डीजीटल प्रसिद्धी

लोक प्रसिद्धी पावतात की मिळवतात हे माहीत नाही पण प्रसिद्धीसाठी लोक कोणत्याही थराला जातात हे माहीती आहे,कारण समाजात सध्या एखादा कुत्र्याचा वाढदिवस जरी आसला कींवा एखादी कुत्री जर बाळंत झाली तरी तीच्या झालेल्या पिल्लासोबत काढलेला डीजीटल बोर्ड रस्त्याच्या कडेला पाहतो तेव्हा मात्र प्रसिद्धी यालाच म्हणतात का ?आसा प्रश्न पडतो. प्रसिद्धी साठी ग़ल्लो ग़ल्ली डीजीटल बोर्ड लावले जातात मग़ तो कुत्रा आसो की मांजर नाहीतर पांळण्यातील बाळं आसो, ज्या व्यक्तीचा कीवां प्राण्याचा डीजीटल बोर्ड लावला जातो त्या व्यक्तीकडे लोक आश्चर्यानी पाहताता आणि मनातचं म्हणतात हीच ती बोर्डावरील प्रसिद्ध व्यक्ती...आसो सामान्य व्यक्तीला प्रसिद्धीची कींमत मोलाची कधी अनुभवलेले नसते ना...पण सध्या ग़रिबातील ग़रिब व्यक्तीला प्रसिद्धीची हावा लाग़ली आहे,आहो कमी पैशात जास्त प्रसिद्ध होण्याचा एकमेव मार्ग़ आता सामान्य जनतेले सुध्दा सापडलेला आहे....मग़ प्राणितर कशाला माग़े पडतील..!

field_vote: 
0
No votes yet