तिन दलित तरुणांची निर्घ्ृण हत्या. लोकसत्ता दि.३/१/२०१३

संदीप सचिन आणि राहूल तुम्ही नाटक न करता तात्काळ पंचमहाभुतात विलिन होऊन जायचं. इथे अजुन फुकाट अपेक्षा करायची नाही.आम्ही दिलीय ना तुम्हाला एका वर्तमानपत्रातील पहिल्या पानावरची थोडीशी जागा ? च्यँनलवरची चार मिनिटं ? झाट टीआरपी नसतो तुमच्या मरणात हे कळुन सुध्दा ! बाकिचे तुमचे एकदोन पेपरवाले बघून घेतील. आम्ही दुसरीकडे वळतो आहोत. काय ? वेदना ? कसली वेदना ? वेदना आम्हाला कळत नाही असं थोडंच आहे. हात पाय तोडणे, गळे चिरणे, आवळणे ही काय वेदना झाली ? गुप्तभागात काही घुसवलंय का ? ते असेल तर सांगा. करु विचार. खैरलांजीत केला नव्हता काय ? थोडा का असेना पण केला होता हे आठवत नाही ? आमच्या चवीचाही विचार व्हायला हवा , ही आमची माफक अपेक्षा चूकीची आहे का ? मिटक्या मारत जेवणं आणि पहिल्या घासातच ताट बाजूला सारावं लागणं हा खाण्यातला फरक तुमच्या लक्षात कसा येत नाही ? बलात्कार वेगळा आणि खून वेगळा. बरं साल्यांनो तुम्ही गल्ती अशी केली कि, ते नगरला घेऊन जात होते तेव्हा दिल्ली दिल्ली ओरडता आलं नाही तुम्हाला ? आता तुमच्यासाठी मेणबत्त्या कुठे शोधायच्या ? औट आँफ स्टाँक झाल्या त्या बाजारातून ! हा , बाजारात आता शांतीचं वाटप चालू आहे. फुकाट ! अगदी फुकाट. जे घेणार नाहीत त्यांच्या बोकांडी बसून ती दिली जाणार आहे. तुमच्या चुका तरी कितीरे ? सालं या देशात जन्माला येता , आणि वर माणूस म्हणुन वागवा असा हट्ट धरता. वा रे वा ! ठेवलंय तुमच्या बापाने. घ्या ! आता तुमच्यावर कविता कोण करणार ? सालं एका फटक्यात मेलात तुम्ही. किमान आठ दिवस झुंजायचं तरी. तुमची चूक नाही याच्यात. निकृष्ट खाण्यावर पोसलेला तुमचा देह तसा टिकलाही नसता फार. आम्ही कवितेचं आश्वासन देऊ शकत नाही. पण पेपरात थोडं आणलं असतं हे नक्की. कवितेच विसरा आता. हो, दिल्ली प्रकरणात आम्ही जुलाब लागल्या सारख्या कविता केल्या लेखांची लेंडकं टाकली हे खरं आहे . पण साला एन्ट्राक्युनाँल घ्यायला आणि तुमची बकवास बातमी वाचायला गाठ पडली ! काय करणार ? आता कोठा जड झालाय. आता एखादा बलात्कार किंवा सवर्ण अडचणच आम्हाला मोकळं करु शकते. गध्द्यांनो लाज कशी वाटत नाही रे मोठ्मोठ्या लेखक लेखिकांची नावं घ्यायला ? त्यांची लेखणी तुम्हाला स्वस्त वाटली काय ? पुन्हा तेच. एखादा नाना तुमच्यासाठी बोलेल ? पागल आहात. असो. तुमच्या आयांची काळजी फार करु नका. तुमच्या मागोमाग येतील त्या ही तिथे. खात्रीने ! तुमच्या अंगावरचे घाव त्यांना इथे थोडंच स्वस्थ बसू देतील ? तेव्हा निश्चिँत होऊन जा मित्रांनो. आणि शेवटचं , अत्यंत म्हत्त्वाचं, याद राखा पिँडाच्या वेळेस नाटक केलंत तर, कावळ्यात प्रविष्ट होऊन तात्काळ पिँडाला शिवायचं आणि चळवळीला मोकळं करायचं. नाहीतर गंभीर परिणाम होतील. याच देशात दलित जातीत पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल.

field_vote: 
1.666665
Your rating: None Average: 1.7 (6 votes)

प्रतिक्रिया

लेख अज्जिबातच आवडला नाही.
यातून दलितांचे प्रश्नच तेवढे खरे आणि स्त्रियांचे खोटे हा जो सूर लागलाय त्याचा हजारदा निषेध.
हा ही एक प्रश्न आहे तो ही एक प्रश्न आहे असा विचार का नको?
प्रत्येकवेळी दुसर्या प्रश्नाशी कंपॅरिजन करून , अवहेलना करून मगच स्बतःची व्यथा विशद केली पाहिजे असे दलित प्रश्नांच्या बाबत केलेच पाहिजे का?

मग याआधी बलात्कार आणि मग खून झालेच होते की मुलींचे . हीच केस गाजली , हिलाच १५ लाख मिळतायत म्हणून बाकीच्या बलात्कारपीडितानी रडत बसावे का?
जंगलात ठिणग्या वारंवार पडतातच , नेमक्या याच ठिणगीने वणवा का पेटला असा प्रश्न उगाळण्यात काय हशील?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शब्दाशब्दाशी सहमत.

उद्वेग रास्त आहे. कडवटपणाही कदाचित रास्तच, पण बलात्कारित स्त्रीच्या घटनेशी तुलना योग्य वाटत नाही.

बाकी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जंगलात ठिणग्या वारंवार पडतातच , नेमक्या याच ठिणगीने वणवा का पेटला असा प्रश्न उगाळण्यात काय हशील?

हेच्च म्हणायचं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

साती आपला राग
आणि वेदना सारख्या हव्यात. दुर्दैवाने तेच
नाही म्हणुन तुलना केली. आजही आपल्या देशात
स्त्री कुठल्याही जातीतली असो.
तिला दर्जा दलिताचाच अशी परिस्थिती आहे.
या न्यायाने दिल्लीतील तरुणी आमची बहिणंच .
तिच्या बाजूनं उठलेला आवाज आम्हाला निराश
करत नाही. पण
खैरलांजी किँवा नगरची घटना अजुन बर्याच
घटना त्यावेळी हे आवाज का येत नाहीत ?
खरा प्रश्न हा आहे. मिडिया काय निकष पाहते
हे ही सहज लक्षात येत.मिडीयाच्या पुंगीवर डोलणारी आभासी जगातली ढोंगी माणसं यांच्यावरचा हा खरा राग आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण खैरलांजी किँवा नगरची घटना अजुन बर्याच घटना त्यावेळी हे आवाज का येत नाहीत ?

नगरच्या घटनेचं माहित नै पण खैरलांजीच्या वेळेस खूप आवाज उठले होते येवढं नक्की. शिवाय सध्या फेसबुक वगैरेंमुळेसुद्धा बातमी वेगाने पसरते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लोकसत्तातील बातमी जर ही असेल, तर ते तिघे दलित असल्याने हत्या झाली आहे, असे कुठेही दिलेले नाही. उलट, बातमी वाचून ते तरूण दलित समाजातले होते, हे नमूद करण्याचे कारणही कळले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमुक
हि ती भयानक बातमी ... Sad
http://www.loksatta.com/maharashtra-news/murdered-of-three-dalit-samaj-p...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हीच बातमी मी माझ्या प्रतिसादात खाली दिलेली आहे. त्यामुळे माझा मूळ प्रश्न अनुत्तरित राहतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तीन व्यक्तींची अश्या प्रकारे हत्या झाली याबद्दल दु:ख वाटते. त्यांच्या कुटुंबियांसोबत सहवेदना व्यक्त करतो. दिल्लीतील घटनेशी तुलना किंचित आततायी (किंवा तात्कालिक संतापाच्या भरात केलेली) आणि (म्हणूनच) अस्थानी वाटली

बाकी त्या तीन व्यक्तींचा जात, धर्म, लिंग आदींचा हत्येच्या कारणाशी संबंध अजून तरी पुढे आलेला दिसत नाहि. तोपर्यंत तो तपशील केवळ बातमीदाराने सनसनाटी निर्माण करण्यासाठी वापरलेली क्लृप्ती वाटते असे म्हणावे लागेल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

घटना दु:खद आहेच, पण प्रतिक्रिया आक्रस्ताळी वाटते. तसेही एकट्या दिल्लीत दरवर्षी शेकडो बलात्कार होतात; पण हा एक जितका गाजला तितके इतर नाहीत. एखादी घटना गाजते म्हणजे ती इतरांहून विशेष असतेच असं नाही; तद्वत् एखादी गाजत नाही म्हणजे ती कमी महत्त्वाची असंही नाही. ज्या माध्यमसंपृक्त आणि सोशल नेटवर्किंगसंपृक्त जगात आपण राहतो त्याचा हा अपरिहार्य परिणाम आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

एखादी घटना गाजते म्हणजे ती इतरांहून विशेष असतेच असं नाही; तद्वत् एखादी गाजत नाही म्हणजे ती कमी महत्त्वाची असंही नाही. ज्या माध्यमसंपृक्त आणि सोशल नेटवर्किंगसंपृक्त जगात आपण राहतो त्याचा हा अपरिहार्य परिणाम आहे.

अगदी सहमत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

ज्या पद्धतीने त्या तिन्ही तरुणांच्या देहाचे हाल हाल करुन नृशंस हत्या करण्यात आली त्या घटनेचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.
लेखातील तळमळ जाणवली , उद्वेग जाणवला.

@साती माझ्यामते लेखकाने तुम्ही निषेध करावा असे काही म्हटलेले नाहिये.
लेख अज्जिबातच आवडला नाही.
यातून दलितांचे प्रश्नच तेवढे खरे आणि स्त्रियांचे खोटे हा जो सूर लागलाय त्याचा हजारदा निषेध.

लोकांचे लक्ष (अटेंशन हा जास्त समर्पक शब्द) ह्या व तत्सम नृशंस घटनांकडे तेवढ्या गांभिर्याने जात नाही पण बलात्कारासारखे घृणीत विषय चर्चेचे विषय होतात याबद्दल लेखकाची पीडा आहे असे मला वाटते. उपरोधिक भाषा वापरुन सतीश वाघमारेंनी आपल्या (शेवटी आपणही याच समाजाचे भाग आहोत) मनातील संवेदनशीलतेला आवाहन केले आहे.
उलट पक्षी स्त्रियांचे अत्याचार तेच खरे व दलितांवरचे अत्याचार खोटे हा थेट सूर मात्र तुमच्या प्रतिसादात जाणवला. तुमच्या मनात अर्थातच तसे काही नसणार याची खात्री वाटत आहे पण तुमच्या प्रतिसादामुळे गैरसमज होतोय म्हणून हा प्रतिसाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दलितांवरचे अत्याचार खोटे आणि स्त्रियांवरचे खरे असा सूर माझ्या प्रतिक्रियेचा असूच शकत नाही.
(मला दोन्ही असण्याचा अनुभव आहे Smile )
पण प्रत्येकवेळी इकडे लक्ष दिलंत आता आमच्याकडे लक्ष द्या असा अभिनिवेश कशाला? नुसते आमच्याकडे लक्ष द्या असे सांगता येईलच.
मूळात त्या बातमीची लिंक माझ्याकडे उघडत नाही आहे. पण काहिही झालं तरी कुणाच्याही देहाचे हालहाल करून मारणे वाइटच. प्रश्न असा आहे की त्या वाईटाचा सरळ निषेध का करू नये?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

साती, तुझ्या खरडवहीत बातमीचा मजकूर चिकटवलेला आहे.

बातमी वाईट आहे, निषेधार्हच आहे. "इकडे लक्ष दिलंत आता आमच्याकडे लक्ष द्या असा अभिनिवेश" मलाही पटत नाही. बातमी वाचून यात जातीचा संबंध फार असेल असं वाटत नाही. बातमीत उल्लेख केल्याप्रमाणे "खुनाचे कारण समजू शकले नसले तरी अनैतिक संबंधातून खून झाला असावा, असे पोलिसांचे मत आहे." (खैरलांजी प्रकरणाचा इतिहास आठवता, पोलिसांनी लबाडी करून या प्रकरणाला वेगळंच वळण लावलेलं असेल अशीही शक्यता आहेच.) खैरलांजी प्रकारात जातीचा संबंध होता, स्त्रियांवर लैंगिक अत्याचार झालेले होते आणि त्याबद्दल संताप व्यक्त करणारं लिखाण अजूनही अधूनमधून होत असतं. मराठी संस्थळांवरही त्या प्रकरणाबद्दल, काही काळ गेल्यानंतरही संताप व्यक्त झाल्याचं आठवत आहे.

असं होत असेलच तर का होत असेल याबद्दल एक तर्क आहे. स्त्रियांचं समाजातलं प्रमाण ~ ५०% आहे. दलितांचं प्रमाण यापेक्षा बरंच कमी आहे. अर्ध्या समाजाला जो प्रश्न व्यक्तिगत प्रश्न वाटतो, त्याची बातमी मोठी होणं आणि त्याबद्दल प्रचंड प्रमाणात प्रतिक्रिया येणं सहाजिक वाटतं. सगळ्यांनाच नाही तरी काही लोकांना परदु:ख शीतल वाटत असावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सदर बातमीतून काहीच जातीवाचक कारण असावे असे वाटले नाही. असो.

तू म्हणतेस तसं अगदी बरोबर.५०टक्के लोकसंख्येला अत्याचाराची भिती वाटू लागलीय आणि उरलेल्या पनास टक्क्यांच्या या स्त्रिया नातेवाईक आहेत. साहजिकच मोठ्या प्रमाणावर उद्रेक होणारच. त्यातही हे आंदोलन निर्नायकी होते. जात पंथ लिंग या गोष्टी या आंदोलनावर परिणाम करत नव्हत्या.
ती मुलगी फिजियोथेरपिस्ट होती. तिच्या ओळखीत नक्कीच मिडियाशी संपर्क असणारे सोशल नेटवर्क वापरणारे लोक असणार आहेत. त्याहुनही महत्त्वाचं म्हनजे आज जी पिढी सोशल नेटवर्किंग करतेय, शिकतेय, बाहेर कामानिमित्त फिरतेय , शहरातून राहातेय त्या सगळ्या पिढीला स्वतःच्या सुरक्षिततेचा प्रश्न अचानक भयानक आणि प्रचंड स्वरूपात भेडसावू लागलाय. म्हणून इतकी जास्त प्रसिधी झालि या घटनेची आणि म्हणूनच इतकं मोठं आंदोलनही झालं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या सगळ्या पिढीला स्वतःच्या सुरक्षिततेचा प्रश्न अचानक भयानक आणि प्रचंड स्वरूपात भेडसावू लागलाय.

मान्य.
एवढंच नव्हे, आता बोलण्यासाठी माध्यम उपलब्ध आहे. दहा वर्षांपूर्वीही ही सुविधा नव्हती.
दुसरं म्हणजे बलात्काराबद्दल असणारा टॅबू कमी होणं पण पुरता नष्ट न होणं हे महत्त्वाचं असेल असंही वाटतं. बलात्कार लपवून ठेवावा, त्या स्त्रीलाच दोषी म्हणावं, विटाळलेली म्हणावं अशी मनोवृत्ती फेसबुकावर, जालावर वावरणार्‍या मंडळींची नाही. निदान माझ्या बघण्याततरी नाही.

पण बलात्कार हा पावित्र्यभंग आहे असं किंचित वाटत असतं त्यामुळे सरळ खून किंवा हाल-हाल करून केलेला खून जेवढा भयंकर वाटतो त्यापेक्षा बलात्कार+खून प्रचंड भयंकर वाटतो. भीषणता जेवढी जास्त वाटते तेवढा उद्रेकही मोठ्या प्रमाणावर होतो. योनीशुचिता, त्याला जोडलं गेलेलं पावित्र्य याचा भंग बलात्कारात होतो त्यामुळे या मुलीची जात, धर्म, भाषा, आर्थिक वर्ग काहीही माहित नसतानाही तिच्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात प्रतिक्रिया आल्या. हा माझा तर्क. आजच या मुलीच्या मित्राला ज्याने मार खाल्ला, त्यालाही निर्वस्त्र करून बसमधून फेकून दिलं गेलं, त्याने त्या परिस्थितीत तिच्यासाठी काही करण्याचा प्रयत्न केला, त्याला मदत, सहानुभूती न मिळाल्याची तक्रारही वाचनात आली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एकंदरीत प्रतिक्रिया पहाता विद्रोह आणि विवेक एका ठिकाणी कसे नांदणार? असा प्रश्नच पडतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

लेखकाचा संताप योग्य आहे. आम्हालाही तितकाच संताप येतो अशा घटनांनी. पण जिथे सर्वच समदु:खी आहेत तिथे अशी विद्रोही भाषा वापरुन काय उपयोग ? ती भाषा सत्तांध व मदांध झालेल्या सत्ताधार्‍यांशी बोलताना वापरावी. घटनेचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

सागर माझ्या प्रतिक्रियेचा नेमका धागा ओळखल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सागर माझ्या प्रतिक्रियेचा नेमका धागा ओळखल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनापासून केलेल्या लिखाणावरती अशा निघॄण प्रतिक्रिया यायला नको होत्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

मनापासून केलेल्या लिखाणावरती अशा निघॄण प्रतिक्रिया यायला नको होत्या.

पराशी पूर्ण सहमत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झाल्या घटनेचा करावा तेव्हढा निषेध कमीच. तुमचा राग्/उद्वेग रास्तं आहे.

तरी, तुम्ही वर "आपला राग आणि वेदना सारख्या हव्यात. दुर्दैवाने तेच नाही म्हणुन तुलना केली" असं म्हणताय. पण जर हे हत्या झालेले तरूण दलीत नसते तर तुम्ही ह्याच भावनेने किंवा वेदनेने हा धागा काढला असता का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

अनामिक एकच उदाहरण तुम्हाला देतो. मनुने भारतीय सवर्ण स्त्री पार रसातळाला नेऊन ठेवली. (दलित स्त्री तर सोडून द्या आजही त्यांना माणूस समजलं जात नाही. हे विदारक वास्तव.) भारतीय संविधानामधे हिँदू कोडबिलाची रचना डाँ.आंबेडकरांनी कोणत्या समाजातील स्त्रीयांना गृहित धरुन केली होती हो ? हा तुम्हाला केलेला प्रश्न बरीच उत्तर देणारा आहे. आजही किती सवर्ण आंबेडकरांना देशभक्त समजतात ? सवर्णांप्रती व्यक्त केलेल्या दलितांच्या दुःखांना किती किंमत ? श्रीमंतांच्या लग्नातला गरीबाचा आहेर ईतकीच!बाय द वे मी प्राध्यापक आहे आणि जात न पाहता विद्यार्थ्याँना अतिरिक्त शिकवतो. माझे विद्यार्थी विद्यार्थ्यीनी (सवर्ण समाजातील)आज जीवनात यशस्वी आहेत.फक्त माझे आडनाव कुलकर्णी किँवा पाटील नसल्यामुळे आणि मी ३४ वर्षाँचा असल्यामुळे ते योगदान तुमच्या नजरेत श्रीमंताच्या लग्नातील गरीबाच्या आहेरासारखं ठरतं. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाय द वे मी प्राध्यापक आहे आणि जात न पाहता विद्यार्थ्याँना अतिरिक्त शिकवतो. माझे विद्यार्थी विद्यार्थ्यीनी (सवर्ण समाजातील)आज जीवनात यशस्वी आहेत.फक्त माझे आडनाव कुलकर्णी किँवा पाटील नसल्यामुळे आणि मी ३४ वर्षाँचा असल्यामुळे ते योगदान तुमच्या नजरेत श्रीमंताच्या लग्नातील गरीबाच्या आहेरासारखं ठरतं. असो.

कै च्या कै विधान आहे हे. उपकार केल्याच्या थाटात वाटते आहे.

माझ्या जुन्या सायबर कॅफेत दर शनीवारी आणि रविवारी मी वेश्यांच्या मुलांना १ तास फुकट शिकवत असे ते पण प्राध्यापक नसताना देखील. मी सवर्ण आहे का नाही हा मुद्दा वेगळाच. मग आता ह्यात मी माझे ढोल किती वाजवून घ्यायचे ? का मी हे असले काहीतरी 'लै भारी' केले आहे म्हणून दरवेळी उठून त्यांच्यावरती कोरडे ओढत बसायचे ?

रामपुरी दलितांनी मिळुन सवर्णाँची हत्या करण्याची उदाहरणे किती आहेत हो. जरा आकडेवारी सांगता का ?

हे तर अत्यंत विनोदी विधान वाटले.

असे वाचून उद्या कोणी विचारायला लागले, की 'काय हो जोशी, आपटे, देशपांडे ह्या सारख्यांनी मिळून घरफोडी केल्याची किंवा चेन स्नॅचींग वैग्रे केल्याची किती उदाहरणे आहेत?' मग काय डॉके अपटून घ्यायचे ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

त्यांनी वैयक्तिक मला विचारलं. म्हणुन मी सांगितलं ओघात. तुम्हाला न विचाराता तुम्ही देखील सांगितलच कि. पण मुद्दा लक्षात न घेता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सतीश - डॉ. आंबेडकरांना देशभक्तं न समजणारे मला तरी माहित नाहीत, म्हणून ते अस्तित्वात नाहीत असेही नाही. महत्मा गांधींना न मानणारेही आहेत, आणि त्यांच्या हत्येला वध समजणारेही आहेत. म्हणून त्यांचं (आंबेडकर आणि गांधी दोघेही) देशाप्रती असलेलं योगदान, बलीदान व्यर्थ ठरत नाही.

मूळ मुद्दा हा तुम्ही वर दिलेली बतमी, तिला दिलेला जातियवादाचा रंग, आणि त्या बातमीची दुसर्‍या घटनेशी केलेली तुलना हा आहे. मला फक्तं एवढच म्हणायचं होतं की कोणत्याही घटनेकडे त्रयस्थ नजरेने बघता यायला हवं, आणि ते त्याच प्रमाणे मांडताही यायला हवं (तुम्ही प्राध्यापक आणि एक सशक्त लेखक असल्याने सहज शक्य व्हावं). वरच्या बातमीत तुम्ही तिथेच चुकलात असं मला वाटतं. एकवेळ असं समजू की झाली दुर्घटना ही जातीयवादामुळे झाली, तरीही तिची दुसर्‍या घटनेशी केलेली तुलना ही अस्थानी वाटली. खरंतर दुसर्‍या घटनेतल्या स्त्रीची जातच काय, पण तिचं खरं नावही अजून माहित नाही. दोन्ही घटना तत्वतः तेवढ्याच वाईट. पण एका घटनेला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे दुसरी घटना कमी वाईट होत नाही. वर चिंजं म्हणतात त्या "सोशल नेटवर्किंगसंपृक्त जगात आपण राहतो त्याचा हा अपरिहार्य परिणाम आहे" ह्या मताशी मीही सहमत आहे.

तुम्ही प्राध्यापक आहात आणि जात न बघता शिकवता ही चांगली गोष्टं. पण "मी जात मानत नाही" हे जेव्हा सांगावे लागते तेव्हाच आपल्यात "जात" अजून शिल्लक आहे असे समजावे. हा मुद्दा दोन्ही बाजूच्या लोकांना लागू व्हावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

ते तरूण 'दलित' होते म्हणून त्यांची हत्या झाली असे दिसत नाही. मग तो मुद्दा धरून लेख लिहिण्याचा आणि त्यात सुद्धा दिल्ली प्रकरणाशी त्याचा संबंध जोडण्याचा प्रकार हास्यास्पद आहे. नुसता हास्यास्पदच नव्हे तर त्यामुळे त्याला जातीयवादाचा रंग आला आहे. दलितांनी मिळून सवर्णाची हत्या केली असती तरी असाच लेख पाडला असता काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रामपुरी दलितांनी मिळुन सवर्णाँची हत्या करण्याची उदाहरणे किती आहेत हो. जरा आकडेवारी सांगता का ? दलितांना आजही माणूस म्हणंन जड जातय तुम्हाला हे तुमच्या प्रतिसादावरुन दिसून येते. तुम्हाला दोन्हीँची तुलना हास्यास्पद वाटते. यातच दृष्टीकोण लक्षात येतो तुमचा. मिडीयाच्या पुंगीवर डोलणार्या आभासी जगातील माणसांच्या बेगडी संवेदनशीलवृत्ती वर केलेली टिका आहे माझ्या लेखात. डाँ. आंबेडकरांना आजही देशभक्त न समजणारे लोक आहेत तिथे मी लेख ' पाडला' असता कि नस्ता हा प्रश्न किरकोळ !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आडनावावरुन निरिक्षणे मांडण्याच्या प्रकारावरुन मला
http://mr.upakram.org/node/1208#comment-20002 आजच्या सुधारकच्या जात आरक्षण विशेषंकाची आठवण झाली. असो तो समांतर विषय असला तरी अवांतर आहे.
@ परा

माझ्या जुन्या सायबर कॅफेत दर शनीवारी आणि रविवारी मी वेश्यांच्या मुलांना १ तास फुकट शिकवत असे ते पण प्राध्यापक नसताना देखील

ही तू चांगली गोष्ट केली या बद्दल तुझे कौतुक केले तर तुला ते नको आहे का? आपण चांगल्या केलेल्या गोष्टीचे श्रेय प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपाल्याला मिळावे हे वाटणे गैर नव्हे.मानवी स्वभाव आहे. यातुन चांगल्या कामाला प्रेरणाच मिळते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

ही तू चांगली गोष्ट केली या बद्दल तुझे कौतुक केले तर तुला ते नको आहे का? आपण चांगल्या केलेल्या गोष्टीचे श्रेय प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपाल्याला मिळावे हे वाटणे गैर नव्हे.मानवी स्वभाव आहे. यातुन चांगल्या कामाला प्रेरणाच मिळते.

कौतुक कोणाला नको असते ?

पण आपण समाजासाठी काही करणे म्हणजे समाजावरती जणू काही उपकार केले आहेत अशा थाटात त्याची जाहिरात करून कौतुक मिळवणे मला नक्कीच नको आहे. आणि समाजासाठी एखादी गोष्ट करताना जात/पात/ धर्म ह्याचा उल्लेख यायचे कारणच काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

ते दलित होते म्हणुन त्यांची हत्या झाली का?
की ते दलित आहेत म्हणुन त्यांच्या खुनाची चौकशी होत नाहीये?
की ते दलित आहेत म्हणुन मिडीया दखल घेत नाहीये?

जिथे प्रसिद्धी तिथे मिडीया. त्यामुळे मिडीया जातीयवादी आहे असं म्हणणं अति होईल. मिडिया बाकी काहीही असु शकते...असंवेदनशील, सत्ताधाऱ्यांना विकली गेलेली..पण जातीयवादी नाही.
बाकी खुनाची चौकशी काय होईल..गुन्हेगारांना सजा होईल का हे जर जातीय आधारावर ठरतं असं तुम्हाला म्हणायचं असेल तर त्याबद्दलची कृपया आकडेवारी द्यावी. कारण माझा पुण्यातील एक ब्राह्मण समाजाचा मित्रही ह्याच धर्तीवर बोलत असतो. इंजिनीअरींगला असतांना त्याने त्याची स्कुटी ठोकली..एका महिलेला थोडंस खरचटलं. पण तिने पोलिस कंप्लेंट केल्यावर त्याला जेलची हवा खावी लागली. तो ब्राह्मण असल्याने त्याला मुद्दाम तिथल्या अधिकाऱ्यांनी त्रास दिला असं तो म्हणतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

३ माणसे मेली, ती कुठल्या जातिचि होती त्याचा काही तरी संबध आहे का ह्या खूना शी. सतत सारखे दलित असण्याचे रडगाणे गात असायचे.जेंव्हा victim दलित असतो तेंव्हा ह्यांना दलित पण आठवते.
जेंव्हा गुन्हेगार दलित असतो तेंव्हा कधी दलित असण्याची आठवण येते का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0