डुबरगेंडा

डुबरगेंडा सर अशी सुरुवात मी इथे करत आहे ती केवळ तुम्हाला ते शिक्षक होते हे कळण्यासाठी. तोंडारमधे आम्ही कोणत्याही शिक्षकाला सर म्हणत नसू. गुर्जी आणि बाई अशा संज्ञा आम्ही तिथे वापरत असू. डुबरगेंडा सर मात्र गुर्जी या सन्मानाला देखिल कोणाला पात्र वाटत नसत. त्यांचा उल्लेख इतर शिक्षकांत आणि मुलांत एकेरीने होई. इथे 'त्यांच्या' हा शब्द देखिल ओव्हरएक्सप्रेशन आहे. तेव्हा तरी आम्ही त्याला एकेरीच संबोधत असू. तो कोणालाच आवडत नसे. त्यालाही कोणी आवडत नाही असे वाटायचे. त्याच्या नावाची मला फार गंमत वाटत असे. असले नाव कोण बरे आपल्या मुलाला ठेवले असेल? आमचे गुरुजी उशिरा आले किंवा आलेच नाहीत तर आम्ही वर्गात धिंगाणा घालत असू. तेव्हा तो आमच्या वर्गात येई आणि सर्वांना हडकत असे. त्यामुळे तो सर्वांना अप्रिय होता. तो आम्हाला शिकवायाला कधीच नव्हता. त्याच्या वर्गातील मुलांत देखिल त्याच्या एकलकोंड्या स्वभावामुळे आणि कडक सजांमुळे घाणेरडा अशीच होता. हळूहळू कळले कि त्याचे मूळ नाव डुबरगेंडा नाही, वेगळेच काहीतरी आहे. पण तो ४ फुटी असल्याने आणि वाकून चालत असल्याने त्याला डुबर हे विशेषण तंतोतंत बसत असे. तो तसा बराच वाळका होता तेव्हा कशाचाच काहीच परिणाम न होण्याच्या त्याच्या स्वभावामुळे त्याला गेंडा ही उपाधी मिळाली असावी. शिवाय त्याची चेहरेपट्टीही कुरुपच होती. शिवाय त्याच्या चेहर्‍यावर गेंड्याप्रमाणे छोटछोट्या वळकट्या होत्या. त्याला पाहिले कि मुले दोन हात फटकूनच असत. तो फारच चेंगूट होता असे सगळे म्हणायचे. त्याची चेंगटपणाची उदाहरणे गावप्रसिद्ध होती. त्याचे मळकट फाटके कपडे लगेच त्याची साक्ष म्हणून पाहता येत.

तोंडारचे शासकीय प्राथमिक विद्यालय गावापासून एक किमी वर असावे. त्याच्या बाजूने एका ओढ्याचे पात्र होते. पावसाळ्यात त्यात खेळणे म्हणजे मुलांसाठी कोण मजा असायची. त्या पात्रातून आणि त्याच्या कडेने एक वाट जाई. तिकडे फारसे शेतकरी जाताना कधी पाहिले नाहीत. मेंढपाळ मात्र तिकडेच जात. संध्याकाळी पाच वाजता अंधार पडायला चालू झाले कि डुबरगेंडा तिकडच्या अंधारात गायब होई. गावात आम्ही कधी त्याला पाहिले नाही. त्या शाळेत मी २-३ वर्षे होतो, दुसरी ते चौथी. पैकी डुबरगेंडा वजा जाता मला गणेश, राजेश, संगीता, रमेश, त्याची बहिण राणी, महेश, गजेंद्र, असे काही मित्र आणि चार-सहा शिक्षक इतकेच तिथले लोक आठवतात. सर्वजणांसाठी एकमताने डुबरगेंडा एक उपहासाचे पात्र होते आणि त्याला स्वतःला त्याची ना खंत ना खेद! तो कधी प्रार्थनेसाठी सर्वांसोबत थांबलेला देखिल आठवत नाही. अगदी स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताकदिनी सुद्धा. कधी कुणाची काळजीने, हून विचारपूस केली नाही. कधी कुणाला काही देण्याघेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

इयत्ता दुसरीचे निकाल असावेत. परीक्षा अशी नव्हतीच. एका प्रार्थनासभेनंतर दुसरीच्या वर्गाचे पहिला, दुसरा असे ठरवण्यात आले. कसे तर शिक्षक मुलांकडे पाहायचे आणि पैकी एका मुलाला 'उठ' म्हणायचे. तो पहिला. मग दुसर्‍याला म्हणायचे. तो दुसरा. पहिला महेश होता. त्याचे वडिल, तालुक्याच्या गावी प्राध्यापक होते. त्यांचा गावात चांगलाच दबदबा होता. शिवाय ते लिंगायत होते. दुसरा मी होतो. आमचे वडील ग्रामसेवक. सर्व जातींत मिसळणारे. शिक्षित पण खेडवळ. प्रत्येक लिंगायताप्रमाणे महेशचे वडिल काँग्रेस/शिवराज पाटील/इंदीरा गांधी काँबोचे समर्थक आणि प्रत्येक ब्राह्मणाप्रमाणे आमचे वडिल अटलजींचे पूजक! एकदा महेशच्या आईने मला जेवायला बोलावले होते. कोणता सणसमारंभ असावा. माझ्या खाण्याच्या पद्धतीत काहीच ब्राह्मणी नाही, ब्राह्मणी तर जाऊच द्या अगदी लिंगायती पण नाही म्हणून ती कुचेष्टेने हसली होती. तसे तिने बोलूनही दाखवले होते. तो एक सल मनात होता. शिवाय महेश वर्गात गप्प असायचा, मीच प्रश्न विचारायचो आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायचो. इतकेच नव्हे तर शिक्षक नसत त्यावेळी मी शिक्षकाप्रमाणे शिकवायचो देखिल! आपल्यापेक्षा कुणी हुशार आहे ही कल्पना देखिल मला तेव्हा सहन व्हायची नाही. (उदगीरला आलो तेव्हा तिथली कितीतरी मुले आपल्यापेक्षा कितीतरी हुशार आहेत हे मला सलले होते, पण हळूहळू त्याची सवय झाली. शिवाय त्यात काही अन्यायात्मक नव्हते.) म्हणून मी हेडमास्तरांना म्हणालो कि तुम्ही महेशला पहिला बनवले आहे ते चुकीचे आहे. माझ्या उद्दामपणाचा त्यांना प्रचंड राग आला आणि त्यांनी मला गपचूप खाली बसायला सांगीतले. मी रागाने खाली बसलो आणि खुनशीपणे त्यांच्याकडे पाहू लागलो. त्यांचा राग अजूनच वाढला. त्यांनी वडिलांना पत्र लिहिले आणि बोलावून घेतले. त्या निमित्ताने मी पूर्ण शाळेत प्रसिद्ध झालो.

त्यानंतर १-२ महिने गेले आणि डुबरगेंड्याने मला एकदा एका मुलाकरवी निरोप धाडून बाजूला बोलावून घेतले. मला बरेच नवल. 'व्हाय मी ऑउट ऑफ ऑल?' ची भावना तरळून गेली.
"तुझं नाव काय?"
"अरुण."
"पूर्ण नाव?"
"अरुण भास्करराव जोशी."
"तू ब्राह्मण आहेस का?"
"मी देव, धर्म, जातपात मानत नाही."
"तुला बाकीचे लोक ब्राह्मण मानतात का?"
"हो."
"येळवसीला आमच्या घरी येशील का?"
"कुठे?"
"कुमठ्याला"
"तुम्हाला शेत आहे?"
"चांगलं ५० यक्कर आहे."

त्यावेळी प्रत्येकाचं शेत ५० प्लस यक्कर असायचं. ज्याची १० यक्करपेक्षा कमी जमिन असायची ते दळिद्री. आमचे शेतच काय घरही नव्हते म्हणून आम्हाला कंगालच मानायचे. पण एकदा 'ब्राह्मणाचे धन त्याचे शिक्षण असते' असे आमचे गायकवाड सर म्हणाले तेव्हापासून तो न्यूनगंड गुरगावचे शेतकरी पाहिपर्यंत तरी माझ्या मनातून गेला होता.
"पण मी नेहमी माझ्या मित्रांसोबत येळवसीला शेतावर जातो. तुमच्या घरी गेल्यावर त्यांच्यासोबत मजा करता येणार नाही."
माझे खरे दुखडे वेगळेच होते. भातुकलीच्या खेळात राणी माझी राणी बनत असे. ती गावात, आमच्या पिढित, सर्वात गोरी आणि सुंदर मुलगी होती. रेल्वे ट्रॅकपलिकडचे त्यांचे शेत अप्रतिम सुंदर होते आणि आम्ही सगळे तिकडेच पडिक असत असू. येळवसीला गुरांना न्हाऊ घालणे, अंबिल खाणे, कडब्याची खोपटी बनवणे, पतंग उडवणे, झाडावर खेळणे, साळीच्या पिकात लपालपी खेळणे, भातुकलीचा कोणतासा प्रकार खेळणे यांमधे तिचा जो सहवास मिळणार होता त्याला मी मुकणार होता.

"असं काही नाही. माझ्या दोन मुली आहेत. त्यांच्यासोबत खेळ."
"पण त्यांच्याशी मैत्री करायलाच मला वेळ लागेल."
"काही वेळ लागणार नाही."
माझे हिशेबी मन विचार करू लागले. डुबरगेंड्याच्या मुली त्या काय राणीइतक्या सुंदर असणार?
"मी येणार नाही." मी ठामपणे म्हणालो.
"अरे ब्राह्मण लोकांनी ब्राह्मण लोकांसोबत राहावे. त्याच्याने बुद्धिमत्ता वाढते."
"काय सांगता? तुम्ही ब्राह्मण आहात?"
"हो."
मला प्रचंड धक्का बसला.
"पण गुर्जी, तुम्ही तर आमचे पाव्हणे नाहीत."
"म्हणजे?"
"म्हणजे आमचे पाव्हणे नसलेले ब्राह्मण मी पाहिलेलेच नाहीत. जितके पाहिले ते सगळे पाव्हणेच."
"ते कसं?"
"आम्ही ज्या ज्या गावात जायचो, तिथे आमचं एकमात्र कुटुंब ब्राह्मण असायचं. तेव्हा नातेवाईक सोडून ब्राह्मण मी पाहिलेलेच नाहीत."
"आमच्या गावातही आमचं एकच घर आहे."
"किती दिवस जायचं?"
"दोन."

नातेवाईक सोडून जे लोक ब्राह्मण कसे असतील याबद्दल मला प्रचंड कुतुहल वाटले. हा कंसेप्टच मला नविन होता. 'दुसरे' ब्राह्मण कुटुंब कसे असते हे पाहायला मिळणार! शिवाय डुबरगेंड्याला दोन मुली आहेत. गावात मी अत्यंत कुरुप लोकांच्या अत्यंत आकर्षक मुली पाहिल्या होत्या. मुली पाहताना त्यांच्या बापांचे वैगेरे चेहरे आठवले तर रसभंग होतो. शिवाय 'बामन भट, कडी आंबट. कडीत पडली माशी, बामन राहिला उपाशी.' असे इतर जातीची मुले मला नेहमी चिडवत. दुसर्‍यांदा अन्न बनवेल इतकेही धन ब्राह्मणांकडे नसते असा त्याचा अर्थ होई. इथे ५० यक्कर शेताची मालकी! मनाची चांगलीच द्विधा झाली. शेवटी राणीबल नाविन्यबलासमोर टिकले नाही. डुबरगेंड्याने मला इतका आग्रह केला कि विचारता सोय नाही. शेवटी मी हो म्हटले. आईवडिलांची परवानगी घ्यायचा प्रश्नच नव्हता, गावकर्‍यांना सर्व जग पूर्णतः विश्वसनीय असायचे. मुलगा कितीही वेळ दिसला नाही तरी पुन्हा कधीना कधी दिसायचाच, म्हणून १-२ दिवस बिनघोर कुठेही जा.

शाळेशेजारचा ओढा पश्चिमेकडे जायचा. मावळत्या सूर्याच्या जणू साथीलाच आम्ही दोघे त्याच्याकडे सरकत होतो. मेंढपाळ परतत होते. ते मला ओळखत. आज डुबरगेंड्यासोबत मी ही आहे हे पाहून त्यांना नवल वाटले. मला बाजूला घेऊन त्यांच्यापैकी एकाने कुठे चालला म्हणून विचारले. येळवसीला गुर्जीकडे चाललोय म्हटल्यावर 'सांभाळून बाबा' इतकंच ते म्हणाले. हळूहळू अंधार झाला. डुबरगेंडा माझ्यापासून ३०-४० फूट पुढे चालला होता. मधे मधे मागे वळून मी आहे का हे पाही. वाढत्या अंधारासोबत निसर्गाने पृथ्वीवर पाडलेल्या वळकट्या दिसेनास्या झाल्या. आकाशात चंद्राचा पत्ता नाही. मी कोणासोबत कोठे चाललोय ते मला एकट्यालाच माहित. मेंढपाळाच्या शब्दाचे जास्त अर्थ निघत आहेत वाटू लागले. तो दोन गावांमधला भाग असल्याने कोणी रस्ता ओलांडताना पण दिसेना. 'याने मला मारले तर?' अचानक अंगावर काटा आला. 'पण तो कशाला मारेल?' दुसरे मन म्हणे. 'कशालाही मारू शकतो.' तिसरे मन म्हणे. रस्त्यात कुमठ्याच्या गुफा लागल्या. त्या म्हणे राक्षसांनी नखाने कोरल्या होत्या. ते लांबलचक व्रण मी स्वतः पाहिले होते. त्यांच्या शेजारच्या तळ्याभोवती दरवर्षी जत्रा भरे. त्यांत एक मोठी घनाकृती पाण्याने भरलेली आणि नाणे जाईल इतकीच फट असलेली गुफा होती. तीत मी नाणे टाकले नाही. असे करणारांस राक्षस आपल्या लोकांमार्फत उचलत असे मला सांगूनही उद्दामपणे टाकले नाही. अश्रद्धा! 'हा त्या राक्षसांचा एजंट असला तर?' अनेक भयप्रद विचार येत होते, तितक्यात कुमठ्याचे दिवे दिसू लागले. आपण या माणसाला निष्कारण अपराधी ठरवत होते हे जाणवून मलाच अपराधी वाटले.

डुबरगेंड्याचे घर म्हणजे प्रशस्त वाडा होता. त्यात ते चौघेच राहत. त्याच्या दोन्ही मुली माझ्यापेक्षा ४-७ वर्षांनी मोठ्या होत्या. त्यांच्या चेहरेपट्टीला, वागण्याला, आवाजाला, शब्दांना कोणताही ब्राह्मणी टच नव्हता. नॉट ब्यूटीफूल अनटील मेड्-अप प्रकारच्या होत्या. राणीला मी नक्कीच मिस करत होतो हे मला तत्काळ जाणवले. व्यक्ति सुंदर आणि स्वीकार्य दिसायला चालू व्हायला वेळ लागतो हे मला कालामानाप्रमाणे जाणवले आहे. त्यांच्या घरात धान्याची रेलचेल होती. कुठे काय ठेवावे आणि त्याचे जतन कसे करावे हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता आणि तो नीट न सुटलेला दिसत होता. डुबरगेंडा कंजूष मात्र नक्कीच होता. त्यात मात्र त्याने सीमा ओलांडली होती. तो आपल्याच शेतात परसाकडे जाई. उंदीर त्याची पोती फाडत आणि दिवसभर तो दाणे उचलत असे. पाणी वाचवणे, सुतळीचा तुकडा वाचवणे यांतच त्याचा वेळ जाई. मला मात्र तो जेवताना चांगलाच आग्रह करी. पण मी काही बाजारू वस्तू मागीतली कि घरगुती पर्याय सुचवी. माझ्यासाठी पतंग आणि मांजा पण त्याने घरीच बनवला. तो बहुतेक काहीच विकत आणत नसावा असेच मला वाटायला लागले. (आता वाटते कि असा वाणिज्य मंत्री देशाला लाभला तर वाणिज्यिक तूट नावाचा प्रकारच नसता.)

दुसर्‍या दिवशी सगळे शेतावर गेलो. येळवस म्हणजे येळवर. मला तर दिवाळीपेक्षाही प्रिय! अगदी शहरी लोक ऑफिस सोडून गावात शेतात सण साजरा करत. कोण्या देवाची पूजा करतात. स्थानिक भाषेतल्या मंत्रघोषणा देतात. डुबरगेंड्याला शेतातल्या पात्यानपात्याची इत्यंभूत माहिती होती. प्रत्येक झाडाचे सगळे गुणावगुण, निसर्गधर्म मुखपाठ. ते ऐकत मी थोडा 'आपण कोणती निरीक्षणे करत नाहीत' हे पाहून स्तंभित झालो होतो. मग नंतर जेवणं झाली. वेगवेगळ्या भाज्या, फळे खाऊन झाली. मी पहिल्यांदाच गाजरे उपडून पाटात धूवून खात होतो. थोड्यावेळाने ते ही नाविन्य संपले. मी माझ्या सगळ्या चमूपासून दूर होतो. माझे मन तिथे लागेना.
"मला घरी जायचंय."
"अरे आपण दोन दिवस राहणार होतो."
"नाही पण मला बोर झालंय."
"थोडा वेळ झोका खेळ."
"मला एकट्याने आवडत नाही."
"माझ्या धाकल्या मुली सोबत खेळ."
झोका चढविणे हा प्रकार अतिशय रोचक असतो. खासकरून एक पुरुष आणि एक स्त्री झोका चढवत असतील तेव्हा. बसून उठताना जोडीदाराशी अंगांग अक्षरशः घासते. झोका जमिनीला समांतर होतो तेव्हा तर पडायची भिती आणि जोडीदारीणीचा स्पर्श हे एकत्र उच्चबिंदूवर असतात. डुबरगेंडाची मुलगी माझ्यापेक्षा मोठी! तिही चांगली ४ वर्षांनी!! त्या काळात आमच्या मनात मोठ्या मुलींबद्दल ताईवाद चांगलाच दृढ होता, तेव्हा मला काही झोक्याचा नीट आनंद घेता येईना. दु:खापेक्षा नैतिक द्विधा वाईट.

दोन दिवस गेले. माझ्याकरिता नवेनवे पदार्थ केले गेले. मला काय हवं नको ते विचारलं जायचं. मला काहीच काम करावं लागायचं नाही. मला एखाद्या गोष्टीचा त्रास होतोय म्हटलं कि ती बंद. जणू माझी सेवा हाच त्यांचा धर्म होता. मला त्याची सवय नव्हती. मागीतले तरी मिळत नाही या पिंडात वाढलेला मी! माझ्या मनात दरवेळी काहीतरी काळंबेरं यायला लागलं. अगदी खाऊन पिऊन मग कापलेल्या प्राण्यांपासून ते कोणत्या वाममार्गात गुंतवायचे सगळे प्रकार माझ्या डोक्यात घोळ घालू लागले. एव्हढी सेवा का? एव्हढी विचारपूस का? असे करणारे लोक चांगल्या मनाने असे करतात हे माझ्या आयुष्यात अजून सिद्ध व्हायचं होतं. लोक चांगलेच वागतात असं मी सहसा पाहयचो पण इतके डेडीकेटेडली चांगले वागणारे लोक पाहिल्यावर मात्र मनात शंकाकुशंका घोळायला लागल्या. त्याच्या जोडीला एकटेपणाची भावना होती. घराची एक सुप्त ओढ मनात निर्माण झाली आणि क्षणोक्षण ती जोर धरायला लागली.
"मला घरी जायचंय. आज तिसरा दिवस आहे."
"पण आज शाळा बंद आहे. उद्याही बंद आहे."
"पण मला आजच घरी जायचंय."
"शाळा सुरु झाल्यादिवशी आपण जाऊ."
"त्याला अजून २-३ दिवस आहेत. मी तितका वेळ कळ काढू शकत नाही."
"तुला काय पाहिजे ते सांग."
"मला काही नको. मला घरी जायचंय."

संध्याकाळी गावात फिरून आलो. हे गाव तोंडारपासून वेगळं होतं. इथल्या भिंतींवर शिवराज पाटील आणि पदमसिंग पाटील दोघांच्याही प्रचाराच्या जाहिराती होत्या. रात्री तुफानीची अस्वस्थता वाढली. वाटलं उठावं आणि सरळ चालू लागावं. पण पैसे नको आणि रस्ता माहित नाही. येताना अंधारातून आलेलो! दुसर्‍या दिवशी पुन्हा तेच पालुपद.
"तुम्ही मला का थांबवताय?"
"अरे इथे तुला काही कमी आहे का?"
"तुम्ही मला इथे कोंडून ठेवणार का?"
"मी तुला इथे कोंडून ठेवलंय का?"
"आज शाळा चालू झाली असेल. तुम्ही उगाच म्हणतात आज बंद आहे म्हणून."
"समजा चालू आहे. एक दिवस सुट्टी."
"मला सुट्टी नको. माझं इथे काय काम आहे?"
"आमची सुनिता तुला आवडते का?"
"मला तुमच्या घरचे सगळेच लोक आवडतात. पण मला तोंडारला जायचंय."
"तिला बायको करून घेशील का?"
आता मात्र मला काय बोलावे ते सुचेना. जास्त विचार न करता मी म्हणालो,
"नाही."
ती राणीसारखी गोरी आणि सुंदर असती तर माझी काहीच हरकत नसती हे सांगायचं धाडस माझ्यात नव्हतं.
"मी लहान आहे."
"तिच्यापेक्षा?"
"एकंदरीतच आणि तिच्यापेक्षाही. आम्ही आमच्यापेक्षा मोठ्या मुलींना ताई म्हणतो."
"पण तू तिला म्हणाला नाहीस. आणि चार वर्षांनी काही फरक पडत नाही."
"मला आत्ता लग्न करण्यात रस नाही."
"मग मोठेपणी कर."
"मला जायचंय."
"तू जाऊ शकत नाहीस."
"का?"
"तुझी चप्पल मी लपवून ठेवलीय. अरे, मला मुलगा नाही. लग्नानंतर सगळी प्रॉपर्टी तुझीच होणार आहे."
मी जाऊ नये वा जाऊन हरवून जाऊ नये, त्याची नक्की काकलूत काय होती मला कळली नाही. मी चपलेशिवाय ही जाऊ शकत होतो पण ती माझी पहिलीच चप्पल होती आणि घरी मला तिचा हिशेब द्यायला लागला असता. या बाबाने नंतर कधीच चप्पल आणलीच नाही तर?
"मला नको प्रॉपर्टी. मला घरी जायचंय."

मनात विचार आला, मी घराबाहेर कुणाकडेही कितीही दिवस राहू शकतो असे मी जे काही म्हणतो ते तितकंसं खरं नाही. आपण तिथे नसताना आपल्या जगात काय चालू असेल? राणीसोबत कोणी भातुकली खेळली असेल? ती हातची गेली तर? मला कल्पना करवेना. या कुमठ्याच्या नॉन्-ग्लॅमरस, दूर राहणार्‍या, आपल्यापेक्षा मोठ्या आणि सर्वात घाण म्हणजे इतक्या कुप्रसिद्ध डुबरगेंड्याची मुलगी कुठे आणि राणी कुठे. रात्रीचा वेळ होता. मी डेस्परेटली माझी चप्पल शोधू लागलो. ती काही मिळेना. शेवटी मी डुबरगेंड्याची चप्पल शोधली आणि लपवली. रात्री बारा वाजता मी त्याला उठवले.
"जोपर्यंत तुम्ही मला तोंडारला नेत नाही तोपर्यंत मी तुमच्या गोष्टी अशाच लपवणार."
"?"
"तुम्ही माझी चप्पल लपवली. मी तुमची लपवली."
"आता निवांत झोप. सकाळी आपण जाऊ."
माझे हताशपण त्याला कळले असावे. दुसर्‍या दिवशी सकाळी स़काळी ते ४-५ किमी अंतर आम्ही सूर्य वर यायच्या आत कापले. शाळेच्या वेळात आम्ही शाळेत आलो. राणीचा भाऊ सोडून प्रत्येकाकडे मी इर्ष्येने पाहत होतो. यांच्यापैकी भातुकलीत राजा कोण झाला असेल. मला कुमठ्यात इतका तामझाम स्वीकारल्याचे फारच वाईट लागले. वाहवत जाऊन आपण आपल्या नात्याचा अव्हेर केला असे वाटू लागले. शेवटी मधल्या सुट्टीत आम्ही सगळे ओढ्याच्या प्रशस्त वाळूत बसलो. सगळे जण येळवस कशी कशी खेळली ते सांगू लागले. शेवटी सगळे पांगले. मी आणि राणीच उरलो.
"भातुकली कोणकोण खेळले? तुझा राजा कोण झालं?"
न राहवून मी विचारले. काय उत्तर येईल? कोणाचेही नाव येते त्याने काय फरक पडतो? शेवटी माझ्या नशिबचे गेले ते गेलेच.
"या वर्षी मी भातुकली खेळलेच नाही. तू नव्हतासच ना!"
"मला वाटलं..."
"काय?"
"कि तू ..."
"मी काय?"
"काहीच नाही."
अपराधीपणाचा भाव माझ्या अंगाअंगातून ओसंडून वाहू लागला. तिने मला जवळ घेतलं आणि म्हणाली," तू तर नाही ना त्या डुबरगेंड्याच्या मूलीसोबत..?"
"नाही नाही. मुळीच नाही. त्यांच्याकडे भातुकली खेळतच नाहीत आणि असते तरी मी कोणाचा राजा बनलो नसतो."
अर्थातच मी खोटं बोलत होतो. डुबरगेंड्याची मुलगी फार सुंदर निघाली असती तर कदाचित मी राणीला विसरलो असतो. पण आता ते खोटं आहे हे स्वत:शीही कबूल करत नव्हतो. अपराधीपणाची भावना पराकोटीला पोहोचली कि भूतकाळातली सत्येही मनातून मिटवण्याचा प्रयत्न करते.

डुबरगेंड्याने मला माझ्या खर्‍या भावनांची प्रचिती आणून दिली होती.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (6 votes)

प्रतिक्रिया

मस्त Smile _/\_

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडलं !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मस्त!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile
फक्त मला यत्ता दुसरीत इतकी अक्कल नसल्याने आयुष्यातली काही वर्षे वागा गेल्यासार्ख उगाच वाटू लागलं Wink

स्वगत: च्यामारी लोकांना इतकं जूनं इतक्या तपशीलात आठवतं नी तुला इंजिनियरींगमधील सगळे प्रसंग लिहि म्हटलं तर काही रोचक क्षण वगळता सगळं धुरकट झालेलं Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

स्वगत - तरीही ऋषिकेश माझ्यापेक्षा लहान! घ्या!! WinkWink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

येलवस मह्णजे काय?
इयत्ता दुसरीत लग्नाची ऑफर द्यायची तर दुसरीतील मुलाला देतात की त्या मुलाच्या घरच्यांना?
पोरगं हो जरी म्हणलं पण घरच्यांनी नकार दिला तर काय करतात?
बाकी लिहित रहा, आम्ही वाचत आहोतच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

येळवस दक्षिण मराठवाड्यातला एक शेतकर्‍यांचा सण आहे.

लग्नाची ऑफर गमतीने आली असेल वा परिसरात ब्राह्मणच नाहीत या डेस्परेशनले आली असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पण डेस्परेशन कितीही म्हटलं तरी दुसरीतल्या पोराला कशाला ऑफर द्यायची?
त्याच्या घरच्यांना नाही का द्यायची?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अर्थातच त्याने ती तेवढ्या सिरियसली दिली नसणार मग. दिली होती हे नक्की. लॉजिक मला माहित नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लग्नाच्या ऑफर मधे एवढ आश्चर्य वाटण्यासारख काय आहे? फार कॉमन आहे हे. मोठी लहानांना गमतीत देत असतात. आणि लहान ऐकमेकांना गंभीरपणे देत असतात ;-). दुसरी म्हणजे ऐवढपण लहान नाहीय. आणि Freud विसरु नको.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी अगदी. मुलीला प्रत्यक्ष सांगू धजला नाही तर आपपल्या मित्रांमधे एका मूलीवर क्लेम सांगायचा आणि इतरांनी तिच्यावर काही हक्क सांगायचा नाही हा संकेत पहिली ते बारावी पर्यंत थोडाफार रुढ होता असे आठवते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आणि लहान ऐकमेकांना गंभीरपणे देत असतात

साने गुर्जींची काहीतरी गोष्ट होतीशी आठवतेय. म्हणजे, तपशील आता नीटसे आठवत नाहीत, पण काहीशी अशी:

एक लहान मुलगी (अर्थात लहानपणी) तिच्या दोन जीवश्चकण्ठश्च बालमित्रांना वचन देते, की मोठेपणी मी तुम्हा दोघांचीही बायको होईन, म्हणून. मग अर्थातच, तिचे हे भविष्य खरे होण्यासाठी, तिचे त्यांपैकी एकाशी लग्न होते पण... (यापुढचे तपशील धूसर आहेत, पण आठवणींतून रीकन्स्ट्रक्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे, तेव्हा तपशिलांबद्दल चूभूद्याघ्या.)

...बहुधा तिचा नवरा, फॉर रीझन्स बियॉण्ड हिज़ कण्ट्रोल विच आय कॅनॉट रीकॉल अ‍ॅट द मोमेण्ट, बेपत्ता होतो. बराच काळ बेपत्ता होतो म्हटल्यावर तो मेला असे समजून ती दुसर्‍याशी लग्न करते, आणि हे प्रेस्टो! तिचा पहिला नवरा कोठूनतरी अकस्मात् अवतरतो. त्यानंतर मग या त्रिकोणातून नेमके कोणाकोणाला नि कसकसे एलिमिनेट केलेले आहे, तो तपशील आता आठवत नाही; मागे काही वर्षांपूर्वी पोराच्या मुंजीत जनरीतीस अनुसरून कोणीतरी साने गुर्जींच्या गोष्टींचा संग्रह गळ्यात मारला होता, तो घरात कोठेतरी धूळ खात पडलेला आहे, तो शोधून काढून त्यावरची धूळ झटकून तपासावे लागेल. पण ष्टोरी एकंदरीत डेडली. आणि भिकार. ('तुमचा होतो खेळ, पण...' ही कमेंट महत्प्रयासाने टाळलेली आहे.)

आता, ही ष्टोरी लहान मुलांच्या गोष्टींच्या संग्रहात घालायला योग्य आहे, असे कोणास का वाटावे, कळत नाही. त्याच संग्रहात आणखीही एक डेडली गोष्ट वाचली होती, तिचा सारांश: एक लहान मुलगा आपले मृत्युपत्र बनवतो, त्यात आपल्याजवळ असलेल्या किरकोळ गोष्टी वाटून टाकण्याची तरतूद करतो, नि मग मरतो. व्हेरी प्रफाउंड.

आणखीही एक गोष्ट होती. त्यात एक प्रियकर प्रेयसीच्या सांगण्यावरून आईचा खून करून तिचे काळीज प्रेयसीला द्यायला निघतो, वाटेत ठेचकाळतो नि हातातून काळीज खाली पडते, ते म्हणते, "बाळा, लागले तर नाही ना तुला?" थोडक्यात, आईचे काळीज गूड, प्रेयसी ब्याऽऽऽऽऽड. सो मेलो-ड्राम्याटिक, यू नो.

'श्यामची आई' मी वाचलेले नाही, अथवा तो पिच्चरही पाहिलेला नाही. परंतु यानंतर ते धाडस होत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही पहीली गोष्ट दिलीय, ती कुठल्यातरी चित्रपटाची कथा म्हणुन ऐकलीय... (तो चित्रपट राज कपूरचा संगम आहे असे वाटत होते, पण imdb वर संगमची थोडी वेगळी कथा लिहीलीय). रवीना, सैफ आणि सनीचा पण एक चित्रपट होता. त्याची स्टोरी थोडीफार अशीच होती का?? एक गाणं छान होत त्यातल सैफच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'संगम'च तो. लईईईईईई रटाळ. त्यात राज कपूर आधी बेपत्ता होतो युद्धात. मग परत येतो तोपर्यंत त्याच्या मैत्रिणीच/प्रेयसीचं (वैजयंती माला) त्याच्या जिवलग मित्राबरोबर (राजेंद्र कुमार) लग्न झालेलं असतं वगैरे वगैरे. एक दोन गाणी फार भारी !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

बाकी Kate Beckinsale त्यावेळीपासुन जी काळजात बसली ती अजुन तशीच आहे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

तीन मुले. बुधा, मंगा आणि मधुरी. अत्यंत गुळमट आणि भिकारडे पुस्तक. कामाचा एकच तपशील आठवतो. सांजोरी या पदार्थाचे नाव प्रथम त्यात वाचले होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...त्या मृत्युपत्रवाल्या गोष्टीतून आम्हांस 'प्राणोत्क्रमण' या शब्दाची ओळख झाली होती. गुर्जी नसते, तर हा शब्द आम्हांस (आणि तोही बालवयात) ठाऊक झाला असता काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'प्राणोत्क्रमण'वरून आठवले...

लोकांचे 'प्राणोत्क्रमण'च का होते?

कधी कोणाचे 'अपानोत्क्रमण' झाल्याचे ऐकू का येत नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>कधी कोणाचे 'अपानोत्क्रमण' झाल्याचे ऐकू का येत नाही?

त्याला बहुधा 'अधोशब्द' म्हणतात. सार्वजनिक ठिकाणी आवाज होण्याइतपत 'अपानोत्क्रमण' होऊ देण्यास अंगी धैर्य (अथवा मजबूरी) असावे लागते. बऱ्याचदा अपानोत्क्रमण झाल्यास फक्त वास आणि तदुपरी होणारे प्रश्नार्थक चेहेरे एवढेच पुरावे आढळतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

महाराष्ट्रीय व्हर्जन

उत्तमे ढमढमे पादे मध्यमे टुर्टुराटुरी |
पादानां फुस्कुली राणी तस्य घाणी न जायते ||

दाक्षिणात्य व्हर्जन १

डर्रबुर्रं महाघोरं टिस्सपिस्सश्च मध्यमम्||
..(हे आठवत नाही)..नि:शब्दं प्राणसंकटम्||

दाक्षिणात्य व्हर्जन २

ढर्रं ढुर्रं भयं नास्ति कय्यं कुय्यं मध्यमं अस्ति
...ठुस्साकारं प्राणसंकटम्||

उत्तरभारतीय व्हर्जन (थँक्स टु थ्री इडियट्स)

उत्तमं धद्ददात्पादं मध्यं पादं थुचुक्थुचुक्|
कनिष्ठं थुडथुडी पादं सुर्सुरी प्राणघातकम्||

इतिहासात अशाही गोष्टींचे संकलन केलेले एक बरे असते म्हणून हे पादपूरक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

म्हणजे, एखादा माणूस जेव्हा मरतो, तेव्हा 'त्याचे प्राणोत्क्रमण झाले' असे म्हटलेले ऐकण्यात येते. तद्वत, गेला बाजार एखादा तरी माणूस मरण पावल्यावर 'त्याचे अपानोत्क्रमण झाले' असे कोणी म्हटल्याचे मानवजातीच्या - गेला बाजार मराठीभाषक हिंदू मानवजातीच्या - इतिहासात आजवर ऐकण्यात आलेले नाही. ते का? असा माझा मूळ प्रश्न होता.

बोले तो,

"आयी मिलन की बेला,
बंडू पादून पादून मेला|"

...वाली केस.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या माहितीप्रमाणे:

शरीरात पाच वायू असतात - प्राण, अपान, उदान, व्यान आणि समान. याला कलेक्टिव्हली प्राण (किंवा पंचप्राण) म्हणतात, आणि यांचं संतुलन असलं तर ब्वॉडी जित्ती राहते. प्राणोत्क्रमण झालं म्हणजे या पाचही लोकांनी एकत्रितपणे आपलं काम करायचं बंद केलं. म्हणजे त्यात प्राणोत्क्रमण, अपानोत्क्रमण, उदानोत्क्रमण, व्यानोत्क्रमण आणि समानोत्क्रमण हे सगळंच आलं.

- (बाळा तांबेच्या चतकोर पुरवणीचा वाचक) आदूबाळ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आता, ही ष्टोरी लहान मुलांच्या गोष्टींच्या संग्रहात घालायला योग्य आहे, असे कोणास का वाटावे, कळत नाही.

वा रे वा!! दोन्ही नायक व नायिका गोष्टीच्या सुरवतीला लहान मुले होते की नाही? मग या गोष्टीला लहान मुलांची गोष्ट म्हटले पाहिजे नै का? Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इथे एक साने गुरुजी हेट कल्ट निर्माण झाला आहे कि काय वाटले. म्हणजे गोष्टी कशा असाव्यात, त्यात काय असावे हे आपण साने गुरुजींना सांगणार. दुसरीकडे 'London bridge is falling down', 'Johny Johny, yes papaa ...' असली (निरर्थक बकवास) शिकवणार. मस्त. मस्त. चालू द्या.

मी लहानपणी तीन मुले आणि श्यामची आई दोन्ही वाचले होते. आम्हाला एक धडाही होता शामची आईच्या पुस्तकातून. मला दोन्ही प्रचंड आवडले होते. आजही आवडते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तीन मुले?
मंगा- बुधा -मधुरी तीच गोष्ट ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तीन मुले नाही वाचलं. पण शामची आई पुस्तक आवडतं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

दोन्हीही सारखेच बिनडोक आहेत असे आमचे स्पष्ट मत आहे. लहानपणी हे लंडन ब्रिज वैग्रे प्रकार मराठी शाळेत शिकल्याने ठौक नव्हते. गल्लीतली काही पोरे इंग्लिश मीड्यममध्ये शिकत ती मराठीवाल्यांना कमअस्सल समजत. त्यांचे ते "न हिन्दुर्न यवनः" पद्धतीचे आचरण पाहून या ब्रौन साहेबी लोकांबद्दल तेव्हापासूनच एक अढी बसली होती ती अजूनही पुरतेपणी निघालेली नाही. यांच्याइतके केविलवाणे पूर्ण जगात कोणी नाही असा आमचा स्पष्ट अभिप्राय आहे.

अ‍ॅज फॉर सानेगुर्जी: सुरुवातीला गुडीगुडी वाटायचे अन मोठे लोकही त्यालाच प्रमाण मानत. पण सहाध्यायी तसे कधीही वागत नसल्याने कन्फ्यूजन तर व्हायचेच, शिवाय पुढे विद्याधर पुंडलीकांचा सानेगुर्जींवरचा एक लेख वाचून त्या अतिरेकी गोग्गोड मूल्यवर्धनाचे वैय्यर्थ्य मनात ठसले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पहिला पॅरा - आनंद गगनात मावेना वाचून !!!

दुसरा पॅरा - मोठे झाल्यावर लहानपणीच्या गुटीच्या चवीची तक्रार योग्य नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

गुटी किमान लहानपणी तरी ठीक आहे, कामाची आहे.
पण लहानपणी विनाकारण कागद चावून चावून खायला लावला, तर त्याची मोथं झाल्यावर बोंब मारायची नाही का?
साने गुर्जी कुथं भेटला तर त्याला आजच्या एखाद्या बॉइज कॉलेज हॉस्टेल मध्ये बसवून त्याचे ट्रेनिंग करायचे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

काय जब्राट ऐडिया: सानेगुर्जी होष्टेलात जातात आणि बाहेर येताना आरेचटीडीएम मधील मॅडी होतात. मस पिच्चर निघेल यावर.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ठ्ठो!ऽऽऽऽ
ROFL
ROFLROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दुसऱ्या गुणी पोरींना पाहून आम्च्या आऊसाहेब "शिक शिक जरा त्या पोरींकडून..." जसं म्हणतात तसं श्यामची आई वाचून आम्च्या आऊसाहेबांना सेम टू सेम म्हणून धपाटे खाल्ल्याचं लक्शात आहे Blum 3Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

...गेले असते नि तिथे कोणी जर त्यांची रीतसर ऱ्यागिंग केली असती, तर ('श्यामची आई' नि 'भारतीय संस्कृती' लिहिण्याच्या कित्येक वर्षे अगोदरच) त्यांनी आत्महत्या केली असती. (नि आपण सारेच सुटलो असतो.)
..........

पंख्याला गळफास लावून. झोपेच्या गोळ्या घेऊन नव्हे. व्हाय वेष्ट फादर्स हार्ड-अर्न्ड मनी ऑन झोपेच्या गोळ्या व्हेन अ फ्री विकल्प ऑफ पंखा अँड गळफास इज़ अॅव्हेलेबल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही. सानेगुरुजींनी आत्महत्या करण्यापेक्षा त्यांचा मॅडी होणे ही जास्त चांगली कथा आहे.

तर: त्यांचा मॅडी करण्यासाठी हॉस्टेलमध्ये कोण कोण लागेल? (म्हणजे कोणती क्यारेक्टरं लागतील?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सर्किट, मुन्नाभाई, इ. लागतील. व्यंकूची शिकौणी मधला व्यंकू लागेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लंबू आटा, बुल्ला आणि कंपनी लागेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मेरा नाम है साने गुर्जी...
एकेक को बनाके खाऊंगा बुर्जी...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लहानपणीही त्या तथाकथित गुटीत काहीतरी गडबड आहे हे जाणवलेच होते. शिवाय कशाची तक्रार योग्य नव्हे हेही एकदा ठरूनच जौदे Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अ‍ॅज फॉर सानेगुर्जी: सुरुवातीला गुडीगुडी वाटायचे अन मोठे लोकही त्यालाच प्रमाण मानत. पण सहाध्यायी तसे कधीही वागत नसल्याने कन्फ्यूजन तर व्हायचेच, शिवाय पुढे विद्याधर पुंडलीकांचा सानेगुर्जींवरचा एक लेख वाचून त्या अतिरेकी गोग्गोड मूल्यवर्धनाचे वैय्यर्थ्य मनात ठसले.

बॅटमन, विद्याधर पुंडलीकांचा सानेगुर्जींवरचा तो लेख आम्हाला पण पाठवा की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तो हुडकून स्कॅन केला पायजे. जमेल तसे करतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आवडलेच!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"मी देव, धर्म, जातपात मानत नाही."

तुम्ही दुसरीत असताना असं बोलत होता?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी कसा सगळ्यांपेक्षा शहाणा आहे हे सांगणं हा त्यामागचा सुप्त हेतु होता. आणि शाळेची शिकवण हा स्रोत होता. उदगीर परिसरात आर्य समाजाचा, लिंगायत धर्माचा मोठा प्रभाव आहे. त्यातली काही उदात्त तत्त्वं मनावर बिंबवली गेली होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्र.ना.संतांचा लंपन आठवला. पण हा इथला मुलगा जरा जास्त चावट्ट आहे. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लाईक फॉर दि "ट्ट".

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दुसरीत असताना झोक्याची गंमत तुम्हाला समजत होती म्हणजे आश्चर्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ती मला लोकांचे ऐकून त्यापूर्वीही माहित होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अश्या व्यक्तींचे मला कमालीचे आश्चर्य वाटते.
आम्हाला झोक्यातली गंमत समजु लागली तोवर आपणहून/निरागसपणे वगैरे कोणती मुलगी आमच्याबरोबर झोके खेळायला येईल ही शक्यता कमी झाली होती Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

झोक्यात अशी काही चावट्ट गंमत असते हे मला हा लेख वाचल्यावर कळाल ROFL आत्ता बोला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

निसर्गापासून अतिदूर गेलेल्या अतिसभ्य समाजात आपण सगळे जन्मले, मोठे झालेले आहात असे वाटते. त्याचा तुमच्या मतांवर, विचारांवर असलेला परिणाम स्पष्ट दिसतो. नागरी जीवनशैली जवळ करताना मी प्रत्येक बदल स्वतः अनुभवला आहे.

गमतीची गोष्ट अशी आहे कि शहरी लोक ग्रामिणांना मागास, अशिक्षित, इ इ समजतात. खरी मजा आहे गावकरी शहरी लोकांना काय समजतात ते ऐकण्याची. तो एक वेगळा प्रबंध विषय आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

निसर्गापासून अतिदूर गेलेल्या अतिसभ्य समाजात आपण सगळे जन्मले, मोठे झालेले आहात असे वाटते

बळंच?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अतिसभ्य नागरी, मागास-अशिक्षीत ग्रामिण वगैरे शब्द मी वापरणार नाही.
पण हो मुळ मुद्दा मान्य आहे. मी फार मोठ्या नाही पण शहरातलीच आहे. उंच झाडाला बांधलेला झोका कधी खेळला नाहीय.
तुमचे इतर अनुभव, ग्रोइंग अप वाचायला आवडेल Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सेम हियर.
झोका खेळताना धडपडल्याने आमचं अंगांग* पोरींशी घासायच्या ऐवजी सालं झोक्याच्या दोरखंडांनी सोल्वटून निघाल्याचं आठवतय.
.
अंगांग म्हणजे दंड, पंजा इत्यादी व यासम सभ्य अवयव अपेक्षित आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

'झुलेमें पवनकी आई बहार' हे गाणं तयार झालं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

असं काहीतरी धमाल लिहा हो अरुणभाऊ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१ अजो तुम्हाला ललित लिहीण्याची flair आहे. Why not hone it?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

+१
आप्ल्या ललित लेखनाचे आम्ही फ्यान आहोत. असे काहीतरी लिहीत चला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्यामते हे अरूणजोशी वेगळे आहेत. Wink हा आयडी ललितवाले एक आणि चर्चावाले एक असे दोन अरूणजोशी चालवतात.

जुना-नवा काळ, उरोगामित्व, भाषेचं दौर्बल्य काही काही म्हणून ललितवाल्यांना आडवं येत नाही की हो!

ललितवाल्यांची लय आठवण येते हो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

उरोगामित्व

शब्द बाकी 'काळजाला भिडला'. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उरोगामित्व

अशी काय विशेषता आहे या शब्दात ?

( उरोजगामित्व म्हणावेसे वाटत असल्यास तसे स्पष्ट लिहा ना राव !!! ..... पळा पळा पळा )
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चला, मी माझा अँटी-पुरोगामी प्रोपागंडा थांबवतो. काहीतरी सुरम्य लिहायचा प्रयत्न करतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वा!!! Smile नक्की नक्की!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

डुबरगेंडा ऐवजी प्रोपागेंडा अशी काहितरी ष्टुरी लिहा...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

लाँडरिंग आणि प्रोपागेंडा हे आजचे दोन्ही विनोद आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ललित लिहा असे तुम्हाला काहीवेळा खरडी/व्यनीतून विनंती केली तेव्हा ऐकलं नाही (म्हणजे नाही म्हणाला नाहीत पण लिहिलंही नाही), प्रिय गुर्जींच्या हाळीसाठी थांबला होतात होय! Wink

असो.. वाट बघत आहेच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गोष्ट आवडली. सुरेख रंगविली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लव्हली स्टोरी अरुणभाऊ..

लहानपणच्या लपाछपीच्या खेळात नेऊन पोचवलंत. ती कातळावर बंगला असलेल्यांची मुलगी, गोरी आणि सुंदरच होती. लपाछपीच्या वेळेला कपाटात एकत्र लपायची माझ्यासोबत. कपाट लहान होतं पण गैरसोय वाटायची नाही.

पुन्हा एकदा हे लेखन लिहिणारे जोशीबुवा आणि ते वर काढणारे जे कोणी सदस्य असतील त्यांचे अत्यंत आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गविसाहेब, धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

Happy b day AJo....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धागा वर काढायची ही पद्धत असं लिहिणार होतो...
---------
धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कशी कोण जाणे, पण ही डुंबरगेंडा ही गोष्ट वाचनातून सुटली होती. दुसरीतल्या मुलाला तेंव्हा जर इतकी समज होती, तर आत्ता किती असेल ?
अजो, तुमच्या चरणकमलांचा फटु पाठवा किंवा तुमच्या पादुका पाठवून द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

आत्ता समज कमी झालीय हो आणि लहानपणीच्या चरणकमलांचा फटूच नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

भारी आहे कथानक.
आईच्या नात्यातली एक मुलगी माझ्याबरोबर बसमधून मुंबई बघण्यासाठी आली होती तो प्रसंग आठवला. त्यांनी अगोदर जी सरबराई करून तुझ्याबरोबर ही मुंबई पाहायला येणार आहे म्हटल्यावर चपापलोच. त्यावेळी एकवीस बावीस वय असेल. मुंबई दाखवण्यासाठी फिरलो. सुंदर होतीच पण अबोल. मला काही वेगळ्याच प्लानचा वास आलेला आणि नातेवाईकांच्या बोलण्यांतून सिद्धही झाला. पण मला मला आयते मित्र आणि शत्रु घ्यायला आवडत नसण्याची भावना तेव्हाही होतीच. गाइडपेक्षाही कोरडेपणाने मुंबई दाखवली आणि सुटका करून घेतली.
हट्टीपणा दुसरं काय? एक चुकीचा निर्णय पुढच्या आयुष्याचं लळित करू शकतो.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडले!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0