त्रागा धागा... वैताग

हा धागा मी का लिहितोय ?
कटकट करुन फार थकलोय. चिडचिड करायचाही स्टॅमिना संपलाय. अगदि लहान लहान गोष्टींत चिडचिड करायची पूर्वीपासून सवय. एक बस सुटली ऑफिसची नि ५ मिनिटं वाट पहावी लागली, कर चिडचिड. बॉसनं येताना सगळ्यांना शेकहँड केलं गुड मॉर्निंग म्हणत, मला सोडलं, कर चिडचिड. तिचं नाव ठाउक नाही, पण रोज येउन ओळखीची स्माइल देते, आज एकदम अनोळखी चेहरा करुन चाल्ली गेली, कर चिडचिड.
पक्यानं आज पुन्हा फुकटात चहा पिला माझ्याकडून नि पुन्हा वर निर्ढावल्यासारखा फुक्टात सुट्टा मारुन गेला; बोंबल त्याच्या नावानं.(तरी त्याला स्वतःहून बोलावून चहा पाजायचं सोडू नकोस. किंवा त्यानी बोलावल्यावर लागलिच जायची सवय मोडू नकोस.)
धाग्याला प्रतिसाद नाही मिळाले, होउन बस खट्टू. बसम्ध्ये शेजारी जाड्या येउन बसला नि माझ्याही सीटचा ८०% भाग त्यानं व्यापला, करुन घे वैताग.
.
चीननं ग्वादार बंदर घेतलं, बांधलं ; घे टेन्शन. युरो कोसळणार, डॉलर कडाडणार असं ऐकलं, कर चिंता. डॉलराऐवजी रुपया कडाडला(नि डॉलर पडला!) अजूनच घाबर. कंपनीचा नफा कमी झाला हो. पैसा कमी मिळणार हो. अशी बोंब मारणं कर सुरु.
.
पाकड्यांची अण्वस्त्रं माथेफिरुंच्या हाती जाण्याचं ऐकलं कर त्रागा. जगातलं पेट्रोल एक न एक दिवस संपणार आहे हे पुन्हा जाणवलं, घे घाबरगुंडी उडवून स्वतःची. "अरे बाप रे , आभाळ कोसळणार, आता कसं होणार" हाच ह्या सगळ्यात आमचा टोन.
.
बस आता. हे जगाचं टेन्शन सोसवत नाही. "सारी दुनिया का बोझ मेरे ही कमजोर खंदो पे है" असं वाटून घेणं सोडीन म्हणतो. जsssरा मोकळ्या मनानं श्वास घ्यावा. मनापासून आवडलेल्या छोट्या छोट्या गोष्टींना दाद देउन पहावी. पण आधी एकदा सगळा त्रागा लिहूनच काढायची तीव्र इच्छा आहे. पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या धाग्यांवर तोच तो वैताग डोकावयास नको.
.
.
समाजवादी आत्मताडन नि मन मारुन जगणे
पूर्वी ऊठसूट स्वच्छ चारित्र्यवाल्या जुन्या नेत्यांबद्दल, नि त्यांच्या उच्च मूल्य, साधी राहणी, परोपकार , निष्ठा, वगैरेबद्दल वर्तमानपत्रात वाचायचो आणि आपल्याला किती वाईट काळात रहावं लागतय त्याबद्दल हळहळायचो. आजही मराठी वृत्तप्त्रांतातील स्तंभलेखनात जुन्या काळच्या समाजवाद्यांचा प्रभाव आहेच. विनोबा भावे,साने गुरुजी,तर कधी नानाजी देशमुख, कधी राममनोहर लोहिया, एसेम, मृणाल गोरे किंवा उच्च मूल्ये जपणारे , अभ्यस्त असणारे आणि प्रागतिक विचाराअंचे म्हणून यशवंतराव चव्हाण अशी नावं पब्लिक घेते.
मुळात ह्या सर्वांचा जेव्हा तथाकथित कर्तबागारीचा सुवर्णकाळ सुरु होता, तेव्हा भारत कुठे होता?
ह्यांनी त्यात काय भर घातली? आज जे भिकारचोट, अप्पलपोटे आणि ढेर्‍या तुडुंब भरल्या तरी ढेकरही न देणारे असे जे नेते म्हणवले जातात,हे त्यांचीच सेकंड जनरेशन फळी आहेत ना? ह्या आज गणंग वाटणार्‍यांना त्यांनीच वर आणले/येउ दिले का?
की ह्यांना ते थांबवायचे होते पण काळाच प्रवाह अडवण्यात हे माझ्याइतकेच दुर्बळ, हीन दीन दुबळे ठरले?
म्हणजे चांगली वर्तणूक असणरे सज्जन पण दुर्बळ अशीच ही माणसे का?
.
सगळ्या भल्या म्हणवल्या जाणारे लोक नेहमी कांदा भाकरीच का खातात? चांगलं खाण्यावर असे ते खार खाउन का असतात?(स्पेशली विनोबा भावे).चांगलं खाउनपिउन समाजसेवा करता येत नाही का?
विनोबा भावे आणि गांधी ह्यांच्या "भलेपणानी वागा", "चांगला माणूस बना" असल्या कै च्या कैच उपदेशाला सिरियसली घेतल्यानं आम्ही किती खड्ड्यात गेलोय हे ह्यांना माहितीये का?
माझ्या खड्ड्यात जाण्याची हे जिम्मेदारी घेतात का?
चांगलं खाउनपिउन समाजसेवा करता येत नाही का?
समाजासाठी आप्लं घर स्वाहा करतो म्हणजेच फार काही मोठ्ठं करतो असं काही आहे का?
सुखासुखी राहणं हा मोठ्ठा गुन्हा आहे का? "हे साले पांढरपेशे", "स्वतःपुरतं पाहणारे" असं म्हणत नेहमी आम्हाला आमच्या जगण्याची लाज वातून द्यायचा हा वृत्तपत्रवाल्यांचा का प्रयत्न असतो?
.
विनोबाजींचे बहुतांश लिखाण हे उपदेशात्मक असते त्यामुळेच कधी कधी थोडेसे वाचून झाले की कंटाळवाणे नि पकाउ वाटते. उदात्त, पारंपरिक भारतीय विचार वगैरे त्यातून डोकावत राहतात.त्यांच्या टाइपच्या पुढील वाक्यांमुळे मला व्यावसायिक व व्यावहारिक जीवनात जबरदस्त आपटी खावी लागली.

खरे बोलावे. साधे रहावे. उगाच भपका कशाला? दुसर्‍यांना माफ करावे. समजून घ्यावे.भलेपणाने वागावे.
उगाच कुणाला वाइट्-साइट बोलू नये.(म्हनजे थोडक्यात सगळी टिंगल टवाळी गायब. गजाल्या गायब. कट्टे गायब्.दोसत कंपनी गाय्ब.) मेहनत करावी. मेहनत केली असेल तर त्याचे श्रेय मिळेलच. श्रेय मुद्दम घेण्याचा प्रयत्न करू नये.आपली चूक कबूल करावी.दुसर्‍याच्या चुका उगाच प्रकाशझोतात आणू नये.
.
दवणे :-
चित्रपट रसिक म्हणवणार्‍यांनी "गुंडा" पाहिलं नसेल, वाचक म्हणवणार्‍यांनी "दवणे" वाचले नसतील तर त्यांनी आयुष्यात खूप मोठ्ठं काही मिस केलय.
.

(सर्व साने गुरुजी फ्यान ची क्षमा मागून) अधिकाधिक बाळबोध, सुगम, सुकर, तथाकथित "संस्कारक्षम" लिहिण्यात साने गुरुजींपेक्षाही दवणे कैकपट पुढे आहेत. ( त्याच्या लिखाणात साधेपण, सात्विकपणा, वागण्यातील शुचिर्भूतता वगैरे वगैरे टिप्पिकल मध्यमवर्गानं over hype करुन ठेवलेल्या संकल्पनांचा भडिमार आहे.)
.
कुणाला शिव्याशाप खरोखर लागत असतील असे वाटत असेल तर माझ्या आयुष्यातील सर्व तळतळाट ह्या बकवास समाजवादी विचारांना लागतील. "साधे रहा. चांगले रहा. भले रहा. (स्वतःची चूक नसताना) थोबाडित खाउन घ्या. स्वतः कष्ट करूनही सुखासमाधानानं जगायची लाज वाटून घ्या. आपल्या कामाचं क्रेडिट घ्यायला संकोच करा नि स्वतःच्या पायावर धोंडा घालून घ्या; स्वतःचा न्याय्य हक्क विसरुन मन मारुन जगा. गुणी बाळ व्हा."
असला बकवास सिरियसली घेतल्यानं माझं लै नुस्कान झालेलय. स्वतःवर विलक्षण अन्याय करायची नि न्यूनगंड बाळगायची , अनावश्यक समाजसेवा (स्वतःचे इतरांमार्फत शोषण होउ देण्यासाठी इतरांना उत्तेजित करण्याची!!) करण्याची मला असल्या कंपूच्या बालपणातील घेरावामुळे लागलेली सवय अजूनही धड गेलेली नाही.
.
थोडक्यात थिल्लरपणाचा विक्रम तो माणूस करतो. ह्या उथळपणात त्याला फक्त चेतन भगतच*टक्कर देउ शकतो.
.
.
*भगत सोशालिस्ट बकवास करतो असे मी म्हणत नाही. पण तो त्याच तोडीचे भंकस्/थिल्लर/सवंग लिखाण करु शकतो असे मला म्हणायचे आहे.
.
स्वामी विवेकानंद :-
"इच्छा असेल तर सद्गुरु मिळतोच" , तथाकथित "सन्मार्गस नि आध्यात्मिक उन्नतीस लागतोच" वगैरे वगैरे स्टाइल काही स्वामीअभ्यासक म्हणवणार्‍यांनी बिंबवले. आम्ही दिवसेंदिवस इच्छाच करीत बसलो.
नंतर मात्र त्यांचेच इतरही विचार/quotes समजले ते बरे झाले. कष्ट करा. (चक्क भौतिक)उन्नती करुन घ्या. पाश्चात्त्यांच्या चांगल्या गोष्टी( मोकळेपणा, सचोटी, आत्मविश्वास) शिकण्यास संकोचू नका . बंधूभाव जपा. बलशाली व्हा. "तरुणांनो गीता पठण करण्यापेक्षा आधी सशक्त व्हा. भरपूर फुटबॉल खेळा" ह्या धर्तीवरचं बरच काही "स्वामी विवेकानंद म्हणतात" ह्या इवल्याशा पॉकेट बुक मध्ये मिळालं. स्वामीजींच्या नावानं जो डोक्याला शॉट्ट करुन घेतला त्यावर स्वमीजींनीच उतारा दिला.
असो.
.
साने गुरुजी, विनोबांचे काही निबंध नि विचार आणि अशा महापुरुषांच्या गोष्टी ह्या नाही त्या वयात वाचल्या. निस्ते वाचून न थांबता वाचून सिरियसली घेतल्याने महाप्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. वागणूक विचित्र झालेली नि साइडलाइन झाल्याने होणारा त्रास व इतर वैताग नेमक्या शब्दांत इतरांसमोर मांडता न आल्यानं स्वतःचाच प्रदीर्घ काळ छळ करुन घेतला होता. झेपेल ते झेपेल तसे करावे, नीट समजून घ्यावे; समजत नसेल तर सोडून द्यावे नि चार चौघांसारखे जगायला लाजू नये, गिल्ट तर अजिबात वाटून घेउ नये हे समजायला फार म्हणजे फारच उशीर झाला होता.
.
.
मिपावर ह्या चिडचिडीवर एका प्रतिसादात भारीच उपाय सुचवलेला :-
सॉफ्ट्वेयरचे hotfix वा नविन version येते तसेच विचारांचेही करायचे असते.
विचारांच्या मागे "शक्य असेल तेव्हा", " नुकसान होणार नसेल तर ","काहीच फायदा होणार नसेल तर" हे टाकून पहा.
शक्य असेल तेव्हा खरे बोलावे. साधे रहावे.
काहीच फायदा होणार नसेल तर उगाच भपका कशाला?
नुकसान होणार नसेल तर दुसर्‍यांना माफ करावे. समजून घ्यावे.भलेपणाने वागावे.
.

माझे रडगाण्यातून थोडा पॉझ घेतोय.
कामास लागतो. बाय.

--मनोबा

field_vote: 
4.25
Your rating: None Average: 4.3 (4 votes)

प्रतिक्रिया

ये क्या हाल बना रक्खा है.. कुछ लेते क्यूं नही.. ?

Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कसे घेणार?
चिंतातुराणां न लाइफ न मज्जा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बस आता. हे जगाचं टेन्शन सोसवत नाही. "सारी दुनिया का बोझ मेरे ही कमजोर खंदो पे है" असं वाटून घेणं सोडीन म्हणतो. जsssरा मोकळ्या मनानं श्वास घ्यावा. मनापासून आवडलेल्या छोट्या छोट्या गोष्टींना दाद देउन पहावी.

चांगला उद्देश. शुभेच्छा!

पण आधी एकदा सगळा त्रागा लिहूनच काढायची तीव्र इच्छा आहे. पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या धाग्यांवर तोच तो वैताग डोकावयास नको.

बघ हं पुन्हा अज्जीबात किरकिर करायची नाही... जमेल का? Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile एवढ प्रामाणिकपणे लिहिल्यावरं तुम्हाला बरचं बरं वाटलं असेल, ह्या चिंता थोड्या प्रमाणात सगळ्यांनाच भेडसावत असतात, प्रमाण फार झालं की काही लोकं दोन घोट मारतात आणि पुढे सरकतातं, काही लोकं इतरांनां प्रत्यक्ष प्रमाण दाखवतात, फेसबूक सारख्या आंतरजालीय व्यवस्थांमूळे इतरांचं आयुष्य कसं मजेत आहे आणि आपणच कसे म्याड आहोत असं सगळ्यांनाच वाटत असतं, नफ्याचं वैश्विक सुत्र(फॉर्म्युला) असं काही नसतं हे समजायला ह्या सगळ्यातून जावं लागत, ते जाणं जरा त्रासदायक असतं पण ते दूरगामी फायद्याचं असतं.

दुष्काळाचे फोटो बघितले की क्षणभरासाठी "वाया जाणार्‍या पाण्याचा" विचार होतो, टाकल्या/नासल्या जाणार्‍या अन्नाचा विचार होतो, आपण माजतो आहे असं अधिक प्रकर्षाने वाटायला लागतं, असे अनेक प्रसंग रोजच्या आयुष्यात येत रहातात, लाज वाटत रहाते.

सगळचं आलबेल किंवा सगळाच नरक कायम नसतो, स्थित्यंतरं कायम असतात, दू:ख करण्यापेक्षा क्षमतेप्रमाणे योग्य प्रयत्न करणं केंव्हाही चांगलं, बाकी जो-तो ज्याच्या त्याच्या कर्मानं जगतो-मरतो, त्याचा किती भार कशासाठी आपण वहायचा हे ज्याचं-त्यानी ठरवावं.

खूप त्रास/त्रागा होत असेल तर एक सुचना - ADHD किंवा Anxiety disorder ची लक्षणे साधारणत: अशीच असतात, disorder मुळे दैनंदिन जिवन बर्‍यापैकी त्रासदायक होतं व त्याच दूरगामी परिणाम होतो, तसं असल्यास वेळेत योजलेलं थोडं-फार मेडिकेशन व मेडिटेशनने मदत करेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तरी मी सांगत होतो फार विचार करु नका! रात्री खोकल्याच औषध घेउन मस्त झोप काढा मनोबा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

डांगी अडुळसा ना.. ??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अडुळसाची चव बाकी लैच भारी अस्ते बरं!! त्या बेचव बेनेड्रिलपेक्षा हे औषध लै मस्त लागायचं. दोन-दोन चमचे मुद्दाम पीत असे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मनोबा, धागा आवडेश. मनात खदखदणार्‍या गोष्टी एकदाच्या उकलून दाखवल्या की मन थोड्या वेळासाठी का होईना, एकदम स्वच्छ होतं. बाकी अलीकडे आत्मताडन बरंच कमी झालंय. इतर गोष्टी कमीअधिक प्रमाणात सलत असल्या तरीही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"मुलींची शाळा", "मुलांची शा़ळा" ...ई ई ई ई ई....यक्क्क्क.........
अशा सेपरेट शाळा काढणं हा राष्ट्रिय गुन्हा म्हणून जाहिर करायला हवा. त्याच्यानं पर्सन्यालिटी प्रॉब्लेम होतो.
.
शाळा सोबत ठेवली तर पोरं मोठी झाल्यावर बावचळल्यासारखं करायची किंवा उचकल्यासरखं किंवा हपापल्यासारखं करायची शक्य्ता कमी होते. मला अजूनही कमी परिचित स्त्रियांशी बोलताना गोंधळल्यासारखं होतं. कळतं पण वळत नाही.म्हणजे समजा अगदि ग्रुप जमलाय कींवा कट्टा सुरु आहे; तेव्हाही अगदि शेजारी येउन , नाव घेउन कुणी स्पष्ट प्रश्न विचारला तरच मी उत्तर देतो. उत्तरही जेवढ्यस तेवढे असते. बोलायचे टाळतो. विनाकारण कॉन्शिअस होतो. नक्की काय होते सांगता येत नाही. जीभ ,मान आक्रसते. मी मनानेही आकुंचित पावतो. मनातल्या मनात कोपर्‍यात जाउन बसतो. अन्यथा ग्रुप मध्ये बसलो आहोत, सगळे बोल्ताहेत असे चित्र असेल तर त्या चित्रातील गप्प बसलेला तो प्राणी मीच असतो. बर्‍यापैकी आता ग्रुप असताना आजही कमी परिचित स्त्रियांबद्दल माझा reflex हा असाच आहे. मला मिक्सअप होण्यास भयंकर वेळ लागतो. कधी कधी अनंत वेळ घेतला तरी मी मिक्स अप होउच शकत नाही. हा मी असा आहे हे मला ठाउक असतानाही मुळात माझ्या मागे कुणी लागूच कसं शकतं हे आजवर मला समजलेलं नाही.
अर्थात भारतात मला माझ्यासारखेच शतमूर्ख सहस्रसंख्येने सापडले. आपण एकटे नाहित ह्या कल्पनेने सुखावलो.
.
म्हणूनच "शेपरेट शाळा हा राष्ट्रिय गुन्हा" आहे.
.
टू द टॉप ऑफ धिस आय सरप्राइझ अबाउट वन थिंग . आमची "भावी ही" आहे. तिला हे असं आहे हे सगळं सगळं ठाउक आहे. तिला हा चक्क प्लस पॉइंट वाटतो.मध्यमवर्गीय चष्म्यातून हा बावचळलेपणा म्हणे सभ्यतेचा पुरावा आहे!
.
इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला माझी प्रोजेक्ट मेट घरी वगैरे यायची.(प्रोजेक्ट टीम मी निवडली नव्हती. HOD ने सिलेक्ट करुन दिली होती. माझी मुलींना एकदम चक्क "माझ्या सोबत प्रोजेक्ट करणार का" इतका भयंकर चावट, लज्जास्पद, अश्लील वगैरे प्रश्न थेट विचारायची हिम्मत नव्हती.)
तर ती यायची तेव्हाही घरचे(त्यातही स्त्रीसदस्य) विनाकारणच उगीचच सलगीनं वागायचे. "आम्हाला चाल्तं हो. आम्हीही तसे फार मागासलेले वगैरे नाही. मोकळ्या विचारांचे आहोत." असं उगीच अधून मधून आडून आडून सात सांगत वैताग आणायचे. त्यांच्या ह्या सांगण्यामुळं ते खरोखर तसे नाहित; त्यांना फक्त तसे दाखवायचे आहे आणि तेसुद्धा तसेच अवघडल्यासारखे आहेत ह्यावर शिक्कामोर्तब व्हायचे.
.
ह्या परिस्थितीत वढल्यानं परवापरवापर्यंत पार वाट लागलेली होती. जसाजसा सोशल मिक्स अप झाला तसा निखळपणे दंगा करता आला. हा असाच आधीची वीस बावीस वर्षे नि:संकोचपणे करता आला असता हे समजलं.
.
बादवे, मी स्वभावाने "शांत"नाही. एखादा मुद्दा मिळाला तर त्याबद्दल मी बिनदिक्कत काहीहे पिंका टाकित सुटतो. किंवा अमुक विषयाची माहिग्ती व्हावी म्हणून शंका वगैरेही विचारतो. प्रॉब्लेम कधी होतो? प्रॉब्लेम माझा तेव्हा होतो जेव्हा इकडचं तिकडचं बोलायचं असतं. मुद्द्यांशिवाय सहज, गप्पाटाप्पा करायच्या असतात. हां तेव्हा मात्र आख्खा कोराच असतो. ब्लँक. ह्या सर्व गोष्टीचं १००% खापार शाळेवर जात नाही; पण त्याचाही काही प्रमाणात तरी महत्वाचा सहभाग आहेच.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मनोबा.. ज्योक मारण्याच्या नादान धागा आवडल्याचं सांगायचंच राहिलं..

या त्राग्याशी थेट संबंध नाही पण ही वेबसाईट पाहिली नसशील तर पहा.. आवडेलः

http://www.skeptic.com/

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला आठवतय तसं वय वर्षे बावीसएक होइपर्यंत मी औरंगाबाद शहराच्या धड पुरेसं बाहेरच पडलेलो नाही काही कारणाने.वय वर्षे तेवीसपासून मी नॉर्मल लोकांना भेटलो. त्यामुळं बौद्धिक वय अजूनही पाचेक वर्षेच आहे. घर ते शाळा इतकच करायचो. शाळेनंतर फार तर इकडं तिकडं फिरणं आणी धडपडणं व्हायचं, त्यातही एकटाच असायचो. कधी कधी ग्रुप असायचा. पण मी अशा एखाद्या ग्रुपमध्येही एकटाच असायचो. i may not be unique. but i was alone.
.
मला प्रॉब्लेम ice breakingचा आहे. मला ते चटकन करता येत नाही. विशेषतः in person भेटित. त्यातही ग्रुपमध्ये भेटत असेन तर नक्कीच.एकदा एवढे ice breaking झाले की मग काहिच नाही.
.
.
जालवरती चक्क स्त्री आयडी "monogamy is a myth" ह्या धर्तीवर बोलूच कसं शकतात? (भारतीय) स्त्री त्यात पुन्हा विवाहित असून मद्यप्राशन करुच कसं शकतात? पुन्हा ते गपगुमान न करता वर तोंड करुन साम्गायला काहिच न वाटणे ह्या गोष्तीमुळे मला दचकायला होतं.(व्यक्तीस्वातंत्र्य वगैरे ठीक आहे; पण वातावरण्/संस्कार वगैरे नावाखाली एक प्रोग्रामिंग आहे; ते मानगुटीवरून उतरत नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

प्रकाटाआ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तुका म्हणे ऊगी राहावे
जे जे होईल ते पाहावे

या ऊक्तीचा ऊपयोग केल्याने चिडचिड कमी होते असा स्वानुभव आहे Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

खिक्
इन्ट्रोव्हर्टनेस म्हणजे बावच़ळलेपणा असेल तर आहोत बॉ आम्हीही बावचळलेले Wink
आणि मुलींसोबत असे नाही, एकूणच अघळपघळ बोलताना आपोआप कोमात जाणारे.. एकत्र शाळेत शिकूनही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कधी वेळ मिळाला तर निरीक्षण करा. प्रत्येक घरात एक सोफा सेट असतोच फक्त लेदरचा की लाकडी की आणखी कसा हाच फरक, एक डायनिंग टेबल असतोच फक्त आकार-उकार आणि खुर्च्यांचा फरक, एक फ्रीज असतोच फक्त ब्रँड वेगळा... सगळं कसं स्टँडर्ड लाईफ. चारचौघांसारखं झालं पाहिजे आणि त्यातल्या एक-दोघांपेक्षा बरं असेल, आणखी एखाददोन जास्तीच्या वस्तू असतील तर बरंच! त्यात पुन्हा बहुश्रुत, कलासक्त, संवेदनशील असायला पाहिजे! ऑफिसात हाताखाली जितके जास्त लोक कामाला असतील तितकं चांगलं. टीव्हीवर जाहिरातीत दाखवतात तसं सगळं असलं म्हणजे झालं यशस्वी आयुष्य! लग्न, घर, गाडी, मुलं, नातवंडं असे सगळे टप्पे ठरल्यावेळी ठरल्यासारखे पार पडले म्हणजे झालं यशस्वी आयुष्य!
असं यशस्वी आयुष्य जगण्यासाठीच सगळी धडपड!
पण मध्येच कधीतरी गडबड होते. बहुश्रुतपणा वाढवायला काही वाचायला जावं तर नको त्या गोष्टी कळायला लागतात. संवेदनशील असायच्या नादात अशा गोष्टी कळूनही निगरगट्ट राहणे जमत नाही. मग वैताग होतो. वैताग झाला तरी चाकोरी सोडवत नाही; मग आणखी वैताग होतो. वैताग हॅन्डल करायला मग नकारघंटा, राग, तडजोड, नैराश्य आणि स्वीकार अशा टप्प्यांमधून जावं लागतं. काही लोक सगळे टप्पे पार पाडून 'फक-इट-ऑल' बिंदूवर येतात आणि आहे त्या परिस्थितीला शरण जाऊन शांतपणे प्रवाहपतित होतात, काही लोक मधल्याच एखाद्या टप्प्यावर अडकून बसतात. ज्याचा तो 'फक-इट-ऑल' पॉईंट आला तो सुटला. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>मुळात ह्या सर्वांचा जेव्हा तथाकथित कर्तबागारीचा सुवर्णकाळ सुरु होता, तेव्हा भारत कुठे होता?
ह्यांनी त्यात काय भर घातली? आज जे भिकारचोट, अप्पलपोटे आणि ढेर्‍या तुडुंब भरल्या तरी ढेकरही न देणारे असे जे नेते म्हणवले जातात,हे त्यांचीच सेकंड जनरेशन फळी आहेत ना? ह्या आज गणंग वाटणार्‍यांना त्यांनीच वर आणले/येउ दिले का?
की ह्यांना ते थांबवायचे होते पण काळाच प्रवाह अडवण्यात हे माझ्याइतकेच दुर्बळ, हीन दीन दुबळे ठरले?
म्हणजे चांगली वर्तणूक असणरे सज्जन पण दुर्बळ अशीच ही माणसे का?

>>चांगलं खाउनपिउन समाजसेवा करता येत नाही का?
समाजासाठी आप्लं घर स्वाहा करतो म्हणजेच फार काही मोठ्ठं करतो असं काही आहे का?
सुखासुखी राहणं हा मोठ्ठा गुन्हा आहे का? "हे साले पांढरपेशे", "स्वतःपुरतं पाहणारे" असं म्हणत नेहमी आम्हाला आमच्या जगण्याची लाज वातून द्यायचा हा वृत्तपत्रवाल्यांचा का प्रयत्न असतो?

तुमचा आदर्श रतन टाटा असेल, तर असू द्या. पण मग राडिया टेप बाहेर येते तेव्हा तुमचं काय होतं याचाही विचार करून ठेवा. आणि तरीही टाटांना आदर्श मानण्यानं तुम्हाला जगण्याची दिशा मिळत असेल, तर कुणाची त्याला का हरकत असेल? फक्त तुम्हाला त्या दिशेनं जगण्यात सुख मिळतंय का, ते मात्र पाहा. ते मिळत नसेल (आणि ह्या धाग्यावरनं वाटतंय की ते मिळत नाही), तर मात्र ही वरची गृहीतकं तपासून पाहाणं तुम्हाला भाग आहे.

>>विनोबाजींचे बहुतांश लिखाण हे उपदेशात्मक असते त्यामुळेच कधी कधी थोडेसे वाचून झाले की कंटाळवाणे नि पकाउ वाटते. >>कुणाला शिव्याशाप खरोखर लागत असतील असे वाटत असेल तर माझ्या आयुष्यातील सर्व तळतळाट ह्या बकवास समाजवादी विचारांना लागतील.

ठीक आहे; मग पुलंनी 'तुझे आहे तुजपाशी' लिहून ठेवलं आहे. ते वाचून तुम्ही भोगवादी झालात की मग एकविसाव्या शतकात जर तुम्हाला Dreamum wakeuppam अश्लील गाणे? असा प्रश्न पडू लागला, तर मग मात्र तुमचं कठीण आहे. जर तुमचा भोगवादाविषयीचा विचार पुलंमध्येच अडकून राहिला तर मग तोदेखील आज पुरा पडणार नाही. मग काय कराल?

काळ बदलतो तसा समाज बदलतो, पण आपण बदललो हे मानायला तो तयार होत नाही हे ह्याचं साधं उत्तर नाही का? म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात काही आदर्शवाद होते. तेव्हाचा समाज आदर्श होता असं नाही, पण जे आदर्श होते ते स्वच्छ चारित्र्य, साधी राहणी, उच्च विचारसरणी असे होते. नंतरच्या काळात मात्र वेगवेगळ्या कारणांनी त्यांचा अपुरेपणा जाणवू लागला. आदर्श अपुरे पडले म्हणून समाज बदलला, की समाजाची आदर्श नीतिमत्तेची व्याख्या बदलली त्यामुळे आदर्श बदलले हे सांगणं कठीण आहे. पण एक उदाहरण म्हणून अमिताभ बच्चनची लोकप्रियता पाहू. साने गुरुजींचं 'श्यामची आई' ज्या घरांत आदर्श संस्कार म्हणून वाचलं जाई त्या घरांत सत्तरच्या दशकातला व्यवस्थेवर चिडलेला नायक लोकप्रिय झाला हे खरं ना? जर साने गुरुजी खरंच आदर्श वाटत असतील, तर बच्चन कसा 'हीरो' वाटू शकेल? आणि बच्चन 'हीरो' वाटत असेल, तर श्याम कसा 'हीरो' राहील? पण अजूनही, म्हणजे अमिताभ म्हातारा झाला, तरीही आपण जर श्यामला आदर्श म्हणून कवटाळून बसलो, तर डोक्याचा भुगा होणारच. नाही का? त्याउलट अमिताभचा व्यवस्थेवरचा राग आपल्याला मान्य असेल, आणि त्यामुळे स्मगलर होणारा किंवा कायदा हातात घेणारा किंवा परवीन बाबीबरोबर लग्न न करता राहणारा अमिताभ आपल्याला आवडत असेल, तर मग आणीबाणीतल्या इंदिरा गांधी किंवा राडेबाज शिवसेना किंवा कायदा हातात घेणारे इतर नेते त्यातूनच उद्भवले नाहीत का? आणि आताचे आपले नेते निव्वळ स्वार्थापोटी तीच व्यवस्था पुढे नेत नाहीत का? आणि आताचे आपणही स्वार्थी नाहीत का? मग "पांढरपेशा", "स्वतःपुरतं पाहणारे" असं कुणी म्हणालं तर त्याला सामोरं जायला हवंच, नाही का?

>>झेपेल ते झेपेल तसे करावे, नीट समजून घ्यावे; समजत नसेल तर सोडून द्यावे नि चार चौघांसारखे जगायला लाजू नये, गिल्ट तर अजिबात वाटून घेउ नये हे समजायला फार म्हणजे फारच उशीर झाला होता.

समाजवाद कालबाह्य झाल्यामुळे धड समाजवादी होता येत नाही, अन् बदलत्या जमान्याबरोबर धड भोगवादीही होता येत नाही, अशीच ही अडचण दिसते. मला हे वाचून'पुणे ५२'ची आठवण झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

प्रतिसाद खूपच बांधेसूद असला तरी विस्तृत आहे. अधिकाधिक वाचून मगच बोलता येइल.
सध्या तरी मला वाटतय की तुमचा प्रतिसाद समाजवादी आत्मताडन नि मन मारुन जगणे हया एकाच बुलेट पॉइंट भोवती आहे.
मुळात माझी आदळापट ही विविध कारणावरून एकाच वेळी सुरु आहे. ती एकाच वेळी सुरु आहे; इतकाच त्यातला समान धागा असावा असं मला वाटतय. इतक्या तीव्रतेने जाणवतय कारण सपाटून मार खाणं कधीतरी संपेल अशी आशा होती. पण दिवसेंदिवस नवन्वीन गोष्तींत मी मारच खात चाल्लोय. आज डोकं सुन्न होइपर्यंत वैताग आला इतकच. विविव्ध आघाड्यांवर एकाचवेळी आपटी खाणे हे ठीक; पण ती सातत्याने पचवणे जड जात आहे.तर ह्या अनेक त्राग्यांच्या कारणांपैकी एक प्रकार आहे भिडस्त स्वभाव, दुसरा साधेपण शिकवणारे, तिसरं आहे माझं चुकीचं आकलन नि शिवधनुष्य पेलण्याचा हट्ट, पेलणं नच जमल्यास फार मोठी टोचणी लावून घेणे इत्यादी सर्व.
त्यापैकी तुम्ही सविस्तर बोललात ते फक्त "साधेपणाच्या" मुद्द्याबद्दलच. हे माझ आकलन योग्य असावं अशी आशा.(आणि हा पुणे ५२ चा हँगओव्हर नाही. हे माझ्याच जुन्याच प्रतिसादांचं आणि खरडींचं संकलन आहे. त्यातले काही पाच्-सात महिने तरी जुने असावेत मीमराठी डॉट नेट वरील. )
.
समाजवाद कालबाह्य झाल्यामुळे धड समाजवादी होता येत नाही, अन् बदलत्या जमान्याबरोबर धड भोगवादीही होता येत नाही, अशीच ही अडचण दिसते. मला हे वाचून'पुणे ५२'ची आठवण झाली
त्या धाग्यावरही माझं ह्याच लायनीवरचं रडगाणं सुरु आहे.
.
>>चांगलं खाउनपिउन समाजसेवा करता येत नाही का?
समाजासाठी आप्लं घर स्वाहा करतो म्हणजेच फार काही मोठ्ठं करतो असं काही आहे का?
सुखासुखी राहणं हा मोठ्ठा गुन्हा आहे का? "हे साले पांढरपेशे", "स्वतःपुरतं पाहणारे" असं म्हणत नेहमी आम्हाला आमच्या जगण्याची लाज वातून द्यायचा हा वृत्तपत्रवाल्यांचा का प्रयत्न असतो?
हे प्रश्न ज्याला पडतात त्याचा आदर्श टाटा किम्वा फॉर द्याट म्याटर अजून कुणी असावेतच असे थोडीच आहे? समजा टाटा ड्याम्बिस आहे.तरीही माझी तक्रार गैरलागू कशी होते. टाटा ड्याम्बिस आहे; म्हणून मी मन मारत का जगू? ज्यानं घोटाळे केले असतील त्याला त्या प्रमाणात शिक्षा द्या. त्यामुळं हा मुद्दा समजला नाही.
.
श्यामची आई-अमिताभ थोडा थोडा समजतो आहे. पुन्हा पुन्हा वाचतो आहे.
(आणि ह्या धाग्यावरनं वाटतंय की ते मिळत नाही), तर मात्र ही वरची गृहीतकं तपासून पाहाणं तुम्हाला भाग आहे.

अ‍ॅक्चुअली केस उलट आहे."त्याग करा.", "साधे रहा" असले काहीतरी करण्याच्या नादात धड सुखी राहता आले नाही आणि समाधानीही. सुखी रहायचा प्रयत्न(सध्याच्या लिव्हिंग ष्ट्यांडार्डनुसार) तर अजून धड सुरुही केलेला नाही; चंगळवादी होणे तर दूरच राहिले. मी लक्झरींचा त्याग* केला तर मला मोठ्ठं समाधान मिळेल असं इम्प्लिसिट आश्वासन विनोबांनी दिलं होतं. पण तसं समाधान वगैरे अजिबात मिळालेलं नाही. उलट "हे झेपेना झालय बाबा आता" असं वाटू लागलय; जीव मेटाकुटीला आलाय; घायकुतीला आलाय.
परवा कधी नव्हे तो एस्सेल वर्ल्डला गेलो होतो जन्मात पहिल्यांदा.झिप झॅप झूम शिड्या; उंचच उंच थरार. कुठे रोलर कोस्टार. गप्पा गाणी. ढिंगच्याक ड्यान्स फ्लोअर. जब्बरदस्त धमाल आली. आणि लागलिच "आपण खुश झालोच कसे" ह्याबद्दल भयंकर लाज वाटली. ते चंगळ करायचे साधन आहे असे म्हणून थोबाडित मारुन घेतले आणि गिल्ट घेउन फिरतो आहे.
.
सुखी राहाल पण समाधानी कसे व्हाल? असले काहिसे पब्लिकने पहिल्यापासून डोक्यात घातले. साधे रहा, साधे रहा असले काहीतरी शिकवले.
"तुम्ही सुखी असलात तरी तुम्ही समाधानी असालच असे नाही" हे अशा काही पद्धतीनं ऐकवलं की बाप रे बाप. त्या नादात
"तुम्ही सुखी नसाल तरच तुम्ही समाधानी राहू शकता" असे काहीतरी ही मंडळी बिंबवून गेली.
.
बाकी साधेपणा, मूल्ये, चंगळ ह्याबाबत तुम्हा मंडळींचं अजून काही चिम्तन वाचायला मिळालं तर बरं होइल असं वाटतं.
*त्याग हा सापेक्ष शब्द आहे. मी त्यास low profile lifestyle असे म्हणतो. उदा: - समजा माझ्या हापिसात जवळपास सारेच चारचाकीने येतात दुरवरून. तरीही मी स्वतः येताना; त्यांच्या शतपट ऐपत असूनही फाटक्या दशकभरापूर्वीच्या जुनाट स्प्लेंडारवर किंवा लूनावर येतो. तर हा माझ्या पातळीवरचा साधेपणाच आहे असे माझे गृहितक आहे.(लाल बहादूर शास्त्री :- फार काही वेगळे करु नका. नुसते आठवड्यातून एक दिवस उपास करा. जिथे आहात तिथेच खर्चात कपात करा. मुद्दाम काही वेगळे नको. अशी ती स्कूल ऑफ थॉट.)
गृहितक योग्य वाटत नसल्यास तसे सांगावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तुमचा आदर्श रतन टाटा असेल, तर असू द्या. पण मग राडिया टेप बाहेर येते तेव्हा तुमचं काय होतं याचाही विचार करून ठेवा. आणि तरीही टाटांना आदर्श मानण्यानं तुम्हाला जगण्याची दिशा मिळत असेल, तर कुणाची त्याला का हरकत असेल? फक्त तुम्हाला त्या दिशेनं जगण्यात सुख मिळतंय का, ते मात्र पाहा. ते मिळत नसेल (आणि ह्या धाग्यावरनं वाटतंय की ते मिळत नाही), तर मात्र ही वरची गृहीतकं तपासून पाहाणं तुम्हाला भाग आहे.

मुळात कोणाला आपला आदर्श काय म्हणून मानायचं? याच्यासारखं (स्वतःचाच)टैम-वेस्टिंग ट्याक्टिक दुसरं नसेल. पण हे लक्षात येईपर्यंत अर्धं आयुष्य बरबाद झालं. असो.

ठीक आहे; मग पुलंनी 'तुझे आहे तुजपाशी' लिहून ठेवलं आहे. ते वाचून तुम्ही भोगवादी झालात की मग एकविसाव्या शतकात जर तुम्हाला Dreamum wakeuppam अश्लील गाणे? असा प्रश्न पडू लागला, तर मग मात्र तुमचं कठीण आहे. जर तुमचा भोगवादाविषयीचा विचार पुलंमध्येच अडकून राहिला तर मग तोदेखील आज पुरा पडणार नाही. मग काय कराल?

पु.ल.-विचारसरणीला डिस्कार्ड करूनही काही काळ लोटला आता. (मुळात ती नेहमीच पटली होती म्हणून तरी स्वीकारली होती का खरोखर? की 'नाहीतर मराठी कसं म्हणवतं तुम्हाला?' म्हणून डोळे झाकून, फारसा विचार न करता, 'म्हणायची पद्धत आहे' म्हणून आपली म्हटली होती? सगळेच म्हणतात, म्हणून? नाही म्हणजे, एके काळी या मनुष्यानं ज्याम हसवलं होतं खरं. काहीशा तशाच समाजपरिस्थितीत वाढल्यानं त्याच्याशी 'रिलेट'ही करता येत होतं. पण म्हणून 'आदर्श'? त्यांचा कसंही असण्याचा, कसाही विचार करायचा अधिकार अर्थातच मान्य आहे, पण तो मी कसं असावं याचा, माझ्या विचारांच्या दिशेचा अल्टिमेट कंपास का असावा? पण जाऊद्या!) आणि 'ड्रीमम वेकप्पम' ही काय भानगड आहे, हे आत्तापर्यंत माहीत नव्हतं, म्हणून दुवा बघितला. तर...

'ड्रीमम वेकप्पम' हे कोणास बॉर्डरलाइन अश्लील वाटल्यास मला (सकृद्दर्शनी तरी, विडियो बघितला नसला, तरी 'सामान्यज्ञाना'च्या एक्स्टेन्शनने विडियोची कल्पना करून आणि बव्हंशी नुसत्या शब्दांच्या आधारावर) आश्चर्य वाटणार नाही. याचा पु.लं.शी संबंध नाही. 'मी आहे हा (या क्षणी तरी) असा आहे', याच्याशी आहे. असो.

पण एक उदाहरण म्हणून अमिताभ बच्चनची लोकप्रियता पाहू. साने गुरुजींचं 'श्यामची आई' ज्या घरांत आदर्श संस्कार म्हणून वाचलं जाई त्या घरांत सत्तरच्या दशकातला व्यवस्थेवर चिडलेला नायक लोकप्रिय झाला हे खरं ना?

याबद्दल काहीसा साशंक आहे. म्हणजे, साने गुरुजींचं 'श्यामची आई' ज्या घरांत आदर्श संस्कार म्हणून वाचलं जाई, त्या घरांतल्या, ते पुस्तक आदर्श म्हणून बिंबवणार्‍या पिढीत अमिताभ प्रिय असावा, असं वाटत नाही. बहुधा (त्या पिढीच्या नाकावर टिच्चून, कदाचित 'रिअ‍ॅक्शन' म्हणून) त्या घरांतल्या पुढल्या पिढ्यांत तो लोकप्रिय झाला असावा, अशी शंका आहे. तर तेही असो.

समाजवाद कालबाह्य झाल्यामुळे धड समाजवादी होता येत नाही, अन् बदलत्या जमान्याबरोबर धड भोगवादीही होता येत नाही

मुळात कुठल्याही 'वादा'च्या मागे जावंच कशाला, नि कुठल्या वादाला चिकटावंच कशाला? आपल्याला हवं तेव्हा हवं ते करावं. कधी गरज असेल तेव्हा समाजवादी व्हावं, कधी जमेल तेव्हा भोगवादी व्हावं. पण मुख्य म्हणजे 'स्वतःची सोय'वादी व्हावं. काय म्हणता?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शेवटच्या परिच्छेदाला +१.
सौम्य शब्दांत मी धाग्यात हेच लिहिलयः-
झेपेल ते झेपेल तसे करावे, नीट समजून घ्यावे; समजत नसेल तर सोडून द्यावे नि चार चौघांसारखे जगायला लाजू नये, गिल्ट तर अजिबात वाटून घेउ नये
.
किंवा त्याहून भारी म्हणजे:-
सॉफ्ट्वेयरचे hotfix वा नविन version येते तसेच विचारांचेही करायचे असते.
विचारांच्या मागे "शक्य असेल तेव्हा", " नुकसान होणार नसेल तर ","काहीच फायदा होणार नसेल तर" हे टाकून पहा.
"खरे बोलावे. साधे रहावे.उगाच भपका कशाला?दुसर्‍यांना माफ करावे. समजून घ्यावे.भलेपणाने वागावे." ह्या ज्ञानकणांना हे प्रिफिक्स लावून बघूतः-

शक्य असेल तेव्हा खरे बोलावे. साधे रहावे.
काहीच फायदा होणार नसेल तर उगाच भपका कशाला?
नुकसान होणार नसेल तर दुसर्‍यांना माफ करावे. समजून घ्यावे.भलेपणाने वागावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

धाग्याचा एकूण सूर पटला नाही....
चिंजं म्हणतात ते पटते.

आमच्या आई-वडिलांनी सिनेमा पहायचे, दागिने घेण्याचे टाळल्यामुळे आम्हाला शिक्षणासाठी पैसे कमी पडले नाहीत* असे वाटते.

ते आदर्श पाळण्यासाठी साधे रहात होते असे वाटत नाही. तेव्हाच्या त्यांच्या वैयक्तिक आर्थिक परिस्थितीचा तो परिणाम होता. (ऑन द अदर हॅण्ड, आमचे अनेक नातेवाईक गडगंज श्रीमंत असूनसुद्धा साधेपणाने (दळिद्री पद्धतीने) रहात त्याचे कारण ते साधेपणाचा आदर्श मानीत होते हे नसून त्याकाळी तसेच राहण्याची पद्धत आमच्या समाजात (साने गुरुजी, टिळक, आगरकर यांच्या कैक आधीपासून) होती.

*त्यांच्या तशा राहणीमुळे आमच्या पिढीची व्हिजन तशी मर्यादित राहिली हे काहीसे खरे आहे. व्हिजन म्हणजे इंजिनिअर होऊन कंपनीत चिकटणे इतकीच मर्यादित होती. म्यानेजर/व्हाइस प्रेसिडेंट/सीईओ व्हायची व्हिजन आमच्यात त्यांनी रुजवली नाही हे खरे आहे. पण त्याबद्दल त्यांना दोष देणे मला पटत नाही.

अवांतर: कोएड शाळेत शिकूनही मुलींशी वागण्याचे बाबतीत आम्ही मनोबांसारखेच होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अवांतर: कोएड शाळेत शिकूनही मुलींशी वागण्याचे बाबतीत आम्ही मनोबांसारखेच होतो.

कोएड शाळेत आणि अभियांत्रिकी कोएड कॉलेजात शिकूनही आम्ही स्वतःहून मुलींशी बोलायला शिकलो ते कंपनीत नोकरी लागल्यावर. म्हणजे जवळपास प्रौढ वयातच. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शिवाय मुलींशी एकदा बोलणे होऊ लागल्यावर बोलत नव्हतो ते बरेच होते अशी जाणीव होऊन मुलांशी बोलणेही आवडायला लागले. असो. ह. घ्यालच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते आदर्श पाळण्यासाठी साधे रहात होते असे वाटत नाही. तेव्हाच्या त्यांच्या वैयक्तिक आर्थिक परिस्थितीचा तो परिणाम होता. (ऑन द अदर हॅण्ड, आमचे अनेक नातेवाईक गडगंज श्रीमंत असूनसुद्धा साधेपणाने (दळिद्री पद्धतीने) रहात त्याचे कारण ते साधेपणाचा आदर्श मानीत होते हे नसून त्याकाळी तसेच राहण्याची पद्धत आमच्या समाजात (साने गुरुजी, टिळक, आगरकर यांच्या कैक आधीपासून) होती.

अधोरेखिताशी विशेष सहमत.

अतिअवांतर: 'साध्या राहणी'चा 'उच्च विचारसरणी'शी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही - किंवा असलाच, तर मासे खाण्याचा बुद्धिमत्तेशी जितपत आहे, साधारणतः तितपतच असावा - असे जाता जाता अतिशय नम्रपणे नमूद करावेसे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येथे जाऊन जीवन जगण्यालायक करणार्‍या गोष्टींची यादी पहा. कदाचित तुम्हाला काहीतरी सापडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उपक्रमाच्या स्थापनेपासूनच्या बहुतांश चर्चा माझ्या वाचून झालेल्या आहेत फार मागेच. पण त्या वाचल्या तेव्हातिथे वाचनखुणांची सोय नव्हती. मग चांगले लेख असेच माझ्या विस्मृतीत जात राहिले. पुन्हा ती लिंक बघून फारच आनंद झाला.
शतशः आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सगळा त्रागा वाचायचा स्टॅमिना नाही...पण एकूण सूर आहे त्यावरून एका मित्राचा त्रागा आठवला:
"जेव्हा मुली माझ्याकडे पहात होत्या...तेव्हा पालकांनी मान खाली घालून गप अभ्यास करायला लावला. आणि आता जेव्हा डोक्यावरच्या केसांना ओहोटी लागली आहे, कोणी मुलगी ढुंकूनही पहात नाहिये, तेव्हा ते म्हणतायत "लग्नाचं तुझं तूच बघ बाबा"."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नको त्या गोष्टींचा नको तेवढा त्रास करून घेता का? एखादी फटाकडी नाही आपल्याकडे बघून हसली म्हणून आपला हँडसमनेस कमी झाला वगैरे वाटतं का?

अशा अनेक गोष्टींचा मला त्रास-बिस होत नाही. आमच्या को-एड शाळेत मुली-मुलांनी आपसात बोलणं पाप मानलं जात असे. सख्ख्या भावाला बहिणीशी मित्रांसमोर बोलण्याची लाज वाटत असे. असली शाळा संपली तेव्हा मला चिक्कार आनंद झाला, निदान आता तरी कोणी असल्या भंपक कल्पना घेऊन डोकं खाणार नाही. कॉलेजात माझ्या मैत्रीणींबद्दल मला माहिती विचारणारी काही मुलं होती; त्यांना माझ्याशी बोलण्यात काही खास रस नसे. मला काय त्याचं! माझ्या दृष्टीने ते मुलगेही दखलपात्र नव्हतेच. उच्चशिक्षणासाठी मुंबई विद्यापीठाच्या कालिना कँपसला जावं लागत असे. त्या किचाट कुर्ला स्टेशनात रोज जाऊन "आपण स्वर्गात रहातो" याचा आनंद व्हायचा. सध्या जाड्या लोकांच्या देशात आहे, जाडे लोक दिसले तर आपण एवढे भयंकर जाडे नाहीत याचा आनंद मानायचा आणि शेजारीच बसले तर डोळ्यांना त्रास होत नाहीये याचा.

'परवा' कनेटीकटमधे शूटींग झाल्यानंतर आता टेक्सासात म्हणे शिक्षकांना बंदूकी द्या असा फतवा काढण्याबद्दल चर्चा सुरू आहे. निदान शहराचा पोलिसप्रमुख "शिक्षकांनी शिकवायचं का बंदुका चालवायच्या?" असे प्रश्न विचारतो यावर आनंद मानायचा.

... मुळात ह्या सर्वांचा जेव्हा तथाकथित कर्तबागारीचा सुवर्णकाळ सुरु होता, तेव्हा भारत कुठे होता? ह्यांनी त्यात काय भर घातली?

१९४७ नंतर भारताने कशातच काहीच प्रगती केलेली नाहीये का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१९४७ नंतर भारताने कशातच काहीच प्रगती केलेली नाहीये का?

प्रगती केली आहे. पण पुरेशी प्रगती केली आहे का?
भारत एक सेकंदाने पुढे जातो तेव्हा जग १ मिनिटाने पुढे गेलेलं असतं.
१९४७ नंतर प्रगतीए केली हे ठीक. पण जागतिक पटलावर तुम्ही कुठे आहात?
जिथे आहात, त्याहून किती पुढे असणं तुम्हाला शक्य होतं? तुम्ही तिथे नाहित का?
नसाल तर का नाहित? system collapse झालेला नाहिये का?
कायदा सुव्यवस्था कशी आहे? कुणाचा पायपोस कुणाच्या पायात आहे का?
"चार खांब" इकडे तर अजून मला यायचय सविस्तर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ए मनोबा, उगी त्रागा करतो का बे?

स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत मेडिकल सुधारणा बघ, हरित क्रांती बघ, नोकर्‍यांच्या वाढलेल्या संधी बघ. पूर्वीपेक्षा लै भारी आहेत बर्‍याच गोष्टी. सिस्टिमबद्दल म्हणशील तर लोकांच्या डोक्यात रोमँटिक कल्पनाच जास्त असतात. करप्शन वगैरे मौर्यकाळापासून आहेच-ती वृत्ती कधी जाणारही नाही. तेव्हा ते जमेला धरूनच काय ते बोला. मजल मारायची ती बरीच मारलेली आहे. चिकार करायचे बाकी आहे, पण मिळविले ते काही कमी नाही.

तुलना करायची तर युरोप-आम्रिका-एशियन टायगर्स यांच्याशी न करता, चीनशी करावी. त्या तुलनेत आपण मागे आहोत हे मान्य, पण अगदीसुद्धा गंडलेलो नाही. मला तर ब्वॉ हा काळ आधीच्या कुठल्याही काळापेक्षा जास्त "प्राप्तकाल हा विशाल भूधर | सुंदर लेणी त्यांत खोदा " पैकी वाटतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा काळ आधीच्या कुठल्याही काळापेक्षा जास्त "प्राप्तकाल हा विशाल भूधर | सुंदर लेणी त्यांत खोदा " पैकी वाटतो.

+१७६०

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋ आणि बॅटमॅनच्या प्रतिसादात भरः

जागतिक पटलावर BRIC देश अजिबातच काही नाहीत असं म्हणतो आहेस का? मान्य आहे, आपण चीनच्या बर्‍यापैकी मागे आहोत, पण यूट्यूब, गूगल, फेसबुक आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य न मिळणार्‍या देशापेक्षा अरिंदम चौधरीच्या नावाने शंख करता येतो अशा देशात असण्याला काहीच महत्त्व नाही का? अरिंदम चौधरी नसणारे देश जगाच्या पाठीवर कुठे आहेत म्हणे?
दुसर्‍या महायुद्धानंतर काही वर्षात स्वातंत्र्य मिळालेले अन्य देश पहा, पाकिस्तान, श्रीलंका, आफ्रिकेतले आपल्यापेक्षा काही वर्ष नंतर स्वातंत्र्य मिळालेले केनिया, द. आफ्रिका, झिंबाब्वे या देशांची सध्याची स्थिती काय आहे हे पहा आणि भारताकडे पहा.

---

आपल्याकडे एक सेकंद प्रगती होते तेव्हा बाहेर एक मिनीट प्रगती होते असं वाटत असेल तर थोडी उदाहरणं देते. प्रगत देश अमेरिकेत वाहनांच्या टायरमधे हवा भरायला पेट्रोलपंपाबाहेर जी यंत्र असतात, तिथे डिजीटल डिस्प्ले नसतो. भारतातल्या शहरांमधेतरी अनेक ठिकाणी हवेचा दाब दाखवण्यासाठी डिजिटल डिस्प्ले असतात. परदेशामधे जुनी FPS पद्धत वापरतात, आपल्याकडे कसं, ष्ट्यांडर MKS पद्धत आहे, मीटर, किलो, सेकंद. युरोप आणि अमेरिकेतल्या अनेक विमानतळांवर फुकट वाय-फाय इंटरनेटही नाही, आपल्याकडे तासभरतरी मिळतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

human resource index मध्ये, एकूण जीवनमान जिथ्म मोजलं जातं त्यात श्रीलंका अपल्या कैक पुढं आहे. अगदि बांग्लादेशही थोडासा पुढेच आहे.
infant mortality rate वगैरे तर परवा परवापर्य्म्त (निदान १९९०च्या दशकाच्या मध्यापर्यंत)पाकिस्तानचा सुद्धा भारतापेक्षा चांगला होता.(तिथं अर्भक मृत्यू, प्रसूतीदरम्यान मातेचा मृत्यू हे प्रमाण भारतापेक्षा कमी होते. )
भारतात बोंब मारता येते; पण ती ऐकली जात नाही ह्याची पक्की खात्री आहे.(they have assured you the freedom of speech.They never said they are listening to you!!)
बाकी खाली सविस्तर प्रतिसाद देत आहेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अशाच लोकांमुळे भारताचा GNH इन्डेक्स खालावत असणार Wink (ह घेशीलच)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

परत तेच!

तुलना करायला हे चिंडके देश नको घेऊ. घेतल्याने नुकसान आहे असे नाही, पण आपल्यासारखे आळशी आहेत असे मानले तरी साईझ लहान असल्याने लै फरक पडतो.

तुलनाच करायची तं चीन, ब्राझील, इंडोनेशिया, इ. शी कर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

च्यायला, सरड्याची धाव कुंपणापर्यंत. तुलना करायची तर जर्मनी, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्कशी करा की. तिथे पण स्वानुकंपा कशाला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जे भारी आहेत त्यांच्याशी तुलना करा हे म्हण्णे तत्वतः पटले तरी लॉजिकल कितपत आहे? महाराष्ट्राच्या फारतफार दुप्पट साईझ-बर्‍याचवेळा त्याहीपेक्षा कमी, निम्मी लोकसंख्या अन वर ढीगभर शास्त्रज्ञ, तत्वज्ञ, राजकारणी, शिवाय कलोनियल एंपायरची ब्याकग्रौंड, या आणि इतरही बर्‍याच गोष्टी हैत त्यांच्याकडे. आपली तुलना कशाला करता? तेंडुलकरने अ‍ॅकॅडमीमध्ये घेतलेलं ट्रेनिंग अन लगान पिच्चरमधल्यांचं ट्रेनिंग याची तुलना कशी करता येईल?

स्वानुकंपा नाहीच्चे ही. तसे असते तं चीनशी तुलना करा असेतरी का म्हटलो असतो? तुलनेमधली सापेक्षता दाखवून द्यायची होती, इतकंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भारतात बोंब मारता येते; पण ती ऐकली जात नाही ह्याची पक्की खात्री आहे.(they have assured you the freedom of speech.They never said they are listening to you!!)

याच्याविरुद्ध, "You have the freedom of speech, of course; nobody, on the other hand, has an obligation to listen to it, or to react to it." असाही प्रतिवाद करता येईल.

घटनेतील 'कर्तव्यां'च्या यादीत 'इतरांची अभिव्यक्ती ऐकणे' अशी काही नोंद असल्याचे आठवत तरी नाही; चूभूद्याघ्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>घटनेतील 'कर्तव्यां'च्या यादीत 'इतरांची अभिव्यक्ती ऐकणे' अशी काही नोंद असल्याचे आठवत तरी नाही;

तसेही घटनेतील कर्तव्यांची यादी ही आणिबाणीच्या कालखंडात घातलेली असल्याने ती मान्य करण्याचे काहीच कारण नाही.

बाकी मूळ प्रतिसादातील "they have assured you the freedom of speech.They never said they are listening to you!!" यातले They म्हणजे कोण ते लक्षात येत नाहीये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तसेही घटनेतील कर्तव्यांची यादी ही आणिबाणीच्या कालखंडात घातलेली असल्याने ती मान्य करण्याचे काहीच कारण नाही

का बरे? असे का ते समजले नाही Sad
कधीही घातलेली असली तरी ती घटनेचा भाग आहे. जोपर्यंत नंतरची सरकारे /संसद ती घटनेतून काढून टाकट नाहित तोपर्यंत ती आहेतच आणि घटना मान्य असल्यास मान्यही असली पाहिजेत असे वाटते

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आणिबाणी म्हणजे हुकुमशाहीचा आविष्कार, विरोधकांना तुरुंगात डांबून केलेले उद्योग वगैरे वगैरे......

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ते सगळे ठीक.. पण म्हणून त्या काळात केले बदल घाऊकरित्या टाकाऊ ठरवावेत का? असल्यास ते अजूनही घटनेत का ठेवले आहेत - त्या अर्थी बहुमताला ते मान्य आहेत असाच घ्यावा का / घ्यावा ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सालं संपादक झालो तरी संपादकपदाची कामं करायला छटाकभरही टैम काढणं ह्या जन्मात जमणार नाही. पण "संपादक हो म्हणून म्हणत होते. पण मीच नको म्हटलं " असं जाहिर कट्ट्यावर मानभावीपणे म्हणायची संधी मिळण्यासठी काय करावं लागतं? नक्की कोणती अ‍ॅप्टी क्लिअर केली की इथे संपादक्/निरिक्षक आणि अजून मोठ्ठ्या पदव्या मिळतात?
संतुलित पणाचा किती आव मी आणून दाखवला म्हणजे मला आमंत्रित करतील? सम्जा एखाद्या तावातावाच्या काथ्याकुटात "तुम्हाला शतमूर्ख त्याने जाहिर धाग्यावर म्हणावयास नको होते. आम्ही त्याच्याशी सहमत असलो तरी तुम्हाला तसे म्हणणार नाही"(!!??) असे किती गोल्-गोल , संतुलित प्रतिसाद देउन दाखवले तर मला हे ह्यांच्यासारखाच खरोखरिच सभ्य, मॅच्युअर्ड समजतील? हे गंडलेले आहेत की इतरांना गंडवताहेत ? Wink
.
हे संतुलित लोक मनातल्या मनातही संतुलित असतात का? कुणी राँग साइड येउन ह्यांना रस्त्यावर धडकला तरी हे "अहो असे करु नका. असे करणे इष्ट नाही." अशा समजुतीत बोलत असतील का? मनातल्या मनातसुद्धा "थोबाड फोडलं पाहिजे ***च्याचं " असं हे कधीच म्हणत नसतील का? तसं असेल तर नक्की कोणती तपःसाधना हे महात्मे आणि महात्मीणी करतात?
.
इथं अपेयपानाचं नाव कढलं की उकळ्या फुटणारे अनेकजण आहेत. नक्की साल्यांना परवडतेच कशी? की हे नेहमी फुकटातली पितात नि त्याच्या कॉकटेल्सच्या पाकृ टाकीत राहतात? ह्यांना डाउनपेमेंटचं आणि हप्त्यांचं टेन्शन नसतं का? सुखी माणसाचा सदरा ह्यांना भेटलं तर मिळू शकतो का?
"पिणार्‍यला पोरगी देत नाहित हं चांगल्या घरचे" असं ह्यांना पुनः पुनः सांगून घरच्यांनी कधीच टारकावलं नसेल का? ह्या स्थितीत मनावर ते कसा विजय मिळवू शकतात? हे लोक साने गुर्जींना शिरिअसली घेत नाहित का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

नक्की कोणती अ‍ॅप्टी क्लिअर केली की इथे संपादक्/निरिक्षक आणि अजून मोठ्ठ्या पदव्या मिळतात?

काय? लईच त्रागा व्हतोय राव. कायबी विचार करताय ते. संपादक व्हायसाठी अॅप्टी वगैरे लागतंय असं कोन म्हनलं? कुनी संपादक नाय केलं तर आपली स्वतःची साईट काडायची अशते, इत्कं बी कळत नाय? लईच त्रागा व्हतोय राव हा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संपादक व्हायचं नाहिच्चेय.
फक्त "संपादक व्हायला (पब्लिक आमंत्रण देत असली तरी) वेळ नाही" हे मानभावीपणे सांगायची लै हौस आहे.
साइट काढली तर खरोखरिचा मालक्-संपादक होइन की. साम्गितलं कुनी हेड्याक?( "पदवी" हवी आहे; जिम्मेदारी नकोय; कामे नकोत.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हेड्याक घेऊच नका राव. म्या फक्त हे सांगतूया की, काय अॅप्टी, बाप्टी नसतीया. ती नसल्यानंच तर संपादक व्हता येतं.
हां, आता तुम्ची जी हौस हाय न्हवं, तिच्यापायी तुमास्नी येक करावं लागेल. एकांद्या सायटीच्या मालकास्नी धरा यकदा. त्यांस्नी पटवून द्या, त्यांची साईट कशी भारी हाये ते, पण त्यात कसे बदल करनं गरजेचं हाये... मग झालंच समजा तुमचं काम. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाईट-साईट सल्ले! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला आता गोंधळ होतोय की हा धागा औपरोधीक आहे की लेखकाला खरोखर एवढा त्रागा करावासा वाटतोय? फक्त लेख वाचून तर उपरोधच जाणवला होता पण प्रतिक्रिया वाचून तसं वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

साराच काही औपरोधिक आहे असं नाही.(स्पेशली शेपरेट शाळांबद्दल)
सिरियसली भयंकर वैताग आला होता काही गोष्टींचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मुला-मुलींकरता स्वतंत्र शाळांचा कन्सेप्ट मलासुद्धा अजिबात पटत नाही. मी स्वतः सातवीपर्यंत फक्त मुलींच्या शाळेत शिकतेय. ती बालवाडीपासून पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतच्या शिक्षणासाठी फक्त मुलींकरताची संस्था होती. सुदैवाने नंतर म्हणजे कळायला लागलं तेव्हा मुलामुलींच्या एकत्र शाळेत शिकले. पण आधीच्या शाळेतल्या अनेक मैत्रिणी असल्याने अश्या स्वतंत्र शाळेत शिकलेल्यांची मानसिकता समजू शकते.

अदितीने वर लिहिलंय तसं मुलामुलींच्या एकत्र शाळेतच असं काही वातावरण असतं की तिथे मुलामुलींत निकोप मैत्रीचं नातं निर्माण होणं अवघड असतं (आम्ही वर्गात गप्पा-गोंधळ करायला ते जुमानत नसू ही गोष्ट वेगळी ;)). अश्या आपल्या सामाजीक स्थितीत वेगळी शाळा म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

>>सध्या तरी मला वाटतय की तुमचा प्रतिसाद समाजवादी आत्मताडन नि मन मारुन जगणे हया एकाच बुलेट पॉइंट भोवती आहे.

हे खरं आहे. कारण १. अनेक समस्यांपैकी ती एक प्रमुख समस्या आहे असं मला वाटलं. आणि २. एकेका समस्येवर स्वतंत्र प्रतिसाद देणं सोयीचं जाईल असं वाटलं.


>>>>चांगलं खाउनपिउन समाजसेवा करता येत नाही का?
समाजासाठी आप्लं घर स्वाहा करतो म्हणजेच फार काही मोठ्ठं करतो असं काही आहे का?
सुखासुखी राहणं हा मोठ्ठा गुन्हा आहे का? "हे साले पांढरपेशे", "स्वतःपुरतं पाहणारे" असं म्हणत नेहमी आम्हाला आमच्या जगण्याची लाज वातून द्यायचा हा वृत्तपत्रवाल्यांचा का प्रयत्न असतो?

>>हे प्रश्न ज्याला पडतात त्याचा आदर्श टाटा किम्वा फॉर द्याट म्याटर अजून कुणी असावेतच असे थोडीच आहे? समजा टाटा ड्याम्बिस आहे.तरीही माझी तक्रार गैरलागू कशी होते. टाटा ड्याम्बिस आहे; म्हणून मी मन मारत का जगू? ज्यानं घोटाळे केले असतील त्याला त्या प्रमाणात शिक्षा द्या. त्यामुळं हा मुद्दा समजला नाही.

टाटा अादर्श असावेत हे गरजेचं नाहीच. उदाहरणार्थ तुम्ही सुखवादी (hedonist) असाल, तर तुम्ही उलट म्हणाल की अरेरे हा माणूस आधीच पैसा कमावण्यासाठी फार श्रम करतो; त्यात वर सामाजिक बांधीलकी वगैरे मानतो (आणि शिवाय राडियाबाईंसारख्या बाईशी त्याला डील करावं लागतं!) त्याचं आयुष्य तर अगदी व्यर्थ आहे. Smile

पण प्रश्न तो नाही. कारण पांढरपेशा समाजाला लाज वाटायला लावायच्या वृत्तपत्रांच्या प्रयत्नांनीही तुमचा त्रागा होतो आहे आणि एस्सेलवर्ल्डला जाऊन मजा केली तरी तुम्हाला अपराधी वाटतं आहे. याचा अर्थ तुम्ही सुखवादी नाहीत. अन् समाजवाद्यांवर हा त्रागा काढण्यात काही हशील नाही, कारण त्यांनी तुमचे हात धरलेले नाहीत. हवं तसं जगायला तुम्ही स्वतंत्र आहात. आणि माझ्या मते हे स्वातंत्र्यच तुमच्या सर्व अडचणींचं मूळ आहे. ते कसं?

जेव्हा तुम्ही एका विशिष्ट स्तराच्या वरच्या आर्थिक-सामाजिक वर्गात जाऊन पोहोचता तेव्हा तुमचे मूलभूत गरजांचे प्रश्न सुटतात. हे स्वातंत्र्य माणसाला हवंहवंसं वाटतं. कारण आता रोटी-कपडा-मकान यांमागे धावण्यात तुमचा सर्व वेळ आणि उर्जा आणि पैसा खर्च होत नाहीत. शिल्लक उरलेला (सरप्लस) वेळ, उर्जा आणि पैसा आपल्या मर्जीनुसार खर्च करायला तुम्ही स्वतंत्र आहात. आता खरा मुद्दा हा येतो की जगणं अर्थपूर्ण कशानं होईल? समाजवादानं ह्याची जी उत्तरं दिलीत ती तुम्हाला मान्य नसली तर काही हरकत नाही. पण तुम्हाला कसं जगणं अर्थपूर्ण वाटतं हे तुमचं तुम्हालाच शोधून काढायला लागणार. पूर्वीच्या युरोपमध्ये जे आर्थिक वर्ग होते त्यात हा असा सरप्लस वेळ आणि पैसा आणि उर्जा असणारा, म्हणजे कष्टकरी नसणारा वर्ग फार महत्त्वाचा ठरला. लेखक, कलाकार, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ ह्या वर्गातून आले. काहींनी निसर्गाचं निरीक्षण केलं; काहींनी मनुष्याचा अभ्यास केला. काहींनी विश्वकोश तयार केले. द सादनं तर भोगाचं तत्वज्ञान निर्माण केलं. इतकी प्रतिभा नसली, तरीही कुणी देशोदेशी पर्यटन करून महत्त्वाची निरीक्षणं करून ठेवली. व्होल्तेअरसारख्यांनी समाजातल्या अनिष्ट रुढींवर टीका केली. हे समाजवादी लोक नव्हते. ते आपल्या आवडीच्या गोष्टी करत होते. त्यातून समाजाचं भलं झालं हा कदाचित अनुषंगिक परिणाम झाला. तुम्हाला एस्सेलवर्ल्डमध्ये जाऊन काही काळ मजा येते; पण कदाचित त्यातला पोकळपणा किंवा क्षणभंगुरपणा लक्षात येऊन मग अपराधी वाटत असेल. त्याचं खापर समाजवाद्यांवर का फोडा? त्याबद्दल त्रागा करण्यापेक्षा आपल्याला अधिक काळ टिकणारी मजा कशात येते ते शोधून काढा. एकाचं उत्तर दुसऱ्याला लागू होणार नाही; पण एखाद्या पुरेशा मोठ्या समाजगटात वेगवेगळ्या लोकांनी आपल्यासाठी शोधून काढलेली उत्तरं पाहिली तर त्यात काहीतरी सापडू शकतं. फक्त मग समाज काय म्हणेल? कुटुंब काय म्हणेल? ह्यात देशाचं हित आहे का? हे धर्माच्या विरुद्ध आहे का? ह्याची चिंता सोडा. (धर्मात समाजवादसुद्धा आला, कारण तुमची समाजवादाची व्याख्या ही पोथीनिष्ठ आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पूर्वीच्या युरोपमध्ये जे आर्थिक वर्ग होते त्यात हा असा सरप्लस वेळ आणि पैसा आणि उर्जा असणारा, म्हणजे कष्टकरी नसणारा वर्ग फार महत्त्वाचा ठरला. लेखक, कलाकार, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ ह्या वर्गातून आले.

युरोपातल्या अमीर-उमरावांशी आजच्या गर्दीतून ब्रेकनेक वेगात पळणार्‍या मध्यमवर्गीयाची तुलना पचायला जड गेली. कारण आता सरप्लस पैशाबरोबर रोटी-कपडा-मकान एवढीच गरज नसते ना माणसाची, ती ही वाढतच जाते.
आहे ती लाईफस्टाईल टिकवायला (आणि वाढवायला) काम करत राहणे, दिवसातून तुकड्या तुकड्याने मिळणारा मोकळा वेळ, वाहतुकीत जाणारी निम्मी ऊर्जा आणि न मिळणार्‍या जॉब सिक्युरिटीसाठी त्यातूनही वेळ काढून स्किल्स अपग्रेड करत राहणे हे कुठे आणि गुलामांची फौज बाळगणारे ते अमीर-उमराव कुठे.
बाकी आशयाशी मात्र सहमत.
एक कोणतातरी (मार्केटचा? पीअर प्रेशरचा?) अदृष्य हात घाण्याभोवती फिरायला भाग पाडत असतो, त्याचा बिमोड करून खर्‍या अर्थाने आपल्याला आवडेल तसे जगल्यास सगळा त्रागा, त्रास नष्ट होईल हे प्रत्येकालाच कळते, पण फार थोड्या लोकांना वळते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राष्ट्रिय पातळी, भारत महासत्ता वगैरे विषयाबद्दल आता बोंब ठोकणार आहे. ही बर्‍यापैकी गांभीर्याने ठोकत आहे.
भारत महासत्ता होणार म्हणे. म्हणजे नक्की काय होणार आहे? रस्त्यातले खड्डे संपणार आहेत का? सुरळित वीजपुरवथा सर्वत्र(निदान बहुतांश ठिकाणी, शेतीपासून घरदारापर्यंत) मिळणार का? कधीही बॉम्ब फुटू शकतो हे गृहित धरणं भारतीय सोडणार का? समान नागरी कायदा आणायची हिम्मत येणार का?(तो कायदा येणं योग्यच आहे; ह्यावर खोपदा एकमत दिसतं; पण ते आणणं व्यवहार्य नाही; तो आणला तर आपली वाट लगेल अशी भीती आहे.तर ती भीती जाणार का?)
.
सध्या भारतात स्त्रियांच्या मुतार्‍या किती आहेत? महासत्ता झाल्यावर ते येणार आहेत का? त्यांची अवस्था काय असणार आहे?
.
बेसिकली आपण बहुसंख्य लोक हिप्पोक्रेट्स आहोत; अप्पलपोटे आहोत. धडधडित राँग साइडने येउन धडक दिल्यावरही याला प्रत्युत्तर देताना " मी कसा बरोबर आहे" हे आर्ग्युमेंट कुणीच का करत नाही? "मी किती मोठ्ठा आहे. मेरि कितनी पैचान हय" असले सडेल आर्ग्युमेंट करताना आपल्याला काहिच कसं वाटत नाही. "जाउ दे; मोठी असामी आहे" असं म्हणून प्रभावशाली व्यक्तींचे गुन्हे इतक्या भयावह प्रमाणावर माफ होणार्‍या देशात जे चाललय त्याला आलबेल म्हणता येइल का?(बाहेर पंतप्रधान आणि प्रेसिडेंटांच्या सख्ख्या मुलींनाही तुरुम्गवास झालेला ऐकन्यात येतो.किरकोळ मद्यपान वगैरेसाठी. खरेतर हे गुन्हे तर सहज दाबत येण्यासारखे आहेत; भारतात तरी.)
.
भारतत काय वाईट आहे असं म्हणणं म्हणजे डम्पिंग ग्राउंड मध्ये उभं राहून "दाखव बघू इथला कचरा" असं म्हणण्यासारखं आहे. इथं जे आहे ते बाय डिफॉल्ट चूकच आहे. चांगल्या गोष्टी अपवाद आहेत. मिडिया आणि त्याची भूमिका ह्यावर इथेच जालावर शेकडो पाने खर्ची पडलित. नेत्यांना निवडून द्यायचे स्वात्म्त्र्य तुम्हास आहे असे सांगण्यात येते. त्यातून काय अवस्था आहे हे दिसतेच. न्यायव्यवस्था बाय डिफॉल्ट होलि काउ आहे; त्याला चांगले म्हणणे कंपलसरी आहे. लष्कराकडे काय दारुगोळा आहे; किती शस्त्रसाठा आहे; ही झाकली मूठच बरी.(अगदि अधिकृत अहवालातही चीनकडे सातेकसेह पाणबुड्या असतील तर आपल्या पन्नस्-साथ अशा धर्तीची आकडे वारी दिसते. जस्ट कम्पेअर चीन्-भारत्-पाक :-
७५०-१५०-९०).
संरक्षण सामुग्री किती आयात होते; त्याचे पुढे काय होते देवच जाणे. इतका मोठा देश आजही काहिच धड युद्धसामुग्री निर्मित करु शकत नसेल तर अवघड आहे.
.
८०%च्या वर कैदी कच्चे कैदी आहेत. ते जेलात गुरासरखे भरले जातात; मॅजिस्ट्रेटसमोर उभे न करताही वर्षानुवर्षे तसेच दाबले जातात.
.
मनोरुग्णांबद्दल समाजाचा दृष्टीकोन काय आहे ह्याची जाणत्यांना कल्पना आहेच. त्यांच्या हॉस्पिटल्सची अवस्था बघून नॉर्मल माणूसही मानसिक धक्क्याने रोगी होइल.
काहीही धड दर्जेदार निर्मिती कुठे होताना दिसत नाही. brand india असं काही उत्पादन क्षेत्रात किम्वा फॉर द्याट म्याटर सेवा क्षेत्रात आहे का?( भारतीय आय टी हा बकवास आहे हे इथे गृहितक आहे.) शेतीबद्दल बोलावयास नको. हेक्टरी उत्पादन पास्चात्यांचे एकरी ४० च्या घरात असेल, तर चीनचे ३३-३५ पर्यंत आहे. भारताचे १५-१८च्या घरात रेंगाळते.
तुम्ही म्हणे शेतीप्रधान देश. चीनचे लागवडीखालील क्षेत्र भारतातील लागवडीखालच्या क्षेत्राच्या फक्त निम्मे आहे. तरीही त्यांचे उत्पादन भारताहून बरेच अधिक आहे.
.
भारत एकाच वेळी तीनेक शतकात वावरतो. सुखी आणि नशीबवान लोक,आभिजन वर्ग सध्याच्या युगात आहे. बाकेचे कित्येक मागच्या शतकात आहेत. त्याहूबुरसटलेल ओक बुरसटलेल्या टालक्यानिशी नि सडलेले जीवनमान घेउन त्याही मागच्या शतकात रेंगाळताहेत.(सलमडॉग पाहिल्यावर सगळे कसे चिडले होते. पण खरच तसं काही नाहिये का इथे?उगा "आमच्याकडे ताजमहाल आहे; चकचकित मॉल्सही आहेत" असे म्हनत वाळूत तोंड का खुपसतात देव जाणे.) आर्थिक राजधाने मुंबै म्हणे. ५५%हून अधिक पब्लिक झोप्डपट्टीत राहते. जवळपास मुंबैच्या आसपास जाणारीच लोकसंख्या असणारी शहरे म्हणजे शांघाय, तेहरान आनि तोकियो. ह्या प्रत्येकावर एकदा नजर टाका. तिथलं जीएवनमान पहा. नुसता आकार पाहिलात तरी समजेल. ही सर्व शहरे मुंबैच्या सात्-आठ पट मोठी आहेत; पण तितकीच लोक्संख्या वागवून आहेत. तिथे मोकळ्यानी श्वास घेता येतो.
.
(मेळघाट वगैरे सारखे गंभीर)कुपोषण, उपोषण, बालमृत्यू हे शब्द नक्की कुठल्या महासत्तेच्या डिक्शन्रीत असतात ते एकदा तरी दाखवून द्या बुवा.
.
कित्येक लोकांचा व्यवसाय अजूनही स्मशानात जाउन मेलेली मढी उकरून त्याच्या अंगावरून जे काय मिळेल ते हिसकावून उदरनिर्वाह करणे हा आहे.
.
कितीही स्फोट झाले तरी कुणाला काहीच वाटत नाही. आता काल आणि आज काहिच झाले नाही. म्हणून सगळे एकदम थट्तामस्करी वगैरे करताहेत. जणू काही झालेलेच नाही. अचनाक ह्यांच्या बुडाखाली एखादा स्फोट होतो; हे बावचळल्यासारखे करतात; तेवढ्यापुरतं "कापून कआधलं पाहिजे. एकदा धडा शिकवला पाहिजे" वगैरे रागाच्या ओकार्‍या बाहेर काढतात. आणि पुन्हा? पुन्हा काहिच नाही. सगळं कसं आलबेल! काही झालेलच नाही. नंदनवनात जणू सारे वावरताहेत्.थट्टा मस्करी सुरु.
अरे काय्हे? मग एकदम स्फोटानंतर निर्वाणीची भाषा वगैरे व्यर्थ अभिनिवेशी बडबड तरी करु नका ना. स्फोट झाला उचक. बलात्कार झाला; एकाएकी "फार झालं. काहीतरी करा. त्याचं कापूओन कध्लं पाहिजे " वगिरे वगैरे. आनी लागलिच पुढच्याच दिवशी पुन्ह? पुन्ह अकाहिच नाही. अरे बातम्या येत नहैत तेव्हा काहिच होत नसतं का? भारतात दर मिनिटाला दहाच्यावर तरी जोर-ज्बरदस्तीचे किस्से होत असतात. तुम्हाला सुधारायचे असेल तर मग नियमित दबाव का टाक्त नही? नाहितर बोंब मारणे तरी सोडा ना मिडियानं कळ लावल्यावर.
तोच प्रकार तो थिल्लर/वाह्यात अण्णा-केंद्रित भ्रष्टाचार विरोधी शंखाचा. "भ्रष्टाचारानं बरबटलेलो आहोत" हे एकदम तो म्हातारा काका ओरडायला लागल्यावर तुम्हाला कळलं का? म्हतारा काका गपचिप जाउन पडल्यावर तुमची हवा कुठे गेली? तुम्ही नक्की बोंब्का मारत होतात? तुमचे उद्दिष्ट तुम्हाला तरी माहित होते का?
.
रेसिझम्-सेइक्सिझम आणि कास्टिझम हे भारतातून आधी संपतील का भारतच आधी संपेल हे (असलाच तर)देवच जाणे.
त्याची हिडिस रुपे मी सांगण्याची गरज नाही.
.
"माझ्यावर अन्य्यय होउ नये" ही कुनाचीच भूमिका का नाही? "मला इतरांना दाबता येइल इतपत सामर्थय्वशाली व्हायचय" अशीच सगळ्यांची सुप्त इच्छा का आहे? ("जानता है मै कौन हूं" मागचा गर्भितार्थ तोच आहे. "मी बडे बाप की औलाद आहे. मी वाटेल ते करीन.अनिर्बंध राहिन" हा तो आवेश आहे.)
.
दाद मागावयास गेल्यास तक्रारकर्त्यास कायम झोडपण्यात येणे कधी थाम्बनार?
पोलिसांना सामान्य पब्लिक विशेषतः फारसे गुन्हे न करणारे वचकून का असतात? पोलिसांची भीती सामान्य नागरिकाला वाटावी कि गुंडाला वाटावी? भारतात बाहुबली राजकारणी, इतर गुंड, स्थानिक प्रभावशाली व्यक्ती(अगदि इमाम बुखारी पासून तोगडिया पर्य्म्त सारेच) हे पोलिसांना खरच घाबरतात का? भारत हे पिसाळलेल्या कुत्र्यांचं अभयारण्य नाहिये का?
तुम्हाला कुणी लुबाडून गेला तर तुम्हाला न्याय मिळेल ह्याची किती खात्री वाटते?(काही लाख केसेस ह्या क्कित्येक दशके अपिलात पडून आहे. न्यायव्यव्स्था जबरदस्त अपयशी आहे.(उदात हेतू; कुचकामी अंमलबजावणी))
.
किती टक्के लोकसंख्येला पुरेसं चांगलं पाणी प्यायला मिलतं? महासत्ता झाल्यावर त्यांना मिलणार आहे का?sanitationची अवस्था काय आहे?(हे वरती आलच आहे)
.
स्त्रिया एकट्या फिरताना बिंदास फिरु शकतात का?(अपवाद सोडून)
.
भारताच्या लष्कराचा धाक किती आहे हे दशकभरापूर्वीच दिसले. बांग्लादेशी सैनिकांनी सहा भारतीय जवानांना मारले. त्यातील एक दोघांच्या प्रेतांची मिरवणूक काधली त्यांचय सीमेवरील गावाअतून(टाइम्स मध्ये फोटो होता. शिकारीत मारलेल्या डुकराला आडव्या काढीला बांधतात; नि त्याचे प्रेत मिरवतात तसे फिरवत होते.) वाजपेयींना शेख हसिना का खालेदा झिया कोण होती तेव्हा तिथे तिला फोन करुन निषेध केला. बस्स. इतकेच. हाच तुमचा धाक. धन्य धन्य.
.
डम्पिंग ग्राउंड इतके मोठे आहे की अजून पाच पन्नास हजार प्रतिसाद लागतिल सगळं सांगायला. तरी खूप काही शिल्लक राहिल.
"आम्ही आफ्रिकन देशांपेक्षा बरे आहोत" ह्यात खुश राहणे बरोबर आहे क ह्याचा जरूर विचार व्हावा.
.
थोडक्यात भारताची एक जबरदस्त गटार बनलेली आहे.
आर्थिक प्रगतीचे ढोल बड्वणार्‍यांस्साठी :-
http://articles.economictimes.indiatimes.com/2012-12-21/news/35953405_1_...
http://articles.economictimes.indiatimes.com/2013-01-02/news/36111402_1_...
.
तुमच्या नकाखाली काय चाल्लय तेही पहा जरा:-
http://www.economist.com/blogs/banyan/2013/02/spending-bangladesh

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

छ्या! कसं राहतात नै लोकं इथे! Wink
तुमचे "मन" इतका त्रागा करतं तो क्षणिक असतो का? असल्यास तुम्हीही या भावी महासत्तेतले नागरीक आहात यात समाधान माना की Blum 3

बाकी, वेगवेगळ्या विषांना एकत्र स्पर्श केल्याने एकावरही नीट बोलता येणार नाहिये.. तुर्तास

पास्चात्यांचे एकरी ४० च्या घरात असेल, तर चीनचे ३३-३५ पर्यंत आहे. भारताचे १५-१८च्या घरात रेंगाळते.
तुम्ही म्हणे शेतीप्रधान देश. चीनचे लागवडीखालील क्षेत्र भारतातील लागवडीखालच्या क्षेत्राच्या फक्त निम्मे आहे. तरीही त्यांचे उत्पादन भारताहून बरेच अधिक आहे.

किमान या बाबतीत तरी त्रागा अजिबात वाटत नाही. उगाच घाईने बीटी बियाणे गळ्यात बांधुन घ्यायची आणि कॅन्सर, नापिक जमिनी वगैरे गळ्यात पाडून घ्यायचे आणि मग आफ्रिकेत जमिनी घ्यायला धावायचे (अन् तिथल्या लोकांची, इकोसिस्टिमची वाट लावायची ती वेगळीच) असा मुर्ख उद्योग आम्ही करत नाहियोत म्हणून किंचितसे समाधानच वाट्टे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उगाच घाईने बीटी बियाणे गळ्यात बांधुन घ्यायची आणि कॅन्सर पाणी नापिक जमिनी बाळगायच्या आणि मग आफ्रिकेत जमिनी घ्यायला धावायचे (अन् तिथल्या लोकांची, इकोसिस्टिमची वाट लावायची ती वेगळीच) असा मुर्ख उद्योग आम्ही करत नाहियोत म्हणून किंचितसे समाधानच वाट्टे.

होय. ही समाधानाची गोष्ट आहे, पण हे समाधान अल्पजीवी आहे.
भारतातही जीएम ध्यान्याच्या आगमनाचे सूतोवाच झालेले आहे. मा. कृषीमंत्री यांनी त्याबद्दल उघड मत व्यक्त केले आहे.
आफ्रिकेत चाललेल्या लूटमारीत भारतीय नाहीत असे समजायचे कारण नाही. भारतीय राजकारण्यांच्या आफ्रिका, इंडोनेशिया आदी देशांमध्ये खाणी आहेत. परकीय कंपन्यांच्या उद्योगांचा गवगवा होतो तसा भारतीय 'कंपन्यांच्या' उद्योगांचा होत नाही इतकेच. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खाणींच्या -१ बाबतीत +१
बाकी जयराम रमेश यआंना 'पदोन्नती' काय उगाच दिली असे वाट्टे? शिवाय त्यांच्या जागी जयंती नट्राजन यांच्यासार्खी थोर्थोर व्यक्ती आल्यानंतर कृषीमंत्र्यांनी ही मते द्यावीत यात नवल वाटले नाही.. धास्ती जरूर वाटते Sad
अवांतरः यावरून आठवले: चीनच्या आफ्रिका आणि एकूणच स्थानिकांचा विचार न करण्याच्या सवयीने त्यांनी देऊ केलेले आर्थिक फायदे काही देश झुगारू लागले आहेत. त्याबद्दल इथे वाचता येतील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

राज्यसभा टिव्हीवर आफ्रिकेतील भारतीयांची गुंतवणूक आणि त्याचे स्थानिक परिणाम यावर नुकतीच एक उत्तम चर्चा ऐकायला मिळाली. त्यात गांधीजींच्या तत्त्वांचा अभ्यास करून त्यामुळे आम्ही आमच्या हक्कांबद्दल कसे जागृत झालो आहोत वगैरे सांगत इथियोपिया, केनिया वगैरेचे प्रतिनिधी, कॅपिटलिस्ट भारतीय प्रतिनिधींनाच धडे देत होते हे बघुन मौज (आणि खेद) वाटली. युट्युबवर चर्चा मिळाली तर बघतो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सकारात्मक दृष्टीकोनातून पाहायचच नाही का भारताच्या स्थितीकडे ? आणि सकारात्मकतेने पहाणं म्हणजे "सगळ्या वाईट गोष्टी नजरेआड करून, गोड गैरसमजात जगणं" असा तुमचा झालेला गैरसमज आहे असं वाटतं.

'बळी तो कान पिळी' हे जगात सगळीकडे प्रत्ययास येइल, प्रगत देशात काय किंवा अप्रगत काय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नक्की प्रॉब्लेम काय झालाय? लडकीका चक्कर है क्या?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लडकीका चक्कर नही है, इसलिए ही तो प्रॉब्लेम है! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता सिरियसली मेलोय. ठार झालोय.
होम लोनसाठी बेंक अधिकार्‍याने तोंडी सांगितलेला आकडा गृहित धरुन फ्लॅट बुक केला होता. डाउन पेमेंट नि अग्रीमेंटही झालं.
आता loan eligibility(कर्ज पात्रता?) मी समजलो त्याच्या वीस टक्के कमी निघालिये.
आता घ्या पर्सनल लोन आणि अडका कर्जाच्या सायकल मध्ये.
.
बहुतांश बँकांचा हाच दर असणार आहे. मला कुणी NBFC(non banking financial instituitions) सुचवू शकाल का? त्या अधिक लोन देतात म्हणे. काही nbfc म्हणजे महिंद्र फायनान्स्,चोलामंडलम, इंडिया बुल्स. असे अजून कुणाला ठाउक असतील तर सांगा. काम सोपं होइल.
नाहीतर तीर्थरुप नामक डिफॉल्ट बँकर निसर्गाने दिलेलाच आहे. पण आजवर तरी तिकडे जाण्याची पाळी आलेली नाही ग्रॅज्युएशनला लागल्यापासून.
आता गेलो तर इतकी वर्ष जपलेला आख्खा तोरा उतरेल एका झटक्यात.
.
घर विकण्याचा मला अनुभव नाही. घर विकणारे एखादे विश्वासाचे वकील वगैरे असतील तर त्यांचा नम्बर द्या.
फार ताण घेण्यापेक्षा घर काढून मोकळा होइन म्हणतो.
.
मनोबा, कधी होणार तुम्ही मॅच्युअर?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

नाही कळ्ळं.. प्रे-अप्रुव्ड लोन असेल तर अचानक eligibility कमी कशी होऊ शकते? तोंडी आकडा म्हणजे? लोन प्रीअप्रुव्ह्ड नव्हते का?

बाकी जर फ्लॅट नुसताच बुक केला असेल अन् तयार नसेल तर विकणार काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लोन "गृहित" धरायची आम्हांस खाज सुटली होती. "क्ष" रकमेचे लोन मिळेल ही अपेक्षा. आता ०.८xक्ष इतकेच लोन मिळते आहे. तिकडे डिमांड लेटर घरी येउन पडले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

*भगत सोशालिस्ट बकवास करतो असे मी म्हणत नाही. पण तो त्याच तोडीचे भंकस्/थिल्लर/सवंग लिखाण करु शकतो असे मला म्हणायचे आहे.

या विधानावर तीव्र आक्षेप!

चेतन भगत हा एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धातला (गेला बाजार इंग्रजीतला) सर्वश्रेष्ठ सटलविनोदी लेखक आहे, असे आमचे प्रांजळ मत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनोबा, लैच भारी... मस्त... Smile
खरंच, सगळी वैतागवाडीच...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

इशारा :- धार्मिक म्हणवून घेणार्‍यांपैकी काहिंच्या भावना दुखावू शकतात. खालील ओळींतील भावार्थ लक्षात घ्यावा. जमल्यास शांतपणे एकदा वाचून पाहिलेत तर आभारी राहिन.
.
हल्ली अध्यात्म, "योगा" ह्याला ग्लॅमर आलेलं आहे. काही आध्यात्मिक व अधार्मिक किंवा निधर्मी संघटनांबद्दल आमचे हे मत आहे. "आम्ही धार्मिक नाही पण आध्यत्मिक आहोत" असेही म्हणणारी बरीच मंडळी आहेत. अनेकानेक ब्रँडचे ते ग्राहक आहेत. ह्यातले सर्वात जोरात चालणारे माझ्या माहितीतले पुण्यात मला दिसलेले ब्रँड सांगतो:-
१.श्री श्री १००८ रविशंकर --Art of Living
२.इगतपुरीचे विपश्यनावाले गोयंकाजी
३.सद्गुरु परिवाराचे आपले सद्गुरु वामनराव पै.
४.स्व पांडुरंगशास्त्री आठवल्यांचा स्वाध्याय परिवार
५.एका नामांकित वर्तमानपत्रात आयुर्वेदाच्या नावाने धुमाकूळ घालणारे एक महाराज आता अध्यात्मावर अन् गीतेवर भाषणे,चेहर्‍यावर अष्टसात्विक भाव आणून व्याख्याने,कथने व वैचारिक नर्तने करताना दिसतात.
.
ह्यापैकी क्र.१ वाल्याकडे जाउन आलेली माणसे उगीच "हमारे गुरुदेव्,जय गुरुदेव" म्हणत झीट येइस्तोवर त्यांच्या पंथात सामील व्हायचा आग्रह करत आर्जवी स्वरात पैसे मागत सुटतात(शिबिरात ये म्हणून).बरे, एकदा काहीतरी रौप्यमहोत्सवी वर्ष का काहितरी म्हणून शिबीर फुकट होते म्हणून तिकडे गेलो तर डोक्याल इतका शॉट्ट बसला की फुकटातलेही पूर्ण करवले नाही. बुद्धीवाद्यांचे, स्वातंत्रयाव्दी तर्ककर्कश विचारवंतांपेक्षाही त्यांचे बकणे अधिक वैतागवाणे होते.
.
क्रमांक दोनवाले पैसे मागत नाहित. पण गेल्यावर मानगुटीला धरुन १० दिवस १००% टक्के मौन करायला लावतात.हे झेपणेबल न वाटल्याने गेलो नाही.(तिथल्या सूतकी कळा घेउन वावरणार्‍यांशी बोलायचं नाही हे ठिक आहे हो, पण एखादा फोनही कधीमधी कुणाला करायचा नाही, गरज पडल्यास पानटपरीवरही अजिब्बात जायचं नाही, हे आमच्यासरख्या उतवळ्या माणसाला भयंकर क्रूर,अमानवी वगैरे वाटले.) जायला बिचकलो. शिवाय सलग दहा दिवस सुट्टी जॉबला लागल्यापासून आजतागायत कधीच घेतली नाही.(बॉसला कुठल्या तोंडाने सुट्टी मागायची? मग आम्हास दाखवल्या जाणार्‍या ऑनसाइटच्या गाजराचे काय होइल??)
.
क्रमांक तीनवाल्यांचे भक्त त्यांच्यकडे हरिपाठ वगैरे ठेउन जेवायला बोलावतात म्हणून जाम आवडतात.बाकी कर्मकांड वगैरे ह्यांच्यात फार आहे असे वाटले नाही, पण सतत उपदेशा देण्याच्या पवित्र्यात उभ्या असलेल्या मंडळींकडे जाणे म्हणजे डोक्यावर आधीच विरळ झालेले केस स्वतःच्या हाताने संपवून घेणे, म्हणून त्यांच्या नादी लागलो नाही.
(प्रामाणिक् रहा, मेहनत् करा, स्त्रीचा आदर करा, क्रोध व व्यसनाच्या आहारी जाउ नका,लोकांशी चांगले वागा ह्या आणि अशा (खरंतर कॉमनसेन्सच्या) गोष्टी ह्यांचे सद्गुरु सांगतात. पण ह्या "जगावेगळ्या शहाणपणाच्या", अद्भुत, असामान्य व "जीवनाचे सार" ह्या गोष्टी मीही सांगायला तयार् आहे हो. पण मला ह्यांच्यासारखे कुणी पैसे का देत नाही ह्या विचाराने नेहमीच उदास् होतो Sad )
.
क्रमांक चार वाल्यांनी समाजोपयोगी बरीच कामे केल्याचे ऐकले आहे.(तळी खोदणे, श्रमदान वगैरे) पेप्रात त्यांच्या स्वाध्याय परिवाराच्या इस्टेटीवरुन काही वाद झाल्याचे वाचल्याचेही आठवते आहे. पण अजून त्यांचे कुणी (सुदैवाने?)बोलवायला आले नाही.
.
क्रमांक पाच हे पेप्रातूनच इतके भंडावून सोडतात की त्यांच्याकडच्या थंड हवेच्या ठिकाणी जायची हिम्मत होत नाही.(कधी हिम्मत झालीच तरी त्यांच्या पंचतारांकित सुविधा परवडणार नाहित हेही खरेच.)
तेच ते. गीतेचे सार्. गीता, आध्यात्म ह्यावर ते आयुर्वेदाकडून् अचानकच् आलेत. त्यांचा प्रचंड उदोउदो वर्तमानपत्रातून काळजीपूर्वक् होतोय्."जीवन ह्यांना कळले हो" नावाने त्यांचा कुठलासा मुलाखतीचा का कसलातरी कार्यक्रम् होता.
आता काही दिवसात ते योगाचीही (आतडी) फाडून ठेवणार असा डौट येतो. (म्हणजे, योगाचे अंतरंग् उघडे करणार, योगाच्या पोटात शिरून आपणास ज्ञान वगैरे देणार असे म्हणायचे आहे.)
.

तुम्ही सुशिक्षित म्हणवणारी माणसे प्रामुख्याने "मनाला उभारी यावी", "आत्मबळ मिळते" वगैरे कल्पना घेउन नवनवीन ठिकाणी जाता.(आर्ट् ऑफ लिव्हिंग गँगवाले).जरा साय-फाय्, तात्विक् व आध्यात्मिक पॉलिशचे आवरण असलेली ठिकाणे पसंत करता. सुशिक्षित व् त्यातही मध्यमवर्ग, उच्चमध्यमवर्ग ह्यात् अधिक. विशेषतः शहरी.
हे ज्यांच्याकडे जातात त्या गुरुंकडे ह्यांच्याकडे अफाट शाब्दिक ताकत असते. समोरच्याला अजिबात् कळणार् नाही असे बोलण्याची एक अद्भुत सिद्धी ह्यांच्याकडे असते. "चित्तमात्रेतून समष्टी निर्माण होते. नासिकाग्रे ध्यान् करत त्राटक केल्याने मनोर्जा जागृतीने अष्टचक्रे फिरु लागतात" असे काहिसे हे बोलू लागले, की मराठीच बोलताहेत् असा भास होतो, पण् तासंतास ऐकूनही अजिब्बात समजत् नाही.
.
मरणोत्तर काही मागत सुटणारे काही अल्पसंख्यही आहेत;ते वेगळे . ते "अलौकिक् दर्शन" वगैरे घेउन् कृतकृत्य होतात. कुणी बापूंच्या अन् त्यांच्या पत्नी व् भावाच्या दर्शनाने होतो, कुणी अम्मा भगवानच्या अनुग्रहाने फलित होतो. आमच्यकडे काही लोक् आधीच अशा प्रकारे सातही जन्माची पापे धुवून् बसली आहेत. पुन्हा करणयसही तयार् आहेत्,आध्यात्मिक धोबी ती त्यांना धुवून देतीलच.एकाने तर निव्वळ दर्शनाने स्वतःची कुंडली व पर्यायाने नियती आख्खीच बदलून् मिळू शकते व तसे बदलायची त्यांच्या केंद्रात एक्स्चेंज ऑफर अजूनही सुरु असल्याचे सांगितले आहे.
.
जबरदस्त पैसा असल्यावर्/मिळाल्यावर मनुष्य् असा धास्तावल्यासारखा का करतो व कशाच्याही कच्छपी का लागतो ते न कळे.
.
तुम्ही वेगवेगळ्या लोकांच्याकडे गेल्यावर आम्ही तुम्हाला फारसे समजावू शकत नाही. "आम्हाला अनुभव आलाय्." हेच एक स्टिरिओअटाइप् सतत ऐकावे लागते.प्रामाणीक पणे मी वेगवेगळ्या मंडळींना भेटूनही मलाच कसा कधी कुठला "अनुभव" आला नाही हे कळत नाही. अजूनही जाण्यास तयार आहे. पण कुणी असे खरोखरीचे पावरफुल सापडतच नाहित. ते नेहमीच "कोणे एके काळी होउन गेले" , "आमच्या ह्याच्या त्याला भेटले" असेच किस्से असतात. भाविकांच्या गराड्यात राहणे म्हणजे म्हटले तर गंमम्तीशीर म्हटले तर् गोंधळवणारा व् म्हटले तर वैतागवाडी/क्रूर अनुभव असतो. ढोंगी,बिनडोक,प्रामाणिक,लबाड,समजूतदार ह्या सर्वच प्रकारचे श्रद्धावंत भेटलेत. पण बुद्धीवाद्यांत इतकी व्हरायटी नाही. बुद्धीवंत म्हणवून घेणारे बव्हंशी एकसुरी असतात. ते बहुतांशी प्रामाणिक असतात; पण समजूतदार तर फारच क्वचित असतात.
.
असो. खूप काही मनातून स्क्रीनवर सांडते आहे. आवरते घेतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लहानपणापासूनच शाळेत काय नि घरात काय अतिरेकी लीन्-दीन होण्याचं गौरवीकरण केलेलं.
कल्पना करा आधीच लहान पोराला काही धड समजत नाही; खूप सरे प्रश्न ,शंका डोक्यात असतात त्याबद्दल ठाउक असेल तर उत्तर देउन मोकळे व्हावे किम्वा ठाउक नसेल "ठाउक नाही रे बाबा" असे म्हणून मोकळे व्हावे. ज्या त्या "गोष्टीवर त्या सर्वशक्तीमान प्राण्याला शरण जा, त्याच्या चरणी लीन हो. दीन हो. त्याच्यापुढे आपण सर्व यःक्श्चित आहोत. आपला हीन दीन दुबळेपणा मान्य करणे म्हणजे मोठेच पुण्य. " अशी गलिच्छ शिकवण रोज बोळ्याबोळ्याने दूध पाजावी तशी गळ्यात मारण्याची काय गरज?
.
सुसंस्कारी म्हणजे तोच जो थोबाडित खाउन घेतो.पण हाणामारी टाळतो. जो जितका जास्त भेकड; तो तितका जास्त सभ्य.
.
लाइफ ऑफ पाय पाहिल्यावर त्यातला कथानायक सुरुवातीच्या भागात बर्‍यापैकी वेडझवा दाखवलाय. "thank you lord vishnu for introducing me to jesus" असे काहीतरी तो म्हणत जीझस च्या नादी लागतो. "असंही कधी असू शकतं का? इतकं कुणी बिन्डोक राहतं का भाउ" अशा प्रतिक्रिया त्या दृश्याबद्दल नंतर ऐकू आल्या.believe me, मी अगदि बराचसा असाच होतो. रादर, तसं असणं हेच कसं भला असल्याचं लक्षण आहे; सतत "ईश्वरी राज्यात जगण्यासठी" आपण "ईश्वरी दयेवर" कसे लाचार असतो; सज्जन माणूस म्हणजेच अधिकाधिक लाचार असे नकळतपणे ही माणसे ठसवित होती. आता पुन्हा "आम्ही कुठे काय शिक्वीत होतो रे बाबा" असे म्हणत हात वर करायला हे मोकळे आहेतच. म्हणजेच ह्यांना त्यावेळी सिरियसली घेणे ही आमची घोडचूक ठरली. आपल्या शाळा नि तथाकथित संस्कार हे असा दुबळेपणा संसर्गित करण्याचे कारखाने बनवून ठेवलेत. तुम्ही जर टगे असाल ; तर ह्यास सहज पुरून उराल. पण तुम्ही ह्यांच्यावर विश्वास ठेवलात तर मराल. उलट तुम्ही मेल्यावर "मी तर असे म्हटलोच नव्हतो रे बाबा", "धर्म तर असे सांगतच नाही", "तुला खरा अर्थच कळला नाही" असे हे वर तोंड करुन बोलणार.
.
तुम्हाला प्रात्यक्षिक हवं असल्यास कुठल्याही मुलांच्या मराठी नावाजलेल्या शाळेत जा.तिथे प्रार्थना म्हणताना कसा "आर्त, व्याकूळ" भाव कसा थबथबून ओथंबून जात असतो ते बघा. लीन ,दीनवाणे शब्द आणि त्याहून केविलवाणा स्वर म्हणजे ह्या पादर्‍या प्रार्थना.
.
ही प्रार्थना पहा :-
"तुम ही हो माता पिता तुम्ही हो
तुम ही हो बंधू सखा तुम ही हो
तुम ही हो साथी तुम ही सहारे
कोइ न अपना सिवा तुम्हारे"
.
"तुम ही हो नैया तुम ही खिवय्या
तुम ही हो बंधू सखा तुम ही हो "
.
ही प्रार्थना म्हणताना आख्ख वर्ग/शाळा खाली उभा राही, समोर माइक घेउन तीन चर सुरेल पोरं उभी रहात नि आम्हास सुरात सूर मिळवून म्हणावं लागे.(नाहीतर कानफटात मिळे)हे म्हणताना चेहर्‍यावर आणी सुरात भक्तीभाव नावाच्या प्रकाराखाली जी किळसवाणी लाचारी टपटपती होइ; त्यास तोड नाही.
.
फार मागे टीव्हीवर एकदा जुनं हिंदी गाणं पाहिलं होतं "दे दी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल" त्याच्या शेवटी ते पोरगं अगदि भक्तीभावाच्या अतिरेकानं पार रडायला वगैरे लागतं. कसला हा बुळचटपणा. आणी हाच्च प्रकार अगदि असाच शाळांत ठाकून ठोकून शिकवला जातो.
पोरांचं भलं करायचच असेल तर आधी शाळेतील सर्व दीनवाणी गाणी बंद करा. प्रार्थना ह्या शब्दाला आग लावा. चांगुलपणाचे पाय चाटायला शिकवण्यापेक्षा वाईटपणावर थुंकायला शिकवा. पोरांना निर्भय बनवा. नाहीतर हीच पोट्टी पुढं जाउन नागरिक बनतात नि देवाला घाबरल्यागत विचित्र वागतात; ते नेहमीचच उपास तापास वगैरे. तो प्रकार आटोक्यात आणायचा तर ह्याही भागाकडं लक्ष द्या.
अजून काही प्रार्थना :-
"तू ही राम हय तू रहीम हय
तू करीम कृष्ण खुदा हुवा"
wtf? वरील दोन ओळींत जेवढ्या व्यक्तींची/प्रकारांची नावं आहेत त्यांना व्यावहारिक जीवनात खिजगणतीत तरी धरायची गरज आहे का? उठसूट आपलं तेच भंकस "सगळेच चांगले आहेत. सगळ्याच ग्रंथात सगळच चांगलं सांगितलय." (हे म्हणजे गांधींच्या "गीता हे मानसिक द्वंद्वाचं वर्णन आहे. त्यातही खरा उपदेश अहिंसेचाच आहे." ह्या छापाच्या तत्वज्ञानाच्या वर झालं राव. "हतो वा प्राप्यसि स्वर्गम् जित्वा वा भोक्ष्यसे महीम" काय गंमत म्हणून लिहिलं होतं का तिच्यायला?)
.
"हमको मन की शक्ती देना मन विजय करे
दूसरो की जय से पेहले खुद को जय करे"
(आधी स्वतःवर विजय मिळवा, मग दुसर्‍यांवर. स्वतःला थोबाडित मारुन घ्यायला शिका. टिपिकल बकवास.)
.
असो. घाईत आहे. सध्या इतकेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

"दे दी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल" या गाण्याइतके डोक्यात जाणारे दुसरे काहीही मी आजवर ऐकलेले/पाहिलेले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"दे दी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल" या गाण्याइतके डोक्यात जाणारे दुसरे काहीही मी आजवर ऐकलेले/पाहिलेले नाही.

त्यावर उतारा म्हणून हे ऐका. संपूर्ण गाण्याचे बोल अगदी मन लावून, लक्षपूर्वक ऐका. (सुरुवातीला कदाचित एखादी जाहिरात येईल, तिच्याकडे मनापासून दुर्लक्ष करा.)

डोक्यात जे काही गेलेले आहे, ते, अधिक वैताग, तिडीक, जे जे म्हणून काही असेल, ते त्वरित पळून जाईल, दूर होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाकिस्तानात जन्मलेल्या, पाकिस्तानात राहिलेल्या आणि/किंवा मुस्लिम नेत्यांबद्दल आपल्या पाठ्यपुस्तकांमधे फार माहिती नसतेच. जिनांनी स्वातंत्र्यलढ्यात नक्की काय केलं तर ते मला नीट आठवत नाही. (काही काळ लंडनमधे गेले होते, मग परत आले वगैरे अंधूक तपशीलच.)

या गाण्याच्या निमित्ताने साबरमतीच्या संताचं गाणंही पहिल्यांदाच ऐकलं. त्यातला आवाज कायदेआजमच्या गाण्याच्या आवाजापेक्षा जास्तच गोग्गोड (पक्षी: डोक्यात जाणारा) आहे. तेव्हाच्या रेकॉर्डींगचाही दोष असू शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

टिळकांचे वकील होते ते कुठल्यातरी खटल्यात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माझापण एक त्रागा Wink (संस्कृतिसंरक्षक मेले!!)

मार्क्सिस्ट अन निरीश्वरवाद्यांनी सध्या लैच उच्छाद मांडला आहे. जो धर्माला जितक्या जास्त आणि शेलक्या शिव्या देईल तितके हुच्चभ्रूपणाचे कूल पॉईंट्स मिळतात. पण यांची कट्टर विरोधभक्ती यांना धार्मिकांसारखेच बनवत आहे हे यांना कळत कसे नाही? यांपैकी डोके जागेवर असलेले लै कमी असतात- निव्वळ मूर्तिभञ्जनाचा आणंद घेणारेच जास्त. त्यांना हे चित्र एकदम लागू व्हावं.

वाळूत तोंड खुपसलेला शहामृग.

(पळा पळा, मरतंय आता लौकरच)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्रागा क्र ६ पर्यंतचे सर्व त्रागे वाचल्यावर इतकेच लक्षात आले की "माझ्या आयुष्यात जे काही वाईट घडत आहे.... मनाजोगते घडत नाहीये त्याला 'बाकीचे' लोक जबाबदार आहेत" असं धागाप्रस्तावकाला म्हणायचं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

"माझ्या आयुष्यात जे काही वाईट घडत आहे.... मनाजोगते घडत नाहीये त्याला 'बाकीचे' लोक जबाबदार आहेत" असं धागाप्रस्तावकाला म्हणायचं आहे.
दुरुस्ती
"जे काही वाईट होतय ते इतरांमुळेच " असे नसून "असे काही लोक भेटले की ज्यामुळे डोक्याला ताप झाला" किम्वा "डोक्याला ताप देणारी मंडळी भेटली; त्यांचे हे वर्णन" अशी धाग्याची वन लाइन स्टोरी साम्गता येइल. पण अर्थातच सारेच त्रागे तसे नाहित(त्रागा क्र.५ ; "ह्यांनी येउन नुकसान केले" असा नसून "लै पकवतात" असा आहे.)
.
शिवाय वरती चि जं ना दिलेल्या उपप्रतिसादात सरळ म्हटलय ते असं
विविव्ध आघाड्यांवर एकाचवेळी आपटी खाणे हे ठीक; पण ती सातत्याने पचवणे जड जात आहे.तर ह्या अनेक त्राग्यांच्या कारणांपैकी एक प्रकार आहे भिडस्त स्वभाव, दुसरा साधेपण शिकवणारे, तिसरं आहे माझं चुकीचं आकलन नि शिवधनुष्य पेलण्याचा हट्ट, पेलणं नच जमल्यास फार मोठी टोचणी लावून घेणे इत्यादी सर्व.

हे वाचूनही सारच खापर सदर धागाप्रस्तावक "फक्त" "इतरां"वर फोडताहेत असं आपणास वाटतं का?
का वाटतं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

>>"ह्यांनी येउन नुकसान केले" असा नसून "लै पकवतात" असा आहे.)

आपल्या लेखनात तर असाच सूर दिसतो.

त्यांनी साधं रहायची शिकवण दिली म्हणून आम्ही मन मारून जगायला शिकलो......
त्यांनी समाजवादाची शिकवण दिली म्हणून आम्ही भोगवादी नाही होऊ शकत......
त्यांनी मुलींच्या शाळा वेगळ्या काढल्या (पालकांनी मुलांच्या शाळेत घातलं) म्हणून आमचा मुलींशी बोलायचा प्रॉब्लेम झाला....

त्या लोनच्या त्राग्यातही "त्यांनी" मला जास्त लोन मिळेल असं सांगून दिशाभूल केली असं तुम्ही म्हणताय (मी शहानिशा करून घेतली नाही हे म्हणत पहिल्याप्रथम नाही.

स्वातंत्र्यानंतर देश चालवणार्‍यांनी कायतरी केलं/केलं नाही म्हणून देश मागे राहिला. देश मागे राहिला म्हणून नायतर मी कुठच्याकुठे गेलो असतो (प्रगती केली असती)......

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पुनर्मांडणी :-
तुमचे म्हणणे :-
त्रागा क्र ६ पर्यंतचे सर्व त्रागे वाचल्यावर इतकेच लक्षात आले की "माझ्या आयुष्यात जे काही वाईट घडत आहे.... मनाजोगते घडत नाहीये त्याला 'बाकीचे' लोक जबाबदार आहेत" असं धागाप्रस्तावकाला म्हणायचं आहे.
माझे म्हणणे :-
ह्यात दुरुस्ती क्र.१:- त्रागा क्र५ मध्ये "ह्यांच्यामुळे नुकसान झाले" असा नसून "हे लै पकवतात"असा आहे. त्यामुळे "त्रागा क्र ६ पर्यंतचे सर्व" ह्यातील "सर्व" शब्दाबद्दल विचार व्हावा.
.
"सर्वच गोष्टींना बाकीचेच जबाबदार आहेत" (अध्याहृत अर्थ :- मनोबा जबाबदार नाहिच. असे माझे म्हणणे नाही.) म्हणूनच पुढील ओळी आहेत :-
तर ह्या अनेक त्राग्यांच्या कारणांपैकी एक प्रकार आहे भिडस्त स्वभाव, दुसरा साधेपण शिकवणारे, तिसरं आहे माझं चुकीचं आकलन नि शिवधनुष्य पेलण्याचा हट्ट, पेलणं नच जमल्यास फार मोठी टोचणी लावून घेणे इत्यादी सर्व.
.
ह्यात "तिसरं माझं चुकीचं आकलन" ह्या आणि अशा शब्दांत लोनपासून काय काय येतं ह्याची जाणत्यांना कल्पना यावी.
.
आता लोनचा थेट विषय पुन्हा निघालाच आहे तर त्या तर्कारीची सुरुवात कशी आहे ?
होम लोनसाठी बेंक अधिकार्‍याने तोंडी सांगितलेला आकडा गृहित धरुन
स्वतःस अतिजस्टिफाय करायचे असते तर त्याने आकडा तोंडी सांगितला असा उल्लेख केला नसता. लिखित गोष्टीच व्यवहारात ठोस आधारभूत होतात. शिवाय लिखित रुपात पुरेशी स्पष्टता नसताना "गृहित धरले" हे चूकच ह्याची जाणीव आहे.
म्हणूनच त्याच प्रतिसादात शेवटचे स्वगत म्हणून एक वाक्य आहे; ते पुन्हा आपल्या नजरेस आणू इच्छितो :-
मनोबा, कधी होणार तुम्ही मॅच्युअर?

.
इतकं असूनही मनोबांचा स्वभाव सगळं खापर इतरांवरच फोडण्याचा आहे असे वाटते का?
बाकी, आपण वाचताहात, त्याबद्दल मनःपूर्वक आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

थोडेसे वैयक्तिक झाल्याबद्दल क्षमस्व.

आणि प्रत्येक त्रागा अगदी डिट्टेलमध्ये न वाचवल्यामुळे काह्से जनरलायझेशन झाले त्याबद्दलही क्षमस्व.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

क्षमस्व वगैरे नको प्लीझ.
लोनचा मुद्दा मी स्वतःहूनच जाहिर ठिकाणी मांडलेला आहे; त्यावर चर्चा होणं अस्वाभाविक नाही हे जाणतो.
अर्थात त्यामुळेच काही चांगले पर्यायही मला काही जालवासियांनी; विशेषत: ऋषिकेशने लोनसंदर्भात सुचवलेले आहेत; त्यांचा आभारी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

१९ फेब्रु ते आता ७ मार्च.
मनातले बरेच काही बाहेर आल्यावर हलके वाटत आहे? काही फरक पडला का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars