी युद्ध हे किती वाईट असते आणि आपले काहीच स्टेक वर नसताना प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढणार्‍याला किती तरी गमवावे लागते याची जाणीव होऊन त्यानी युद्धखोरीची वांझ भावना बदलली तरी मद्रास कॅफे हा १०० कोटी कमावणार्या इतर चित्रपट पेक्षा यशस्वी होईल.

आशावाद आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बघायच्या यादीत आधी होताच, आता पुढच्या विकांतापर्यंत टिकला तर बघावाच लागेल

(कथासूत्र समजायच्या भितीने परिचय पूर्ण वाचलेला नाही)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काळजी करू नका. पूर्ण कथासुत्र आणि डीटेल्स दिलेले नाहीत. बिंदास वाचा : )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

माझ्यासाठी उत्सुकता चाळवायला दिग्दर्शक आणि परिचयाचा मथळा + पहिला परिच्छेद पुरेसा आहे Wink
बाकी परिचय चित्रपट पाहिल्यावर वाचेनच

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

रोचक चित्रपट दिसतोय. बघू या कधी बघायला मिळतो ते.

लष्करी बळावर आजूबाजूच्या चिमुकल्या देशाना चिरडून टाकु हा गंड बाळगण्याचे भीषण परिणाम ...

Smile
अमेरिकेतल्या निदान काही शहरांमधे आजही चौकाचौकात भिकारी दिसतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुढिल आठवड्यात 'सत्याग्रह' येतोय त्यामूळे हा टिकेल की नाहि शंकेने आजच बघुन घेतला Smile
तुर्तास आवडला असे म्हणतोच शिवाय परिचय चांगला उतरला आहे.

संवादलेखन अधिक चांगले असते तर चित्रपट अधिक प्रभावी असता असे वाटते.

(मात्र कथा काहिशी उघड होतेय. व्याप्तीनिर्देश (डिस्लेमर) असता तर अधिक आवडले असते.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दक्षिणेकडचे दिसावेत असे चेहरे आणि शरीरयष्टी असलेले नट घेतले आहेत ते आपापल्या जागी शोभून दिसतात. जॉन अब्राहमलासुद्धा कमी ग्लॅमरस केलं आहे. (नर्गिस फखरी सोडता) चित्रपटाचा 'लूक' चकचकीत नाही हे आशयाला धरून आहे. ह्या जमेच्या बाजू आहेत. तरीही एकंदरीत चित्रपट फसलेला वाटला. त्याचं मुख्य कारण हे पटकथा आणि संवाद हे वाटलं. पात्रांमध्ये प्रेक्षकाला रस वाटावा इतपत प्रसंगांना वजन येत नाही. ते पटापट उरकून घेतल्यासारखे वाटतात. डोकं बाजूला ठेवून पाहायच्या फास्ट अ‍ॅक्शन सिनेमात ही लय चालून जाते. पण जिथे प्रेक्षकांनी डोकं चालवावं अशी अपेक्षा असते (आणि इथे ती होती असं वाटतं) तिथे ते पुरेसं होत नाही. मध्यंतरापूर्वी नक्की कोण कुणाच्या बाजूनं आहे, कोण कुणावर कुरघोडी करतंय आणि कोण फसतंय ह्यात पुष्कळ वेळ जातो. त्यामुळे, ज्या मानवी ताणतणावांमुळे आणि दोन बाजूंच्या सुष्ट किंवा दुष्ट असण्याबद्दलच्या अस्पष्टतेमुळे हा संघर्ष अ‍ॅक्शन सिनेमाच्या दोन अंगुळं वर जाऊ शकला असता ते पुरेसे अधोरेखित होत नाहीत. मध्यंतरानंतर सिनेमा रूळ बदलतो आणि हत्येच्या कटाभोवती फिरू लागतो. अपेक्षेनुसार बॉडी काउंट वाढत जातो आणि अखेर काय होणार ते तर माहीतच असतं. जर मध्यंतरापूर्वीच्या पटकथा-संवादांना आणि त्यांद्वारे पात्रांच्या नैतिक-अनैतिक भूमिकांना पुरेसं वजन आलं असतं, तर उत्तरार्ध अस्वस्थ करणारा वाटला असता. पण तसं होत नाही. उत्तरार्धात केवळ तपासकथा आहे. जर सिंहली-तमिळ संघर्षाची पार्श्वभूमी नसती, तर एखादी उत्कंठावर्धक हेरकथा किंवा पोलीस विरुद्ध माफिया संघर्ष वगैरेंइतपतच चित्रपटाचं स्वरूप राहिलं असतं. ही पार्श्वभूमी घेतली म्हणून अधिक अपेक्षा होत्या, पण त्या पूर्ण झाल्या नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

त्याचं मुख्य कारण हे पटकथा आणि संवाद हे वाटलं

हैला! याबाबतीत (चक्क) चिंजंशी मत जुळलं! Wink
म्हंजे आमची चित्रपटाची समज वाढली की कसे? Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अगदीच सपक आणि सरळसोटपणे जाणारी पटकथा.रटाळ, संदर्भहीन संवाद. इतक्या संवेदनशील विषयाचे भजे झाले असे वाटले. त्यात भर म्हणून की काय मी ज्या चित्रपटगृहात खर्‍या सिनेमास्कोपमध्ये ( म्हणजे ७० मिमि - हल्ली मल्टीप्लेक्समध्ये ती स्क्रीनच पहायला मिळत नाही) पाहिला. तिथे पहिल्याच आठवड्यात प्रिंटवर ओरखडे, हाताने केलेल्या गोल खुणा असले तंबू टॉकीज प्रदर्शन झाले. रात्री साडे नवाच्या शोला कोणत्याही मादक्क पेयाचे सेवन न करता चित्रपट पहायला गेलेला मी; पण थिएटरचा प्रोजेक्टर औट ऑफ फोकस असल्याने पहिल्या अर्ध्या तासातच हँगओव्हरप्रमाणे डोके दुखू लागले.

त्यामुळे चित्रपट कधी एकदा संपतो असे झाले. याला चांगला हिंदी चित्रपट कशाला म्हणायचे असे वाटत आहे. उलट गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटच अधिक गुणवत्तेने येत आहेत असे वाटते. (वर सन्जोप रावांनी उल्लेखलेले नव्हत.)

त्यामुळे हिंदी चित्रपट म्हणाल तर आता घरातल्या टाटा ईस्काय टीव्हीवर तेलुगू-तमिळ मधून डब केलेले चित्रपटच पहायचे ठरवले आहे. डोके दुखत नाही, छान झोप येते आणि टीव्हीही आपोआप बंद होतो. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घरातल्या टाटा ईस्काय टीव्हीवर तेलुगू-तमिळ मधून डब केलेले चित्रपटच पहायचे ठरवले आहे. डोके दुखत नाही, छान झोप येते आणि टीव्हीही आपोआप बंद होतो.

+१०१००. सगळे कसे अगदी सरळ-साधे आणि ठसठशीत असते. डबिंग आणि ष्टायली तसेच अशक्य सीन्समुळे मजा येते हेवेसांनल. मग तो घोडा स्किड करण्याचा सीन असो किंवा रेल्वेच्या डब्यावर पाय आपटून तो विलग करण्याचा सीन किंवा विंडोज मीडिया प्लेयरमध्ये प्रोग्रॅमिंग करणार्‍या हॅकरचा शीन असो. जी मजा येते, आहा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चित्रपट अगदिच वाईट नाही; पण "वेगळ्या" विषयावरचा बॉलीवूडपट म्हणून जितका वाटला तितकाही भारी नाही.
( कथा आंतरराष्ट्रिय मुद्द्यांभोवती फिरण्याच्या बाबतीतच विचार केला तर "काबुल एक्स्प्रेस" अधिक परिणामकारक वाटला होता.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars