वेडी आशा अनुदानाची -

आशा मोठी वाईट असते
कुणालाच ती सोडत नसते -
पाऊसधार भुलवुन जाते
धरा कोरडी पहात असते...

गोठ्यामधली वैरण संपुन
गुरेढोरे विकून झाली -
डोळ्यामधल्या पाण्यामध्ये
शिळीच भाकर भिजून गेली...

दुष्काळाचे पडता सावट
शासन सारे झोपी जाते -
बळीराजाची वेडी आशा
अनुदानाची वाट पहाते !
.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अनुदान म्हणजे मला आधी संशोधनासाठीचे अनुदान वाटले (रिसर्च ग्रँट). आजकाल संशोधनाकरिता अनुदाने मिळवायची आशा सुद्धा बरीच व्याकूळ असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0