श्रद्धांजली

कळविण्यास अत्यंत दु:ख होते की, "ऐसी अक्षरे"च्या सदस्या अदिति यांचे दीर्घकालीन आजारानंतर निधन झाले.

"ऐसी अक्षरे"चा आजवर जो छोटासा प्रवास झाला आहे त्यात त्यांनी मनापासून सहभाग घेतला. आपल्या उत्तम शैलीमधे वेळोवेळी जिव्हाळ्याच्या विषयांवर लिखाण केले. या लिखाणातून (आणि त्यांच्या प्रतिक्रियांमधून) त्यांच्या बुद्धीमत्तेची, रसिकतेची साक्ष पटल्यावाचून राहात नाही. येथील अनेक सदस्यांशी त्यांचे निखळ मैत्रीचे संबंध तयार झालेले होते.

एका तरुण, हुशार, बहुश्रुत , आणि उत्तम शैली असलेल्या, अनेक विषयांमधे उत्तम गती असलेल्या एखाद्या व्यक्तीचे असे सोडून जाणे अतिशय दु:खद आहे. "ऐसी अक्षरे"च्या व्यवस्थापनाच्या आणि येथील सभासदांच्या वतीने "अदिति" यांना प्रेमपूर्वक श्रद्धांजली.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

टोपणनाव एकच असल्यामुळे अदितिबद्दल ओळख नसतानाही कुतूहल होतं. जालीय ओळख का होईना, पण अदितिशी ओळख होणं ही आनंदाची गोष्ट होती. तिच्या आजारपणाबद्दल खरडींमधून ती क्वचित उल्लेख करत असे, पण तक्रारीचा सूरही कधीच नसे. त्यामुळे अचानक अशी बातमी येणं फारच धक्कादायक आहे.

अदिति 'डॅडी लाँगलेग्ज'बद्दल लिहीणार होती. दिवाळी अंकात लिहू शकली नाही म्हणून तिने व्यनि केला होता. "हा पहिलाच अंक आहे, अजून बरंच काही करायचं आहे. तू त्याबद्दल सॉरी म्हणू नकोस" असं तिला उत्तर दिलं तेव्हा पुढे काय होणार याची मला कल्पनाच नव्हती.

अदितिने ऐसी अक्षरेवर केलेलं सर्व लिखाण इथे आहे:
http://www.aisiakshare.com/user/357/authored

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपल्या वैशिष्ठ्यपूर्ण लेखनशैलीने आणि प्रतिसादांतून, ती एक विलक्षण बुद्धिमान मुलगी आहे हे जाणवायचे. हळहळ व्यक्त करण्यापलिकडे आपण काहीच करु शकत नाही.
तिला श्रद्धांजली!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

अतिशय दु:खकारक वार्ता.

संपादकांची वैयक्तिक ओळख असेल तर आमच्या सहभावना कृपया कुटुंबीयांना कळवाव्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"डू नॉट पास गो" सारखं काहीतरी सतत आम्हाला वाचायला मिळावं म्हणून का असेना; पण आपणास शतायुषी होता आला असतं तर बरं झालं असतं तै.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

दु:खद बातमी! अदिती ह्यांना मनःपुर्वक श्रद्धांजली!
त्यांचं लेखन नेहमीच आवडलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

वाईट बातमी...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

लेखनाच्या माध्यमातून अनेकांशी तिचा परिचय होता. अदितिचे जाणे मनाला चटका लावणारे आहे.
ही बातमी खरोखर धक्कादायक आहे.
मनःपूर्वक श्रद्धांजली.
सोनाली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एका शब्दपेक्षा दोन बरे.

त्यांचे लेख, अनुवाद छान असायचे.
वाईट बातमी... श्रद्धांजली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाईट बातमी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्रद्धांजली...

त्यांचे लेख, अनुवाद छान असायचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मन:पूर्वक श्रद्धांजली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अरेरे.. अत्यंत धक्कादायक व दु:खदायक बातमी Sad

काही महिन्यांपूर्वी नंदनच्या भारतवारीत त्याच्यासोबत तीला भेटायला गेलो होतो तेव्हा पहिल्यांदा तिची प्रत्यक्ष भेट झाली होती. आजारी आली तरीही सतत हसतमुख होती. नवे काही वाचत असलो की नेहमी चर्चा करत असु.. शेरलॉक कथांच्या अस्सल भाषांतरामुळे पहिल्यांदा तिच्या लेखनाकडे लक्ष गेले होते आणि मग फॅनच झालो होतो. ऐसीवरही कालपर्यंत तीचे लेखन पहिल्या पानावर झळकत होते. आता हे सारं थांबणार...

छ्या! काही सुचत नाहिये! श्रद्धांजली!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मनःपुर्वक आदरांजली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

धक्कादायक बातमी!
ज्यांचे असे जाणे चटका लावणारे आहे! Sad
श्रद्धांजली!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरंच, ही अत्यंत दुखद बातमी आहे...
परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो...

- सुमित

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

वाईट बातमी.

श्रद्धांजली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मनःपुर्वक आदरांजली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"After all, to the well-organised mind, death is but the next great adventure."
- तिचा आणि माझा लाडका डंबलडोअर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

अत्यंत दु:खद वृत्त.
अदितिचे लेखन आवडायचे.
अंतःकरणपूर्वक श्रद्धांजली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनःपुर्वक आदरांजली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बातमी वाचून अतिशय दु:ख झालं. अशी बातमी समोर येइल ह्याचा अंदाज नसल्याने वाचताना धक्का बसला.
त्यांनी केलेले शेरलॉक होल्म्सच्या कथांचे अनुवाद नेहमीच लक्षात राहतील आणि पुनःपुन्हा वाचले जातील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपल्यापेक्षा वयाने लहान असणार्‍या लोकांचे असे निघून जाणे सहन होत नाही. अदिती एक रसिक, चोखंदळ, कलासक्त मुलगी होती. तिच्या वयाच्या (बर्‍याच) मुलींमध्ये आढळणारा थिल्लरपणा तिच्यात बिलकुल नव्हता. होम्स, वुडहाऊस, जुने सिनेमे हे तिच्या आणि माझ्या समान आवडीचे विषय. भाषा, वाचन, संगीत यांवर प्रेम करणारी, उच्च अभिरुची असणारी अशी ती एक गुणी मैत्रिण होती. गेल्या वर्षी इस्पितळात तिची भेट झाली तेंव्हा हेच आता शेवटचे भेटणे असे अंतर्मनात कुठेसे वाटलेही होते, पण ते खरे ठरु नये असेही वाटले होते.
गेल्या काही वर्षांत, विशेषतः गेल्या वर्षाभरात तिला सहन कराव्या लागणार्‍या वेदना बघता तिची सुटका झाली हा विचार दिलासा देणारा आहे. पण ज्यांच्या केसांत तांदूळ बघावे त्यांना तीळ वाहावे लागणार हा विचार मन कापत जाणारा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

अदिति या आयडीने ऐसीवर पदार्पण केलं ते खरडवह्यांतून दिसलं. नंदन, राधिका वगैरेंशी तिची पूर्वीपासून ओळख होती हे लक्षात आलं होतं. नंतर लेखनही केलं. एकंदरीत वावरावरून विचाराने गंभीर तरीही वागायला, बोलायला खेळकर अशी तिची प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर निर्माण झाली. आमच्या खरडवहीत गप्पाही होत. भारतात गेलं की आवर्जून भेटण्याच्या लोकांच्या यादीत मी तिची भर टाकलीही होती. पण ओळख पूर्ण व्हायच्या आधीच ती गेल्याचं कळल्यावर धक्का बसला. तिच्या शेवटच्या आजारपणाच्या गंभीरतेविषयी तिने एका अक्षरानेही ऐसीवर सूतोवाच केलं नव्हतं.

इतकं दुःख असताना लेखनातून, गप्पांतून आनंदी चेहरा ठेवणारी अदिति एवढ्या तरुण वयात गेली हे फार वाईट झालं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिये!

नक्कीच तशीच ज्जगली असावी ती. मर्यादित वेळात खूप काही करून गेली असणार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

'अदिति'चे लेखन वाचनात होतंच. आमची खरडींपुरतीही ओळख नसली तरी ऐसीपरिवारातल्या एका तरून मुलीचं असं आजारपणाने जाणं दु:खद आहे. मनःपुर्वक आदरांजली!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

अदितीने, 'सांगावेसे वाटले म्हणून' या लेखात लिहिलेल्या ' जेव्हा एखाद्या माणसाची आपल्या मनातली प्रतिमा आणि त्या माणसाच्या डोळ्यातलं हे प्रतिबिंब एकमेकांशी जुळतं तेव्हा रेझोनन्समुळे तंबोऱ्याची षड्जाची तार वाजवल्यावर तिच्या शेजारची तार आपोआप झंकारून उठावी, तसं काहीसं मला होतं असतं.' ह्या ओळीवरून तिच्या संवेदनशीलतेची कल्पना येते. इतक्या रसरशीतपणे आयुष्यातल्या कला, साहित्य वगैरे सृजनशील गोष्टींकडे पहाणारी आणि तितक्याच प्रभावीपणे ते व्यक्त करू शकणारी अशी तरूण व्यक्ती अकाली निघून जाण्यामुळे फक्त 'सॅड लॉस' असे शब्द ओठाशी येतात. हा लॉस सर्वस्वी आपला असतो...मागे रहिलेल्यांचा. किती काही अनुभवू शकली असती आणि किती काही वाटू शकली असती!
माझी तिच्याशी काहीच वैयक्तिक ओळख नव्हती पण ती व्हायला हवी होती अशी चुटपुट लागावी अशी व्यक्ती होती. शिवाय तिच्या वरच्या लेखाचे, त्या धाग्यात कौतुक करताना हात आखडता घ्यायला नको होता, जे मनापासून वाटले ते तिला मनापासून सांगायला हवे होते, असेही वाटून गेले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"Death is but crossing the world, as friends do the seas; they live in one another still. For they must needs be present, that love and live in that which is omnipresent. In this divine glass, they see face to face; and their converse is free, as well as pure. This is the comfort of friends, that though they may be said to die, yet their friendship and society are, in the best sense, ever present, because immortal."
[Original quote by William Penn, used in the last of the Harry Potter books]

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0