मराठी भाषा दिन व भाषाभ्रम

मराठी भाषादिनानिमित्त टिप्पण करणारा डॉ. प्रकाश परब यांचा एक रोखठोक लेख मराठी भाषा दिन व भाषाभ्रम लोकसत्तात वाचला. मराठी भाषा अस्तंगत होते आहे, आणि काहीतरी जनजागृती उत्सव करून ती टिकेल हा भ्रम आहे असा लेखाचा रोख आहे. लेख मुळातच वाचावा, पण सारांश खाली मांडतो आहे
- मराठी दिनानिमित्त शुभेच्छांचा पाऊस पडतो, भाषेचा अभिमान असल्याचं जाहीर होतं, पण खरं चित्र काय आहे? इंग्रजी ही लोकभाषा व ज्ञानभाषा होणार आहे हे सत्य आपण 'पोपट मेला' प्रमाणे उच्चारायचा धीर करत नाही.
- मराठी ही ज्ञानभाषा कधीच होऊ शकणार नाही हे मान्य करायला हवं, कारण ती शिक्षणभाषा म्हणूनही टिकू शकलेली नाही. जी ज्ञानभाषा नाही ती जागतिकीकरणाच्या धबडग्यात टिकूच शकणार नाही.
- मराठी भाषा टिकवण्याचा प्रश्न सामाजिक किंवा सांस्कृतिक नाही - तर आर्थिक आहे. जी भाषा अर्थार्जन पुरवू शकत नाही तिची पाळंमुळं दुर्बळ होणार. आणि कधी ना कधी तो वृक्ष उन्मळून पडणार.
- भाषा सुदृढ नसताना ती आहे असं म्हणत राहणं धोकादायक आहे. प्रत्यक्षात पाहिलं तर मराठी शाळा मरताना दिसतात, मराठी महाविद्यालयांना अवकळा आलेली आहे. हा ऱ्हास थोपवण्यासाठी सरकारने काही करणं अत्यावश्यक असूनही सरकार निष्क्रिय आहे. इतर भाषांबाबत हे प्रयत्न होताना दिसतात.
- स्वभाषा हे मूल्यच राहिलेलं नाही.

या मांडणीकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे हे निश्चित. गेली तीसपस्तीस वर्षं तरी मराठी मरत चालली आहे, आजकाल कामवाल्या बायकांनाही त्यांची मुलं इंग्लिश शाळेत घालण्याचा सोस असतो वगैरे ऐकू येतं आहे. त्याचबरोबर आपल्याला परबांनी म्हटल्याप्रमाणे अनेक शाळा सेमीमराठी होताना दिसताहेत. यावरून मराठी भाषा पुढची पन्नास-शंभर-दोनशे-पाचशे वर्षं टिकेल असं म्हणता येईल का? ऐसीकरांना याविषयी काय वाटतं?

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

यावरून मराठी भाषा पुढची पन्नास-शंभर-दोनशे-पाचशे वर्षं टिकेल असं म्हणता येईल का? ऐसीकरांना याविषयी काय वाटतं?

आर्थिक कारण योग्य व पटण्याजोगे आहेच
मला समजणारी, मला व्यक्त व्हायला पुरक अश्या भाषेचा अभ्यास / भाषेतून संभाषण कमी होत जाईल याबद्दल वाईट वाटेलच - वाटतही. पण ते तितक्यापुरतंच. जर मराठी मरायची असेल तर ती मरेलच. तिला जरा अधिक काळ वा अधिक मानाने जगवायचे काही उपाय सुचतातही पण ते होणे नाही, त्यामुळे निसर्ग आणि मातृभाषा वगैरे वाचवण्याच्या वल्गना करायच्या / आरोळी द्यायच्या निरर्थक फंदात मी पडायचे नाही असे ठरवले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

परबांचं म्हणणं मी वरती मांडलं. पण मला नेहमीच प्रश्न पडतो की भाषेसारख्या बाबतीत ती वृद्धिंगत होते आहे की तिचा ऱ्हास होतो आहे याची मोजमाप कशी करावी?

- प्रमाणभाषा लिहिता बोलता येणारांची संख्या. - ही तर गेली काही दशकं वाढतानाच दिसते आहे. (इथे मी टक्केवारीपेक्षा अॅब्सोल्यूट संख्या मोजतो आहे)
- प्रमाणभाषेत निघणाऱ्या दैनिकांचा खप - हाही वाढतच गेलेला असावा असा अंदाज आहे.
- प्रमाणभाषेत शिक्षण घेणारांची संख्या - हीही वाढते आहे बहुतेक. कारण शहरी भाग सोडला तर अजूनही शिक्षण मोठ्या प्रमाणावर सरकारी शाळांतूनच होतं.
- प्रमाणभाषेत होणारं साहित्यिक लिखाण - याबद्दल मला कल्पना नाही.
- प्रमाणभाषेत होणारं दूरचित्रवाणी प्रसारण - हे वाढलेलं आहे. अनेक चॅनेल्स मराठीतच असतात. दर्जाविषयी काही बोलत नाही, पण संख्या वाढलेली आहे.

यापलिकडे काही मोजमाप करता येण्यासारखे निकष आहेत का? मुळात हे निकष तरी लागू आहेत का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नेमकं!

फक्त

प्रमाणभाषेत शिक्षण घेणारांची संख्या - हीही वाढते आहे बहुतेक. कारण शहरी भाग सोडला तर अजूनही शिक्षण मोठ्या प्रमाणावर सरकारी शाळांतूनच होतं.

याबद्दल साशंक आहे. मात्र अर्थातच विदा बघावा-शोधावा लागेल

बाकी, मुळात भाषा मरणं म्हणजे काय? हा त्या मेघनाच्या धाग्यावर टाकलेला प्रश्न पुन्हा टाकतोय.
त्या प्रतिसादांत म्हटल्याप्रमाणे, भाषा बोलीभाशा म्हणून मोठ्याप्रमाणात वापरली जात असेल मात्र त्यात आर्थिक गणितांमुळे त्यात मोठ्या प्रमाणात सकस साहित्यनिर्मिती होत नसेल तर भाषा जिवंत की मृत म्हणावी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दुसरा प्रश्न मला पडतो तो म्हणजे 'ज्ञानभाषा नसल्यास मृत्यू' हे गृहितक कितपत सत्य आहे? स्थानिक संवादांसाठी एक भाषा आणि व्यवहारासाठी दुसरी भाषा असं द्वैभाषिकत्व अनेक जण प्रयत्नांनी स्वीकारू शकतात. म्हणजे प्रत्येक माणसाच्या डोक्यात एकच भाषा मावण्याची जागा असते, तेव्हा इंग्लिश वाढली की मराठी नष्ट होणार असा झीरो सम गेम का गृहित धरावा?

समजा, पुढे कधी असं तंत्रज्ञान निघालं की ज्यायोगे मी मराठीत बोललो तर समोरच्याला ते कामचलाऊ इंग्लिशमध्ये (अगर कुठच्याही हव्या त्या भाषेत) ऐकू येईल. मग इंग्लिशच शिकली पाहिजे हा अट्टाहास कमी होणार नाही का? शंभर वर्षांपूर्वी अशा तंत्रज्ञानाची कल्पनाही संभवत नव्हती. आता तशी कल्पना करता येते. मग तंत्रज्ञानामुळे भाषा टिकून राहील, व लोक अधिक सहजपणे बहुभाषिक होतील हे शक्य नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विकीच्या पानावरुन मिळालेल्या दुव्यावरील हि परिक्षा भाषेचा कस(सद्य परिस्थितीचे आकलन) शोधण्यात मदत करण्यास उत्तम आहे असे वाटते.

स्वतःपुरते - साधारण ३ पिढ्यांमधील स्वभाषेत संवाद साधण्याची क्षमता सांख्यकी शोधल्यास भाषा कुठल्या पंथाला लागली आहे हे लक्षात येऊ शकेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

समजा, पुढे कधी असं तंत्रज्ञान निघालं की ज्यायोगे मी मराठीत बोललो तर समोरच्याला ते कामचलाऊ इंग्लिशमध्ये (अगर कुठच्याही हव्या त्या भाषेत) ऐकू येईल. मग इंग्लिशच शिकली पाहिजे हा अट्टाहास कमी होणार नाही का? शंभर वर्षांपूर्वी अशा तंत्रज्ञानाची कल्पनाही संभवत नव्हती. आता तशी कल्पना करता येते.

असल्या तंत्रज्ञानातून आंतरराष्ट्रीय / आंतरभाषिक गैरसमज - आणि तेही प्रमाणाबाहेर - वाढण्याचीच शक्यता अधिक. (कधी गूगल ट्रान्स्लेटर वापरलाय काय?)

त्यापेक्षा, नकोच ते!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कळीचा प्रश्न. माझ्या डोक्यात या प्रश्नांबद्दल बरेच गोंधळ आहेत, हे आधीच स्पष्ट केलेलं उत्तम. तरी यावर म्हणायचंही चिकारच आहे.

- मातृभाषेतून शिक्षणाचे फायदे (मायमराठीच्या नावानं कढ काढण्याहून निराळे) आणि तोटे (इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास नसणे या तथाकथित गंडाहून निराळे) पुरेशा प्रमाणात चर्चिले जात नाहीत, असं एक निरीक्षण. (पालकनीतीच्या अंकाचा दुवा देऊ नये. तो वाचला आहे. पण तो काही मुख्य धारेतल्या माध्यमांमध्ये मोडत नाही, हे आपण स्वीकारू या.)

- एका मित्राच्या निरीक्षणानुसार दहावीपर्यंतचं सगळं शिक्षण मातृभाषेत घेण्याचा पर्याय देणार्‍या काही मोजक्या राज्यांपैकी महाराष्ट्र एक आहे. निदान तूर्तास परदेशात स्थायिक होऊ पाहणार्‍या पिढीच्या प्राथमिक शिक्षणाच्या काळात तरी होता. इतर राज्यांतून असा पर्यायच असत नाही. (या विधानाच्या पुष्ट्यर्थ विदा नाही. कुणाकडे बाजूनं वा विरोधातही असला, तर प्लीज द्या.)

- माझ्या शहरात माझी मराठी माध्यमाची शाळा बंद पडण्याच्या वाटेवर आहे. काही मराठी शाळा आधीच बंद पडल्या आहेत. आजूबाजूच्या लोकांच्या मताचा अंदाज घेतला असता असं दिसतं की,

 • मुलांनी मातृभाषेतून शिकावं असं लोकांना मुळातून वाटतंच नाही. ('आमचं नुकसान झालं, तसं त्यांचं व्हायला नको...' हा एक न्यूनगंडात्मक बचाव. काय नुकसान झालं, या प्रश्नाचं उत्तर 'इंग्रजी बोलता आलं नाही, म्हणून लाज वाटली' इतकंच असतं.)
 • मातृभाषेत शिक्षण देणार्‍या 'चांगल्या' शाळा उपलब्ध नाहीत. (चांगल्या म्हणजे काय, हे कुणालाच धड सांगता येत नाही. त्यातल्या त्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून दिला जाणारा अवांतर गोष्टींवरचा भर पुन्हा पुन्हा उगाळला जातो.)
 • शिक्षणाचं माध्यम आणि साहित्याची भाषा या दोहोंत लोकांची प्रचंड गल्लत होते. (आमची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेली, 'तरी' 'स्वामी', 'मृत्युंजय'सारखी 'मोठ्ठाली' पुस्तकं वाचतात.... अशी सारवासारव.)
 • मराठी शाळेत कामवाल्या बायांची (याला मोलकरीण असा शब्द पूर्वी असे. हल्ली... असो.) मुलं येतात. त्यांच्या संगतीत आपल्या मुलांना राहू देणं पालकांना धोक्याचं वाटतं. (शिव्या, घाणेरडी राहणी, मारामार्‍या यांचा संबंध सरळसरळ आर्थिकदृष्ट्या खालच्या वर्गाशी लावला जातो. यात आपण काहीतरी मूलभूत अन्यायकारक बोलतो आहोत, असं कुणालाच वाटत नाही. मग मुलाचा संबंध भोवतालाशी येऊ देण्याची जबाबदारी वगैरे तर दूरच राहिली.)

- या पार्श्वभूमीवर येत्या काही दशकांत माझी भाषा निदान शहरातून तरी हद्दपार होईल, असं मला वाटतं. भाषेचा लवचीक, जोरकस वापर हे आत्मविश्वासाचं एक प्रमुख साधन असणार्‍या मला या परिस्थितीची भीती वाटते. कारण निदान माझ्याकरता तरी हे माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या एक सबळ बाजूचं खच्चीकरण ठरेल.

मात्र हे केवळ भरल्या पोटी केलेलं रूदन आहे की खराच प्रश्न, असल्यास त्यावर तोडगा काय, असा तोडगा काढावा की काढू नये, काढलाच तर तो उपयोगी ठरेल की क्षीण प्रयत्न ठरेल, याबद्दल डोक्यात स्पष्टता नाही. चर्चाविषयाकरता मात्र आभार. वाचतेय...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मेघनाशी सहमत.

न्यूनगंडग्रस्त लोकांचं एक सोडून द्या. पण चांगली मराठी शाळा मिळाली तर पोरांना त्यात घालू अशी भूमिका असलेलेही बरेच लोक आहेत.

सध्या मराठी माध्यमाच्या शाळांत चांगला क्राउड न येणे, शिक्षक चांगले नसणे, इ. अनेक बोंबा आहेत. चांगला क्राउड म्ह. काय अभिप्रेत असते, ते मेघनाने सांगितले आहेच. ढोंगीपणाचा आरोप सहन करूनही परिस्थिती बदलेल, अशी स्थिती नाही. चांगले शिक्षक न उरणे आणि उच्चवर्गाचा फोकस इंग्रजीवर जाणे या दोन कारणांमुळे मराठी माध्यमाच्या शाळांचा दर्जा खालावत आहे. संख्या वाढत असली तरी दर्जा खालावत आहे. माझ्या शाळेच्या अनुभवावरूनही हे मी सांगू शकतो. कमीअधिक फरकाने सगळीकडेच असे होते आहे.

खुद्द मिरजेत दोन हुच्चभ्रू कॉन्व्हेंट शाळा आहेत अन अन्य इंग्रजी माध्यमाच्याही शाळा आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांचे ग्लॅमर खुद्द मिरजेत तरी आता आजिबात दिसून येत नाही-पण कधीकाळी तत्रस्थ मध्यमवर्गात बरेच होते. माझ्यानंतरच्या माझ्या शाळेत शिकलेल्या पोरांकडून उत्तरोत्तर अधोगतीचेच रिपोर्ट येताहेत. सांगलीत तुलनेने स्थिती अंमळ बरी असेल असा अंदाज आहे, पण विदा नाही. विचारले पाहिजे. कोल्हापूरबद्दलही काहीसे असेच म्हणता यावे. तुलनेने पुण्यात स्थिती बरीच उत्तम आहे असे वाटते. ठाणे-मुंबैचं माहिती नाही. उरलेल्या महाराष्ट्रातही सांगली-मिरजेत दिसलेला ट्रेंडच दिसून येईल असे वाटते.

शिक्षणक्षेत्राची दुरवस्था सर्वपरिचित आहेच- त्यात परत इंग्रजीच्या तुलनेत मराठी ही सवतीची लेक झाल्यामुळे तिची अजूनच वाट लागली. पुण्यात मराठी शाळांचा एलिटपणा अजून जरा टिकून आहे हे पाहून कसे बरे वाटते. बट ब्याक होम, ऑल ग्लोरी इज लॉस्ट.....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चांगल्या शाळेचे निकष नक्की काय असतात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तसे तर बरेच आहेत, पण इन जण्रल अपेक्षा पाहिल्या तर शिक्षक चांगले असणे, क्राउड 'चांगला' येणे व बेशिक सोयीसुविधा ठीकठाक असणे, विविध परीक्षा घेणे, इ. निकष मुख्य ठरावेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चर्चेमध्ये गप्प बसायचे ठरवले होते.
पण एकूणात काय दिसते आहे आसपास, माझ्या शहरात ते सांगतो.
पुण्यात नूमवि, मुंबैत बालमोहन ह्या बर्‍यापैकी नावाजलेल्या, जुन्या शाळा आहेत असे ऐकले आहे.
तशीच माझ्या शहरातली माझी शाळाही जुनी, नावाजलेली.
स्वातंत्र्यसैनिकांनी १९१४ साली स्थापन केली. अत्यंत सचोटिचे लोक चालवतात म्हणून नावाजलेली गेलेली .
अत्यंत आघाडीची शाळा.मी मराठी मिडियमात शिकलो.
बारावी नंतर फारसा संपर्क राहिला नाही. माझा मी गुंगून गेलो.
आता दशकभरानं जे काही पाहिलं त्याने मोठाच धक्का बसला.
शाळेचा बट्त्याबोळ, खेळखंडोबा झालेला आहे.
तेथील मुले गरिब आहेत ही तक्रार नाहिच.
(आमच्या वेळीही सारे काही श्रीमंत नव्हते. अगदि गरिबाघरचेही होते बरेच; काही श्रीमंत, बरेचसे मध्यमवर्गीय व त्याहून अधिक आमच्यासारखे निम्नमध्यमवर्गीय.)
आता गरिब मुलेच जात आहेत ही तक्रार नाही हो.
एकूणात शाळेचा रिपोर्ट पाहिला. अवस्था पाहिली.
बघवत नाही.
स्लँग भाषेत बोलायचं तर शाळेची मारल्या गेली आहे वाईट.
इतर मित्रांशी बोललो. त्यावेळचे आमचे विविध स्पर्धापरिक्षा, वक्तृत्व स्पर्धा , वगैरे मधले कट्टर स्पर्धक अशा विविध जिल्ह्यातील मित्रांशी बोललो. त्यांच्या जिल्ह्यांतही अशा ज्या कुठल्या शाळा होत्या, त्यांची अवस्था काही फार वेगळी नाही.
नक्की होतय ते चांगलं, वाईट ठाउक नाही.
कशामुळे होतय हे ही ठाउक नाही. (आधी कोंबडी की आधी अंडं ?)
पण काहीतरी खतरनाक होतय खास.
बरं ; "प्रत्येकच पिढीला आपल्या वेळची शाळा आता राहिली नाही; असं वाटतच असतं " ही घिसीपीटी लाइन मारुन समाधानही करुन घेता येत नाही.
कारण?
माझे वडील व आजोबा हेसुद्धा त्याच शाळेत काहीकाळ शिकले होते.
त्यांचीही मतं मोठी झाल्यावर नोकरी धंद्याला लागल्यावर अशीच होती की "आपली शाळा चांगली आहे.
आपल्या पोराला तिथेच घालू" तेच वाक्य म्हणायची माझी हिम्मत होत नाही.
माझे वदील, ज्यांनी पन्नासेक वर्सहपूर्वी शाळा पाहिली असेल्,त्यांच्या बालपणी व नंतर माझ्याही बालपणी त्यांनी पाहिली; त्यांचेही म्हणणे आहे की शेवटच्या ज्या काही धद बॅचेस ह्या शाळेतून बाहेर पडल्या त्यापैकी तुझी एक.
नंतर साराच आनंदी आनंद झालाय.
मुले गरिब आहेत, हा प्रॉब्लेम नाहिच.
काहीतरी त्याहून भयंकर आहे.
शाळेचं रिपोर्ट कार्ड गंडलय.
वातावरण नासलय.
हे इतरही जिल्ह्यांत होतय असं माझ्या एकेकाळच्या स्पर्धक मित्रांचं त्यांच्या मराठी माध्यमाच्या शालांबद्दल मत आहे.
.
.
पुन्हा तेच, बदल होतोय तो(मराठी कडून इंग्लिश कडे जाणारा मध्यमवर्ग वगैरे) चांगलं - वाईट मी काहिच म्हणत नाहिये.
पण शाळांचा बट्ट्याबोळ होतानाही
"हॅ हॅ हॅ...सगळ्याच पिढ्यांना असच वाटतं" असं म्हणणारी पाद्री लाइन तोंडावर मारु नका प्लीझ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मेघनाचा आय्डी अरुण जोशींनी चोरलाय का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

यग्झाक्टली हेच म्हणायचे होते. मराठी शाळांची वाईट्ट मारल्या गेली आहे एकदम असा रिपोर्ट सगळीकडून येतो आहे. शिक्षकांची क्वालिटी हे एक महत्त्वाचे कारण त्यामागे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खून चोर्‍अय दरवडेखोरी ह्यांचे शिक्षण शाळेत न मिळणे.
शाळेतील मुले विविध स्पर्धांत आपणहून भाग घेत असणे.
काही ना काही करण्यास त्यांना वाव मिळणे.
जे अभ्यासात हुशार असतील त्यांना त्यात ऑलिम्पियाड, ntse वगैरे कडे उपलब्धी असणे.
सर्व चुलीत जाउ दे.
निदान मुले पास होणे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अवांतरः कदाचित मराठी माध्यमाच्या शाळा असा धागा वेगळा काढावा लागेल.

"शिक्षक 'आनिपानी' बोलतात / मावा खातात." आणि "शाळेत झोपडपट्टीतली, कामवाल्या बायांची मुलं येतात." हे सोडून शाळांवर नक्की आक्षेप काय आहेत? आमची शाळा आमच्या काळातही फार थोर नव्हती. 'माळ्यासाळ्यांची शाळा' असंच तिचं विशेषण होतं. अतिशय गरीब घरातली मुलं शाळेत येत असत. मुलं जनरली करतात, ते सगळे धंदेही करत असत (शाळेतून पळून जाणे, शाळेचे पंखे वाकवून ठेवणे, पोरापोरींची लफडी होणे.. इत्यादी). तरीही इतर अवांतर गोष्टीही बर्‍याच चालत. रामायणाच्या परीक्षा, टिमविच्या परीक्षा, चित्रकलेच्या परीक्षा, संस्कारवर्ग, कराटे, मल्लखांब, राज्य पातळीपर्यंत पोचलेला खोखोचा संघ... अनेक.

मला माझी शाळा फार थोर होती असं वाटत नाही, तसंच फार नासलेली इत्यादी होती असंही वाटत नाही. उलट माझ्यासारख्या चष्मिष्ट पोरांना एक प्रकारे एक्स्पोजर होतं. माझं शाळेमुळे काहीच नुकसान झालं असं वाटत नाही.

मग 'चांगली' शाळा या गोष्टीचे निकष तरी नक्की काय आहेत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

"शिक्षक 'आनिपानी' बोलतात / मावा खातात." आणि "शाळेत झोपडपट्टीतली, कामवाल्या बायांची मुलं येतात."

या दोहोंचे प्रमाण पूर्वीपेक्षा बर्‍यापैकी वाढून

तरीही इतर अवांतर गोष्टीही बर्‍याच चालत. रामायणाच्या परीक्षा, टिमविच्या परीक्षा, चित्रकलेच्या परीक्षा, संस्कारवर्ग, कराटे, मल्लखांब, राज्य पातळीपर्यंत पोचलेला खोखोचा संघ... अनेक.

याचे प्रमाण बर्‍यापैकी कमी झाले असेल तर? म्ह. जण्रल परीक्षा सोड, पण टिमवि, एनटीएस , इ. परीक्षांबद्दल म्हणतोय.

अन मुख्य म्हंजे असा फीडब्याक काही शिक्षकांकडूनच मिळत असेल तर चिंतेस वाव नक्कीच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मेघनाप्रमाणेच माझ्या मनातही गोंधळ आहे ह्या विषयाबद्दल. पण मेली तर मेली, काय फरक पडतो असे वाटत नाही.
वरती राजेश घासकडवींनी जो युक्तिवाद केला आहे तो फसवा वाटतो. प्रमाणभाषा लिहिता-वाचता येणार्‍यांची संख्या वाढली आहे कारण मराठीभाषक असणारा पण लिहिता-वाचता न येणारा वर्ग आता लिहायला शिकू लागला आहे. ह्या आधी असलेल्याच पण दिसत नसलेल्या आणि आता दिसू लागलेल्या गोष्टीला नवीन निर्माण झाल्याप्रमाणे वागवणे चुकीचे वाटते. उलट शहरांमधून फारसे प्रमाण मराठी न वाचणार्‍या लोकांची संख्या वाढलेली दिसते.
इतर भाषांबद्दल काय परिस्थिती आहे ह्याचे कुतूहल आहे. उदा. माझ्या तेलुगुभाषक मित्रांपैकी फारच कमी तेलुगु पुस्तके वाचणारे दिसतात. ह्या मित्रांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या आसपासही फार जास्त तेलुगु वाचणारे असे कोणी नाही, मात्र तेलुगु चित्रपटांचे वेड, त्याच्याबद्दल चर्चा वगैरे चिक्कार होतात. आमच्या कॉलेजात तर लहानपणापासून हैदराबादमध्ये वाढलेला, तेलुगु मातृभाषा असलेला, तेलुगुचा अभिमान बाळगणारा, पण तेलुगु अजिबात लिहिता-वाचता न येणारा एक सिनिअर आहे. मला झेपलंच नाही हे प्रकरण! त्याचप्रकारे तेलुगु माध्यमाच्या शाळेत शिकलेलेही फारसे पाहण्यात नाहीत. इतरभाषक मित्रांमध्ये बंगाली, कन्नड, मलयाळम, हिंदी ह्या भाषांमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले मित्र आहेत. बंगाली आणि मलयाळी मित्रांना त्यांच्या मातृभाषेतील पुस्तके वाचताना पाहिले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अन्यभाषीय निरीक्षणाबद्दल सहमत आहे.

हिंदीवाल्यांपैकी आजवर एकदोघेच अंमळ हिंदी वाचणारे भेटले. स्वभाषीय साहित्याबद्दल इतकी उदासीन आणि (पार्डन मी) अडाण** जमात आजवर पाहिली नाही.

तेलुगुही तसेच. एरवी राडे करतील पण मातृभाषेबद्दल घंटा माहिती नसते.

तुलनेने बंगाली लोक मराठी लोकांसारखेच.

तमिळांचा अनुभव नाही, कन्नडिग तरी भैरप्पा इ. वाचतात, अ‍ॅटलीस्ट माहिती तरी असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जोपर्यंत मी........
१) दररोज काहितरी मराठीत वाचतोय (वर्तमानपत्र / ब्लॉग / पुस्तक किंवा इतर काही), मराठीत लिहितोय
२) महिन्या / दोन महिन्यातून एक तरी मराठी चित्रपट पाहतोय
३) घरात / कार्यालयात मराठीत बोलतोय (यात मराठी / अमराठी दोन्ही आले)
४) राग आला / भांडण झाले की दोन चार कचकचीत मराठी शिव्या (मनातल्या मनात / किंवा उघडपणे) देतो. आनंद झाला की मराठीतच व्यक्त करतोय.
५) एटीएम मधे गेलो की मुद्दामहुन मराठी मेनू निवडून व्यवहार करतो.
६) चार वर्षाच्या मुलाला ह्या शब्दाला मराठीत हे म्ह्णतात, इंग्रजीमधे हे म्हणतात असे सांगून त्याच्याशी संभाषण करतो
७) शक्य तिथे मराठीतच व्यवहार करतो.
तोपर्यंत माझ्यापुरती मराठी मेलीय / मरणाला लागलीय असे म्हणणार नाही.
आप मेला जग बुडाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मराठी बालमोहन अजून चालू आहे?
बहुतेक नसावी. इंग्रजी माध्यम चालू करण्याचे कारण 'आतल्या गोटातून' कळले ते असे- 'मुले ज्या घरांतून येतात तो वर्ग बदलला. मध्यमवर्गी,सुशिक्षित पालक आता बालमोहनसारख्या प्रतिष्ठित शाळेतही मराठी माध्यमामुळे मुले घालत नाहीत.'
नूमवित गणित- विज्ञान इंग्रजी माध्यमात आहे असे ऐकले आहे ते खरे आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आजूबाजूच्या लोकांच्या मताचा अंदाज घेतला असता असं दिसतं की,
•मुलांनी मातृभाषेतून शिकावं असं लोकांना मुळातून वाटतंच नाही. ('आमचं नुकसान झालं, तसं त्यांचं व्हायला नको...' हा एक न्यूनगंडात्मक बचाव. काय नुकसान झालं, या प्रश्नाचं उत्तर 'इंग्रजी बोलता आलं नाही, म्हणून लाज वाटली' इतकंच असतं.)
•मातृभाषेत शिक्षण देणार्‍या 'चांगल्या' शाळा उपलब्ध नाहीत. (चांगल्या म्हणजे काय, हे कुणालाच धड सांगता येत नाही. त्यातल्या त्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून दिला जाणारा अवांतर गोष्टींवरचा भर पुन्हा पुन्हा उगाळला जातो.)
•शिक्षणाचं माध्यम आणि साहित्याची भाषा या दोहोंत लोकांची प्रचंड गल्लत होते. (आमची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेली, 'तरी' 'स्वामी', 'मृत्युंजय'सारखी 'मोठ्ठाली' पुस्तकं वाचतात.... अशी सारवासारव.)
•मराठी शाळेत कामवाल्या बायांची (याला मोलकरीण असा शब्द पूर्वी असे. हल्ली... असो.) मुलं येतात. त्यांच्या संगतीत आपल्या मुलांना राहू देणं पालकांना धोक्याचं वाटतं. (शिव्या, घाणेरडी राहणी, मारामार्‍या यांचा संबंध सरळसरळ आर्थिकदृष्ट्या खालच्या वर्गाशी लावला जातो. यात आपण काहीतरी मूलभूत अन्यायकारक बोलतो आहोत, असं कुणालाच वाटत नाही. मग मुलाचा संबंध भोवतालाशी येऊ देण्याची जबाबदारी वगैरे तर दूरच राहिली.)

- या पार्श्वभूमीवर येत्या काही दशकांत माझी भाषा निदान शहरातून तरी हद्दपार होईल, असं मला वाटतं.

या आजूबाजूच्या लोकांपैकी मी एक आहे. उलट मला ती मुले स्वामी वैगेरे वाचतात म्हणून सांगायची गरजही वाटत नाही. आपली निरीक्षणे अचूक आहेत पण या वर्गाबद्दल वापरलेली भाषा/विशेषणे जास्त कडक वाटली. व्यक्तिगत अनुभवावरून माझ्या कुटुंबातून मराठी हद्दपार व्हावी आणि तिचे स्थान प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय भाषांनी घ्यावे असे मला प्रामाणिकपणे वाटते. (१). इथे मराठीच्या जागी हिंदी म्हटले तरी चालेल. आपण म्हणताय कि आपल्याला कोणी धड उत्तरे दिली नाहीत, पण मी प्रयत्न करू शकतो.

(१) या माध्यमाच्या सदस्यांच्या मराठीबद्दल संवेदना पाहता हे वाक्य नाही लिहायला पाहिजे होते. पण त्याशिवाय मी मुलाला 'मराठी/हिंदी माध्यमात घालायचा विचारही का करू शकत नाही' हे खरेपणाने सांगता येणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नूमवित गणित- विज्ञान इंग्रजी माध्यमात आहे असे ऐकले आहे ते खरे आहे का?

नूमवित गणित-विज्ञान (आठवीपासून पुढे) इंग्रजी माध्यमातून (सक्तीचे - वैकल्पिक नव्हे!) गेला बाजार पस्तीस ते चाळीस वर्षांपूर्वीपासून आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या विषयावर मतप्रदर्शन करत नाही. फक्त वस्तुस्थितीत एक दुरुस्ती सुचवतो :
आज माझ्या परिसरातल्या (मुंबई-पुणे) श्रमजीवी वर्गाचीही मुलं मराठी शाळेत जात नाहीत. जागतिकीकरणानं उपलब्ध झालेल्या आर्थिक संधींचं आकर्षण हेच त्या मागचं मुख्य कारण आहे. त्यामुळे मी त्यांना अजिबात दोष देणार नाही. दुसरीकडे प्रमाण भाषेच्या जवळ जाणारी ज्यांची बोली भाषा नाही त्यांना प्रमाण भाषेविषयी प्रेम नाही. हे लोक महाराष्ट्रात बहुसंख्य आहेत. त्यामुळे प्रमाण भाषेत लिहिता-वाचता येणारे लोक वाढणं वगैरे फक्त तात्पुरतं आहे; शाश्वत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आता हा युक्तीवाद मानायचा तर कामवाल्या बायांची पोरंदेखील इंग्रजी शाळांत जातात. मग आम्ही आमची मुले फ्रेंच शाळेत घालायची काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्व चर्चेत मला प्रस्तुत वाक्य सर्वाधिक महत्त्वाचं वाटलं.

"मराठी भाषा टिकवण्याचा प्रश्न सामाजिक किंवा सांस्कृतिक नाही - तर आर्थिक आहे. "

भाषा मरेल का जिवंत राहील, जिवंत रहाण्याची नक्की व्याख्या काय, मराठीतल्या साहित्य आणि इतर सांस्कृतिक घडामोडी कुठल्या दिशेने जात आहेत, कुठल्या गोष्टी जोम धरत आहेत आणि कुठल्या कमी होत आहेत या बाबी महत्त्वाच्या , रोचक आहेत; परंतु मला उपरोल्लेखित "पाळंमुळं कमजोर असण्यामुळे एकंदर वृक्षाची वाढ थांबल्यागत असणं" हे पटतं.

आपण आपल्या भाषेत आपल्याला जिव्हाळ्याच्या वाटणार्‍या असंख्य गोष्टी बोलू/वाचू/लिहू/गाऊ/ऐकू/पाहू शकतो हे बरोबर आहे. आणि असं करणार्‍यांची संख्या दहा-अकरा कोटींच्या घरात आहे हेही खरंच आहे. त्यामुळे "मराठी मेली किंवा मरू घातली आहे" हे काही म्हणणं अतिच झालं.

पण गावाकडची अर्थव्यवस्था आणि शहराकडची अर्थव्यवस्था यांच्यामधे शहरीकरण जिंकतंय आणि गावाकडची अर्थव्यवस्था वर्षानुवर्षं अधिकाधिक क्षीण होत गेलेली आहे. या घटनेचा माझ्या मते मराठीच्या अस्तित्त्वाशी नव्हे तरी तिच्या महत्तेशी, तिच्या रिलेव्हन्सशी महत्त्वाचा संबंध आहे. महाराष्ट्राची राजधानी आणि तिची अर्थव्यवस्था यातला मराठी व्य्वहाराचा टक्का खूपच कमी आहे. राज्यव्यवहार काही प्रमाणात होत असेलसुद्धा, परंतु मुख्य म्हणजे कॉर्पोरेशन्स, कंपन्या, वित्तसंस्था, उद्योगधंदे, या सर्वांचा व्यवहार इंग्रजीतूनच चालतो. कामगारांपासून कारकूनांपर्यंत प्रत्येकाला किमान इंग्रजी येत असलं तरच तो वर्ग आपापली कामं करू शकेल. न्यायव्यवस्था, टॅक्सेशन (कर भरण्याची व्यवस्था) , हे सगळं इंग्रजीतून.

पुणं, औरंगाबाद, नागपूर या शहरांमधेही क्रमाक्रमाने इंग्रजीचा प्रादुर्भाव वाढतो आहे. जिथे औद्योगीकरण आहे तिथे इंग्रजीला पर्याय नाही. त्यामुळे शेती आणि तिच्याशी संबंधित अर्थव्यवस्था यांचा टक्का जसजसा कमी होत जाईल, सहकारक्षेत्रांसारख्या गोष्टी जसजशा महाराष्ट्रात अधिकाधिक कमकुवत होत जातील तसतसं मराठीचं (माझ्यामते आधीच दुय्यम बनलेलं ) स्थान अधिकाधिक कमकुवत बनत जाताना दिसतं.

याचा अर्थ मराठीमधले वाचिक, लेखी, सांस्कृतिक व्यवहार संपलेले आहेत असं नाही. भूतकालाच्या हिशेबात यांच्यात वाढच झाली असं म्हणता येईल. पण लोकंसख्या जितक्या वेगाने वाढली, बाकी अर्थव्यवस्था जितक्या वेगाने वाढली, त्यामानाने हा वेग एकतर कमी तरी आहे किंवा त्या गोष्टींचा उपजीविकेच्या साधनांच्या बाबतचा वाटा फार कमी असा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

(इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास नसणे या तथाकथित गंडाहून निराळे)

इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास नसणे हा गंड तथाकथित वगैरे नसून संपूर्ण खरा आहे. दहावीपर्यंत संपूर्ण मराठी माध्यमात आणि अगदी अकरावी-बारावीलाही मराठीतून भूगोलाचा पेपर असणाऱ्या व टँजंट म्हणजे स्पर्शिका असे समजावून सांगणाऱ्या शिक्षणाचा लाभार्थी असल्याने अस्मादिकांना तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरी लागून दोन तीन वर्षे होईपर्यंत इंग्रजी बोलण्याचा काडीचाही आत्मविश्वास नव्हता. या आत्मविश्वासाच्या अभावापायी मुख्य कामासंदर्भात काडीचीही अक्कल नसलेले मात्र इंग्रजीतून पोपटपंची करता येऊ शकणारे अनेकजण नोकरीत बढती वगैरे मिळत गेलेले पाहिले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दुसरीकडे प्रमाण भाषेच्या जवळ जाणारी ज्यांची बोली भाषा नाही त्यांना प्रमाण भाषेविषयी प्रेम नाही.

शिवाय यातीलच अनेकजण मातृभाषेतील शिक्षणाचा पुरस्कारही मात्र तावातावाने करतात. मात्र वेळ आली की इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वाट धरतात. त्यात चुकीचे काही नाही फक्त एक निरीक्षण मांडले. Wink

त्यामुळे प्रमाण भाषेत लिहिता-वाचता येणारे लोक वाढणं वगैरे फक्त तात्पुरतं आहे; शाश्वत नाही.

हाच मुद्दा मला मराठी विकीसंदर्भातल्या चर्चेत मांडायचा होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वरच्या प्रतिसादांत खूप वैयक्तिक निरीक्षणं आलेली आहेत. ती चुकीची आहेत असं म्हणत नाही. पण माझा प्रश्न असा आहे

'असा कुठचा निकष आहे जो मोजत राहिल्याने आपल्याला भाषेची पाळंमुळं मजबूत होत आहेत की नाही हे व्यक्तिनिरपेक्षरीत्या ठरवता येईल?'

काही आकडे सांगतो. बरोब्बर शंभर वर्षांपूर्वी महाराष्ट्रात (लोकसंख्या सुमारे ३ कोटी) ५ टक्के लोक साक्षर होते (सुशिक्षित नाही, साक्षर). म्हणजे जास्तीत जास्त १५ लाख लोकांना लिहिता वाचता येत असे. त्यावेळी प्रमाण भाषा कमी वापरात होती, बोलींचा प्रादुर्भाव होता. आज १० कोटी लोकसंख्येत ७५ ते ८० टक्के साक्षर आहेत. म्हणजे जास्तीत जास्त ८ कोटी लोकांना लिहिता वाचता येतं. १५ लाखांवरून ८ कोटीवर जर १०० वर्षांत प्रगती झाली, तर भाषा मरतेय अशी बोंब कुठच्या आधारावर ठोकत रहावं? 'मला माझ्या आसपास असं दिसतंय' हा युक्तिवाद फार फसवा असतो. इथे लिहिणारे जवळपास सगळे जण आआर्थिक शैक्षणिक दृष्ट्या वरच्या पाच ते दहा टक्क्यात आहेत. अशांच्या 'आसपास'वरून भाषेचं काय चाललंय हे कसं ठरवणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशांच्या 'आसपास'वरून भाषेचं काय चाललंय हे कसं ठरवणार?

अगदी योग्य प्रश्न.

पण इतिहासात पाहिले तर या वरच्या ५-१०% लोकांच्या कलावरूनच एखादी भाषा फक्त मौखिक रूपात राहील की तिचे वाङ्मय होईल हे ठरते. युरोपात लॅटिनच्या वरवंट्याखाली इटलीमधील अन्य भाषा कशा सपाट झाल्या अन बाकी रोमन साम्राज्यातल्या भाषाही कशा मरतझुरत राहिल्या त्याचे विवेचन शेल्डन पोलॉकच्या पुस्तकात इत्थंभूतरीत्या आलेले आहे. भारतात संस्कृतचा वरवंटा तयार झाला नाही कारण प्रसाराचे मॉडेलच वेगळे होते. युरोपात लॅटिनने स्थानिक भाषांना कमीतकमी रोमन एंपायर जिवंत असताना शक्य तितके खाऊन टाकले होते. तुम्ही म्हणता तसेच अन भाषा बोलणारे लाखो लोक होते पण त्यांना प्रतिष्ठा नव्हती. शेवटी लॅटिनबरोबर मिक्स होत कधीतरी त्या रोमन प्रभाव संपल्यानंतर ५००-६०० वर्षांनी परत जगलेल्या दिसतात. अन त्यातही लॅटिनेतर एलेमेंट्स बरीच कमी दिसतात.

तस्मात इंग्लिशकडे असाच कल राहिला तर काही शे वर्षांनी या भाषा परत उसळी मारतीलही कदाचित, पण तोपर्यंत भाषिक-सांस्कृतिक जाणिवा पूर्णपणे बदललेल्या असतील अन इंग्लिशपूर्व मराठीशी आपले कसलेच नाते राहणार नाही. तसे ते आत्ताही ब्रिटिश प्रभावामुळे कमीच आहे ते एक सोडाच-पण नंतर अजून जास्त मिक्श्चर होईल.

या सर्व बदलाला शेकडो वर्षे लागतील म्हणून ते इर्रिलेव्हंट आहे असे कुणाला म्हणायचे असेल तर म्हणो बापडे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण इतिहासात पाहिले तर या वरच्या ५-१०% लोकांच्या कलावरूनच एखादी भाषा फक्त मौखिक रूपात राहील की तिचे वाङ्मय होईल हे ठरते.

इतिहासात फक्त हे पाच-दहा टक्के शिकायचे. आज ती परिस्थिती नसताना तेच इथे कसं लागू होईल? असो. माझ्या अवतरणातल्या प्रश्नाचं कोणी उत्तर दिलेलं नाही. निकष कुठचे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण आज इतके लोक शिकू लागले तरी शेवटी इंग्रजीकडे कल वाढतोच आहे. तुमचे म्हणणे काही अंशी पटते पण अभिजनवर्ग हाच कधीही सामाजिक टेस्टचा प्राईम मूव्हर असतो. इंटरनेटमुळे ही मक्तेदारी मोडल्यासारखी वाटतेय पण हा गेल्या दहाबारा वर्षांतला गोंधळ आहे. अजून काही वर्षे गेल्याखेरीज हे समजणार नाही असे वाटते. संक्रमणकाळ असल्याने परस्परविरोधी अनेक गोष्टी दिसताहेत.

पण आज वय वर्षे २० पेक्षा कमी असलेल्या जन्तेकडे पाहिले तर मराठीच्या दृष्टीने आशादायक काय दिसते? फारसे नाही. तस्मात तुमच्याशी असहमत आहे.

असो. पण तूर्तास वेट & वॉच असेच म्हणेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शाळा वगळता मला मोजावेसे वाटणारे काही सोपे निकष खालीलप्रमाणे. यावरुन मराठीचा अवकाश हा उंबऱ्याच्या आत घरापुरताच मर्यादित झाला आहे की नाही हे स्पष्ट होईल. हा प्रकार शहरांपुरता मर्यादित नाही हे निश्चित.

१. आजकाल सर्वसामान्य व्यक्ती बँकांचे व पोस्टाचे (विमा किंवा म्युच्युअल फंड्स वगैरे) व्यवहार करताना कोणत्या भाषेत अर्ज व चेक भरतो?
२. सर्वसामान्य व्यक्तीला या व अर्थविषयक वा इतर व्यवहारांमध्ये या संस्थांकडून कोणत्या भाषेत संपर्क केला जातो?
३. सर्वसामान्य व्यक्ती इतर सरकारी खात्यांमध्ये कोणत्या भाषेत व्यवहार करतो?
४. पीएमटीची नवी तिकिटे किंवा पुण्यात फाडल्या जाणाऱ्या टोलच्या पावत्या कोणत्या भाषेत आहेत?
५. सर्वसामान्य व्यक्ती इतर खाजगी व्यवहारांमध्ये कोणती भाषा वापरतो (उदा. गॅसचा 'नंबर' लावण्यासाठी किंवा डॉक्टरकडे 'नंबर' लावण्यासाठी गेल्यावर तिथली रिसेप्शनिस्ट कोणत्या भाषेत रजिस्टरमध्ये नोंदणी करते)?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आपल्याला भाषेची पाळंमुळं मजबूत होत आहेत की नाही हे व्यक्तिनिरपेक्षरीत्या ठरवता येईल का ?
- बहुतेक नाही. उलट भाषेला कुठे मुळं असतात असा जीवशास्त्रीय प्रश्न विचारता येईल.

भाषा मरतेय अशी बोंब कुठच्या आधारावर ठोकत रहावं?
- कुठल्याच नाही. इथे कुणी भाषा मरतेय असं म्हण्टलेलं दिसत नाही. काही मते प्रतिपादित झाली आहेत.

इतरांच्या मताला बोंबा ठोकणं म्हणता येईल का ?
- येईल.

बाकी चालू द्यात,

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

सहमत. मी देखील याच प्रकारे वर मत मांडलेले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मराठी शाळेत मुलांना घालण्याबाबत व्यक्तिगत निरीक्षण नोंदवतो. ते कदाचित अस्थानी किंवा कैच्याकै सुद्धा असेल.

मी (१९६८-७८ दरम्यान) मराठी शाळेतून शिकलो. मी अगदी बालपणी चाळीत आणि नंतर फ्लॅटमध्ये राहिलो. माझ्या आसपासची मुले अर्थातच मराठी माध्यमाच्या शाळेत जात असत.

परंतु याचबरोबर माझ्या (आणि माझ्या चाळीतल्या इतरांच्या) नात्यातली काही मंडळी थोड्या वरच्या क्लासमध्ये होती. उदा. माझी एक मावशी आणि तिचे यजमान टाटा कॅन्सर हॉस्पिटल मध्ये शास्त्रज्ञ होते. दुसरे एक दोन नातेवाईक खाजगी कंपनीत मॅनेजर वगैरे हुद्द्यांवर होते. आणखी एक नातेवाईक स्वतःचा बर्‍यापैकी व्यवसाय करीत. त्यांची मुले मात्र त्याही काळी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असत.

मी किंवा माझ्या आसपासच्या मुलांचे पालक कारकून, शिक्षक किंवा कामगार अशा वर्गातले होते. आम्ही मराठी शाळेत जात होतो. आमच्या (माझ्या आणि माझ्या मित्रांच्या) उच्चभ्रू नातेवाइकांची मुले इंग्रजी माध्यमात शिकत.

आज जे घडले आहे की त्यावेळच्या बर्‍याचश्या कारकून कामगारांची मुले आज कामगार - कारकून राहिलेली नाहीत. थोडी वर सरकली आहेत. आमच्या उच्चभ्रू नातलगांच्या (त्या वेळच्या) उदाहरणावरून असे वाटते की मराठी माध्यमाच्या शाळांत 'आनीपानी न करणारे शिक्षक' असते आणि 'गुटखा खाणारी मुले' नसती तरी (आर्थिक दृष्ट्या वरच्या वर्गात सरकलेल्या) आम्ही आमच्या* मुलांना इंग्रजी शाळेतच घातले असते.

*माझी मुलगी मराठी शाळेतच जाते.

या वरून अर्थातच मोलकरणी-कामगारांची मुले इंग्रजी माध्यमात का जातात याचा उलगडा होत नाही हे खरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एका वेगळ्या फोरमवर झालेल्या याच चर्चेतील मत इथे नव्याने मांडतोय. मराठीच्याच नव्हे तर एकूणच भारतीय भाषांच्या संभाव्य र्‍हासाला काहि प्रमाणात आर्थिक बाजु कारणीभूत आहे हे मुळ लेखातले पटण्यासारखेच आहे. पण इथे मला थोडे अधिक खोलात शिरून वेगळे मत मांडायचे आहे. पुढिल प्रतिसाद मुक्त चिंतनासारखा आहे, त्यामुळे संभाव्य विस्कळीतपणाबद्दल आगाऊ क्षमस्व!

=========
चांगली शाळा: अनेकांसाठी या तथाकथित "चांगली शाळा" म्हणजे काय? तर "आनि-पानि" न बोलणारे शिक्षक आणि "चांगल्या" मुलांची संगत!
असे मत असणार्‍या व्यक्तींशी अधिक बोलल्यावर "चांगली संगत" म्हणजे काय? तर "इतरां"बरोबर संगत नसणे. पण "इतरांच्या" संगतीत काय वाईट आहे? असं विचारलं तर वर मेघना म्हणते तसं 'शिव्या, घाणेरडी राहणी, मारामार्‍या' वगैरे. आणि याचा संबंध घाऊकपणे समाजातील एका वर्गाशी लावला जातो.

तर या व्याख्येचे तात्पर्य इतकेच की 'चांगली शाळा म्हणजे जिथे ठराविक वर्गातील - अर्थात बहुजन समाजातील - व्यक्तींना पोचणे कठीण' असते.

थोडक्यात हा उच्चभ्रुंचा वर्गवाद-जातीवाद मराठीच्या संभाव्य र्‍हासाला कारणीभूत आहे असा माझा दावा आहे.

या दाव्याला पुष्टी देण्यासाठी अजून एक निरिक्षण मांडतो.

समाजाचा बहुजन वर्ग व उच्चभ्रु मंडळींपर्यंतच जेव्हा शिक्षण सिमीत होतं त्यावेळी त्यांनी स्वतःला जन्मतःच येणार्‍या संस्कृत, मराठीत शिक्षण पुरेसे मानले. इंग्रज आल्यानंतर त्या भाषेमुळे विशेष आर्थिक लाभ दिसू-मिळू लागल्यावर मुळातच शिक्षणाचं अंग असणारा हा समाज स्वाभाविकपणे पुढे सरसावला. अर्थात शिक्षण घेणे व देणे हे त्याकाळच्या आर्थिक गरजेमुळे घडत होते. मात्र याच बरोबर इंग्रजांच्या काळात शिक्षण हे धार्मिक न रहाता, रोजगाराचं साधन झालं नी ते बहुजन वर्गातील काहींनी आत्मसात केलं. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही बहुजनवर्गात हळुहळू जागृती होत होती. आरक्षणामुळे अनेक वंचितांनाही शिक्षण मिळु लागले. आणि ८०-९० च्या दशकांत ही नवशिक्षित पिढी शिक्षक म्हणून पुढील पिढ्यांना शिकवायला येऊ लागले.

आणि इथे या 'उच्चभ्रु'चे आसन डळमळीत झाले. जेव्हा बहुजनवर्ग अभिजनवर्गाने आखलेला रस्ता वापरत त्याच्यापर्यंत पोचतो तेव्हा अभिजनवर्गाला आपले श्रेष्ठत्त्व अबाधित ठेवण्यासाठी अधिक वेगळे काही करावे लागते. पुन्हा त्यांच्या मागे बहुजन वर्ग जातो, तोवर अभिजन वर्गाने आणखी चार पावले पुढे टाकली असतात. व अभिजनवर्गाने आखलेल्या म्हणा, जोखलेल्या म्हणा मार्गाने ढोबळपणे समाजाची प्रगती होत असते असे म्हणता येते. शिक्षणाच्या बाबतीत मात्र वर दिलेल्या कारणांने आपल्याकडे 'अस्मितां'चा शिरकाव झाला. त्यात कायदेशीर पाठबळ व आरक्षणामुळे बहुजनवर्गाला संधी नाकारता येत नव्हती नी त्यांच्या खांद्याला खांदा लाऊन सोडा, त्यांच्या हाताखाली काम करणे, त्यांनी आमच्या मुलांना शिकवणे या वर्गाला सहन होईनासे झाले.

याच काळात मुलांना 'इंग्रजी' शाळांत घालायचा उपाय निघाला. व मराठी शाळेत बहुजनवर्गातली पोरे जाऊ लागली कारण तिथेही शिक्षणाचे महत्त्व पटू लागले होते. मात्र आपली जन्मभाषा सोडण्यात अभिजनवर्गाची मोठी चुक झाली असे मला वाटते. अस्मितांच्या आहारी न जाता तेव्हा बहुजनवर्गाला त्यांनी मोठ्या मनाने आपल्याशी तुल्यबळ मानले असते तर भारतीय भाषांवर ही वेळ आली नसती.

इंग्रजीत नोकरीच्या संधी आहेत किंवा तिथे आर्थिक फायदे आहेत हे दुय्यम झाले. आता जेव्हा बहुजन वर्गातील मुले इंग्रजी शाळेत जाऊ लागली आहेत तेव्हा अभिजन वर्गाने सीबीएससीत मुलांना घालणे सुरू केले आहे. काहिंनी तर इंटरनॅशनल शाळांत घातले आहे. थोडक्यात सांगायचा मुद्दा हा की वर मेघनाने म्हटलेली कारणे ही बोलायची कारणे झाली. इथे प्रेम मराठीचेही नाहिये नी इंग्रजीचेही नाहिये. त्याच्या मुळाशी प्रखर जातीवाद-वर्गवाद आहे.

=====

आमच्यावेळी कसे छान (म्हणजे ब्राह्मण) शिक्षक होते. आताच्या आनिपानींनी वाट लावली आहे वगैरे दांभिक वाक्ये याच विचारधारेतून येतात. प्रत्यक्षात अजूनही ५०% जागा उच्च वर्गीयांना आहेतच. फक्त आरक्षित जागा भरल्या जात आहेत कारण त्यांच्यात शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. जे खरंतर स्वागतर्ह (नी अनेकदा कौतुकास्पद) आहे. अभिजनवर्ग शिक्षकीपेशातून कमी झाला तो आर्थिक गणिते बदलल्यानंतर. कष्टाने घडवलेली पुढिल पिठी अमेरीकादी देशांत तरी गेली नाहितर इथेच बरेच कमवु लागली . तेव्हा कमी पगारांत बरेच राबवून घेणारी शिक्षकी नोकरी करण्याची गरज उरली नाही. दुसरे असे की शिक्षकी पेशा हा पुर्वीच्या सनातनी/पारांपरिक घरांमध्येही स्त्रियांसाठी स्वीकार्ह ऑप्शन होता व ते घरात लक्ष देण्यासाठी सोयीचेही होते. इतर कष्टाच्या किंवा फिरत्या नोकर्‍या स्त्रियांनी करणे तेव्हा समाजमान्य नव्हते. आता तीही परस्थिती नाही. तेव्हा सहाजिकच अभिजनवर्गाने शिक्षकीपेशाकडे पाठ फिरवली.

====

बाकी आनिपानि ही प्रमाणभाषा नसेलही पण ती 'वाईट' कशी ठरते हे कळत नाही. चित्रकला, इतिहास किंवा गणिताच्या शिक्षकाची मराठी प्रमाण नसल्याने मुळ विषयाला काय तडा जातो समजत नाही.

====

असो. या विषयावर लिहिण्यासारखे बरेच आहे. पण या आनिपानींनी शिक्षणाची/मराठीची वाट लावली हे ऐकलं की डोक्यात तिडीक जाते. किंबहुना सध्या जी काही मराठी वापरात आहे ती तिथेच आहे. पोकळ गळे काढणार्‍यांनी ती केव्हाच विकून खाल्ली आहे! Sad

===

अभिजन वर्गाने आपले सामाजिक श्रेष्ठत्त्व टिकवायला नको होते का? तर माझे तसे मत नाही. समाजाच्या प्रगतीसाठी अभिजनवर्गाने पुरोगामी रहाणे गरजेचेच असते व ते जबाबदारीचेही असते. अभिजन वर्गात पोकळ जातीय अस्मितांचा शिरकाव झाला नी तेव्हापासून कित्येक बाबतीत हा एकेकाळी विविध सामाजिक सुधारणांत गुंतलेला वर्ग आणि त्याच बरोबर मराठी समाज आणि भाषा एका चक्रव्युहात अडकले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अजून एक वैयक्तिक अनुभवः

आम्ही दोघे इंग्लिशमधून शिकलो. माझ्या मुलासाठी सध्या शाळेच्या शोधात आहोत. बंगाली-माध्यम शाळेत घालायची इच्छा आहे, पण हे नात्यागोत्यात किंवा शेजारपाजारांना सांगितलं की जगबुडी आल्यासारखं करतात. पुण्यासारख्याच काही जुन्या, चांगल्या शाळा इथे आहेत, पण त्यांचा दर्जा खालावला आहे असे सर्वत्र ऐकू येतं. पण म्हणजे नेमकं काय बिघडले आहे हे विचारलं तर वर अनेक प्रतिसादात नोंदविले आहे, तसे मुलांचा सामाजिक दर्जा बदलला आहे हे कळतं. ("नाहीतर एकेकाळी सत्यजीत राय या शाळेत शिकले, हो!") काही इंग्रजी शाळांबद्दल सगळे माना डोलावतात (आजकल 'इंटरनॅशनल स्कूल्स चा जमाना आहे), पण मी इथे एम.फिल आणि पी.एच.डी च्या मुलांना शिकवते. शहरातल्या, आणि काही अन्य शहरातल्या नामांकित इंग्रजी शाळा-कॉलेजातून मुलं-मुली येतात. त्यांचं इंग्रजी ऐकून-वाचून इंग्रजी शाळेत जाऊन ही भाषा नीट लिहीता वाचता बोलता येईल यावर माझा तरी विश्वास नाही. अ‍ॅक्सेंटचा छाप असतो, नक्की. काँटॅक्ट्स मिळतात, "वर्नॅक्युलर" छाप नसतो. पण कधी कधी त्यांची पेपरं वाचून रडू येतं. असो. दॅट रँट इज फॉर अनदर डे.

आम्ही अजून शाळा पक्की केली नाही, पण बंगाली माध्यम नर्सरी-प्री-प्रायमरी शोधणे रोचक ठरले. २.५-३ वर्षांच्या मुलांसाठी प्लेस्कूल, माँटेसरी वगैरे शाळा सगळ्याच इथे इंग्रजी माध्यमाच्या आहेत, आणि शहरातल्या नामांकित इंग्रजी शाळेच्या इंटर्व्यू साठी मुलांना तयार करणं हे त्यांचे मुख्य ध्येय, आणि सेलिंग पॉइंट आहे. स्वतःला "कॉस्मोपॉलिटन" म्हणवून घेणार्‍या प्लेस्कूल-नर्सर्‍यांनी माझं नाव ऐकून "आम्ही इथे बंगाली बोलू देत नाही" हे मला आवर्जून सांगितलं. पण बंगाली माध्यमाच्या शाळेत प्रवेश हवा असला तर ४ वर्षाच्या आधी काही नाही; अनेक चांगल्या शाळांत ५ वर्षांच्या आधी काही नाही. प्रवेशाचा प्रोसेस काही ठिकाणी लॉटरीने चालतो, तर काहींनी काही खुलासा केलेला नाही. एक-दोन ठिकाणी नर्सरीवजा शाळा आहेत, पण तेथे जाणार्‍या पालकांच्या कामाच्या वेळा लक्षात ठेवून (बहुतांश सकाळी घरकामाला येणार्‍या बायका) त्या शाळा सकाळी ७-९.३० चालतात. इंग्रजी माँटेसरींच्या वेळा ९-१२. आमच्यासारख्या ऑफिसवाल्यांना, अ‍ॅटलीस्ट पार्ट-टाइम सूट होण्यासारख्या.

आम्ही तूर्तास जवळच्या माँटेसरीत घातले आहे, कारण नाहीतर मुलाला अजून दोन वर्षं घरी बसवायला लागेल, आणि दोघे आई-वडील नोकरी करणारे असल्याने हे शक्य नाही. आतापर्यंत त्याला मराठी बाराखडी आणि बंगाली वर्णमाला येत होती, दोन्ही भाषा तो व्यवस्थित बोलतो, पण एका महिन्यातच गुलाबीला "याला पिंक म्हणतात", "हे चौकोन नाही, स्क्वेर आहे" वगैरे चालू केले आहे. घरी बंगाली आणि मराठी दोन्ही चालू ठेवणे आणि दोन वर्षात लॉटरी लागेल आणि गुलाबीचं संपूर्ण पिंक होणार नाही ही आशा बाळगणे ही आमची सध्या स्ट्रॅटेजी आहे.

मातृ-पितृभाषेतूनच मुलांचं शिक्षण व्हावं हे मान्य आहे, पण आमच्या मोलकरणीचा नातू इंग्लिश स्कूलला जातो. त्यासाठी तिच्या मुलीने नोकरी सोडली. आम्ही बंगाली शाळा शोधतो आहोत हे ऐकल्यावर "तुमचं बरं आहे हो, तुम्ही घरीच त्याला चांगलं इंग्रजी शिकवाल. आमचं काय?" हे म्हटली. बरोबरच आहे ते. तो ऑप्शन तिला आणि तिच्यासारख्या लाखोंना नाही, म्हणूनच प्रत्येक गल्लीबोळात इंग्लिश मीडियमच्या शाळा जोरात आहेत.

अजून एक आठवण - माझी एक काकी बरीच वर्षं पुण्याच्या एका मराठी माध्यम प्राथमिक शाळेत शिक्षिका होती. तिचा नातू कर्नाटक शाळेत जायला लागल्यावर टिचरांनी घरी चिठ्ठी पाठविली - मुलाच्या आजी-आजोबांना त्याच्याशी इंग्लिशमधे बोलायला सांगा, म्हणजे तो लवकर भाषा शिकेल. काकी भडकली. ३५ वर्षाचा तिचा अनुभव मातीत गेल्यासारखं तिला वाटलं. पण थोड्याच वेळात सूर बदलला आहे. परवाच मी तिला आमच्या समस्येबद्दल सांगितलं. म्हटली (आय कोट): "अगं, मला ही आधी वाइट वाटलं. पण आता आमच्या शाळेत ही नुसते बीसी भरलेत. गेली खड्ड्यात. घाल मुलाला इंग्रजी शाळेत, शेवटी आपले संस्कार नकोत का?"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या सारख्या कोणतीच भाषा धड न येणार्‍या 'थर्ड वर्ल्ड'वाल्याला हे सगळं(?) वाचून (असं म्हणायची पद्धत आहे) हा 'फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम' आहे का काय असे वाटून राह्यले आहे. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे व असे निकष रास्त वाटतात. विशेषतः कॉंप्युटरायझेशन झाल्यापासून इंग्रजीत डेटा एंट्री करणं सर्रास झालं आहे. देवनागरी आकडे जाऊन इंग्लिश आकडे आले तसंच व्यवहारात आपल्या देवनागरी नाव पत्त्याऐवजी इंग्लिश भाषेतला नाव-पत्ता आलेला आहे. भारतीय भाषांमध्ये डेटा एंट्रीसाठी सीडॅकने काही उपक्रम राबवले होते. पण ते कितपत पूर्णत्वाला गेले कोण जाणे.

कदाचित हे चित्र बदलेलही. युनिकोड क्रांती ही गेल्या काही वर्षांमधली आहे. तिचं लोण पोचून काही बदल होऊन मराठी थोडी पुन्हा प्रवेश करूही शकेल.

४. पीएमटीची नवी तिकिटे किंवा पुण्यात फाडल्या जाणाऱ्या टोलच्या पावत्या कोणत्या भाषेत आहेत?

हा हा. हे वाचून, मनसेचं टोलविरोधी आंदोलन हे त्या पावत्यांच्या भाषेबद्दलच होतं हे लक्षात आलं. न रहेगा टोलबूथ, न फटेगी अंग्रेजी पावतियॉं! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भाषा मरतेय अशी बोंब कुठच्या आधारावर ठोकत रहावं?
- कुठल्याच नाही. इथे कुणी भाषा मरतेय असं म्हण्टलेलं दिसत नाही. काही मते प्रतिपादित झाली आहेत.

बोंब ठोकणं हे मूळ लेखाला उद्देशून होतं. 'पुरेसा भक्कम विदा नसताना काहीशा भीतीयुक्त शब्दात आकाश कोसळतंय असं म्हणणं' याला मी सुटसुटीतपणे बोंब ठोकणं असं म्हटलेलं आहे. कदाचित माझा शब्दप्रयोग चुकला असेल. पण भावना समजून घ्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मराठी भाषेचा असा काही प्रश्न आहे हे बहुजन समाजाला मान्य नाही किंवा त्यांना भाषेपेक्षा जगण्याचे (आर्थिक) प्रश्न अर्थातच महत्त्वाचे वाटतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चर्चा मराठी भाषेबद्दल सुरू होऊन मराठी माध्यमांच्या शाळा व त्यातील मास्तर यांच्यावर घसरलेली दिसते. असो.

वास्तविक, भाषेबाबत लोकभावना लक्षात घेऊन तिच्या वापराबाबत धोरण ठरवणे, तिची वापरक्षेत्रे निश्चित करणे, सक्ती आणि संधी यांच्याद्वारा तिच्या वापराच्या प्रेरणा निर्माण करणे, तिचे नियोजन व नियमन करणे हे सरकारचे काम आहे

लोकसत्तेतील ज्या लेखावरून ही चर्चा सुरु झाली त्यातले हे एक वाक्य इथे डकवतो आहे.
मराठी भाषेसाठी सरकार नामक कुणीतरी काहीतरी करायला हवे ही एक कॉमन अपेक्षा असते.
त्या वाक्यात अधोरेखित केलेला 'लोकभावना' हा शब्द कळीचा आहे. लोकांचीच अपेक्षा इंग्रजीतून शिक्षण हवे, अशी असेल, तर सरकार तेच करणार.
शिवाय सरकारने मराठीची सक्ती ('त्यांना') करावी अशी एक कन्सेप्ट असते. मराठी संवर्धनासाठी, जतनासाठी मी काय केले, किंवा काय करू शकतो याचा विचार कुठेच नाही. तो विचार व्हावा अशी आशा करतो.

***
वरच्या प्रतिसादातील मास्तरांच्या दर्जाबाबत.
आधी एक स्वानुभव : एका संस्थेच्या अनेक शाळांपैकी माझी शाळा शहराच्या मागास भागात होती. सहाजिकच 'बॅकलॉग' भरलेले शिक्षक सगळे या शाळेत होते.
पण.
आजच्या अन त्याकाळच्या मास्तरांत फरक हा होता, की माझे सर्व शिक्षक, आपापला विषय उत्तम अभ्यास करून शिकवत असत, त्या विषयात मुलांना रस उत्पन्न होईल याचा प्रयत्न करीत, सर्व प्रकारच्या एक्स्ट्रा करिक्युलर अ‍ॅक्टिव्हिटीज, अगदी नाटक, चित्रकला स्पर्धा, टिमवि, वक्तृत्व स्पर्धा, शालेय सहली, ज्या खर्‍या अर्थाने शैक्षणिक होत्या, अशा सर्व बाबींत आमच्या शाळेतील मुले हिरिरीने भाग घेत, व बक्षिसेही मिळवीत. याला शिक्षकांचाच आधार व मार्गदर्शन कारणीभूत होते. हे शिक्षक ९०% बहुजन समाजातलेच होते.
आज,
त्या शाळेत तितक्या उत्तम दर्जाचे शिक्षक उरलेले नाहीत, व त्याच्याशी त्यांच्या जात्/पातीपेक्षा, पाट्या टाकण्याच्या वृत्तीचाच संबंध जास्त आहे असे म्हणावेसे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

हा एक इंट्रेस्टिंग टेकः

शिळी कढी आणि रिकामचोट टाहो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मला समजणारी, मला व्यक्त व्हायला पुरक अश्या भाषेचा अभ्यास / भाषेतून संभाषण कमी होत जाईल याबद्दल वाईट वाटेलच - वाटतही.
मराठी का (आणि कशी) मरत चालली आहे यावर सदर वाक्यातून काही प्रकाश पडतो, असे वाटते Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

वरील निकषांशी सहमत आहे. तरीही असे निकष लावून काही विदा गोळा करणे व त्याला संख्याशास्त्राच्या काही चाचण्या लावून त्यावरुन एखादी भाषा जिवंत आहे की मरु घातली आहे याविषयीचा निष्कर्ष काढणे योग्य वाटत नाही. तथापि, एखाद्या भाषेमध्ये एकूण किती शब्द आहेत, त्यामधील साधारणतः वापरात असणारे शब्द किती, एखाद्या भाषेत दरवर्षी किती नवीन शब्दांची भर पडते, भाषेतले वाक्प्रचार आणि म्हणी यांचा किती टक्के लोकांना बिनचूक अर्थ माहिती असतो, भाषेचे शुद्धलेखनाचे नियम कोणते, ते ठाऊक असणारे आणि ते पाळणारे लोक किती,एखाद्या भाषेत प्रकाशित होणारी पुस्तके किती (ती कोणती पुस्तके आहेत व त्यांचा दर्जा काय हा मुद्दा येथे गैरलागू ठरावा), त्यातली किती टक्के पुस्तके लोक वैयक्तिक अखत्यारीत खरेदी करतात (संस्थांनी खरेदी केलेली पुस्तके हाही मुद्दा येथे गैरलागू ठरावा) असे काही निकष लावले तर त्या भाषेचा वर्तमानकाळ (आणि कदाचित भविष्यकाळ) यावर काही भाष्य करता येईल, असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

शब्दसंख्या, वापरातली शब्दसंख्या, प्रकाशित होणारी पुस्तकं, वैयक्तिक खरेदी होणारी पुस्तकं हे निकषही आवडले. हे कोणी दर पाच वर्षांनी पद्धतशीरपणे मोजले तर आपल्याला निश्चितच ट्रेंड समजू शकेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> १५ लाखांवरून ८ कोटीवर जर १०० वर्षांत प्रगती झाली, तर भाषा मरतेय अशी बोंब कुठच्या आधारावर ठोकत रहावं? 'मला माझ्या आसपास असं दिसतंय' हा युक्तिवाद फार फसवा असतो.

ही वाढ झाली हे कुणीच नाकारत नाही. प्रश्न भविष्याचा आहे. महाराष्ट्र सरकारनं काही वर्षांपूर्वी जेव्हा पहिलीपासून इंग्रजी अनिवार्य करण्याचं धोरण स्वीकारलं तेव्हा त्यावर काही शिक्षणतज्ज्ञांनी नापसंती व्यक्त केली होती. तेव्हा 'आमचा प्रगतीचा मार्ग अभिजनांनी रोखू नये' अशा सुरात बहुजनांकडून मतं व्यक्त झाली होती. माझ्या मते ती प्रातिनिधिक होती. इंग्रजी आल्यामुळे आर्थिक संधी उपलब्ध होतात हे न नाकारता येणारं सत्य आहे. ते आता बहुजन समाजाच्या स्वप्नांचा एक भाग आहे. हे वास्तव जितक्या लवकर स्वीकारलं जाईल तितकं आपलं भविष्याविषयीचं आकलन योग्य दिशेनं जाण्याची शक्यता वाढेल.

>>इथे लिहिणारे जवळपास सगळे जण आर्थिक शैक्षणिक दृष्ट्या वरच्या पाच ते दहा टक्क्यात आहेत. अशांच्या 'आसपास'वरून भाषेचं काय चाललंय हे कसं ठरवणार?

मी ज्या बहुजनांविषयी लिहिलंय ते माझ्या परिसरातलेच आहेत. त्यात रिक्षावाले, मोलकरणी, मॉलमध्ये घोडकाम करणारे, शाळेतले/कार्यालयातले शिपाई असे अनेक लोक येतात. शिवाय, हे साक्षर झालेले बहुजन त्यांच्या दृष्टिकोनाची मांडणी आता वृत्तपत्रांमधून आणि नियतकालिकांमधून करत असतात. वर उल्लेख केलेल्या पहिलीपासून इंग्रजी अनिवार्य करण्यासारखी शासनाची शैक्षणिक धोरणं ठरवताना ह्या बाजूचा विचार प्रामुख्यानं आता लक्षात घेतला जातो. हे वास्तव दुर्लक्षून चालणार नाही.

आकडेवारीसाठी ह्या काही बातम्या :

गार्डियन : Language exodus reshapes India's schools

वरच्या बातमीतून उद्धृत :

The latest data compiled by the National University of Education, Planning and Administration (NUEPA) shows that the number of children studying in English-medium schools has increased by a staggering 274% between 2003 and 2011, to over 20 million students.

प्रगत शिक्षण संस्था : मराठी शाळांना कसे वाचवायचे

वरच्या लेखातून उद्धृत :

डीआयएसईची (DISE) आकडेवारी दर्शवते की 2002 ते 2011-12 या दशकाहूनही कमी काळात, मराठी माध्यमांच्या शाळांतील भरती 89%
पासून 74% पर्यंत घटली, तर इंग्रजी माध्यमांतील शाळांमधील मुलांची भरती 3% इतक्या अल्प प्रमाणापासून 16% पर्यंत वाढली.
[...]
2011-12 मध्ये खाजगी िवनाअनुदािनत शाळांमधून भरती झालेल्या जवळजवळ 3 लाख मुलांपैकी, 75% हूनही अधिक इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी
होते, तर 20% हूनही कमीविद्यार्थी मराठी माध्यमाचे होते.

प्रहार : मराठी माध्यमाच्या शाळा मृत्युपंथाला?

शिक्षक अभ्यास मंडळाचं हे व्यासपीठसुद्धा रोचक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

लास्ट वर्ड म्हणता यावा असा प्रतिसाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वर बॅटमॅन यांनी विचारल्यामुळे एक अनुभव. सध्या तिथे रहात नसल्याने माझ्या सांगलीतील शाळेची सद्यपरिस्थिती नक्की ठाऊक नाही, पण आंम्ही खेळायचो त्या मैदानावर प्रचंड बांधकामे केली आहेत. पॉलिटेक्निक काढले आहे. आमच्या वेळी कानडी भाषेचा प्रभाव शिक्षकांच्या बोलण्यावर जाणवायचा, ते आता जरा नीट मराठी बोलत असावेत असा अंदाज आहे. (उदा. मी त्याला मारलो) त्या शाळेत सध्या प्रवेश सहज मिळतो अशी माहिती आहे.
भावाने सांगलीत त्याच्या मुलाला इंग्रजी माध्यमात व मुलीला मराठी माध्यमात घातले होते. या वर्षी मुलीलाही ईंग्रजी माध्यमात घातले आहे. त्यासाठी बराच आटापिटा केला, पण नोकरी बदलली तर प्रोब्लेम नको असा विचार केला. त्याला येत्या वर्षी महाराष्टराच्या बाहेर जावे लागणार आहे.
माझी मुले मात्र पुण्यात प्रयोगशील मराठी शाळेत जातात. त्यांचे ईंग्रजी बर्याच ईंग्रजी माध्यमात शिकणार्‍या मुलांच्यापेक्षा बरे आहे असे वाटते. पुढे तर ते आणखीनच चांगले होईल. त्यामुळे निर्णय ठीकच आहे. त्यांच्या पुण्यातील मराठी शाळांना तरी काही घरघर लागलीय असे वाटत नाही.
- स्वधर्म.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुद्द्यावर नेमके बोट ठेवणारा प्रतिसाद. जिव्हाळ्याचा विषय असल्याने इतके दिवस वाचनमात्र असलेला ऐसी वरचा वावर थाम्बवून सदस्यत्व घेऊन, हा पहिलाच प्रतिसाद लिहिण्याचा प्रयत्न.
१.

चांगली शाळा म्हणजे जिथे ठराविक वर्गातील - अर्थात बहुजन समाजातील - व्यक्तींना पोचणे कठीण' असते

सम्पूर्ण सहमत.
हल्ली हल्लीच एकपेक्षा अधिक सहकारी मित्रानी अभिमानपूर्वक मला सान्गितले आहे, की शाळेने सरकारी अनुदान घेण्याचे ठरवल्यावर पालकानी त्याची शाळा बदलली, कारणे: त्यामुळे येणारी शिक्षक वर्गातील आरक्षणे आणि कमी झालेल्या फीमुळे "खालच्या वर्गातील" मुले शाळेत येण्याची निर्माण झालेली शक्यता.
याच मित्राना मी स्वत १० वी पर्यन्त मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळेत शिकल्याचे सान्गितल्यावर बसलेला धक्का त्यान्च्या चेहर्‍यावर दिसलाच, पण नन्तरही काही काळ वेर्नि म्हणून चिडवणेही मनोरन्जक म्हणावे असेच.

२. आज इन्ग्रजी(बोलता/ वाचता/ लिहिता) येण्याचे आर्थिक फायदे अमान्य करता येणारच नाहीत, परन्तु इन्ग्रजी शाळेत जाऊन अथवा मराठी माध्यमात पहिलीपासून इन्ग्रजी शिकून हे जमते का याबद्दल साशन्क आहे. अनेक मराठी व अमराठी सहकार्‍यान्शी बोलल्यावर, आणि पदव्युत्तर पातळी वरच्या अनेकानी लिहिलेल्या उत्तरपत्रिका पाहिल्यावर शाळा/ माध्यम आणि इन्ग्रजी बोलण्याची क्षमता यातील परस्परसम्बन्ध इतका सरळ नसावा असे मानायला जागा आहे.

३. एका अवान्तर विषयाकडे यानिमित्ताने लक्ष वेधावेसे वाटते. तथाकथित "चान्गल्या" मुलामधे/ शाळेत न शिकता ही इतर कोणत्याही बाबतीत वेगळेपणा वाटला नसला, तरी अमेरिकन/ ब्रिटिश टीव्ही व पॉप सन्गीता मधे माझ्या उपरोल्लेखीत सहकार्‍यान्इतकी रुची आणि व्यासन्ग मला कमवता आलेला नाही. यात कोणताही न्यून्गन्ड नसला, तरी रुटीन सम्भाषणात हे वेगळेपण उठून दिसते ही गोष्ट खरीच. आता या अज्ञान/ अरुचीचा सम्बन्ध शिक्षणातील फरकाशी जोडता येईल का यावर मते ऐकायला आवडेल.

पहिल्यान्दाच मराठी टायपिन्गचा प्रयत्न करत आहे. अजून अनुस्वार कसे द्यावेत हे कळलेले नाही. त्यामुळे झालेल्या शुद्धलेखनाच्या चुकान्बद्दल क्षमस्व.

सविता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनुस्वाराकरता M वापरावे. उदाहरणार्थः अं = aM

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ऐसीवर स्वागत. प्रतिसाद आवडला.

पहिल्यान्दाच मराठी टायपिन्गचा प्रयत्न करत आहे. अजून अनुस्वार कसे द्यावेत हे कळलेले नाही. त्यामुळे झालेल्या शुद्धलेखनाच्या चुकान्बद्दल क्षमस्व.

अनुस्वारासाठी कॅपिटल एम् (M) हे अक्षर वापरावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हिंदी भाषा अशाच प्रकारे मरत आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मी अजूनही माझ्या लेकीला कुठल्या माध्यमाच्या शाळेत घालायचे हे नक्की केले नाहीये.

पण एक विचार मी करते. आपल्या पालकांच्या पिढीने (निदान त्यातील बहुतांशी) पोरांना शाळेत घालताना फार काही गहन विचार केला नव्हता. शिकवायचे आहे, घराजवळ, फी परवडते, आजूबाजूचे, नात्यागोत्यातले बरेचसे जण आपली मुले इथे घालताहेत वगैरे निकष वापरून शाळा निवडल्या.

आपण शिकून नोकर्‍या शिकायला बाहेर पडेपर्यंत नुकतेच जागतिकीकरणामुळे नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध झाल्या होत्या, आणि मागणी भरपूर असल्याने आपण लगेच कुठे ना कुठे कामाला लागलो, यथावकाश स्थिरावलो.

पण आपल्या पुढची पिढी जेव्हा नोकरीसाठी बाहेर पडेल तेव्हा जागतिकीकरण ही गोष्ट जुनी झाली असेल, शिकणार्‍यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने पुरवठा सुद्धा वाढला असेल अशा वेळी त्यांना जर स्पर्धेत टिकायचे असेल तर आपण जे काही, जितके काही आणि मुख्य म्हणजे "ज्या पद्धतीने" शिकलो तेवढं पुरेल? मला नाही वाटत!

एक काळ होता (१९६० वगैरे) फक्त B.A. झाले असेल तरी उत्तम नोकरीची हमी असायची, आज माझ्याकडे काम करणार्‍या बाईचा मुलगा B.A. होऊन फुटकळ सिक्युरिटी गार्डची नोकरी करतोय.

त्यामुळे मी १५-१६ वर्षांनी काय लागेल याचा विचार करतेय.

माझा "चांगली शाळा" चा निकष. (शिक्षक आणि इतर येणारी मुले हेही आहेतच)

१. मिळणार्‍या सुविधा, त्यांचा दर्जा - यात मी पायाभूत सुविधा म्हणतेय (मी ज्या शाळेत गेले तिथले स्वच्छतागृह - हरहर - आठवले तरी अंगावर काटा येतो).
२. शिकवण्याची पद्धत - फक्त सरधोपट पोपटपंची न करता मुलांना आकलनशक्तीला वाव देणारे - अर्थात हे मी कितपत निवडू शकेल आणि भारतात असे चांगले पर्याय असतील का हे अजून माहीत नाही. एक उदाहरण देते - माझी भाची सध्या परदेशामध्ये आहे, तिथल्या पहिलीमध्ये जाते. त्यांना "अल्फाबेट" शिकवून झाल्यावर स्पेलिंग किंवा व्याकरण न शिकवता सध्या फक्त एखाद्या शब्दातले स्वर उच्चारावरून ओळखून तसे लिहायला सांगतात. (मुळात लिहीणे फारसे नसतेच, वाचन आणि आकलनावर भर) त्यामुळे तिने "आंटी" चे स्प्लेलिंग - anti असे लिहीले तर ते बरोबर असते. पुढच्या वर्षी त्यांना योग्य स्प्लेलिंग काय आणि ते तसे असण्याचे कारण अशा पद्धतीने शिकवले जाणर.

आठवा, आपल्याला इंग्रजी कसे शिकवले गेले? स्पेलिंग पाठ करा, व्याकरणाचे नियम पाठ करा. सगळे पाठ करा. अरे पण "असे का?" हे समजावून सांगायचे का?

३. पुस्तकाबाहेरचे पण समाजात वाप्रताना उपयोगी पडणारे शिक्षण सुद्धा असावे. एक सुजाण नागरिक होण्याची सुरूवात तिथे व्हावी.

अजून पण आहे पण आता टायपायचा कंटाळा आला.

हे वरचे आणि शिवाय घरापासून असणारे अंतर, मला परवडेल अशी फी असणे असे बरेच निकष आहेत.

सर्वात जास्त निकष पुर्ण करणारी शाळा निवडणार, माध्यमाने निदान प्राथमिक शिक्षणात तरी काडीचाही फरक पडत नाही असे मला वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

माझ्या मते, जी शाळा सगळ्यांना आर्थिक व मानसिक पातळीवर झेपेल अशी.
मी ज्या शाळेत शिकलो ती तरी बरेच अर्थी तशी होती.
आज मराठी माध्यामीक शाळेमध्ये आठ्वी पर्यंत परीक्षा बंद केल्यायेत "सो निदान मुले पास होणे!" हा मुद्दा बाद.

वाईला एक मराठी शाळा बघितलेली दुवा. पुण्यातपण ग्राममंगलची एक शाळा आहे.

या शाळांमध्ये जो शिकवण्याची पध्द्त आहे ती मुर्त कडुन अमुर्त (concrete to abstract) अशी आहे.ही पध्द्त मला पटते. उलट अमुर्त कडुन मुर्त गेल्यास माती/वस्तुस्थीती शी समंध तुटायची शक्यता नाकारता येत नाही.
उदा. आलेख शिकवातांना वेगवेगळी झाडं मोजुन या आणि त्याचा पाय-चार्ट बनवा.
माझा असा अंदाज आहे की या अश्या शाळेत शिकलेल्यांना मी इंटीग्रेशन/ डेरिव्हेटीव्ह का शिकलो? हा प्रश्न कधीही पडणार नाही.

वाईच्या शाळेत सगळी मुलं-मुली गरीब कष्ट्करी वर्गातील आहेत आणि सगळीच्या सगळी स्कॉलरशिप ची परीक्षा पास होतात. २-३ मेरिट.
२-३ चे विद्यार्थी ज्या कविता करतात त्या वाचुन ऐसीकरांना देखिल कॉप्लेक्स यावा अश्या. व्यक्तीस्वातंत्र/ओपनकल्चर इतकं की मी तिकडे माझा आवडता प्राणी गाढव हा निबंध पण वाचला, सगळे निंबध नोटीस बोर्ड वर पोस्ट केले जातात.
परत कधी गेलोच तर असं काही पोस्ट करतो ऐसीवर. इंग्रजी पण विद्यार्थांना व्यवस्थीत जमते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'प्रयोगशील मराठी शाळा'?

ही कुठे आहे आणि कशी आहे? नाव वेगळंच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे अगदी पटलं. पण बिगर-इंग्रजी माध्यमाची शिक्षणपद्धतीच न्यूनगंडावर उभारलेली आहे - कृत्रिम परिभाषा असो, इंग्रजी अभ्यासक्रमाच्या साच्यात वर्नॅक्युलर मसाला भरणे असो, किंवा दैनंदिन वातावरणात कायम तथाकथित आदर्श आणि आकर्षक इंग्रजी माध्यमाशी तुलना असो. सार्वजनिक शिक्षणाची कल्पना भारतात आल्यापासून हेच चालू आहे कारण अँग्लो-वर्नॅक्युलर शिक्षणपद्धतीच या उतरंडीवर उभारलेली आहे.

माझ्या (बोर्डिंग) शाळेत दोन्ही माध्यमं होती - १-१०वी इंग्रजी, आणि ८-१०वी मराठी माध्यम. आधीच बोर्डिंग म्हटल्यावर पैशाचा, वर्गवर्चस्वाचा देखावा असायचाच, पण मराठी माध्यमातील मुलांना "वर्नॅक्स", "घाटी" म्हणून फारच छळलं जायचं. बोर्डिंग्मधे असलेल्या अगदी पैसेवाल्यांनाही हे ऐकावं लागायचं; आसपासच्या गावातून आलेल्या डे-स्कॉलर्सची अवस्था तर जाऊच द्या. आता शाळेत दोन माध्यमं टिकून आहेत की नाही कोण जाणे, पण ठरवून बोर्डिंगला लांब मराठी माध्यमात शिकायला आपल्या मुलांना आता कोणी पाठवत असेल असं वाटत नाही.

आम्ही इथल्या अशाच दोन्ही माध्यमं असलेल्या एका शाळेबद्दल चौकशी केली. एका कोलीग ने सांगितले, की मास्तरच बंगाली माध्यमाच्या मुलांना "तुम्ही ढ आहात, तुमचे पुढे काही होणार नाही कारण तुम्ही इथे आडकला आहात, इंग्रजी माध्यमात तुम्हाला चान्स नाही" असे सारखे सांगून हिणवत होते. शाळा एरवी मात्र काँवेंट विरुद्ध "राष्ट्रीय" "भारतीय" "बंगाली" मूल्ये जपणारी म्हणून नावाजलेली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्लीज लिही याबद्दल. हा सॉलिड रोचक विषय आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पेप्रातून अशा मिळतात वाचायला कधीमधी.
पण त्या आपल्या आसपास कधीच नसतात.
मुद्दा पुन्हा सिद्ध होतो.
"ही बघा, ही मराठी शाळा चांगली आहे.(कींवा निदान वाईट नाही)" असे वेगळे सांगावे लागते.
आसपासच्या जितकय मराठी शाळा असतात त्या बाय डिफॉल्ट गंडलेल्या असतात असे आता वाटायला लगले आहे.
(हा पहिल्यांदा मला धक्का होता. अगदि अलिकडपर्यंत असे काही असते ह्याचा मला पत्ता नव्हता.
खुद्द माझ्या शाळेची ब्यांड वाजलेली पाहिल्यावर तर चक्कर आली.)
बाकी जातीयवादी वगैरे आरोप अस्ले तर ते चुकीचे आहेत हे संगू इच्छितो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

जग पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या तुकड्यांत वाटलेले होते आणि अशा तुकड्यांचा एकमेकांशी क्वचितच संपर्क येत असे. जितका संपर्क येई, त्यात संवाद साधण्यासाठी भाषांतरकार असत आणि सामान्य जनतेला या परक्या मुलकाच्या भाषांशी काही देणे घेणे नसे. हळू हळू संस्कृतींचा संपर्क वाढला आणि तात्कालिक वा कायमचे स्थलांतरण वाढले. त्यातून भाषांची, शब्दांची देवाणघेवाण झाली आणी त्यांचे स्वरुप बदलू लागले. परंतु तरीही भाषेचा ढाचा बदलण्याची गरज भासली नाही. उदा. भारतभरात वाक्यरचना एकच प्रकारे होते. अलिकडे ज्या भाषांचा ढाचाच प्रचंड प्रमाणात वेगळा आहे त्यांचा संबंध जगातल्या सर्व भाषांशी जोरकसपणे आला. यामुळे बोली, शालेय, प्रशासकीय स्तरावर या परकीय भाषांचा प्रभाव दिसू लागला. रोजगाराच्या संधी, सामाजिक प्रतिष्ठा, आंतरजालाचा वापर, इअतर जगाशी संपर्क यांमुळे या भाषांचे महत्त्व वाढले.
आता जगातल्या सगळ्याच भाषा एकमेकींशी ढवळल्या जात आहेत. आजमितिला तरी जागतिक ज्ञान जगण्यासाठी आवश्यक बाब नाही. परंतु उद्या प्रत्येकाला जगाच्या प्रत्येक कोपर्‍यातून स्रवणार्‍या ज्ञानाची गरज अगदी सामान्य जीवन जगायला देखिल असेल. यावेळी या भाषांतरकारांवर अवलंबून राहणे हळूहळू कमी होईल. या वेळी शिक्षणाची, व्यापाराची, प्रशासनाची, मनोरंजनाची एक सामान्य भाषा प्रत्येकाला शिकावी लागेल. ही भाषा आकार घेत असताना स्थानिक भाषा हळूहळू एकेका वतुळातून हद्दपार होतील. त्यांना पोसायचा खर्च आणि कष्ट कोणालाही नको असेल. हवा, पाणी फुकट असतात तशी भाषा फुकट असते असे प्रत्येकाला वाटते पण तसे नाही. या हिशेबाने सर्व भारतीय भाषांना भारतीय पुरातत्व खात्याच्या हवाली केले जाईल असा अंदाज आहे. केवळ भारत जर एक प्रबल प्रकारची महासत्ता, तीही प्रत्येक क्षेत्रात बनून दीर्घकाल टिकला तर याला अपवाद होइल.
कितीही नाही म्हटले तर भाषा हे एक साधन आहे. एका प्रकारच्या साधनापेक्षा प्रबल असे दुसरे साधन उपलब्ध झाले तर कमजोर साधनाचा त्याग होणारच. हा त्याग श्रीमंत, शिक्षित लोकांत अगोदर होणार आणि सामान्य लोक नंतर त्याची री ओढणार. या हिशेबाने मराठी बोलणारांचा टक्का थेट कमी होणार. मराठी लिहिणारांचा टक्का प्रथम वाढणार कारण अशिक्षितांना प्रथम शिक्षण याच भाषेत उपलब्ध होणार आहे. मग हळूहळू हे दोन्ही कमी होणार. हळूहळू मराठी पातळ होणार आणि नंतर नष्ट होणार. मराठीच्या इतर बोली भाषांना जर स्वतंत्र भाषा मानले तर हे पातळ होणे प्रकर्षाने जाणवेल, आत्ताच.
अर्थात या सगळ्या घटनांचा कालखंड प्रदीर्घ असणार. १००% साक्षरता -अजून २५ वर्षे. शिक्षणाचा दर्जा (मराठीतच) उत्तम अशी साक्षरता - अजून ५० वर्षे. सगळेच लोक इंग्रजी जाणू लागणार - अजून ५० वर्षे. प्रत्येकाला नेटीव इंग्रजी येणार, पण मराठी घरात, बाजारत, पाहुण्यांत, इ - अजून ५० वर्षे, मराठीचा वापर कमी कमी होत अस्त - अजून १०० वर्षे. एकूण २७५ वर्षे. पण या काळात जागतिकारणाचा वेग काही कारणाने बंद झाला तर असे काही होणार नाही. याउलट उपजिविका आणि इंग्रजीचे ज्ञान यांचे कोरिलेशन जबरदस्त स्ट्राँग झाले तर ही टाईमफ्रेम संकुचित होईल.

(Numbers are intuitional.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पण मराठी माध्यमातील मुलांना "वर्नॅक्स", "घाटी" म्हणून फारच छळलं जायचं.

मास्तरच बंगाली माध्यमाच्या मुलांना "तुम्ही ढ आहात, तुमचे पुढे काही होणार नाही कारण तुम्ही इथे आडकला आहात, इंग्रजी माध्यमात तुम्हाला चान्स नाही" असे सारखे सांगून हिणवत होते.

असे अनुभव माझ्यासकट अनेकांचे आहेत. ही कसली पराभूत मनोवृत्ती आहे देव जाणे. सुदैवाने अकरावी सायन्सला आल्यावर सुरुवातीच्या ५-६ महिन्यांत हे सगळे ईव्हन आऊट झाले. नंतरही असेच जर होत असेल तर मग इतका आरडाओरडा कशाला काय माहिती.

दहावीला माझ्या वर्गात मी धरून ६० जण होते. सर्वजण शुद्ध मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेले. विशेष अडचण कुणालाच आली नाही इंग्रजीची. साली एक भाषा तर शिकायची आहे, किती बाऊ करावा हैट्ट आहे खरीच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

+१

शिवाय यातीलच अनेकजण मातृभाषेतील शिक्षणाचा पुरस्कारही मात्र तावातावाने करतात. मात्र वेळ आली की इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वाट धरतात. त्यात चुकीचे काही नाही फक्त एक निरीक्षण मांडले.

हाच मुद्दा जवळपास ह्याच शब्दांत काही ऐसीकर मित्रांशी वॉट्सॅपवर बोलताना मांडला होता.
बादवे, भाषावगैरे बद्दल वाद घालण्यात मला काहीही इंटारेस्ट नाही; पण शळा-माध्यम ह्याबद्द्दलची अधिकाधिक माहिती मिलववी, मांडावी म्हणोन धाग्यावर येत आहे.
तो दैनंदिन आयुष्याशी निगडित प्रश्न वाटतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

२-३ चे विद्यार्थी म्ह्न्जे दुसरी-तिसरीचे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मित्रा, या प्रतिसादासाठी तुझे आभार, खरतर तु यावर अजुन लिहावेस, हव तर याच प्रतिसादाचा एक नविन धागा काढ.

माझ्या शाळेचा अजुन एक किस्सा- अगदी खोटा वाटावा असा,
अमरावती मधिल माझी शाळा न्यु हायस्कुल बेलपुरा (नगर-पलिका छाप ),ही १-२ शिक्षक सोडल्यास सगळेच जातीवंत ब्राम्हण,यांनी बॅकलॉग भरलेलाच नव्ह्ता. मी अडॅमिशन घेतली तेव्हा पर्यंत शाळा बरी होती(दरवर्षी १ मेरीट इ.) अचानक एक महार शिक्षीका मुख्याध्यापिका म्हणुन आल्यात. आपल्या'वर' एक महार एकाही सर्वणाला खपलं नाही. यांना कदाचित एखादा मागासवर्गीय चालला असता पण जयभिमवाल्याची किळसच.

आधी शाळेत आमच्या शिक्षीकांचीही मुले शिकायची त्यांनी त्याची ट्रान्सफर दुसरीकडे केली.अक्षरक्षः बर्याच शिक्षीकांनी विद्यार्थांना शिकवणं सोडलं, आणी मग अवकळा काय पुसता? आजही कधी-कधी मी त्या शाळेत का शिकलो याचं वाइट वाटतं.
नविन तीन शिक्षकांची भरती झाली, ती पण ब्राम्हणच खुप मनं लावुन शिकवायची त्याच्यामुळे आम्ही थोडं तरलो. पण त्याचं जास्त काही सिनियर्र पुढे टिकलं नाही. तेव्हा हे उमगत नव्हतं आज विचार केल्यावर ह्यासगळ्याचा अर्थ लागतो.

दोन वर्षापुर्वी शाळेत जाउन आलो, विद्यार्थ्याशी बोलावं म्हनुन गेलेलो. पण सर म्हणाले "ह्या यांच्याशी काय बोलणार?" रडावस वाटत होत? याशाळेत आज मागसवर्गीय पण अ‍ॅड्मिशन घेत नाहीत.

या शाळेचा 'गट ब' चा मी दहावीचा टॉपर गुण ६९ टक्के. दरवर्षी १ तरी मेरीट ते टॉपर गुण ६९ टक्के काय भारी प्रवास आहे ना? त्यानंतर आजवर एकही मेरीट नाही.

सगळ्याच संस्थेमध्ये आपाआपल्या जातीची लोकांची भरती हाच प्रघात आहे, पण विद्यार्थांना शिकवणं सोडणं अगदी घ्रुणास्पद आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लिहायला हरकत नाहि रे, पण उगाचच स्वतःलाच त्रास होतो. एकुणच अस्मितांची घुसखोरी इतकी अफुसारखी असते की त्याच्या आवरणाखालच्या व्यक्तीला/समुहाला मोठी भुरळ पाडते. शेवटी शिक्षकही त्याच समाजाचे भाग असतात हेच खरे.

ब्राह्मण समाज एकेकाळी शिक्षणक्षेत्रात शिरला तो काही समाजकार्यवगैरेसाठी नव्हते तर तो पोटापाण्याचा व्यवसाय होता. त्यातील काही जण आत्मीयतेने शिकवत असत तरी बाकी बहुतांश पाट्याच टाकत. मात्र ८०-९०च्या दशकांत एकुणच समाजाच्या मानसिकतेत झालेला कोता बदल विदीर्ण करणारा आहे. नव्या सहस्त्रकांत तर व्यक्तीकेंद्रीत समाजामुळे एकमेकांशी बोलणे, समाजाभिसरण अधिकच मंदावत आहे. एक समाज असा भोवती आहे ज्याला या सगळ्याची कल्पनाही नाहीये. माझ्या हाफीसातील अनेकांना याची कल्पनाही नाहीये की ते किती वर्गवादी आहेत. त्यांच्यासोबत बाहेर चाराठ तास काढल्यावर काही वेळाने ते मोकळे झाल्यावर त्यांची एकूणच सामाजिक मते ऐकून शिसारी येऊ लागते.

तु दिलेला किस्सा दुर्दैवी तर आहेच, अतिशय वेदनादायी आहे - फक्त अधिक दुर्दैव हे की धक्कादायक नाही Sad

"आरक्षणाने सगळी बोंब केली आहे. आरक्षण नसतं ना मग कळलं असतं यांना, चार जणांनाही नोकर्‍या टिकवता आल्या नसत्या. आरक्षण आहे म्हणून गमजा करताहेत, नाहितर लायकी आहे का त्यांची" वगैरे वाक्य बोलणार्‍या तथाकथित उच्चभ्रु नी "सभ्य" व्यक्तींना आपल्या बोलण्यातील घृणास्पद परंतू आरक्षणाचे महत्त्वच अधोरेखीत करणारा ढळढळीत विरोधाभास कळतही नाही - किंवा तो कळून घ्यायचा नसतो! Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रतिसादाबद्दल आभार आणि ऐसीवर स्वागत Smile

शाळा/ माध्यम आणि इन्ग्रजी बोलण्याची क्षमता यातील परस्परसम्बन्ध इतका सरळ नसावा असे मानायला जागा आहे.

सहमत आहे. शेवटी माध्यम हे "माध्यम" असते. माहिती पोचवायचे मिडीयम असते. ते अधिक कठीण वा मुलाच्या स्वाभाविक विचारभाषेत न ठेवल्याने मिळणारे ज्ञान किती रुजेल हे समजणे-ठरवणे कठीण आहे.

तरी अमेरिकन/ ब्रिटिश टीव्ही व पॉप सन्गीता मधे माझ्या उपरोल्लेखीत सहकार्‍यान्इतकी रुची आणि व्यासन्ग मला कमवता आलेला नाही.

हा अनुभव मलाही आहे. मात्र तो सवयीचा/वातावरणाचा परिणाम असावा.
या वाक्यामुळे एक अवांतर-समांतर आठवले:
पुलंनी न्यूजर्सीला एक (बहुदा ७६ साली) भाषण केले होते ते मी एकदा कुठेतरी ऐकले होते, त्यात त्यांनी एक सांगितले होते त्याचा माझ्या आठवणीतल्या शब्दांत मांडतो आहे. पुलंचे शब्द अर्थातच वेगळे होते. "महाराष्ट्रातल्या अगदी लहान मुलांना इंग्रजी शिकवायचा आणि अमेरिकेतल्या तुमच्या मुलांना मराठी शिकवायचा धोशा लावणे त्यांना मुळातून उखडण्यासारखे असते. भाषा ही नुसती भाषा नसते तर ती आपल्याबरोबर एक स्वभाव-संस्कृती-सवयी घेऊन येते. प्राथमिक स्तरावर यात झालेला बदल तुमचा स्व-भाव बदलून टाकतो. जर तुमची प्राथमिक भाषा इंग्रजी आहे तर मुले आपोआप पॉप संगीताकडे वळणार, त्यात गैर वा वाईट काहीच नाही."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्यातील काही जण आत्मीयतेने शिकवत असत तरी बाकी बहुतांश पाट्याच टाकत.

हे तुमचं निरिक्षण आहे का? का हे 'पूर्वी ९९% लोक सुखी असत' या छापाचं विधान आहे.

मात्र ८०-९०च्या दशकांत एकुणच समाजाच्या मानसिकतेत झालेला कोता बदल विदीर्ण करणारा आहे.

हे का झालं असावं? त्या दशकात असं काय झालं की हा तथाकथित 'कोता' बदल झाला असावा? त्या आधी , स्वातंत्र्य मिळाल्यावर ३०-४० वर्षांमध्ये का नाही झालं काही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हे का झालं असावं? त्या दशकात असं काय झालं की हा तथाकथित 'कोता' बदल झाला असावा? त्या आधी , स्वातंत्र्य मिळाल्यावर ३०-४० वर्षांमध्ये का नाही झालं काही?

ऋषिकेश त्याचा मुद्दा स्वतंत्रपणे मांडेलच.

माझी आई ठाण्यातल्या एका अनुदानित शाळेत सुपरवायझर म्हणून लागली. पुढे (उप)मुख्याध्यापिकाही झाली. ८० च्या दशकाच्या शेवटी शाळेतले जुने शिक्षक सेवानिवृत्त व्हायला लागले. तोपर्यंत 'बॅकलॉग' बराच होता, म्हणजे आरक्षित जागा भरलेल्या नसणं. आधी लोक मिळाले नसतील किंवा आरक्षणाचा सरकारी निर्णय आधीच्या तारखेपासून लागू झाला असेल. हे तपशील मला माहित नाहीत. पण जसजशा नव्या जागा झाल्या, तशा त्या आरक्षितच झाल्या, कारण बॅकलॉग. त्यामुळे अनुदानित शाळांमधे जरा बऱ्या प्रमाणात आडनावांमधली विविधता दिसायला लागली. ठाण्यातल्या बऱ्याच शाळांमधे हे होतंय, अशा गप्पा घरी कानावर पडत असत. माझ्या आठवणीत नव्वदीच्या सुरूवातीला, "आनी-पानी" शिक्षकांबद्दल ओरड, ठराविक विषय शिकवणारे (संस्कृत) शिक्षक आरक्षित जातींमधून मिळतच नाहीत, मग जे (अनारक्षित) मिळतात ते अपुऱ्या पगारामुळे त्रासतात आणि/किंवा टिकत नाहीत अशा प्रकारच्या तक्रारी कानावर यायला लागल्या.

(ठाण्यातल्या मराठी माध्यमाच्या, अनुदानित शाळांचा, एक शाळासमूह होता/असेल. या शाळांमधे परीक्षा, चाचणी, सहामाहीचा सिलॅबस ठरवणं वगैरे कामं एकत्रिरित्या व्हायची. त्यामुळे या शिक्षकांचा आपसात संपर्क होता. त्यामुळे या शाळांमधली खबर बऱ्याच लोकांना होती.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुमचं निरिक्षण आहे का? का हे 'पूर्वी ९९% लोक सुखी असत' या छापाचं विधान आहे.

हे निरीक्षण आहे. अगदी जवळून केलेलं. माझी आई स्वतः शिक्षिका होती. एकूणच शिक्षक, त्यांचे 'शिक्षक' या रोलमधून बाहेर आल्यावरचे विचार, बोलणे अगदी जवळून बघितले आहे. त्यापैकी चांगले शिकवणारे शिक्षक होते, पण ते ब्राह्मण किंवा उच्चजातीतील होते म्हणून ते चांगले शिकवत नसत. दे वेअर जस्ट गुड टिचर्स. बाकीच्या बहुतांश (नक्की टक्केवारी सांगता येणार नाही पण संख्येने बरेच अधिक) शिक्षकांची जमात ही पाट्या टाकणार्‍यांचीच होती इर्रेस्पेक्टिव्ह ऑफ जात/वर्ग.

हे का झालं असावं? त्या दशकात असं काय झालं की हा तथाकथित 'कोता' बदल झाला असावा? त्या आधी , स्वातंत्र्य मिळाल्यावर ३०-४० वर्षांमध्ये का नाही झालं काही?

वर अदितीने दिलेलं कारण योग्यच आहे, पनाशीच्या दशकांत आरक्षण आलं. ते पुढिल एखाद दशकांत टार्गेट गटापर्यंत पोचलं, मग त्यापुढिल पिढीने शिकायला सुरूवात केली व ८०-९०मध्ये हा "बॅकलॉग" भरायला सुशिक्षित व्यक्ती मिळु लागल्या.
त्यांची भाषा प्रमाण नसेलही पण ते काही चुकीचे शिकवत किंवा आधीच्या शिक्षकांपेक्षा (अगदी माझ्या आईपेक्षाही) एकुणात अधिक चांगले / अधिक वाईट होते असे तेव्हाही वाटले नाही, आजही वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझ्या घरात किमान १० शिक्षक होते. स्वतः आई आणि वडील दोघेही अनेक शिक्षण संस्थांशी निगडीत होते. घरात साधारण १९९० नंतर ब्राह्मण सोडून अनेक शिक्षक येत असत. ह्यातले बरेच लोक शिकण्यासाठी येत पण काही काही लोक आता आमची वेळ आहे आणि आह्माला आमचे हक्क मिळालेच पाहिजेत ह्या वृत्तीचे होते. आई जेंव्हा २००१ ला निवृत्त झाली तोपर्यंत ८०% आरक्षित जागांवरचे लोक होते. त्यातले किमान ६०% लोक फक्त पगार घ्यायला येत. हे में फक्त आईच्या तोंडून नाहीतर अगदी शाळेतला शिपाई आणि आरक्षित जागेवरल्या सुपरवायझर ह्यांच्या मुखातून आईकले आहे. दुसरा मुद्दा अनि-पानी वाल्यांना विरोध होताच पण त्यांनी घेतलेले निर्णय नी त्यांनी सत्ता मिळाल्यावर मुद्दामहून बाकीच्या छळणे ह्या प्रकारामुळे बऱ्याच ब्राह्मण आणि अगदी काही मराठा लोकांनी पण नोकरी सोडून चक्क क्लासेस चालू केल्याचे पहिले आहे. काही फक्त २० वर्षे सर्विस होण्याची वाट पाहत बसले आणि एक दिवस झाल्या झाल्या राजीनामा फेकून लावा आता काय वाट लावायची आहे संस्थेची असे म्हणून बाहेर पडले आहेत. तेंव्हा नविन बदल जे झाले त्यामुळे स्वतः शिक्षकांचे कसे व्यक्तिगत जीवन बदलले हे स्वतः मी पहिले आहे. उरफाटे निर्णय घेवून सगळ्यांचे नुकसान होते आहे हे पण कळत नव्हते. बर ह्याच नविन शिक्षकांची मुले पण त्या शाळेत ते स्वतः घालत नाहीत. म्हणजे त्यांना स्वतःलाच खात्री नाहीये. तेंव्हा सगळा दोष सरधोपटपणे ब्राहमण लोकांना देणे फार सोयीस्कर आणि वरवरचे विवेचन झाले.

पण हेही खरेच आहे की सुरवातीला सगळ्यांनी राखीव जागा भरायला चांगलाच विरोध केला आणि तो सगळा बैक्लोग एकदम भरावा लागला. त्यामुळे एका फार कमी कालावधीत कामाच्या वातावरणात अमुलाग्र बदल झाला. आणि तो पचवणे कठीण आहे. इथे सध्या ज्या कंपनी मध्ये आहे तिथे ऑरकल सोडून एसएपी वापरायला लागल्यावर ९०% लोक बोम्ब मारताना दिसतात. त्यात भले भले नोकरी सोडून गेले कारण रोजच्या काम करण्याच्या सवयीत बदल. इथे तुलना करणे तसे चुकीचे आहे पण मुद्दा कामाच्या स्वरुपात झालेले बदल, निर्णय घेण्याची आणि दुसऱ्यांनी घेतलेले निर्णय राबवाण्यावरून होणारा आणि येणारा ताण ह्यामुळे काही शिक्षक सोडून गेले आणि जे राहिले त्यांना दुसरा काही मार्गच नव्हता म्हणून राहिले असे मला तरी वाटते.

आणि माझे तर स्पष्ट मत आहे की ह्याच मुळे निदान पुण्यात तरी इंग्रजी शाळांचे स्तोम वाढले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे निरीक्षण आहे. अगदी जवळून केलेलं. माझी आई स्वतः शिक्षिका होती. एकूणच शिक्षक, त्यांचे 'शिक्षक' या रोलमधून बाहेर आल्यावरचे विचार, बोलणे अगदी जवळून बघितले आहे. त्यापैकी चांगले शिकवणारे शिक्षक होते, पण ते ब्राह्मण किंवा उच्चजातीतील होते म्हणून ते चांगले शिकवत नसत. दे वेअर जस्ट गुड टिचर्स. बाकीच्या बहुतांश (नक्की टक्केवारी सांगता येणार नाही पण संख्येने बरेच अधिक) शिक्षकांची जमात ही पाट्या टाकणार्‍यांचीच होती इर्रेस्पेक्टिव्ह ऑफ जात/वर्ग.>>>

एकदम बरोबर. आमच्या शाळेत काही अस्सल पुणेरी शिक्षक होते की जे फक्त पोरांना लाथा घालणे आणि मुद्दामहून टोचून बोलणे ह्यापलीकडे काहीही करत नसत. उलट स्वतः क्लास घेवून जे ह्यांच्या क्लासला आले नाहीत त्यांना उगाचच कमी मार्क देणे वगैरे प्रकार करत असत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थोडे तुटक लिहिते आहे, त्यासाठी आधीच क्षमा मागते.
एक संशोधन प्रकल्प मी पूर्वी केला होता : महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणाचे प्रयोग. त्यावेळी मराठी माध्यमाच्या व इतर ( इंग्लीश, हिंदी, उर्दू या तीन प्रामुख्याने इतर मध्ये येतील ) पाहिल्या होत्या. प्रायोगिक शाळांमध्ये 'प्रयोग' गृहीत धरल्याने काही चुका होणे, त्या पुढच्या खेपेला दुरुस्त होणे, असे होत होत पुष्कळ चांगले काम होताना दिसले. या विषयावर पुढच्या काळात अनेक पुस्तकंही मराठीत आली. या पुस्तकांचा वापर इतर अनेक शाळांनी केला. संख्या तुलनेत कमी असली तरी हे दुर्लक्ष करण्याजोगे नाही.
ठरवून / आखून काही गोष्टी करता येतात, त्या केल्या तर चांगले परिणाम दिसू शकतात. शालेय शिक्षण संपल्यानंतरचं महाविद्यालयीन शिक्षण देखील मी मराठी माध्यमात घेतलं आहे. कलाशाखेत समाजशास्त्र, अर्थशास्त्र व मराठी साहित्य हे तीन विषय मी निवडले होते. इतरही अनेक विषय मराठीतून शिकता येत होते व अभ्यासक्रमाची सर्व पुस्तकं आवर्जून मराठीतून लिहिली गेलेली होती. मोठ्या संख्येने कला व वाणिज्य शाखांमधले विद्यार्थी आजही मराठी माध्यमातून शिकत आहेत. अधिक व अवांतर वाचनासाठी आम्हांला इंग्लीश पुस्तकांची यादी दिली जाई.
आजोबांचे शिक्षण मराठवाडा तेव्हा निजामाच्या हद्दीत येत असल्याने उर्दू माध्यमात झालं होतं व वडिलांचंही दुसरीपर्यंत उर्दू माध्यमच होतं, नंतर मराठी शाळा उपलब्ध झाल्या. उर्दूत इंजिनिअरिंग व मेडिकल अशा शाखांचीही पुस्तकं त्या काळात उपलब्ध करून दिली गेली होती व सर्वच शाखांमध्ये विद्यार्थी उर्दूतून शिकू शकत. हे त्या काळात निजामाला शक्य झालं होतं, तर आज आपल्याला अशक्य का व्हावं, असा प्रश्न आजोबा विचारत.
त्यामुळे इथं परब म्हणताहेत हे भाबडं आहे असं मला वाटत नाही.
मी चित्रकलेचं शिक्षण घेतलं तेव्हा तिथंही ( बीएफए करताना ) मराठी माध्यमाचा पर्याय उपलब्ध होता, आजही आहे. ( कलेचा इतिहास, सौंदर्यशास्त्र या विषयांचे पेपर 'लिहावे' लागतात.)
वरील चर्चा वाचताना अजून काही गोष्टी मनात आल्या.
१. शि़क्षणाचा दर्जा जर घसरलेला आहे तर तो सर्वच माध्यमांमध्ये घसरलेला आहे. फक्त मराठी नव्हे.
२. मोलकरणी इत्यादींची मुलं आता मोठ्या प्रमाणात इंग्लीश माध्यमांच्या शाळांमध्येही जातात, केवळ मराठी माध्यमाच्या नव्हे.
३. मराठी माध्यमाच्या शाळांचे 'निकाल' इंग्लीश माध्यमाच्या शाळांहून चांगले आहेत. विशेषकरून दरवर्षीची दहावीची मेरीट लिस्ट पाहिली तर मराठी माध्यमाची मुलं बहुसंख्य आढळतात.
४. 'चांगल्या शाळा' मोजक्या असल्या तरी तिथं विद्यार्थ्यांची गर्दी असते व प्रवेश मिळण्याची मारामार... हे वसईतल्या शाळांचंही दृश्य आहे. मराठी माध्यमाच्या उत्तम शाळा इथं आहेत आणि कॉन्व्हेंटही.
५. दैनंदिन वापरातील बोलीभाषा आजही मोठ्या संख्येने घरांमधून, परिसरात बोलल्या जातात. या बोलींमधून लेखनही होत असतं... फक्त ते नीट 'पोचत' नाही अशी अडचण आहे. त्याची कारणं अजून वेगळी आहेत.
६. मराठीत प्रकाशित होणारी दैनिकं, साप्ताहिकं, मासिकं, दिवाळी अंक, पुस्तकं यांची संख्या वाढतेच आहे. प्रकाशकांची संख्याही फुगते आहे दरसाल. अनुवादित पुस्तकांची संख्या तर पूर्वी कधीच नव्हती इतकी वाढली आहे. वाचकही भरपूर आहेत. वाचकांच्या पत्रांवरून ( अनेक लेखकांच्या अनुभवानुसार ) ग्रामीण भाग व लहान शहरं इथले वाचक अधिक आहेत. वृत्तपत्रांमधून लेखन केल्यावर जाणवतं की अनेक लहान गावांची नावंही माहीत नसतात तिथून आजकाल मोठ्या संख्येने इमेल्स येत असतात. रडावं अशी परिस्थिती असती, तर ही कोणतीच संख्या वाढलेली दिसली नसती. पुस्तकं खपत नाहीत असं कुणी प्रकाशक सांगत असतील तर ते तद्दन खोटं असतं. ( फारतर त्यांना मार्केटिंग जमलं नाही किंवा अंदाज चुकला अशी शक्यता असते, हे नवीन लोकांबाबत होतं. पण ते कुठल्याही व्यवसायात होतं.) अन्यथा प्रकाशकांचे बंगले उठले नसते व चारचार गाड्या, फर्महाऊस इत्यादी झालं नसतं... आणि पुढचा काळ ते व्यवसाय करत राहिलेही नसते. ( लेखकांना फारसे पैसे मिळत नाहीत, कारण लेखक वाजवून पैसे मागत नाहीत आणि पुरेसे कष्ट घेऊन लिहीतही नाहीत... तो स्वतंत्र विषय आहे.)
७. अनेकजागी आता 'व्यावसायिक मराठी'चे वर्ग सुरू झाले आहे. व्यवहारात मराठीचा वापर ज्या क्षेत्रांमध्ये होतो, तिथं तो कसा करावा हे शिकवलं जाण्यास ( उशिरा का होईना ) सुरुवात झाली आहे. आर्थिक दृष्ट्या खालच्या स्तरातील जो वर्ग हळूहळू शिक्षणाकडे वळतो आहे त्यांना मराठी माध्यमच आजही सोयीचं वाटतं आहे. ( आदिवासींना अद्याप तेही अवघड जातंय ). इंग्लीश माध्यमात शिकवणारेही मराठीचा, त्यातही बोलीभाषांचा वापर करून शिकवतात सरसकट... ( याचे नमुने नेमाडेंच्या कादंबर्‍यांमध्ये दिसतील.) हे जुनंच चित्र आहे.
८. व्यावसायिकांना व नोकरदारांना बहुतेक जागी दोन्ही भाषा वापरून व्यवहार करावे लागतात. उदा. डॉक्टरला रुग्णाशी बोलताना मराठीतच सगळं समजावून सांगावं लागतं, त्यामुळे स्थानिक भाषा त्याला येणं गरजेचंच ठरतं व झक्कत शिकावं लागतं. हेच चित्र बँकेत, अनेक कार्यालयांमध्ये, कोर्टात कैक जागी दिसतं. ( आमच्या भागातले मराठी भाषिक नसलेले अनेक लोक कैक फॉर्म भरून घेण्यासाठी माझ्याकडे येत असतात, तेव्हा हे ध्यानात येतं. उदा. मृत्यूचा दाखला.)
९. वाचनालयांबाबतही एक निरीक्षण आहे. ज्यांनी आपल्या कार्यपद्धती काळानुरूप केल्यात त्यांना चांगला प्रतिसाद आहे. उदा. फिरती वाचनालये उत्तम चालतात. फोन वा इमेलद्वारे हवी ती पुस्तकं नोंदवून घरी वा कार्यालयात मागवून घेण्याची ( व परत करण्याची ) व्यवस्था आता अनेक वाचनालयांनी सुरू केली आहे, तीही खूप चांगली चालली आहेत. वाचनालयांत काही पुस्तकांच्या आठ-दहा प्रतीही घेतल्या जातात आणि प्रतीक्षायादीत वाचक सहा-सहा महिने थांबतात, हेही चित्र आहे. दिवाळीअंक, मासिकं यांसाठीही लोक वाचनालयांचाच आसरा घेतात. ज्या वाचनालयांनी अभ्यासिका, इंटरनेट, झेरॉक्स, स्कॅनिंग अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत तिथं तरुणांचीही पुष्कळ गर्दी असते.
१०. महानगरांचं चित्र निराळं आहे; पण लहान शहरं व गावांमध्ये व्याख्यानमालांना शेकडोंची गर्दी असते, हे मी अनुभवलेले आहे. संगमनेरची दहा दिवसांची अनंत फंदी व्याख्यानमाला तर तिकीट लावून होते व मैदान खच्चून भरलेले असते... तेही प्रचंड थंडी असताना. सोलापूर, अंबेजोगाई, लासलगाव, जामखेड ही अजून सहज आठवलेली काही गावांची नावं. इथल्या काही कार्यक्रमांचं थेट लोकल केबलने टीव्हीवर प्रसारण होतं. थिएटर गच्च भरून बाहेर तीन-तीन स्क्रीन लोकांसाठी लावलेले असतात. अंबेजोगाईला तर दोन मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद करून थिएटर बाहेरच्या रस्त्यांवर खुर्च्या मांडल्या होत्या व जागेअभावी थिएटरमध्ये न मावलेले लोक असे बाहेरून व्याख्यान ऐकत होते, असा अनुभव आहे. आणि व्याख्यानं म्हणजे काही निव्वळ मनोरंजन नसतं, तरीही भूक असते लोकांची बुद्धीरंजनाचीही... हे अशा जागी जाणवतं. ( अर्थात बोलणं पटलं नाही तर घोळक्या घोळक्यांनी लोक उठून जाऊ शकतात, ही जोखीम असतेच.) जालन्याच्या एका व्याख्यानानंतरचा अनुभव तर असा होता की व्याख्यानाच्या शेकडो सीडीज लोकांनी कॉपी करून नेल्या... ( अर्थात वक्त्यांची रीतसर परवानगी घेऊन.)
अशी पुष्कळ सुटी निरीक्षणं आहेत... जी सांगतात की चित्र फार विदारक इत्यादी नाहीये. पण ते चांगलं बनवायचं असेल तर जाणीवपूर्वक प्रयत्न करायलाच हवेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

बहुजन समाजाच्या शिक्षकांची संख्या वाढल्याने अभिजन वर्ग इंग्रजी माध्यमाकडे वळला व त्यामुळे भाषेचे/मराठी शाळांचे मरण ओढावले असे अनेक प्रतिसादातून जाणवले, ह्याचा अर्थ शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेला बहुजन समाज भाषा/शाळा टिकवण्यासाठी असमर्थ आहे असा पण निघतो आहे.

शालेय अभ्यासक्रम अभिजन वर्गाच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना अधिक पूरक होता त्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या नंतरच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे निकाल कमी लागणे स्वाभाविक होते, त्याचा परिणाम म्हणून अशा संस्थांमधे भविष्यातील उत्तम संधीबद्दल जागरूक असणार्‍या शिक्षक आणि विद्यार्थ्यांची आवक कमी झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अजून एक मुद्दा उच्चारांबाबत.
माझे स्वत:चे अनेक उच्चार चुकतात. ( काही उच्चार करता येत नाहीत असं म्हणणं अधिक योग्य राहील.)
उदा. सगळ्यांना सहज ओळखू येणारा न / ण चा उच्चार. याहून इतर उच्चारांकडे कुणीच फारसं लक्ष देत नाही; पण श / ष, रु / ऋ इत्यादी उच्चारही अनेकांचे चुकतात. ज्या अक्षरांचे अनेक उच्चार असतात तिथंही ( ज, च, फ इत्यादी ) खूप जणांच्या चुका होतात. बाकीही बर्‍याच गडबडी आहेत, ज्या का होतात हे आम्ही भाषाशास्त्रात शिकलोही होतो.
मी दोन वर्षं प्राध्यापकी केली, तेव्हा वर्गात पहिल्याच तासाला हा 'दोष' सांगून टाके व उच्चारामुळे एखादा शब्द समजला नाही तर तो फळ्यावर लिहून दाखवला जाईल असे सांगे. मराठवाड्यातच शिकवत होते तेव्हा काही फरक पडला नाही, कारण तिथे माझ्यासारखे बहुसंख्य होते. लहान शहरांमध्ये, गावांमध्ये व्याख्यानाला जाते तेव्हाही काही फरक पडला नाही. फरक फक्त तीन जागी पडला... मुंबई, ठाणे व अर्थातच पुणे. तिथेही कुजबुजणारे विद्यार्थी व व्याख्यानांनंतर प्रश्न विचारणारे वा चिठ्ठी पाठवून उच्चारांवर आक्षेप घेणारे केवळ ब्राह्मण या एकमेक जातीचे लोक असत. ( त्यातही अनेकांना 'तुम्ही स्वतः ब्राह्मण असून चुकीचे उच्चार करता याचं दु:ख, लाज, ओशाळलेपण अधिक असे.) बाकी कुठे उच्चारांच्या कटकटी झालेल्या स्मरत नाही. हां... आकाशवाणीवाल्यांशीही यावर सुरुवातीच्या काळात वाद झाले. पण नंतर त्यांनीही माघार घेतली.
उच्चार जमत नाहीत हे काही अभिमानाचे नव्हे, तरीही त्यात प्रादेशिक कारणं असतात, वैद्यकीय कारणं असतात, हेही समजून घेणारे खूप असतात. शुद्ध उच्चार ही ज्या व्यवसायांचीच गरज आहे तिथं ते असायला हवेतही. पण इतरत्र काही फरक पडताना दिसत नाही... बोलीभाषा इतक्या आहेत आणि त्यानुसार शब्द इतक्या तर्‍हांनी उच्चारले जातात... काय किती चुकीचं ठरवत बसणार?
अशोक शहाणे तोतरं बोलतात किंवा प्रा. शेषराव मोरेंचे उच्चार व्याख्यानांमध्ये जड जिभेचे असल्याने कळत नाहीत... तरी कानाचं सूप करून मला त्यांचं बोलणं ऐकावं वाटतं... 'काय बोलतात किंवा कसं शिकवतात' हे अधिक महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. माझे अनेक शिक्षक अशुद्ध बोलणारे होते, आहेत... पण ते देतात ते ज्ञान अधिक मोलाचं वाटतं. उच्चार शुद्ध असते, तर दुधात साखर, पण नाहीत म्हणून तेवढ्यावर मी तरी त्यांना बाद करणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

मार्मिक, रोचक आणि माहितीपूर्ण अशा तीनही श्रेणी एकाच वेळी देता येत नसल्यामुळे मार्मिक श्रेणी दिली. आणि बाकीच्यांसाठी पोच म्हणून हा प्रतिसाद.

चिंतातुर जंतूंनी मांडलेलं चित्र 'आत्ता वाढ पण भविष्यकाळ चिंताजनक' आणि तुम्ही मांडलेलं 'आत्ता दिसणारी वाढ आणि प्रयत्न केल्यास तग धरता येईल' या दोनमध्ये मला केवळ भविष्याकडे पहाण्याच्या दृष्टिकोनाचा फरक दिसतो. असे प्रयत्न कुठच्या पातळीवर व्हायला हवेत? परबांनी 'सरकारने काहीतरी करायला हवं' असं कळकळीने म्हटलेलं आहे. सरकारने काय करायला हवं, आणि आपण किंवा सामान्य जनतेने संस्थात्मक पातळीवर काय करायला हवं, याबद्दल काही सांगता येईल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नेमके अन मार्मिक!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वा! चित्र बरेच आशादायक आहे तर मग. पण अर्थातच प्रयत्नांची गरजही तितकीच आहे म्हणा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पुढे कधी असं तंत्रज्ञान निघालं की ज्यायोगे मी मराठीत बोललो तर समोरच्याला ते कामचलाऊ इंग्लिशमध्ये (अगर कुठच्याही हव्या त्या भाषेत) ऐकू येईल.

मला वाटतं इथे तुम्ही उलट विचार करत आहात. असे तंत्रज्ञान येण्यासाठी मराठीला महत्त्वाची भाषा हे स्टेटस आधी मिळवावे लागेल. अशा वेळी इतर लोक मराठी शिकतील. फ्रि मार्केट वाल्यांनी इथे मला समर्थन देणं अपेक्षित आहे! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असं तंत्रज्ञान उपलब्ध झालेलं आहे. संसदेतही ते वापरलं जातंय. अजून पुरेसा प्रसार झालेला नाही इतकंच. जनसामान्यांना ते उपलब्ध होण्यासाठी काळ जावा लागेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

+१

असेच म्हणतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

छान चर्चा. अनेक प्रतिसाद वाचण्यासारखे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संसदेत म्हणजे सरकार, म्हणजे फ्री मार्केट नाहीच! Wink

इंटरेंस्टिंग आहे. अधिक माहिती काढायला हवी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या बाबतची मांडणी आजवर अनेकांनी केली आहे. अगदी अशातली आहे ती आ.ह. साळुंके यांची. ती लोकसत्तेत छापूनही आली होती आणि वाचकांकडून सूचनाही मागवल्या होत्या. मला आवडलेली मांडणी आहे ती राज्य मराठी विकास संस्थेच्या धोरणांची. दुर्दैवाने ती संस्था केवळ काही पुस्तकं प्रकाशित करणार्‍या सरकारी तरी स्वायत्त प्रकाशन संस्थेसारखी बनून राहिली आणि आता तर तेही धड होत नाहीये. अशा संस्थांवर महत्त्वाकांक्षी, सरकार दरबारी कामं करवून घेण्याची क्षमता असणारी ( लाळघोटी नसणारी ) आणि उत्तम प्रशासकीय कौशल्यं असलेली माणसं अधिकारपदावर असली पाहिजेत.
भाषा संचालनालनालयाला तर गेली काही वर्षं संचालकच नाही, ही अनास्था आहे. तिथली अनुवादाची कामं, शब्दकोशांची कामं मुंगीच्या गतीनं व सुमार दर्जाची होतात व काही कामं ठप्पच झालेली आहेत. कोश अद्ययावत करणं तर घडलेलंच नाहीये.
विश्वकोशाची स्थिती म्हणजे काम सुरू आहे, पण गती मंद आणि काम कमी व समारंभ जास्त अशी अवस्था आहे. तरी आहेत ते खंड जालावर उपलब्ध करून दिले गेल्याने चांगला वापर होतो आहे.
सरकार कडे सगळी जबाबदारी ढकलून मोकळं होता येणार नसतंच. पण ते सोपं असल्याने अनेक क्षेत्रांमध्ये तसं होताना दिसतं. तिथंही पाठपुरावा करत राहावा लागतो आणि तो प्रसारमाध्यमांनी उचलून धरला तर चांगला होतो. प्रसारमाध्यमं फक्त जिथं सनसनाटी असेल अशाच बातम्या उचलतात वा घडवतात वा कशातही सनसनाटीपणा शोधतात; एरवी चांगल्या उपक्रमांकडे दुर्लक्ष करतात. अनेक साहित्य विषयक, कलाविषयक कार्यक्रम होत असतात. आता ते कव्हर करणारे वार्ताहरही नसतात अनेक वृत्तपत्रांमध्ये. ( परवा पत्रकार अशोक जैन यांच्या निधनानंतर श्रद्धांजलीची सभा झाली, ती एका पत्रकार मुलीने तिच्या ब्लॉगवर कव्हर केली. जालावर हे प्रकार वाढत जात असून एक चांगली पर्यायी व्यवस्था उपलब्ध होते आहे. पण आपण ब्लॉग्जवर चर्चा करणे अद्याप सुरू केलेले नाही, जशा चर्चा संकेतस्थळांवर करतो... हिंदी इंग्लीशमध्ये हे घडतेय, मराठीत अजून नाही. आवडले म्हणणे, एखादी शंका विचारणे इतपतच प्रतिक्रिया असतात. चर्चा झाल्या पाहिजेत चांगल्या.)
सरकार, प्रसारमाध्यमं यानंतर तिसरी फळी येते ती वैयक्तिक कार्याची. यात विक्रीयोग्य उपक्रम प्रकाशक उचलून धरतात, बाकी नाही. काही संस्थांची स्पॉन्सरशीप मिळवून, फेलोशीप्सच्या माध्यमांमधून व देणगीदारांनी पुढाकार घेऊन काही आवश्यक उपक्रम राबवता येऊ शकतील. उदा. माधुरी पुरंदरे यांचा 'लिहावे नेटके' हा उपक्रम टाटांच्या एका ट्रस्टमधून पैसे मिळाल्याने झाला. समाजविज्ञानकोश हा सहा खंडांचा प्रकल्प डॉ. स. मा. गर्गे यांनी केंद्र शासनाकडून सहाय्य मिळवून पूर्णत्वास नेला. पण अशा मदती मिळवण्याचे कौशल्य अनेकांकडे नसते, त्यांचे प्रकल्प रखडतात, बासनात बांधून ठेवले जातात वा गर्भपात तर नवे नाहीतच. पुढार्‍यांच्या हातापाया न पडता, सरकार दरबारी खेट्या घालाव्या न लागता लोकांना आपले उपक्रम पार पाडता आले पाहिजेत. काही लोक संशोधनासाठी फेलोशीप्स देताहेत आता... उदा. महाराष्ट्र फाउंडेशन किंवा लाभशेटवार यांच्यासारख्या व्यक्ती. पण हे अपेक्षित कामाच्या तुलनेत खूपच कमी आहे आणि यांच्या रकमाही अत्यल्प आहेत. तरीही काहीतरी होते आहे हे चांगलेच.
आपल्याकडे कोणते कोश आहेत व कोणते कोश व्हायला हवेत याची एक यादी मी एका कोशविषयक पुस्तकाचे संपादन केले त्यात दिली होती. सूचींबाबतही असे काम होऊ शकते. आपल्या भाषेत अजून भाषिक नकाशाही केला गेलेला नाहीये.
साहित्यसंस्थांना त्यांची कामं जाहीर करण्यास भाग पाडलं पाहिजे. निधी आहेत, जागा आहेत, मनुष्यबळ आहे... पण इच्छाशक्ती नाही, कल्पनादारिद्र्याच्या रेषेखाली असलेले लोक तिथं ठिय्या देऊन बसले आहेत. त्यांना धक्का देणारं कुणी नाही. साहित्य संमेलनापलीकडे कितीतरी कामं त्यांच्या अजेंड्यावर आहेत, पण ती कुणीही करत नाही.
व्यक्तीपातळीवर मोठी कामं होऊ शकतील असा विश्वास मला वाटतो, त्यासाठी निधी उपलब्ध झाले पाहिजेत. आपल्याकडे जे वर्णमालेचे तक्ते आहेत, ते अत्रे-शांता शेळके यांनी एकदा बदलले त्यानंतर अजून बदलले गेले नाहीयेत; मुलांसाठी साधी अल्फाबेट्सची पुस्तकं इंग्लीशमध्ये असतात तशीही नाहीयेत... पण हे काम करून दिलं तरी पुढाकार घेऊन ते छापणं, बाजारात उपलब्ध करून देणं यासाठी तर यंत्रणा हवी; मला अजून तसं कुणी मिळालेलं नाही. मराठी अनिवार्य असल्याने शाळांमधून अशा गोष्टींची गरज आहे, मागणी आहे, पण जुनंच चालतंय तोवर चालू दे ही वृत्ती आहे. शिक्षणखातं, पाठ्यपुस्तक मंडळ, बालभारती या सगळ्यांना धक्का कोण मारणार? एक मराठी दिन आला की दोन लेख छापायचे किंवा काहीतरी आचरट 'स्टोर्‍या' करायच्या इतकंच करतात वृत्तपत्रं. त्यांचीही धोरणं आता 'लोक बोलतात तसं आम्ही लिहितो' अशी बनली आहेत आणि आवर्जून चांगली भाषा, अचूक मराठी शब्द वापरणं, नवे शब्द घडवणं व रुळवणं अशी उचापत करण्याची त्यांचीही इच्छा नाहीये. असो. भरकटलंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

इंडिक लँग्वेज प्रोसेसिंग इतके कटिंग एज इ. असेल याबाबत शंका आहे. इतर बहुतेक शास्त्रशाखांप्रमाणेच इथेही भारतीय भाषा इंग्रजीच्या मागे आहेत.

याबद्दल जमेल तशी अधिक माहिती कॄपया द्यावी अशी विनंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भाषा एका नदी प्रमाणे आहे, सतत वाहत राहणारी. मराठीचे म्हणाल तर इंटरनेट भाषेला चांगले दिवस आले म्हणता येईल. आधी वर्षातून पुस्तकी माध्यमातून काही लेख आणि गोष्टी वाचायला मिळायच्या. आज रोज वाचायला मिळते. माझ्या सारख्या माणसाने वयाची ५० उलटल्यावर (मराठी न शिकलेल्या) मराठी वाचणे आणि लिहिणे शिकले.

मराठीत डॉक्टर आणि इंगीनीरिंगचे शिक्षण सुरु केल्यास, आपोआप लोक आंग्ल भाषा शिकणे बंद करतील. महाराष्ट्रात दहा कोटी लोक राहतात. महाराष्ट्रातच मराठी माध्यमातून डॉक्टर, इंगीनीअर, आर्किटेक बन्नार्याना कामाची कमी राहणार नाही. इथे भक्त स्वाभिमानाची गोष्ट आणि गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याची आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'प्रयोगशील मराठी शाळा'हे विषेशण आहे, नांव नव्हे.
मुलगा वर सिफर यांनी उल्लेख केलेल्या ग्राममंगल संस्थेच्या 'लर्निंग होम' या शाळेत आहे. ती पुण्यात कोथरूडला गांधी भवन शेजारी आहे. नुकतेच शाळेचे एक प्रदर्शन झाले. दरवर्षी फेब्रुवारीमधे असते. तिथे मुलांचे या वर्षी केलेले काम पहायला मिळते. वर आणखी एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे लेखन-वाचनावर भर नसतो. मुलगी पुण्यातील 'अक्षरनंदन' या शाळेत आहे. तिकडे मात्र पाठ्यपुस्तके व लेखन-वाचनावर बर्‍यापैकी भर असला, तरी प्रकल्प पद्धतीने शिकवले जाते.
एकंदर अनुभव पाहता, मी मुलांना ईंग्रजी माध्यमात न घालता मराठी शाळांत घातले या गोष्टीच्या तोट्यांपेक्षा फायदे आधिक झाले असे वाटते. म्हणजे माझ्या मुलांचा माझ्या आईवडीलांशी चांगला संवाद आहे. ती जर ईंग्रजी माध्यमात असती तर त्यांच्या विश्वात ईंग्रजी न येणार्‍या आजी-आजोबांना कितपत प्रवेश मिळाला असता? पण हे व्यक्तीसापेक्ष आहे. राहिला मुद्दा ईंग्रजी चांगलं येण्याचा. ईंग्रजी त्यांना बोलायची वेळ येईपर्यंत ते शिकतीलच असे वाटते. अहो, ते पुण्यासारख्या ठिकाणी आताशा ते इतकं वापरलं जाऊ लागलंय, कि त्यासाठी मुलांना ईंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायची काही गरजच वाटत नाही. बरेच लोक चांगलं ईंग्रजी येणे आणि ईंग्रजी माध्यमातून शिकणे याचा गोंधळ करतात आणि आपल्या मुलांचं शिकणं आनंददायक व्हायच्या ऐवजी ती एक ड्र्जरी होते, असं वाटतं.
-स्वधर्म

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बहुत रोचक!

असे काही असणे हे लै आशादायक आहे. धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पाने