छायाचित्रण पाक्षिक-आव्हान १० : गर्दी

पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे : गर्दी

"गर्दीचं गाणं", "गर्दीतला निवांत क्षण" असे विषय मनात आले होते, पण छायाचित्राचं आकलन/बोध हा सापेक्ष विषय असल्याने फक्त गर्दी असा विषय देतो आहे. विषय गर्दी असला तरी आशय तुमच्या मनातला असू शकतो, विषयासाठी चित्र न काढता आशयासाठी चित्र काढा, तुमच्या छायाचित्रातून तुमच्या मनीचे थोडक्यात सांगा. फोटो नीट एडिट करून दिल्यास तुम्हाला जे सांगायचे आहे ते नेमके कळण्यास मदत होते.

स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र स्पर्धा काळ संपल्यानंतर, निकाल घोषित झाल्यावर त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही किंवा स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.

२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमुद करावे.

३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परीक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहिल.)

४. एक स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट १२ नोव्हेंबर रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल व १३ नोव्हेंबर मंगळवारी विजेता घोषित होईल व तो विजेता पुढील विषय देईल.

५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचाराव्यात, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती.

६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्याचे असतील. त्यासाठी त्याने ठरविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाचा वीरच आव्हानदाता असेल).आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले तरी अपेक्षा जरूर आहे.

७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच आव्हानवीर घोषित करणे बंधनकारक आहे.

८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.

९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.

१०. कॅमेरा व लेन्सची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास एफ्झिफ डेटा द्यावा.

चला तर मग! "गर्दी" करा छायाचित्रांची.

सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपण काढलेले फोटो कसे प्रदर्शित करावेत याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.

फोटो अपलोड करताना, अपलोड करणार्‍यांनी जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून डिलीट करावा. कृपया याची नोंद घ्यावी.

मागचा धागा: विषय - रंग.

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हिथ का उभार्लास चल र ज्ञानाच दर्सन गिउ
आर बाबारे किवडि हि गर्दि ....दर्सन मिळल का
त्यापरिस त्या इंद्रायणीत डुबकि मारून जाउ कि जत्रला
किवडि बग भरलिय जत्रा......

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तार्यांना पहाण्यासाठी जमलेली गर्दी:

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रोहतक (हरयाणा) इथं मिनी सेक्रेटरिएटवर आलेला एक मोर्चा. मार्च २०१२.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Camera SONY
Model DSC-W70
ISO 1000
Exposure 1/60 sec
Aperture 2.8
Focal Length 6mm
Flash Used false

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Camera SONY
Model DSC-W70
ISO 100
Exposure 1/10 sec
Aperture 2.8
Focal Length 6mm
Flash Used true

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

"खुर्च्या: भाड्याने आणलेल्या" हे पुलंचे न-नाट्य आठवले Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा एक विषयानुरूप फोटो फेसबुकावर दिसला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Camera Model Canon EOS 550D
Shooting Mode Manual Exposure
Tv( Shutter Speed ) 1/90
Av( Aperture Value ) 5.6
ISO Speed 400
Lens EF-S18-55mm f/3.5-5.6 IS

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नको असलेली तिसरी व्यक्ती असणं म्हणजे गर्दी असं कोणीतरी म्हटलंय, त्यामुळे आपण नको आहोत की काय ह्या भावनेने बहूदा इथे फार कोणी गर्दीच केली नाही. पण पुण्यामधे ४-५ लोकांच्या गर्दीवर पण "आज सभा घेतली" वगैरे सहज बोललं जातं, त्या धर्तीवर ह्या पाक्षिकाच्या निकालाची सोडत आज आपण इथे करत आहोत तरी सर्वांनी गर्दी करु नये.

पहिल्या क्रमांक ऋषिकेश व अतिवास ह्यांच्या छायाचित्रांना आहे, रोहतकचा मोर्चा एका चित्रात बरच काही सांगतो, "हमरीतुमरीवर आलेले मोर्चेकरी, जवळच निवांत उभे असलेले लोकं, बसून गप्पा मारणार्‍या बायका, जवळपास मारामारी होत असताना शांत उभे असल्याने कामचुकार वाटणारे पोलीस", तांत्रिक बाबींमधे फोटो थोडा कमी असला तरी तो बराचसा उपलब्ध तंत्राचा कमीपणा असल्याने छायाचित्रकाराचे कौशल्य कमी मानण्याचे कारण नाही. ऋषिकेश ह्यांनी दिलेली छायाचित्र पण उत्तम आहे, माशांना बघायला केलेली गर्दी व माशांनी केलेली गर्दी ह्याचे मिश्रण उत्तम जमले आहे, तसेच निळ्याशार पार्श्वभूमीवर गर्दीचे सिलऊट/सिलऑट(silhouette) छान दिसते आहे, तांत्रिक बाबीतही चित्र उत्तम आहे.

दुसरा क्रमांक शाबि ह्यांच्या आळंदीच्या गर्दीला आहे, चित्र थोडे वरुन क्रॉप केल्यास गर्दीचा इफेक्ट अधिक जाणवला असता.

तिसरा क्रमांक तर्कतीर्थांच्या कंदिलांचा आहे, वास्तविक पहाता रांगेत नीट लावल्याने फार गर्दी झाल्यासारखी वाटलीच नाही म्हणून तिसरा क्रमांक दिला आहे, पण चित्रात टिपलेला रंगीत प्रकाश मोहून टाकणारा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुढील आव्हान देण्याच्या सोयीसाठी एकच पहिला क्रमांक घोषित करणे बंधनकारक आहे. तेव्हा पुढील आव्हान कोणी द्यायचे दे मी यांनी सांगावे ही विनंती

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पुढील विषय कोणी द्यावा हे तुम्ही परस्पर संमतीने ठरवावे अशी विनंती करतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दी झाली! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घरांची गर्दी.
गर्दी नसते तेंव्हा
मरणांत गर्दी
ढोल गर्दी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'गर्दी' हा विषय थोडा अवघड वाटला होता आणि कमी स्पर्धक आले हे कदाचित त्यामुळे असेल.
एक माझ्या लक्षात राहिलेला गर्दी या विषयाला धरून असलेल्या फोटोचं वर्णन करावसं वाटत. (हा फोटो प्रवासात असताना दुसर्याच्या हातातल्या पेपरमध्ये पाहिला होता.) सचिन तेंडुलकर बाद झाल्यावर परततो आहे...तो फोटोत समोर आउट ऑफ फोकस आहे. फोकस मध्ये मागे स्टेडियम मधली गर्दी आहे...सचिन आऊट झाल्यावरची निराशा सगळ्यांच्या चेहर्यावर आणि आविर्भावात आहे (कुणाचे डोळे मिटलेत, कोणी डोक्याला हात लावलेत, कोणी आकाशाकडे निराशेने पाहातो आहे, वगैरे). ही निराशा अधिकच होती कारण सचिनच्या १००व्या शतकाच्या प्रतिक्षेत ही गर्दी होती !

मला फोटोग्राफरचं नाव किंवा कोणत्या पेपरमध्ये हा फोटो आला होता काहीच आठवत नाही :(. कुणाला माहित असल्यास माहिती द्यावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0