गूगलं शरणं व्रज |

मूळ रचना आणि तिचे समश्लोकी भाषान्तर अधिक सौकर्याने वाचता यावे म्हणून त्यांची पुनर्रचना करून मांडीत आहे. (मुळाचे संपादन आत शक्य नाही.)

“कुत्र किं क्रीयते वस्तु कुत्र विक्रीयते च तत् । कोठे काय मिळे चीज कोठे काय विकावया?
किं मूल्यं च भवेन्मित्रं” “गूगलं शरणं व्रज” ॥ १ ॥ काय त्यास असे मूल्य “गूगलं शरणं व्रज” ॥ १ ॥
“अस्वस्थमद्यमेऽपत्यं को गदः किं च भेषजम् । अपत्याला असे रोग काय त्या देउ औषध।
कुत्रास्ति वैद्यो मे ब्रूहि” “गूगलं शरणं व्रज” ॥ २॥ कोठे वैद्य तया शोधू “गूगलं शरणं व्रज”॥ २॥
“भोजनाय क्व गच्छाम किं खाद्यं तत्र लभ्यते । भोजनासि कुठे जावे आणि काय तिथे मिळे।
किं मूल्यं च कियद्दूरं” “गूगलं शरणं व्रज” ॥ ३ ॥ किती पैसे किती दूर “गूगलं शरणं व्रज” ॥ ३ ॥
“चलचित्रालयं कुत्र तत्र किं चित्रदर्शनम् । सिनेमाला कुठे जावे काय आज तिथे असे।
तत्र दर्शनवेला का” “गूगलं शरणं व्रज” ॥ ४ ॥ ’शो’च्या वेळा तिथे कैशा “गूगलं शरणं व्रज” ॥ ४ ॥
“कुत्रास्म्यहमिदानीं भोः कियद्दूरं हि मद्गृहम् । कोणती ही असे जागा माझे गेह कुठे असे।
वर्त्मना केन गच्छामि” “गूगलं शरणं व्रज” ॥ ५ ॥ कोणत्या जाउ मार्गाने “गूगलं शरणं व्रज”॥ ५ ॥
“विश्रान्त्यै कुत्र गच्छाम तत्रासीदाम वा कथम् । सुट्टीसाठी कुठे जावे आणि खर्च तिथे किती।
तत्र पश्याम किं मित्रं” “गूगलं शरणं व्रज” ॥ ६ ॥ तिथे काय पाहावे म्या “गूगलं शरणं व्रज” ॥ ६ ॥
“कोऽर्थः पदस्य तत् वाक्ये कथं सम्यक् प्रयुज्यते । शब्दाचा अर्थ ह्या काय तो कसा ठीक वापरू।
समानार्थपदं किं स्यात्” “गूगलं शरणं व्रज” ॥ ७ ॥ समानार्थी तया काय “गूगलं शरणं व्रज” ॥ ७ ॥
“चित्राणि द्रष्टुमिच्छामि श्रोतुमिच्छामि गायनम् । चित्रप्रदर्शना कैसा जाऊ तैसाच गायना
इच्छामि पठितुं ग्रन्थं” “गूगलं शरणं व्रज” ॥ ८ ॥ कोठल्या पुस्तका वाचू “गूगलं शरणं व्रज” ॥ ८ ॥
“शालायां सहपाठी मे कुत्राद्येति कुतूहलम्” । शाळेतील सखा माझा आता कोठे बरे असे।
“देशकालततायामं गूगलं शरणं व्रज” ॥ ९ ॥ कोठल्या तो असे देशी “गूगलं शरणं व्रज” ॥ ९ ॥
“चेतुमिच्छसि किं पत्नीं पतिं जामातरं स्नुषाम् । पाहिजे का तुला भार्या पति वा सून जावई।
नवोद्योगं तदा सद्यः गूगलं शरणं व्रज” ॥ १० ॥ व्यवसाय नवा शोधू “गूगलं शरणं व्रज” ॥ १० ॥
“विमानरेलयानानां गमनागमनेषु किम्। विमान-रेलगाडीने जावयाचे असे कुठे।
विलम्बं सूच्यते मित्रं” “गूगलं शरणं व्रज” ॥ ११ ॥ लेट आहे किती त्यांना “गूगलं शरणं व्रज” ॥ ११ ॥
“कुत्र वर्षति पर्जन्यः कुत्र शैत्यं कियन्मितम् । कोठे किती असे वर्षा शीताचे अंशमान वा।
कुत्र सूर्यप्रखरता” “गूगलं शरणं व्रज” ॥ १२ ॥ उष्णता वा किती कोठे “गूगलं शरणं व्रज” ॥ १२ ॥
“नगरे मम का वार्ता मद्देशे वा महीतले । बातमी काय गावाची देशाची जगताचि वा।
क्रीडासु जनसौख्ये च” “गूगलं शरणं व्रज” ॥ १३ ॥ खेळाची कर्मणूकीची “गूगलं शरणं व्रज” ॥ १३ ॥
“तत्त्वार्थशास्त्रविज्ञानगणिताध्ययने स्पृहा” । तत्त्वार्थ शास्त्र विज्ञान गणिताची असे रुची।
“सर्वज्ञानमहाद्वारं गूगलं शरणं व्रज” ॥ १४ ॥ कवाडा सर्व ज्ञानाच्या “गूगलं शरणं व्रज” ॥ १४ ॥
“आत्मानन्दं मनःशान्तिं तृप्तिं वाञ्छसि वा यदि । आत्मानन्द मन:शान्ति तृप्ति वा यदि इच्छसी।
गूगलं संपरित्यज्य श्रीहरिं शरणं व्रज” ॥ १५ ॥ टाकुनी गूगलाला तू "श्रीहरिं शरणं व्रज” ॥ १५ ॥
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

आता सगळे भाषांतरीत असल्याने श्लोक समजले. छान रचना आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

आता कळाले. आभार. मस्त आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन