सिस्टीन चॅपेल.

रोममध्ये नव्या पोपची निवडणूक होऊ घातली आहे आणि नवा पोप निवडणारे कार्डिनल्स रोममध्ये दाखल होऊन त्यांची पहिली सभा वॅटिकनमधील सिस्टीन चॅपेलमध्ये पार पडलेली आहे. अजून काही सभा होऊन मतदानाने नव्या पोपची निवडणूक होईल आणि चॅपेलच्या खिडकीतून पांढर्‍या धुराच्या संकेताने सर्व जगाला ती वार्ता कळवली जाईल. नंतर यथावकाश नवे पोप समारंभाने आपले स्थानग्रहण करतील.

)

ह्या सर्व गोष्टी जगभर टीवी पडद्यावरून आपणास पहावयास मिळतील. त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी जागा म्हणजे सिस्टीन चॅपेल आणि त्यातील मायकेलऍंजेलोची प्रख्यात चित्रेहि आपणास वारंवार दिसतील. त्या चित्रांची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न.

पोप सिक्स्टस चौथा, इटॅलियनमध्ये सिस्टो, (अधिकाराचा काळ १४७१-८४) ह्याच्या काळात त्याच्या नावाने सिस्टीन चॅपेल उभारले गेले. सुरुवातीस त्याच्या छतावर आणि भिंतींवर काहीच कलाकुसर नव्हती पण पोप सिक्स्टस चौथा ह्याचा भाचा पोप ज्यूलिअस दुसरा, (अधिकाराचा काळ १५०३-१३), ह्याने ही त्रुटि भरून काढण्याचे ठरविले.

)
पोप सिक्स्टस चौथा पोप ज्यूलिअस दुसरा

पोप ज्यूलिअस दुसरा ह्याने तत्कालीन प्रख्यात सुपरस्टार शिल्पकार मायकेलअँजेलो ह्याला हे कमिशन दिले. मायकेलअँजेलो ह्या वेळेस पोप ज्यूलिअस दुसरा ह्याच्या भावी दफनस्थलाची शिल्पे करण्यात गुंतला होता आणि सान पिएत्रो इन विंकोली (St Peter in Chains) हे रोममधील चर्च त्यासाठी बांधून तेथे मायकेलअँजेलोने निर्माण केलेले मोझेसचे प्रसिद्ध शिल्पहि तेथे निर्माणहि झाले होते. त्या कामातून लक्ष काढून सिस्टीन चॅपेल रंगविण्याचे काम मायकेलअ‍ॅंजेलोने अंगावर घ्यावे अशी आज्ञा पोपने दिल्यावरून मायकेलअँजेलोने नाखुषीनेच हे काम अंगावर घेतले. सान पिएत्रो इन विंकोली मधील मोझेसचे शिल्प दुरून आणि जवळून पुढीलप्रमाणे दिसते:

मायकेलअँजेलो मूळचा शिल्पकार होता आणि चित्रकलेबाबत त्याचे मत फारसे चांगले नव्हते आणि त्याने त्या कलेचा फारसा अनुभवहि घेतला नव्हता. किंबहुना आपल्या शिल्पकलेतील कौशल्याबाबत आपला मत्सर करणार्‍या कंपूने - ज्यामध्ये त्याचवेळी वॅटिकनमध्ये दुसरे एक काम करीत असलेला प्रख्यात चित्रकार राफाएलहि सामील होता - आपली कीर्ति नष्ट करण्यासाठी मुद्दामच हा बनाव बनवून आणला आहे आणि त्यातून आपली दुष्कीर्ति व्हावी असा त्यांचे कारस्थान आहे असे त्याला वाटत होते. पोपच्या इच्छेनुसार काहीशा नाखुषीनेच त्याने हे काम स्वीकारले आणि १५०८-१२ अशी चार वर्षे अखंड श्रम घेऊन ते पूर्णहि केले.

हे काम शारीरिकदृष्ट्याहि अवघड होते. काम फ्रेस्को पद्धतीचे होते. फ्रेस्को म्हणजे भिंतीवरचा गिलावा ओला असतांनाच त्यावर चित्र रंगविणे. असे केले म्हणजे रंग गिलाव्यात शोषले जाऊन गिलाव्याचाच भाग बनतात आणि त्यामुळे अधिक टिकाऊ ठरतात. ह्यामागील प्रमुख आह्वान म्हणजे गिलाव्याचा ओलेपणा विशिष्ट पातळीचा असतानाच त्यावर रंगकाम करता येते. गिलावा अधिक सुकला तर तो रंग नीट शोषत नाही, अधिक ओला असला तर त्यावर रंग धरत नाही. म्हणजेच रंग लावण्याची window अगदी छोटी असते आणि ती साधून रंगकाम करावे लागते. ह्याखेरीज उभे राहून मान कायम वर धरून हात चालविणे हेहि दमणूक करणारे आहे. रंग आणि गिलावा सतत तोंडावर वा डोळ्यात पडत असतात. ह्या सर्व अडचणींवर मात करून मायकेलअँजेलोने हे १३१ फूट लांब आणि ४३ फूट रुंद, म्हणजे सुमारे ५६०० चौरस फूट इतके फ्रेस्को काम एकटयाने केले. त्यासाठी छताजवळ उभे राहून काम करण्यासाठी त्याने आपल्याच कल्पनेने एक आधारहि - scaffolding - बनवून घेतला होते. सिस्टीन चॅपेल हे रोजच्या वापरातले चॅपेल आणि ख्रिश्चन पद्धतीतील धार्मिक कार्ये तेथे होतच होती. जेव्हा चॅपेल मोकळे असेल तेव्हाच कामासाठी ते मायकेलऍंजेलोला मिळे. अशा अनेक अडचणींवर त्याला मात करावी लागली.

पोपची इच्छा चॅपेलमधील छतावरील चित्रे नव्या कराराशी (New Testament) संबंधित असावीत अशी होती पण मायकेलअँजेलोने आपली सर्व चित्रे जुना आणि नवा करार ह्या दोन्हींशी संबंधित अशी घेतली आहेत.


छतावर एकूण ४७ वेगवेगळी चित्रे शेजारी दिलेल्या योजनेप्रमाणे दिसतात. मध्यावरील लंब आयताकृति पट्टीवर ९ आयताकृति चित्रे आहेत. त्यातील तीन चित्रे विश्वाच्या उत्पत्तिविषयक आहेत, तीन अ‍ॅडम आणि ईव ह्यांची निर्मिति आणि पतन, तसेच ईडनच्या उद्यानातून त्यांना बाहेर काढण्याच्या विषयाशी संबंधित आहेत आणि उरलेली तीन नोहाच्या आयुष्यातील तीन घटना - बळी चढविणे, महापूर आणि नोहाचे मद्यप्राशन करून धुंद होणे आणि अध:पतन - ह्यावर आहेत. ह्या ९ आयतांबाहेरहि १२ आयताकृति आहेत आणि त्यात आळीपाळीने जुन्या करारातील प्रेषित (इसाया, डॅनिएल, इझिकेल, जेरेमाया, झकेरिया, इ.) आणि येशूचे भावी आगमन सुचविणार्‍या सिबिल नामक ग्रीक देवता (डेल्फीची सिबिल, लायबेरियाची सिबिल इ.) ह्यांची चित्रे आहेत. चार कोपर्‍यांमध्ये डेविड आणि गोलायथ, होलोफेर्नेसचे मस्तक कापून नेणारी ज्यूडिथ अशा स्वरूपाची कथानके आहेत. सर्वात बाहेर १४ अर्धवतुळांमधून येशूचे पूर्वज दाखविलेले आहेत.

ह्या चित्रांपैकी ’ईश्वराकडून अ‍ॅडमची निर्मिति, तसेच अ‍ॅडम आणि ईव ह्यांचे अध:पतन आणि ईडनच्या उद्यानातून त्यांचे निष्कासन ही चित्रे सर्वज्ञात आहेत आणि त्यांना iconic म्हणता येईल असा दर्जा प्राप्त झाला आहे. मधल्या भागातील प्रमुख नऊ चित्रे जशी छतावर दिसतात त्याच क्रमाने येथे दाखवीत आहे.

एका प्रेषिताचे चित्र आणि लिबियन सिबिलचे चित्र ही अशी आहेत:

ह्या सर्व चित्रांचे वैशिष्टय असे की त्रिकोणी चित्रांभोवतीची बॉर्डर काय ती खरीखुरी माती-विटेची बनलेली आहे. बाकी सर्व चित्रांमधील खर्‍याखुर्‍या वाटणार्‍या बॉर्डर्स केवळ रंगविल्या आहेत. त्यांच्यात खरेपणा वाटावा म्हणून चित्रकाराने आत येणार्‍या नैसर्गिक प्रकाशाचा कौशल्यपूर्ण उपयोग केला आहे.

ह्या सर्व चित्रांची अजून एक लक्षणीय् गोष्ट म्हणजे त्यातील सर्व पुरुष आणि स्त्रिया ह्या प्रमाणबद्ध पिळदार स्नायु असेलेले दर्शविले आहेत. अ‍ॅडम आणि ईवची निर्मिति करणारा अथवा Last Judgement च्या चित्रातील ईश्वर हा पिळदार शरीराचा रुबाबदार व्यक्ति आहे. सौम्य, दयाळू असे त्याचे रूप नाही. स्त्रियाहि - उदा. ईवकडे पहा - अशाच पीळदार स्नायूंच्या आहेत. किंबहुना चित्रातील स्त्रिया म्हणजे स्तन असलेले पुरुषच वाटावेत! मायकेलअँजेलो हा मूळचा शिल्पकार होता हे वर उल्लेखिलेले आहेच. त्याचे शिल्पकलेचे आदर्श हे त्याच्याहि १५०० वर्षांपूर्वीचे अज्ञात ग्रीक शिल्पकार होते. रोममध्ये जमिनीत पुरल्या गेलेल्या दोन प्राचीन ग्रीक शिल्पकृति मायकेलअँजेलोच्याच काळात सापडल्या. त्या दोन्ही तेव्हापासून वॅटिकनच्या संग्रहात आहेत. त्यांपैकी एक म्हणजे लेऑकॉन आणि त्याच्या दोन मुलांना समुद्रसर्प गुदमरवून मारत आहेत असे दर्शविणारा पुतळा. ही कथा ट्रॉयच्या पाडावाशी संबंधित आहे. हा पुतळा १५०५ साली रोममध्ये एका द्राक्षाच्या बागेत सापडला. थोरल्या प्लिनीने त्याच्या काळात तो पाहून त्याचे वर्णन लिहून ठेवले होते. त्यावरून तोच हा इ.स.पूर्व २००-३०० वर्षे कोणा अज्ञात ग्रीक शिल्पकाराने बनविलेला पुतळा आहे अशी खात्री पटली. दुसरा पुतळा म्हणजे वॅटिकन संग्रहालयात असलेले पाय वा मस्तकविरहित एका पुरुषाचे शरीर. ह्या दोन्ही शिल्पकृति मायकेलअँजेलोने पाहिल्या होत्या आणि त्याच्या चित्रांतील पुरुषाकृतींचे आणि त्यांच्या उठण्याबसण्याच्या पद्धतींचे मॉडेल म्हणून त्याने ह्या शिल्पांचा वापर केला आहे असे जाणकारांचे मत आहे.

ही चित्रे पूर्ण होण्याच्या पुढेमागेच वॅटिकनमधील वातावरण मायकेलऍंजेलोच्या विरुद्ध जाऊ लागले होते. तेथील पुष्कळ उच्चपदस्थांना चित्रांमधील नग्नता अजिबात पसंत नव्हती. ह्यानंतरच्या काळात अशी नग्नता झाकण्याचे, तिच्यावर एखादा कपडयाचा तुकडा रंगविण्याचेहि प्रकार झाले. पोपचा बियाजिओ दा चेसेना नावाचा Master of Ceremonies अशा मताचा होता की ही चित्रे पोपच्या चॅपेलच्या नव्हे, तर सार्वजनिक हमामखान्याच्या वा खानावळीच्या लायकीची आहेत. कालान्तराने हा विरोध मावळला आणि आपल्यापुढे मायकेलऍजेलोची मूळ कलाकृति मुळाबरहुकूम आहे. चेसेनावर मायकेलऍंजेलोने कसा सूड घेतला ते नंतर येईलच.

छताची चित्रे निर्माण झाल्याच्या नंतर २४ वर्षांनी तेव्हाचा पोप पॉल तिसरा ह्याने पुन: मायकेलअँजेलोला पाचारण करून नवे कमिशन दिले ते म्हणजे चॅपेलमधील प्रमुख पीठाच्या मागील भिंतीवर चित्र काढणे. १५३६-४१ ह्या काळात ह्या जागी मायकेलऍंजेलोने Last Judgement हे आपले दुसरे प्रख्यात चित्र काढले. चॅपेलची एक संपूर्ण बाजू ह्या चित्राने व्यापलेली आहे. चित्रात मध्यभागी वरच्या बाजूस ईश्वर बसलेला असून तो सर्व आत्म्यांना त्यांच्या चांगल्या-वाईट कर्मानुसार स्वर्गाकडे वा नरकाकडे पाठवीत आहे. आपल्या डाव्या आणि ईश्वराच्या उजव्या हाताला स्वर्गाकडे चढणारे पुण्यात्मे आहेत तर विरुद्ध बाजूस नरकात पाठवण झालेले दुरात्मे आहेत आणि ग्रीक देवता खारॉन त्यांना आपल्या नावेतून स्टिक्स नदीपलीकडे मिनॉस ह्या यमराजाच्या ताब्याकडे घेऊन जात आहे. येथे मिनॉसला वर उल्लेखिलेल्या चेसेनाचा चेहरा आणि गाढवाचे लांब कान देऊन मायकेलअँजेलोने त्याच्यावर आपला सूड उगविला. ईश्वराच्या पायापाशी सेंट लॉरेन्स आणि सेंट बार्थोलोम्यू बसलेले आहेत. ख्रिश्चन श्रद्धेनुसार धर्माच्या प्रारंभीच्या दिवसात रोमन साम्राज्यात धर्मावर बंदी होती. त्यामुळे सेंट लॉरेन्स ह्याला धातूच्या जाळीवर बसवून जिवंतपणी भाजून मारण्यात आले आणि सेंट बार्थोलोम्यूला कातडी सोलून मारण्यात आले. ह्याच कारणासाठी चित्रातील सेंट लॉरेन्सच्या हातात धातूची लांब पट्टी आहे आणि सेंट बार्थोलोम्यू आपली सोललेली त्वचा हातात धरून आहे. त्या त्वचेचे तोंड हे मायकेलअँजेलोचे स्वचित्र - self-portrait - आहे असे तज्ञ मानतात.

ह्या चित्रांना आता ५०० वर्षे होत आली आहेत. ह्या काळात त्यांना अनेकदा साफसूफ करण्यात आले. लाखो प्रेक्षकांच्या श्वासामधील दमटपणा, त्यांच्या शरीरावरून पडणारी मृत त्वचा, हवेतील धूळ अशा अनेक कारणांनी चित्राची झळाळी आणि रंगांचा ताजेपणा कमी होतो आणि तो साफ करण्याची आवश्यकता असते. सर्वात अलीकडे १९८० ते १९९९ ह्या वर्षात पायरीपायरीने हे काम पुन: करण्यात आले आणि त्यामुळे लक्षात येण्याजोगा परिणाम दिसला. रंग पुन: झळाळले आणि जवळजवळ अदृश्य झालेले तपशील पुन: लक्षात आले. शेजारच्या ’आधी आणि नंतर’ चित्रावरून हे कळून येते.

सिस्टीन चॅपेल आणि वॅटिकन - सेंट पीटर बॅसिलिका ह्यांच्या जागा दर्शवून हा लेख संपवू.

)

(चित्रश्रेय - विकिपीडिया, स्वत: काढलेली छायाचित्रे, tourist cards, प्रवासी कंपन्यांच्या जाहिराती इत्यादींचे स्कॅन्स.)

field_vote: 
4.75
Your rating: None Average: 4.8 (4 votes)

प्रतिक्रिया

चित्रे मलाच दिसत नैयेत की सर्वांनाच?

बाकी लेख खूप मस्त आहे हेवेसांनल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अतिशय सुंदर लेख..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अधिक तपशीलांसह चित्रं (उदाहरणार्थ) इथे पाहायला मिळतील.

>>ह्या सर्व चित्रांची अजून एक लक्षणीय् गोष्ट म्हणजे त्यातील सर्व पुरुष आणि स्त्रिया ह्या प्रमाणबद्ध पिळदार स्नायु असेलेले दर्शविले आहेत. अ‍ॅडम आणि ईवची निर्मिति करणारा अथवा Last Judgement च्या चित्रातील ईश्वर हा पिळदार शरीराचा रुबाबदार व्यक्ति आहे. सौम्य, दयाळू असे त्याचे रूप नाही. स्त्रियाहि - उदा. ईवकडे पहा - अशाच पीळदार स्नायूंच्या आहेत. किंबहुना चित्रातील स्त्रिया म्हणजे स्तन असलेले पुरुषच वाटावेत!

मायकेलँजेलोचं समलैंगिक असणं ह्याला जबाबदार असावं असं वाटतं.

>>तेथील पुष्कळ उच्चपदस्थांना चित्रांमधील नग्नता अजिबात पसंत नव्हती. ह्यानंतरच्या काळात अशी नग्नता झाकण्याचे, तिच्यावर एखादा कपडयाचा तुकडा रंगविण्याचेहि प्रकार झाले. पोपचा बियाजिओ दा चेसेना नावाचा Master of Ceremonies अशा मताचा होता की ही चित्रे पोपच्या चॅपेलच्या नव्हे, तर सार्वजनिक हमामखान्याच्या वा खानावळीच्या लायकीची आहेत.

हे आक्षेप अगदीच कळण्यासारखे आहेत. निव्वळ नग्नताच नाही, तर अनेक चित्रांमध्ये चक्क सॉफ्ट पॉर्न म्हणता येईल असं मानवी देहाचं चित्रण होतं. उदाहरणार्थ, हे पाहा :

चित्रातल्या पुरुषाची एकंदर देहबोली, त्याच्या दोन मांडयांमधून गुप्तांगाचं होणारं ओझरतं दर्शन, वक्षस्थळापाशी नेलेला हात, कोपर ज्यावर टेकलं आहे त्या टेकूतली लिंगसदृश आकारांची लयलूट वगैरे पाहाता हे धार्मिक चित्र आहे असं कोण म्हणू धजेल? Smile

संपादकः width="" height="" टाळावे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चित्रातल्या पुरुषाची एकंदर देहबोली, त्याच्या दोन मांडयांमधून गुप्तांगाचं होणारं ओझरतं दर्शन, वक्षस्थळापाशी नेलेला हात, कोपर ज्यावर टेकलं आहे त्या टेकूतली लिंगसदृश आकारांची लयलूट वगैरे पाहाता हे धार्मिक चित्र आहे असं कोण म्हणू धजेल?

त्यातही हीदनांच्या धर्मात एकवेळ चालेल, क्रिश्चॅनिटीत चालणं अवघडच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आकारांची लयलूट वगैरे पाहाता हे धार्मिक चित्र आहे असं कोण म्हणू धजेल?

वरील चित्र कोणाचे आहे? एखाद्या देवतेचे असेल तर भक्तीरसात ओथंबलेल्या भक्तांना ते सोज्वळ धार्मिक वाटूही शकेल Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>वरील चित्र कोणाचे आहे? एखाद्या देवतेचे असेल तर भक्तीरसात ओथंबलेल्या भक्तांना ते सोज्वळ धार्मिक वाटूही शकेल

अनेक देवीदेवता घाऊक घेतल्यामुळे 'पॅकेज डील'मध्ये फुकटात मिळालेल्या एका पुरुषाचं ते चित्र आहे हा माझा अंदाज. सिस्टीन चॅपेलमधला हा पुष्ट देहांचा भडिमार पाहूनच तेव्हाच्या चर्चला हमामखान्याची आठवण येणं स्वाभाविक वाटतं. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सिस्टीन चॅपेलमधला हा पुष्ट देहांचा भडिमार पाहूनच तेव्हाच्या चर्चला हमामखान्याची आठवण येणं स्वाभाविक वाटतं. Wink

यावरून पु.लं.च्या 'बटाट्याच्या चाळी'तला संवाद आठवला.

"काय मेला मासळीबाजार मांडला आहे!"
"अय्या! तुम्ही कधी गेला होतात मासळीबाजारात?"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हमामखा़ने मे सब नंगे...
नंगेसे खु़दा डरे...
Q.E.D

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

संपादकः width="" height="" टाळावे

हे आत्मचिंतन करड्या रंगात टाकून अधिक लक्षवेध केला आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निव्वळ नग्नताच नाही, तर अनेक चित्रांमध्ये चक्क सॉफ्ट पॉर्न म्हणता येईल असं मानवी देहाचं चित्रण होतं. उदाहरणार्थ, हे पाहा :

चित्रातल्या पुरुषाची एकंदर देहबोली, त्याच्या दोन मांडयांमधून गुप्तांगाचं होणारं ओझरतं दर्शन, वक्षस्थळापाशी नेलेला हात, कोपर ज्यावर टेकलं आहे त्या टेकूतली लिंगसदृश आकारांची लयलूट वगैरे पाहाता...

गंमत आहे. म्हणजे, हे चित्र पाहता प्रथमदर्शनी आम्हांस त्यात केवळ यट्टनदर नागडा माणूस दिसतो, नि तत्क्षणी त्या चित्रातला रस उडाल्याने मग 'ह्यॅ:, यात काय पाहायचे?' असे म्हणून आम्ही त्याकडे द्विवार ढुंकून बघतदेखील नाही. तर इथे इतर कोणाला त्यात कायकाय नि कसलेकसले तपशील दिसतात.

अर्थात, चित्रकलेतले आम्हांस काहीही कळत नाही, हा एक भाग आहे म्हणा. असो चालायचेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या लेखमालिकेत केवळ इतिहासच नव्हे तर दृश्यकलेवरही लेखांक असतील याची अजिबात कल्पना नव्हती. सुखद धक्का!
लेख आवडलाच! काहि संकल्पना आता माहित असल्याने अधिक समजल्यासारखा (उगाचच) वाटते आहे. Smile

पुढिल भागाच्या प्रतिक्षेत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+1

असेच म्हणते

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

सुंदर लेख, आवडला.

पण चित्रे खूपच लहान आकारात टाकली असल्याने त्यांचा आस्वाद घेता येत नाहीये. मोठी चित्रे टाकणं जमेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

चित्रांच्या आकाराबाबत अगदी +१.

आणि पोपचा राजीनामा, निवडणूका वगैरे पार्श्वभूमीवर समयोचित.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सूचनेनुसार चित्रे मोठी करून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची वर्णने वरती आहेतच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खूप छान लेख _/\_

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0