अल्बर्ट काम्यू जन्मशताब्दी

नोबेल परितोषिक विजेता विख्यात लेखक अल्बर्ट काम्यू याचा जन्म ७ नोव्हेंबर १९१३ रोजी झाला. म्हणजे आता त्याचे जन्मशताब्दी वर्ष चालू झाले आहे. 'लोकसत्ता'त दर शनिवारी येणाऱ्या 'ग्रंथविश्व' ह्या सदरात आज विबुधप्रिया दास यांनी त्याची दखल घेतली आहे. लेखाचा दुवा -
http://www.loksatta.com/sampadkiya-news/birth-century-of-alber-kamu/

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

गटण्याचा बाप पुलंना म्हणतो "तुम्ही अबक सराफांचं नाव ऐकलं असेलच"
आता आम्ही सराफांची फक्त नावंच ऐकतो असं पुलं लिहून जातात.

काम्यू वगैरेंबाबतही असंच होतं.. त्यांची आजवर फक्त नावंच ऐकत आलो आहे .. आजच्या या लेखाने अगदी तोंडओळख का होईना तशी झाली ती ही मराठीतून याचा आनंद झाला.

माहितगाराचे आभार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मानवी आयुष्यातील विचकटलेपण ज्यांना जाणवते त्यांच्यासाठी 'Outsider' हे Must Read आहे.विधाधर पुंडलिकांनी कामूच्या 'आउटसायडर' वर 'शाश्वताचे रंग' ह्या पुस्तकात 'प्रिय पराया' हा अतिशय सुंदर, पिसांसारख्या हलक्या शब्दात, रसग्रहण वजा लेख लिहिला आहे.
लोकसत्तामधील लेखात 'उपरा' हा शब्द वापरला आहे.पण त्याऎवजी विद्याधर पुंडलिकांनी 'पराया' हा वापरलेला शब्द खासच आहे.
कामूच्या 'रिबेल' चा मराठीत 'बंडखोरीचे तत्वज्ञान' ह्या नावाने झालेला अनुवाद माहीत आहे. बाकीच्या कामूच्या पुस्तकांचे मराठीत अनुवाद झालेले आहेत की नाही ह्याची कल्पना नाही.

योगायोगाने कामूचे नाव ऎकताच ज्यांची आठवण व्हावी अश्या किरण नगरकरांची मुलाखत पण आजच्या लोकसत्ता मध्ये प्रसिध्द झाली आहे.
तिचा हा दुवा.
तसेच "किरण नगरकरांचं काय करायचं?" हा 'कादंबरीकार किरण नगरकर मराठीत का रुजू शकले नाहीत याचा तटस्थपणे घेतलेला शोध' पण वाचनीय आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

योगायोगाने अल्बर्ट काम्यूचे 'द स्ट्रेंजर' हे पुस्तक मिळवायचा प्रयत्न नुकताच एका वाचनालयात केला होता. विजय तेंडुलकरांच्या लेखनात कुठे त्याचा उल्लेख आला आहे असं एकाकडून समजताच हे पुस्तक वाचायचं ठरवलं होतं. पण फक्त फ्रेंच मध्येच ते उपलब्ध होते. आता जाला वरून सॉफ्ट कॉपी मिळाली आहे तीच वाचत आहे. अतिशय प्रामाणिकपणे, कसलाही आव न आणता (without any pretence) कुणीतरी गोष्ट सांगत आहे असं एकूण वाचताना वाटत आहे.

जन्मशताब्दी बद्द्ल माहित नव्हतं. धन्यवाद !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0