मी वाचलेला भयंकर एक ब्लॉग

अनिता पाटील नावाच्या एक महिलेचा ब्लॉग मी वाचला. ब्लॉग अभ्यासपूर्ण वाटला. म्हणजे किमान लेखन अभ्यासपूर्ण आहे, हे दिसेल याची खबरदारी लेखिकेने घेतलेली दिसली. या ब्लॉगवरील मजकूर धक्कादायक आहे. गोमांस भक्षक ब्राह्मण या विषयावरीलच लेख तर भयंकरच आहेत. या विषयावर एकूण चार-पाच लेख ब्लॉगवर आहेत. हे लेख वाचून मला भोवळच आली. प्राचीन काळी ब्राह्मण गोमांस खात असत, असे ह्याच्यातील प्रत्येक लेखात वारंवार सांगितले गेले आहे. तसा दावा करण्यात आला, असे म्हणणे अधिक योग्य राहील. प्राचीन काळातील ब्राह्मणांचे गोमांस भक्षण सिद्ध करण्यासाठी पाटील बार्इंनी संस्कृत भाषेतील असंख्य श्लोक लेखात दिले आहेत. हे श्लोक खरे आहेत का, याबाबत मला तरी संशयच वाटतो. कारण मी असे या पूर्वी कधीही ऐकलेले नाही. कुठे वाचलेले सुद्धा नाही.

अनिता पाटील यांनी गोमांसा विषयाच्या लेखानमध्ये अश्वलायन गृह्य सूत्र या नावाच्या ग्रंथाचा आधार घेतला आहे. या ग्रंथातील अनेक श्लोक लेखासाठी मोठ्या प्रमाणात घेण्यात आल्याचे दिसून येत होते. असा काही ग्रंथ आहे, हे माझ्या वाचनात आलेले नाही. तज्ज्ञांनी यावर प्रकाश टाकायला हवा. असा ग्रंथ नसेल, तर तसे स्पष्टपणे समोर यायला हवे. आणखीन, असेल तर या ग्रंथात नेमके काय म्हटले आहे, हे तपासून पाहायला पाहिजे आहे. असा ग्रंथ कोणाला माहिती आहे का? असल्यास कृपया सांगावे.

आणखीन एक गोष्ट अशी की, अनिता बाइंच्या लेखांत मनुस्मृतीमधील काही श्लोक सुद्धा मला दिसले. इतकेच काय ऋगवेदातले श्लोक सुद्धा आहेत. माझा यापैकी कोणत्याच ग्रंथाचा अभ्यास नाही. जाणकार लोकांनी या ब्लॉगला भेट देऊन सत्यता तपासून पाहायला पाहिजे हवी. मनुस्मृती आणखीन ऋगवेदातील श्लोकांचा खरा अर्थ लोकांच्या पुढे यायला पाहिजे आहे, असे माझे स्वत:चे मत आहे.

माझ्या अल्पमती प्रमाणे मी माझे मत या येथे उकलून मांडले आहे. गोड मानून घ्यावे, ही सर्वांना नम्रतेची हात जोडून विनंती तसेच हा माझा पहिलाच लेख आहे. हे सुद्धा मी नमूद करून ठेवते.

मी नवीनच ब्लॉग काढला आहे, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
................................
नवा जोड
................................
प्रश्नांची उत्तरे मिळायला पाहिजे आहे
या विषयावर दोन दिवस चर्चा झाली. पण मी ज्या हेतूसाठी हा लेख लिहिला होता, तो आणखीन साध्य झालाच नाही. कारण मी जे काही प्रश्न येथे विचारून ठेवले होते, त्यांची नेमकी उत्तरे मिळालेली नाहीत.
माझे प्र्श्न असे आहे -
१. अनिता पाटील यांनी अश्वलायन गृह्यसूत्र नावाच्या कोणत्या तरी ग्रंथाचा आधार घेऊन गोमांस
भक्षणाचे लेख लिहिले आहेत. असा खरेच काही ग्रंथ आहे का?
२.असलाच आहे, तर तो कोठे उपलब्ध होईल?

यांची उत्तरे मला मिळायला पाहिजे आहे.
.......................
अनिता पाटील यांच्या लेखात आलेल्या पुस्तकांच्या नावाची खात्री करून घेता यावी म्हणून त्यांच्या ब्लॉगचा धागा खाली देऊन ठेवते आहे :
http://anita-patil.blogspot.in/
खलील प्रमाने सुद्द्दा हा ब्लोग उघड्तो.
http://anita-patil.blogspot.com/

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (3 votes)

आपण अनिता पाटील यांच्या ब्लॉगचा दुवा दिलेला नाही.
प्राचीन काळी ब्राह्मण गोमांस भक्षण करीत असत यात नवीन काही नाही.

मनुस्मृती आणखीन ऋगवेदातील श्लोकांचा खरा अर्थ लोकांच्या पुढे यायला पाहिजे आहे, असे माझे स्वत:चे मत आहे.

हा काथ्याकूट दशकानुदशके चालूच आहे. जो तो आपल्या अन्वयार्थाला खरा अर्थ म्हणतो.

मी नवीनच ब्लॉग काढला आहे, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.

कुठला ब्लॉग काढलाय ते कुठे सांगितल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

श्री. प्रकाश घाटपांडेजी,
आपण अनिता पाटील यांच्या ब्लॉगचा दुवा खलील प्रमाने आहे -

http://anita-patil.blogspot.in/

खलील प्रमाने सुद्द्दा हा ब्लोग उघड्तो.

http://anita-patil.blogspot.com/

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बापट हे नाव कुलकर्णी, देशमुख्,खोत ह्यांच्याप्रमाणेच व्यवसाय निदर्शक आहे म्हणतात.
बापट म्हणजे जे यज्ञात गायींचा शास्त्रोक्त बळी देण्यास सहाय्य करत ते असे काहीतरी.
पहिल्यांदाच वाचतो, तेव्हा हे सगळे नवीन, धक्कादायक वगैरे वाटते.
अजून काही धक्के खायचे असले तर हे वाचा;-
१.राम आणि सीता ह्यांच्या मद्यपानाचे उल्लेख संस्कृत रामायणात आहेत. सात्विक रुपांतरण केलेल्या मध्ययुगीन रामचरितमानस मध्ये हे अर्थातच सापडणार नाहित.
२.राम वनवासाला निघाला असता सीतेने त्याच्यासोबत जायचा हट्ट का केला?
कारण "रामाच्या माघारी भरत शत्रुघ्न हे घाणेरड्या नजरेने एका एकट्या स्त्रीवर वाकडा डोळा ठेउन असतील. त्यापेक्षा मी वनवासात आलेलीच बरी" असे म्हणाली म्हणतात ती संस्कृतात.
३.मारिचाची "ल्क्ष्मणा धाव रे" ही खोटी हाक ऐकल्यावर सीता त्याला रामाच्या शोधात जा म्हणाल्यावरही तो काही जायला तयार होइना. पण तिने सरळ त्याला "राम गेल्यावर मी आयतीच तुझ्या हाती लागीन असा घाणेरडा विचार तर करत नाहीस ना" असे म्हणत पिटाळले.
४.भीमाने युद्धसमयी मैरेयक नावाचे मद्य प्यायले होते.
५. राम्,सीता ह्या दैवतांची सोवळ्यात सात्विक पूजा वगैरे केली जाते.त्यांच्या मंदिरात आज मांसाहार नेला जाउ शकत नाही. मात्र राम व सीता ही संस्कृत रामायणातील पात्रे सामिष अन्नाचे सेवन करतात.
६. आजच्या नैतिकतेचा चष्मा लावून वाचाल तर वि का राजवाडे ह्यांचे "भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास", त्यातही अश्वमेध यज्ञाचे विस्तृत वर्णन वाचून भोवळ येइल, उलटी होइल. थोडिशी चुणूक http://mr.upakram.org/node/1279 मिळेल.
(ओ पकाकाका, तुम्ही स्कॅन केलेली उपक्रमावरची पाने कुठल्या लिं़एवर आहेत? सापडत नाहियेत. तुम्हीच टाक्लं होतं ना स्कॅन करुन?)
७.भरत्-शकुंतला ही अमरप्रेमकहाणी वगैरे म्हणून ठाउक असेल. कौरव-पांडावांचे पूर्वज म्हणून हे ठाउक असतील. पण त्यात भरत शकुम्तलेला विसरतो, ओळख दाखवत नाही, विवाह नाकारतो,; तेव्हा ही "शालीन", "कुलीन","सात्विक" स्त्री जी विशेषणे भरतास लाउन त्याच्या कुळाचा उद्धार करते तेवढा आपण हल्लीच्या काळात हिरवा सिग्नल असतानाही तुमच्या समोर गाडी ब्म्द ठेउन रस्ता अडवून बसलेल्याचाही करणार नाही!!
.
अजून फार गोष्टी आहेत. पहिल्यांदा ऐकून मला भोवळ आलेल्या ज्या ज्या होत्या; त्यातल्या सर्वप्रथम आठवणार्‍या सध्या लिहून काढल्यात.
बाकीचे फुरसतीत.
तां क :- ह्यातलं खरं खोटं मला ठाउक नाही. कुणीतरी कुणाच्या तरी भक्कम संदर्भाच्या नावानी सांगितलेल्या ह्य गोष्टी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मराठी विवाहसंस्थेचा इतिहास हे पुस्तक जालावर उपलब्ध आहे. हा दुवा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बाई दुवा कुटे आहे ? आमानी वाचायचा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारतीय समाजाला सामाजिक जबाबदारी घेण्याची आवश्यकता आहे, समाजसेवेची नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>

भरत शकुंतला नव्हे तर दुष्यंत शकुंतला असे हवे. भरत या दोघांचा मुलगा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

बरोबर आहे.
घाईने लिहिण्याच्या नादात चुकीचे लिहिले गेले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

'भारतीय विवाहसंस्थेच्या इतिहासा'(च्या संदर्भा)चे निकटसान्निध्य लक्षात घेता, कदाचित हेही स्वीकारायला हरकत नसावी, असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...कदाचित हेही स्वीकारायला हरकत नसावी, असे वाटते...

'न'वी बाजू,
आपण कशाबद्दल बोलत आहात? सुप्रिया बाईंनी उल्लेख केला त्या ब्लॉगबद्दल, राजवाडे यांच्या पुस्तकाबद्दल की, शकुंतलेच्या कहाणीबद्दल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...राजवाड्यांच्या 'इतिहासा'च्या प्रकाशात, ('दुष्यंत-शकुंतले'ऐवजी) 'भरत-शकुंतले'च्या उपरोल्लेखित ('फ्रॉइडियन-स्लिपे'स?) 'कथे'सही खपवून घेण्यास फारशी अडचण येऊ नये, एवढेच (नम्रपणे) सुचवावयाचे होते.

आभारी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

> ही माहिती कुठून काढली देवा? दि.वि. जोग यांच्या 'चित्पावन आडनावांचे यज्ञशास्त्रीय मूळ' (असंच काहीसं नावं) पुस्तकाचा दाखला देणार असाल तर ते पुस्तक अजिबात विश्वसनीय नाही! यज्ञपरंपरेशी संबंध जोडावयाचा तो एक उगाच कैच्याकै प्रयत्न आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

"जाणकार लोकांनी या ब्लॉगला भेट देऊन सत्यता तपासून पाहायला पाहिजे हवी. मनुस्मृती आणखीन ऋगवेदातील श्लोकांचा खरा अर्थ लोकांच्या पुढे यायला पाहिजे आहे, असे माझे स्वत:चे मत आहे."

हा आणि असेच इतरहि असेच ब्लॉग धागे पकडून मागोवा घेतला तर पहावयास मिळतील.

धाग्याच्या प्रवर्तक बाईंना हवी असलेली सत्यता 'जाणकार लोकांना'हि माहीत असेलच असे नाही. मी 'जाणकार' नाही तरीहि एव्हढे म्हणू शकतो की जुन्या ग्रंथकारांनी कोठल्या संदर्भात काय म्हटले आहे ह्याचा सर्वमान्य अर्थ सापडणे अवघड असते. कोठल्याहि अधिकारी तज्ज्ञाच्या मताच्या विरोधात तितकाच प्रबल दुसरा तज्ज्ञ उभा करता येतो. 'पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना कुण्डे कुण्डे नवं पयः| जातौ जातौ नवाचारा नवा वाणी मुखे मुखे||' हे वचन तुम्ही ऐकलेले असेलच, तीच ही परिस्थिति आहे. अनिता पाटीलबाईसारख्यांना ह्या वस्तुस्थितीचा मोठाच लाभ होतो. त्यातून त्या अथवा त्यांच्यासारखे लेखक खरे 'झोपलेले' नसून 'झोपण्याचे सोंग घेणारे' असले तर त्यांना उठवणे अशक्यच असते.

अशा लेखकांच्या धडाधड श्लोक उद्धृत करण्यामुळे काहीच ठरत नाहीत. जालावरून ते चिकटविणे सहजसाध्य असते. त्या व्यक्तीचे थोडेफार वाचले की त्याच्या विचारांचा 'आम रुख' (एनसीसीमध्ये शिकलेला शब्द) घ्यानी येतो आणि त्यांचा खरा वकूब आणि खोली किती आहे हेहि कळते.

माझा असा अनुभव आहे की अशा लोकांशी वाद घालणे हा वेळेचा अपव्यय, निष्कारण मनस्तापाचे कारण आणि अरण्यरुदन आहे. For your own sanity they are best ignored!

भर्तृहरि काय सांगतो ते आठवा: अज्ञः सुखमाराध्यः सुखतरमाराध्यते विशेषज्ञ:| ज्ञानलवदुर्विदग्धं ब्रह्माऽपि नरं न रञ्जयति|| ( अज्ञाला समजावता येते, विशेषज्ञाला पटवून देणे आणखीच सोपे असते, अल्प ज्ञानाने विद्वान झालेल्याला ब्रह्मदेवसुद्धा वळवू शकत नाही.)

तेव्हा असले भडकाऊ लिखाण करमणुकीसाठी हवे तर वाचा पण त्याचा प्रतिवाद करण्याच्या भानगडीत पडू नका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशा लेखकांच्या धडाधड श्लोक उद्धृत करण्यामुळे काहीच ठरत नाहीत.

का कोण जाणे, पण हे वाचून श्री. झकीर नाईक यांची आठवण आली, नि भडभडून आले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिती आणि अभ्यासाअभावी मतं बनवणं योग्य नाही. अनिता पाटील यांनी त्यांच्या लिखाणात त्यांनी वापरलेले संदर्भ दिलेले आहेत, त्यांचा अभ्यास करून मतं मांडण्याचा पर्यायही निवडता येतो.

लोकसत्तेमधल्या 'वाचावे नेट के' या सदरात सदर ब्लॉगची दखल घेतली होती, ती नोंद इथे सापडेल. या लेखातही ब्राह्मण गोमांस खात असत याचा उल्लेख संदर्भासकट झालेला आहे.

आपल्याला आवडलेली गोष्ट आपण पसरवतो, प्रसार करतो आणि ही कृती समजण्यासारखी आहे. आपल्याला एखादी गोष्ट अगदीच टाकाऊ वाटली तर त्याबद्दल निबंध लिहीण्याचे कष्ट घेणारे फार कमी असतात. पण अशा प्रकारे लिहीणार्‍या लोकांच्या मताला खूप अधिक किंमत असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदिती मॅडम, तुम्ही दिलेली लोकसत्ताची लिन्क वाचली. त्यात अनिता पाटील यांच्या लिखानावर फारच थोडे वितरण आहे. तुम्ही पाटील बार्इंचा ब्लॉग वाचला आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तो ब्लॉग थोडासा चाळला होता. माझा या विषयाचा फार अभ्यास नाही, मला फार आवडही नाही. पाटील बाईंचं लिखाण काही फार दखलपात्र लिखाण नाही असं मत झालं त्यामुळे मी फार वाचन केलं नाही. पण ज्या गोष्टींचा मला प्रतिवाद करावासा वाटेल त्या विषयाचा मी आधी अभ्यास करेन आणि मगच विरोध दर्शवेन.

ब्राह्मणांनी गोमांस खाण्यात काय विशेष हा प्रश्न मलाही पडला आहे. माझ्या समोर बसून ब्राह्मण जातीत जन्मलेल्या अनेकांनी गोमांस खाल्लेलं आहे. व्यवस्थित शिजवलेलं खात आहेत तोपर्यंत ठीक आहे, कच्चं मांस, अंडी यांच्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता वाढते.

अशा प्रकारच्या विषयांवर (पेशवाई, शिवकालीन इतिहास) ज्यात मला फार रस, आवड किंवा गती नाही त्यावर अरविंद कोल्हटकर सातत्याने लिहीतात. मला त्यांचं लेखन आवर्जून वाचावंसं वाटतं याचं कारण त्यांचं लिखाण अभ्यासपूर्ण आणि अभिनिवेशविरहीत असतं. या विषयांमधे रस असणार्‍या लोकांसाठी मी त्यांच्या लेखनाच्या लिंका शेअर करत रहाते.

बाकी खालचा रमताराम याचा प्रतिसाद मलाही अतिशय आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ब्राह्मणांनी गोमांस खाण्यात काय विशेष हा प्रश्न मलाही पडला आहे. माझ्या समोर बसून ब्राह्मण जातीत जन्मलेल्या अनेकांनी गोमांस खाल्लेलं आहे. व्यवस्थित शिजवलेलं खात आहेत तोपर्यंत ठीक आहे, कच्चं मांस, अंडी यांच्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता वाढते.

आम्हांस आमचा ष्टेक वेलडनपेक्षा मीडियम रेअरच बरा वाटतो. त्यातून किंचित रक्त (तितपत भाजल्यानंतर) अजूनही ठिबकत असल्यास सुवर्णाहूनि पीत.

(किंबहुना, आम्ही क्वचित्प्रसंगी - क्वचित्प्रसंगीच, कारण त्याहून अधिकदा आजच्या जमान्यात परवडत नाही, म्हणून - जेव्हा घरी भाजतो, तेव्हा ताटलीत हमखास थारोळे साचण्याइतपत ठिबकतेच ठिबकते. ते दृश्य पाहून उत्तमर्धांगिनी कोकलते - कारण, पु.लं.नी म्हटल्याप्रमाणे, शेवटी आम्ही भटेंच, त्याला काय करणार? - पण आम्हांस आणि आमच्या चिरंजीवांस त्याचे काहीही सोयरसुतक नसते. आम्ही आपले ताटात आपणच वाढून ठेवलेले मुकाट गिळतो. कधी चिरंजीव पूर्णपणे गिळू नाही शकले, तर 'त्याचा बाप खाईल!' म्हणून दुसर्‍यांदा पुढे ओढून गिळतो. पण चुकूनही अधिक भाजत नाही. कारण अधिक भाजल्यावर रक्तस्राव थांबेलही, पण त्यातून जो काही ऐवज निर्माण होतो, तो चावण्याऐवजी कोल्हापुरी चप्पल चघळलेली काय वाईट? असा अनुभव आहे. आणि महागाईचा ष्टेक आणून त्याची अशी वाट लावायची? हे काही पटत नाही बुवा!)

बाकी ज्याचीत्याची समज, जाण, अनुभव वगैरे... (आणि हो! आम्ही सुशीसुद्धा - जेव्हा परवडते तेव्हा - मोठ्या आवडीने खातो, बरे का?)

(उद्धृताच्या प्रथम वाक्याशी सहमत.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दोन्ही प्रतिक्रियांवर एकत्रच मतप्रदर्शन करतो.

ब्राह्मणांनी गोमांस खाण्यात काय विशेष हा प्रश्न मलाही पडला आहे.

अदितीचं पहिलं वाक्य (तुम्हीही ते क्वोट केलं आहे) एकदम माझ्या मनातलं होतं. मांसभक्षण स्वीकारलं की गाय बैल म्हैस वासरु मेंढी डुक्कर कोंबडी मासे या सर्वात असा वेगवेगळा, विशेषतः तिरस्कार बेस्ड फरक का करावा. (चव आवडते / आवडत नाही / काटे असतात / वातड इत्यादिंवर मतभेद ठीक.)

पण नंतर जे उल्लेख आहेत त्यामुळे काही विचार आले..

मला स्वतःला बैल-गाय-घोडा यांच्या मांसाने फरक पडत नाही. मीही ते ते पदार्थ खाताना या मुद्द्यामु़ळे थांबलेलो नाही. पण ही आपापली एक मानसिक कंडिशन असते. चिकन खाणारा वरणभात खाणार्‍याकडे पाहून स्वतःला खाण्याबाबतीत अधिक लिबरल समजतो.. (तुम्ही तसे आहात असं नव्हे.. फक्त उदाहरण).. पण मासे खाताना त्याला उग्र वास येतो.. मासे खाणार्‍याला तोच उग्र वास हवासा वाटतो.. माझ्यासारख्याला वर निर्देश केलेले प्रकार आवडतात आणि त्यामधली नवीन चव ट्राय करायलाही हरकत नसते. पण कुत्रा, वटवाघूळ, बेडूक, भुंगे इत्यादि प्राण्यांना खाण्याबद्दल बद्दल "उगीचच" एक किळस असते. याला तार्किक कारण नाही.

कुत्रा खाणारेही लोक जगाच्या काही भागात असतात. त्यांना माझ्यासारख्यांची गंमत वाटते.

त्याउपर मनुष्याचं मांसही खायला खरंतर कोणाची हरकत नसावी. जर मृत व्यक्तीने मरण्यापूर्वी स्वतः लिहून दिलं की माझा देह कोणाच्या स्वादपूर्तीसाठी कामी यावा, तर त्याच्या देहाचं मांस शिजवून खायला कोणी कायदेशीर हरकत घेऊ नये आणि असे प्रयोग काहीजणांनी केलेही आहेत.

या सर्वामधे आपापली जी काही एक मर्यादा पडलेली आहे ती त्या त्या वेळी खरोखरची असते. त्यावरच्या पातळीवरच्या तपशिलांनी येणारी किळस त्या त्या व्यक्तीसाठी सत्य असते..

अशा वेळी कशा प्रकारची चर्चा किंवा विधानं जास्त योग्य ठरावीत हे पाहू:

योग्य विधानप्रकारः "गोमांस भक्षणाला वेगळा दर्जा का असावा" किंवा "कुत्रा खाणं हे किळसवाणं आहे किंवा नाही ही सापेक्ष कल्पना आहे. आमच्या भागात तो खाल्ला जातो." अशी विधानं ही तात्विक पातळीवर चर्चेला योग्य ठरतात.

पण..

त्याउपर जाऊन कुत्रा शिजवण्याचं रीतसर वर्णन.. कुत्र्याचे वृषण भाजून खाताना ते फुटून त्यातून किंचित द्रव बाहेर आला पाहिजे पण अधिक शिजले की ते कडक आणि कडवट होतात.. अशा स्वरुपाच्या तपशिलांनी काही खास मुद्दा सिद्ध होईल असं मला वाटत नाही. पण जो अजून तितपत "लिबरल" झालेला नाही त्याला येणारी शिसारी मात्र बरीच असेल.

अगदी अस्संच नव्हे पण यालाच समांतर एखादं उदाहरणं घेता येतील.

देव ही कल्पना मला मान्य नाही. किंवा मूर्तीच्या स्वरुपातला देव मला पटत नाही हे विधान अगदी योग्य वाटतं. मी मूर्तीरुपातला सोंड असलेला हत्तीच्या मुखाचा देव मानत नाही याचाच अर्थ मला गणपती बसवून त्याची मनोभावे आरती करण्यात रस नसण्याची जास्त शक्यता आहे. मी देव या संकल्पनेला व्यक्तिगत आयुष्यात महत्व देत नाही. याचा अर्थ मी गणपतीची मूर्ती पोकळ करुन अ‍ॅश ट्रे म्हणून कशी वापरतो किंवा मी त्याचा पेपरवेट कसा केला आहे हे सांगून माझा ईश्वरविषयक मुद्दा पुढे येण्यापेक्षा कसलीतरी प्रतिमाभंजक वृत्ती दिसते.

कोणीतरी समूह आहे ज्याला ती मूर्ती वंदनीय आहे, कोणीतरी समूह आहे ज्याला ते गोमांसभक्षण धक्कादायक आहे हे मनात कुठेतरी असावं इतकंच..

बाकी आपण स्वतंत्रच.. !! Smile

यावर तुम्ही विचार करता की डिफेन्समधे जाता यावरुनही तुमची अधिक ओळख होईल..

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विवेक! अशी श्रेणी असायला हवी होती. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विवेक!, सहमत!, अशा काही श्रेण्या पाहिजे होत्या असे जाणवू लागल्या गेले आहे. सध्ञाची वर्गवारी बर्‍यापैकी कॉंप्रिहेन्सिव्ह आहे पण काही बारीक खाचाखोचा राहिल्या आहेत असे वाटतेय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ब्याटमनच्या प्रतिसादास सहमत.
ब्याटामनच्या प्रतिसादास "आवश्यक" अशी श्रेणी देता यायला हवी.
मागण्या इतक्या आहेत की, प्रत्येक सुचवणीस "आवश्यक" ही श्रेणी दिली जाउ शकते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

काही पर्याय:
*सहमत असहमत अशी दोन रेडीओ बटनस् देउन त्यातील सिलेक्शन नुसार +ve किँवा -ve श्रेणीचे ड्रॉपडाउन देणे
*सध्या केवळ शेवटची श्रेणी दिसते त्याऐवजी आधीच्या किती जणांनी कोणत्या श्रेणी दिल्या ते दिसल्यास जास्त योग्य होईल eg रोचक: १, माहीतीपुर्ण: २ मार्मिक: १ असे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सध्या केवळ शेवटची श्रेणी दिसते
आत्ताच प्रयोग केला.ज्यांना "मार्मिक ५" अशी श्रेणी दिसली असे एक दोन प्रतिसाद निवडले. त्यांना "कै च्या कै" करुन पाहिले. मग "मार्मिक ४" दिसू लागले. "शेवटची श्रेणीच दिसते" हे त्यामूळे पटत नाही. प्रयोग करुन पाहू शकता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मी +ve श्रेणी ची -ve श्रेणी केली नाही कधी.
पण तुम्ही batman ना दिलेला उपप्रतिसाद आतापर्यँत मार्मिक ३ होता त्याला मी रोचक ४ केला...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आताच थोडं टेस्टिँग केलं. www.aisiakshare.com/node/139 या धाग्यातील ५अ नुसार बहुमत ज्या श्रेणीला असेल ती श्रेणी दिसत राहते.
मन यांचा प्रतिसाद 'score: ४ माहितीपूर्ण' दिसत होता. नविन प्रतिसाद 'score: १' असतो. म्हणजेच ५अ नुसार कमीत कमी २ जणांनी माहितीपूर्ण श्रेणी दिलेली असणार.
मी +ve पण आधी कोणी दिली नसेल अशी विनोदी श्रेणी दिली आणि आता तो प्रतिसाद 'score: ५ विनोदी' दिसतोय.
(मनोबा माफ करा मी फक्त टेस्टिँग करत होते Smile )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

This comment has been moved here.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गविंचे प्रतिसाद पाहून त्यांचा आणि माझा आत्मा एक्याच मूळ तत्त्वांचा बनलेला आहे असे वाटते.

यापेक्षा जास्त I coincide with you ला मी दुसरे चांगले शब्द वापरु शकत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही. अनेक इतिहासकारांनी असे पुरावे पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. यात आपण खुल्या मनाने ते वाचतो, समजून घेऊ इच्छितो का हा आपापल्या पुरता प्रश्न सोडवावा. सर्वसामान्य माणसाला मुळातच जे लिहिले ते भयंकर असे वाटत असेल आपल्यापुरते 'खोटे आहे' असे म्हणत त्याने पुढे जावे. पण अभ्यासकाने मात्र लेखकाच्या हेतू, वकूब याच्या पेक्षा निष्कर्षाच्या संभाव्यतेला तपासावे हे नक्की. समोरचा सामान्य वकूबाचा म्हणून हे वाचूच नये असे म्हणणे हा चलाखीचा, सोयीचा प्रतिवाद मानतो मी. समोरचा सामान्य वकूबाचा असेल तर त्याचे मुद्दे अधिक वकूबाच्या व्यक्तीला सहज खोडून काढता यावेत याबाबत दुमत नसावे असा समज आहे.

वर राजवाड्यांचे उदाहरण आले आहे तसेच डॉ. कोसंबी, पं. राहुल सांकृत्यायन यांनीही असे अनेक उल्लेख दाखवून दिले आहेतच. पण त्यांना कम्युनिस्ट इतिहासकार, बौद्ध इतिहासकार म्हणून आपण झाडून टाकतो (जसे इथे अनिता पाटील यांच्याबाबतही होऊ शकते) नि त्यांच्या लेखनाची, अभ्यासाची दखल घ्यायला आपण नाकारत असतो. आपल्याला न पटणारे लिहिणार्‍याच्या इलिजिबिलिटीवरच आरोप करून आपण असे संशोधन अडगळीत टाकून देतो.

आज बहुसंख्य हिंदू 'जे मानत नाहीत' किंवा 'आग्रहाने असे नव्हतेच' असा अट्टाहासाने दावा करतात असे अनेक गैरसोयीचे मुद्दे धर्मग्रंथातून सापडतात. माझ्या मते यात शरम वाटावी असे काही नाहीच. आपल्याला आपले नीतिनिकष हजारो वर्षे जुने असायला हवे असतात नि असल्या अट्टाहासातून हा उलटा दुराग्रह येतो. उलट जुन्यातील हीण म्हणा किंवा आपल्याला 'आज' अयोग्य वाटते असे काही आपण सोडून पुढे आलो हे खरंतर प्रगतीचे लक्षण मानावे लागेल.

मी स्वतः इतिहासाचा अभ्यासक नाही, तज्ञ तर मुळीच नाही. परंतु जर कोणी ऋग्वेदातून, उपनिषदातून वा अन्य प्राचीन व्यवस्थेबाबत काही सिद्धांत मांडू पहात असेल तर मी शक्य झाल्यास आवर्जून वाचेन. शक्य झाले नाही, कुवतीबाहेरचे वाटले तर सोडून देईन. पण व्यक्तिची इलिजिबिलिती चॅलेंज करून सारे संशोधनच न वाचता चूक ठरवणार नाही.

ता.क. अनिता पाटील यांच्या लेखातील मुद्द्यांशी, त्यांच्या राजकीय मतांशी मी सहमत आहे का हा मुद्दा वेगळा आहे (थोडक्यात कृपया माझ्याच इलिजिबिलिटीवर घसरू नये. Smile ) हा प्रतिसाद केवळ सर्वसाधारण दृष्टिकोन मांडतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

सर्वसामान्य माणसाला मुळातच जे लिहिले ते भयंकर असे वाटत असेल आपल्यापुरते 'खोटे आहे'
हे मला माझ्यापुरते सोपे, सुटासुटित व सहज आचरणीय वाटते.
.
आपल्याला आपले नीतिनिकष हजारो वर्षे जुने असायला हवे असतात नि असल्या अट्टाहासातून हा उलटा दुराग्रह येतो. उलट जुन्यातील हीण म्हणा किंवा आपल्याला 'आज' अयोग्य वाटते असे काही आपण सोडून पुढे आलो हे खरंतर प्रगतीचे लक्षण मानावे लागेल.
नेमक्या शब्दांत दिलेला संदेश; इतका नेमका की; ह्याहून कमी शब्दांत ह्याहून योग्य संदेश देणे शक्यच वाटू नये.
.
व्यक्तिची इलिजिबिलिती चॅलेंज करून सारे संशोधनच न वाचता चूक ठरवणार नाही.

इथे एक व्यावहारिक अडचण येते. हल्ली अगणित ब्लॉग, पुस्तके छाप्ली जातात. तुम्ही वर दिलेली नावे तर आहेतच (कोसंबी वगैरे.) पन होतं काय की "ब्रिगेड"च्या बाजूने अनेकजण लिहायला पुढे होउ लागतात; कुणी लागलिच "सनातन" च्या बाजूने, कुणी पु ना ओक स्कूल ऑफ थॉट वाले. आता ह्यातल्या प्रत्येकास उत्तरं द्यावीत का? अडचण ही होते की नक्की कुणी कुणी(अभ्यासकांनी ) कुणाकुणाला उत्तरं द्यायची. बरं; होतं काय की, उत्तरं कित्येकदा उत्तरं आधीच दिली गेलेली असतात; पण कुणी ती वाचायचे कष्टच घेत नाहीत, तेच प्रश्न पुन्हा उपस्थित होतात. त्यामुळे दांडगा व्यासंग असणारे सोडाच; थोडीफारही माहिती, निदान उपस्थित केलेल्या आक्षेपाबद्दलचे मुद्दे माहित असणारी व्यक्ती "किती वेळा तीच ती उत्तरं द्यायची" म्हणून सोडून देउ लागते. थकवा , कंटाळा येणं स्वाभाविक नाही का?
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ब्राह्मण गोमांस भक्षण करत असे कुणी लिहिले तर त्यांत धक्का का बसला ते कळले नाही. ब्राह्मण नरभक्षक होते असेही कुणी म्हणेल. म्हणेनात का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

स्वतःला हवे तेच विचार पसरवणारा ब्लॉग म्हणून अनिताबाई पाटलांच्या ब्लॉगला मी ओळखतो.
त्यांच्या ब्लॉगवर जेवढ्या कॉमेंट्स आहेत त्या सर्व मॉडरेट करुन ब्लॉगवर दिसू द्यायच्या की नाही ते त्या ठरवतात. त्यामुळे तुम्ही कितीही विरोधात चर्चेच्या अनुषंगाने जाणारी कमेंट दिली तरी ती त्यांच्या ब्लॉगवर दिसत नाही. आणि लोकसत्तावरील वाचावे-नेट-के सदरामुळे झालेल्या हाणामारीनंतर या बाईंनी अमेरिका टूरच्या निमित्ताने ब्लॉग लेखनाला पूर्णविराम दिलेला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनिता पाटील यांची भाषाशैली वाचताना [इतर अनेक ब्लॉग वाचकांना पडलेला प्रश्न] सातत्याने जाणवत राहते की 'अनिता' या स्त्री-नामामागे कुणीतरी भीमाप्पा यमाप्पा असावा आणि शतकानुशतके सांप्रत महाराष्ट्रदेशी चालत आलेल्या त्या ब्रह्मद्वेषाची मशाल अत्यंत विकृतरित्या पेटवित ठेवत आहे. वाचणार्‍याला काय...मिळते काहीतरी चमचमीत...वाचतात, संताप व्यक्त करतात....ठरल्याप्रमाणे काही अनिताबाईची (?) बाजू उचलून धरतात....विसरून जातात....जशा आता अनिता पाटील याही ब्लॉगला रामराम करून क्लिंटनबाईंच्या गावी गेल्या आहेत....[वर सागर यानी ती पूर्णविरामाची बातमी दिलेली आहेच.]

रामदास झाले, टिळक झाले, सावरकर झाले....आता अशा ब्लॉगर्सना भडास व्यक्त करण्यासाठी पु.ल. आणि कुसुमाग्रज आणि साने गुरुजी सापडले आहेत....तोडत राहतात तारे... त्यांच्यात्यांच्या समग्र लिखाणातून संदर्भेहीन वाक्य तोडून दाखवित सत्यावर विजेरी टाकण्याचा आव आणत.

त्यामुळे सुप्रिया जोशी याना विनंती की, असल्या ब्लॉग्जना भेट दिलीच तरीही त्यातील ते महान मॅटर चर्चेच्या लायकीचे असते असे कदापिही मानू नये....वाचावे, आणि संपल्याक्षणीच भेळेचा कागद झटकल्यानुसार झटकूनही टाकावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसादाच्या मुख्य मुद्द्याशी सहमतच आहे.

फक्त अशा प्रकारचं लिखाण स्त्री करू शकत नाही हे एक स्त्री म्हणून मला पटत नाही. गंमतीत हे वाक्य अनेकदा वापरलेलं असलं तरी ते इथेही तेवढंच लागू आहे, "आम्हीही (स्त्रिया) माणूसच आहोत."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"अशा प्रकारचं लिखाण स्त्री करू शकत नाही हे एक स्त्री म्हणून मला पटत नाही......"

~ अदिती, मी 'वैचारिक बंडखोरी' मान्य करतो आणि विभावरी शिरूरकर, कमल देसाई, छाया दातार, गौरी देशपांडे, सानिया, तसेच अगदी आजच्या कविता महाजन अशा समर्थ लेखिकांनी त्या संदर्भात वापरलेली भाषा खुल्या मनाने स्वीकारतो कारण त्यांच्या लिखाणामागे जो अभ्यास आहे, संशोधन आहे, ते त्यानी एक स्त्री जितक्या संयतपणे मांडू शकते नेमके तशाच पातळीवर मांडले आहे आणि तरीही त्यांचे मुद्दे प्रखरतेने साहित्यात उतरले आहेत. असे अनिता पाटील यांच्या भाषाशैलीविषयी म्हणवत नाही. त्यांचा ब्लॉगवर मांडलेल्या विषयाचा अभ्यास आहे ? जरूर असेल, त्याबद्दल तक्रार करण्याचे कारण नाही, जे प्रतिवाद करतील त्यानी ते जाणवेलच. पण म्हणून अनिताबाईंची 'वैचारिक आदळाआपट' सहन करण्याच्या पल्याडची आहे.

'एक स्त्री अशा प्रकारचं लेखन करू शकेल का ?' या प्रश्नाचे उत्तर आजपर्यंतच्या स्त्री लेखिकांच्या वाचनाच्या माझ्या अनुभवावरून 'नाही' असेच राहिल....हे विधान असत्य निघाले तर मग माझेच वाचन अत्यंत त्रोटक आहे इतकाच अर्थ त्यातून निघेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे विधान असत्य निघाले तर मग माझेच वाचन अत्यंत त्रोटक आहे इतकाच अर्थ त्यातून निघेल.

अधिक खोलात शिरत नाही, परंतु दुर्दैवाने (किंवा कदाचित आपल्या सुदैवाने) असाच अर्थ काढावा लागेल, एवढेच नम्रपणे सुचवावेसे वाटते. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आय अ‍ॅक्सेप्ट द कनक्लुजन...ग्रेसफुली, सर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या बाबतीत वाचन त्रोटक आहे याचा आनंद मानण्यात अडचण नसावी.

एकाच समाजात वेगवेगळ्या प्रकारचे लोकं दिसतात. गांधीजींचे मारेकरी, विरोधक आणि राजकीय, अध्यात्मिक शिष्यही एकाच समाजातले होते. इतिहासाचा अर्थ कुरूंदकरही लावतात आणि ब्रिगेडीही लावतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या बाबतीत वाचन त्रोटक आहे याचा आनंद मानण्यात अडचण नसावी.

नेमके!

थोडक्यात, 'त्रोटक' नाही, 'सिलेक्टिव' म्हणा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.वाचावे, आणि संपल्याक्षणीच भेळेचा कागद झटकल्यानुसार झटकूनही टाकावे.

अशोक काका, अगदी एका वाक्यात अशा द्वेषाने भरलेल्या ब्लॉग्सचे वाचन कसे करावे ते सांगितलेत Smile
पूर्ण सहमत आहे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशोक पाटील यांच्याशी सहमत आहे. साधारणपणे वरवर जरी चाळला तरी ब्लॉगचा हेतु लक्षात येतो. अशा ब्लॉग कडे दुर्लक्ष करावे.
सुप्रिया जोशींनी ऐसी अक्षरे वर अनेक चांगल्या चर्चा आहेत त्यात सहभागी व्हावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

माझ्या वरील प्रतिक्रियेवर ज्या प्रति-प्रतिक्रिया आल्या आहेत त्यावरून असे वाटते की मी अनिता पाटील ह्यांचे लिखाण खुल्या नजरेने पहावे आणि त्यांना dismiss न करता त्यांचे पुरावे तपासावे अशी सूचना करण्यात आली आहे.

ह्या सर्वसाधारण मार्गाने जायला माझी बिलकुल ना नाही. खुल्या मनाने वादविवाद होत राहिले पाहिजेतच. पण असे खुलेपण दोन्ही बाजूंनी असावे.

ब्राह्मण मांसभक्षण करीत होते ह्यात नवे काहीच नाही. वेदांमध्ये ह्याचे भरपूर उल्लेख आहेत. पशुपालन करून उपजीविका करणार्‍या टोळ्यांचे हे नैसर्गिक अन्नच असणार हे उघड आहे. सर्व अभ्यासकांना हे मान्य आहे. मनुस्मृतीतील एक-दोन श्लोकच काय, ५व्या अध्यायातील चारपाच डझन श्लोक हे सांगतात. कॉलेजात संस्कृत शिकत असतांना 'पञ्च पञ्चनखा भक्ष्या:' (पाच नखे असलेले पाच प्राणी खाण्यायोग्य आहेत, मनुस्मृतीतील श्लोकांत ह्यांचाहि उल्लेख आहे) ह्यावरची चर्चा आमच्या prescribed text मध्ये होती. हेच पुनः सांगून अनिताबाई काही अश्रुतपूर्व विचार पुढे आणत आहेत आणि त्यावर खुल्या मनाने चर्चा करण्याला त्या आपणास आवाहन करत आहेत असे मुळीच नाही. त्यांचा 'आम रुख' वेगळाच आहे. ह्या blinding flash of the obvious मुळे डोळे दिपून जायचे काहीच कारण नाही.

मांसभक्षणावरील निर्बंध नंतरच्या शतकांमध्ये केव्हा निर्माण झाले, कसे आणि का ह्याची अभ्यासू चर्चा होऊ शकते. पण अनिताबाईंना अशा चर्चेत काही स्वारस्य आहे का हा प्रश्न आहे. ह्या खोल पाण्यात त्या शिरणार नाहीत असा माझा होरा आहे. इकडची-तिकडची सहज मिळणारी संस्कृत वचने आणि श्लोक वापरून समाजाच्या एका गटाला झोडपायचे इतकाच त्यांचा मर्यादित हेतु मला जाणवतो.

अशा झोडपण्याला त्यांना कोणताहि दांडू चालतो. त्यांचा ब्लॉग वाचा म्हणजे तुम्हाला दिसेल, अथवा दिसावे! त्या वांझ उद्योगापासून त्यांचे लक्ष काही योग्य आणि ज्ञानाच्या दिशेने जाणार्‍या चर्चेकडे वळवता येईल असे तुम्हास वाटत असले तर अवश्य प्रयत्न करा. मी माझा वेळ घालवायला तयार नाही हे मी नोंदवले आहे आणि इतरांनीहि तेच करावे असा माझा कळकळीचा सल्ला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाटील यांचा ब्लॉग वाचला. ब्रिगेडी लिखाण दिसतं. पाचेक मिनिटात त्याचा विद्वेषाचा अजेंडा लक्षांत आला. वेळ घालवण्याकरता याहून कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत. वर कोल्हटकर यांचा प्रतिसाद प्रातिनिधिक आहे. तस्मात् या ब्लॉगकडे दुर्लक्ष केल्या गेले आहे हे नमूद करतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

या प्रतिसादातील 'केल्या' गेले आहे या आणि श्री. अशोक पाटील यांच्या प्रतिसादातील 'भडास' या शब्दांबद्दल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बाकी मूळ विषयावरील प्रतिसादाबाबत ह. मो. मराठे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

ब्राह्मणांनी गोमांस खाण्यात काय विशेष हा प्रश्न मलाही पडला आहे.

अहो जरा गाईंना विचारून पाहा!

आम्हांस आमचा ष्टेक वेलडनपेक्षा मीडियम रेअरच बरा वाटतो. त्यातून किंचित रक्त (तितपत भाजल्यानंतर) अजूनही ठिबकत असल्यास सुवर्णाहूनि पीत.

हाय रे कर्मा!
काय हे अगोचर वागणं.
ह्या अमानुष प्रथेचा निषेध असो!!
गोहत्याबंदी विधेयक झालेच पाहिजे झालेच पाहिजे झालेच पाहिजे!!!

जे कुणी ह्या अशा कबुल्या देताहेत त्या सर्वांना नम्रतेची हात जोडून विनंती... नाही नाही ह्या बैलाचा हात न जोडून एकच प्रशनः
तुम्ही गोमांस खात असाल पण तुम्ही ब्राम्हण आहात हे कशावरून?

धिक्कार असो या भयंकर संस्थळाचा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

अहो जरा गाईंना विचारून पाहा!

तुम्ही कधी विचारता का गायींना? आले लगेच धावत, आरडाओरडा करत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>

अशोकमामांच्या सगळ्याच्या सगळ्या टिप्पणीला अनुमोदन. आयटॅलिक मधले वरचे वाक्य विशेष आवडलेले.
सागर यांनी म्हटल्याप्रमाणे एका वाक्यात सार मांडलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्राचीन सत्ये ही त्या काळापुरती मर्यादित असतात. ब्राह्मण गोमांस व इतरही प्राण्यांचे मांस खात होते. नव्हे, पुत्रप्राप्ती होण्यासाठी कोवळ्या खोंडाचे मांस शिजवून स्त्री व पुरुष दोघांनीही खावे असे एका संस्कृत ग्रंथात कुठेतरी वाचले आहे. शोधून संदर्भ देऊ शकतो. तसेच यज्ञाच्यावेळी कोणकोणत्या आणि प्रत्येकी किती पशूंची हत्या करावी आणि त्यांच्या मांसाचे गावजेवण घालावे याचेही तपशील आढळतात. 'युवा' हा शब्द त्याकाळी 'युगुलातील एक जोडीदार' या अर्थाने वापरला जात होता. श्रीराम व श्रीकृष्ण हे 'देव' तर क्षत्रियच असल्याने त्यांनी मांशासन आणि मद्यपान करावे यात आजही काही विशेष नाही.
असे वाद निर्माण करणारे अनेक उल्लेख हिंदूंच्या धार्मिक साहित्यात शोधून सापडावेत.
पण प्रश्न असा येतो की 'आजच्या' समाजाला हे ऐतिहासिक उल्लेख किती प्रमाणात लागू पडतात आणि त्यांचा 'गैर'वापर सोयिस्कररित्या कसा होतो?

बौद्ध धर्म संक्रमणानंतर निर्माण झालेला हिंदू धर्म हा धेडगुजरी आहे. ना धड वैदिक, ना धड वेदान्ती, ना धड बौद्ध, ना धड शक्ती-उपासक, ना धड लोकदेवताप्रणित, ना धड मूर्तीपूजक, ना धड अमूर्तउपासक, ना धड आश्रमी, ना धड विषयपराङ्मुख... पण या सगळ्या आणि इतर अनेक (अगदी मुस्लिमसुद्धा) विचारपरंपरांचे ते एक कडबोळे आहे.
ही उपासना मार्गांतील विविधता त्याचे सामर्थ्य आहे तसेच त्याचा मर्मबिंदूही आहे.

हे लक्षात घेऊन हवे तर सर्वांनी सहिष्णूतेने एकत्र रहावे अथवा एकमेकांच्या उरावर बसावे. इतिहासातून कोणी काय वापरायचे ही गरज (ज्याची-त्याची) आणि समज (ज्याची-त्याची) यावरून ठरते. अनिता पाटलांनी ब्राह्मणांचा गळा पकडायचे ठरवले आहे. त्यांच्या विचारांना किती किंमत द्यायची ते आपले आपण ठरवायचे.

अवांतर : आजकालचा ब्राह्मणविरोध - टीका करताना थेट ब्राह्मण व्यक्तींवर नावानिशी करायची आणि स्पष्टीकरण देताना 'ब्राह्मण्या'ला (वृत्तीला) विरोध आहे असे म्हणायचे - हा एका विशिष्ट राजकीय खेळीचा भाग आहे हे वेगळे सांगायला नकोच.
ब्राह्मणेतर जातीतलेही अनेक जण आपल्या विद्वत्ता, कर्तृत्व आणि अभ्यासाच्या जोरावर वेगवेगळ्या आघाड्यांवर ब्राह्मणांइतकेच किंवा त्यांच्यापेक्षाही पुढे गेले हे स्पष्ट दिसत आहे आणि ब्राह्मणांनाही त्यांच्या मोठेपणाचा गौरव करणे भाग पडले आहे. त्यांचे उदाहरण घेऊन आपण सर्वजण गुणात्मक रितीने ब्राह्मणांना मागे टाकू असे या आजच्या ब्राह्मणद्वेष्ट्यांपैकी कोणी म्हटल्याचे ऐकिवात नाही. कारण यशाचा हा खडतर मार्ग चोखाळण्याइतके धैर्य या लुंग्यासुंग्या पुढार्‍यांकडे नाही. केवळ कष्टांच्या जोरावर ब्राह्मणांचा गुणात्मक पराभव करणे शक्य नाही अशी शरणागतीची खोटी भावना भविष्यात आपले स्वयंभू कर्तृत्व दाखवू शकणार्‍या ब्राह्मणेतर होतकरूंच्या मनात पक्की करण्याचा गुन्हा या पुढार्‍यांनी केला आहे. ही अगतिकता वापरून त्यांनी आपली राजकीय पोळी भाजून घेण्याची सामाजिक दुही माजवणारी खेळी केली आहे.
Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खूप आवडलेली पोस्ट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण काय हो जोशीबै, तुम्ही का वाचता असलं कैतरी ? अन कुठे सापडला हा ब्लॉग तुम्हाला ? त्यापेक्षा एखादं पुस्तक वाचा, टी.व्ही. पहा, गाणे ऐका, गॅलरीतुन दिसणारी भांडणं पहा अन फारच हौस आली भांडणं करा. काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

dadahari6 February 2012 15:00
अनिताची बोलती कायमची बंद झाली आहे ;
इंटरनेट च्या माध्यमातून मराठी माणसात
विशेषतः ब्राम्हण आणि मराठा समाजात वितुष्ट
निर्माण करून समाजात फुट पाडण्याचा विघ्नसंतोषी
डाव मी उलथून पाडला आहे ; अनिता नावाच्या भस्मासुराचा
वध करण्यासाठी मला काहीकाळ ब्राम्हणविरोधी लिखाण करावे लागले .
त्यामुळे काही काळ माझ्यावरही ब्राम्हणाचा रोष निर्माण झाला होता .
काहींनी तर मला फोन वर धमक्या /शिव्या देखील दिल्या पण मला हें
हलाहल पचवणे भाग होते . अनिताला उघडे पडण्य साठी मी हें हलाहल
पचवले . अनिताची समाजविघातक विचारसरणी/ तिचे खोटे स्त्रीत्व/ मराठा असल्याची
बतावणी आणि तिचे दलित असणे व खरे नाव जेव्हा जगजाहीर होण्याची वेळ आली
तेंव्हा तिने ( त्याने ) फेसबुक आणि ब्लॉग वरून कायमचा गाशा गुंडाळला ..........
हें सर्व करण्या साठी मला ब्राम्हण समाजाला दुखवावे लागले . त्या बद्दल मी दिलगीर
आहे . पण खोलवर रुतलेला काटा काढायचा तर स्वतःची कातडी टोकारावी लागते
थोडी कळ काढावी लागते ....ओठावर दात दाबून वेदना सहन कराव्या लागतात
.........पण रुतलेला काटा काढावाच लागतो अन्यथा त्याचे कुरूप होते .....
मित्रहो मी देखील अनिता या नावाने मराठी माणसात द्वेषाचे कुरूप ठरू
पाहणारा विषारी वेड्या बाभळीचा काटा कायमचा उपसून काढला आहे .
काटा काढताना झालेली जखम कालोघात भरून येईल ....सलणारा -खुपणारा
काटा निघणे गरजेचे होते .तो निघाला ....चला आता पुन्हा बंधुत्वाची
वाट चालूया .............रवींद्र तहकिक ( दादा हरी )
..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या विषयावर दोन दिवस चर्चा झाली. पण मी ज्या हेतूसाठी हा लेख लिहिला होता, तो आणखीन साध्य झालाच नाही. कारण मी जे काही प्रश्न येथे विचारून ठेवले होते, त्यांची नेमकी उत्तरे मिळालेली नाहीत.
माझे प्र्श्न असे आहे -
१. अनिता पाटील यांनी अश्वलायन गृह्यसूत्र नावाच्या कोणत्या तरी ग्रंथाचा आधार घेऊन गोमांस
भक्षणाचे लेख लिहिले आहेत. असा खरेच काही ग्रंथ आहे का?
२.असलाच आहे, तर तो कोठे उपलब्ध होईल?
यांची उत्तरे मला मिळायला पाहिजे आहे.
.......................
अनिता पाटील यांच्या लेखात आलेल्या पुस्तकांच्या नावाची खात्री करून घेता यावी म्हणून त्यांच्या ब्लॉगचा धागा खाली देऊन ठेवते आहे :
http://anita-patil.blogspot.in/
खलील प्रमाने सुद्द्दा हा ब्लोग उघड्तो.
http://anita-patil.blogspot.com/
सरासरी:

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय सुप्रियाजी,

आश्वलायन गृह्यसूत्रे हा एक प्राचीन ग्रंथ आहे. या ब्लॉगवर येथे तुम्हाला या संदर्भात थोडी माहिती मिळेल

हा अजून एक दुवा

संस्कृत मधील आश्वलायन गृह्यसूत्रे या दुव्यावर उपलब्ध आहे. ऑनलाईन वाचता येईल किंवा DLI Downloader च्या मदतीने डाऊनलोड करुन घेता येईल

आश्वलायन श्रौतसूत्र जास्त प्रसिद्ध आहे. याबाबतही येथे माहिती मिळेल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनुस्मृती आणखीन ऋगवेदातील श्लोकांचा खरा अर्थ लोकांच्या पुढे यायला पाहिजे आहे, असे माझे स्वत:चे मत आहे.

"खरा अर्थ" म्हणजे नक्की काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनुस्मृती आणखीन ऋगवेदातील श्लोकांचा खरा अर्थ लोकांच्या पुढे यायला पाहिजे आहे, असे माझे स्वत:चे मत आहे.

तर्कतीर्थ, यासाठी नरहर कुरुंदकर यांचे मनुस्मृती हे पुस्तक जरुर वाचावे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राम व श्रीकृष्ण हे 'देव' तर क्षत्रियच असल्याने त्यांनी मांशासन आणि मद्यपान करावे यात आजही काही विशेष नाही.
हेच म्हणत होतो!

राम हा क्षत्रिय वर्णाचा होता.
क्षत्रियांना तत्कालीन वर्ण व्यवस्थेत मांसाहार किंवा मद्यपान वर्ज्य नव्हते.
त्यामुळे त्या आधारावर 'ब्राह्मण मांसाहार करत असत' हा विचार कसा काय मांडता येतो ते समजले नाही.

बाकी विषयावर कोल्हटकरांशी सहमत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-निनाद

फार सुंदर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>राचीन काळी ब्राह्मण गोमांस खात असत, असे ह्याच्यातील प्रत्येक लेखात वारंवार सांगितले गेले आहे. तसा दावा करण्यात आला, असे म्हणणे अधिक योग्य राहील. प्राचीन काळातील ब्राह्मणांचे गोमांस भक्षण सिद्ध करण्यासाठी पाटील बार्इंनी संस्कृत भाषेतील असंख्य श्लोक लेखात दिले आहेत. हे श्लोक खरे आहेत का, याबाबत मला तरी संशयच वाटतो. कारण मी असे या पूर्वी कधीही ऐकलेले नाही. कुठे वाचलेले सुद्धा नाही.

सदर धागा लेखिकेने सावरकर वाचलेले नाहीत हे वाचून भोवळच आली.

या दुव्यावर पान क्र ११२ पहावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

'ते' वाक्य तुमच्यासाठी नाहिये. ते नवख्या वासरांसाठी आहे, जे नव्याने असले (दोन्हीकडे. याही अन ब्लॉगवाल्याही. तेच करीत आहेत.) प्रक्षोभक लिखाण वाचतात, अन त्यांच्यात माथेफिरू होण्याची ताकत असते.
असो.
तुम्ही दिलेल्या पुराव्याने त्यांचे डोळे उघडण्याची शक्यता उणे शून्य आहे. (is there a number like -0? minus zero?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

is there a number like -0? minus zero?)

अशा प्रकारची संख्या नसली तरी संकल्पना आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Signed_zero

थोडक्यात, उदाहरण देऊन सांगायचं झालं तर तापमान शून्याच्या आसपासच घोटाळत असतं, आपल्या तापमापकात शून्यानंतर एकदम -०.२ अंश से. चा आकडा आहे आणि तापमान शून्य आणि -०.२ च्या अधेमधेच घोटाळत आहे तर त्याला -० म्हणता येईल.
किंवा limit या संकल्पनेतही -० असा प्रकार आहे.

तर त्यामुळे मुद्दा असा की भावना पोचल्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अन मला वाटत होतं की मी मायनस झीरो इन्व्हेंट केलाय.
असो. नवी माहिती मिळाली. धन्यवाद.

(नॉन-गणिती) आडकित्ता

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

'ते' वाक्य तुमच्यासाठी नाहिये. ते नवख्या वासरांसाठी आहे, जे नव्याने असले (दोन्हीकडे. याही अन ब्लॉगवाल्याही. तेच करीत आहेत.) प्रक्षोभक लिखाण वाचतात, अन त्यांच्यात माथेफिरू होण्याची ताकत असते.
असो.

मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे.

(is there a number like -0? minus zero?)

'उणे शून्य' अशी काही संख्या असण्याबाबत काहीसा साशंक आहे, परंतु वचने किं दरिद्रता? बोले तो, संख्येचे ऋणत्व शून्यापाशीच रोखल्याने ते काहीसे सीमित होत नाही काय? उणे अनंतापर्यंतचा स्पेक्ट्रम मोकळा आहे; पुढे जा, अख्खे नऊ वार जा, माणसा, मजा कर!*

थोडक्यात, आपला उपरोल्लेखित प्रश्न प्रस्तुत संदर्भात मूट आहे, असे सविनय सूचित करू इच्छितो. असो.


* 'गो अहेड; गो द होल नाइन यार्ड्ज़, म्यान, ह्याव फन!'
 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणून तर 'न'वी संख्या शोधून काढलिये ना बॉस! मायनस झीरो Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

दुवा वाचला.

अवांतरः

 • 'ग्वाटेमाला' म्हणजे 'गौतमालय' ही व्युत्पत्ती (!) पुनाओकी असावी, अशी समजूत होती. ती सावरकरी असल्याचे वाचून अतीव आश्चर्य वाटले. (तत्रैव, पृष्ठ ११३.)
 • याशिवाय, एकीकडे गांधींची वरकरणी सौम्य खिल्ली उडवणारी, "त्या ‘दुग्धधारां’त गांधीजींच्या शेळीच्या दुधाच्या धाराच फार." (पृ. १०७) किंवा "आज या वेळी गांधीजींच्या घरात (चुकलो आश्रमात! कारण गांधीजी ज्या घरात राहतात त्यास आश्रम आणि ज्या प्रासादात राहतात त्यास पर्णकुटी म्हणायचे असते!) राहतात" (पृ. १०९) अशी (काहीशी कुजकट) वाक्ये जरी पदोपदी पेरलेली दिसली, तरी त्यांआडही,
  • गांधींची ही (सावरकरांच्या विचारसरणीनुसार विरोधाभासी किंवा खिल्ली उडवण्यायोग्य अशी) जी कृत्ये आहेत, तीसुद्धा वरकरणी तशी भासली, तरी अंतिमतः (उदा. जात्युच्छेदनाच्या) अंतिम ध्येयाच्या दृष्टीने पोषकच आहेत, किमानपक्षी त्यांचेही अंतिम ध्येय वेगळे नाही, हे मान्य करण्याचा;
  • भले ही मतभेद असोत, परंतु त्यांच्या (पक्षी: गांधींच्या) विचारसरणीमागील 'मेथड इन द म्याडनेस' काय असावी, हे किमान समजून घेण्याचा प्रयत्न करण्याचा;
  • मार्गाबद्दल किंवा मार्गाच्या उपयुक्ततेबद्दल किंवा योग्यायोग्यतेबद्दल कदाचित मतभेद असले तरी जेथे अंतिम उद्दिष्ट समान दिसले तेथे ते तसे आहे याची दखल घेण्याचा;
  • आणि मुख्य म्हणजे, बाकी कितीही विरोध असो, परंतु गांधींचे एखादे कृत्य जर काही मुद्द्यांवर का होईना, पण योग्य वाटले, तर ते अमूकअमूक मुद्द्यांवर योग्य आहे याचीही दाद देण्याचा

  एका प्रकारचा दिलखुलासपणाही तितकाच पदोपदी* जाणवतो, हेही आश्चर्यजनक.**


*वानगीदाखल:

- पृष्ठ १०६, अंतिम परिच्छेद, ते पृष्ठ १०७, परिच्छेद ५. ("आणखीही एक उपयोग ह्या पत्राचा सहजगत्या होत आहे."पासून ते "चौंडे म्हणे भ्रष्ट तिही लोकी"पर्यंत.)
- पृष्ठ १०८, अंतिम परिच्छेद, ते पृष्ठ ११०, प्रथम परिच्छेद. ("ह्या सहभोजनाच्या घणाघाईखाली एकदा का रोटीबंदीच्या बेडीचे तुकडे उडाले की"पासून ते "अशी चेतावणी (caution) देतो."पर्यंत.)

** हा दिलखुलासपणा पुढे स्वतःस 'सावरकरभक्त' म्हणवत मिरवणार्‍यांपैकी बहुसंख्यात कसा काय बुवा उतरला नाही, अशा दृष्टीने आश्चर्यजनक; अन्यथा, सावरकरांनी दिलखुलास असण्याकरिता कोणास काही प्रत्यवाय असण्याचे काही कारण नसावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नमस्कार!
आपल्या लेखाखाली दिलेला हा जोडः

नवा जोड
................................
प्रश्नांची उत्तरे मिळायला पाहिजे आहे
या विषयावर दोन दिवस चर्चा झाली. पण मी ज्या हेतूसाठी हा लेख लिहिला होता, तो आणखीन साध्य झालाच नाही. कारण मी जे काही प्रश्न येथे विचारून ठेवले होते, त्यांची नेमकी उत्तरे मिळालेली नाहीत.
माझे प्र्श्न असे आहे -
१. अनिता पाटील यांनी अश्वलायन गृह्यसूत्र नावाच्या कोणत्या तरी ग्रंथाचा आधार घेऊन गोमांस
भक्षणाचे लेख लिहिले आहेत. असा खरेच काही ग्रंथ आहे का?
२.असलाच आहे, तर तो कोठे उपलब्ध होईल?

कृपया काढून टाकावा अशी विनंती करतो.
कारण:
१. सागर यांचा हा प्रतिसाद.

२. सर्वश्री. पळसकर, कोल्हटकर इ. यांनीही या "आ"श्वलायन सूत्रांविषयी इतरत्र सखोल चर्चा केलेली आहे.

३. श्री. थत्ते यांचा वरील प्रतिसाद.

***
मा. संपादक.
धागाकर्ती यांनी स्वयंसंपादन न केल्यास, या धाग्यातील वरील addendum कृपया संपादित करावे अशी वरील कारणास्तव विनंती करतो.
धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

सुप्रिया जोशी ताई, एस. एल. सागर लिखित 'हिंदूंनी केलेले गोमांसभक्षण' हा ग्रंथ वाचल्यास तुमचे सर्व प्रश्न निकाली लागतील. पुस्तक बुकगंगा डॉट कॉम वरती उपलब्ध आहे. वेद काळ, ब्राह्मण काळ, उपनिषद काळ, रामायण काळ, महाभारत काळ, सूत्र काळ, स्मृती काळ, पारणं काळ, बौद्ध काळ, मध्य युग काळ, आधुनिक युग काळ या सर्व काळातील पुरावे मिळतील. प्रकाशक: सुगावा प्रकाशन, पुणे. किंमत ८० रुपये, पृष्ठे ११७.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचा आणि विचार करा!