धूसर

धूसर धूसर वाटतो
आता तुझा चेहरा
अगणित क्षणांच्या थेम्बानी भिजुन गेलेला........

जणू अनेक युगं लोटली आपल्याला भेटून...बघून

प्रत्येक क्षणी नदी जशी असते वेगळी....वाहती....
तसाच माणूस.
या क्षणाचा दुसरया क्षणी नाही...
या क्षणाचं नातं या क्षणापुरतच.

तुझ्यामाझ्यातले अंतर मिटवु पाहणारे ते सर्व क्षण
दुरून पाहत राहतात...असहायपणे ........

तू ..........तुझं सगळं काही ....

सगळयावर काळ नावाची अंतिम शक्ति फिरवत चाललीय आपले हात.....

धूसर धूसर वाटतो
आता तुझा चेहरा....
~भलती भोळे

field_vote: 
0
No votes yet