उत्तर कर्नाटकः काही क्षणचित्रे (१/३)

भाग - | | ३
~~~~~~~
"अरे आठवडा होत आला अजून काही लिहिलं नाहीस?" पासून "जिथे जाऊ त्याबद्दल लिहिलंच पाहिजे का?" इथपर्यंत अनेक मतमतांतराच्या गलबल्यातून नुकताच उत्तर कर्नाटकात जाऊन आलो त्याबद्दल लिहावे की नाही? या संभ्रमात होतो. शेवटी (दरवेळेप्रमाणे) धोंडोपंत जोश्यांच्या काकांचे स्मरण करून समोरच्या कोदंडधारी रामाला वंदन केले आणि बोटे कीबोर्डावर सरसावली. पण मग प्रश्न उभा राहिला की नक्की काय काय? कसे? आणि किती लिहावे? माझ्यापुढे "प्रवासातल्या माझ्या वर्णना"पासून ते "प्रवासातील स्थळांच्या माहितीपुस्तिके"पर्यंत अनेक पर्याय होते. शिवाय जालावरील अनेक भटकबहाद्दर समजणार्‍या (माझ्यासारख्या) लेखकांनी लिहिलेल्या वर्णन पद्धतीही होत्याच. पण मग मनोबाचा लेख आला Wink आणि मग सुचेल तसे, सुचेल तेथील थोडक्यात काय वाट्टेल ते! लिहायचे ठरवले.

मी केलेल्या सहलीचा मुळातील क्रम असा आहे: पुणे --> हुबळी-धारवाड --> शिरसी, मुंडगोड --> बदामी --> हम्पी, हॉस्पेट --> दांडेलीचे जंगल --> बेळगाव --> पुणे. मात्र, या लेखमालेतील लेखनाचा क्रम कसाही असू शकेल, शैली कशीही असू शकेल हे आधीच नमूद करून ठेवतो. सध्या तरी तीन लेखांकांची सीमा घालून घेतो आहे. ती वाढेलही किंवा कमीही करावी लागेल.

=========================

बर्‍याच वर्षांपूर्वी 'हॉर्नबिल' हे नाव पहिल्यांदा ऐकले होते तेव्हाच या नावाच्या पक्षाबद्दल कुतूहल जागृत झाले होते. आंतरजालावर देखणे फोटो असलेला हा पक्षी प्रत्यक्षात पाहण्याचा योग काही येत नव्हता. तसं या पक्ष्याने एक-दोनदा माझी अपॉईंन्टमेन्ट घेऊनही ऐनवेळी माझे त्याच्याकडे लक्ष न गेल्याने तो रुसून उडून गेल्याचे कळले होते. या पक्ष्याचे दर्शन होण्याची शक्यता, मी न्यूयॉर्कला असताना, तेथील प्राणिसंग्रहालयाला भेट द्यायची ठरवल्यावर पहिल्यांदा निर्माण झाली होती. "तिथे हॉर्नबिल बघितला" असे माझ्या शेजारी राहणार्‍या लहानग्या (आगाऊ) मित्राने (आगाऊ) माहिती दिल्यावर लगेच त्याच विकांताला संग्रहालय गाठले. तिथे गेल्यावर हॉर्नबिलच्या पिंजर्‍यासमोर गेलो; तर तिथे हॉर्नबिल होताही, पण त्याची ती प्रसिद्ध चोच कसल्याशा फडक्याने गुंडाळलेली होती. मला काही कळेना. तर तेथील पाटीवर लिहिलेले दिसले की "Under Treatment". आता हे म्हणजे फार मागे डोंबिवलीत मंगेशकर कुटुंबीयांनी ठेवलेल्या कार्यक्रमात आशा-लताबाईंना स्टेजवर बघावं, पण त्यांच्याऐवजी त्यांची गाणी उषाताईंनी गाऊन दाखवल्यावर झालं होतं ना तसं काहीसं झालं होतं. पिवळी जर्द, लांबलचक अशी राजबिंडी चोच असलेला हा पक्षी, पण त्यावेळी आपला युएस्पीच गुंडाळून बसला होता.

"हॉर्नबिल" हे नाव दुसर्‍यांदा अंदमानला भेटले. "हॉर्नबिल नेस्ट" नावाचे आमचे हॉटेल होते. तिथे भोवतालच्या झाडीत हॉर्नबिल येतात अशीही माहिती तेथील म्यानेजरने दिली होती. दुसर्‍याच दिवशी भल्या सकाळी हॉटेलातील पोर्‍या धावत रूमवर आला होता आणि त्याच्या सांगण्यानुसार हॉर्नबिलला बघायला आम्ही धावत बाहेर गेलो पण दूरवर उडत्या हॉर्नबिलची आकृती "तो होता" इतकेच सिद्ध करण्यापुरती दिसली होती.

दरम्यानच्या काळात खर्‍या पक्ष्यांना बघायचीही याची आवड निर्माण झाली :). यथावकाश हॉर्नबिलला मराठीत "धनेश" म्हणतात हे समजले. ही धनेश मंडळी 'एकपत्नी'व्रताचे कडक आचरण करणारी असतात. बाकी, काही खास "भारतीय पक्षी" म्हणावेत त्यापैकी "राखी धनेश" हा पक्षी आहे. धनेश तसाही केवळ आफ्रिका आणि आशियात आढळतो. त्यातही एकट्या भारतात ९ प्रजाती आढळतात. त्यापैकी हा "राखी धनेश" फक्त उत्तर भारतात आढळतो, मात्र जेव्हा आम्ही दांडेलीच्या जंगलात शिरत होतो तेव्हा आपल्या पश्चिम घाटात म्हणा किंवा दक्षिण सह्याद्रीत म्हणा आढळणारा हा "मलबारी धनेश" दिसण्याची शक्यता अजिबात गृहीत धरलेली नव्हती.

दांडेलीचे अभयारण्य जवळजवळ साडेआठशे वर्ग की.मी.मध्ये पसरलेले आहे. इथे रानगवे, हरणे, हत्ती, काळवीटे याचबरोबर प्रसंगी वाघही दिसतो असा दावा भारतातील अनेक जंगलांप्रमाणे इथेही केला जातो. गेल्या अनेक अनुभवांनी मी आणि आमचा चमू (या थापांना) "तयार" झालो असल्याने "दोन दिवस शहरी कलकलाटापासून दूर राहता यावे" या आणि इतक्याच स्वच्छ हेतूने दांडेलीचे अभयारण्य मी कार्यक्रमात घातले होते. अर्थातच या जंगलाने प्राण्यांच्या बाबतीत आमची अजिबात निराशा केली नाही. दोनदा जंगलात जाऊनही प्राण्यांच्या खात्यावर डबक्यात डुंबणार्‍या म्हशी आणि दूरवरचा सोनेरी ठिपका दाखवून "ते हरण आहे" अश्या दाव्यावर विश्वास ठेवल्यास, ज्याला गाइडने हरण म्हटले ती आकृती सोडल्यास काहीही जमा झाले नाही. अर्थात, नाही म्हणायला रानकोंबड्यांच्या एका कळपात, बहुदा एक वाट चुकलेले पाडस दिसले. त्या पाडसाकडे पाहून मात्र राम पटवर्धनांचा ज्योडी सोडल्यास काही फारसे छान आठवले नाही.

अभयारण्य जरी प्राण्यांची जाहिरात करत असले तरी पक्ष्यांनी मात्र सुखद दर्शन दिले. मी आमचा कँप दांडेली गावात वा जवळ न निवडता तेथून १०-१२ मैलावरील प्रधानी या जंगलातील एका वस्तीजवळ निवडला होता. अर्थात तिथे जायला डांबरीच काय कोणत्याही स्वरूपातील पक्का रस्ताही नव्हता. आमची गाडी, एका झाडींमधून फक्त एकच गाडी कशीबशी जाऊ शकणार्‍या त्या जंगलवाटेवरून, त्या कँपवर पोचली आणि सामान उतरवत असतानाच समोरच्या फांदीवर चक्क भारतीय घुबडाने दर्शन दिले. आता "घुबड हा पक्षी दिवसा झोपतो आणि रात्री बाहेर पडतो" वगैरे शालेय माहितीच्या पुढे माझी गाडी गेली असली तरी आमच्या गाडीच्या आवाजानंतरही आणि त्याहूनही आमच्यातील अनेकांनी एकाच वेळी, आमचे सामान उतरवणार्‍या तेथील पोरांना दिलेल्या सूचनांच्या "मंजूळ किलबिलाटाकडे" तटस्थपणे कटाक्ष टाकत बसलेला त्याला इतक्या जवळून पाहिला आणि "साला, दिन बन गया!". एखादा मिनिट त्याला न्याहाळल्यावर भानावर येऊन क्यामेराकडे बोट गेले आणि माझ्या या तुच्छ कृतीच्या निषेधार्थ त्या पक्षाने आपले विशाल पंख पसरून आमच्याच डोक्यावरून पलायन केले. मग यथावकाश इतरांनी "जंगलात आल्याच्या" उत्साहात काढलेले "सांगायचंस ना आधी!" वगैरे काढलेले उद्गार कानामागे ढकलत दांडेलीत शिरलो.

आमच्यापैकी "आराम म्हणजे झोप" इतके स्वच्छ आणि ठाम समीकरण असणार्‍या सुखी जीवांना वगळून दुसर्‍या दिवशी सकाळी सकाळी 'जंगल वॉक' करायला गेलो. ती सकाळ मात्र पक्ष्यांच्या बाबतीत "घेशील किती दो कराने" च्या चालीवर "बघशील किती दो डोळ्याने" म्हटले पाहिजे अशी निघाली. नुकतेच पेव फुटले होते. जंगल म्हणजे 'पक्ष्यांची शाळा' झाली होती. तर्‍हेतर्‍हेचे आणि हरतर्‍हेचे आवाज चारी दिशांनी येत होते. काही वेळाने जरा कान स्थिरावल्यावर त्यांची दिशा आणि अंतराचा अंदाज येऊ लागला. आणि मग हळूहळू त्या आवाजांच्या स्रोतांचे दर्शन होऊ लागले. 'हळद्या' आणि 'शिंपी' या पक्ष्यांना याआधीही अनेकदा मुंबई-पुण्यातही बघितले आहे. शिंप्याचे घरटे मागे एकदा पनवेलला, रोह्याला वगैरे मागे बघितले होते. मात्र यावेळी या दोन्ही पक्षांना गाताना ऐकले-पाहिले. बाकी शहरांबाहेर सहज दिसणारा (आणि मी याआधीही गाताना ऐकलेला) दयाळही दिसला. जरा जंगलात गेल्यावर हुदहुद्या (ज्याला मी बराच काळ सुतारपक्षी समजत असे) पक्ष्यांची जोडी दिसली. आजपर्यंत एकटा तो ही मैदानी भागात, पाणवठ्याजवळ बघितलेला हा पक्षी या खोल जंगलात कशी वाट चुकला असे वाटत असताना, पुढच्या वळणावर एक पाणवठा लागलाच!

आम्ही अत्यंत शांत असल्याने, पाणवठ्यावर आमच्या आगमनाची चाहूल लागली नसावी किंवा त्यांनी दुर्लक्ष केले असावे, पण समोर बगळे, पाणकोंबड्या आम्ही नसल्याच्या तोर्‍यात फिरत होत्या. किनार्‍यावर टिटव्या, साळुंक्या होत्या. शिवाय झाडीत रान-कोंबड्या होत्या. कर्नाटकात आल्यापासूनच बरेचदा निळ्या छातीचा खंड्या बघितला होता, तो इथेही होताच. अतिपरिचयाने अवज्ञा नको म्हणून तिथे कोतवाल अनेक झाडांवर दिसले हे ही नमुद करायला हवेच. या शिवाय सनबर्डस, निकेलचा फुलटोचा, आणि काही न ओळखता आलेले पक्षीही दिसले. आणि इतक्यात समोरच्या सागवानावरून अचानक मोठा पक्षी येत असल्याचे जाणवले. त्या घारीच्या आकाराच्या पक्षाने या पाणथळ जागेतला कुठलासा प्राणी (बहुदा उंदीर असावा, आम्हाला दिसला नव्हता) टिपला आणि आमच्या डोक्यावरून पुन्हा उडता झाला. आणि इतका वेळ शांत असलेल्या आमच्या सगळ्यांच्याच तोंडून "ब्राह्मणी घार" असा उद्गार निघाला. (त्याने काही जवळील पक्षी उडून गेले). आमच्यातल्या लंगड्या गायीने आम्हाला साधारणतः ऑस्ट्रेलिया आणि भारतात दिसणारा हा पक्षी एप्रिल पर्यंतच इथे असतो मग उत्तरेला जातो आणि मग तिथून ऑस्ट्रेलियापर्यंत प्रवास कसा करतो याची कथा सांगितली.

आम्ही ब्राह्मणी घारीची माहिती ऐकत असतानाच आमच्यातल्या एकाने "समोर, ९ वाजता" इतकेच म्हटले. सगळ्यांनी बघितले तर तिथे चक्क मलबारी धनेशाची जोडी बसली होती. आमच्यापासून १०-१५ फुटांवरच असेल. दोघेही, तपकिरी पिसंचे, पिवळ्या जर्द चोचीचे देखणे धनेश उंबरासारखी आलेली फळे खाण्यात मश्गूल होते. आम्ही एखादा मिनिट बघत बसलो असु तोच मागून झाडीतून आणखी तीन धनेश वरच्याच फांदीवर आले आणि फळे खाऊ लागले. दरम्यान लक्षात आले की हा धनेशांचा थवाच आहे, तो ब्रेकफास्टला निघाला आहे. तिथून माझ्या एका मित्राच्या क्यामेरातून एक प्रकाशमान "क्लिक" वाजला आणि ती टोळी समोरच्या झाडीत उडाली आणि अदृश्य झाली! मात्र तोवर इतक्या जवळून एकदाची आमची हॉर्नबिल-भेट झाली होती! Smile

टिपः माझा क्यामेरा "पॉइंट अ‍ॅन्ड शुट" पद्धतीचा साधासा कॅमेरा असल्याने पक्ष्यांची चित्रे काढण्याच्या भानगडीत पडलेलो नाहि तेव्हा ती चित्रे इथे देता येणार नाहीत. पक्ष्यांची माहिती + चित्रे दिलेल्या दुव्यांवर वाचता येतील

------------

पूर्वी जेव्हा "कोस्टल कर्नाटक" नावाची टूर टुरिस्टांच्या नकाशावर उमटायची होती तेव्हाच आम्ही चाणाक्षपणे तो भाग बघून घेतला होता. शिरसी हे हिल स्टेशन तेव्हाच घडले होते. मात्र त्याच्या जवळ असणारे 'सहस्त्रलिंग' नावाचे ठिकाण बघायचे राहिल्याने यावेळच्या प्रवासात पुन्हा शिरसी ठेवले होते. आम्ही हुबळीहून शिरसी टाळून -येल्लापूर मार्गे- आधी थेट सहस्त्रलिंगला गाडी वळवली. सहस्त्रलिंग नावाचे हे ठिकाण श्यामला नदीच्या पात्रात आहे. या पात्रात कोण्या अज्ञात शिल्पकाराने पात्रातील खडकांवर अनेक लिंगे कोरलेली आहेत असे सांगितले जाते. वाहत्या नदीच्या पात्रात शिरून ती जागोजागी विखुरलेल्या पिंडी बघणे मोठे रोचक आहे अश्या शिफारशी, तिथे जाऊन आलेल्या अनेकांनी केल्या होत्या.

खरंतर काही टिपिकल टुरिस्टांकडून या ठिकाणाची शिफारस होऊ लागली होती तेव्हाच आम्ही समजून जायला हवे होते, पण ते असो. आम्ही तिथे गेलो आणि जे बघितले त्याने केवळ शिसारी आली. खरे तर नॅशनल हेरीटेज व्हावे अश्या प्रतीच्या या ठिकाणची ही शिल्पे नदीच्या ऐन पात्रात आहेत. वाहत्या पाण्यातून चालतच त्यांच्यापर्यंत जावे लागते. मात्र आता प्रत्येक पिंडीचा ताबा एकेक पुजार्‍याने घेतला आहे. आणि श्रद्धेने डबडबलेली मंडळी त्या पिंडीवर पाण्यासोबत हार, उदबत्त्या वगैरे वाहून, ओलेत्याने अभिषेक वगैरे करत प्लॅस्टिकादी कचरा तिथेच फेकत आहेत. आपल्याला कित्येकदा हार, फुलांच्या मागे दडलेली पिंड दिसतही नाही.

श्रद्धेच्या नावावर चाललेली अस्वच्छता बघवत नव्हती. जास्त वेळ न थांबता निघालो तर वाटेतच काहि शाळेतील विद्यार्थी समोरून येताना दिसले. ते कोणतीतरी पत्रके वाटत होते. आम्हाला पत्रक दिल्यावर "कन्नड येत नाही" असे सांगितल्यावर, एका मुलीने अगदी छान मराठीत ते काय करायला आले आहेत ते सांगितले. ती मुले त्या पात्रातील पिशव्या, निर्माल्य वगैरे गोळा करायला आले होते, आपणहून शाळेच्या शिक्षकांशिवाय! रविवार असल्याने त्यांना सुट्टी होती. इतक्या उन्हात ते तिथे दिवसभर थांबणार होते आणि भाविकांना कचरा न टाकण्याचे आवाहन करत, त्यांना तसे करण्यापासून न रोखता तो 'कचरा' निर्माल्य म्हणून उचलणार होते. अतिशय कौतूक वाटले. "वा! छान काम करताय! शुभेच्छा!" इतकेच म्हटले तर ती लहानशी मुलगी खुपच खुश झाली. डोळ्यात दोन आनंदाचे दिवे नाचवत निघून गेली.

पुन्हा गाडीकडे येताना त्या भाविकांच्या वर्तनाबद्दल राग करावा की विद्यार्थ्यांच्या उपक्रमबद्दल आनंद मानावा काहीच कळेनासे झाले होते.

(क्रमशः)

field_vote: 
4.25
Your rating: None Average: 4.3 (4 votes)

प्रतिक्रिया

कॅमेराने टिपलेल्या फोटोंशिवायदेखील नजरेने टिपलेली ही क्षणचित्रं आवडली.

पक्षीनिरीक्षण वेगळ्या अर्थाने आवडत असलं तरी खऱ्या पक्ष्यांच्या बाबत उदासीनच होतो. त्याचं मुख्य कारण म्हणजे मला नावं, प्रकार, आणि त्यांची वैशिष्ट्य लक्षात रहात नाहीत. त्यामुळे होस्टेलमध्ये असताना वाइल्ड लाइफ क्लब तर्फे जाणाऱ्या हाइक्स/आउटिंगसाठी कधीच गेलो नव्हतो. ज्यांना या विषयात गती आणि उत्साह आहे त्यांचं कौतुक नेहमीच वाटत राहिलेलं आहे.

सहस्रलिंगाविषयी पहिल्यांदाच वाचलं, पण अशा सुंदर ठिकाणाचं मंदिरीकरण झालं हे ऐकून वाईट वाटलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभार!
मी स्वतः "हौशी पक्षीनिरिक्षक' या क्याटेगरीतही येत नाही. खास पक्षी बघायचे म्हणून फारसा कुठे भटकलेलोहि नाही. मात्र ट्रेकिंगच्या निमित्ताने व माझ्या नात्यातील एक-दोघांच्या 'नादाला लागून', दिसलेला पक्षी कोणता याचे कुतूहल उत्तरोत्तर जागृत होत गेले आहे. सुरवातीला चिमणी, कावळा, डोमकावळा, बगळा, घार, कबुतर, कोंबड्या इतकेच माझं पक्षीविश्व होतं. पण एका मित्राने ऐन मुंबईत त्याच्या घराजवळ दारूच्या ग्लासच्या आकाराचं घरटं दाखवलं आणि त्यातील नाचण पक्षी व त्याची अंडीही त्याच्या गॅलरीतून दिसत होती. त्यादिवशीच नेमके नाचण पक्ष्याने कावळ्यांच्या लहानशा टोळीला एकट्याने पळवून लावलेले पाहिले आणि तो पक्षी लक्षात राहिला. मग अचानक दिसल्यावरही तो पक्षी कोण हे लक्षात येऊ लागले. मग हळु हळू लक्षात आले की अगदी घरच्या खिडकितूनही जरा डोळे उघडे ठेऊन पाहिले तर बरेच पक्षी दिसतात.
कुठेही न जाता आधी मुंबईत आता पुण्यात वर उल्लेख केलेल्या पक्षांपैकी ब्राह्मणी घार, घुबड आणि धनेश सोडल्यास घरबसल्या बघितले आहेत. (तेच नाहित त्याव्यतिरिक्त वेडा राघु, सातभाई, शिंजीर, हरितालक, पारवे वगैरेही घरबसल्या दिसतात).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जे काही आहे ते आवडले. आणखी येऊ द्या. मग एकदमच प्रतिक्रिया देतो. बाकी पुणे --> हुबळी-धारवाड हा क्रम काही पटला नाही. गल्ली चुकलं काय हो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

का हो? Wink
हुबळी-धारवाड हा बेस अगदीच योग्य पडला. शिरसी, बदामी, दंडेली सगळं काही वेगवेगळ्या दिशांना दोन अडीच तासांच्या अंतरावर आहे तिथून. त्यामुळे उलट अधिक सोयीचं झालं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गल्ल्या चुकलेल्या बऱ्या असतात. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राघा आणि संजोपराव ह्या दोघांनाही +१ . लेखन आवडलं .
अचूक ठिकाणी "गल्ली चुकलं काय हो?" हे प्रतिसादातील वाक्य खुमारी वाढवून गेलं बघा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लेख आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तर कर्नाटकची क्षणचित्रे आवडली!!! पंखवाल्या पक्ष्यांच्या निरीक्षणात तादृश इंटरेस्ट नाही, पण वर्णन उत्तम!

सहस्रलिंग स्थान रोचक दिसते आहे. तिथे जाऊन बघवले तर बघू कधी जमल्यास. बाकी तुलनेने दक्षिणेतील देवस्थाने उत्तरेच्या तुलनेने बरीच स्वच्छ असतात असा अनुभव आहे. पण उडदामाजि काळेगोरे असतातच, इलाज नै. त्या विद्यार्थ्यांचे वर्णनही मस्तच जमले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बाकी तुलनेने दक्षिणेतील देवस्थाने उत्तरेच्या तुलनेने बरीच स्वच्छ असतात असा अनुभव आहे

सहमत आहे.
उत्तरेच्या भोंदुगिरी आनि गचाळपणाच्या दगडापेक्षा दक्षिणेतील अतिभाविक भक्तगणाच्या बुजबुजाटाची वीट मऊ इतकेच Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हे बाकी खरंय Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वा !
दांडेली जवळचा हा आडबाजूचा कॅम्प कोणता आणि पक्षी तिथेच पाहिले की आणखी कुठे जवळपास जाऊन ?
बेळगाव, दांडेली, कारवार हा भाग माझा अत्यंत आवडीचा आहे. बेळगावमध्ये किंवा आसपास 'बन्स' खाल्ले का नाश्त्याला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रधानी नावाची वस्ती आहे. 'दंडेली जंगल कँप' नावाचा कँप आहे. दंडेली.कॉम वर माहिती मिळेल.
तिथे रहायची सोय ओके ओके आहे, मात्र जेवण अप्रतिम होते Smile शिवाय कँप जंगलातच आहे.

केंम्पमधूनच बरेच पक्षी दिसायचे मात्र वर उल्लेख केला आहे तो आजुबाजुच्या जंगलात पायी फेरफटका मारायला गेलो होतो. कँम्प मधीलच एक मुलगा वाटाड्या होता. साधारणतः तासभर तो टुरिस्टांना भटकवून आणतो. आमची पक्ष्यांमधील उत्सूकता बघुन की काय कोण जाणे पण आम्हाला पाणवठ्यावर जाऊ म्हनून जवळजवळ तिप्पट वेळ फिरवले Wink

बाकी तुम्ही म्हणताय हा सारा परिसर एकूणात अतिशय आवडला!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सहस्रलिंगाचे फोटो काढले आहेस का? आणि त्या शाळकरी मुलांचेही?

पुढच्या भागांची वाट पहाते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सहस्रलिंगाचे फोटो काढले आहेत. (चेपुवर त्यातील एका नंदीचा फटु दिसेल). अपलोड करायचा मुहूर्त शोधतो आहे. शाळकरी मुलांचे नाही, तेव्हा माझ्या हातात क्यामेरा नव्हता. परत येताना नदीच्या पात्राजवळ तो नेमका पडला, फार ओला नाही झाला पण 'रिसक' नको म्हणून बंद करून ठेवला होता थोडा वेळ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेख आवडला. सुरुवातीचे पक्षीपुराण थोडे लांबले खरे पण पुढे स्थळांची आणखी रोचक माहिती येईल अशी आशा पल्लवीत झाली आहे.

पक्षीनिरीक्षण वेगळ्या अर्थाने आवडत असलं तरी खऱ्या पक्ष्यांच्या बाबत उदासीनच होतो

खर्‍या पक्षीनिरीक्षकांचं फार कौतुक वाटतं, पण त्यांच्याबरोबर जाणे म्हणजे वात येतो अगदी.
समोर दिसणारा पक्षी हुप्पो आहे की सुतारपक्षी (की दोन्ही एकच आहेत?) हे सुद्धा आपल्याला कळत नसताना हे लोक तो अमुक टेल्ड आणि तमुक ब्रेस्टेड आहे अशी त्याची वर्गवारी करूनही मोकळे होतात. पक्षी पाहून तो आपल्या (D)SLR क्यामेर्‍यात शक्य तितक्या त्वरेने टिपणे आणि मग बरोबरच्याने विचारले नसले तरी त्याची इत्यंभूत माहिती देणे एवढा एकच उद्योग करण्याचा यांना अथक उत्साह असतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पक्षी पाहून तो आपल्या (D)SLR क्यामेर्‍यात शक्य तितक्या त्वरेने टिपणे आणि मग बरोबरच्याने विचारले नसले तरी त्याची इत्यंभूत माहिती देणे एवढा एकच उद्योग करण्याचा यांना अथक उत्साह असतो.

ठ्ठो! ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

असे काही हौशी पक्षीनिरीक्षक फोटोग्राफर मित्र आहेत. त्यातल्या काहींना समोरच्याची आवड्/नावड बहुतेक चेहेर्‍यावरून समजते. एकाने मात्र भयंकर वात आणला होता. कोणतातरी रंगीबेरंगी पक्षी दिसल्याचं म्हणत होता म्हणून मला जरा कुतूहल वाटलं. पक्षी काही दिसेना. मग तो माझ्या शेजारी उभा राहून, गुडघे वाकवून डोकं माझ्या डोक्याच्या उंचीला आणून मोठ्या मेहेनतीने "ही फांदी संपते तिच्या ३ वाजता पहा" वगैरे हात लांबवून सांगायला लागला. त्याने त्या दिवशी आंघोळ केलेली असती तर कदाचित मी "हां, हां, काय भारी रंग आहेत ना!" असं खोटं बोलले नसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खर्‍या पक्षीनिरीक्षकांचं फार कौतुक वाटतं, पण त्यांच्याबरोबर जाणे म्हणजे वात येतो अगदी.

अजिबात नाही. एकदा खऱ्याच पक्षीनिरिक्षकांसोबत जा. त्यांचा वात सोडा, तो नसतोच. समोरच्याच बंद करतील.

समोर दिसणारा पक्षी हुप्पो आहे की सुतारपक्षी (की दोन्ही एकच आहेत?) हे सुद्धा आपल्याला कळत नसताना हे लोक तो अमुक टेल्ड आणि तमुक ब्रेस्टेड आहे अशी त्याची वर्गवारी करूनही मोकळे होतात. पक्षी पाहून तो आपल्या (D)SLR क्यामेर्‍यात शक्य तितक्या त्वरेने टिपणे आणि मग बरोबरच्याने विचारले नसले तरी त्याची इत्यंभूत माहिती देणे एवढा एकच उद्योग करण्याचा यांना अथक उत्साह असतो.

ते खरे पक्षीनिरिक्षक नव्हेतच. ते 'पक्षी'निरिक्षक.
पंडित आणि विकीपंडीत असा हा फरक आहे. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्वा! मस्त. वाचता वाचता छायाचित्रे असती तर अजून मजा आली असती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचता वाचता मधेच क्लिकवावे लागत असल्याने अंमळ रसभंग झाला.
वर्णनशैली आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त आहे लेख. येऊंद्यात आणखी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पुढच्या भागाची वाट पाहते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान वर्णन आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झकासच सुरुवात झाली आहे .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्षणचित्रे आवडली. पुभाप्र.
फोटो लिँकऐवजी लेखातच द्यायला हवे होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऋ,

तुझ्या कर्नाटक यात्रेचा वृत्तांत माहिती करुन घ्यायचाच होता.
अतिशय मोजक्या पण अकृत्रिम अशा शब्दांतून तू या यात्रेची माहिती देतो आहेस. पक्ष्यांच्या सहवासातील तुझे निरिक्षण आवडले.
लेखाच्या शेवटी आलेल्या लहानग्या मुलीच्या प्रसंगाने टच् केले.
सुरेख सुरुवात झालीय. पुढील भागाच्या प्रतिक्षेत हेवेनसां Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला. २००८ साली काहीशा अशाच मार्गाने उत्तर कर्नाटकात मस्त भटकंती केली होती, पक्ष्यांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली की एकदम किती दिसायला लागतात! इतके "बी-ईटर्स" मी या आधी कधीच पाहिले नव्हते. हंपीच्या एका जुन्या इमारतीकडे पाहत असताना अचानक मला दोन डोळे दिसले: छोटेसे "स्नो-आउल" माझ्याकडे टक लाऊन बघत होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0