नरेंद्र मोदींचा 'व्हायब्रंट गुजरात' की तहलकाचा गंजलेला लोहपुरुष?

गुजरात निवडणुका जवळ आल्यामुळे मोदीभक्त आणि मोदींविरुध्द त्वेष बाळगणारे अशा दोहोंकडून मोदींच्या गुजरातबद्दल विविध दावे केले जात आहेत. मोदी जिंकणार हे निश्चित असं म्हणतानादेखील जाहिरातींतला गुजरात आणि वास्तवातला गुजरात यांच्यातला फरक टिपण्याचा एक उल्लेखनीय प्रयत्न 'तहलका'नं 'The Iron man Begins To rust' या लेखात केला आहे. केवळ मुस्लिमच नाही, तर इतर काही गटांत मोदींविषयी असंतोष आहे असा त्यात दावा आहे. उदाहरणार्थ, अमित शाहना मोदींनी वाचवलं, पण माया कोदनानींना वाचवलं नाही याबद्दल सिंधी समाजात मोदींविषयी रोष आहे असं लेखात म्हटलं आहे. गुजरातेत स्थायिक झालेले उत्तर भारतीय हिंदुत्ववादीसुध्दा मोदींच्या विभाजनवादी राजकारणावर नाराज आहेत असा दावाही त्यात आहे. लेवा पटेलांसारख्या काही जाती विकासाचा पुरेसा फायदा न मिळाल्यामुळे चिडल्या आहेत; मोदींच्या निर्णयामुळे उद्योगांना मदत झाली, पण स्वस्त जमीनविक्री आणि पाण्याचा अभाव अशा समस्यांमुळे शेतकरी वंचित आहेत असे दावे लेखात केले आहेत. गुजरातच्या विकासदराविषयी ऐतिहासिक आकडेवारी देऊन आधीपासून इतर राज्यांपेक्षा जलद गतीने विकास करणाऱ्या गुजरातचा विकासदर उलट मोदींच्या काळात कमी झाल्याचं ही आकडेवारी दाखवते. विकासातल्या अपयशामुळे काँग्रेसनंसुध्दा दंगली वगैरे जुने मुद्दे बाजूला सारून विकासाच्या मुद्द्यावर प्रचाराचा भर ठेवला आहे असंही लेखात म्हटलं आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळी मोदींची बाजू घेणारी काही प्रसारमाध्यमं ह्या आणि अशा कारणांमुळे या वेळी मोदींवर टीका करत आहेत असाही तहलकाचा दावा आहे.

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (4 votes)

प्रतिक्रिया

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

या लेखात म्हटलेली परिस्थिती खरी असेलही.पण मला नेहमी एक प्रश्न पडतो.सगळ्याच पक्षांची सरकारे आपल्या केलेल्या किंवा न केलेल्या कार्याचा डंका पिटत असतात.आपण बिहारमध्ये सामाजिक न्याय आणला असा डंका लालू पिटू शकतात तर आपण बंगालमध्ये समतेवर आधारीत व्यवस्था आणली असा डंका डावे पिटतात.केंद्रात सत्तेत असलेला काँग्रेस पक्ष तर कित्येक वर्ष गांधी घराण्याने त्याग केला असा डंका पिटत आहे.सांगायचा मुद्दा म्हणजे सगळेच पक्ष स्वतःची लाल करण्यात पुढे असतात. पण मोदींच्या डंक्याची जितकी चिरफाड होते तितकी इतर डंक्यांची होत नाही.

सुरवातीच्या काळात मोदी गुजरात दंगलप्रकरणी अडकतील असे अनेकांना वाटले असावे.अशांच्याच मागण्या मान्य करून सर्वोच्च न्यायालयाने एस.आय.टी नेमली पण त्या एस.आय.टी नेच आपल्याकडे मोदींविरूध्द खटला दाखल करण्याइतका पुरावा नाही असे म्हणून अशा मंडळींचा मुखभंग केला.मोदी दोषीच असेच गृहित धरून चाललेल्या मंडळींची त्यामुळे पंचाइत झाली. (आणि अगदी तशीच पंचाइत राजीव गांधी बोफोर्स प्रकरणी दोषीच हे गृहित धरून चाललेल्या मंडळींची न्यायालयाने फटकारल्यावर झाली होती).मोदींना झोडपायचे हा एककलमी कार्यक्रम असलेल्यांना काहीतरी करून मोदींविरूध्द टिका करायची संधी हवी होती. दंगलप्रकरणी फारसे यश येत नाही हे लक्षात येताच मोदींच्या विकासाच्या दाव्याविरूध्द आदळआपट जास्त सुरू झाली.

मोदी दंगलप्रकरणी दोषी आहेत की नाही हे मला माहित नाही.मोदींचा गुजरात विकासाचा दावा खरा आहे का हे ही मला माहित नाही.मी गुजरातमध्ये दिड-दोन वर्षे राहिलो असलो तरी यानंतर भविष्यात कधी परत गुजरातमध्ये राहिन याची शक्यता जवळपास शून्य.तेव्हा या दोन्ही गोष्टींबाबत मी अनभिज्ञ आहे.फक्त माझे म्हणणे इतकेच की दंगलप्रकरणी मोदी दोषी आहेत की नाही हे न्यायालयांना ठरवू द्या आणि मोदींनी गुजरातचा खरोखर विकास केला आहे की नाही हे तिथल्या मतदारांना ठरवू द्या.

पण अनेकदा चित्र उलटेच दिसते.एस.आय.टी ने मोदींविरूध्द पुरावा नाही असे म्हटल्यानंतर "मोदी किती हुषार--ते पुरावा कसा सोडतील" अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया वाचल्या होत्या.म्हणजे मोदी दोषीच हे या फेसबुकींनी गृहितच धरलेले. तीच गोष्ट मोदींच्या विकासाच्या दाव्याबद्दल.

मला पडलेला प्रश्न हा की सगळेच पक्ष त्यांच्या सरकारांची लाल करत असताना केवळ मोदींच्या दाव्याचा इतका काथ्याकूट का होतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********वि.जे.क्लिंटन**********

>>केवळ मोदींच्या दाव्याचा इतका काथ्याकूट का?

इथे काहीतरी सेन्स ऑफ प्रपोर्शनचा घोळ होत आहे. मोदींच्या विकासाची जेवढी चर्चा माध्यमांतून होते तेवढी वरील स्वरूपाची (विकास तितकासा विशेष नाही अशा प्रकारची) चर्चा होत नाही. गुजरातचा विकास असा गूगल सर्च मारला तर ९० टक्क्याहून अधिक रिझल्ट विकास होत आहे अशा बातम्यांचे/लेखांचे/ब्लॉगचे मिळतील. तेव्हा मोदींच्या दाव्याची अतिरेकी चिरफाड होते आहे यात तथ्य नाही.

दोन वर्षे गुजरातमध्ये राहिल्यावर गुजरातमध्ये विज पुरवठा सोडला तर महाराष्ट्रापेक्षा उच्च असे मला व्यक्तिशः काही आढळले नाही. म्हणजे महाराष्ट्रापेक्षा गुजरात मागे आहे असे नव्हे पण गुजरात काहीच्या काही विकसित होत आहे आणि महाराष्ट्राची पीछेहाट चालली आहे असे चित्र दिसले नाही.

>>दंगलप्रकरणी मोदी दोषी आहेत की नाही हे न्यायालयांना ठरवू द्या आणि मोदींनी गुजरातचा खरोखर विकास केला आहे की नाही हे तिथल्या मतदारांना ठरवू द्या.

पहिल्या बाबतीत सहमत आहे. दुसर्‍या बाबतीत तितकासा सहमत नाही. मोदींनी गुजरातचा स्वर्ग बनवला आहे आणि भारताचा स्वर्ग बनवण्यासाठी आता त्यांना पंतप्रधानच करायला हवे असा (फेसबुकी) प्रचार चालू आहे म्हणून त्या विकासाच्या दाव्यांचे विश्लेषण फक्त गुजरातच्या मतदारांनी करून पुरणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आधीच तहलका त्यातचि राना आयुब लिहिता झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यालाच लै भाव द्यायचा तर का हो? रामाने धोब्याच्या कुजबुजण्याला का भाव दिला होता म्हणे?

धोब्याचे म्हणणे डिसक्रेडीट करता आले नाही, की ह्यॅ! धोबीच तो! त्याला काय किम्मत असे म्हणण्याला आमचा त्रीव्र निषेढ आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

विसुनाना, लिहाल असं काही अनाकलनीय पुन्हा? लिहाल? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेबोसुला कशाला हवंय? Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

तहलकातला लेख वाचला. लेख पूर्वग्रहाने बरबटलेला आहे. पूर्वग्रहांना पूरक असलेली निवडक आकडेवारी-मते, फक्त विरोधकांच्या मतांवरून काढलेले निष्कर्ष यावरून या लेखाला फारशी किंमत देण्यासारखे काही वाटले नाही. मोदींची लोकप्रियता कमी होत आहे हे कदाचित खरेही असावे पण या लेखापेक्षा अधिक पत्रकारिता मूल्य असलेले लेखन विश्वसनीय वाटले असते. तीव्र मोदीविरोध यात 'उल्लेखनीय' काय आहे हे समजले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हा लेख मोदींच्याच माणसांकडून प्रेरित झालेला आहे! त्यानिमित्ताने मोदीविरोधकांची थोडी हवा बाहेर पडण्यास मदत होते, आणि मग या लेखात तितकासा दम नाही, हे पुढे आले की मोदींचे घोडे कायम दौडू लागते. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१ फॉर कॉन्स्पिरसी थियरी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१ लेख निवडक आकडेवारी (सिलेक्टिव्ह ट्रुथ) वर आधारीत वाटला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्या लेखातला दुसरा फोटो सूचक वाटला. मोदींची राजेशाही टोपी, शिरस्त्राण, जिरेटोप, पगडी, जे काही आहे ते आणि भाजपचं कमळ एकाच line-of-sight मधे, एकाच रंगाचं आहे. मोदींचा चेहेरा, पगडी फोकस्ड पण कमळ मात्र डीफोकस्ड. अलिकडेच मटामधे प्रसिद्ध झालेला नितीन गडकरींचा गलिच्छ फोटोही उगाच आठवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars