नमामि चार्ल्सं डार्विनम्॥

'जुने जाऊ द्या मरणालागुनि' असं सांगणार्‍या केशवसुतांनी लिहून अनेक दशके झाली. तरी हा संदेश सदैव नवीनच वाटतो. परवाच टीव्ही पहाताना दोन कार्यक्रम बॅक-टू-बॅक पाहिले, पहिला होता पिरॅमिडबद्दल आणि दुसरा होता 'मॉडर्न मार्व्हल्स'. हजारो वर्षांपूर्वी हजारो लोकांना कामाला लावून प्रचंड आकाराचे पिरॅमिड बांधले हे आश्चर्य आहेच; पण त्यापेक्षाही विस्मयकारक वाटतात ते हजारो टन वजन उचलू शकणारे स्टीलचे दोर. रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणारे, आजूबाजूला दिसणारे 'मॉडर्न मार्व्हल्स' मला तरी जास्त रोचक वाटतात. हे मॉडर्न मार्व्हल्स वापरून पिरॅमिडसारख्या अतिप्रचंड वास्तू बनवण्यासाठी आज हजारो लोकांना उन्हात छाती फुटेपर्यंत काम करावं लागणार नाही.

हजारो वर्षांपूर्वी लिहीलेल्या स्तोत्रांचा साठा करण्यापेक्षा मला महत्त्वाचे वाटतात "आजचे आदर्श". आधुनिक ऋषि-मुनि आणि देव - आयझॅक न्यूटन, चार्ल्स डार्विन, मारी क्यूरी, महात्मा गांधी आणि अगदी सचिन तेंडूलकरसुद्धा! तर हा धागा आहे आजच्या काळाच्या आदर्शांबद्दल काही लिहीण्याचा. फक्त एकच अट आहे, हे लिखाण करायचं ते स्तोत्रांच्या स्वरूपातच. चार्ल्स डार्विनची स्तुती करण्याचा हा आमचा एक प्रयत्न.

सुशुभ्रदाढिधारको सतेजबुद्धीधारको
भुमिभ्रमणकारको नमामि चार्ल्सं डार्विनम्॥

सुसानरॉबर्टसुतो सुश्रूसबरिसुपुत्रो
एडींबरामाजीछात्रो नमामि चार्ल्सं डार्विनम्॥

बीगलात्प्रवास्कृतो गॅलापेगोसगच्छितो
एफआरेसपावको नमामि चार्ल्सं डार्विनम्॥

निसर्गशास्त्रज्ञातो जिवोत्पत्तिसंशोधको
उत्क्रांतिक्रांतिकारको नमामि चार्ल्सं डार्विनम्॥

आधुनिकऋषीवरो सुतर्कधर्मपालको
सृष्टीगुढशिक्षको नमामि चार्ल्सं डार्विनम्॥

मंदार, धनंजय आणि इतर सर्व संस्कृताभ्यकांकडून या स्तोत्रांना पॉलिश होईलच अशी अपेक्षा आहे.

स्तोत्र राजेश घासकडवी आणि मंदार यांच्या मदतीने लिहीण्यात आले आहे.

field_vote: 
3.75
Your rating: None Average: 3.8 (4 votes)

प्रतिक्रिया

सदा सर्वदा योग असे घडावे
सफरचंद नेमके मस्तकी पडावे
उपेक्षु नको न्युटना तु गुरु बा
गुरुत्व्नायका मागणे हेची आता

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आणि स्तोत्रांच्या आधीचे प्रकटनही आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आयडिया चांगली आहे पण इथे कोणाला संस्कृत येतंय एवढं.. (कोणाला येतंय ? हा प्रश्न किंवा शंका नसून मला येत नाही हे म्हणण्याचा बोलीभाषेतील प्रकार आहे हेवेसांनल..)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्तोत्र संस्कृतातच येतात असं कोणी सांगितलं..
हे मराठी संस्थळ आहे ना. मग!. येऊ द्या मराठीत स्तोत्र

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मंदारराव लवकरच पंधरा हजारी मनसबदारी साहेबांवर स्तोत्र रचतील याची खात्री आहे :). त्यानंतर सविस्तर प्रतिसाद दिल्या जाईलच.

अवांतर - चार्ल्स डार्विनबद्दलची ही व्हिडिओमालिका पहावी अशी - http://www.youtube.com/view_play_list?p=F2E17B4CDCCE15F5

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वप्रथम माझ्याकडून पॉलिश होईल वगैरे अपेक्षा ठेवल्याबद्दल आणि मला संस्कृताभ्यासक वगैरे उपाधि चिकटवल्याबद्दल अदितीबाईंना वाहाशु. मी काही अभ्यासक वगैरे नाही पण सुधारणा सांगायच्या तर सगळीकडे जिथं जिथं विशेषणांना प्रथमा वापरली आहे तिथं तिथं द्वितीया वापरावी. उदा "सुशुभ्रदाढिधारको सतेजबुद्धीधारको" हे "सुशुभ्रदाढिधारकं* सतेजबुद्धीधारकं" असं व्हावं. तसंच "भूभ्रमंतीकारकं" व्हावं. 'भुमिभ्रमण' वृत्तात बसत नाही. 'म' च्या जागी गुरू यायला हवा.

* येथे 'सुशुभ्रश्मश्रूधारकं' हेच अधिक योग्य. पण अदितीबाईंना मीच चुकीचं मार्गदर्शन केल्याबद्दल जाहीर माफी मागतो. त्या 'श्मश्रू' म्हणत होत्या मीच 'श्मश्रू' बरोबर वाटत नाही म्हणून राँगवन टाकला.

बाकी पंधरा हजारी मनसबदारी साहेबांवर स्तोत्र - गेलाबाजार काही श्लोक - रचण्याचा मानस आहेच! हा विश्वास माझ्यावर दाखविल्याबद्दल नंदनभाऊस धनबाद.

बाकी सवडीनं लिहितोच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मेरी क्युरी
.
मेरी क्युरी
(७ नोव्हें. १८६७, वॉर्सा, पोलंड-४ जुलै १९३४, सॅव्हॉय, फ्रान्स)
.
जन्मगाव वॉर्सा, मुळी वारसा न फारसा ।
तरीही उजळलीस तू, मेरी किरण-अर्जिता१ ॥ धृ ॥
.
उदय२ गोंधळात ना, म्हणून त्यजशी देश ना ।
कष्ट काढले जिथे ती, कर्मभूमी फ्रान्स ना ॥ १ ॥
.
रुचसी शिक्षकास३ तू, पियरेस कांक्षसीही तू ।
शोधवेड साधण्या, वरशीही लग्नगाठ तू ॥ २ ॥
.
’किरणे युरेनियमची४’ ती, विषय कठीण मानती ।
निवडसी तयास तू, तुला न वाटते क्षिती ॥ ३ ॥
.
“मी” म्हणत थंडी ये, नळात पाणी गोठते ।
उबेस कोळसा५ नसे, तरी ज्ञानभक्ती तेवते ॥ ४ ॥
.
प्रखर युरेनियमहुनी, जे द्रव्य किरण सोडते ।
शोधण्या तयास, सकल मूलद्रव्य६ हुडकते ॥ ५ ॥
.
गवसले असेही द्रव्य, किरण दिव्य सोडते ।
’पोलोनियम७’ म्हणून ती देशाभिमान दावते ॥ ६ ॥
.
पिचब्लेंड८मधून आगळे मग द्रव्य आढळे नवे ।
प्रारणे सशक्त, दिप्ती लक्षगुणित जाणवे ॥ ७ ॥
.
हे ’रेडियम९’ नवेच द्रव्य, दिप्ती दूर फाकते ।
टनात खनिज चाळता, लघुग्रॅम फक्त हाती ये ॥ ८ ॥
.
शोध लावला म्हणून, लाभले ’नोबेल१०’ही ।
शोधते कसे जनांस उपयुक्त ते ठरेल, ही ॥ ९ ॥
.
अकस्मात, चालता पियरेस देत धडक११ एक ।
वाहने उजाडले तिचे आयुष्य विरह देत ॥ १० ॥
.
आयरीन१२ गुणी खरीच, किरणोत्सार घडवते ।
ईव्ह धाकटी, पियानो, जन-रंजनास वाजवे ॥ ११ ॥
.
उपचार१३ दिप्तीचेही ती, शोधण्यास राबली ।
’नोबेल’ लाभले पुन्हा, दिगंत कीर्ती जाहली ॥ १२ ॥
.

१ अर्जिले किरणांस जिने ती, किरण-अर्जिता
२ वॉर्सा त्याकाळी रशियाच्या गुलामगिरीत कितपत असल्याने, देशात उदय होणे कठीण असे वाटून मेरी स्क्लोडोवस्का हिने पोलंड हा स्वदेश सोडला होता. ती चरितार्थ चालवण्याकरता तसेच शोधजिज्ञासा शमवण्याकरता फ्रान्समधे स्थलांतरित झाली होती.
३ पिअरे क्युरी या भौतिकशास्त्राच्या प्राध्यापकांना, मेरी तिच्या कष्टाळू आणि जिज्ञासूवृत्तीमुळे आवडू लागली. तिलाही ते आवडत असत. परस्परपूरक वैज्ञानिक काम करत राहिल्याने, पुढे त्यांच्यात प्रेम होऊन, मग त्यांचे लग्न झाले.
४ मेरीने युरेनियमची किरणे हा अवघड विषय अभ्यासाकरता निवडलेला होता.
http://www.manogat.com/diwali/2011/node/77.html या दुव्यावर मेरी क्युरीची संपूर्ण गोष्ट वाचता येईल. हाडे गोठवणार्‍या थंडीत चौथ्या मजल्यावर कोळसा वाहून नेऊन ती ऊब मिळवत असे. तोही संपला की असतील नसतील ती कापडे गुंडाळून कुडकुडत बसावे लागे. तरीही तिची शिकण्याची जिद्द उणावली नाही.
६ अनेक मूलद्रव्यांची छाननी करून मेरीने किरणोत्सारी मूलद्रव्ये वेगळी काढली होती.
७ सर्वप्रथम ज्या किरणोत्सारी मूलद्रव्याचा शोध तिने लावला त्यास तिच्या मायदेशाच्या नावावरून त्यांनी ’पोलोनियम’ हे नाव दिले.
८ हे युरेनियमचे प्रख्यात असलेले खनिज आहे. युरेनियम काढून घेतलेल्या पिचब्लेंडमध्ये अथक परिश्रमानी शोध घेऊन मेरीने पोलोनियम हुडकून काढले.
९ पुढे पोलोनियमपेक्षाही अधिक सक्रियता पिचब्लेंडमध्ये आढळून आली. तेव्हा रेडियमचा शोध लागला.
१० पोलोनियम आणि रेडियमच्या शोधाखातर मेरी क्युरी आणि तिचे पती पिअरे क्युरी यांना १९०३ सालचे नोबेल पारितोषिक, नैसर्गिक किरणोत्सर्जनाचा शोध लावणार्‍या हेन्री बेक्वेरल यांचेसोबत विभागून मिळाले होते.
११ या अपघातात पियरे यांचा मृत्यू झाला.
१२ ही क्युरी दंपत्याची मोठी मुलगी. कृत्रिम किरणोत्सर्जनाचा शोध लावल्याखातर हिला १९३५ सालचे रसायनशास्त्राचे पारितोषिक मिळाले होते.
१३ मेरीने पियरे यांच्या पश्चात किरणोत्साराचे वैद्यकीय उपयोग आणि तत्संबंधित कायदे यांचा व्यासंगी अभ्यास केला होता. तिच्या ह्या कामाची पावती म्हणून किरणोत्साराच्या अभ्यासाखातर तिला १९११ सालचे रसायनशास्त्राचे पारितोषिक मिळाले होते.
.

http://nvgole.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मराठीतून स्तोत्र..? संस्कृतात स्तोत्र. मराठीत आरती असं काहीतरी फिक्स डोक्यात आहे. म्हणजे मारूतीचा पुतळा की मूर्ती? मराठी पुतळा. संस्कृत मूर्ती Wink बरोबर काय वाट्टं सांगा बरं?

बाकी मला एक गाणं सुचलं : या चालीवर

डार्विन डार्विन काय म्हंतोस.
डार्विन डार्विन काय म्हंतोस.
डार-विन डार-विन काय म्हंतो
डा-डा डार्विन हो हो डार्विन आहा डार्विन हाSय आहा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

>

या प्रश्नाचं उत्तर निरीक्षणांती असं देता येईल की ज्या व्यक्तिरेखा काल्पनिक आहेत त्यांची मूर्ती आणि ज्या व्यक्तिरेखा प्रत्यक्षात होऊन गेल्यात त्यांचा पुतळा.

उदाहरणार्थ :- शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, इत्यादींचा पुतळा.

राम, श्रीकृष्ण, गणपती, मारूती, शंकर यांची मूर्ती.

अर्थात हे असं मी कुठे वाचलेलं नाही. अनेक वर्षांच्या निरीक्षणा नंतर काढलेलं व्यक्तिगत अनुमान आहे. चूकीचंही असू शकेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

हा बघा एक सुंदर सुवर्णजडीत पुतळा!
Sai Baba

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

ओकारांत ओळी वाचून 'डिमेलो, रिबेलो वगैरेच डोक्यात घुमायला लागले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हे बघितले आहे काय?
दुवा : झटपट स्तोत्ररचना - पहिला धडा (मोफत)

हे पहिले कडवे थोडे सुधारून
सुशुभ्रश्मश्रुधारकं सतेजबुद्धिधारकम्
सुभूप्रवासकारकं नमामि चार्ल्संडार्विनम्॥

दुसर्‍या कडव्यातील "रॉबर्ट" हा काही करून वृत्तात बसणार नाही. त्यामुळे वेगळे कडवे योजायला पाहिजे. कदाचित लडिवाळपणे त्याच्या बापाचे नाव लडिवाळपणे "बॉब" करता येईल. श्रूसबरी ऐवजी काउंटीचे नाव काय बघितले पाहिजे वगैरे...

सुतं सुसानबॉबयो: ... इ. इ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्षमस्व, हा सुलभस्तोत्रशास्त्र संदर्भग्रंथ वापरला त्याचा दुवा द्यायचा राहिला.

मार्गदर्शनाबद्दल आभार. श्रूसबरी हे गाव श्रॉपशर काऊंटीत आहे, त्यामुळे तिथेही अडचण आली. एडींबराच्या मेडीकल कॉलेजातून डार्विनने शिक्षण अर्धवट सोडलं पण केंब्रिज वृत्तात मावेना म्हणून एडींबराच ठेवलं.

श्री. गोळे, मेरी क्यूरीवर काही लिहावं असं वाटत होतं, दोनच दिवसांपूर्वी तिची जयंती झाली. पण तुम्ही ते काम केलंतच.

गवि, संस्कृत येत नाही तर मराठीत लिहा ("ब्रेड परवडत नसेल तर केक खा" या चालीवर वाचू नये.). श्लोक लिहा, स्तोत्र लिहा, आरती लिहा. पण आधुनिक जगातल्या गुरू, महान, पूजनीय व्यक्तींबद्दल, ज्यांच्या अस्तित्त्वाचे आणि कार्याचे ठोस पुरावे आहेत अशांबद्दलच लिहा असा आग्रह आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मस्त धागा.. वाचते आहे. अभिव्यक्ती किती विविध प्रकारची असू शकते ते या संकेतस्थळावर सशक्तपणे दिसते !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एका शब्दपेक्षा दोन बरे.

स्वातंत्र्याइतकं आदर्श दुसरं काय असणार? आजकालच्या काळात देश पारतंत्र्यात नाही, पण स्वातंत्र्यदेवतेची गळचेपी होताना जागोजाग दिसते. धार्मिक रूढी पाळण्यासाठी स्त्रियांच्या आचारस्वातंत्र्यावर बंधनं दिसतात. विभूतींची तथाकथित बदनामी टाळण्यासाठी विचारस्वातंत्र्य जपणाऱ्यांवर हल्ले होताना दिसतात. त्यामुळे स्वातंत्र्यदेवतेसाठीचं हे स्तोत्र आजही लागू आहे.

जयोऽस्तु ते

जयोऽस्तु ते! जयोऽस्तु ते!
श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुतां वंदे!

राष्ट्राचें चैतन्य मूर्त तूं नीती संपदांची
स्वतन्त्रते भगवती श्रीमती राज्ञी तूं त्यांची
परवशतेच्या नभांत तूंचि आकाशीं होशी
स्वतन्त्रते भगवती चांदणी चमचम-लखलखशी

गालावरच्या कुसुमीं किंवा कुसुमांच्या गालीं
स्वतन्त्रते भगवती तूंच जी विलसतसे लाली
तुं सूर्याचें तेज उदधिचें गांभीर्यहिं तूंचि
स्वतन्त्रते भगवती अन्यथा ग्रहणनष्टतेची

मोक्ष-मुक्ति हीं तुझींच रूपें तुलाच वेदांतीं
स्वतन्त्रते भगवती योगिजन परब्रह्म वदती
जें जें उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें
स्वतन्त्रते भगवती सर्व तव सहकारी होती

हे अधमरक्तरञ्जिते सुजनपूजिते श्री स्वतन्त्रते
तुजसाठि मरण तें जनन
तुजवीण जनन तें मरण
तुज सकल-चराचर-शरण चराचर-शरण

-विनायक दामोदर सावरकर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तीर्थ साहेब क्षेत्र साहेब
देव साहेब देवपूजा साहेब

माता साहेब पिता साहेब
बंधु साहेब गोविंदु साहेब

गुरू साहेब गुरू देवता साहेब
निधान साहेब निर्झर साहेब

घासू म्हणे माझा साहेब सापडला
म्हणुनी कळीकाळा पाड नाही

(हे भजन अनेक वर्षांपूर्वी 'अंतरीच्या नाना कळा' या कार्यक्रमात ऐकलं होतं - पण त्यावेळी साहेबचा संदर्भ वेगळा होता)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वरचा फोटो आणि खालची टिप वाचली नसती तर आमच्या मनातही दुसरे साहेब आले...
हे योग्य प्रकारे दुसर्‍यासाहेबासच लागु होते

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://www.maayboli.com/node/30767 वासोटा ते नागेश्वरः भाग२: दर्शन वासोटा
.
या दुव्यावरल्या प्रत्येक फोटोकरता एक यानुसार वासोटा किल्ल्यावरील पदभ्रमणावर केलेले हे काव्य
स्तोत्र म्हणता येईल का? मला माहीत नाही.
.
तरीही प्रस्तुत धाग्यावरील इथले सर्व प्रतिसाद पाहता हे जास्त उचित ठरावे!
.
नरेंद्र गोळे | 24 November, 2011 - 23:57
हे भ्रमण, त्याचे फोटो, त्याचे वर्णन सर्वच आवडले. भावले. म्हणूनच.....
.
वन्य वाट चालती, पाठी न वळून पाहती । रम्य रानवाट अन्‌, दिलेर साथी पाठीशी ॥ १ ॥
उंच डोंगरावरून दृष्टी, टाकताच खालती । सखोल, साथी राहती, तळात पाणी पाहती ॥ २ ॥
जलाशयही रम्य तो, हिरवे अरण्य भोवती । पाठीशी आडवी पडे, सह्य-रांग लांब ती ॥ ३ ॥
बलदंड मारूतीची, मूर्ती पत्थरात कोरली । सुबक शिल्प देखणे, द्वारी कमान मोडली ॥ ४ ॥
तिथेच मंदिरानजीक, वाट दूर चालली । अवशेष भग्न, भिंत परि पत्थरी उभारली ॥ ५ ॥
पाथरवटी चुन्याची चक्की, चाकही उभे दिसे । उभारले कधीतरी इथेही, काम देखणे ॥ ६ ॥
भव्य भिंत कातळी, मग वाट आडवे पुढे । पाऊले खुशाल तरीही, पाठी घालती कडे ॥ ७ ॥
उंच कातळी कड्याचे, टोकही मग ये पुढे । खालती दरी सखोल, दृश्य दिव्य देखणे ॥ ८ ॥
उंच ही उडी किती, मजेत मारली वरी । जीनत१ सहर्ष सर्वही, आस्वादती पुरी पुरी ॥ ९ ॥
पत्थरी, कमान-कळस, गर्भगार नंदीही । शिवालयी ध्वजा सुखे, खुले उन्हात प्रत्यही ॥ १० ॥
नाल वाटते जशी ही, रांग रास डोंगरी । इथेच साथी आपले, वाट चालती वरी ॥ ११ ॥
किल्ला अनुपमेय तो, वासोटा नाव लावतो । गोलसे पठार वरती, परत-वाट दावतो ॥ १२ ॥
रानकोंबडा प्रकाशचित्र, सुबक रेखते । दृष्टीक्षेप एक पाठी, टोळी सर्व टाकते ॥ १३ ॥
हिरवे असूनही पुरे, घनदाट वनही दाटले । दिवस मावळून रात्र, अंधार भीती दाखवे ॥ १४ ॥
नकाशावरील शुभ्र-बाण, वाट दावती तरी । कुठे कळे न, काय वाढले पुढ्यात ते वरी ॥ १५ ॥
.
ह्या सहलीत शरीक (सामील) झालेल्या सर्व पदभ्रमरांच्या आनंदात सहभागी होण्याचा,
मनःपूर्वक केलेला एक प्रयास! - नरेंद्र गोळे २०११११२५
.
१ “जीनत” ह्या ऊर्दू शब्दाचा मराठीतला अर्थ “शोभा”.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा आमचा आवडता देव. आधुनिक मुनीम्हणा हवं तर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0