जयपूर साहित्य संमेलनात आशिष नंदी यांचे खळबळजनक विधान?

सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ आशिष नंदी यांनी जयपूर साहित्य संमेलनात एका परिसंवादादरम्यान भ्रष्टाचाराच्या संदर्भात केलेल्या एका विधानाचे पडसाद उमटू लागले आहेत. 'भ्रष्टाचारात समता आणण्याचे सामर्थ्य असते' हे विशद करताना त्यांनी 'निम्न जातींचे लोक भ्रष्टाचार करण्यात पुढे येतात' असे म्हटले. त्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. प्रत्यक्षात माझे म्हणणे वेगळे होते, असे म्हणत नंदी यांनी आपले म्हणणे विस्ताराने मांडले आहे. अधिक माहितीसाठी -

http://www.thehindu.com/arts/books/storm-in-jlf-as-ashis-nandy-links-cor...

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

शीर्षक आवडलं! Wink
आता ते बदललं तर या प्रतिसादाचं काय करावं बरं?
प्रस्ताव अधिक नीटस मांडता येणार नाही का? 'भ्रष्टाचारात समता आणण्याचे सामर्थ्य असते' या विधानातील ही कोणती समता त्यांना अभिप्रेत आहे? मला वाटते की, त्यात उपरोध आहे. शिवाय, आशीष नंदी नेमके काय म्हणाले याचे व्हीडीओ आंतरजालावर असतीलच की कुठं तरी. असल्यास तेही देता येतील येथे. संदर्भचौकट पुरेशी मिळेल. हिंदूतील बातमी वाचली. त्यात 'मोस्ट' हा शब्द जेथे आहे, त्या स्थळाविषयीच मुळात काही गडबड आहे, असे नंदी यांचे म्हणणे आहे, असेही जालावरच विविध बातम्या पाहिल्या की दिसते. एकूण, जालीय आधार पूर्ण घेऊनच हा प्रस्ताव मांडला जावा, असं वाटतं.
तज्ज्ञ अधिक बोलतीलच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असे वाद जेव्हा होतात तेव्हा बोलणार्‍या किंवा लिहिणार्‍याने खरोखरी काय विधान केले आहे हे पाहिले तर पुढील चर्चा कमी पसरट होण्याची शक्यता असते. नंदी ह्यांचे विधान मी यूट्यूब वर येथे पाहिले आणि उतरवून घेतले. ५८ सेकंद चालणारे हे विधान असे आहे:

<...how shall="" i="" put="" it...="" almost="" vulgar="" statement="" on="" my="" part.="" it="" is="" a="" threat="" that="" most="" of="" the="" corrupt="" come="" from="" obcs="" and="" scheduled="" castes="" now="" increasingly="" tribes="" as="" long="" indian="" republic="" will="" survive="" want="" to="" give="" one="" example.="" states="" with="" least="" amount="" corruption="" state="" west="" bengal="" city="" propose="" you="" draw="" your="" attention="" fact="" in="" last="" hundred="" years="" nobody="" backward="" classes="" have="" anywhere="" near="" power="" bengal.="" an="" absolutely="" clean="" state...="">

हे बोलणे चालू असताच आशुतोष ह्या व्यासपीठावरील दुसर्‍या चर्चकाने बोलणे नंदींचे बोलणे तोडून आपले निषेधाचे बोलणे सुरू केले. (हे अर्थात आपल्या चर्चांच्या परंपरांना धरूनच आहे. मध्ये बसलेल्या बुटालिया बाई काय करीत होत्या? आशुतोषना गप्प बसवून नंदींना पुढे अधिक स्पष्टीकरण द्यायला त्यांनी सांगायला हवे होते.)

नंदींच्या ह्या अशा तुटलेल्या बोलण्याचा मला काहीच सुसंगत अर्थ लावता येत नाही. पश्चिम बंगाल हे भारतातील सर्वात कमी भ्रष्टाचार असलेले राज्य खरोखरीच आहे काय? ते तसे असे मानल्यास तेथे सत्तेवर कोणी SC/ST न आल्यामुळे त्याला हा स्वच्छ दर्जा मिळाला का ते स्वच्छ राज्य असल्याने कोणा SC/ST ला सता काबीज करता आली नाही? कारण कोणते आणि परिणाम कोणता?

अर्थात वाहिन्यांच्या breathless आणि 'आकाश कोसळायच्या बेतात आहे' अशा आविर्भावाच्या टिप्पण्यांमूळे पडद्यावर चेहरा दाखवून तारस्वरात बोलण्याची संधि आता पुष्कळांना मिळेल. नंदी आपला पाय तोंडात घातलाच आहे. तो तेथून बाहेर काढण्याचा ते आटोकाट आणि केविलवाणा प्रयत्न करीत राहतील. त्यांच्यावर एखादी केसहि दाखल होईल आणि काही वर्षे ती चिघळत राहील आणि एक दिवशी विसरूनहि जाईल. आकाश कोसळायची पुढची वेळ येईपर्यंत हे चालत राहील. नंतर आकाश नव्याने कोसळू पाहील आणि आपण Here we go around the mulberry bush असे गाणे म्हणत राहू असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नंतर सारवासारव केली म्हणून वर उद्धृत केलेली वाक्ये दुर्लक्षिण्यागत नक्कीच नाहीत. राईफ़ विथ इनॅक्युरसीज अ‍ॅट बेस्ट. काही प्रमाणात अँटी-दलित तर आहेतच, शिवाय तर्कविसंगतही आहेत-विशेषतः बंगालबद्दलची वाक्ये. नंतरची मखलाशी ही केवळ सारवासारव वाटते वरील वाक्यांच्या तुलनेत. जंतूंनी दिलेली दुसरी लिंक देखील वादासाठी वाद घालतेय (शिव विश्वनाथनचा लेख). त्यातली मुक्ताफळे पाहता मूर्तिभञ्जनासाठी मूर्तिभञ्जन असला प्रकार दिसतो. हिंदूमधल्या लेखातही, काँटेक्स्ट वगैरे भानगडी यादेखील एकाच साईडसाठी राखीव असाव्यात की काय, अशी शंका येण्याइतपत मंडन आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मध्यमवर्गीय लोकं तर कसल्याही नैतिक तडजोडीसुद्धा करत नाहीत. भ्रष्टाचार फारच लांब राहिला. Wink

---

वरचा व्हीडीओ पाहिला. आशुतोष यांना 'व्हल्गर' आणि/किंवा 'बिझार' विधानासंदर्भात चर्चा करण्याऐवजी स्वतःचं म्हणणं मांडण्यातच रस आहे असं वाटलं. चर्चेच्या आरोग्याच्या दृष्टीने दुसरा काय म्हणतो आहे ते न ऐकता स्वतःचंच म्हणणं पुढे रेटणं ठीक वाटत नाही.

आशिष नंदी यांनी स्वतः अन्य एका पत्रकाराला दिलेलं उत्तर इथे. (व्हीडीओच्या दुव्यानुसार हा व्हीडीओ त्यांच्या उत्तरानेच सुरू होतो.)
'द हिंदू'मधली जी बातमी आहे त्यातही हे स्पष्टीकरण आहेच. स्वतः नंदी यांनी म्हटल्याप्रमाणे, श्रीमंत आणि सॉफिस्टीकेटेड (मराठी?) लोकांसाठी भ्रष्टाचार हा रोजचा खेळ झालेला आहे. दलित, गरीब आणि अन्य लोकांनाही भारतातल्या राजकीय पद्धतीचा फायदा उठवू बघत आहेत ही भारताच्या भविष्याच्या दृष्टीने आशादायक गोष्ट आहे. या व्हीडीओतलं नंदी यांचं शेवटचं वाक्य मला फार आवडलं, "...जे ऐकायला तयार आहेत त्यांच्याशीच बोलण्यात मला रस आहे."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एवढ्यातेवढ्यानं भावना दुखावून घ्यायला अधीर झालेल्या आणि त्यातून टीआरपी किंवा राजकीय फायदा उठवायला आतुर असलेल्यांविषयी काय बोलणार? बाकी नंदी यांच्या विधानामागची गुंतागुंत समजावून सांगणारे हे दोन लेख नक्की वाचा अशी शिफारस करेन.

१. 'हिंदू'मधला हर्ष सेठी यांचा लेख
२. 'फर्स्ट पोस्ट'वरचा शिव विश्वनाथन यांचा लेख

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

धन्यवाद. दोन्ही लेख आवडले.

भ्रष्टाचार हा आत्मविश्वासाचा निर्देशक आहे; त्यामुळे दलित आणि अन्य मागासवर्गीयांनी केलेला भ्रष्टाचार नंदी यांना आशादायक वाटतो हे समजलं. आपल्याकडे सामान्यतः असं समजलं जातं की दलित आणि अमाव यांच्यात जे लोक शिकतात किंवा (भ्रष्टाचार करून किंवा न करता) श्रीमंत होतात ते या जातींमधले उच्चवर्णीय बनतात. बहुजनांच्या बहुसंख्येच्या बाबतीत स्थिती 'जैसे थे'च रहाते. शिव विश्वनाथन यांनी या मुद्याचा ओझरता उल्लेख केलेला आहे. यासंदर्भात नंदी यांचा काही अभ्यास, तर्क, निष्कर्ष आहे का?

सामाजिक विषयातल्या संशोधनाचे निष्कर्ष* योग्य शब्दांत मांडता न येणं आणि 'व्हल्गर' विधान केल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण ऐकून न घेणार्‍या लोकांसमोर देण्यासाठी आवश्यक असणारा संयम नसणं याला भ्रष्टाचार म्हटलं तर नंदी यांचं उदाहरण त्यांच्या निष्कर्षांच्या विपरीत आहे.

*याला सत्य म्हटलेलं नाही याची कृपया संबंधितांनी नोंद घ्यावी. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नंदी यांना जे अभिप्रेत होते याचे स्पष्टीकरण देणारे लेख वाचले

that most of the corrupt come from the OBCs and the Scheduled Castes and now increasingly Scheduled Tribes

हे विधान कोणत्याही कंटेक्स्टमधून पाहिले तरी ओबीसी आणि मागासवर्गींयांसाठी सरळसरळ निंदाव्यंजकच आहे. या वाक्याच्या रचनेमुळे उच्चवर्णीयांच्या तुलनेतत दलित आणि इमाव हे अधिक भ्रष्टाचारी आहेत असे सूचित होते. भ्रष्टाचार करणारा नेता हा राज्य करण्यास नालायक असतो अशी मनोभूमिका आजकाल तयार होत आहे. त्यामुळे दलित व इमाव हे एकदा 'अधिक भ्रष्टाचारी' असल्याचे म्हटले की आपोआपच सत्ता करण्यास योग्य कोण असा प्रश्न विचारला की उच्चवर्णीय नेता हे उत्तर देता येते.

दलित व इमाव हे उच्चवर्णीयांइतक्याच निधड्या छातीने भ्रष्टाचार करु लागले आहेत हा त्यांच्या सबलीकरणाचा पुरावा आहे असे अभिप्रेत असल्यास त्यांनी तसेच म्हणायचे होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आशिष नंदीच्या पाठराखणीसाठी "इच्यारवंत" ज्या पद्धतीने सरसावले ते पाहता सर्वांच्याच निष्ठांचे ध्रुवीकरण झालेले आहे याची खात्री पटली. राजकारण्यांवर तुटून पडणारे लोक नंदीच्या चुकीच्या विधानामागची पार्श्वभूमी समजावून घेण्याचा आग्रह करताना पाहून करमणूक तर झालीच, शिवाय खेदही वाटला. डौन विथ विचारजंत्स्!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'पुणे ५२'वरच्या चर्चेच्या संदर्भात आणि आता पुन्हा नंदींच्या विधानाच्या संदर्भात मला असं लक्षात आलं की भ्रष्टाचाराकडे सारखं एकध्रुवीय नजरेतून पाहिलं जातंय. भ्रष्टाचार म्हणजे काहीतरी वाईट, जे आपण (सुशिक्षित, मध्यमवर्गीय आणि तरीही तथाकथित सर्वसामान्य) करत नाही आणि फक्त राजकारणी, नोकरशहा वगैरे लोकच करतात, असं काहीतरी चालू आहे. म्हणजे मग नंदींच्या विधानामागची गुंतागुंत लक्षात येणं कठीणच आहे. 'आताआतापर्यंत समाजातले सवर्णच सामाजिक-राजकीय-आर्थिक उतरंडींत वरचढ होते. त्यामुळे भ्रष्ट होण्याची संधी त्यांनाच मिळत असे. ह्याउलट आता समाजाच्या सर्व स्तरांतून भ्रष्ट लोक दिसताहेत. हे एक प्रकारचं लोकशाहीकरण आहे. भ्रष्ट होण्याच्या संधी मिळणं हे तुमचं सामाजिक-राजकीय-आर्थिक उतरंडींत वरचढ होण्याचं एक लक्षण मानता येईल. परंपरेनं निम्न समजल्या जाणाऱ्या जातींत हे होताना दिसतंय, म्हणून भारतीय प्रजासत्ताकावर माझा विश्वास आहे.' असा मुद्दा जातीयतावादी आहे का?

जाताजाता : आजच्या 'लोकसत्ता'तलं संपादकीय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तुम्ही हा मुद्दा या प्रतिसादात जशा पद्धतीने मांडलाय त्यावरून तो जातीयवादी वाटत नाही, पण मग अरविंद कोल्हटकरांनी उद्धृत केलेली वाक्ये पाहता नंदींच्या खोडसाळपणाबद्दल खात्री वाटते. त्यांची बंगालबद्दलची मुक्ताफळे आक्षेपार्ह का नाहीत हे मला समजत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काही विषय असे असतात
१. जात .. कीवर्ड्सः बामण, मनुवाद, निधर्मी, बीसी, ओबीसी, चातुर्वर्ण्य
२. स्त्रिया-पुरुष.... की वर्ड्सः स्त्री, पुरुष, मुक्ती,कपडे, सातच्या आत घरात, स्त्रीस्वातंत्र्य, पुरुषप्रधान, एमसीपी, फेमिनिस्ट, बलात्कार
३. धर्म... कीवर्ड्सः हिंदू, हिंदुत्व, इस्लाम, धर्मग्रंथ, तत्व, शरिया

अशा वेळी तुम्ही कितीही अभ्यास करा, पी एच डी करा, प्रबंध लिहा, भाषण करा, मुद्दा मांडा, युक्तिवाद करा, पेपर सादर करा..

बोलायला लागलात की सुरुवातीची चारपाच वाक्ये नीट उच्चारता येतील. नंतर मुद्दा मांडणार्‍या एका शब्दाला सारवासारवीचे वीस शब्द अशा गुणोत्तराची ग्यारंटी. मत योग्य आहे की अयोग्य या पातळीवर विषय टिकणं शक्यच नाही.

तेव्हा अशा विषयावर अभ्यासपूर्ण किंवा अदरवाईज मते देऊ नयेतच.. किंवा कसेही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत.
ह्यावतिरिक्त अजून एक गोष्ट म्हणजे हल्ली माध्यमं जरा जास्तीच उपलब्ध आहेत.
१०० करोड ह्या लोकसंख्येत निदान पाच पन्नस हजार तरी "सेलिब्रिटी" किंवा तथाकथित महत्वाचे लोक असावेत.
ह्यापैकी प्रत्येक माणूस काहीही बोलला की हल्ली लग्गेच चर्चा सुरु होते. ट्विटरवर बोल्ला, चर्चा सुरु. मुलाखतीत्/भाषनात ब्बोलला, मग तर विचारायलाच नको.
आत्मचरित्रास प्रसिद्धी साठीही काही प्रानी ही प्रस्थापित पद्धत म्हणून वापरतात्.मग पुस्त्क आलं, कर चर्चा सुरु.
.
मला एक सांगा २४x६ ह्यापैकी प्रत्येकजण भावी प्रत्येक वादाची संभाव्यता लक्षात घेउनpolitically correct कसे बोलू शकेल?
आपल्यापैकी किती बहद्दर असे आहेत की सतत असे वागू शकतात?
आम्हाला कंपनीत assertive communication बद्दल फ्रेशर असताना खूपच चांगलं प्रशिक्षण देण्यात आलं होतं.
तेव्हा कुठे थोडाफार ही गोष्ट शिकलो. सरावाने थोडीफार अधिक शिकतो आहे. ह्या सर्वांचच ह्या धर्तीवरच ट्रेनिंग झालेलं नसावं.
सर्वांनी सर्वच वेळी अगदि योग्यच बोललं पाहिजे ही अपेक्षा थोडीशी जास्त नाही वाटत ?
त्याहीपेक्षा महत्वाचं मुसु म्हणतात त्याप्रमाणं लागलिच तासभराच्या बोलण्यापैकी लागलिच घाइघाइनं एखादं वाक्य अर्धवट्/तोडून एकलेलं अस्ताना लागलिच मतप्रदर्शन केलेच पाहिजे असे काही आहे का?
पूर्वी मलाही ही सवय होती. पेपरमधला मथळा वाचला उडा फुटाण्यासरखे ताडताड अन बोला काहीतरी. बाइट ऐकली, लागलिच अस्वस्थ तरी हो , उत्तेजित तरी हो किंवा तसच काहीतरी. नंतर मी प्रतिक्रिया देत देत थकलो. पण ही माणसं मी प्रतिक्रिया देण्यास उत्सुक होइन असं बोलायची मात्र थांबली नाहित.
.
मुळात वरती भारतात सांगितलेले पाच पन्नास हजार लोक, प्लस जग जोडले गेल्यानं बाहेरच्या देशातली मंडळी(शेन वॉर्न पासून ते अल सदात पर्यंत. ब्रिटनच्या राणीपाअसून ओबामापर्यंत.) प्रचंड आहेत. they are enough in numbers to keep you busy in thinking about their statements 24x7.
.
रोजची रोजीरोटी सांभाळून ह्या सगळ्या गोष्टीकंडे लक्ष देत बसणं म्या पामराच्या आवाक्याबहेर आहे.
.
मुळात गवि ह्यांच्या "काही विषय इतके संवेदनशील होउन बसलेत भारतत की मरामारीसाठी एव्हरग्रीन आहेत" ह्या आशयाशी सहमत.
(आता पुन्हा "गविंचा आशय हा नाहिच" असे म्हणत आपण ऐसी वरती लोकल दंगा घालु शकतोच. शेवटी तेही जालाबाहेर आणि जालावरतीही सेलिब्रिटी आहेतच. Wink )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वाक्याची फेररचना केल्यावर ते जातीयवादी वाटत नाही. मात्र ज्या पद्धतीने ते मीडियामध्ये आले त्यावरुन ते अत्यंत खोडसाळ वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत आहे.

अरविंद कोल्हटकरांनी जी Transcript दिली आहे त्या वाक्यांवरून कुठलाही पॉझिटिव्ह अर्थ काढणे फारच बौद्धिक कसरतीचे काम आहे.

कोल्हटकरांनी ती मीडियातून घेतलेली नसून स्वतः व्हिडिओ पाहून उतरवून घेतली असल्याने मीडियाने विधानाचा विपर्यास केला आहे असे म्हणवत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मला कळलं त्यानुसार बंगाल हे त्यांचा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी दिलेलं उदाहरण होतं. '(तिथे) डाव्यांची सत्ता जाऊन ममतांची सत्ता आली तरीही विशिष्ट (सवर्ण) वर्गच सत्तेचा मलिदा चाखतो आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या आरोपांत निम्नजातीय दिसण्यातून जी समता दिसून येते ती तिथे दिसत नाही. इतकंच नव्हे, तर तिथे फारसा भ्रष्टाचारच दिसत नाही - कारण उच्चवर्णीय हुशारीनं भ्रष्टाचार करतात; त्यामुळे ते आरोपांत अडकत नाहीत' असा तो मुद्दा आहे. 'बंगाल स्वच्छ आहे' हे म्हणण्यात उपरोध आहे. आजच्या जमान्यात कोणतंही सरकार 'स्वच्छ' आहे असं म्हणण्यात जो उपरोध आहे, तोच हा उपरोध आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हम्म असेल ब्वॉ. सकृद्दर्शनी तरी हे सगळं कळत नाही. आपली विधाने सरळसरळ मांडायला तरी काय जातं म्हणतो मी? आणि ही मखलाशी बाकीच्यांनी बोंबा मारायला सुरु केल्यावर केल्याचे दिसते, त्यामुळे शंका येणारच. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मखलाशी या शब्दावर आक्षेप आहे. नंदी यांना मूळ कार्यक्रमात आशुतोष यांनी आरडाओरडा करून बोलूच दिलं नाही. आपण करणार आहोत हे विधान 'व्हल्गर' आहे अशी सुरूवात केल्यानंतरही, तिथेच, त्याच व्यासपीठावर त्यांना या व्हल्गॅरिटीचं स्पष्टीकरण देता आलं नाही. मग जेव्हा संधी मिळाली ती त्यांनी वापरली. नंदी यांचं आधीचं लिखाण, आधीच व्यक्त केलेली मतं पहाता नंदी यांनी 'सारवासारव' केली, 'मखलाशी' केली हे म्हणणं अन्यायकारक आहे.

भारतातला, भारतीयांचा भ्रष्टाचार या विषयासंदर्भात नंदी यांची मतं तेहलका टीव्हीच्या २०११ मधल्या या व्हीडीओमधेही आहेत.
http://www.youtube.com/watch?v=kcwG0vnGBaw

'लोकसत्ता'मधला अग्रलेख आवडला. विशेषतः "प्रा. नंदी यांनी एक विचार मांडला. त्याचा प्रतिवाद जे करू इच्छितात त्यांना तो विचाराने करण्यास कोणाचा प्रत्यवाय असण्याचे कारण नाही. परंतु ते जरा आव्हानात्मक असल्याने हल्ली विचारांना झुंडशाहीच्या आचाराने उत्तर देण्याची प्रथा पडली आहे." हा भाग पटल्यामुळे अधिक त्रासदायक वाटला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ओके, हे दुवे पाहून मग मखलाशीवर अजून मखलाशी करतो Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>आपली विधाने सरळसरळ मांडायला तरी काय जातं म्हणतो मी?

राम बापट, गो.पु. अशा अनेकांबद्दल ऐकल्यामुळे हे आक्षेप चांगलेच परिचयाचे आहेत. मुळात समाजातल्या गुंतागुंतीला समजून घेण्याविषयी (आणि पर्यायानं समाजाविषयी) आस्था असेल, तर त्याबद्दलची गुंतागुंतीची विधानं समजून घेण्यासाठी गरज पडली तर बुद्धिजीवींनी तरी आपली थोडी बुद्धी का खर्च करू नये, असं याविषयी उलट म्हणता येईलच. आणि ती खर्च करायची नसली, तर मग सोपी विधानं करून विशेष काहीच न म्हणणारे पुष्कळ लोक आंतरजालावरच सापडतील; त्यातून सोप्या विधानांची भूक भागावी. असो. ज्यांना नंदी यांच्या समाजशास्त्रीय अभ्यासाविषयी माहिती आहे त्यांना नंदी यांच्या विधानांचा अर्थ समजून घ्यायला कष्ट पडले नाहीत असं दिसतं. काल 'आयबीएन लोकमत'वर प्रकाश बाळ आणि योगेंद्र यादव दोघांचंही म्हणणं ऐकलं त्यावरून हे मत बळकट झालं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हरकत नाही. वर निवडलेले वाक्य हा अर्थातच मुख्य आक्षेप नव्हता. असो.

लेफ्ट इज लेफ्ट अ‍ॅण्ड राईट इज राईट, अँड द ट्वेन शॅल नेव्हर मीट Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

समाजातल्या गुंतागुंतीला

काssssय? मला कळेल असं सांगा प्लीज... Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ज्यांना नंदी यांच्या समाजशास्त्रीय अभ्यासाविषयी माहिती आहे त्यांना नंदी यांच्या विधानांचा अर्थ समजून घ्यायला कष्ट पडले नाहीत असं दिसतं.

हे ठीक आहे. नंदींच्या लिखाणाशी चांगलीच वाकिफ असल्याने मला त्यांना काय म्हणायचे आहे हे कळलं. त्यांचा मूळ मुद्दा पटला नाही असेही नाही. पण मला या घटनेने थोड्या वेगळ्याच दिशेने विचार करायला प्रवृत्त केले.

नंदी हे 'समाजशात्रज्ञ' म्हणून वर्णिले जात असले तरी त्यांचा मूळ अभ्यासाचा विषय सामाजिक-मानसशास्त्र आहे: सोशल सायकॉलॉजी. या चौकटीतून लिहीलेली त्यांची अनेक पुस्तके - The Savage Freud; The Intimate Enemy: Loss and Recovery of Self Under Colonialism; The Illegitimacy of Nationalism and Other Essays; हिंदी सिनेमांवरचे समीक्षक निबंध The Secret Politics of our Desires; इत्यादी, इ. अत्यंत मार्मिक आणि विचारप्रवर्तक आहेत. खासकरून इंटिमेट एनिमी तर प्रत्येकाने वाचावेच असे आहे. त्यांची लेखनशैलीही प्रस्थापित "अ‍ॅकॅडेमिक" अशा बोजड शैलीला झिडकारून, कधी साध्या गप्पावजा तर कधी संदिग्ध, कोडे घालणारी, उपरोधक आहे. एखाद्या "कॉमनसेन्सिकल" भाषेत, थोडेसे रँबल करता करता हळूच काहीतरी नवीन सुचवतात. वाचणार्‍याला याचा त्रास होतो, पण सवय झाल्यावर मजाही येते. एकूण प्रस्थापित ज्ञानशास्त्रांच्या बाहेर राहूनही विविध शाखांच्या मूळतत्त्वांना नव्याने पडताळण्याचे काम नंनींनी अनेक दशके करायचा प्रयत्न केला आहे.

त्यांचा राजकीय दृष्टीकोन देखील असाच, डाव्या पार्ट्यांच्या कायम बाहेर राहून, परिवर्तनवादी, साम्यवादी राहिली आहे. "आधुनिकता" या कल्पनेचे, खासकरून त्याच्या भारतीय, वसाहतकालीन संदर्भाचे, ते कायम अभ्यासक राहिले आहेत, आणि डाव्या पार्ट्या असोत वा उच्च जातीय विचारवंत आणि राजकारणी असोत, त्यांच्या साम्यवादी शब्दांमागे, आधुनिकतेचे दाव्यांतील पोकळपणा, दलित-बहुजनांना, आदिवासींना समावून घेणे लांबचे राहिले, पण हे आधुनिक राष्ट्र, राज्यव्यवस्था आणि अभिजन संस्कृती त्यांना बाहेर ठेवण्यावरच कसे बेतले गेले आहेत, या सगळ्यांकडे नेहमी बोट दाखविले आहे. त्यांच्या Romance of the State पुस्तकाचे मुखपृष्ट या संदर्भात अगदी बोलके आहे.

मला आश्चर्य, आणि खंत याबद्दल वाटते, की हे सगळे असूनही, भाषेचे, पोलिटिकल डिस्कोर्सचे, मीडिया आणि लोकतंत्राचे इतके मार्मिक अभ्यासक असलेले नंदी, जयपूर फेस्टिवल सारख्या तमाशात, असंख्य कॅमेरांसमोर असे लूझ विधान केल्यावर त्या विरुद्ध उठलेल्या वादाबद्दल आश्चर्य कसे व्यक्त करतात? अनेकांनी अग्रलेखांतून, ब्लॉगपोस्टीतून समजावून सांगितले आहे की बाबांनो, ते असेच बोलतात, असेच लिहीतात, घरातल्या बैठकीत गप्पा व्हाव्यात तसेच बाहेर लिहायची-बोलायची त्यांची श्टाइलच आहे. पण ही शैली या कल्पनेवर बेतली आहे, की वाचणारे आपल्याच वर्तुळातले ओळखीचे असतील, आपल्याशी एकमत असतील, आणि आपल्या म्हणण्यामागच्या उपरोधक विचाराला बरोबर हेरतील. म्हणजे एका लाइक-माइंडेड वर्तुळाला, बैठकीला ध्यानात ठेवून, अशी विधानं केली जातात. त्याबाहेर जग असले, आणि ते आपल्या अभ्यासाचा विषय असले तरी ते आपल्या चर्चेत सहभागी होऊ शकेल, आणि ते ही अनपेक्षित रित्या, याचा विचारच होत नाही.

अ‍ॅकॅडेमिक लेखन आजकाल खूपच आयरॉनिक, सेल्फ-रेफरेंशियल झालं आहे, खासकरून इंग्रजीतले (हाहा!). ज्या अभ्यासकांना बाहेरच्या जगाशी काहीच संपर्क साधायचा नाही त्यांचं ठीक आहे, पण नंदींचा राजकीय आणि लिखाणाचा प्रवास या प्रवृत्तीशी लढा देणारा आहे. असे असूनही मला वाटतं की जातवाचक भाषा किंवा उदाहरण इतके लूझली वापरून, त्याचा बोध वा त्याला प्रतिक्रिया सीमित वर्तुळाबाहेर किती वेगळ्या पद्धतीने येऊ शकतात या बद्दल त्यांनी फारसा विचारच केला नाही.

"दलित, ओबीसीं"बद्दल विधाने करून "मी तर त्यांच्या हिताचेच बोलत होतो हे म्हटले की झाले का? एकतर त्यांना "संबोधून" ही चर्चा होतच नाही, तर कायम "त्यांच्या बद्दलच" होते. आता "ते" देखील ऐकतायत-वाचतायत म्हटल्यावर, त्याचा एकीकडे उदोउदो केल्यावर, ही जातवाचक भाषा किती सहजसहज आपल्या (उच्चजातीय) जिभेवर येते व आपल्या चर्चावर्तुळाच्या सीमेचे आकलन कशी करून देते, यावर फेरविचार करण्याची, इंट्रोस्पेक्ट करण्याची ही संधी आहे.

हा मुद्दा फक्त नंदींना लागू अर्थातच नाही, पूर्ण लिबरल, उच्च-जातीय, इंग्रजीत चालणार्‍या चर्चाविश्वाला आहे (ज्यात मी स्वत:लाही मोजते). पण त्यांच्या सारख्या संवेदनशील आणि परिवर्तनवादी विचारवंताला सुद्धा लागू आहे, याची आठवण हे सर्व प्रकरणाने मला करून दिली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हैन!! मस्त प्रतिसाद एकदम. विशेषतः

अ‍ॅकॅडेमिक लेखन आजकाल खूपच आयरॉनिक, सेल्फ-रेफरेंशियल झालं आहे, खासकरून इंग्रजीतले (हाहा!). ज्या अभ्यासकांना बाहेरच्या जगाशी काहीच संपर्क साधायचा नाही त्यांचं ठीक आहे, पण नंदींचा राजकीय आणि लिखाणाचा प्रवास या प्रवृत्तीशी लढा देणारा आहे. असे असूनही मला वाटतं की जातवाचक भाषा किंवा उदाहरण इतके लूझली वापरून, त्याचा बोध वा त्याला प्रतिक्रिया सीमित वर्तुळाबाहेर किती वेगळ्या पद्धतीने येऊ शकतात या बद्दल त्यांनी फारसा विचारच केला नाही.

"दलित, ओबीसीं"बद्दल विधाने करून "मी तर त्यांच्या हिताचेच बोलत होतो हे म्हटले की झाले का? एकतर त्यांना "संबोधून" ही चर्चा होतच नाही, तर कायम "त्यांच्या बद्दलच" होते. आता "ते" देखील ऐकतायत-वाचतायत म्हटल्यावर, त्याचा एकीकडे उदोउदो केल्यावर, ही जातवाचक भाषा किती सहजसहज आपल्या (उच्चजातीय) जिभेवर येते व आपल्या चर्चावर्तुळाच्या सीमेचे आकलन कशी करून देते, यावर फेरविचार करण्याची, इंट्रोस्पेक्ट करण्याची ही संधी आहे.

हा मुद्दा फक्त नंदींना लागू अर्थातच नाही, पूर्ण लिबरल, उच्च-जातीय, इंग्रजीत चालणार्‍या चर्चाविश्वाला आहे (ज्यात मी स्वत:लाही मोजते). पण त्यांच्या सारख्या संवेदनशील आणि परिवर्तनवादी विचारवंताला सुद्धा लागू आहे, याची आठवण हे सर्व प्रकरणाने मला करून दिली.

हा भाग लैच पटला आणि आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

क्या बात है! प्रतिसाद आवडलाच.
त्याउप्पर "इंटिमेट एनिमी" ची सुचवणी नोंदवली आहे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

परत एकदा मार्मिकच्या वरची श्रेणी निर्माण करावी अशी विनंती संस्थळचालकांना करत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

+१.

सहमत आहे.

लै भारी, अप्रतिम, सहमत, सुंदर, वगैरे श्रेण्या पाहिजेतच!

विशेषतः "सहमत" ही श्रेणी आवश्यक आहे, उगीच +१ करून एका प्रतिसादाची जागा खावी लागणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आशिस नंदी कोण? इथेपासून या विषयाबाबत उत्सुकता होती. (आणि अनभिज्ञता होती. साध्या भाषेत 'अज्ञान' म्हणता येईल. ;))

रोचना यांच्या या प्रतिसादामुळे या सर्व वादाचा पूर्ण खुलासा झाला. आभारी आहे.

(पण मग - माझ्यासारख्या नवख्या माणसास आशिस नंदी यांच्याबाबत त्यांच्या अभ्यासाबद्दलचा आदर वाटावा की त्यांच्या 'लूज टॉक'बद्दल आणि 'म्युच्युअल अ‍ॅडमिरेशन क्लब' बाबत तिरकार वाटावा? - यासंबंधाने गोंधळ उडाला.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विसुनाना तुम्ही त्यांचे एखादे पुस्तक वाचून मगच ठरवा! लिबजेन डॉट इन्फो वर त्यांची अनेक पुस्तके फुल्ल पीडीएफ वर उपलब्ध आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चर्चा वाचतो आहे.

आपल्या सगळ्यांचा अटेन्शन स्पॅन एखाद्या "साऊंड बाईट"पुरताच - आणि तोदेखील पुरतं बोलूही न देता , ऐकलेल्या अर्धवट बाईट पुरताच - मर्यादित झाला आहे काय, अशी शंका आली. कुणाचंही एका मिनिटापेक्षा कमी लांबीचं बोलणं ऐका, त्याला अर्धवटच थांबवा , त्याच्यावर हल्ला करा , किंवा त्याच्या बोलण्यातलं एखादं वाक्य बाहेर काढा आणि धुरळा उडवा. सोप्पं दिसतं आहे सगळं. गेल्या एका वर्षांत घडलेल्या या प्रकारच्या घटनांच्या मालिकेकडे पाहता हे स्पष्ट व्हावं.

माझ्यामते चर्चा-परिसंवाद-मुलाखत-भाषण करण्या आधी वक्त्यांनी एक डिस्क्लेमर द्यायची गरज आहे : "येत्या काही मिनिटांमधली मी व्यक्त करत असलेली मते ही संदर्भाशिवाय , पूर्ण बोलणं न ऐकता, सोयीस्कर अर्थ लावून घेणार्‍या, निव्वळ वाद निर्माण करणार्‍या घटकांना मी सादर समर्पित करतो आहे. कळावे लोभ असावा."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

सहमत आहेच, त्यामुळेच आशय सोडून, अशा(कोण काय/का म्हंटले) प्रकरणांवर खरंच चर्चा व्हावी काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अवांतर वाटेल असा प्रतिसाद देउ इच्छितो. खरे तर टायपायचाही कंटाळा आलाय. पण....
.
हा किस्सा
एकदा काय झालं;united nations का कुठल्या तरी संस्थेनं जगातील विविध भागांत एकाच प्रश्नाबाबत काही विचारणा केली. पण त्यास आलेले प्रतिसाद हे चक्रावून टाकणारे होते. प्रश्न अगदि साधा होता:-
Please give your honest opinion about shortage of food in rest of the world.
ह्या प्रश्नावर भारताकडून गेलेला प्रतिप्रश्नः-
बाकीचं ठीकय हो,पण what is "honest"?
.
चीनकडून गेलेला प्रतिप्रश्नः-
what is "opinion"?
.
काही प्रगत पश्चिम युरोपीय देशांकडून आलेला प्रतिप्रश्न :-
बाकीचं ठीकय हो,पण what is shortage?
.
काही दरिद्री आफ्रिकन देशांकडून आलेला प्रतिप्रश्नः-
बाकीचं ठीकय हो,पण what is food?
.
अमेरिकेकडून आलेला प्रतिप्रश्नः-
बाकीचं ठीकय हो,पण what is "rest of the world"?
.
We "hear" a lot, very few of us "listen".
those who listen are often habitual of selective listening.
.
.
.
किस्सा दुसरा:-
वाचिक अभिनय शिकताना अभिनयाच्या तालमीत्/प्रशालेत नेहमी दिले जाणारे उदाहरण:-
एकाच वाक्याचे वेगवेगळ्या ठिकाणी गॅप, पॉझ देउन किंवा एखाद्या विशिष्ट शब्दावर जोर देउन पाsssr वेगळे अर्थ होउ शकतात.
उदाहरण :-
सम्जा तुमच्या समोर रंगमंचावर दोन पात्रे बोलत आहेत. किंवा रंगमंचच काय ; कुठेही दोन व्यक्तींत संवाद सुरु आहे. आणि त्यातील एकजण पुढील वाक्य बोलत आहे. ठळक शब्दावर जोर देउन पहा; वेगळे अर्थ लागतील.
I didn't say you have stolen my pen.
I didn't say you have stolen my pen.
I didn't say you have stolen my pen.
I didn't say you have stolen my pen.
I didn't say you have stolen my pen.
I didn't say you have stolen my pen.
.
.
तर मी काय म्हणत होतो; हां आठवलं.....
.
.
.
चालु द्यात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ज्यांना ह्या विधानांमागच्या संदर्भचौकटीत रस आहे त्यांच्यासाठी इंडियन एक्स्प्रेसमध्ये आज त्या चर्चेचं शब्दांकन आलेलं आहे...
http://www.indianexpress.com/news/our-corruption-doesnt-look-that-corrup...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हे शब्दांकन वाचल्यानंतर त्यांना काय म्हणायचे आहे ते मला स्पष्ट कळले आणि ज्यांनी हे नीट ऐकले असेल त्यांनाही ते कळायला काहीच अडचण येऊ नये असे वाटले.

बाकी आजकालचा इलेक्ट्रॉनिक मिडियाने घातलेला सगळा सावळा गोंधळ पाहून क्रिस हेजेसच्या "Empire of Illusion" पुस्तकाच्या नावातल्या "End of Literacy and the Triumph of Spectacle" या ओळीची आठवण झाल्याशिवाय राहात नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसीवरच्या तज्ञांनी दखल घेतली म्हणजे ह्या विधानात नक्कीच काहितरी 'खळबळजनक' असणार हे नक्की.

बाकी साहित्य संमेलन = परीसंवाद = भ्रष्टाचार ही युती काही लक्षात आली नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

'चांगली प्रगती चाललीये हं देशाची ! पूर्वी फक्त धनाढ्य बलवानच बलात्कार करु शकायचे (भारतमातेवर) आता सर्वसामान्य जनताही करु शकते.'
कसं वाटतं हे वाक्य ? मूळ वाक्य वाचून असेच काहीसे मनांत आले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

>>मला आश्चर्य, आणि खंत याबद्दल वाटते, की हे सगळे असूनही, भाषेचे, पोलिटिकल डिस्कोर्सचे, मीडिया आणि लोकतंत्राचे इतके मार्मिक अभ्यासक असलेले नंदी, जयपूर फेस्टिवल सारख्या तमाशात, असंख्य कॅमेरांसमोर असे लूझ विधान केल्यावर त्या विरुद्ध उठलेल्या वादाबद्दल आश्चर्य कसे व्यक्त करतात? अनेकांनी अग्रलेखांतून, ब्लॉगपोस्टीतून समजावून सांगितले आहे की बाबांनो, ते असेच बोलतात, असेच लिहीतात, घरातल्या बैठकीत गप्पा व्हाव्यात तसेच बाहेर लिहायची-बोलायची त्यांची श्टाइलच आहे. पण ही शैली या कल्पनेवर बेतली आहे, की वाचणारे आपल्याच वर्तुळातले ओळखीचे असतील, आपल्याशी एकमत असतील, आणि आपल्या म्हणण्यामागच्या उपरोधक विचाराला बरोबर हेरतील. म्हणजे एका लाइक-माइंडेड वर्तुळाला, बैठकीला ध्यानात ठेवून, अशी विधानं केली जातात. त्याबाहेर जग असले, आणि ते आपल्या अभ्यासाचा विषय असले तरी ते आपल्या चर्चेत सहभागी होऊ शकेल, आणि ते ही अनपेक्षित रित्या, याचा विचारच होत नाही.

इथे दुसरी बाजूही लक्षात घ्यायला हवी. नंदी हे आपल्याकडचे 'पब्लिक इंटेलेक्चुअल' म्हणता येतील. तुम्ही म्हणता तसा अनेकांचा ह्या त्यांच्या मताशी आणि एकंदर शैलीशी पूर्वपरिचय आहे (एकमत नसेलही; उदाहरणार्थ, योगेंद्र यादवांनी आपला मतभेद स्पष्ट केला आहे). मग नंदींनी हे गृहित धरून का बोलू नये? 'त्यां'नीच बदलावं; 'आम्ही' मात्र असेच राहणार हा आग्रह नंदींच्या श्रोत्यांना तरी शोभतो का? उद्या कुणी असं म्हणू लागलं की 'किशोरी आमोणकर काय गातात ते काही समजत नाही बुवा. त्यांनी जरा सोपं गावं.' तर त्यांनी सोपं गावं का?

>>अ‍ॅकॅडेमिक लेखन आजकाल खूपच आयरॉनिक, सेल्फ-रेफरेंशियल झालं आहे, खासकरून इंग्रजीतले (हाहा!). ज्या अभ्यासकांना बाहेरच्या जगाशी काहीच संपर्क साधायचा नाही त्यांचं ठीक आहे, पण नंदींचा राजकीय आणि लिखाणाचा प्रवास या प्रवृत्तीशी लढा देणारा आहे. असे असूनही मला वाटतं की जातवाचक भाषा किंवा उदाहरण इतके लूझली वापरून, त्याचा बोध वा त्याला प्रतिक्रिया सीमित वर्तुळाबाहेर किती वेगळ्या पद्धतीने येऊ शकतात या बद्दल त्यांनी फारसा विचारच केला नाही.

मला नंदींसारखे वक्ते सामाजिक आरोग्यासाठी आवश्यक वाटतात. नाहीतर सोपं पण आशयहीन बोलत राहणारे पुष्कळ लोक रोज टीव्हीवर ऐकावे लागतातच की. आणि वर त्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याला पाठिंबासुद्धा द्यायला लागतो! किती कुचंबणा होते! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मला नंदींसारखे वक्ते सामाजिक आरोग्यासाठी आवश्यक वाटतात.

अगदी सहमत. नंदींनी सोपं, सगळ्यांना समजण्यासारखं लिहावं, किंवा गुंतागुंतीचे विचार मांडू नयेत असा माझा मुद्दा नाहीच. आणि सगळ्यांना पटावं असं बोलावं, अनकन्वेंशनल किंवा खळबळजनक काही बोलूच नये असे तर अजिबात नाही. वर म्हटल्याप्रमाणे त्यांनी मांडलेल्या मुद्द्याशी दुमत नाही; माझ्या विचारांवर त्यांच्या लेखनाचा प्रचंड प्रभाव राहिला आहे. पण ते पब्लिक इंटेलेक्च्युअल आहेत (आणि राम गुहा वगैरेंसारखे गोग्गोड नाही तर खरोखर जहाल विचारांचे) म्हणूनच मला आश्वर्य वाटतं की जयपूर सारख्या मंचावर सर्वांना त्यांच्या मताशी आणि एकंदर शैलीशी पूर्वपरिचय असेल असे गृहित धरले असले तर ते मीडियाबद्दल, लोकतंत्राबद्दल आणि आजच्या अस्मितावादी राजकारणाबद्दल त्यांच्याच लेखनात दिसणार्‍या मार्मिक अभ्यासाच्या, आणि प्रस्थापित वर्तुळांचे (अ‍ॅकॅडेमिक, राजकीय, ज्ञानशास्त्रीय) त्यांनीच जे परखड परीक्षणाच्या विरुद्ध जातं. स्वत:च आधी 'व्हल्गर आणि काँट्रोवर्शल' म्हणून टॅग केलेल्या विधानाबद्दल त्यांनी फारसा विचार केला नाही.

जयपूर सारखे स्पेक्टेकल रोचक आहेत - "ये जे एल एफ है मेरे भाई, यहां हर कोई पब्लिसिटी का भूखा है!!" - मीडियाला 'ब्रेकिंग न्यूज'च नाही, तर अनेक सामाजिक, राजकीय गटांच्या 'हर्ट सेंटिमेंट्स' साठी असले समारंभ आता एक मस्त संधी होऊन बसले आहेत. पण या बरोबर असल्या मंचांतील चर्चा ऐकणार्‍यांची, त्यात वापरल्या गेलेल्या कॅटेगरीज ला पडताळणार्‍यांची संख्या व स्वरूप खूपच विस्तारले आहे. त्यांच्याशी नंदींसारख्या प. इं. ना संपर्क साधायचा असला (आणि ते असल्या मंचावर आले म्हणजे असे त्यांना हवे आहे ते स्वत: फक्त पब्लिसिटी के भूखे नाहीयेत हे मी गृहित धरते!), तर या श्रोता वर्गाच्या वैविध्याचा थोडा अजून बारकाईने विचार व्हायला हवा, असे माझे प्रामाणिक मत. याचा अर्थ जपून बोला, साधंच बोला, गोग्गोड बोला, उगीच का भावना दुखावताय, असा नाही, तर आपले अत्यंत गुंतागुंतीचे विचार याच विविध श्रोतावर्गाला लक्षात घेऊन अधिक क्रियेटिव्हली मांडायला आव्हान आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रोचना ह्यांचे म्हणणे मला पटते.

ही एक अगदी सहज सर्वमान्य होण्याजोगी गोष्ट आहे की सार्वजनिक सभेत काहीहि बोलतांना श्रोता/श्रोते ह्यांना झेपेल आणि सहज आकलन होईल तेव्हढेच बोलावे. नाजूक विषयांबाबत बोलतांना तर अशी काळजी अधिकच घ्यायला हवी नाहीतर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो आणि मूळ मुद्दा दूर राहून भलतेच फाटे फुटतात.

SC/ST हा एक नाजूक मुद्दा आहे. तो तसा का असावा ह्या प्रश्नाला काहीहि उत्तर नाही. खोलीमधे गोरिला बसलेला आहे आणि त्याला कोणीहि बाहेर काढू शकत नाही आणि त्याच्याकडे दुर्लक्षहि करू शकत नाही. अशा परिस्थितीत त्यांच्यामधील SC/ST मधील लाचखोरीची चर्चा - ती कितीहि complimentary अर्थाची असो - सार्वजनिक सभेमध्ये अतिशय सावधपणे करावयास हवी आणि शब्द, मांडणी सगळेच विचारपूर्वक करायला हवे. नंदींनी हे का लक्षात घेतले नाही?

Discretion is the better part of valor हा वागण्याचा नियम ते विसरले. विद्वानांना पाचपोचहि असतो असे गृहीत धरता येत नाही हेच ह्यावरून दिसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कदाचित काळ वेगळा होता, प्रसारमाध्यमे इतकी आधाशी झालेली नव्हती.
पण तरीही आपली मते लोकांना दुखावणार नाहीत अशा रितीने कशी मांडावीत याचा एक वस्तुपाठ नरहर कुरुंदकरांच्या लेखनातून आणि विशेषतः भाषणांतून दिसून येतो.

सध्या ओवैसीसदृश वक्तव्यांचे पीक आल्याने भाषणातील एखादा उणादुणा आणि गैरसमज निर्माण करू शकणारा शब्दही लोकांच्या भावना भडकवायला पुरेसा आहे. आणि तसे करण्यात मिडीयाचा हात आणि फायदा आहे.

गोरिलाचा मुद्दा आता सर्वच गटांबाबत लागू होतो. वांशिक अस्मिता, धार्मिक अस्मिता, जातीय अस्मिता,भौगोलिक अस्मिता, भाषिक अस्मितांचे समूह गोरिला होऊन बसले आहेत आणि परखड पण हिताचे बोल सुनावणार्‍यांची मुस्कटदाबी सुरू आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>अस्मितांचे समूह गोरिला होऊन बसले आहेत आणि परखड पण हिताचे बोल सुनावणार्‍यांची मुस्कटदाबी सुरू आहे.

सहमत. म्हणूनच कुरुंदकरांना आपली मतं मांडणं आज अतिशय कठीण गेलं असतं. तीच गोष्ट आंबेडकरांचीही आणि फुल्यांचीही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

इथे कदाचित थोडा गोंधळ होतोय - माझे मत मी नीट मांडू शकत नाहीये Wink

दलित चळवळ फक्त एक सोडवायचा किंवा 'अव्हॉइड' करायचा किंवा सावध रहायचा 'नाजुक' प्रश्न नाही. कोठून व कशी आली याचाच शोध घेतच तर नंदी इथपर्यंत पोचले आहेत. त्याबद्दल त्यांचे विचार तर त्यांनी मांडलेच पाहिजे असा माझा आग्रह आहे; फक्त आपल्या अ‍ॅकॅडेमिक वाचकांना न संबोधून खुद्द निम्न-जातीय मानले गेले लोक, दलितही त्यांच्या श्रोता वर्गात आहेत हे लक्षात घेऊन त्यांना संबोधलं पाहिजे, नंदींनाच हवी असलेली चर्चा अधिक समृद्ध होईल.

म्हणूनच "विचारपूर्वक" मांडणी करणे म्हणजे "श्रोत्यांना झेपेल" असे बोलणे (गोग्गोड किंवा साधे-सोपे), किंवा "नाजुक" मुद्द्यांना टाळून बोलायला हवे असे मला म्हणायचे नव्हते. फक्त एखाद्या वर्तुळात परिचित असलेली शैली (किंवा जार्गन किंवा टेक्निकल शव्द) अचानक वाढलेल्या श्रोतावर्गाला ही तशीच ऐकू जाईल, किंवा आपण ज्यांच्याबद्दल हक्काने विधान करतो, ते आपले विधान ऐकू शकत नाहीत हे गृहित धरू नये. यात मीडियाची सर्कस आणि निव्वळ बघ्यांच्या गरजांना सोडून मी खुद्द दलित चळवळीतून नंदींवर झालेल्या टीकांच्या संदर्भात मी बोलतेय. मीडिया सर्कस काय, होत राहील, उद्या शशी थरूर किंवा दिग्विजय सिंह पुन्हा काहीतरी खळबळजनक म्हणतील आणि नंदींना सगळे विसरतील. पण चळवळीतून आलेली टीका-चर्चा रोचक आहे, बहुतेक उच्चजातीय असलेल्या आपल्या अ‍ॅकॅडेमिक चर्चेवर पुनःविचार करवणारी आहे, आणि माझे इथले प्रतिसाद त्याच संदर्भातले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही एक अगदी सहज सर्वमान्य होण्याजोगी गोष्ट आहे की सार्वजनिक सभेत काहीहि बोलतांना श्रोता/श्रोते ह्यांना झेपेल आणि सहज आकलन होईल तेव्हढेच बोलावे. नाजूक विषयांबाबत बोलतांना तर अशी काळजी अधिकच घ्यायला हवी नाहीतर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो आणि मूळ मुद्दा दूर राहून भलतेच फाटे फुटतात.

हे आणि बलात्कार होऊ नये म्हणून मुलींनी काळजी घ्यावी असे म्हणण्यात नक्की काय फरक आहे ते कोणी समजावून सांगेल काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथे अवांतर आहे तरी थेट प्रश्न असल्याने लिहितोच Smile

फरक असा की बलात्कार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी म्हणजे काय करावे याची यादी मुलींच्या स्वातंत्र्यावर बंधने आणणारी असतात. किंबहुना मुलींना स्वतःची काळजी घेता येत नाही, किंवा काय केल्याने आपण सुरक्षित राहु हे त्यांचे त्या ठरवू शकत नाहीत या भावनेतून ही व्यक्त झालेली असतात. (उदा. मुलींना/स्त्रियांना स्वतःहून जर असे वाटत असेल की तंग कपडे घालण्याने आपण असुरक्षित होऊ तर तिने ते आपणहून जरूर टाळावे, मात्र फक्त नवर्‍याचे/पतीचे/मुलांचे/भावाचे असे मत आहे म्हणून तिच्यावर 'काळजी' या लेबलखाली जबरदस्ती होण्याला विरोध आहे.) तसे इथे नाही . किंबहुना प्रस्तुत लेखकाला काय बोलावे हे समजते तरीही त्याच्या तोंडून असे वक्तव्य बाहेर पडले याचे आश्चर्य सदर वाक्यातून व्यक्त झाले आहे.

दुसरे असे, की प्रस्तुत बोलण्यामुळे गहजब झाला हे स्पष्ट आहे, त्यामुळे तसे बोलताना काळजी घ्यावी हे म्हणणे आहे. तंग कपड्यांमुळे किंव तत्सम इतर बंधंनांमुळे बलात्कार होतात हे कोणताही विदा दाखवून देत नसतानाही तसे करण्यापासून रोखणारी तथाकथित पोकळ 'काळजी' छुप्या मार्गाने पुरूषी वर्चस्व गाजवायला वापरली जाते याला विरोध आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

किंबहुना प्रस्तुत लेखकाला काय बोलावे हे समजते तरीही त्याच्या तोंडून असे वक्तव्य बाहेर पडले

म्हणजे तेच झालं ना की, लोक अमुकतमुक करतातच आणि ते सुधारणार नाहीत म्हणून आपणच काळजी घ्यावी. अशाने ही भलत्या ठिकाणची अतिसंवेदनशीलता कशी कमी होणार?

प्रस्तुत बोलण्यामुळे गहजब झाला हे स्पष्ट आहे

असहमत. प्रस्तुत बोलणे नीट न समजल्याने वा समजून न घेतल्याने गहजब झाला असे मला तरी वाटते. मुळात कोणी काही बोललं आणि ते इतरांच्या दृष्टीने कितीही चुकीचं असलं तरी लगेच 'माफी मागा/ विधान मागे घ्या' असा गदारोळ करणे हा वैचारिक बलात्कारच नव्हे काय? अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे मला जे आणि जसे बोलायचे आहे ते मी बोलेन, दुसर्‍याला काय समजते किंवा काय ऐकायचेय त्याची काळजी मी का करावी?

तंग कपड्यांमुळे किंव तत्सम इतर बंधंनांमुळे बलात्कार होतात हे कोणताही विदा दाखवून देत नसतानाही

बलात्कार नसतील होत पण अचकट-विचकट शेरेबाजी होते असं कोणी म्हटलं तर? शिवाय विदा असं म्हणतो की बहुसंख्यवेळा स्त्रिया एकट्या असताना बलात्कार होतात, मग स्त्रियांना एकटे न राहण्याचा सल्ला देणार का?

ज्याप्रमाणे कुठे काय कपडे घालावेत याचे संकेत असले तरी प्रत्यक्ष निर्णय त्या व्यक्तीचाच असतो, त्याचप्रमाणे कुठे काय बोलावे याचे संकेत असले तरी प्रत्यक्ष निर्णय त्या व्यक्तीचा असावा एवढेच म्हणायचे आहे. दोन्हीठिकाणी इतरांना दुर्लक्ष करायचे/सभ्यपणे विरोध व्यक्त करायचे स्वातंत्र्य आहेच.
मला तरी दोन्ही काळज्या/सल्ले पोकळच वाटतात आणि एकीकडे एक नियम आणि दुसरीकडे दुसरा असे करू नये असे वाटते.
असो. आवश्यकता आणि अवांतर होतंय असं वाटल्यास खव/व्यनित चर्चा करू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपण एकाच बाजुने वेगळ्या दृष्टिकोनातून बोलत आहोत. मी वरील प्रतिसाद दिला तो तुलना गैरलागू वाटली म्हणून.
बाकी,

ज्याप्रमाणे कुठे काय कपडे घालावेत याचे संकेत असले तरी प्रत्यक्ष निर्णय त्या व्यक्तीचाच असतो, त्याचप्रमाणे कुठे काय बोलावे याचे संकेत असले तरी प्रत्यक्ष निर्णय त्या व्यक्तीचा असावा एवढेच म्हणायचे आहे.

अगदी हेच म्हणायचे आहे. प्रत्येक बाबतीतच! अर्थातच स्त्रियांच्याही बाबतीत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नुकत्याच आलेल्या बातमीनुसार सर्वोच्च न्यायालयानं पोलिसांना आदेश दिला आहे की नंदींना अटक करू नये; पण त्याच वेळी नंदींनाही समज दिली आहे की इतरांच्या भावना आपल्या विधानांमुळे दुखावणार नाहीत यासाठी विशेष काळजी घ्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

>>आपले अत्यंत गुंतागुंतीचे विचार याच विविध श्रोतावर्गाला लक्षात घेऊन अधिक क्रियेटिव्हली मांडायला आव्हान आहे.

हा मुद्दा मान्य केला जाऊ शकतो. पण परिसंवादात त्यांना पुढे बोलूच दिलं गेलं नाही हेदेखील खरं आहे. त्यांना मुद्दा समजावून सांगण्याची संधीच मिळाली नाही हे खेदाचं नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हो, खेदाचं आहेच, संतापजनक ही आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यूट्यूबवर त्यांच्या अन्य चर्चा बघता आल्या. (या गदारोळानंतर शोधताना चाळणी घेऊन बसावं लागतंय.) पण आधीच्या चर्चा अतिशय सभ्यपणे चाललेल्या होत्या असं दिसतं. अशा प्रकारच्या वर्तनाबद्दल आय.बी.एनचे संपादक आशुतोष आणि उर्वशी बुटालिया यांच्याविरोधात कोणीच का बोलत नाही असाही प्रश्न पडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चांगली चरचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

>>मी खुद्द दलित चळवळीतून नंदींवर झालेल्या टीकांच्या संदर्भात मी बोलतेय.

>>चळवळीतून आलेली टीका-चर्चा रोचक आहे, बहुतेक उच्चजातीय असलेल्या आपल्या अ‍ॅकॅडेमिक चर्चेवर पुनःविचार करवणारी आहे, आणि माझे इथले प्रतिसाद त्याच संदर्भातले आहेत.

दलित चळवळीतून आलेल्या रोचक टीके-चर्चेची काही उदाहरणं देऊ शकाल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हा एक लेख. थोडा पर्पल प्रोस टाइप आहे, आणि त्यातलं बरंच काही मला पटत नाही - पण त्यातला हा भाग मला रोचक आणि महत्त्वाचा वाटला:

These remarks should not have surprised us as our academia also comes majorly from the upper castes, upper classes, and where schools and departments have been set up to study social exclusion but very little introspection has been done on a personal level. And for this very reason, it is rather important that we condemn casteist mindset of this kind, especially rooted in academia, so that the intelligentsia make efforts to provide a holistic progressive view on any issue than creating a colored image of their own stereotypes. As writers, academicians, scholars and students challenge patriarchal mindsets, casteist prejudices and classist nature of society, how do we forget that, coming from the same fabric of society, there is a need to challenge our own biases and stereotypes?

काफिला वर ही मुलाखतीबद्दल ही तेच, पण तरी काही भाग विचारप्रवर्तक आहेतः

So this is his argument. Madhu Koda is his model. But we don't have to emulate that. We don't have to accept that view. And our opinion has to be taken into consideration. I mean, he is making a comment specifying (that) SCs, STs and OBCs are the most corrupt people and they are creative people (in emulation), and that leads to democracy. We don't want this kind of characterization. Some people may enjoy (this) -- if you're elite, if you're upper caste, you may enjoy this characterization of his. And you may say that that he is not essentializing Dalits, but is actually giving agency to Dalits. We don't want this false agency to Dalits as corrupt people.

(ठसे माझे)

प्रतिसादांमध्ये, नंदींच्या विधानाविरुद्ध निवडलेल्या न्यायालयीन मार्गाची टीका आदित्य निगमची टीका, आणि पुढे चर्चा आहे.

अजून एक कुठेतरी वाचल्याचं आठवतं पण आता लिंक आठवेना. आठवल्यास इथे देईन. जाता जाता, चळवळीतील नाही, पण काफिल्यावरच शुद्धब्रत सेनगुप्ताचा लेख ही वाचनीय आहे (शेवटचं महाभारताचं अवांतर सोडल्यास...)

They reflect instead a habit of inexactitude and imprecision that is indulged in Indian intellectual life, based on the easy anecdote, idle prejudice and plain statistical dissimulation, and deployed, casually, in passing as the currency of opinion, in may I add, largely male homosocial gatherings, where no one actually challenges anyone else. It reflects the sad fact that the mainstream of Indian intellectual life has not yet learnt to think beyond, below or besides identity based categories.

With regard to a discussion of corruption, the question of caste has a relevance insofar as the informally expressed networks of power and privilege are concerned, through which corruption operates – nepotism, for instance, in a specifically Indian context has to be read in terms of caste, because of the relationship between kinship, the closed structure of many affinity groups and affinal ties and caste structures in India. This is perhaps the territory that Ashis Nandy intended to step into when he began talking about corruption at the Jaipur Literary Festival. But a consideration on the matrix of privilege, informality and familiarity that comes with an assessment of how the wheels of corruption are greased – which is best represented by Nandy’s remark gesturing towards how elites reward and protect their own (which in all fairness cannot be read in an ‘anti-Dalit’ manner) does not necessarily translate into a quantitative assessment of which caste embodies how much corruption. That leap, I am afraid, takes us straight into a habitual, reflexive cast of thought that cannot articulate itself in terms other than those of caste. That intellectual failure, the rush to make a sweeping statement about millions of people, their intents, actions and motives is what disappoints me.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दुर्दैवाची बाब अशी की एखाद्या माणसाच्या जन्माची पार्श्वभूमी पाहून त्याच्या बोलण्याचा अर्थ काढण्याची घाई मीडियाला (आणि मग मुस्कटदाबी करण्याची घाई गोरिल्लांना) झालेली आहे.
इतकेच कशाला? आपल्याच जातभाईने काही श्रेयस्कर सल्ला दिला तरी तो 'त्यांच्यातला' झाला असे म्हणण्याची पद्धत आहे.

आशिस नंदींना काय म्हणायचे आहे (म्हणजे टंग इन चीक वगैरे) ते समजावून घ्यायला त्यांचे विचार माहित असण्याची गरज होती. मीडियात आता अशी माणसे आहेत का?
दुर्दैवाने 'ज्याचे करायला जावे बरे ते म्हणते माझेच खरे' या म्हणीचा अनुभव नंदींना आला.त्याचेच त्यांना सर्वाधिक दु:ख झाले असावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'न्यू यॉर्कर' ह्या सुप्रसिद्ध नियतकालिकात नंदींविषयी आलेला हा लेख नंदी प्रकरण आणि एकंदर भारतातलं अभिव्यक्तिस्वातंत्र्य यांचा वेध घेतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

एक उत्तम लेख.
नंदी प्रकरण इतके उलगडून (कोल्लापुरी भाषेत 'इस्कटून') सांगितले तरी metropolis नामक प्रतिसाददात्याने तिथे जे लिहिले आहे ते वाचून कीव आली.
(कुणाची ते समजून घ्या.)

भारतातल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत म्हणाल तर आता खासगीतसुद्धा बोलताना आपल्या आजूबाजूला उपस्थित असलेल्या मंडळींकडून 'तुम्ही काहीही बोललात तरी आमच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत' असे स्ट्यांप-पेपरवर लिहून घेऊनच तोंड उघडावे असे दिवस येत आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमेरिकेतलं, छोट्या प्रमाणातलं आणि अतिशय मर्यादित, पण प्रत्यक्ष अनुभवलेलं प्रकरण.
'Centre for inquiry' या नावाखाली जमणार्‍या लोकांमधे एकाला Judgemental Austin map या नावाखाली प्रसिद्ध झालेल्या नकाशाचाही राग आलेला होता. अन्य लोकांना या नकाशाबद्दल काय वाटतं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नसावी.
http://austinist.com/2012/06/08/judgmental_austin_map.php

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.