जागतिक तापमानवाढ - प्रलयघंटावाद की वस्तुस्थिती?

गेल्या रविवारच्या 'लोकसत्ता'मध्ये 'जागतिक तापमानवाढ: ‘प्रलय-घंटावाद’ आणि वस्तुस्थिती' या शीर्षकाखाली राजीव साने यांचा एक लेख प्रसिध्द झाला होता. नायगेल लॉसन या ब्रिटिश राजकारण्याच्या 'अ‍ॅन अपील टू रीझन : अ कूल लुक अ‍ॅट ग्लोबल वॉर्मिंग' या पुस्तकातल्या माहितीवर आधारित या लेखाचा सूर हा तापमानवाढ रोखण्यासाठी कठोर उपाय तात्काळ योजायला हवेत असं म्हणणार्‍यांच्या विरोधात होता. तापमानवाढीचे दुष्परिणाम फारसे घातक नसतील असा लॉसन यांचा दावा साने यांनी उचलून धरला होता. आयपीसीसी आणि त्याचे प्रमुख राजेंद्र पचौरी (पंकज पचौरी असा साने यांचा उल्लेख चुकीचा आहे) यांच्यावर साने यांनी टीका केली होती.

त्या लेखाला प्रतिसाद म्हणून आज अतुल देऊळगावकर यांचा 'टोळीसत्ता, शास्त्रांचा बाजार आणि पोरके वास्तव' हा लेख 'लोकसत्ता'नं छापला आहे. त्यात देऊळगावकर यांनी लॉसन यांच्या चुका, त्यामागची त्यांची राजकीय भूमिका आणि ती कुणाच्या सोयीची आहे याचा पर्दाफाश केलेला आहे. त्याचबरोबर लॉसन यांच्या भूमिकेला मान्य करण्यामध्ये भारताचा आणि इतर विकसनशील देशांचा कसा तोटा आहे हेदेखील विशद केलेलं आहे. त्यासाठी त्यांनी स्टर्न रिपोर्ट, आयपीसीसीवरचा दबाव आणि इतर संशोधन अशा अनेक गोष्टींचा आधार घेतला आहे.

'ऐसी अक्षरे'च्या वाचकांच्या या वादावरच्या प्रतिक्रिया जाणून घेणं रोचक ठरेल.

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

घासु गुर्जींनी यापूर्वीच या विषयावर लेख लिहिले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

"द ग्रेट ग्लोबल वॉर्मिंग स्विन्डल" ही फिल्म यासंदर्भात आठवली. ती इथे पाहू शकता:
http://www.youtube.com/watch?v=YtevF4B4RtQ

अल गोर यांच्या 'द इन्क्न्व्हीनियन्ट टृथ' या फिल्म ला ही फिल्म उत्तर होती असं ऐकून आहे.

या बातम्यांना मिळणार्या किंवा न मिळणार्या प्रसिद्धीमागे अर्थकारण-राजकारण असणार याबद्द्ल कधीच शंका नव्ह्ती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शास्त्रीय लेखनाला प्रतिसाद म्हणून हवामानशास्त्रज्ञाच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाकर लेख हा प्रकार विनोदी वाटला.

पृथ्वीच्या पृष्ठभागावरचं वेगवेगळ्या ठिकाणचं हवामान अनेक कारणांमुळे बदलत होतं आणि आहे. सूर्यात होणारे बदल, पृथ्वीच्या आसाचा कोन, एखादी अवकाशस्थ वस्तू पृथ्वीवर आदळणे इ. कारणांमुळे मानवाने काहीही न करतासुद्धा हे बदल घडतात. समुद्राची पातळी वाढण्यामुळे मालदीव पाण्याखाली जाईल अशी भीती होती तो द्वीपसमूह पृथ्वीच्या आतल्या घडामोडींमुळे उलट वर सरकतो आहे, तसेच इतर काही भाग पाण्याखालीही जातील. इथे मानवाच्या कर्तृत्वाचा संबंधही नाही. त्याबद्दल आपण काहीही करू शकत नाही. बांग्लादेश आणि इतर ठिकाणचे लोक बेघर होतील त्याची काळजी वाटणं समजू शकतं. पशूपक्ष्यांच्या अनेक जाती नष्ट होण्याबद्दल असणारी काळजी मात्र थोडी अवास्तव वाटते.

डायनोसोर नष्ट होण्यात माणसाचा काही हात नव्हता. हे थोडं टोकाचं उदाहरण झालं. मध्यंतरी टीव्हीवर पाहिलेल्या कार्यक्रमातून (संदर्भ विसरले): ज्वालामुखीच्या उद्रेकाने स्थानिक इकोसिस्टम (मराठी?) नष्ट झाली. तप्त लाव्हामुळे काहीही जिवंत टिकेल असं वाटत नव्हतं. काही महिन्यांनी तिथे नवीन इकोसिस्टम तयार होऊ लागली. काही वर्षात ती तिथे स्थिर झालीही! तापमानवाढीमुळे किलीमांजारोवरही आता बर्‍याच उंचीपर्यंत डास दिसतात असं निरीक्षण आहे. आपल्याला या डासांचा उपद्रव म्हणून आपल्याला तापमानवाढ नकोशी! पण संपूर्ण पृथ्वीसाठीच काय चांगलं, काय वाईट हे ठरवणारे आपण कोण? काही प्रकारचे प्राणी (उदा: बीव्हर) हिवाळ्यातल्या उदरनिर्वाहासाठी उन्हाळ्यात झाडं तोडतात. ही वृक्षतोड नैसर्गिक म्हटली तर माणसाच्या गरजांसाठी माणसाने केलेली वृक्षतोड अनैसर्गिक का म्हणावी?

---

काही गोष्टी जगासाठी नाही, स्वतःसाठी करते. शक्यतोवर सार्वजनिक वितरण व्यवस्था वापरते जेणेकरून रस्त्यावरचे अपघात कमी होतात. कापडी पिशव्या वापरते कारण समुद्रकिनारा, तलावांचे काठ वगैरे ठिकाणी प्लास्टीकच्या पिशव्या पहाणं तापदायक वाटतं. माझ्या हातात असताना ए.सी.चा वापर कमी ठेवते कारण विजेचं बिल आणि गाडीतलं पेट्रोल आपल्यालाच भरायचं असतं. सायकल चालवते, थोडे कूल पॉईंट्स मिळतात. रिसायकल करताना, विशेषतः काचेच्या बाटल्या, तोडण्या-फोडण्याचा आनंद मिळतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जॉर्ज खार्लिन् ची ही साडेसात मिनिटे ऐका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही प्रकारचे प्राणी (उदा: बीव्हर) हिवाळ्यातल्या उदरनिर्वाहासाठी उन्हाळ्यात झाडं तोडतात. ही वृक्षतोड नैसर्गिक म्हटली तर माणसाच्या गरजांसाठी माणसाने केलेली वृक्षतोड अनैसर्गिक का म्हणावी?

उदरनिर्वाहासाठी. हा शब्द फार महत्वाचा. माणसे झाडे तोडतात ती गरजेपुरती नव्हे. आणि ज्या गतीने झाडे उगवतात आणि वाढतात त्याचा आणि तोडल्या जाण्याच्या गतीचा काहीच मेळ बसत नाही. झाडे तोडणे सोडा, जेवढी गरज नाही तेवढे प्राणी मारुन त्यांचे मांस डबाबंद करुन ठेवायचे, दूध नको तेवढे उत्पन्न करुन पावडर करुन ठेवायचे, गरज नाही तेवढे पाणी नासवून टाकायचे, गरज नाही तेवढी उर्जा नासवायची हे धंदे नैसर्गिक कसे म्हणायचे? असो. माणूस हा निसर्गाचा भाग, म्हणून त्याने बनवलेले सर्वच नैसर्गिक असे कसे काय म्हणावे बरे? मग प्लास्टीकचा कचराही त्याच न्यायाने नैसर्गिक नाही का?

बाकी संपूर्ण पृथ्वीसाठी काय बरं आणि काय वाईट हे ठरवणारे आपण कोण हा प्रश्न रुचला नाही. आपण नाही ठरवणार तर कोण ठरवणार? कार्ल सेगनच्या भाषेत -

We're made of star stuff. We are a way for the cosmos to know itself

(कॉसमॉस).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तापमानवाढ आणि झाडांचा खूप जास्त संबंध नाही. कार्बन डायॉक्साईड 'रिचवण्याचं' काम प्रामुख्याने समुद्रातले जीव, प्लँक्टन, करतात. झाडांमुळे जमिनीचा वरचा कसदार थर टिकून रहातो, वारा अडतो, पाऊस पडतो इ. मनुष्यांना हव्याशा गोष्टी घडतात.

गरजेपेक्षा अधिक कसं ठरवणार? अन्न साठवू शकतो म्हणून आपण अस्तित्त्वाचा विचार करू शकतो. दिवसाचे उजेडाचे बारा तास अन्न शोधण्यात, खाण्यात गेले तर आपल्या वाढलेल्या मेंदूचा काहीही उपयोग नाही. त्यामुळे एक प्रकारे (फक्त) मनुष्याचा मेंदू वाढणं हीच पृथ्वीवरच्या इतर जीवांसाठी वाईट बातमी आहे. सात हजारवर्षांपूर्वी (दीर्घकालीन) दुष्काळ आला म्हणून आताच्या सहारा वाळवंटाच्या उत्तरेला असणार्‍या सुपीक भागातल्या लोकांना स्थलांतर करावं लागलं, आता त्याची तीव्रता फारच कमी झाली आहे. डबाबंद केलेलं मांस, पावडर केलेलं दूध वाया गेलं असं कसं म्हणता येईल? लांडगे, वाघही एकच प्राणी मारून तो चार दिवस खातात. मात्र एकीकडे योग्य किंमत नाही म्हणून मका जाळायचा आणि दुसरीकडे लोकं पुरेशा पोषणाअभावी मरत आहेत तेव्हा ते अन्न वाया जात आहे. ते ही १००% वाया जाणं नाही, कारण राखेतून पुन्हा पुढच्या पीकासाठी पोषण मिळतं.

आपण नाही ठरवणार तर कोण ठरवणार?

आपण खरंच एवढे शक्तिवान आहोत का? इकोसिस्टमला थोडा धक्का लावला तर तिथे छोटे फरक घडून शेवटी कदाचित मोठा परिणाम दिसणार नाही. पण त्यापलिकडे काही करायला गेलो तर माणूस परिणाम थांबवू शकतो का? मुंबईत बिबट्याने माणसांवर हल्ला करणं, हत्तींनी शेती तुडवणं वगैरे बातम्या लहान म्हणाव्यात. भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी हे तर आपल्याला अजून कधी होणार हे ही सांगता येत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"Since the 1990 IPCC Report, considerable progress has been made in attempts to distinguish between natural and anthropogenic influences on climate.
This progress has been achieved by including effects of sulphate aerosols in addition to greenhouse gases, thus leading to more realistic estimates of human-induced radiative forcing.
These have then been used in climate models to provide more complete simulations of the human-induced climate-change "signal".
In addition, new simulations with coupled atmosphere-ocean models have provided important information about decade to century time-scale natural internal climate variability.
A further major area of progress is the shift of focus from studies of global mean changes to comparisons of modelled and observed spatial and temporal patterns of climate change.
...
Our ability to quantify the human influence on global climate is currently limited because the expected signal is still emerging from the noise of natural variability, and because there are uncertainties in key factors.
These include the magnitude and patterns of long term natural variability and the time-evolving pattern of forcing by, and response to, changes in concentrations of greenhouse gases and aerosols, and land surface changes.
Nevertheless, the balance of evidence suggests that there is a discernible human influence on global climate."

- IPCC Working Group I - "The Science of Climate Change"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमच्या प्रतिसादातून असे दिसत आहे की तुम्ही मानवनिर्मीत प्रदूषण/ पर्यावरणाच्या संतुलनाला हानीकारक असलेल्या मानवनिर्मीत कारवायांना विशेष महत्व देत नाही आहात. पृथ्वीच्या एकंदर आवाक्यापुढे आपले आणि आपल्या कारवायांचे आकारमान अगदीच क्षुल्लक आहे, आणि इर्रिलेव्हंट आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे काय?

माणसाच्या कारवायांचे जेवढे परिणाम निसर्गावर होतात, त्याहून अनेक पटींनी अधिक परिणाम इतर अनेक घटकांनी होतात असे तुमचे म्हणणे असेल, तर त्यात मला काहीच दुमत वाटत नाही; पण म्हणून माणसाच्या कारवाया कमी दखलपात्र ठरत नाहीत. अन्न साठवणे आणि अन्नाची नासाडी यातले तारतम्य तुम्हाला समजत नसावे असे म्हणवत नाही. चुकीच्या गोष्टी चूकच असतात. त्याचे समर्थन कशासाठी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नासाडी वेगळी आणि साठवणी वेगळी. नासाडीचं समर्थन नाही. रास्त भाव मिळत नाही म्हणुन मका जाळून टाकण्याचं मी समर्थन करत नाही. पण भारतात ज्या प्रकारे अन्नाची नासाडी होते, त्यात खरोखरच नासाडी या उद्देशाने अधिक उत्पादन केलेलं असतं का? रास्त भाव न मिळण्यामुळे पिकं जाळणं ही सुद्धा वितरणव्यवस्थेतली त्रुटी म्हणावी का?

माझा किंचित आक्षेप "आपणच पृथ्वी वाचवू शकतो" या भूमिकेवर आहे. आपण आपल्याकडून सांभाळण्याचे प्रयत्न करू शकतो, पण माणूस ही जमात अजूनतरी एवढी शक्तिमान आहे असं मला वाटत नाही. परिणाम एकच असला तरीही पृथ्वी वाचवण्याचे (हॉलिवूडी) श्रम करण्यापेक्षा स्वतःचे हातपाय आवरून बसण्याची भूमिका मला ठीक वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

स्टेट ऑफ फिअर (आता लेखक फार्फार प्रसिद्ध आहेत आणि ते म्हणताहेत म्हणून ललित कादंबरी म्हणायचं.. नाहीतर लालित्य जवळजवळ नसलेल्या) नावाच्या कादांबरीत याबद्द्ल उहापोह करून लॉसन यांच्या मताची पुष्टी केली आहे.

बाकी ते पुस्तक कितीही रटाळ असलं आणि त्याच त्या माहितीचा भडिमार असला तरी दिलेली माहिती व व्यक्त केलेले मत अगदीच टाकाऊ वाटले नाही.. तेव्हा हा प्रलयघंटावाद असावा असे प्रथमदर्शनी तरी वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तेच म्हण्णार होतो, स्टेट ऑफ फिअरमध्ये उत्तम (आणि बरीच) माहिती आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तापमानवाढ हे एकमेव कारण मनुष्याला तापदायक नाही अशा अर्थाचा एक लेख आत्ताच ब्लूमबर्गवर वाचला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>शास्त्रीय लेखनाला प्रतिसाद म्हणून हवामानशास्त्रज्ञाच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाकर लेख हा प्रकार विनोदी वाटला.

म्हणजे काय ते कळलं नाही. शास्त्रीय लेखन कुणाचं? नायगेल लॉसन हे टोरी पक्षाचे राजकारणी आहेत. साने यांचं लिखाण त्यांच्या दाव्यांवर आधारित आहे. तर देऊळगावकर यांच्या लिखाणात आलेले उल्लेख ज्यांचे आहेत ते आपापल्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. निकोलस स्टर्न हे अर्थतज्ज्ञ आहेत. ते एकेकाळी जागतिक बँकेवर चीफ इकॉनॉमिस्ट होते. प्रसंगी सरकारला अप्रिय वाटलं तरी आर्थिक तज्ज्ञ म्हणून मला पटेल तेच सांगेन या बाण्यासाठी ते प्रसिध्द आहेत. सय्यद इकबाल हस्नाईन हे शास्त्रज्ञ आहेत. बाकी राजेंद्र पचौरी कोण ते इथल्या वाचकांना माहीत असेल अशी अपेक्षा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सान्यांच्या लेखात बरीच आकडेवारी आहे. कोणत्या वर्षात समुद्रपातळी किती वाढलेली असेल याचे अंदाज, त्यातलं तथ्य अशा प्रकारचं हे लेखन आहे. त्याला उत्तर देताना कोण कोणत्या पक्षाचा आहे आणि कोणाला कोणाचं फंडीग आहे यापेक्षा त्या लेखातली आकडेवारी चूक आहे किंवा त्याचं स्पष्टीकरण अपूर्ण अथवा चूक आहे अशा प्रकारचं उत्तर यथायोग्य वाटलं असतं. या क्षेत्रात राजकारण आहे याबद्दल शंका नाही, फक्त (सान्यांच्या लेखातल्या) आकडेवारीला उत्तर म्हणून ते योग्य वाटत नाही. सान्यांच्या लेखात आणि त्याआधी टेलिग्राफमधे पचौरी यांची निष्कारण बदनामी झालेली आहे यात वाद नाही, पण त्याचा तापमानवाढीशी काय संबंध? तापमानवाढ, त्यामागचं विज्ञान वेगळं आणि त्यामागचं अर्थ-राजकारण निराळंं. देऊळगावकरांच्या लेखात बहुतकरून अर्थकारण, राजकारण आहे (जे दुर्लक्ष करण्यासारखं अजिबात नाही) पण या राजकारणाचा अर्थ मानवाच्या कृत्यामुळे तापमानवाढ होते आहे असा निघत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>सान्यांच्या लेखात बरीच आकडेवारी आहे.

हो, पण आकडेवारीचा स्रोत (नायगेल लॉसन) हा कोणतीही विश्वासार्हता नसलेला आहे.

>>त्या लेखातली आकडेवारी चूक आहे किंवा त्याचं स्पष्टीकरण अपूर्ण अथवा चूक आहे अशा प्रकारचं उत्तर यथायोग्य वाटलं असतं.

ते उत्तर स्टर्न अहवालात सापडावं. मला वाटतं की देऊळगावकरांच्या लेखाचा हेतूच मुळात प्रोपागांडाला बळी पडण्यापासून वाचकांना परावृत्त करण्याचा आहे. त्यानंतर शोधली तर त्यांना पुष्कळ माहिती सहज सापडेल. उदाहरणार्थ, सहज शोधता मला हा ताजा दुवा मिळाला. अनेक शास्त्रज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि वीस सरकारांनी सहकार्य करून निर्माण केलेला हा अहवाल एका टोरी राजकारण्याच्या आकडेवारीपेक्षा अधिक विश्वासार्ह वाटतो. त्यात असं म्हटलेलं आहे -

By 2030, the researchers estimate, the cost of climate change and air pollution combined will rise to 3.2% of global GDP, with the world's least developed countries forecast to bear the brunt, suffering losses of up to 11% of their GDP.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सँडी हरिकेन अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे वादळ ठरण्याची शक्यता आहे अशी टी.व्ही. वर तसेच सकाळ वृत्तपत्रात बातमी आहे.

जागतिक तापमानवाढीचा या वादळाशी काही संबंध आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काल पैर्णिमा होती त्याचा संबंध असू शकेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

'प्रलयघंटावाद' हा शब्द आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कालच्या लोकसत्तामध्ये साने आणि इतरांचे प्रतिसाद आले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--
माहितगार