विद्यार्थी, पुस्तके, प्रती अन् प्रताधिकार

'हिंदू' ह्या दैनिकात आणि आंतरजालावर इतरत्र सध्या एक गरमागरम खलित्यांची लढाई सुरू आहे. निमित्त झालं ते दिल्ली विद्यापीठाविषयीच्या एका बातमीचं. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस यांनी दिल्ली विद्यापीठाच्या आवारातल्या एका फोटोकॉपी दुकानावर आक्षेप घेतला आहे. अभ्यासक्रमात शिफारस (रेकमेंडेड रीडिंग) असणाऱ्या पुस्तकांच्या फोटोकॉपी करून त्या विद्यार्थ्यांना दिल्या जातात असा त्यांचा आरोप आहे. विद्यार्थ्यांना तो आरोप मान्य आहे. त्यांच्या मते पुस्तकांच्या किमती जास्त आहेत. त्यामुळे त्यांना पुस्तकं विकत घेता येत नाहीत. याचा आढावा घेणारा एक लेख ('पेजेस अपार्ट') श्री. आकार पटेल यांनी ११ सप्टेंबरच्या 'हिंदू'मध्ये लिहिला. त्यात त्यांनी पुस्तकांच्या परदेशातल्या आणि भारतातल्या किमती देऊन असं म्हटलं आहे की भारतात पुस्तकं खूप स्वस्तात उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दाव्यात तथ्य नाही. प्रताधिकारांचा आदर राखला पाहिजे आणि विद्यार्थी चोर आहेत असा एकूण ह्या लेखाचा सूर आहे. आजच्या 'हिंदू'मध्ये विरोधी बाजूंचे दोन लेख आले आहेत. त्यापैकी 'नॉट ऑन द सेम पेज' ह्या लेखात आकार पटेल यांचे दावे अवास्तव आहेत आणि त्यांना विद्यापीठातल्या परिस्थितीचा अंदाज नाही असं म्हटलं आहे. पाठ्यपुस्तकांच्या लेखकांकडे पुस्तकांचे प्रताधिकार असतात, पण त्यांना पुस्तकांच्या विक्रीतून मिळणारा वाटा फारच थोडा असतो. त्यामुळे लेखकांचा ह्या फोटोकॉपी प्रकाराला मुळात विरोध नाही आणि नफेखोरीवर डोळा ठेवणाऱ्या प्रकाशनसंस्थांना किती महत्त्व द्यायचं असा प्रश्न त्यात उपस्थित केला आहे. ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठांकडून सबसिडी घेणाऱ्या प्रकाशनसंस्थांना भारतासारख्या देशातून इतकी नफेखोरी का करायची आहे, हा प्रश्न त्या लेखात विचारला आहे. 'हूज कॉपी, हूज राइट?' हा सुधन्वा देशपांडेंचा लेखसुध्दा आजच्या 'हिंदू'त आहे. भारतीय प्रताधिकार कायद्यानुसार शैक्षणिक कारणासाठी प्रती काढणं बेकायदेशीर नाही असं ते म्हणतात. जर्नल्समधल्या शोधनिबंधांच्या प्रती किंवा 'आउट ऑफ प्रिंट' पुस्तकांच्या प्रतीही अनेक विद्यार्थी त्याच दुकानामधून घेतात ह्याकडे आकार पटेल पूर्णपणे दुर्लक्ष करताहेत असा त्यांचा आरोप आहे. पटेल फक्त काही पुस्तकांच्या किमती देतात, पण सर्व रेकमेंडेड पुस्तकांची (५४४) एकूण किंमत जवळपास सहा लाख होते. ही परवडण्यासारखी किंमत आहे का, असा प्रश्न ते विचारतात.

या वादाचा 'ऐसी अक्षरे'च्या वाचकांना परिचय होईल आणि प्रताधिकाराच्या संदर्भात 'फेअर यूज'मध्ये कोणत्या प्रकारचं कॉपी करणं बसावं आणि बसू नये याविषयीची त्यांची मतं या निमित्तानं वाचायला मिळतील अशी आशा आहे.

१ - उदा : http://kafila.org/2012/09/19/academic-publishers-an-insiders-perspective...
२ - हे बहुधा सुप्रसिध्द मराठी लेखक आणि विचारवंत गो.पु.देशपांडे यांचे सुपुत्र असावेत.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

दुव्यांत दिलेले लेखन वाचले नाही. परंतु अमेरिका-युरोपातील शैक्षणिक-वैज्ञानिक संशोधन व पाठ्यपुस्तके प्रकाशन करणार्‍या संस्था विदयार्थ्यांचे, संशोधकांचे, विद्यापीठांचे मोठ्या प्रमाणावर शोषण करतात असा अनुभव आहे. यशस्वी पाठ्यपुस्तकांच्या उगाच नव्या आवृत्त्या काढणे जेणेकरून विदयार्थी जुनी-स्वस्त पुस्तके घेऊ शकणार नाहीत. या नव्या आवृत्तीची किंमत भरमसाठ असणे वगैरे. यात प्रकाशन संस्था आणि यशस्वी पाठ्यपुस्तक लेखक दोन्ही फायदा घेतात. संशोधन प्रसिद्ध करणार्‍या नियतकालिकांत (काही सन्माननीय अपवाद वगळता) संशोधन पाठवण्यासाठी संशोधकांना स्बमिशन फी भरावी लागते. रेफ्री, संशोधक लोक फुकटात (अपवाद आहेत) संशोधनाचे उत्पादन करतात तर प्रकाशनसंस्था नियतकालिकाचे वर्गणीदार होण्यासाठी भरमसाठ पैसे आकारतात. एखादाच निबंध हवा असल्यास त्याची किंमत २५-३० डॉलर्सपेक्षा कमी कधीच नसते. या अशा प्रकाशनसंस्थांमुळे ओपनअ‍ॅक्सेस नियतकालिके वाढत आहेत पण अनेकदा टेन्युअर हवे असल्यास अशा नव्या नियतकालिकांतील संशोधनाला फारसे वजन मिळत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्रेमरशी सहमत आहे .reserach पेपर accepet झाल्या नंतर छापून येण्यासाठी भरमसाठ पैसे आकारले जातात,(जर्नल वर असते पण सामान्य पणे २५ हजारांच्या दरम्यान);आणि आवृत्तीचा अनुभव तर स्वतः घेतोय सध्याची नवीन आवृत्ती आहे ८००० आणि ग्रंथालायातली जुनी आहे २०० रु.ची काय हे?)
भारतात काहीही असले तरी पुस्तकाच्या किमती या खरच खूप महागच आहेत. पाच अंन् दहा हजाराचे एक एक पुस्तक कोणाला परवडायचे?
लायब्ररी एक पुस्तक घेते आणि बाकी सर्वांकडे फोटोकॉपी असते...माझ्या मते हा फेअर युज आहे. ..
शिक्षणीक काम करता फोटोकॉपी वापरल्या आहेत/वापरतो आहे आणि वापरल्या शिवाय गत्यंतर नव्हते ...
आणि कायदा काहीही म्हणो, बंदीची भाषा मंजे जरा विनोदीच आहे,बंदी घालायची म्हणली तरी घालणार कशी???
scribd किंवा बऱ्याच ठिकाणी पुस्तके पी डी एफ स्वरूपात उपलब्ध असतातच.

technically याला चोरी म्हणता येऊ शकते पण मग पुस्तकांवर सबसिडी वगैरे प्रकार करून किमती आटोक्यात आणाव्या

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गेल्या वर्षीपर्यन्त 'गिगापीडिया.ऑर्ग' नावाचे एक सङ्केतस्थळ हजारो फुकट पुस्तकाञ्चे (पीडीएफ् आणि देजाव्यू रुपात) आगार होते. संस्थळाचे स्वरूप असे होते की, समजा मला आज वाटले की, माझ्याकडे एक पुस्तक आहे ज्याचा लाभ सर्वान्नी घ्यावा, तर मी ते स्कॅन करून आन्तरजालाअवर चढविणार आणि इतरान्ना खुले करणार. थोडक्यात, यू-ट्युबवर जसे कुणीही एखादी चित्रफीत चढवू शकते/उतरवून घेऊ शकते, तसे हे पुस्तकांसाठीचे सङ्केतस्थळ होते. कुठल्याही (अगदी कुठल्याही) विषयावरची उत्तम ते दुर्मीळ अश्या पुस्तकाञ्चा महत्प्रदीर्घातिप्रचण्ड साठा होता. अमेरिकन कायद्याने गळचेपी केल्यावर त्याञ्च्या सर्व्हरचे बस्तान आइस्लॅण्डिक देशान्त (न्यूए) हलले आणि 'लायब्ररी.न्यु' या नव्या संस्थळावर तोच साठा पुन्हा उपलब्ध झाला. पण हे फार काळ चालले नाही. याच वर्षीच्या सुरूवातीस एका आन्तरराष्ट्रीय प्रकाशन समुदायाच्या चमूने म्युनिकमधील एका न्यायालयात या सङ्गेकस्थळाविरुद्ध दावा जिङ्कला आणि हेही संस्थळ बन्द झाले. (आता तुम्ही या संस्थळावर जाऊ शकता पण तेथे पुस्तके फुकटात मिळणार नाहीत.) या सर्व घडामोडीञ्चा आढावा घेणारा (आणि प्रकाशकान्नी चालविलेल्या नफेखोरीवर बोलणारा) हा लेख वाचनीय आहे. लेखाचे लेखक हे कॅलिफोर्निया विद्यापीठात मानववंशशास्त्र आणि माहिती-अभ्यास या विषयाञ्चे प्राध्यापक आहेत. त्यान्नी वाचकाञ्ची बाजू निश्चित माण्डली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मीही दुव्यातलं लेखन अजून वाचलेलं नाही. पण मला प्रश्न पडतो की हे किती काळ चालू राहील? संगीताच्या क्षेत्रात क्रांती होताना दिसते आहेच. एके काळी सीडी, किंवा कॅसेट वगैरे वस्तूंमध्ये संगीत जपून ठेवून त्या वस्तू विकण्याचा धंदा होता. तो अजूनही बऱ्याच प्रमाणात चालू आहे. पण त्याचबरोबर त्या वस्तूंपलिकडे जाऊन त्यातला निव्वळ कंटेंट विकण्याकडे आता कल व्हायला लागला आहे. ऍपलने 'एक डॉलरला एक गाणं' या होलसेल भावाने विकायला सुरूवात करूनही बरीच वर्षं झाली. तसंच काहीसं लिखित कंटेंटचं होईलसं दिसतं आहे. मात्र कॉलेजांसाठी लागणारं साहित्य हे आधुनिक असावं लागतं. (असा निदान समज आहे. आता अकरावीचं फिजिक्स किंवा गणित बदलून बदलून किती बदलणार?) पण एक दिवस त्याचंही कमोडिटायझेशन होईलच. तेव्हा कदाचित चोरून झेरॉक्स काढण्यापेक्षा १०० रुपयांना अधिकृत कॉपी स्वतःची घेणं स्वस्त पडू शकेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0