शाळेतली एक आदर्श विद्यार्थिनी

तसं आपण समोरासमोर कधी मुद्दाम बोललो नाही , भेटलो नाही
कधीतरी चुकून ओळखीची नजरानजर शाळेतली
तू आमची एक आदर्श सिनिअर
उदाहरणादाखल फक्त तुझाच नाव
पंधरा ऑगस्ट , सव्वीस जानेवारी एकामागोमाग एक येऊन गेले
तुझ भाषण, गाणं , भरतनाट्यम यांनी भरत गेले
शाळेत रोज शिकवायचे
महिला सबलीकरण, स्त्री पुरुष समानता इत्यादी
बहुतेक तुला सगळ कळायचं ..
तुझी दहावी झाली
सगळ्यांच्या खूप अपेक्षा घेऊन
तू पहिल्या नम्बरने बाहेर पडलीस
नियमांप्रमाणे विस्मरणात गेलीस
कोण म्हणायचं उत्साहाचा निर्झर गेला
तर कोण म्हणायचं खळाळत हास्य गेल
चार पाच महिन्यांनी तू समोर आलीस असाच शाळेला भेटायला
पण हिरव्या बांगड्या , कुंकू , मंगळसूत्र इत्यादी
तुला न शोभणार्या प्रौढपणाच्या अनेक खुणा घेऊन......
थोडी अशक्त झालेली
तुझ हास्य तुझ्याच विस्मरणात गेल असाव
कुणीतरी मला सांगितलं
तुझ लग्न झालाय!
इतक्या लहानपणी लग्न कस शक्य आहे?
“अनुराधेला कर्नाटकापासच लई चांगल स्थळ मिळाल ..दीड एकर जमीन आहे मनून
जास्ती काय इचार केला नाही”
तुझी आई सांगत होती
मागची कितीतरी युगे संसारात पिचलेली
शेवटी धाडस करून मीच तुला विचारलं
“तुला सगळ काळात असून तू इतकी हुशार असून तू विरोध का केला नाहीस ? डॉक्टर बनणार होतीस ना तू?”
तुझ्या चेहऱ्यावरच्या उर्मीच्या रेषा हलल्या
“सगळ काही आपल्या हातात नसत आई-बाप , देव आणि आता नवरा यांच्याच हातात बराच काही असतं...”
नवीन मंगळसूत्राला सावरत तू बोललीस
इकडे शाळेत तास तसेच संपत गेले
मूल्यशिक्षण, स्त्री पुरुष समानता , महिला सबलीकरण , बालविवाह विरोध इत्यादी इत्यादी
बरीच वर्षे झाली
मी असाच सगळ धूसर विसरून गेलो
बाकीच्या प्रश्नांमध्ये पसरून गेलो
आज बसस्टोपवर अचानक तू
एक लहान मुलगा हातात तर एक पोटात
मी हसलो तू हसायचं म्हणून हसलीस
औपचारिकतेच्या पलीकडे गेलो नाही
बसमध्ये विचार करत होतो
शाळेतली तू हुशार उत्साही वेगैरे
आणि आत्ताची किती फरक आहे ...
काही वेळ अस वाटत राहील कि
तू विचारत होतीस
तुझ्या काळ्या वर्तुळातनी वेढलेल्या डोळ्यामधून
माणसाचा जन्म कशासाठी झालेला असतो?
आणखीन माणसाना जन्म घालण्यासाठी?
कि आणखीन काही वेगळ इप्सित ...
मग परिस्थितीच प्रश्नचिन्ह घेऊन मी तिच्या वेदनेची नजर गिळली!

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

लिहित रहा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हा कसा माहीत नाही सुटला होता.
छान आहे म्हणवत नाही. पण आवडला.
लिहीत रहा असेच म्हणेन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान. लिहीत रहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0