भाषिकाचे दौर्बल्य की भाषेचे स्वतःचे दौर्बल्य?

मनुष्य स्वतःशी आणि इतर जगाशी भाषेतून संवाद साधतो. या भाषांची लौकिक रुपे त्यांच्या आदर्श रुपांपासून फार दूर आहेत. भाषेचे/भाषेत (दोन्हीपैकी काय उचित आहे?) किती प्रकारचे दोष आहेत यांची यादी बनवणे अवघड आहे. मनुष्याला न गवसलेल्या विश्वातल्या कितीतरी सत्यांचं हे त्याच्यापासूनचं अंतर कदाचित फक्त भाषेमुळे निर्माण झाले असेल. भावनांचे मनात/मनाबाहेर प्रकटीकरण करणे यासाठी कदाचित भाषेची गरज नसेलच. मग ते भाषेत केले तर अतिशय अपूर्ण असेल. 'एका टेबलावर पाण्याची एक बाटली ठेवलेली' या साध्या स्थिर अवस्थेचे/बाबीचे/घटनेचे पूर्ण वर्णन करण्यासाठी कदाचित अख्खी भाषा अलिकडे (उस महाग झाल्यापासून)उसवाले उस पिळतात तितकी पिळली तरी समाधानकारक म्हणता येणार नाही. त्या स्थिर बाटलीचं, कदाचित तिच्या एका लहानश्या अंगाचं केलेलं वर्णन भाषेचा सगळा कस काढून दाखवेल, तिची सगळी स्मृती भरून टाकेल. भाषेवर अशी टिका करण्यात माझा इतर काही हेतू नाही, भविष्यात एखादी चांगली भाषा बनली तर तिला मदत व्हावी हा आहे. भाषा म्हणजे लिखित, वाचित, बोलित, ऐकित (असे शब्द नसावेत का?).

खालील पॅरा पाहा.
या सर्व चर्चेवरून आपण ज्याला विज्ञानाची प्रगती म्हणतो ती त्याची तत्त्वज्ञान विषयक (विश्वाचा किंवा भौतिक जगाचा मूलाधार स्पष्ट करणारी)प्रगती नसून उपयोजन विषयक प्रगती आहे असे वाटते. या दृष्टीने या प्रगतीकडे पहिले तर खचितच ही प्रगती अतिशय स्तुत्य आहे. परंतु भौतिक जगाकडे पाहण्याचे जे प्रमुख विज्ञान -इति भौतिकशास्त्र - तेच सध्याला तरी इतक्या उथळ पाण्यात आहे की ते कुठलेही तत्त्व प्रस्थापित करू शकत नाही. अशा विज्ञानाकडे एक कारागिरी म्हणून पाहावे, त्याचा आस्वाद घ्यावा , सन्मानही करावा. पण त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टीकोन या नावाखाली स्वतःकडे, समाजाकडे, निसर्गाकडे, विश्वाकडे पाहण्याची दृष्टी विकसित करताना विज्ञानाचे (आणि अशा इतर पोकळ शास्त्रांचे ) पोकळ तत्त्वज्ञान विचार न करता लावू नये. शास्त्राचा अभ्यास करावा, त्याचे नियम अभ्यासावेत, त्यांचा वापर जीवनमान बदलण्यासाठी करावा, हे सर्व ठीक आहे. पण विज्ञान नावाची कुणी एक international official body नसताना, उगाच विज्ञानवादाच्या नावाखाली आपल्या सुंदर आयुष्याचे मातेरे करून घेवू नये. आपले पूर्वज रानटी होते, पशू होते, आपल्या मागच्या पिढ्यांनी प्रेमाने वागायची दिलेली शिकवण (practically) मूर्खपणाची होती, आपण एक अ/प्रायोजित अशी सुंदर निर्मिती नसून एका स्फोटाचा एक random product आहोत हे कसले विचार आहेत? ज्या जीवनमूल्यांवर मानवाच्या कितीतरी पिढ्या सुखाने जगल्या त्यांना एकदम त्यागणे योग्य नाही. हे त्यागणे हळू हळू अभ्यासून पारखून व्हावे. कमित कमी असिद्ध अशा शास्त्राच्या नियमांवर विश्वास ठेवून माणसाने निसर्गावर (म्हणजे पुन्हा आपल्याच अस्तित्वावर ) उघड अपमानाजन्य भाष्य करू नये. निसर्गाने मानवाला स्वताची अशी प्रचंड तत्त्वज्ञान बुद्धी दिली आहे. चांगले जीवन जगण्याकरता ती गरजेपेक्षा जास्त आहे.

१. ही भाषा(मराठी,इंग्रजी) कितीतरी लोकांना कळतच नाही. जगात एकच भाषा असावी. तसं नाही तर सर्वांना कळणारी एक तरी भाषा असावी.
२. ही लिखित भाषा असून कोणत्याही मशिन मधे घातली तरी (म्हणजे हे पेज, त्याचे प्रिंट) त्याचे वाचित, बोलित, ऐकित व्हर्जन बनणार नाही. अशा मशिनी बनवायला विज्ञानाकडे सगळं काही उपलब्ध असून भाषा इतक्या टुकार आहेत की...
३. अक्षरे क्लिष्ट आहेत.
४. लिंग नसलेल्या गोष्टींना लिंग दिले आहे.
५. भाष्य हा द्वयाक्षरी शब्द लिहायला ८ टंकणे करावी लागली.
६. विज्ञाची प्रगती ही त्या क्षेत्रा'तील' प्रगती आहे, विज्ञानाची स्वतःची नाही, क्षेत्रातील पण चूक आहे, क्षेत्रासंबंधित म्हणावे लागेल. ह्या 'ची' साठी विभक्तीच नाही. तेच चर्चेवरूनचे. चर्चेचे भौतिक अस्तित्व आणि 'वरचा' भाग abstract असूनही...
७.र्‍ह्स्व आणि दीर्घ हे प्रकार निष्कारण तर आहेतच आणि अव्यवस्थितपण (म्हणजे एकतर बिनकामाचे नियम, तेही चूकिचे वापरावे लागतात) आहेत.
८. भौतिकशास्त्र उथळ पाण्यात असले प्रयोग आहेत. एकदम unrealistic. सौंदर्य आणि तुलनेची गल्लत झाली आहे.
९. 'हे कसले विचार आहेत?' हा प्रश्न नसायला पाहिजे होता. 'हे विचार चूकिचे आहेत' च्या जागी काहीही खपतय. वाक्यांचे प्रयोग सर्रास बदलले तर चालतात.
१०. क्रियापदाला निष्कारण लिंगे आहेत. ती इतर शब्दांनुसार बदलायला लागतात.
११. ज्या कल्पनांना शब्द असायला हवे होते ते शब्द भाषेत नाहीत. उदा. 'अ/प्रायोजित अशी सुंदर निर्मिती' ही संकल्पना हजारो वर्षे असूनही असा शब्द नाही.
१२. यात व्याकरणाच्या, शुद्धलेखनाच्या exactly एकूण किती चूका आहेत याबद्दल नेहमीच दुमत आढळेल.
१३. कोणत्या (नव्याने आढळलेल्या) शब्दाचा काय अर्थ असू शकतो असे लॉजिक लावता येते. शब्दांचे अर्थ रँडम आहेत आणि केवळ त्या भाषेचा भाषिक सांगू शकतो.
१४. शब्दाच्या प्रयोजनाची सीमा काय हे काहीच कळत नाही. उदा. निसर्गाने मानवाला स्वताची अशी प्रचंड तत्त्वज्ञान बुद्धी दिली आहे. निसर्गात काय काय समाविष्ट आहे? काय काय नाही? मानवाला? आता हा शब्द मानवांना असा नको का? सामान्य नाम कसेही वापरणार? 'अशी' ठेवल्याने आणि काढल्याने नक्की काय फरक पडतो? नसला तर कशाला आहे? दिली? कधी? हातात कि घरात खाली आणून? हे क्रियापद grossly चूक नाही का?
१५. या पॅराचं perfectly edited version बनवायला किती आय क्यू चा माणूस लागेल?
१६. कितीतरी मधे जागा आहे का? किती तरी?
१७. हे वाचताना किती जोरात (व्हॉल्यूम म्हणतोय) लिहिलय ते कळतंच नाही.
१८.पहिल्या वाक्यातलं ती त्याची हे कशाकशाला वापरलंय हे कळायला थोडं ताटकळावं लागतं.
१९. वरच्या लागतं मधला अनुस्वार दोन प्रकारे वापरला जातो. सवयीने (घासण्यानेच) ते कळतं)
२० . नैसर्गिक सगळ्या आवाजांचा स्पेक्ट्रम या भाषेत कव्हर होत नाही.
२१. 'पोकळ तत्त्वज्ञान विचार न करता लावू नये' हे कितीतरी सुरांत वाचता येते. एखादा फार जास्त वाईट वाटून घेईल. अहो भाषेने सुर नको का सांगायला?
२२. शब्दांना विभक्ती लावताना बिघडवले आहे. बरं त्याचाही एकच नियम नाही.
२३. अर्धी व्यंजने (म्हणजे हलन्त असलेली) एकाच नियमाने लिहिलेली नाहीत. वर अर्धा र दोन प्रकारे लिहिला आहे. absence of uniformity of laws म्हणजे भाषा का?
२४. कुठे समास करावा? केवढा लांब? कोणता? याला काहीच नियम नाहीत.
२५. मधल्या इंग्रजीत अक्षरांचा उच्चार आणि शब्दाचा उच्चार यांच्यात काही संबंध नाही.
२६. वापरलेल्या 'ठीक' आणि 'चांगले' यात नक्की किती फरक आहे? सीमारेषा काय?
२७ असिद्ध म्हणजे काय? सिद्ध न झालेला? सिद्ध न होणारा? सिद्ध न होऊ शकणारा? कि अर्थ नसणारा 'न सिद्ध' अशी शब्दद्व्य? यावरुन एक प्रश्न उभा राहतो - शब्दार्थ ही एक wavelength नसून एक spectrum असतो. कि उलटं? की लोक हेच ठरवण्यासाठी भांड्तात? कि अशा स्पेक्ट्रमचा बँड बदलण्यासाठी?
२८. हेच एका बाजूला फार बुळबुळित करुन लिहिलं किंवा दुसर्‍या बाजूला फार कडक करून लिहिलं तर प्रथमवाचनी वाचकाचं मत तेच राहिल?
२९. वाचकांच्या वेगवेगळ्या मूड्मधे तेच मत राहणार? भाषेनं तो फॅक्टर पण धरायला हवा.
३० लेखकाचं प्रत्येक वाक्य एक वगळं तत्त्वज्ञान आहे कि सर्व वाक्ये शेवटच्या वाक्याच्या अनुषंगाने आहेत? वाक्यांचा अर्थ त्यांच्या आजूबाजूच्या वाक्यांवर आधारित?
३१.पॅरा बोल्ड केल्याचा परिणाम होतो? चक्क वाचणार्‍याच्या मतावर म्हणतोय मी!
३२. वर 'हे सर्व ठीक आहे' म्हणताना वचन मॅच झालंय?
३३. याला मचिन लँग्वेज (उद्देश तो नाही, कोणत्याही माणसाला, जो भाषेच्या ढंगांना अपरिचित आहे त्याचा छ्ळ होऊ नये)मधे कसे रुपांतरित करता येईल?
३४. म्हणे स्थानिकांना बोली भाषांची अनेक व्हेरिएशंस लगेच/सहज कळतात. कशामुळे? म्हणजे काही नियम तोडले जात असताना असे कोणते दुसरे नियम पाळले जात आहेत ज्याने समोरच्याला अर्थबोध होतो? ते नियम काय आहेत?
३५. हे बाईने लिहिले आहे कि बाबाने हे कसे कळणार? जिथे लिंग हवे तिथे नाही.
३६. समानार्थी शब्द कशाला? त्यांच्यात काहीतरी फरक हवा ना?
३७. एकाच शब्दाचे अनेक अर्थ कशाला. शब्द बनवण्यासाठी अक्षरांची कितीतरी, खरेतर अनंत combinations उपलब्ध आहेत.
३८. प्रत्येक शब्दाचा प्रत्येक वाचकासाठी, प्रयोग करणारासाठी वेगळा अर्थ? ही भाषा कि भांडण लावणारी चेटकिण?
३९. प्रत्येकाच्या आवाजाचं/हस्ताक्षराचं/इ signature, मग अगदी खोकला लागल्या थोडं वेगळं होणारं, भाषेत असावं.
४०. काळानुसार भाषा अशी बदलू नये की पूर्वीच्या लेखकांना काय अभिप्रेत होतं ते पुढच्या लोकांना कळूच नये.

तुम्ही असा कोणताही उतारा घ्या. तो शांतपणे वाचा. अशा गोष्टी निदर्शनास आणा (भविष्यातील भाषेकडून अपेक्षा, आताच्या भाषांच्या उणिवा). ही गंमतदार गोष्ट असेल.

अजून एक, अशा भाषांमूळे कदाचित आपला मेंदू illogically configured तर नाही झाला असावा? आपल्याला नक्की काय काय आणि कीती किती non-normal आहे हे कधी जाणवतच नाही.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
field_vote: 
1.5
Your rating: None Average: 1.5 (2 votes)

प्रतिक्रिया

आणखी एक उदाहरण घेऊन काही टिप्पण्यांची माझ्याकडून उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.

उदाहरणाकरिता या लेखाचाच पहिला परिच्छेद घेतो :

मनुष्य स्वतःशी आणि इतर जगाशी भाषेतून संवाद साधतो. या भाषांची लौकिक रुपे त्यांच्या आदर्श रुपांपासून फार दूर आहेत. भाषेचे/भाषेत (दोन्हीपैकी काय उचित आहे?) किती प्रकारचे दोष आहेत यांची यादी बनवणे अवघड आहे. मनुष्याला न गवसलेल्या विश्वातल्या कितीतरी सत्यांचं हे त्याच्यापासूनचं अंतर कदाचित फक्त भाषेमुळे निर्माण झाले असेल. भावनांचे मनात/मनाबाहेर प्रकटीकरण करणे यासाठी कदाचित भाषेची गरज नसेलच. मग ते भाषेत केले तर अतिशय अपूर्ण असेल. 'एका टेबलावर पाण्याची एक बाटली ठेवलेली' या साध्या स्थिर अवस्थेचे/बाबीचे/घटनेचे पूर्ण वर्णन करण्यासाठी कदाचित अख्खी भाषा अलिकडे (उस महाग झाल्यापासून)उसवाले उस पिळतात तितकी पिळली तरी समाधानकारक म्हणता येणार नाही. त्या स्थिर बाटलीचं, कदाचित तिच्या एका लहानश्या अंगाचं केलेलं वर्णन भाषेचा सगळा कस काढून दाखवेल, तिची सगळी स्मृती भरून टाकेल. भाषेवर अशी टिका करण्यात माझा इतर काही हेतू नाही, भविष्यात एखादी चांगली भाषा बनली तर तिला मदत व्हावी हा आहे. भाषा म्हणजे लिखित, वाचित, बोलित, ऐकित (असे शब्द नसावेत का?).

> १. ही भाषा(मराठी,इंग्रजी) कितीतरी लोकांना कळतच नाही. जगात एकच भाषा असावी.
> तसं नाही तर सर्वांना कळणारी एक तरी भाषा असावी.
वरील परिच्छेद मराठीभाषकांनाही फक्त मोघमपणे कळेल. त्याचे प्रमुख कारण की "टेबलावर बाटली" हे उदाहरण भाषेचे लंगडेपण कसे दाखवते, तेच कळत नाही. जगात एकच भाषा असावी किंवा एकतरी जोडभाषा असावी, ही कल्पना रंजक, स्तुत्यही असेल. पण प्रस्तावनेशी संबंध काय आहे?

> २. ही लिखित भाषा असून कोणत्याही मशिन मधे घातली तरी (म्हणजे हे पेज,
> त्याचे प्रिंट) त्याचे वाचित, बोलित, ऐकित व्हर्जन बनणार नाही. अशा मशिनी
> बनवायला विज्ञानाकडे सगळं काही उपलब्ध असून भाषा इतक्या टुकार आहेत की...
नाही बनणार? समजले नाही. वरील परिच्छेदाचे यंत्रावरील "वाचित" रूपच माझ्यापुढे आहे.

> ३. अक्षरे क्लिष्ट आहेत.
कशाच्या तुलनेने क्लिष्ट आहेत? उदाहरणार्थ "क्लिष्ट" हा शब्द द्विमान/युनिकोड पद्धतीत "100100010101 100101001101 100100111111 100100110111 100101001101 100100011111" असा लिहिता येईल. यातील अक्षरे म्हटल्यास सोपी आहेत - गोळा आणि उभी रेघ, आणि वाटल्यास मोकळी जागा. परंतु अक्षरे सोपी असली, तरी अक्षरांच्या माळेचा अर्थ लावणे कठिण आहे.

> ४. लिंग नसलेल्या गोष्टींना लिंग दिले आहे.
भाषेतील "लिंग" आणि जीवशास्त्रातील "लिंग" यांच्यात गफलत होते आहे. भाषेतील चिन्हांचा आणि व्यवहारातील "खर्‍या" वस्तूंचा "अर्थ"संबंध नैसर्गिक नाही. रूढीने ठरवलेला आहे.

> ५. भाष्य हा द्वयाक्षरी शब्द लिहायला ८ टंकणे करावी लागली.
इन्स्क्रिप्ट वापरा. कमी टंकनांत काम भागेल.

वगैरे. वगैरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद.

धाग्याचे काही उद्देश, जे स्पष्टपणे लिहिणे ड्रॉप झाले होते ते पुन्हा लिहितो.
१. माणसाच्या सध्याला ज्या भाषा आहेत त्यांच्यामध्य बर्‍याच उणिवा आहेत. या भाषा कदाचित मानवी प्रगतीच्या आड येत असाव्यात. मानवाला आपल्या भाषांशी भावनिक attachment आहे म्हणून तो त्या जपत आहे. आपण जी गोष्ट जपत आहोत शेवटी तीत उणिवा असाव्यात? कितपत त्या मानवाने खांद्यावर घेऊन जाव्यात? माणसांची भाषाविषयक भांडणे कदाचित मिटतील.
२. यात बर्‍याच आशय विषयक सुचना आहेत.
३. बर्‍याच प्रॅक्टिकल, advanced, scientific अपेक्षा आहेत.
४. कोणतीही, टिका वा अपेक्षा कोणत्याही एका विशिष्ट भाषेवर नाही.

@बाटलीचे उदाहरण - बाटलीच्या वर्णनात पाणी, काच, टेबल, बाटलीतील जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इतर शास्त्रे, इ तसेच पाण्याचे, इ चे वाणिज्य, अर्थशास्त्र, इ. कवि लोकांना वगैरे पण बरेच काही सुचेल. या बाटलीचे परिपूर्ण वर्णन भाषेची दमछाक करेल असं मला म्हणायचं आहे. ब्रह्मांडामधे इतकं नाविन्य भरलं आहे आणि आपला भाषांच्या गोठडीत फार कमी गॅजेट्स आहेत म्हणून आपण जगाचे नीटसे वर्णनही करू शकत नाही, पुरेपुर आनंद घेणे दुर राहिले असा सूर आहे.
@ १.भाषा सर्वांना न येणे ही तिची उणिव असं लिहिलं आहे. ती न येणार्‍याची (की आणणाराची) पण उणीव असू शकते. पण जगात सर्वांना येणारी भाषाच नसली तर सामान्य माणसाचा दोष काय? सर्वाना यावी इतकं तिचं अपिल असलं पाहिजे अशी अपेक्षा केली पाहिजे. 'सर्वभाषा' कोणतीही भाषा बनत नाहिय हा आरोप.
@ २. भाषा तिच्या सर्व स्वरुपांत सहजरित्या रुपांतरित झाली पाहिजे ही अपेक्षा. (एक उदा. माझा विशिष्ट एक फॉन्ट असावा, तो मशिन मधे घातला की माझ्या आवाजात ऑडिओ फाईल तयार व्हावी, इ)
@ ३. एकूण उच्चाराचा साईझ आणि लेखनाचा साईझ यात तफावत आहे. क्लिष्टता नसती तर वय झालेले लोक आरामात कोणतीही लिपी लिहू शकले असते.
@ ४. स्त्री, पुरुष, नपु. असे सध्याला मराठीत प्रकार आहेत. ज्या गोष्टींचा आणि लिंगाचा संबंध नाही, उदा. 'खूर्ची' ही कोणत्याही प्रकारे स्त्री नाही. भाषाभाषांत अशा शब्दांचे लिंग बदलते (उदा, भारत, भारतमाता, इंडिया), एकाच भाषेत एकाच गोष्टीला असलेल्या दोन शब्दांचे लिंग वेगळे, अजून खीर चांगली आणि तिला धरून जेवण चांगले, इ. अशा बिनलिंगी गोष्टींचं सॉलिड क्न्फ्यूजन माजवलं आहे.
@ inscript मधे अशुद्ध, भाषाबाह्य शब्द लिहिता येत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

inscript मधे अशुद्ध, भाषाबाह्य शब्द लिहिता येत नाहीत.

हुे, कुो, टुि, लुॅ वगैरे अक्षरे गमभन वापरून लिहिता येतात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा धागा कशासाठी सुरू झाला आहे हे मलातरी समजलेले नाही. धागाकर्त्याने २-४ ओळीत त्याच्या हेतूचा सारांश मांडला तर आम्हा वाचकांकडून त्याला कसे प्रतिसाद अपेक्षित आहेत ते कळेल आणि मग काही लिहिताहि येईल.

अन्यथा कोणी एका अध्यात्मवाद्याने विज्ञान कसे सर्व उत्तरे देण्यास असमर्थ आहे हा - पूर्वी अनेकदा चघळून झालेला - विषय शब्दबंबाळ पद्धतीने आणि अशुद्ध आणि ढिल्या भाषेत लिहिला आहे इतके लगेच कळते. पण धागाकर्त्याला हे म्हणावयाचे नसून त्याचा रोख दुसर्‍या कशाकडे तरी असे वाटते. ते अधिक स्पष्टपणे पुढे आणावे अशी सूचना करतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सामान्यतः मराठी, हिन्दी, इंग्रजी (इथल्या जास्तीत जास्त लोकांना येणार्‍या) भाषांमधील कोणतेही लिखाण उद्धृत करून भाषेतील उणिवा काढणे हा हेतू आहे. इथे भाषा हे सांस्कृतिक परिचिन्ह नव्हे तर एक संवादातील एक तांत्रिक बाब म्हणून 'गृहित धरायचे आहे'/'आहे'.

उदा.
अन्यथा कोणी एका अध्यात्मवाद्याने विज्ञान कसे सर्व उत्तरे देण्यास असमर्थ आहे हा - पूर्वी अनेकदा चघळून झालेला - विषय शब्दबंबाळ पद्धतीने आणि अशुद्ध आणि ढिल्या भाषेत लिहिला आहे इतके लगेच कळते. पण धागाकर्त्याला हे म्हणावयाचे नसून त्याचा रोख दुसर्‍या कशाकडे तरी असे वाटते. ते अधिक स्पष्टपणे पुढे आणावे अशी सूचना करतो.

१. लेखक अध्यात्मवादी आहे/असावा.
२. अध्यात्मवादी असणे किंचित गैर असते.
३. विज्ञान असमर्थ आहे असे पॅराचा लेखक म्हणत आहे.
४. चर्चेचे विषय जुने नसावेत
५. पॅरात तोच आशय पुन्हा पुन्हा मांडलेला आहे.
६. घट्ट भाषा नावाचा काहीतरी प्रकार असतो. तो चांगला असतो.
७. धाग्याचा रोख पूर्णतः कुणीकडे आहे ते कळत नाही.
८. धाग्यात उद्धृत केलेला पॅराच धाग्याचा विषय आहे असे म्हणायला भरपूर/काही वाव आहे.
९. कमित कमी धाग्याचा विषय वाचकास धड कळावा इतकीही क्षमता धागालेखकाची नाही.

आपल्या प्रतिसादावरुन मला वरील गोष्टी आपल्याला म्हणायच्या आहेत असे वाटले/ वाटू शकते. असे आपल्याला खरोखरच म्हणावयाचे असले तर ठीक, पण नसले तर दोष कुणाचा? आपण लिहिलेला पॅरा, लेखकाचा धाग्यातील पॅरा, आपण , मी आणि आपण दोघांनी वापरलेल्या भाषा यामधील 'भाषा हा प्रकार' (म्हणजे तिची रचना, डिझाईन, इ) यास (to noise in communication) कितपत कारणीभूत आहे हा धाग्याचा विषय आहे.

भाषेतील अशा उणिवा दाखवण्यासाठी आपण कोणत्याही स्वरुपातील भाषा (audio, video) चे उदाहरण देऊ शकता जिथे फॉल्ट अधिकतः attribute करता येऊ शकतो. अजूनही शंका असेल तर सांगा, मी सुधारणा करेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मुद्दा साधारण लक्षात येतो आहे. अनुभूतीचा आवाका आणि ती वर्णन करून दुसऱ्याला जशीच्या तशी समजावून सांगण्याची भाषेची क्षमता यात तफावत आहे. याची (काही महत्त्वाची) कारणं म्हणजे

1. भाषेचं मूलभूत एकक असलेले शब्दच हे अपुरे आहेत.
2. त्यात विशिष्ट शब्दांनी निर्माण होणाऱ्या प्रतिमा या प्रत्येकासाठी भिन्न असतात.
3. बोलताना निदान स्वरांवरून काही गोष्टी कळतात, लिखित वाक्यांमध्ये ते येत नाही म्हणून त्यांचे अनेक अर्थ होऊ शकतात, ज्यामुळे वाचणाऱ्याला भिन्न अर्थ लागू शकतात.

या त्रुटी अर्थातच मान्य आहेत. फक्त माझा प्रश्न असा आहे की अशा त्रुटी नसलेली भाषा तयार व्हावी ही अपेक्षा योग्य आहे का? भाषेचा उद्देश दुसऱ्याकडे संकल्पना पोचवणं हा असतो. त्यासाठी तिला दोन गोष्टी आवश्यक असतात

1. अचूकपणा - एखाद्या अनुभवाचे शक्य तितके अचूक वर्णन करता यायला हवं. अचूकतेमुळे संवादात एकमेकांचा गोंधळ होण्याची शक्यता कमी होते.
2. शब्दमर्यादा - कमीतकमी शब्दांत वर्णन केल्याने अधिक संवाद होऊ शकतो. कमीतकमी शब्दांमुळे भाषा शिकायला व वापरायला सोपी होऊ शकते.

कुठच्या बाजूला झुकायचं? हा ऑप्टिमायझेशनचा प्रश्न सर्वत्रच आहे. (गरजा अमर्याद आहेत, संसाधनं मर्यादित आहेत.) माझ्या मते परिणामकारक भाषा म्हणजे या दोहोंचा सुवर्णमध्य काढते ती. अनंत शब्द तयार करून अचूकता वाढवता येईल कदाचित. पण मग ती भाषा इतकी क्लिष्ट असेल की ती शिकायला त्रास पडेल. उदाहरणार्थ - उंच, मध्यम उंचीचा, बुटका असे आपण सर्वसाधारण तीन विभाग करतो. पण अचूक उंची सांगण्याची अपेक्षा योग्य आहे का? कदाचित 180सेटिमीटरुंच, 179सेंटिमीटरुंच.... असे शंभरेक शब्द केले तर अचूकता वाढेल. पण त्यासाठी भाषेच्या सोपेपणाचा बळी द्यावा लागेल.

(हा चर्चेसाठी उत्तम विषय आहे. इतरांचे विचारही वाचायला आवडतील)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मजा आ गया. मला धाग्यात कोणता विषय लिहायचा होता त्याच दिशेनं आपला प्रतिसाद १००% आहे!
आता
१. भाषेची एकके शब्द नसून अक्षरे, चिन्हे, इ असावित.
२. शब्दाच्या प्रतिमा - मी वर शब्द हा तरंगलांबी, तरंगक्षेत्र यापैकी काय आहे असा प्रश्न विचारला आहे. आपण तीळ हा शब्द घेऊ. त्याने लोकांना खायचे तीळ, अलिबाबाचे तीळ आणि अंगावरचे तीळ आठवतील. आपण तीळांग म्हणजे अंगावरचे तीळ असा काल्पनिक शब्द लक्षात घेऊ. तीळांग म्हणजे काय काय असू शकते (शरीरावरचे कायम डाग?), काय काय असतेच (तीळाचे गुणधर्म), काय काय नसतेच (खरचटलेले, इ) असे तीन सेट विचारात घेतले तो निश्चितपणे व्याख्यित करता येईल. एक शब्द हा एक सेट, त्यांची युनिअन किंवा छेदन किंवा असेच काही समीकरण ही संकल्पना उत्तम काम करू शकेल.
शब्दांनी स्वतःच्या प्रतिमा 'समानच' होऊ द्याव्यात अशी अपेक्षा नाही, पण जी भिन्नता ते दर्शवतात त्यांच्या सीमा सुनिश्चित असाव्यात.
३. शब्दांचा 'अचूकपणा' आणि भाषेतील 'शब्दसंख्या' यांचे व्यस्त प्रमाण असावे, हे आपले खूप सुंदर निरीक्षण आहे. पण खरेच असे आहे का? अगदी अचूक असं काही सांगायचं असतं का? मग ज्याला करायचं होतं त्याला अनंत शब्द वापरावे लागले का? कि लोक शेवटी frustate होऊन अर्धवट प्रकटीकरण करतात? मला असं वाटतं की आपल्याला अभिप्रेत असलेला अचूकपणा प्रत्येकाला ठाऊक आहे. गणितात जसा conversing circular reference किती degree of error चालेल हे सांगून थांबवता येतो तसाच शब्दाची संख्या अर्थ आणि अचूकता सांगून सिमित ठेवता येऊ शकते.
४. १८०सेमी, १७९सेमी या उदाहरणाबद्दल - भाषेचे प्रयोजन 'सगळ्या धड्याचा अर्थ' एका शब्दात सांगणे हा नाही. तसेच चूक शून्य करून अनंत शब्द निर्माण करणे हाही नाही.

समजा अशी भाषा अस्तित्वात आली तर - न्याय लवकर, योग्य मिळेल काय/ त्याचे प्रमाण वाढेल काय? माध्यमांकडून होणारी फसवेगिरी कमी होईल? भांडणे कमी होतील?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

संवादाकरिता अचूकपणा (कलम १) आणि आटोपा (कलम २) यांच्यात इष्टतम (ऑप्टिमल) तोल साधायचा आहे, हे योग्य विश्लेषण आहे.

ज्या सार्वत्रिकीकरणाने चर्चाप्रस्ताव मांडला आहे, त्या प्रकारे चर्चा होऊ शकणार नाही.

किती का चिन्हे वापरा, आणि ती एका ओळीने जोडा : बोलताना एकापाठोपाठ एक उच्चार करा, लिहिताना एकापाठोपाठ एक चिन्हे ठेवा. सर्व चिन्हांची संख्या जास्तीत जास्त "काउंटेब्ली इन्फिनिट" (सर्व पूर्णांकांची संख्या) इतकीच असेल. आणि वर्णन करणार्‍या वस्तूंची संख्या (त्यांचे सर्व गुण हे व्यवच्छेदक - डिस्टिंग्विशेबल - मानल्यास*) अन्काउंटेब्ली इन्फिनिट (सर्व रियल नंबर ची संख्या, किंवा त्याहून अधिक अशी सर्व भौमितिक आकृत्यांची संख्या) आहे.

*सर्व गुण व्यवच्छेदक मानण्याचा मुद्दा चर्चाप्रस्तावकाचा आहे :
> बाटलीच्या वर्णनात पाणी, काच, टेबल, बाटलीतील जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र,
> इतर शास्त्रे, इ तसेच पाण्याचे, इ चे वाणिज्य, अर्थशास्त्र, इ. कवि लोकांना वगैरे पण बरेच
> काही सुचेल. या बाटलीचे परिपूर्ण वर्णन भाषेची दमछाक करेल असं मला म्हणायचं आहे.
> ब्रह्मांडामधे इतकं नाविन्य भरलं आहे...

काउंटेब्ली इन्फिनिट चिन्हांचा अन्काउंटेब्ली इन्फिनिट वस्तूंशी परस्परसंबंध लावणे शक्य नाही. आणि चिन्हांची संख्या दुप्पट केली किंवा हजारपट केली तरी चिन्हसंख्या/वस्तुसंख्या हा भागाकार ~=० इतकाच राहील. त्यामुळे ऑप्टिमायझेशनकरिता एक कलम बदलतच नाही.

तस्मात् पहिले कलम "सर्व गुणांना व्यवच्छेदक करणारा अचूकपणा" असा नाहीच आहे.

संवाद साधताना वक्त्याकडून जर श्रोत्याने काही कृती करावी अशी अपेक्षा असेल, तर श्रोता किती वेळेला अपेक्षेप्रमाणे कृती करते? साधारण असा काही अचूकपणा "कलम १" म्हणून अपेक्षित आहे. बाटली, पणी, काच टेबल यांच्याबाबत वक्ता-श्रोता यांच्या परिस्थितीच्या संदर्भानुसार जीवशास्त्र/भौतिकशास्त्र/काव्य... वगैरे अर्थ सीमित होत असतील, तर विशेष चिन्हे वापरून अर्थमर्यादा घालण्याचे भाषेचे प्रयोजन नाही.

भाषण/लेखन अति-आटोपशीरपणामुळे फार संदिग्ध असले, तर वक्त्याची अपेक्षा काही असेल, श्रोता भलतीच कृती करेल. मात्र वक्त्याचे पाल्हाळ खूप लांबले, तर कृती करायची वेळ निघून जाईल, पण संवाद संपणार नाही. किती वेळा भलती कृती केली तर नुकसान सुसह्य मानू? किती वेळा लांबड केल्यामुळे कृतीस विलंब सुसह्य मानू? या दोन कलमांचे ऑप्टिमायझेशन करणे शक्य आहे.

परंतु हल्लीच्या भाषेमध्ये असे ऑप्टिमायझेशन नाही आहे का? हा आरोप करणार्‍यावरती आधार दाखवण्याची जबाबदारी आहे (बर्डन ऑफ प्रूफ).

भाषा ही प्रवाही आहे. आपली आदली पिढी बोलत होती, त्यापेक्षा वेगळे शब्दप्रयोग आपण वापरतो - आपल्या सोयीनुसार. आपल्या आदल्या पिढीचे काही शब्द आपल्या वापराकरिता केवळ अडगळ होते, ते आपण टाकून दिले, ते शब्द "विरळा" नाहीत! आपल्या सामान्य वापरातल्या काही वस्तूंची वर्णने जुन्या भाषेत फाजिल लांबलचक असती, त्यांच्याकरिता आपण नवीन शब्द आत्मसात केले आहेत, ते "संगणका"वर आपण आजच वाचत आहोत.

त्यामुळे भाषा तंतोतंत इष्टतम नसेलही, पण इष्टतमाच्या बर्‍यापैकी जवळपास असेल, असा माझा कयास आहे. हा प्राथमिक विचार करूनच मी पुन्हा म्हणतो - जबाबदारी भाषेबाबत इनिष्टतमतेची तक्रार करणार्‍याची आहे. आणि इन्फिनिट संख्या वादात न घेतल्या तरच चर्चा शक्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काउंटेब्ली इन्फिनिट आणि अन्काउंटेब्ली इन्फिनिट हा मुद्दा अतिशय आवडला. म्हणजे तत्त्वतः सर्वसमावेशकपणे अचूक भाषा तयार करणं अशक्य आहे. तेव्हा संकल्पनांचं शब्दांशी मॅपिंग करताना किमान काहीतरी बिन्स (स्टॅटिस्टिक्समधल्या अर्थाने बिन्स किंवा बकेट्स बादल्या) तयार कराव्या लागतील. 0.5 ते 1.5 मधल्या सर्व रिअल नंबरना 1 या बादलीत टाकायचं, 1.5 ते 2.5 मधल्या सर्व रिअल नंबरना 2 या बादलीत टाकायचं वगैरे वगैरे.

परंतु हल्लीच्या भाषेमध्ये असे ऑप्टिमायझेशन नाही आहे का? हा आरोप करणार्‍यावरती आधार दाखवण्याची जबाबदारी आहे (बर्डन ऑफ प्रूफ).

हेही मान्य. लेखकाला नक्की काय अपेक्षित आहे हे दाखवण्यासाठी केवळ 'या उताऱ्यात खालील त्रुटी आहेत' असं म्हणण्यापेक्षा 'उतारा 1 पहा आणि उतारा 2 पहा. अर्थप्रवाहीपणात उतारा 2 निश्चितच चांगला आहे. किंवा भाषेत अमुकअमुक बदल केल्यास उतारा 3 तयार होईल, जो अधिक चांगला आहे' या स्वरूपाचा युक्तिवाद द्यायला हवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. मांडायच्या आशयाचा अचूकपणा आणि शब्दसंख्या यांची इष्टतमता ही एक भाषेची मोठी उणिव आहे/असावी पण तीच एक उणिव आहे/असावी असे इथे कोणासही म्हणायचे नसावे. इतरही उणिवा पुढे आणाव्यात ही विनंती.
२. लेखी भाषेपेक्षा मौखिक भाषा सर्वसमावेशक आहे. उदा. ठोकलेली बोंब लिहिता येणार नाही पण लिहिलेली बोंब तशाला तशी वाचता येईल. मग वर उल्लेखलेले उच्चार देखिल uncountably infinite निघावेत, म्हणजे मौखिक भाषेची एकके पण न मोजण्याइतकी, सॉरी, न मोजण्यासारखी, निघतात. यातही एक उपविषय आहे, घ्र्द्च्व्ब्स्न्द्ल्फ,च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च चा उच्चार करता येत नाही. ही सरावाची बाब आहे कि आपल्या वाचाप्रणालीच्या संरचनेची?
३. अवांतर - सर्व भौमितिक आकृत्यांची 'संख्या' असेल तर ती सर्व रियल नंबरच्या संख्येपेक्षा अधिक कशी?
४. गणनीय, मर्यादित चिन्हांनी अगणनीय, अमर्यादित प्रकाराचे/गोष्टीचे(एकवचनी शब्द) 'स्वीकार्य चूकिच्या खाली चूक ठेऊन' म्हणा किंवा 'त्रुटीमर्यादेच्या आत' वर्णन करणे भाषेकडून अपेक्षित आहे. इथे अगदी चीनी आणि जपानी भाषांपेक्षा कमी (मराठी इतकी माना) आणि कमी क्लिष्ट चिन्हे अपेक्षित आहेत.
५. भाषेचे गणितीकरण अभिप्रेत नाही. अशी नवी भाषा 'जास्त कष्टाने' शिकावी लागू नये, सहज यावी. नवी भाषा म्हणताच जो मानसिक अडथळा उभा राहतो तो मुळीच नसावा. ही (केवळ)शास्त्रीय नसून सामान्य भाषा अपेक्षित आहे.
६. उच्चारित किंवा श्रुत भाषा यांत्रिकी तरंगाने प्रकट (represent) करता येते. मला श आणि ष, रु आणि ऋ, कवि आणि कवी, अ: आणि अह, कॅ आणि क्या मधला फरक ऐकू येत नाही. प्रश्न असा आहे कि 'पूर्णभिन्न' असे एकूण श्रवणीय/ उच्चारणीय 'सुर' पडताळले जावेत. ळ द. भारतीय भाषांबाहेर, मराठीबाहेर ऐकला नाही. असे किती इतर भाषांतले स्वर मी ऐकलेच नसतील? accent वेगळा असतो तेव्हा तो स्वरच वेगळा असतो कि अजून काही? Well, all the syllables should be mapped on the mechanical wave spectrum with zero overlap. किंवा असंच काही. सुर असे ठरावेत, सरावाने ते उपयोगात येतील. हे झाले सुर किती आणि कसे असावेत याबद्दल. (पण हे लेमॅन चे मत आहे...)
७. कोणत्याही नव्या संकल्पनेची व्याख्या (शब्दार्थ नव्हे) अगोदरच्या किमान तीन पूर्वव्याख्यित शब्दांच्या उपयोगाशिवाय करता येत नाही. संगणकाच्या object oriented language चा उपयोग करून, सेट थिअरी वापरुन सामान्य नामे ठरवता येतील. सर्व वादांचं मूळ स्त्री नसून विशेषणे आणि क्रियाविशेषणे आहेत, त्यांच्यासाठी अजून खूप अभ्यास लागेल. पण सारे 'शब्दांचे प्रकार' पुनर्रचित करता येतील. शिवाय हे आठ प्रकात आणि त्यांचे उपप्रकार ही स्किमही इष्टतम नाही.
८. वाक्यांचे प्रकार, शब्दांची sequence, चिन्हे इ पण इष्टतमतेपासून फार दूर आहेत.

परंतु हल्लीच्या भाषेमध्ये असे ऑप्टिमायझेशन नाही आहे का? हा आरोप करणार्‍यावरती आधार दाखवण्याची जबाबदारी आहे (बर्डन ऑफ प्रूफ).

संवाद साधताना वक्त्याकडून जर श्रोत्याने काही कृती करावी अशी अपेक्षा असेल, तर श्रोता किती वेळेला अपेक्षेप्रमाणे कृती करतो? हे मी उदाहरण म्हणून वाक्य घेईल.
१. संवाद करणे आणि संवाद साधणे यात फरक काय? नसेल तर redundancy का दिली आहे?
२. वक्ता, श्रोता हे पुरुष असतात/असावेत असं काहिसं तुम्हाला म्हणायचं आहे का?
३. वक्ता, श्रोता आणि संवाद हे शब्द 'भाषेतून सिग्नल पाठवणारा' , 'असे सिग्नल स्वीकारणारा' आणि असे 'सिग्नल' यांसाठी most representative आहेत काय?
४. समजा मी म्हणालो, "बोलणार्‍याला ऐकणार्‍याने ऐकल्या(ने)मुळे एखादे काम करावे वाटले तर कितीदा हे काम अचूक होईल?". असे आपले विधान मी किती प्रकारे मांडू शकतो? हजारो प्रकारे. याला मर्यादा असावी असे माझे मत आहे.
५. redundancy काढणे आणि अचूकता घालणे प्रत्येक भाषेसाठी गरजेचे आहे. हे याकरिता कि आपणांस अभिप्रेत नसलेले (आता हे मीच कसे सांगणार?) पण किती तरी अर्थ यांतून काढता येतात. हा अतिरेक आहे पण ...
उदा. "बोलायच्या वेळी , ऐकणारा कितीवेळा अपेक्षेप्रमाणे बोलणार्‍याचे काम ऐकतो?". लक्षात घ्या आपल्याला अभिप्रेत असलेला 'अपेक्षेप्रमाणे' मधला 'अचूकपणा'चा भावार्थ मी काढूनच टाकलाय आणि करतो कि नाही असा अर्थ दिला आहे. पुढे जाऊन तुम्ही कोणतातरी आकडा विचारताय (कितीवेळा) असंही मी म्हणू शकतो. आपल्याला नक्कीच हे अभिप्रेत नव्हतं.
६.आपल्याला जे अभिप्रेत आहे ते आपण मांडताहात , तसाच मी अर्थ काढत आहे, भाषेने इतके अड्थळे आणले तरी! एका विशिष्ट लेवलला हे अडथळे संवाद पोखरु लागतात आणि विसंवाद चालू होतो. त्याची परिणिती अनेक 'भाषाविषयक नसलेल्या' समस्यांमधे होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

> मांडायच्या आशयाचा अचूकपणा आणि शब्दसंख्या यांची इष्टतमता
> ही एक भाषेची मोठी उणिव आहे/असावी पण तीच एक उणिव
> आहे/असावी असे इथे कोणासही म्हणायचे नसावे.
उणीव नाही. संवादाचे माध्यम म्हणून ध्येय अथवा हेतू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अवांतर - सर्व भौमितिक आकृत्यांची 'संख्या' असेल तर ती सर्व रियल नंबरच्या संख्येपेक्षा अधिक कशी?

प्रत्येक रियल नंबरसाठी त्या बाजूचा समभुज त्रिकोण, चौरस, पंचकोन.... अशा अनंत आकृती काढता येतात.

असे किती इतर भाषांतले स्वर मी ऐकलेच नसतील?

हे घडतं त्याला कारण म्हणजे लहानपणी जेव्हा आपण भाषा शिकतो, तेव्हा आपल्या भाषेतले स्वर/ध्वनि डोक्यात घट्ट होत जातात. कानांवर पडलेले इतर ध्वनि जवळात जवळच्या माहित असलेल्या ध्वनिरूपात 'ऐकू' येतात. ही भाषांची त्रुटी नसून सर्वसामान्य मेंदूच्या भाषा शिकण्याच्या प्रक्रियेची आहे.

'स्वीकार्य चूकिच्या खाली चूक ठेऊन' म्हणा किंवा 'त्रुटीमर्यादेच्या आत' वर्णन करणे भाषेकडून अपेक्षित आहे.

भाषांमध्ये तसं होताना दिसत नाही असं तुमचं म्हणणं आहे का? उंच, मध्यम आणि बुटका या शब्दांच्या मधल्या छटांसाठी 'अगदी खूप उंच म्हणावा असा नाही, पण चांगली उंची आहे' 'अगदी खूप बुटका नाही, पण जरा उंची कमीच' असे शब्दप्रयोग वापरता येतात. आता उंचीच्या बाबतीत पाच छटांपेक्षा जास्त गरज सहसा पडत नाही. तीन बहुतेक वेळा पुरेशा होतात. म्हणजे बहुतेक वापरांसाठी हे शब्दप्रयोग त्रुटीमर्यादेच्या आतच आहेत. अचूकता वाढवताना या सोपेपणाचा बळी दिला जाणार नाही याची काही व्यवस्था कशी करणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह मूळ मराठी भाषेतला उतारा आहे की भाषांतरीत? कारण-

या सर्व चर्चेवरून आपण ज्याला विज्ञानाची प्रगती म्हणतो ती
तर खचितच ही प्रगती अतिशय स्तुत्य आहे.
भौतिक जगाकडे पाहण्याचे जे प्रमुख विज्ञान -इति भौतिकशास्त्र -

ही सर्व उदाहरणे हा उतारा शब्दशः भाषांतरीत आहे हे पटवून देण्यास पुरेशी आहेत. त्यामुळे आपण भाषांतर सोपे कसे झाले असते हे पाहूयात. भाषांतरातही तुम्ही मांडलेला भाषेचा मुद्दा वैध असल्याने ते पाहायला हरकत नसावी.
तत्त्वज्ञान विषयक = तात्विक
उपयोजन म्हणजे Application . याला पर्यायी शब्द तुम्हाला माहीत आहे काय? उपयोजन म्हणजे अधिक बाळबोध भाषेत म्हणायचे झाले तर ’उपयोगावर आधारीत’. आपल्याला Application कळते पण उपयोजन कळत नाही कारण Application हा शब्द आपल्या सरावाचा आहे. उपयोजन हा शब्द तितक्या सरावाचा नाही. भाषा जितकी सरावाची होते तितकी ती कमी क्लिष्ट वाटते. सरावाची करुन घेणे हा तुमच्या प्रयत्नांचा, वाचनाचा, जाणून घेण्याचा भाग आहे. सरावाशिवाय, गरजेशिवाय कोणतीही भाषा सोपी नसते. उपयोजन हा शब्द मला ठाऊक आहे, कदाचित तुम्हाला माहीत असेल पण सर्वसाधारण माणसाला कसा माहीत असेल? हा झाला तुमचा प्रश्न. तर मी म्हणेन की सायफर हा शब्द क्रिप्टोग्राफी(गुप्त लिपी शास्त्र)विषयी थोडेबहुत वाचलेल्याला माहीत असतो . त्यामुळे त्याचे गुप्त लिपी हे मराठीकरण तो समजू शकतो. पेण्टींगविष्यी थोडेबहुत कळणार्‍याला abstract म्हणजे अमूर्त हे समजू शकते. त्यामुळे 'थोडेबहुत' समजण्याकरिता 'थोडेबहुत' जाणणे तर नक्कीच गरजेचे आहे. भाषा 'आहे'. तिच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न आपाल्याला करायचे आहेत. फार-फार तर एखाद्या क्लिष्ट शब्दाचा दुवा देता येईल. याउपर काय केले पाहिजे असे तुम्ही म्हणता?

राहता राहिला प्रश्न वरच्या उतार्‍याचा तर हा न कळ्णारा परिच्छेद अतिशय सरळ-साध्या भाषेत मांडता येईल. लेखकाच्या किंवा भाषांतरकाराच्या मर्यादांचे खापर भाषेच्या प्रवाही आणि सुगम असण्यावर कधीही फ़ुटू नये.

कारण ते मशिन आहे. ते त्यातील प्रोग्राम्स (कार्यप्रणाली)नुसार भाषांतर करणार. म्हणूनच Machine Translation आणि Human Translation मध्ये फरक आहे.

कोणत्या भाषेशी तुलना करता?

भाषांतरकाराला किंवा लेखकाला व्याकरण शिकण्याची गरज आहे.

बराहामध्ये चार वेळ कळ दाबून लिहीता येतो. शिफ्ट बी शिफ्ट ए शिफ्ट एस वाय
तात्पर्य-कीबोर्ड अभ्यासणे आणि सराव करणे

शब्दश: भाषांतर करण्याने किंवा इंग्रजीत विचार करुन मराठीत लिहील्याने असे होऊ शकते. in shallow waters चे शब्दश: भाषांतर आहे ते.

(या उतारयाबद्दल म्हणायचे झाले तर)कुठल्या शब्दांचे अर्थ रँडम आहेत?

आणि बाकी सर्वच प्रश्नांना एकच प्रश्न

तुमचा आक्षेप नक्की कशाला आहे? या उतारयात बक्खळ चुका आहेत हे आपण मान्यच करुयात आणि त्या आहेतच. त्यामुळे या उतारयावरुन सर्व भाषेबद्दल तक्रारीचा सूर लावण्याचे काही कारणच नाही.

आय. क्यूचा प्रश्नच नाही. पुरेसे वाचन असलेली, मराठी भाषेतील शब्दसंपदा गाठीशी असलेली कोणतीही व्यक्ती करु शकेल.
मी लेखक आणि भाषांतरकार आहे.
मी ते नेहमीच करते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Escoge un amante que te mire como si quizás fueras magia!

@ गौण माहिती - हा उतारा अनुवादित नाही. हा मीच २-३ वर्षाखाली लिहिला आहे. मी लेखक किंवा साहित्यिक नाही. कार्यालयीन कामामुळे भाषेवर इतर भाषांचा प्रभाव असू शकतो. या धाग्यात कोणत्याही गोष्टीवर लौकिकार्थाने टिका नाही. कशावरही टिका करण्याचा उद्देश नाही. चूकून झाली असेल तर ती माझी/इ चूक.

@ उद्देश - संवादातील एक तांत्रिक बाब मानून भाषा (कि भाषेला?) सुधारणे. त्याकरिता तिच्यातील उणिवा अभ्यासणे. आता मी तुम्ही वापरलेली वाक्ये घेऊन भाषेच्या एक -दोन उणिवा काढायचा प्रयत्न करेन. लक्षात घ्या एक सामान्य मराठी जाणणारा म्हणून माझी तुमच्या चूका काढायची पात्रता नाही. या बाबी/चूका मराठीच्या रचनेच्या भाग आहेत. मला मराठी येते आणि इथले लेखन मराठी आहे म्हणून सार्‍या टिपण्या तिच्यावर आहेत, पण कोणत्याही भाषाविशिष्टावर टिका/तुलना अपेक्षित नाही.

१. ह मूळ मराठी भाषेतला उतारा आहे की भाषांतरीत? मूळ मराठी भाषा? नीट अर्थ ध्वनीत करण्यासाठी आपणांस एकून किती कॉमे आणि सिंगल कोट्स वापरावे लागतील? 'धागाकर्त्याने उदाहरणासाठी दिलेल्या उतार्‍याला' आपण 'मूळ' हा शब्द का वापरला असावा? तिथे मूळ पुढे 'मराठी' शब्द जास्तीचा नाही का, धाग्यातला कोणता उतारा सांगताना?
२. सरळ-साध्या ; सरळ, साध्या मधे काय फरक आहे? हा फरक, असला तर, प्रत्येकाला कळलाय का?
३. कारण ते मशिन आहे. (तसे भाषा पण एक मशिनच आहे, स्वरुप वेगळे आहे, असो) ते? कि ती मशिन? असो. अगदी कळीचा मुद्दा आपण मांडलात. मशिन जी कर्व्ह काढते ती माणसापेक्षा (सॉरी, माणसाने काढलेल्या ...) कितीतरी पट चांगला काढते. भाषांतर मात्र बेकार. भाषेत प्रॉब्लेम आहे तरी काय?
४. प्रवाही भाषा म्हणजे काय? प्रवाही शब्द सर्वात योग्य आहे काय? या प्रवाहाचे काय गुणधर्म आहेत? शेवटी आपण किती शब्द आणि किती 'फ्रेजेस' वापरत आहोत हे आपल्याला तरी माहित आहे का?
५. आता चूकांबद्द्ल - जर दोन वेगळ्या (डॉन लोकांनी) व्यक्तिंनी या परिच्छेदातील 'केवळ' व्याकरण आणि शुद्धलेखनाच्या चूका काढून तिसर्‍या माणसा़ला दिल्या तर ती दोन लेखन तंतोतंत जुळतील का? नसतील तर असे 'ऑप्शनल' नियम भाषेत नसलेले बरे नाही का?

आपण आपल्या प्रतिसादात मांडलेले सर्वच तात्विक मुद्दे मान्य आहेत. ते धाग्याचा विषय नाहीत म्हणून मी काही बोलत नाही. पण एका तात्विक बाबीवर मत द्यायची इच्छा आहे.
लेखकाच्या किंवा भाषांतरकाराच्या मर्यादांचे खापर भाषेच्या प्रवाही आणि सुगम असण्यावर कधीही फ़ुटू नये. अनेकांना गणित येत नाही. यात न येणाराचा (ज्यास येत नाही त्याचा), शिक्षकाचा आणि खुद्द गणिताचा दोष कसा कसा वाटता येईल? सर्वांनाच, ज्यांना गणित येते, त्यांना साख्यिकीतील सर्व पद्धती (eg, factor analysis) येत नाहीत. इथे १००% चं तुम्ही पुन्हा कसंकसं विभाजन कराल? ज्यांना आपण भाषाबुद्धू म्हणत आहात त्यांनी आपला basic sense of logic जास्त compromise केला नाही असं मी त्यांच्या बाजूनं म्हणालो तर?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

चर्चा प्रस्तावकाला काय म्हणायचे आहे ते अजूनही नीट कळलेले नाही.
अधिकात अधिक अचूक किंवा सर्वांगीण वर्णन करावे (शंकेस मुळीसुद्धा वाव राहू नये) अशी लेखकाची अपेक्षा दिसते. आणि तसे वर्णन करता यावे म्हणून शक्य तितके जास्त शब्द भाषेत यावेत असा युक्तिवाद वाटतो आहे. (त्याचे विवेचन घासकडवी आणि धनंजय करीत आहेत).

माझा प्रश्न असा आहे की संवादात किती डिटेल्स असावेत हे परिस्थितीनुरूप बदलते. तेव्हा प्रत्येकाने प्रत्येक वेळी संपूर्ण माहिती द्यायची आवश्यकता नसते.

उदा. एका बसने एका कारला धडक दिली या घटनेचे वर्तमान पत्रातले वर्णन मुंबईकडून गोव्याकडे जाणार्‍या खाजगी आराम बसने महाडजवळ मध्यरात्री एका होंडा कारला धडक दिली. असे असले तर पुरेसे आहे.

याच घटनेचा रिपोर्ट पोलीसात देणारा साक्षीदार इसम अधिक माहिती सांगेल असे अपेक्षित आहे. त्यात मुंबईकडून गोव्याकडे जाणार्‍या लाल रंगाच्या ** ट्रॅव्हल्सच्या एमएच ०८ **** क्रमांकाच्या बसने महाडपासून मुंबईच्या दिशेने सुमारे १२ किमी अंतरावर अमुक हॉटेलसमोर होंडा कारला धडक दिली असे सांगणे अपेक्षित आहे.

याही इसमाने ती बस टाटा कंपनीची मार्कोपोलो मॉडेलची डिझेलवर चालणारी एअर सस्पेन्शन असलेली होती ही माहिती देणे अपेक्षित नाही. (बाटलीचे उदाहरण - बाटलीच्या वर्णनात पाणी, काच, टेबल, बाटलीतील जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इतर शास्त्रे, इ तसेच पाण्याचे, इ चे वाणिज्य, अर्थशास्त्र,)

प्रत्येक वेळी परिपूर्ण वर्णन देण्याची आवश्यकता काय ते कळत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मराठीत उदाहरण लिहिण्यात मी तज्ञ नाही, पण प्रयत्न करून पाहतो.

एक क्ष माणूस आहे. एक य माणूस आहे. क्षला यकडे सामान पाठवायचे आहे. वाहन,रस्ता वापरुन सामान पाठवावे लागते.
क्ष म्हणजे संदेश पाठवणारा, लिहिणाराचे/बोलणाराचे डोके(मेंदू)/तोंड्/हात, इ. य म्हणजे वाचणार्‍याचे डोके/कान्/डोळे इ. सामान म्हणजे संदेश. वाहन, रस्ता , इ म्हणजे भाषा. (संदेशाचे खरे भौतिक स्वरुप काय हा प्रश्न अजून सुटायचा आहे पण ते काही का असेना भाषेतला संदेश भाषेच्याच माध्यमातून पाठवला जातो. पण आपण हे वेगळे करून उदाहरणात पाहत आहोत. आपण फक्त संदेशाच्या 'भाषिक' रुपाबद्दल बोलणार आहोत.)

भाषेच्या उणिवा म्हणताक्षणी 'हे वाहन नीट चालवता न येणे', 'तो रस्ता नीट माहित नसणे', 'सामानाच्या गमनागमनातील इतर अनेक कामाच्या व्यवहार्य गोष्टींची जाण कमी असणे',इ असे चित्र उभे राहते. हे म्हणजे माणसाला भाषा न येणे. हा या धाग्याचा विषय ०% सुद्धा नाही.

विषय आहे सामान अ ते ब जागी जाईपर्यंत (क्ष आणि य च्या नैसर्गिक रचना विषयक बाबी सोडून) वाहन व रस्ता यातील दोष काढणे, त्रुटी काढणे, सुधारणा सुचवणे, इ. Suggestions on ideal concept, design, structure, use of language.

१. वास्तव असे आहे कि (काल्पनिक) वाहक, वाहन आणि रस्ता मूळचे सामान सोडून वेगळेच सामान तांत्रिकदृष्ट्या पोचते करतात. उदा. एका बसने एका कारला धडक दिली इतर कोणताही आगाउचा शब्द न वापरता याचे काय काय अर्थ होतात/होऊ शकतात्/झालेले नाहीतच असे म्हणता येत नाही, पाहा -
अ. धडक बुद्ध्या दिली. अन्यथा धडक झाली असे लिहायला पाहिजे होते.
आ. धडकेतील वाहनांचे गुणोत्तर सहसा १:१ पेक्षा वेगळे असते,म्हणून 'एक' 'एक' असे 'खास' लिहिले आहे.
इ. निर्जीव वस्तू, जसे बस, धडका देतात.
ई. धडक नावाची एक physical object एक वस्तू दुसर्‍या वस्तूला 'देऊ (हस्तांतरण)' शकते. अन्यथा 'धडकली' असे लिहिले असते.
फ. या धडकेत कारचा momentum शून्य असावा. जे काहि केलं तर ते बसनं , कारनं नाही...
आता कोणताही अर्थ आपण कोणी काढणार नाही, कारण आपल्याला माहित आहे असं काही नसतं म्हणून. पण जेव्हा माणसांतील, समाजांतील, काही वर्तुळांतील संवाद जेव्हा क्लिष्ट विषयावर, उच्च प्रतलात होतात तेव्हा भाषेची friction अर्धी उर्जा खाते. संवाद लांबतच नाहीत तर प्रभावहिनही होतात.

पहिला प्रश्न आहे कि ही आपणांस समस्या वाटते कि नाही? जर हो तर पुढे चर्चेला अर्थ आहे.

२. सध्याच्या भाषांच्या उणिवांचे प्रकार
मी आतापर्यंत दिलेल्या प्रतिसांदात आणि मूळ धाग्यात अशा उणिवांची लिस्ट करायचा प्रयत्न केला आहे. साधी उदाहरणे आहेत. खुर्चिला लिंग नसते तर तिला उगाच स्त्रीलिंगी बनवू नये. म्हणजे बिनलिंगी पदार्थांना 'अलिंगी' नावाचा वेगळा लिंगप्रकार असावा. फ्रेंच शिकताना हटकून मराठी आणि फ्रेंच लिंगे वेगळी निघणार - तिही ज्या गोष्टींना लिंगच नाही त्याबद्दल! तसेच चार वेगवेगळ्या लिंगांच्या गोष्टींचा एकत्र उल्लेख करताना सरासरी लिंग (?)काढलेले असते. असे प्रकार सुधारित भाषेत नसावेत. ऊदाहरणातील कारच्या दोन लाईट न् चालणे, रस्त्यात चार सिग्नल आणि पाच खड्डे असणे, सामानासाठी जास्त गाड्या लागणे, सामान हवेत उडून जाणे, सामानावर दुसरेच सामान चुकिने ठेवले जाणे, इ.

३. सुधारित भाषेची डीझाईन
भाषेत किती स्वर, व्यंजने, सुर असावेत. त्यांच्या संख्येचा आणि 'तिथे असण्याचा' निकष काय? वेगळा उच्चार म्हणजे काय? Mechanical wave spectrum आणि त्यांचा संबंध ठेवता येईल का? कसा? शब्दाचे किती प्रकार आणि उपप्रकार असावेत? वाक्यांचे प्रकार? त्यातील शब्दांची सिक्वेंस? चिन्हे? इ इ . म्हणजे उदाहरणातील कारची डिझाईन, तिची अधिकतम गती, गिअर्स, चाके, इंधनाचा प्रकार, रस्ता किती मोठा आहे, किती लेन्स आहेत, जास्तीत जास्त गती काय, स्टॉप्स किती असावेत, इ.

४. आशयचा अचूकपणा आणि भाषेतील शब्दांची संख्या- नवी भाषेतील शब्द एक एक रचत गेले तर आणि शब्दार्थाचा अचूकपणा '१००%' हवा असेल तर कशी अडचण येईल असे अत्यंत मार्मिक निरीक्षण राजेशजींनी त्यांच्या एका प्रतिसादात केले आहे. हा प्रश्न ३ चा एक छोटा उपभाग आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

चर्चा रोचक चालु आहे. या विषयाचा अभ्यास नाही. तस्मात मतही नाही.

मात्र एक निरिक्षण नोंदवतो:
ही चर्चा भाषा म्हणजे जी माणूस बोलु/लिहू शकतो त्यातच सिमीत ठेवली आहे. शब्दांच्या पलिकडल्या भाषेविषयी काहीच उहापोह नाही. संवाद साधला जाताना केवाळ शब्दच नाहित तर समोरच्याचे हावभाव, बोलण्याची ढब, एखाद्या(च) शब्दावर दिलेला जोर, कायिक हालचाली, नेत्रपल्लवी, वातावरण, कंटेक्स्ट वगैरेंच्या संस्कारानंतर शब्दरुपाने किंवा शब्दरूप न घेताही प्रकटते

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

परत एकदा "किती डिटेल्स द्यायचे ते परिस्थितीनुरूप ठरते" याचा पुनरुच्चार.

धडक दिली असे म्हटल्यावर ग्रहण करणारा धडक झाली असे समजतो कारण धडक मारली असण्याची शक्यता दशलक्षापैकी एकाहून कमी वेळा असते हे सांगणारा आणि ऐकणारा दोघाना ठाऊक+मान्य असते.

धडक दिली म्हणजे धडक नावाची वस्तू बस नावाच्या व्यक्तीने कार नावाच्या व्यक्तीला दिली नाही हे ही सांगणारा आणि ऐकणारा या दोघांना ठाऊक असते.

बहुतांश बाबतीत हे अर्थग्रहण खूप मोठ्या कालखंडातही बदलत नाही. महाभारत/मेघदूत/माझा प्रवास यातील बहुतांश वर्णने फारसे डिटेल स्पष्टीकरण न करता समजतात. बहुतांश शब्द आणि त्यांच्या अर्थछटा स्थिर राहतात.

सबब प्रत्येक वेळी सर्वांगीण परिपूर्ण वर्णन करायची आवश्यकता नाही. [विज्ञान तंत्रज्ञानाचे वर्णन करणार्‍या पुस्तकांचे, प्रबंधांचे लेखन करणार्‍या लेखकांना अशी भाषेची अडचण जाणवत असावी आणि त्यासाठी ते नवनवीन शब्द तयार करत असतातच. [बाइट्स, ऑपरेटिंग सिस्टिम, सप्लाय चेन, बेंचमार्किंग वगैरे शब्द त्या त्या क्षेत्रातल्या लोकांनी निर्माण केले आहेतच].

>>पहिला प्रश्न आहे कि ही आपणांस समस्या वाटते कि नाही? जर हो तर पुढे चर्चेला अर्थ आहे.

परिपूर्ण वर्णन करता येत नाही ही समस्या मर्यादित क्षेत्रांत लागू आहे. त्यासाठी पूर्ण भाषेचा ढाचा बदलण्याची गरज वाटत नाही. थोडक्यात 'समस्या वाटत नाही'. समस्या मला समजली आहे त्यापेक्षा वेगळी आहे असे म्हणणे असेल तर अजून चर्चा करता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

>>आपल्याला जे अभिप्रेत आहे ते आपण मांडताहात , तसाच मी अर्थ काढत आहे, भाषेने इतके अड्थळे आणले तरी! एका विशिष्ट लेवलला हे अडथळे संवाद पोखरु लागतात आणि विसंवाद चालू होतो. त्याची परिणिती अनेक 'भाषाविषयक नसलेल्या' समस्यांमधे होते.

अत्यंत रोचक. पण विसंवादाची समस्या सोडवणं हा लेखकाचे उद्देश्य आहे काय?

कारण उत्तम डिझाईन केलेली भाषा जाणिवपुर्वक विसंवाद निर्माण करण्यासाठी आवश्यक ते सहाय्य करण्यास पात्र असावीच लागेल, नाही काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अर्थातच. अभिप्रेत आहे तेच सांगणं आणि नाही ते मुळीच न सांगणं, मग ते चांगलं असो कि वाईट असा अश्या नव्या भाषेचा एक उद्देश असावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

एक उपमान - सात रंगांऐवजी त्यांच्या संयोगाचे १६० लाख रंग वेगवेगळ्या नावाने/चिन्हाने ओळखता यावेत असे आपले म्हणणे आहे असे वाटते, तसे झाल्यास सांगणार्‍यास व बोलणार्‍यास नक्की रंग कोणता हे गैरसमजाशिवाय कळू शकेल?

>>अभिप्रेत आहे तेच सांगणं आणि नाही ते मुळीच न सांगणं, मग ते चांगलं असो कि वाईट असा अश्या नव्या भाषेचा एक उद्देश असावा.

अभिप्रेत आहे तेच पोहचवणं आणि सांगणं हे दोन वेगळे मुद्दे नाहीत काय? पोहचवण्यात फीडबॅक अंतर्भुत आहे तर सांगण्यात फक्त एकतर्फी कृती आहे. विसंवाद साधणंच उद्देश असल्यास भाषेच्या उत्तम संरचनेचा उपयोग ऐकणार्‍याला/वाचणार्‍याला कसा होणार?

काही अंशी जपानी/चिनी कांजी लिपी (वाचिक अनुभव) तुम्हाला अभिप्रेत भाषेप्रमाणे आहे काय? त्यातील काही चिन्हांचा एक आणि फक्त एकच अर्थ निघतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@ सर्व - कोणा एकास प्रतिसाद देताना इतर सर्व लिखाण दिसत नाही म्हणून 'मूळ प्रतिसाद' असे स्वरुप adopt करत आहे.
@ नितिनजी, आपल्याला समस्या पूर्णतः समजली आहे. पण तिचे गांभीर्य समोर आणावयास मी आतापर्यंत असमर्थ समोर ठरलो आहे. ते करण्याचा मी इथून पुढे प्रयत्न करेन.
@ ऋषिकेश - कोणतीही नवरचना करताना 'स्कोप' सुनिश्चित करावा लागतो ही सुचना शिरोधार्त ! इथे अभिप्रेत असलेली भाषा बोलित, ऐकित, लिखित, वाचित, ध्वनी/चिन्ह सुचित (एका विशिष्ट मर्यादेपर्यंत, जी अजून अभ्यासायची आहे) आणि रुपांतरित होतानाची म्हणा इतकीच अभिप्रेत आहे. भाषा हा शब्द फार लूजली वापरला जातो. अधाशाप्रमाणे खाणार्‍या माणसाची हालचाल सांगण्याकरिता कोणी 'भूकेची भाषा' असा शब्द वापरेल. ही भाषा अभिप्रेत नाही. नेत्रपल्लवी, वातावरण, अंगविक्षेप बाहेर, बाकी आत. पण आवाजांचे स्ट्रेस, व्हॉल्युम, त्यात आणलेला आवेश, लिखाणाचा रंग, फाँट, आकार, इ अभिप्रेत आहे. स्कोप डिफिनिशन बद्दल सध्याला इतकं माझ्याकडून पुरेसं आहे.
@ नितिनजी - या विषयाच्या आवश्यकतेची ही शेवटची प्रूफ नाही. पण या दिशेने मधेमधे लिहित जाईन. आता मी विभक्तींबद्दल बोलतो. आपले (आपणा सर्वांचे (इतके कंस मला वापरायला लागतात तरी तुम्ही...)) सुप्रसिद्ध वाक्य घेऊ. एका बसने एका कारला धडक दिली. इंग्रजीमधे A bus hit/collided/crashed/ dashed/rammed into a car असे होइल. इथे कार पुढे 'ला' कुठे आहे? तुम्ही म्हणाल कि कोलाइड म्हणजे 'धडकणे' नाही, 'ला धडकणे'. मान्य. बस आणि बसने एकच? तुम्ही म्हणाल कि ते 'बस कारला धडकली' आहे, 'बसने ...दिली' नाही. मान्य. इंग्रजीत 'बसने ...दिली' कसे लिहितात. दोहोंत फरक काय? या 'ने' ची गरज आहे का? माझे व्याकरण चूक/कच्चे असू शकेल, पण मला शंका आहे की असली ने वाली, किंवा कोणतीतरी एक वाक्यरचनाच इंग्रजीत नाही. जर असे असेलच तर तर ही तृतिया विभक्ती मराठीचे सौंदर्य आहे कि ओझे? कसे ठरवणार?

@ सर्व - वाचकांस असा साहजिक प्रश्न पडलेला असेल कि उपरोल्लेखित 'एका बसने एका कारला धडक दिली' हे मला, चर्चाप्रस्तावकाला कसे लिहिणे अपेक्षित आहे जेणेकरून फूलप्रूफ अर्थ निघेल. समजा 'बस कारला धडकली' असे लिहिले तरी याचा तांत्रिकदृष्ट्या एकच अर्थ निघतो का? अभिप्रेत नसलेले अर्थ निघतच नाहित असे आहे का? याचं उत्तर नाही असं आहे. जर असे नवे वाक्य मराठीतच लिहायचे आहे, त्याच नियमांनी लिहायचे आहे तर हे चक्क चक्क भाषिकाच्या चूका काढणं झालं. हा तर आपला उद्देश नाही. सबब इथे कुठली अक्षरे/शब्द/वाक्ये/चिन्हे/रचना वापरायची हे ठरवून नवे वाक्य लिहायला लागेल. आता तुम्हाला हे थोडे टू मच वाटेल पण जी भाषा तयारच नाही तिच्यातले वाक्य मी आत्ताच कसे लिहू? सध्याला हे वाक्य मी ! @ # %. असे लिहिन.

या धाग्यात आपल्याला काही डिझाइन इ अपेक्षित नाही, पण काही salient features आपण नक्कीच सांगू शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>समजा 'बस कारला धडकली' असे लिहिले तरी याचा तांत्रिकदृष्ट्या एकच अर्थ निघतो का? अभिप्रेत नसलेले अर्थ निघतच नाहित असे आहे का? याचं उत्तर नाही असं आहे.

तांत्रिकदृष्ट्या काय अर्थ निघतो हे पुन्हा हेतूवर अवलंबून आहे. म्हणजे वोल्वो बस धडकली असे म्हटले तर लेलॅण्ड/ टाटा कंपनीच्या विक्रेत्याला आनंद होईल. त्याच्या दृष्टीने ती बस वोल्वो होती ही महत्त्वाची आवश्यक माहिती असेल. कारण त्याच्या ग्राहकांना वोल्वोबस सुरक्षित नसल्याचे पटवण्यासाठी हे उदाहरण वापरील. पण वर्तमानपत्राच्या बातमीच्या दृष्टीने ती बस वोल्वो होती की आणखी काही होती हे आवश्यक नाही. (बातमीदाराचा पेपरातली जागा भरण्याचा हेतु असेल तर तो ही माहिती लिहीलही). इतकेच कशाला? एखाद्या राजस्थानातील वर्तमानपत्रात "मुंबई गोवा मार्गावर बस आणि कारचा अपघात" एवढीच माहिती पुरेशी असेल. राजस्थानातल्या वाचकाला "महाडजवळ" अपघात झाल्याच्या माहितीने काही अतिरिक्त ज्ञान होत नाही कारण महाड कुठे आहे हे त्याला ठाउकच नसते. त्याने आपल्याला फरक पडतो कारण "म्हणजे घाट नव्हता-साधा रस्ता होता तरी अपघात झाला" वगैरे संदर्भ आपल्याला लक्षात येतात. म्हणून प्रत्येक वेळी परिपूर्णच वर्णन करायला हवे हे काही पटत नाही बुवा.

मी यांनी सात रंगांच्या वेगवेगळ्या मिश्रणांना १६० लाख नावे देण्याबद्दल जे म्हटले आहे ते पटते आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

भाषेवरचा एक पुराणा ज्योक.

प्र. - भाषेत एकाच अर्थाचे अनेक शब्द का असतात?
उ. - कारण मूर्ख लोक भाषेचा वापर करतात. ते वेगवेगळे शब्द एकाच अर्थाचे आहेत असे समजतात.

प्र. - भाषेत एकाच शब्दाचे अनेक अर्थ का असतात?
उ. - कारण चतुर लोक भाषेचा वापर करतात. ते एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरल्याचा दावा करतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

१. अधिकतर वाचकांना मी केवळ अधिक अचूकतेची आणि मग अनिवार्यपणे येणार्‍या शब्दांच्या महापूराची अपेक्षा भाषेकडून करत आहे असे वाटत आहे. 'मी यांनी' (मी नव्हे) ७ रंग आणि १६ दशलक्ष रंग असे उदाहरण दिले आहे. तसे मूळ रंग दोन (प्रकाश असणे आणि प्रकाश नसणे, किंवा पाढरा आणि काळा), मग थोडा जास्त विचार केला तर ते तीन (आर जी बी , इ) , मग सात, मग अजून जास्त, असे करत १६० लाख. मानवासाठी ४००*१०^१२ प्रतिसेकंद ते ८०० *१०^१२ प्रतिसेकंद इतक्या संख्यने आणि ३०,००० कि मी प्रतिसेकंद गतीने जाणारी electromagnetic प्रारणे. समजा यातला ४०० ते ४५० हा बँड लाल रंगाचा आहे. ४०० ते ४५० मधे अनंत संख्या आहेत. समजा त्यातला ४२० ते ४२१.१ हा बँड रक्ताच्या रंगाचा आहे. या दोन संख्यामधेही अनंत संख्या आहेत. सो ऑन. म्हणून वास्तविक सगळे रंग अनंत आहेत. ते मोजताच येत नाही. शिवाय पारदर्शिता, रंगहिनता नावाचे प्रकार आहेत. (पातळ, गडद रंग यातच कव्हर झाले असावेत.) जणू इतकं कमी होतं म्हणून या इवल्याशा व्हिजिबल बँड बाहेर यापेक्षा कितीतरी प्रकारचा अंधार आहे.

सामान्य मत असे आहे की व्यवहारासाठी ७ ही संख्या कमी आहे, १६० लाख फारच जास्त आहे, अनंत अव्यवहार्य आहे. जेव्हा आपण १६० लाख रंग म्हणतो तेव्हा माणसाचा डोळा/ किंवा त्याने बनवलेली मशिन संख्यारेषेवर ४००*१०^१२ ते ८००*१०^१२ या बिंदुंच्या दरम्यान १६० लाख बिंदु बहुधा समांतराने ठेवणार. ते त्यांना स्पष्टपणे ओळखू येणार. सामान्य जीवनात या रंगांचे भिन्नत्व संबोधण्याची, उल्लेखण्याची गरज पडत नाही. म्हणून इतकी नविन नावे नकोत. हिच भाषा जेव्हा रंगविज्ञान वापरेल तेव्हा 'वेगळे नाव देणे' आणि 'इतर पद्धत वापरणे' यात काय बरे आहे ते जोखून पाहिल. उद्या भारत सरकारने पृथ्वीतलावरच्या प्रत्येक अणूच्या गळ्यात जी पी एस टॅग बांधला (असं होत नसतं) तर मी प्रत्येक अणूला नाव द्यायचं सुचवत नाही आहे. मानवाने काय काय किती किती मोजलं आहे, त्याला नवं नाव देण्याचा प्रस्ताव नाही.

मला रंगांचं ज्ञान नाही म्हणून मी ठोकळयाचं उदाहरण घेतो. त्याचेही मला ज्ञान नाही पण उदाहरण गोड मानून घ्या.
२. उद्या जर तुम्ही पिंपरीच्या एखाद्या वर्कशॉप मधे गेलात आणि एक ठोकळा मागीतला तर तिथला कामगार तुम्हाला एक स्क्रॅपमधला ठोकळा देईल. तुम्ही म्हणाल किती झाले? तो म्हणेल अरे घेऊन जा, अशा गोष्टीचे कुठे पैसे असतात का?
तुम्ही जर दुसर्‍या दिवशी स्टीलचा, १०० सेमी. उंच, १० सेमी त्रिज्येचा, सिलिंड्रिकल ठोकळा मागाल तर तो एक दिवसांनी १०० रुत देईल.
पुन्हा तुम्ही जर असाच ठोकळा १०० सेमी+- १ मायक्रॉन, १० सेमी +- १ मायक्रॉन मागीतला तर तिथला इंजिनिअर १०००० रु आणि आठवडा लावेल.
पण तुम्ही जर १०० सेमी +- .००१ मायक्रॉन, १० सेमी +- .००१ मायक्रॉन, आणि cylindricity चे ८-१० गुणधर्म (असेच कड्क) मागीतले तर तिथला मालक तुम्हाला सॉलिड पुणेरी पाटी दाखवेल. भारताच्या जीडीपीचा कडक चेक घेऊन जाल तरीही सगळे दरवाजा दाखवतील. तितक्या स्टीलचं वजन एरवी ५० रु च्या आत असेल.
इथे स्तर बनवून त्यांना नाव दिले जाऊ शकते. सध्याच्या भाषांमधे वस्तू कधी स्तर क्रॉस करत आहे ते कळत नाही. एकवाक्यीय बातमीत बसने कारला नकळत स्पर्शापासून ते आण्विक अपघटनपर्यंत (चक्काचूरला मिरची लावून असं लिहिलं आहे) काहीही केलेले असू शकते. अपघात सदरातील ही बातमी नाही असे क्षणभर समजले तर ती कशीकशी वाचली जाईल? लोक जेव्हा मधेच एका संभाषणात भाग घेतात तेव्हा तिथून पुढे त्यांना जे कळतं ते नहेमी अचूक असतं का?

३. मग माझा काय प्रस्ताव आहे असा आपला इथे प्रश्न असणार. जसे सारे कायदे एका घटनेपासून स्रवले आहेत, तसे सारे शब्द, (इथून पुढे भाषिक संकल्पना, कारण हे केवळ शब्दांबद्दल नाही.) एका संकल्पनेपासून स्रवले नाहीत. म्हणून सुरुवात कुठून करणार हा क्लिष्ट प्रश्न आहे. सध्याला भाषेत प्रत्येक शब्दाचं अपना राज आहे. आपण समानार्थी आणि विरोधार्थी म्हणतो ते काही व्हॅल्यू अडिशन करतात का हा मोलाचा प्रश्न आहे.
अ. रॉजेटने इंग्रजीतल्या सगळ्या शब्दांचं मानवी संकल्पनांनुसार १००० भागांत अतिशय स्तुत्य विभाजन केलं आहे. त्यात सुधारणा करून किंवा स्वतंत्रपणे मानवी संकल्पनाचे विभाजन करावे (१००० आकडा जरुरी नाही).
आ. त्यांचे नात्यांचे जाळे बनवावे. समान शब्द, विरोधी शब्द, पितृ शब्द, कन्या शब्द, मित्र शब्द, आजोबा शब्द, इ इ करत.
इ. एक सर्व्हे करावा. शब्दांचे सगळीकड्चे वापर आणि त्यांचा आशय पाहावा. जिथे शब्दघनता कमी वाटते तिथे वाढवावी, सो ऑन.

ई. शब्दसीमा ठरवाव्यात. जसे, धडक/धडकणे म्हणजे काय काय असू शकते, काय काय नसतेच, काय काय असतेच. सेट थिअरी वापरावी.
फ. व्याख्या कराव्यात. यात शेवटी circular refence येईल. त्याकरिता एकक शब्द, आवश्यक असलेल्या अचूकतेच्या गरजेनुसार खोल जाउन ठरवावेत.
ग. नविन आशयाचे शब्द , नविन संकल्पना कशी समाविष्ट करायची त्याचे नियम बनवावेत.
४. या केवळ आशय विषयक प्राथमिक सुचना आहेत. इतर अनेक सुधारणा इतरत्र सुचवल्या आहेत. अशी फिचर्स आताच्या कोणत्याच भाषेत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

शेवटचा प्रतिसाद वाचून काय करायचे ते कळले. भाषा आहेत त्यापेक्षा अधिक स्पेसिफिक (अनंत स्पेसिफिक नसल्या तरी चालेल असे अरुण जोशी यांचे मत दिसते).

किती स्पेसिफिक करायला हवे हा ऑप्टिमायझेशनचाच प्रश्न आहे.
(का करायचं ते अजून पटलं नाही. गरज पडते तेव्हा लोक अधिक स्पेसिफिक भाषा वापरतातच).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नक्कीच. बर्‍याचदा
१. लोकांकडे वेळ नसतो. विचारायचा प्रश्न लांब निघू शकतो. त्याचे ऐकायचे उत्तर पण तसेच निघू शकते.
२. लोकांना काय माहिती पुढे विचारायची हेच कळतच नाही. ते वेगळंच काहीतरी विचारु लागतात.
३. लोकांना विचारायला लाज वाटते, इ.
४. बसच्या बातमीचा वाचक कुणाला विचारणार? पुढचाच नसतो.
५. आतापर्यंत मिळालेली माहिती बरोबर आहे आणि पुढे केवळ degree of accuracy करता माहिती विचारायची आहे अशी परिस्थिती कितीदा असते? म्हणजे पुढील बराच संवाद केवळ मागच्याच गोष्टींच्या verification साठी होऊ शकतो.
६. काही विशिष्ट अर्थ गृहित धरून पुढे गेलेला संवाद, त्याचा मधेच वेगळाच अर्थ ध्वनित झाल्याने, कदाचित मागावून सुरू करावा लागतो.
७. या सर्व प्रकारात उर्जा वाया जाते. म्हणजे संवाद जसा जसा निष्कारण लांब किंवा चूक (apart from not desired which cannot be helped)होत जातो तसा तसा पेशंन्स संपतो.
८. संवादाला एक फाटा फूटला तर संवादकांना बरेच (मुळ रस्त्यापासून) दूर नेऊ शकतो.
९. गैरसमज (भाषेमुळे) होण्याचे प्रमाण फार आहे.
१०. सध्याच्या भाषा भांडू इच्छिणारांसाठी फार सुलभ आहेत. लक्षात घ्या संवादकांना समजूनच घ्यायचे आहे तिथे संवाद पटकन पूर्ण होतो. ज्यांना अर्थ विपरितच काढायचा आहे ते शेवटपर्यंत तसे करू शकतात.
११. जिथे भाषेत अचूकपणा घालायचा आहे तिथे भाषा फार जीवघेणी क्लिष्ट बनते - जसे कायदा, शाळेतल्या व्याख्या, इ. इथे खर्‍या अर्थाने भाषा स्पेसिफिक असते. कोणालाही अशा प्रकारे specificity आणलेली आवडणार नाही.
१२. लहानपणी नाही शिकली भाषा शिकणे म्हणजे डोकेदुखी असते. भाषेतला ओघ, लॉजिक, सिक्वेंस नसल्यांमुळेच. काहिच्या काही शिकावं लागतं. आपण काय इतर गोष्टी नंतर शिकत नाही का?

थोडक्यात सध्याच्या भाषांच्या संरचनांमुळे संवाद चूक किंवा inefficient, इ. होतो. त्यामुळे पहिल्यांदा वापरलेली भाषाच जर सुधारित असेल तर चांगले नाही क होणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

या प्रतिसादात शब्दाच्या बिंदूवस्तू आणि खंडवस्तू (point object and range object) रुपांबद्दल चर्चा आहे.

साधारणतः एक 'शुद्ध' रंग कोणत्या तरी एकाच तरंगलांबीचा किंवा वारंवारितेचा असतो. रंग कोणता ते आपण तरंगलांबी मोजून सांगणार. आता आपण ती किती ते मोजणार. समजा ती आहे ५०.१४ *१०^-७. आपण किती दशांशापर्यंत ती अचूक मोजू शकतो? समजा ०.०१*१०^-७ मी. आता अजून एक दुसरा जवळचाच शुद्ध रंग घ्या. ५०.१४२*१०^-७. आपले यंत्र याला वेगळा रंग मानणार नाही. म्हणजे यंत्रासाठी ५०.१३६ ते ५०.१४४ ही रेंज एक बिंदूच आहे. रंग, जी निसर्गतः बिंदूवस्तू आहे तिला आपली दृष्टीसंस्था खंडांमधे विभाजित करते आणि त्या खंडांना एक एकक मानून चालते.

शब्दांचे ही तसेच आहे. जरी आपण शब्दांना बिंद्वर्थ आहे असे समजत असलो तरी प्रत्येक शब्दाशी संबंधित अर्थाची एक रेंज, अर्थखंड, असतो. हा अर्थखंड केवढा आणि केवढा लवचिक आहे हे बोलणारानुसार, ऐकणारानुसार बदलत असते.

प्रत्येक संकल्पनेचा एक स्पेक्ट्रम असतो. कधी कधी तो आपल्या कामापुरता अरुंद ठेवला जातो तर कधी कधी त्यात अंकाप्रमाणे त्रिमितीय अनंतत्व असते. अंक एका बाजूला - infinity ,दुसर्‍या बाजूला + इंफिनिटी, इतरत्र कोठे खोदले तर अनंत खोलीत जातात. संकल्पनाही डिट्टो तशाच आहेत. ज्ञान ही संकल्पना घ्या. घोर अज्ञान, अज्ञान, माहिती नसणे, विज्ञान, माहिती, ज्ञान, पूर्ण ज्ञान असा एक स्पेक्ट्र्म बनवता येईल. याच्या प्रत्येक महत्त्वच्या खंडाला एक नाव देता येईल.

असं शब्दांचं मॅपिंग करणं, इ धाग्याचा उद्देश नाही. पुन्हा एकदा सांगतो, आशय्/अचूकता हा इथे केंद्रबिदू नाही. इतर अनेक मुद्दे आहेत, जसे बिनलिंगी बाबीचे लिंग. सवयीच्या आहेत म्हणून अडचणीच्या वाटत नाहीत अशा भाषांबाबत हजारो बाबी आहेत. जसे इंग्रजीत प्रत्येक शब्दाचा उच्चार प्रमाण माणसाकडून ऐकल्याशिवाय मला त्याची मुळीच खात्री नसते. मराठीत असं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लेखक म्हणतात अशी साधी सोपी भाषा निर्माण झाली तर आमच्या अतिप्रिय उपहासाचे काय होईल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नव्या सोप्या भाषेत कोणता रस वजा होईल असे आपल्याला का वाटते? सर्व रस कायम राहतील. काल मी माझ्या मुलाला कृत्रिक आणि नैसर्गिक काय ते शिकवायचे होते. गृहपाठ हो दुष्ट! मी म्हणालो ' एका फॅक्टरीत ईशान्यला हात, पाय, पोट, डोके, डोळे, कान, नाक, आणि शेवटी नून्नू लाउन आम्ही आणले आहे का?' आणि तो सॉलिड हसू लागला. हे वाक्य नव्या भाषेत का बरे लिहिता येणार नाही? आपल्याला हवासा उपहास कायम राहिल, उलट जास्त दाब्बून भरता येईल. कदाचित आमच्यासारखे गरीबही मुक्तपणे रस उधळू लागतील, भाषा सोपी झाल्याने. तसंतर अतिसामान्य अशा प्रत्येक विधानात कोणता ना कोणता 'निचोडलेला' का होईना रस असतोच. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या निर्रस भाषा नावाचा प्रकारच नसतो असेही म्हणता येईल.
यंत्र दुरुस्त केल्याने त्याच्या उपयोजनात बाधा येणार नाही. तुम्हाला बाइक नागमोडी चालवायची सवय असेल तर एकदम फिट्ट करून दिलेली बाईक देखिल तुम्ही तशी चालवू शकता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

होऊ घातलेली, मुद्दाम बनवलेली जागतिक भाषा म्हणून "एस्पेरान्तो" भाषेचा इतिहास आणि यश मार्गदर्शक ठरेल (इंग्रजी विकिपीडिया दुवा)

प्रिन्सटन युनिवर्सिटीच्या एका विभागाने शब्दांचे एक जाळे तयार केले होते (चर्चाप्रस्तावकाने रोजेच्या शब्दखजिन्याची प्रगत आवृत्ती असावी असे काही म्हटले आहे तसे.) त्याचा दुवा - वर्डनेट

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नवभाषेची आवश्यकता हा भाग प्रथम यायला हवा. तो पटेपर्यंत दुसरा भाग लिहिण्यात अर्थ नाही. पण आता ती पायरी मी स्कीप करत आहे. आवश्यकतेचे समर्थन माझ्याकडे नाही असं नाही, पण विचार सुसुत्र होईपर्यंत इतरांना काहीही वाचायला लावून संभ्रमात टाकायचा विचार मला आवडणार नाही. सध्याला या भागात आपण ध्वनी विषयक चर्चा करू. 'आवश्यकता' अगदी नाही असे वाटले तरी भाषेबाबतची ही चर्चा अस्थायी आहे असं नाही.

भाषा म्हणजे बोलणे, ऐकणे, लिहिणे, वाचणे असा मर्यादित अर्थ आपण इथे घेणार आहोत.
१. आपल्याला २० हर्ट्झ ते २०००० हर्ट्झ या वारंवारितेचे यांत्रिकी तरंग ऐकू येतात. प्रत्येक प्राण्याला काय काय ऐकू येते आणि यामागे तर्क काय ही एक वेगळीच अभ्यासाची गोष्ट आहे. http://www.lsu.edu/deafness/HearingRange.html मधला टेबल कदाचित आपल्याला वाचायला आवडेल. विश्व हे केवळ ध्वनींचे आहे असे मानले तर देवाने प्रत्येकासाठी विश्वाचा आकार वेगळा ठेवला आहे.
१.१ आपण बोलललेले आवाज हे तर खूप कमी रेंज मधले आहेत. फक्त ५० ते ५५०० हर्ट्झ. यातही आपले ८०% पेक्षा जास्त बोलणे ५०० हर्ट्झ च्या आत आटोपते. व्यंजने उच्चारताना मात्र आवाज १००० हर्टझच्या वर चढतो. कानांना सहसा त्यांच्या रेंजमधले पण उच्च वारंवारितेचे आवाज अधिक चांगले वाटतात.
१.२ ६००० ते २०००० हर्ट्झ मधले जे ध्वनी आपण ऐकतो ते मनुष्याचे नसतात. मशिनचे, निसर्गाचे असतात.
१.३ ध्वनीअंधःकार माणसाला ऐकू येत नाही.
२. आपण ऐकू येणार्‍या 'सगळ्या' प्रकारांना ध्वनी म्हणू आणि माणूस जे बोलतो त्या सबसेटला आवाज म्हणू. शेवटी मशीनच्या ध्वनींची आणि माणसाच्या आवाजाची तुलना इथे करता येणार नाही.
२.१ लहान मुलांना मोठ्या माणसांपेक्षा जास्त ऐकू येते. त्यांनाच ऐकू येईल असा कर्कश आवाज लावून , त्यांना हाकलून, केवळ मोठ्या लोकांचे दुकान चालवता येते.
३. आवाज हा वस्तूंचा (हवा, पाणी) बनलेला असतो, म्हणून तो पोकळीत ऐकू येत नाही. चंद्रावर नील आर्मस्ट्राँगने एड्वीन आल्ड्रीनशी फोनवर बोलले असावे किंवा लिपरिंडिग केली असावी.
४. तुम्ही एकदा 'मेरे आँगने में तुम्हारा क्या काम है?' हे गाणे गा. पाच मिनिट. मग हा प्रश्न म्हणून विचारा- 'माझ्या अंगणात तुझे काय काम आहे?' हा प्रश्न तुम्ही मराठी ठणक्यात (कवितारहित) केव्हाही व्यवस्थित विचारू शकता. पण पाच मिनिटे 'मेरे आँगने में' म्हटल्यावर तोच प्रश्न तसाच हिंदीत रुक्षपणे/पद्यात विचारवला जात नाही. ते पुनःपुनः गाणेच बनून बाहेर येते. आता हेच गाणे फिर छिडी रात बात फुलोंकी च्या तालावर म्हणा. हवे तितकी अक्षरे गाळा/वाढवा पण ती बदलू नकात. आपल्याला असं लक्षात येईल कोणत्याही चालीत कोणतेही गाणे म्हणणे अवघड प्रकार आहे. 'आवाज' म्हणजे अगदी आवाजाची सवय देखिल का हा प्रश्न इथे उभा राहतो. आवाज हा प्रकार काय आहे हे कळायला 'किचकट' आहे.
५. आवाजात नक्की काय काय येतं असा प्रश्न साहजिक आहे. वाक्य, शब्द, अक्षर, शांतता (म्हणजे दोन शब्दात किंवा वाक्यात कुठेतरी ब्रेक असावा तो), स्वर, व्यंजने, उच्चता (किती मोठ्याने जी डेसिबलमधे मोजली जाते), गती (उच्चारलेले शब्द प्रति सेकंद), सुर (उपहास, आश्चर्य, इ), जोर (नक्की काय म्हणायचं आहे केलेलं वेगळं उच्चारण), अर्थ (प्रश्न, आज्ञा, इ), रिदम म्हणा किंवा ताल, अक्षर नसलेले उच्चार म्हणजे ज्यांना अक्षरात पकडताच येत नाही असे उच्चार (मी खुदकन हसतो तेव्हा मी 'खुद' असा आवाज काढत नाही आणि मी नक्की काय आवाज काढला ते तुम्ही मराठीत लिहू शकत नाही), वर (४ मधे) उल्लेखलेली सवय. बोलणं सोपं असलं तरी ते नक्की काय काय आहे हे जाणणं अवघड आहे.
६. आवाज म्हणजे एक विशिष्ट वारंवारिता का? कल्पना करा एक वक्ता खूप लोकांना उद्देशून बोलतोय. त्याच्या श्रोत्यांमधे ५०० मी अंतरावर १०-१० मी च्या अंतराने थांबलेले लोक आहेत. आवाजाचा वेग ३४० मी/सेकंद समान आहे. वक्ता जेव्हा 'भारत' (किंवा भ) म्हणतो तेव्हा सर्वांना भारतच ऐकू जाते. म्हणजे वारंवारिता देखिल तीच राहिली आहे. फक्त आवाज कमी आला. कमी आला म्हणजे हवेच्या लाटा कमी आल्या. ज्या ज्या आल्या त्या सर्वांच्या कानावर समान वारंवारितेने आल्या.
६.१ असे म्हणण्यात अडचणीही आहेत. पुरुष आणि स्त्रीया पूर्णतः वेगळ्या वारंवारिता वापरत असले तरी ते 'तेच' आवाज काढतात. भूपिंदर 'बिती ना बिताई रैना' गातात आणि प्रभाकर जोग पण व्हायोलिन मधून तेच आवाज काढतात. स्त्रीयांचे आणि जोगांचे 'आवाज' मला तेच ऐकू येत नाहीत पण शब्द तेच ऐकू येतात. जेव्हा तोच शब्द अश्या प्रकारे बाळे, मूले, पुरुष, स्त्रीया, वादने 'बोलतात' तेव्हा त्या आवाजाच्या तरंगात 'तेच' काय काय असते आणि वेगळे काय काय असते?
७. आवाजाचे सूत्र सोपे आहे. फुप्फुसातून हवा वेगाने बाहेर येते. फुप्फुस इतके मऊ असते कि ते हवेला कोणती वारंवारिता देत नाहीत. फक्त सामान्य गतीने माल ढकलल्यासारखे हवेला ढकलते. तिच्या मार्गातल्या कंठातल्या तारा मेंदू हलवतो आणि त्यांच्याशी झालेल्या घर्षणाने 'स्वर' तयार होतात. स्वराने व्यंजनाचा उच्चार पूर्ण होतो असे आपण घोकले आहे. पण म्हणजे काय होते? प्रात्यक्षिक? लांssssब अ किंवा उ म्हणा. शक्य आहे. लांब क किंवा ट म्हणा (ककककक नाही, क्क्क्क्क्क्क्क्क म्हणा), तो उच्चार तुटत तुटत बाहेर येतो. स्वर म्हणजे कंठातले सातत्य. बोलून पहा- अ, आ, इ, ई. इथे टाळू ते ओठ भागाचे काही काम नाही. फुप्फुसापेक्षा कडक असला तरीही तुलनेने कंठ फार नाजूक. तोंडातले बोलण्यात भाग घेणारे भाग तर फार कडक. इथे मी चक्क तुमच्या ओठांबद्दलही (जीभ, टाळू, दात, तर आलेच) बोलतोय. तोंडात या भागांच्या ज्या टकरा होतात त्यांचे आवाज स्वर घेऊन येणार्‍या हवेवर सोबत बाहेर येतात. आपण जेव्हा बोलतो तेव्हा लाक्षणिक गतीने या हालचाली करतो आणि सुसंबद्ध भाषण ऐकू येते. इथे शोलेमधला संजयकुमार, आमच्या सरांनी सांगीतलेला महाप्राण काय ते त़ज्ञास विचारावे.
७.१ तांत्रिक दृष्ट्या स्वराने व्यंजनाचा उच्चार पूर्ण होतो/ करता येतो हे खोटे वाटते. 'व्यंजने सातत्याने बोलता येत नाहीत, त्यात मधे स्वर बसवले तर असे सातत्य साधता येते.' हे खरे आहे.
७.२. आपण श्वास यात घेत असू वा बाहेर टाकत असू आपले बोलणे चालू राहते. त्यामुळे हवा कुठे चालली आहे आणि टकरांचे तरंग कुठे चालले आहेत याचा संबंध नाही असे म्हणता येईल.
८. आवाज काय आहे हे कळले तरी आवाजाचे एकक (आहे कि नाही ते आणि) काय आहे हे अजून विज्ञानाला कळले नाही. फोन, फोनिम, असे काही प्रकार सांगीतले जातात पण जसे रंग अनंत आहेत तसे आवाज. रंग किमान एकाच प्रतलात आहेत, आवाजांची इतकी डायमेंशन्स आहेत कि रंगाचा जो १६० लाख (काहीतरी स्रोत असेल याला) आकडा सांगितला गेला तसा आवाजांचा अजून कुणी सांगीतला नाही. कमित कमी किती वेळ ऐकला तर (जसे, १०^-४ सेकंद) माणसाला आवाज ऐकू येईल असा एक प्रश्न उभा राहतो. त्याला एकक आवाज म्हणता येईल. पण अशा दोन आवाजामधे किती ओव्हरलॅप असेल तर वेगळा आवाज येणार नाही हे कळले तरच एकक आवाज मोजता येतील. ते अनंत निघतील का? http://www.langsci.ucl.ac.uk/ipa/sounds.html वर जास्त माहीती मिळेल.
९. जितके आवाज निघतात त्यातले सर्वच एकापुढे एक मांडता येत नाहीत. म्ड्,ड्त, त्ड, असे उच्चार अवघड वाटतात. पण ही सवयीची बाब असू शकते. तोंडात कोणत्या टकरांची सिक्वेंस भाषेत आपल्याला आवडत नाही हे इथे कळावे. पण दुसर्‍या बाजूला असेही शक्य आहे कि या टकरा नंतर रोजच्या टकरांपेक्षा सोप्या वाटतील. लहान मुले ळ ण म्हणत नाहीत. पण नंतर आरामात म्हणतात.
९.१ जास्तीत जास्त किती व्यंजने आणि कोणती जोडावीत हा पण प्रश्न आहे. फार अप्रत्यक्ष असले तरी, र हे स्वर पण आहे असे मराठीत सुचवले आहे. पर्याय म्हणताना बरेच र उच्चारले जातात. त्यामुळे ऋ हा स्वर मानला असावा. पण असा ल चा उच्चार मी करू शकलो नाही.लॄ ?(व्याकरणाचे नियम लक्षात ठेवणे वेगळे)
१०. एक उच्चार म्हणजे एक वारंवारिता हेच सूत्र असले तर स्त्रीया तेच उच्चार जास्त वारंवारिता वापरून कशा काढतात? स्त्रीयांचा अख्खा बँड पुरुषांच्या वर असतो (म्हणून आपल्याला त्यांचा वेगळा आवाज कळतो). कदाचित स्त्रियांचा क आणि पुरुषांचा क समान लिहिले जात असले तरी 'आवाजाचा' इसेंस त्यात कॉमन नसावा, कोणतातरी पॅटर्न चा भाग 'सेम' असावा.
१०.१ तसेच आवाज चढला असताना त्यातला एकच अक्षर ऐकवला तर आवाज चढला असल्याचे कळत नाही. काही संस्कार करण्यासाठी (जसे आर्जव, राग) आवाज जास्त काळ काढावा लागतो. आवाजाची काही डायमेंशन्स कळायला 'बिंदू आवाज' पुरेसा नसून , 'खंड आवाज' जरुरी आहे.
११. जास्त जोरात एका दमात जास्त बोलता येत नाही. जोर हा 'किती हवा' याच्याशी निगडित वाटतो. बोलण्याची जास्त गती हे मेंदूने जास्त वेगाने टकरा (हवेची गती तीच) करण्याने असावी.
१२. आजच्या भाषांत स्वर आणि व्यंजने सोडून इतर बाबी प्रकट करायची प्रावधाने नाहीत किंवा तकलादू आहेत.
१३. शुद्ध एक वारंवारिता निर्माण करता येऊ शकते का?
१४. आवाज वैश्विक दृष्ट्या किती पट्टीत बोलला जावा? किती तरी इंग्रजी नट्यांचे बोलणे मला ऐकू येत नाही. (कळत नाही हा भाग वेगळा). त्या कमी आवाजात का बोलतात. टीव्हीचा आवाज वाढवला तर फारच वाढवावा लागतो. बाकिची बरीच पात्रे ठीक बोलतात. वेगवेगळ्या पट्ट्यांनी भांडने पण होतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मूळ धागा - भाषिकाचे दौर्बल्य की भाषेचे स्वतःचे दौर्बल्य?

खालील पॅरा, पॅराफर्नेलिया, जे काय असेल ते पाहा.

एक क्ष माणूस आहे. एक य माणूस आहे. क्षला यकडे सामान पाठवायचे आहे. वाहन,रस्ता वापरुन सामान पाठवावे लागते.
क्ष म्हणजे संदेश पाठवणारा, लिहिणाराचे/बोलणाराचे डोके(मेंदू)/तोंड्/हात, इ. य म्हणजे वाचणार्‍याचे डोके/कान्/डोळे इ. सामान म्हणजे संदेश. वाहन, रस्ता , इ म्हणजे भाषा. (संदेशाचे खरे भौतिक स्वरुप काय हा प्रश्न अजून सुटायचा आहे पण ते काही का असेना भाषेतला संदेश भाषेच्याच माध्यमातून पाठवला जातो. पण आपण हे वेगळे करून उदाहरणात पाहत आहोत. आपण फक्त संदेशाच्या 'भाषिक' रुपाबद्दल बोलणार आहोत.)
भाषेच्या उणिवा म्हणताक्षणी 'हे वाहन नीट चालवता न येणे', 'तो रस्ता नीट माहित नसणे', 'सामानाच्या गमनागमनातील इतर अनेक कामाच्या व्यवहार्य गोष्टींची जाण कमी असणे',इ असे चित्र उभे राहते. हे म्हणजे माणसाला भाषा न येणे. हा या धाग्याचा विषय ०% सुद्धा नाही.
विषय आहे सामान अ ते ब जागी जाईपर्यंत (क्ष आणि य च्या नैसर्गिक रचना विषयक बाबी सोडून) वाहन व रस्ता यातील दोष काढणे, त्रुटी काढणे, सुधारणा सुचवणे, इ. Suggestions on ideal concept, design, structure, use of language.
१. वास्तव असे आहे कि (काल्पनिक) वाहक, वाहन आणि रस्ता मूळचे सामान सोडून वेगळेच सामान तांत्रिकदृष्ट्या पोचते करतात. उदा. एका बसने एका कारला धडक दिली इतर कोणताही आगाउचा शब्द न वापरता याचे काय काय अर्थ होतात/होऊ शकतात्/झालेले नाहीतच असे म्हणता येत नाही, पाहा -
अ. धडक बुद्ध्या दिली. अन्यथा धडक झाली असे लिहायला पाहिजे होते.
आ. धडकेतील वाहनांचे गुणोत्तर सहसा १:१ पेक्षा वेगळे असते,म्हणून 'एक' 'एक' असे 'खास' लिहिले आहे.
इ. निर्जीव वस्तू, जसे बस, धडका देतात.
ई. धडक नावाची एक physical object एक वस्तू दुसर्‍या वस्तूला 'देऊ (हस्तांतरण)' शकते. अन्यथा 'धडकली' असे लिहिले असते.
फ. या धडकेत कारचा momentum शून्य असावा. जे काहि केलं तर ते बसनं , कारनं नाही...
आता कोणताही अर्थ आपण कोणी काढणार नाही, कारण आपल्याला माहित आहे असं काही नसतं म्हणून. पण जेव्हा माणसांतील, समाजांतील, काही वर्तुळांतील संवाद जेव्हा क्लिष्ट विषयावर, उच्च प्रतलात होतात तेव्हा भाषेची friction अर्धी उर्जा खाते. संवाद लांबतच नाहीत तर प्रभावहिनही होतात.

हुश्श!

१. 'एका बसने एका कारला धडक दिली' हे कळलं, पण अरुणजोशी, तुमची भाषा(तिला मराठी म्हणा की आणखी काही) ह्या बैलाला कळतच नाही. जगात एकच भाषा नसावी. सर्वांना कळणारी एकही भाषा नसावी. पण जरा ह्या बैलाला कळेल असं लिहा हो.
२. तुमची भाषा ही लिखित भाषा असूनही कोणत्याही मशिन मधे घातली तरी (म्हणजे हे पेज, त्याचे प्रिंट) त्याचे कळू शकेल असं व्हर्जन बनणार नाही. अशा मशिनी बनवायला विज्ञानाकडे काहीही उपलब्ध असू दे. ही भाषाच इतकी बेक्कार आहे की...
३. एका मुद्द्याचा दुसऱ्या मुद्द्याशी संबंध नाही.
४. महत्व नसलेल्या गोष्टींना महत्व दिले आहे.
५. हेच कळत नाही की कळू नये एवढा मजकूर लिहायला ह्या माणसाला किती वेळ मिळतो.
६. तुमच्या विचारांची प्रगती ही तुमच्या डोक्या'तील' प्रगती आहे, तुमची स्वतःची नाही, डोक्यातील पण चूक आहे, डोक्याच्या आसपासची म्हणावे लागेल. ह्या 'आसपास' साठी शब्दच नाहीत. तेच त्याच्यावरच्या चर्चेचे. चर्चेचे भौतिक अस्तित्व आणि 'वरचा' भाग किती abstract असावा त्याला लिमिटच नाही...
७ हे लिखाण निष्कारण तर आहेच आणि अव्यवस्थितपण (म्हणजे एकतर तुम्ही बिनकामाचे, वर इतरांनाही कामे सोडून तुमच्याशी वाद घालावे लागतात) आहेत.
८. "किती तरी इंग्रजी नट्यांचे बोलणे मला ऐकू येत नाही. (कळत नाही हा भाग वेगळा). त्या कमी आवाजात का बोलतात. टीव्हीचा आवाज वाढवला तर फारच वाढवावा लागतो. बाकिची बरीच पात्रे ठीक बोलतात. वेगवेगळ्या पट्ट्यांनी भांडने पण होतात.” आता ते तुमच्या कानाचं आणि नट्यांचं गळ्याचं काय भांडन की काय ते पाहा बुवा. आम्हाला नट्या (त्यांच्या गळ्यासकट) आवडतात.
९. 'हे कसले विचार आहेत?' हा प्रश्न नसायला पाहिजे होता, पण आहे. आणि कैच्याकै विचार आहेत हे उत्तर आहे. 'हे विचार चूकिचे आहेत' च्या जागी ऐसीवर काहीही खपतय असं म्हणता येईल. वाक्यांचे क्रम सर्रास बदलले तरी चालतील.
१०. इतरांनी तुमच्या लिखाणाला निष्कारण भिंगे लावली आहेत. ती शब्दांशब्दांना अपुरी पडतात.
११. तुमच्या कल्पनांना पंख फुटले असतील, पण ते पंख लांडोरीचे आहेत. उडतच नाहीत आणि दिसायला पण वाईट. 'लांडोरीच्या पंखासारखी अशी न उडणारी बेढब निर्मिती' ही संकल्पना हजारो वर्षे नसूनही ह्या बैलाला पण ती मराठीत मांडता येते. आता बोला!
१२. तुमच्या लिखाणात अर्थाच्या, संकल्पनांच्या नानाची exactly किती वेळा टांग आहे याबद्दल नेहमीच दुमत आढळेल, पण नानाच्या टांगा कितीतरी आहेत याबद्दल कुणाला संशय नसेल.
१३. कोणत्या (तुमच्या मते) शब्दाचा काय अर्थ असू शकतो असे लॉजिक लावता येत नाही. तुमच्या शब्दांचे अर्थ रँडम आहेत आणि ब्रह्मदेव त्यातली संगती सांगू शकणार नाही.
१४. वाक्याच्या प्रयोजनाची सीमा काय हे काहीच कळत नाही. उदा. निसर्गाने तुम्हाला स्वताची अशी प्रचंड तत्त्वज्ञान बुद्धी (म्हणजे काय तो निसर्गच जाणे!) दिली असेल. पण निसर्गात तर काय वाटेल ते समाविष्ट आहे. काय काय नाही? बुद्धी? आता हा शब्द बुड्ढी असा का नको? डोक्यात बटाटा झाला म्हणून काय कच्चाच खावा? 'अशी' मारल्याने आणि 'तशी मारल्याने नक्की काय फरक पडतो? नसला तर कशाला (वाचकाची) मारता आहात? मारली? कधी? भर बाजारात कि घरात खाली आणून? असं आता विचारू नका. कुणाची तरी मारणं ही क्रिया grossly चूक नाही का? (आता इथल्या उदारमतवादी घासकडवीं वैग्रेना तसं वाटत नसेल, पण ते तसंच आहे!)
१५. तुमच्या लिखाणाचं perfectly understood version बनवायला किती आय क्यू चा माणूस किंवा बैल लागेल?
१६. तेवढ्या आय क्यू ला डोक्या मधे जागा आहे का? बैलाच्या नसेल, पण निदान माणसाच्या तरी?
१७. हे वाचताना किती टाकून (पैल्या धारेची म्हणतोय) लिहिलय ते कळतंच नाही.
१८.तुमच्या कोणत्याही वाक्यातलं कर्ता कर्म क्रियापद कशाकशाला वापरलंय हे कळायला जन्मभर ताटकळावे लागते. त्यात आमची लागते.
१९. वरच्या लागते मधला अर्थ दोन प्रकारे वापरला जातो. सवयीने (घासण्याने) ते कळतं पण तुमचं कळत नाही
२० . वाचताना डोक्यात येणाऱ्या नैसर्गिक सगळ्या शिव्यांचा स्पेक्ट्रम या बैलाच्याने कव्हर होत नाही.
२१. 'पोकळ तत्त्वज्ञान न लावता टाकू नये' हे कितीतरी अर्थानं वाचता येते. फार जास्त वाईट वाटून घेऊ नका. अहो काय लावता आणि काय टाकायचं ते सांगायला नको. नसेल आमचा आय क्यू तुमच्याएवढा पण तेवढं तरी आम्हाला कळतं हो.
२२. शब्दांना एकामागे एक लावताना अर्थ बिघडवले आहे. बरं त्याचाही एकच नियम नाही.
२३. absence of sense म्हणजे तुमचं लिखाण का?
२४. किती निरर्थ करावा? किती वेळा? कोणकोणता? याला काहीच धरबंध नाहीत.
२५. मधेच इंग्रजी शब्दांचा वापर आणि अर्थ यांच्यातही काही संबंध नाही.
२६. वापरलेल्या 'फरक' आणि 'सीमारेषा' यात नक्की किती फरक आहे? सीमारेषा काय?
२७ शब्दद्व्य म्हणजे काय? शब्द न झालेला? शब्द न होणारा? शब्द न होऊ शकणारा? कि अर्थ नसणारा 'शब्द' अशी बडबड? यावरुन एक प्रश्न उभा राहतो - 'शब्दार्थ ही एक wavelength नसून एक spectrum असतो' ही कोणती भाषा? शब्द आहेत कि चिलटं? की लोक हेच ठरवण्यासाठी भांड्तात? कि अशा (२जी) स्पेक्ट्रमचा बँडबाजा वाजवण्यासाठी?
२८. हेच एका बाजूला फार बुळबुळित करुन लिहिलं किंवा दुसर्‍या बाजूला फार कडक करून लिहिलं तरी प्रथमपुरुषी (म्हण्जे बैलासारख्या) वाचकाचा पाय घसरत राहिल की मोडत राहिल?
२९. जास्त 'झाल्या'नंतर वेगवेगळ्या मूड्मधे तेच लिहित राहणार? वाचकानं तो फॅक्टर पण धरायला हवा की 'सोडा'यला हवा?
३० लेखकाचं प्रत्येक वाक्य एक वेगळं अज्ञान आहे कि सर्व वाक्ये शेवटी एकाच अज्ञानाच्या अनुषंगाने आहेत? की अज्ञानाचा अर्थ त्यांच्या आजूबाजूच्या बैलांवर आधारित?
३१.वाचकाला क्लीन बोल्ड केल्याचा परिणाम काय होतो? लिहिणार्‍याच्या अज्ञानावर म्हणतोय मी!
३२. बरं 'हे सर्व अज्ञान आहे' म्हणताना अज्ञान मॅच झालंय?
३३. याला माणसाला कळेल अशा लँग्वेज (बैलांना सोडा, कोणत्याही माणसाला, जो वेडाच्या ढंगांना अपरिचित आहे त्याचा छ्ळ होऊ नये म्हणून)मधे कसे रुपांतरित करता येईल?
३४. म्हणे इथल्या वाचकांना तुमच्या लेखाचे अनेक अर्थ लगेच/सहज कळतात. कशामुळे? म्हणजे काही नियम तोडले जात असताना असे कोणते दुसरे नियम पाळले जात आहेत ज्याने समोरच्याला अर्थबोध होतो? ते नियम काय आहेत?
३५. हे बाईने लिहिले आहे कि बाबाने हे कळल्याने काय फरक पडणार? जिथे लिंग हवे तिथे नाही म्हणजेच बाई की बाबा हे तर बैलालासुद्धा कळतं. बरं मग?
३६. लेखात एवढे शब्द कशाला? त्यांच्यात काहीतरी अर्थ हवा ना?
३७. कोणत्याच शब्दाचा अर्थ कशाचा कशाला नाही. शब्द बनवण्यासाठी अक्षरांची कितीतरी, खरेतर अनंत combinations उपलब्ध आहेत म्हणून काय टंकत जायचं?
३८. प्रत्येक वाक्याचा प्रत्येक वाचकासाठी, वेगळा निरर्थ? हा लेख कि ठिगळ लावलेली गोधडी?
३९. प्रत्येक वाक्याला अगदी ठेच लागल्यासारखं लिखाण का असावं?
४०. की लेखकांना काय अभिप्रेत होतं ते वाचकांना कळूच नये.

तुमच्या लेखातला तुम्ही कोणताही उतारा घ्या. तो शांतपणे वाचा. अशा गोष्टी निदर्शनास आणा (निरर्थक, कैच्याकै, वाटेल ते). ही गंमतदार गोष्ट असेल.
अजून एक, अशा लेखांमूळे असं वाटतं की कदाचित तुमचा मेंदू illogically configured तर नाही झाला असावा? आपल्यात नक्की काय काय आणि कीती किती non-normal आहे हे कधी कधी स्वत:ला जाणवतच नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

काळाजी, मी आपली कोणत्या शब्दांत माफी मागू?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आत्तापर्यंतची उलटसुलट - आणि मला तरी बहुतांशी अनाकलनीय - चर्चा वाचून असे वाटते की राजेश घासकडवींनी सुरुवातीसच म्हटल्याप्रमाणे 'अनुभूतीचा आवाका आणि ती वर्णन करून दुसऱ्याला जशीच्या तशी समजावून सांगण्याची भाषेची क्षमता यात तफावत आहे' हा मुद्दा धागाकर्त्याच्या मनात आहे.

असेच असेल तर ही सर्वमान्य चीज अधिक घोळून मांडून काय मिळणार आहे? विचारांच्या आणि अर्थांच्या छटा अनंत ( uncountable) आहेत, उलटपक्षी त्या व्यक्त करणारी भाषा कितीहि शब्दसमृद्ध असली तरी तिच्यातील एकूण शब्दांची संख्या मोजण्याच्या मर्यादेच्या आतच (countable) असणार, साहजिकच कितीहि आणि कसेहि शब्द वापरले तरी कोणचीतरी अर्थच्छटा त्या शब्दांच्या कवेच्या पलीकडचीच असणार हे स्वयंसिद्ध सत्य आहे असे वाटते.

दोन उदाहरणांनी हे स्पष्ट करतो. आपण तोंडाने अनेक ध्वनि काढू शकतो. त्यापैकी काहींना आपण अक्षरांची लेबले लावून त्यांचा रोजच्या लिहिण्याबोलण्यासाठी वापरहि करतो. तरीहि आपण तोंडाने जितके ध्वनि काढू शकतो ते निसर्गातील सर्व ध्वनि जसेच्या तसे ऐकविण्यासाठी अपुरेच पडतात आणि पडणारच. पिंपळाची पाने 'सळसळ' असा आवाज करतात असे आपण नेहमी म्हणतो पण पिंपळाची पाने खरोखरच 'स-ळ-स-ळ' असा आवाज करतात का? तर नाही. आपल्या कानावर पडलेला त्यांचा आवाज जास्तीत जास्त जवळच्या आणि मनुष्यसाध्य उच्चारांतून दर्शविण्यासाठी आपण 'स-ळ-स-ळ' ह्या खुणा वापरतो. पिंपळाच्या पानांचा खराखुरा आवाज निर्माण करण्याची क्षमता आपल्या तोंडात नाही हेच सत्य.

गणितामध्ये एकूण संख्या अपरिमेय आणि अनंत आहेत. त्यामध्येहि पूर्ण संख्या (१,२ इ.), अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहिल्या जाऊ शकतात अशा संख्या (१/२, २/३ इ.) आणि अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहिल्या जाऊ शकत नाहीत अशा संख्या ('२' चे वर्गमूळ, π,e अशासारख्या संख्या) ह्याहि अनंत आहेत पण पहिले दोन प्रकार हे मोजण्याच्या मर्यादेच्या आत म्हणजेच परिमेय अनंत (countable)आहेत तर तिसर्‍या प्रकारच्या संख्या मोजण्याच्या मर्यादेच्या बाहेर अपरिमेय अनंत (uncountable) आहेत. कितीहि लांबवले तरी '२' चे वर्गमूळ अपूर्णांकांच्या चिमटीत धरता येत नाही. (इतकेच फार पूर्वी शिकलेलेल गणित आता स्मरणात आहे, ते बरोबर लिहिले आहे असे वाटते!)

भाषांच्या अर्थवाहित्वाचे असेच आहे असे दिसते आणि मला तरी ते स्वतःसिद्ध आहे असे वाटते. हे - म्हटले तर 'दौर्बल्य - भाषिकाचे नसून 'भाषा' ह्या संकल्पनेचेच आहे असे मी म्हणेन. सर्वच प्राण्यांच्या आणि त्यांच्या 'भाषां'चे असे आहे, कुत्रामांजरांमध्ये आणि मनुष्यांमध्ये फरक इतकाच की मनुष्यांची भाषा कुत्र्यामांजरांच्या भाषांच्या तुलनेत अर्थवाहित्वामध्ये अधिक समृद्ध आहे इतकेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वृक्षांच्या पानांची जी सळसळ होते ती आपण उच्चारु शकत नाही. लिहू शकत नाही. यात माणसाचा म्हणा किंवा त्याने ज्या प्रकारे भाषा बनवली आहे म्हणा त्याचा काही दोष नाही (असे समजू). समजा तंत्रज्ञान वापरुन असे उच्चारता वा लिहिता येईल पण त्याचा तितकासा उपयोग नाही म्हणून ते करू नये असेही समजू.

आता एक उदाहरण घ्या. समजा मला केवळ मराठी येते. माझ्या एका मित्राला तामिळ आणि मराठी दोन्ही येतात. क्ष ला केवळ तामिळ येते. या सळसळीवर क्ष ने एक सामान्य उतारा तामिळमधे बोलला/वाचला. मला ते उच्चार मराठीत तशास तसे लिहायचे आहेत. इथे तामिळ माणसाने आपली वाचण्याची गती माझ्यासाठी खास कमी करणे अभिप्रेत नाही. (हा प्रयोग कसा करायचा याच्या चार अडचणी नाहीत असे गृहित धरू. उदाहरणार्थ मला मराठीत सेक्रेटरीला जो शॉर्टहँड येतो तो येतो, अक्सेंटचा प्रश्न नाही, इ.). माझा मित्र माझ्या लिखाणातल्या किती चूका काढून दाखवेल? उत्तर शून्य आहे का?

मुद्दा असा आहे कि आपल्या शेजारी जेव्हा अपरिचित भाषा बोलली जाते तेव्हा आपण इतके ब्लँक का होतो? प्रयत्नपूर्वक ऐकूनही अपरिचित भाषा अचूकपणे 'लिहू' आणि 'बोलू' शकत नाही.( इथे कृपया कष्टपूर्वक भाषा शिकण्याचा long-term प्रयत्न या प्रयोगात मिसळू नका.)

प्रश्न असा आहे की वृक्षाचा आवाज जितका बिनमहत्त्वाचा आहे तितकाच बिनमहत्त्वाचा 'आजच्या घडीला आपल्याला न कळणार्‍या इतर भाषांतील माणसांचा आवाज' आहे का? याचे उत्तर नाही असे आहे. ही संभाव्यता खूप मोठी इंडस्ट्री असू शकते.

भाषा हे माणसाने बनवलेले अत्यंत जुने वाजवायला अत्यंत कठीण वाद्य आहे. त्यावर ती भाषा बोलणारा माणूस कितीही कठीण सूर सहजी छेडू शकतो. पण त्याला दुसरे वाद्य दिले कि तो सोपे सुर पण काढू शकत नाही. म्हणून आपण नवी भाषा सहसा शिकतच नाही, अर्धवट शिकतो किंवा कच्ची शिकतो. यात भाषिकाला दोष देत बसलो तर नवीन भाषा शिकणे प्रकाराची आज जी दुरावस्था (average languages known per person) आहे ती नेहमीच पुढे चालू राहील.

स्पष्टीकरण- इथेही आपण म्हणाल. यात नवीन ते काय? हा जुनाच मुद्दा आहे. तर - 'नवी भाषा सहज कशी शिकावी?' हा मुद्दा नाही. 'आपल्याला येते ती भाषा आणि आपण शिकतो ती कोणतीही नवी भाषा यात असे काय भिन्न/सारखे (सारखे या अर्थाने की मातृभाषा ही एका अर्थाने फार कष्टाने प्राप्त झाली आहे, मग पुन्हा एव्हढे डोंगराएवढे कष्ट?) आहे की ती शिकणे अवघड जात आहे?' हा आहे. हा तांत्रिक मुद्दा आहे.

भाषेच्या सर्व उणिवा वरील प्रकारे तुलना करतच कळतात असे नव्हे, भाषेचा standalone अभ्यास करताना देखिल कळतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

भाषा व शब्द हे माहिती/अनुभूतीच्या देवाणघेवाणीचे आदर्श व परिपूर्ण मार्ग नव्हेत, त्यासाठी कायतरी आयडीयेची कल्पना काढावी म्हणजे दुनिया 'व्हॉट अ‍ॅन आयडिया सरजी' म्हणून तुम्हास टीव्हीतल्या अभिषेक बच्चनसारखी भाव देईल अशी काहीतरी संकल्पना लेख लिवण्यामागची आहे.

लेखाबद्दल लिवण्यासारखे भरपूर आहे. काही संकल्पना/अनुभूती या भाषा वापरून संक्रमित करणे अशक्य आहे. जसे उदा. वेदना. 'डोके दुखते' म्हणजे नक्की काय होते, हे कितीही शब्द वापरून, नवे शोधून समोरच्याला ती एक्झॅक्ट संवेदना समजवून सांगणे अशक्य आहे.

त्यामुळे एक आयडिया देतो तुम्हास. ती तुम्ही स्वतःची असे म्हणून खपविलीत तरी चालेल.

नवी भाषा तयार करण्यापेक्षा डायरेक्ट 'आंतर्ज्ञाना'वर रीसर्च चालू करा. तुमच्या मेंदूतल्या सर्किट व इलेक्ट्रिकल इंपल्समध्ये बद्ध असलेल्या माहितीची डायरेक्ट वायफाय ट्रान्स्फर Wink

तुम्हाला जमले, की आम्हाला शिकवा. संपला प्रश्न.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

बराच कीस काढला आहे भाषेचा...सर्व मुद्दे वाचणे आणि या प्रचंड अपुर्‍या भाषेमुळे तुम्हाला जसे अपेक्षित आहे तसे समजून घेणे केवळ अशक्य वाटते !तरीही....
संदर्भ आणि ज्याच्याशी बोलतोय त्याची आकलन क्षमता ह्याची कळत नकळत तपासणी करूनच आपण भाषा वापरत असतो. जिथे गुंतागुंतीच्या भावना पोहोचवायच्या आहेत तिथे पद्य लेखन, विविध उपमा वगैरेंचा उपयोग होतो.
भाषेतली संदिग्धता नाहीशी झाली तर समजून घेण्याची आणि समजावून देण्याची गरजच उरणार नाही...आणि मग फक्त माहितीची देवाणघेवाण उरेल-जशी संगणकामध्ये होते...बापरे...अशा 'आदर्श' स्थितीची कल्पना आहे का तुमची?

खरंतर मनात तरी एखादी गोष्ट म्हणावी तेवढी स्पष्ट असते का? माझा तर अनुभव असा आहे की एखादी कल्पना शब्दात व्यक्त करायची ठरवली की मग ती अधिक सुस्पष्ट होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भाषेतली संदिग्धता नाहीशी झाली तर समजून घेण्याची आणि समजावून देण्याची गरजच उरणार नाही...आणि मग फक्त माहितीची देवाणघेवाण उरेल-जशी संगणकामध्ये होते...बापरे...अशा 'आदर्श' स्थितीची कल्पना आहे का तुमची?

तुमचा मुद्दा पोचला. संदिग्धता नाहीशी झाली तर नक्की काय वाईट होईल याबद्दल मनात अजून संभ्रमच आहे खरा. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बापरे..अशासाठी की समजून घेणे आणि समजावून सांगणे ह्या क्रीयांमधून खूप काही शिकायला मिळतं-ते कसं होणार एकदा संदिग्धताच संपली की. ही फक्त कल्पना केली होती. असं होणं शक्य वाटत नाही.

(आणि मुळात विचारच संदिग्ध स्वरूपात असतात तिथे भाषेमध्ये बदल करून काही साधेल असं वाटत नाही मला तरी.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असं होणं शक्य वाटत नाही हा एक वेगळा मुद्दा झाला-ज्याच्याशी मी सहमत आहे.

पण मुळात संदिग्धता संपल्यावर काय होईल याबद्दलच मी अंमळ संदिग्ध आहे Wink

अन विचार संदिग्ध असले तरी भाषेमुळे ती संदिग्धता आहे तशी पोचविल्या जाऊ शकते. भाषेच्या स्वतःच्या काँप्लेक्सिटीची अजून एक लेयर मध्ये तयार होणार नाही. हा एक फायदाच असे मी समजतो. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अशा 'आदर्श' स्थितीची कल्पना आहे का तुमची?
आपला प्रतिसाद अत्यंत रोचक आहे. आपण जी आदर्श स्थिती म्हणत आहात तिच मला अभिप्रेत आहे. भाषेतील संदिग्धता नष्ट होणे खूप जास्त अपेक्षित आहे. पण आपण ज्या १. केवळ माहितीची देवाण घेवाण उरणे, २, संगणकासमान वर्तन होणे, ३. समजावण्याची गरज न उरणे ४. भयप्रद काही होणे या गोष्टी हा या स्थितीचा फारच पारंपारिक अनालिसिस आहे. असे होणार नाही.

पण संदिग्धता हाच केवळ भाषांमधला दोष नाही. लहान मुलाला लवकर ळ म्हणता येत नाही. यात संदिग्धतेचा काही संबंध नाही. ती भाषेची उच्चारविषयक सुधारणा आहे.

शिवाय माणसाच्या शरीरात (मनात, मेंदूत, कानांत,इ, अंशतः तोंडात) कोणताही बदल इथे चर्चिणे अभिप्रेत नाही. केवळ पारंपारिक रित्या मानवाने भाषेला ज्या प्रकारे बनवले आहे त्या treatments बद्दल बोलणे अभिप्रेत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

'१. केवळ माहितीची देवाण घेवाण उरणे, २, संगणकासमान वर्तन होणे, ३. समजावण्याची गरज न उरणे ४. भयप्रद काही होणे या गोष्टी हा या स्थितीचा फारच पारंपारिक अनालिसिस आहे. असे होणार नाही.' -सहमत...काल्पनिक स्थितीबद्दल फक्त काल्पनिक भिती आहे.

'पण संदिग्धता हाच केवळ भाषांमधला दोष नाही. '
संदिग्धता हा मुळात भाषेचा दोष आहे का याबद्द्लच मला शंका आहे. आपल्या विचारात संदिग्धता असते...नंतर ती भाषेत व्यक्त होते.

'लहान मुलाला लवकर ळ म्हणता येत नाही. यात संदिग्धतेचा काही संबंध नाही. ती भाषेची उच्चारविषयक सुधारणा आहे.'
कळलं नाही नीट. ळ लहान मुलांना म्हणता येत नाही म्हणून भाषेत उच्चारविषयक 'सुधारणा' करून तो काढून टाकाण्याचा/सुलभ करण्याचा विचार व्हावा असे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@ ॠता, निरीक्षणे रोचक आहेत आणि उत्तर देणे कठीण आहे.
संदिग्धता हा मुळात भाषेचा दोष आहे का याबद्द्लच मला शंका आहे. आपल्या विचारात संदिग्धता असते...नंतर ती भाषेत व्यक्त होते.

माणसाच्या मनात दोन प्रकारचे प्रश्न येतात. wh (व्ह) टाईप आणि Yes/No (हो/ना) टाईप. पैकी व्ह प्रकारच्या सगळे उपलब्ध पर्याय एक एक करून मांडून प्रश्नांना हो/ना प्रकारांमधे रुपांतरित करता येते.

'मी काय करू?' या व्ह प्रश्नाला 'मी खाऊ का?', 'मी झोपू का?','मी कोठे जावे का?' इत्यादि प्रश्नांत मांडता येते. पुढे 'मी कोठे जावे?' या व्ह प्रश्नाला 'मी घरी जावे का?' , 'मी रेल्वेस्टेशनवर जावे का?', 'मी सिनेमाला जावे का?', इत्यादि असे मांडता येते. त्यापुढे 'मी सिनेमाला का जावे?' हा प्रश्न निवडला तर 'मला सिनेमे आवडतात का?', 'चांगला सिनेमा लागला आहे का?', 'मला तिकिट मिळेल का?' इत्यादि शेवटच्या सोप्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळतात आणि निर्णय होतो. अर्थात इथे अनंत पर्याय मेंदू विचारात घेतो आणि निर्णय घेतो हे वेगळे सांगायची गरज नाही.

कोणताही एक निर्णय घेताना असे प्रश्न, त्यांचे उपप्रश्न उभे राहतात. हे जाळे अतिशय क्लिष्ट असते पण मेंदू आपले तर्क वापरुन योग्य निर्णय घेतो. माहिती नसणे, field restrictions, वेळेत निर्णय घ्यायचा असणे, पर्यायांची संख्या, नैतिकता, circular references, विचार करण्यातील सुसूत्रता, इ अनंत कारणांनी संदिग्धता निर्माण होते. 'मी खोटे बोलू का?' हे ठरवताना 'बाबा मार देतील' आणि 'देवबाप्पा पाप देईल' यातले काय टाळायचे हे ठरवताना प्रश्नांची आणि तदनुषंगाने येणार्‍या सर्व उपप्रश्नांची उत्तरे देणे मेंदूला अवघड पडते. हे सर्व प्रश्न आणि उपप्रश्न समाधानकारक रित्या न सोडवता आपण एक निर्णय घेतो. असे विचार करणे, बोलणे आणि वागणे संभ्रमात्मक किंवा एका पातळीवर संदिग्ध आहे असे म्हणता येईल. म्हणून संदिग्धता आपल्या विचारात असते नि नंतर ती भाषेत येते असे आपण जे लिहिले आहे ते योग्य आहे.

परंतु संवादातील सर्वच संदिग्धता ही विचारात असते असा आपल्या विधानाचा अर्थ निघू शकतो. तो मात्र खरा नाही. संवादातील एकूण संदिग्धता पृथक् पृथक्
सांगायची असेल तर 'विचार संदिग्धता (मेंदूतील संदिग्धता)' आणि 'भाषा संदिग्धता (शब्द,व्याकरण, इ)' असे दोन शब्द वापरावे लागतील.

'भाषा संदिग्धता' सांगायला मला मीच व्यक्त केलेली संदिग्धता निवडावी लागेल. मनुष्याला न गवसलेल्या विश्वातल्या कितीतरी सत्यांचं हे त्याच्यापासूनचं अंतर कदाचित फक्त भाषेमुळे निर्माण झाले असेल. असे शंकावाचक विधान लेखाच्या पहिल्याच परिच्छेदात आहे. ते निवडतो.

मला काय म्हणायचे होते ते पाहा-
मानव आपले संशोधन पारंपारिक भाषेतून करतात. विश्वाचे नियम, त्याची अनुभूती मांडण्यासाठी या भाषा अपुर्‍या किंवा अयोग्य असाव्यात का? मनुष्याला नवनविन शोध लावायची प्रचंड हुरहुन्नरी आहे. या सत्यांची मानवाला फार गरज आहे. पण ब्रह्मांडाची कितीतरे सत्ये त्याला नेहमी हुलकावणी देतात. याला मानवाची नैसर्गिक संरचना, इ जबाबदार असू शकते किंवा नसू शकते, पण ज्या माध्यमातून तो आपले हे ध्येय साधू इच्छित आहे तेच तर मुख्य अडथळा नसावे? कि यापुढेही जाऊन फक्त माध्यम हेच कारण आहे?

इथे माझ्या मनात संदिग्धता आहे, प्रश्न आहेत ती 'विचार संदिग्धता', जिचा उल्लेख आपण केला आहे.

पण हीच शंका आपल्याकडे नीट पोहोचली नसेल तर ती 'भाषा संदिग्धता'. काही प्रश्न आपल्याला 'भाषा संदिग्धता' नावाचा प्रकार असतो का नसतो ते स्पष्ट करतील.
१. आपल्याकडे हा साधारणतः/ पूर्णतः विचार पोहोचला होता का?
२. हा विचार सांगण्यासाठी मी जी भाषा वापरली आहे, ती चूक आहे का? त्यात काय चूक आहे?
३. हाच विचार इतर कोणत्या प्रकारे सांगीतला गेला असता तर तो सर्वोचित मानला गेला असता?
४. मी जे वाक्य वापरले आहे आणि मी जे स्पष्टीकरण देत आहे त्यांचा संबंधच नाही, पुरेसा नाही, असे म्हणता येते का?
५.संदर्भ अपुरा आहे वाटला का?

या प्रश्नांची उत्तरे घेऊन भाषिकाचे (माझे) दोष आणि भाषेचे दोष सांगता येतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अर्थाच्या संदिग्धतेमुळे अजूनही मला भाषेत बदल करावेत हा विचार पटलेला नाही.
तरी उच्चारातली संदिग्धता, जशी 'चमचा' आणि 'चष्मा' ह्या दोन शब्दातल्या 'च' च्या उच्चारात आहे ती लिखित रूपात दाखवता आली तर बरं होईल असं वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण संदिग्धता हाच केवळ भाषांमधला दोष नाही. लहान मुलाला लवकर ळ म्हणता येत नाही. यात संदिग्धतेचा काही संबंध नाही. ती भाषेची उच्चारविषयक सुधारणा आहे.

लहान मुलांना बरेच काहीकाही म्हणता येत नाही. (यातही संदिग्धतेचा संबंध नाही.) पण म्हणून, लहान मुलांना जे जे काही म्हणता येत नाही, ते सर्व भाषेतून काढून टाकून, आपण सर्वांनी आयुष्यभर बोबडेच बोलत रहावे काय?

कल्पना रोचक आहे. व्यक्तिशः माझी हे करून पहायला हरकत नाही. कल्पना आवडली.

याच कल्पनेचा पुढे विस्तार करायचा झाला, तर नुकत्याच जन्माला आलेल्या अर्भकापासून ते काही महिन्यांपर्यंतच्या बाळांना तर भाषाही येत नाही. सबब, उर्वरित आयुष्यही केवळ 'तॅ पॅ च्यॅ ग्यॅ वँऽऽऽऽऽ' अशा काही मूलभूत ध्वनींनिशी गुजारायला हरकत नसावी. 'भाषेच्या उच्चारविषयक सुधारणे'ची ही कल्पना मस्त आहे.

या तत्त्वावर 'ऐसीअक्षरे'सारखे एखादे संस्थळ चालवल्यास ते कसे दिसेल, याची तूर्तास कल्पना करून पाहत आहे. एक अत्यंत मोहक असे चित्र डोळ्यांसमोर उभे राहत आहे.
=========================================================================================================================================
'गुजारायला'करिता मराठीत 'घालवायला' असा शब्द आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे. केवळ सदर सद्गृहस्थांना सहज कळावे, या कारणास्तव 'गुजारायला' मुद्दाम वापरला आहे. किंबहुना, सदर सद्गृहस्थांना लवकर 'घालवायला' म्हणता येत नाही, या कारणास्तव मराठीतून 'घालवायला' या शब्दास पूर्णपणे घालवून दिले जावे, नि त्याजागी केवळ 'गुजारायला' (किंवा, पर्यायाने, 'बितवायला') असेच शब्द रुजू व्हावेत, अशी 'भाषेची शब्दविषयक सुधारणा' या निमित्ताने मी सुचवू इच्छितो.

म्हणजे, त्याआधी त्यांच्या तोंडात चटकन 'गुजारायला' येते, अशा अर्थी.
=========================================================================================================================================

- बादवे, 'ळ' हा ध्वनी उच्चारायला अगदी लहान मुलांना कदाचित कठीण जात असेलही. परंतु हिंदीत जेथे म्हणून 'ल' हा उच्चार होतो, त्या जागी राजस्थानी/मारवाडी/हरयाणवी वगैरे बोलीभाषांत 'ळ' हा उच्चार (बहुधा मोठ्या माणसांकडून) सर्रास जो होताना दिसतो, तो ती मंडळी प्रयत्नपूर्वक नि अतिकष्टाने करीत असावीत काय? आणि नेमके कशासाठी? हौस म्हणून? 'ळ'चा इतका वापर बहुधा मराठीतही होत नसावा. काहीजणांच्या हौसेला मोल नसते, हेच खरे असावे कदाचित.

- तमिळमध्ये 'ळ'च्या काहीसा जवळ जाणारा (पण नेमका 'ळ' नाही असा, जीभ टाळ्याला बरीच मागे लावली तर येतो तसा) एक ध्वनी आहे. रोमन अक्षरांत त्याचे लिप्यंतरण 'zh' असे केले जाते. लहान मुलांचे माहीत नाही, परंतु हा ध्वनी उच्चारायला मला ज्याअर्थी कठीण जाते, त्याअर्थी तो उच्चारता न येणे ही एक अखिलमानवीय अडचण असावी, असा (माझ्या मनाला येईल तो) निष्कर्ष काढण्यास निदान आजतागायत तरी मला कोणीही अडवलेले नाही. सबब तसा तो काढायचे मी ठरवलेले आहे. तूर्तास कोणा तमिळबांधवाच्या संपर्कात मी नाही, परंतु पुढेमागे तसा संपर्क आल्यास त्या तमिळबांधवास 'भाषेची उच्चारविषयक सुधारणा' मी जरूर सुचवेन. 'भाषेच्या उच्चारविषयक सुधारणे'ची मूळ संकल्पना (नि प्रेरणा) सदर सद्गृहस्थांची असल्याने, परिणामांची जबाबदारी सदर सद्गृहस्थांनी आपल्या शिरावर उचलावी, मला ती उचलावयास लागू नये, एवढीच माझी माफक अपेक्षा आहे.

- बहुतांश भारतीय भाषांमध्ये न सापडणारा एक ध्वनी मराठी भाषेत आहे. (हा ध्वनी भारतीय भाषांपैकी मराठीखेरीज केवळ कश्मीरी भाषेत असल्याबद्दल ऐकलेले आहे.) 'चमचा', 'चावट' वगैरे शब्दांत हा ध्वनी आढळतो. देवनागरीत लिहिताना हा ध्वनी 'च' या चिन्हाने दर्शविला जातो, परंतु हिंदीतील 'च'शी याचा काहीही संबंध नाही. (हिंदीतील 'च' हा ध्वनीसुद्धा मराठीत आहे, आणि देवनागरीत लिहिताना तोही 'च' याच चिन्हाने दर्शविला जातो, परंतु ती बाब अलाहिदा.) या ध्वनीचा उच्चार करणे बहुतांश इतरभाषक भारतीयांस करणे कठीणच नव्हे, तर अशक्य होते; सबब ही अखिलमानवी अडचण असली पाहिजे, तेव्हा मराठी भाषेतून या ध्वनीचे उच्चाटन करून 'भाषेची उच्चारविषयक सुधारणा' होणे अत्यावश्यक आहे. हा ध्वनी मराठी भाषेत असूनसुद्धा तमाम मराठीभाषकांचे आजतागायत कोणतेही नुकसान झालेले नाही, अथवा त्यांस त्यामुळे कोणतीही अडचण आलेली नाही अथवा त्यांची त्यामुळे कोणतीही गैरसोय झालेली नाही, ही बाब अतिशय गौण आहे. आणि लहान मुलांनादेखील या ध्वनीचा उच्चार नाहीतरी लवकर करता येत नाहीच.

शेवटी ही सुधारणा नेमक्या कोणाच्या सोयीसाठी करायची? त्यात्या भाषेच्या सामान्य भाषकांच्या, की हिंदीभाषक/हिंदीधार्जिण्या दिल्लीकरांच्या? हा येथे कळीचा प्रश्न आहे.

'भारत की सभी भाषाएं हमारी अपनी भाषाएं हैं|' अशी एक 'सरकारी घोषणा' दिल्ली परिवहन निगमच्या बशींमध्ये असते, ती काय केवळ बसची शोभा वाढावी म्हणून? की या घोषणेचा अपेक्षित अर्थ 'भारताच्या सर्व भाषांचा (जशा असतील तशा) आपलीच भाषा असल्याप्रमाणे आदर करावा' असा नसून, 'कोणीही उठावे, नि भलेही एखाद्या भारतीय भाषेच्या भाषकांचे त्यावाचून काहीही बिघडत नसो, तरीही, आपल्याला येत नाही म्हणून/आपल्याला अवघड वाटते म्हणून/आपल्या सोयीकरिता ती आपलीच भाषा असल्याच्या थाटात (किंवा जरी अगदी 'आपलीच भाषा' असली, तरीही, , ) त्या भाषेत मनाला येतील त्या 'सुधारणा' सुचवाव्यात - मग भले ही त्यामुळे त्या भाषेच्या मूलभूत स्वरूपात फरक पडो - नि त्याउपर त्या 'सुधारणां'वर त्या भाषेच्या भाषकांकडून गंभीर विचार व्हावा, अशी अपेक्षा करावी' असा आहे?
=========================================================================================================================================
निदान, १९८०च्या दशकात मी त्या विभागात अधूनमधून हिंडत असे, तेव्हा तरी अशी पाटी असे. हल्ली तोही प्रेटेन्स दिल्लीकरांनी सोडून दिलेला असल्यास कल्पना नाही. अन्यथा, उर्वरित भारताविषयीची आणि उर्वरित भारतवासीयांविषयीची (आणि त्यातही विशेषेकरून इतरभाषकांविषयीची) सरासरी दिल्लीकराची एका प्रकारची वसाहतवादी तुच्छतेची अटिट्यूड ही काही नवीन बाब नाही.

सदर सद्गृहस्थ हे तत्त्वतः मराठीभाषक आहेत, याची मला पूर्ण कल्पना आहे.

कदाचित हे थोडे अवांतर होईलही, परंतु सावरकरी भाषा'सुधारणां'बद्दलही मला काहीसा असाच आक्षेप आहे. म्हणजे, मराठी ही सावरकरांची 'आपली' भाषा असेलही, परंतु 'खटला' नाही 'अभियोग' म्हणायचे, 'अर्ज' नाही 'आवेदनपत्र' म्हणायचे हे काय म्हणून? श्री. सावरकरांस हे रूढ शब्द आवडत नव्हते म्हणून? परंतु, (१) सामान्य मराठीभाषकाचे या बदलांवाचून काहीही बिघडत नव्हते, त्यास त्या बदलांची काहीही गरज नव्हती, त्याचे काय? नि (२) आजही हे जुने (सावरकरांना न आवडणारे) शब्दच सामान्य वापरात रूढ आहेत, नि (लिखितस्वरूपातील) 'सरकारी (चुकलो, 'शासकीय') मराठी' वगळल्यास हे सावरकरी 'सुधारित' शब्द अन्यत्र कोठेही फारसे वापरले जात नाहीत, हे काय सांगते?

आणखी एक उदाहरण द्यायचे झाले, तर आमचे चिरंजीव हे मराठीभाषक आईबापांच्या पोटी जन्माला आलेले एक अमेरिकन-इंग्रजीभाषक अमेरिकन सद्गृहस्थ आहेत. अर्थात, (१) त्यांचे आईवडील मराठीभाषक आहेत, आणि (२) जुजबी का होईना, परंतु मराठी त्यांना समजू शकते, प्रयत्नपूर्वक (नि तरीही मोडकीतोडकी) का होईना, परंतु मराठी ते बोलू शकतात, नि अनेकदा मराठी बोलण्याचा आवर्जून प्रयत्नही करतात, या निकषांवर मराठी ही त्यांच्याकरिता 'आपली भाषा' आहे, असे निदान मी तरी म्हणेन.

अर्थात, त्यांची गणना मी 'मराठीभाषकां'त करणार नाही, 'मराठी माणसां'त तर नाहीच नाही. (माझ्या लेखी, त्यांचे वर्गीकरण करायचेच जर झाले, तर (१) सर्वप्रथम आमचे चिरंजीव, (२) त्यानंतर अमेरिकन, नि (३) त्यानंतर झालेच तर मग योगायोगाने मराठीकुलोत्पन्न/भारतवंशीय/हिंदुकुलोत्पन्न/ब्राह्मणकुलोत्पन्न/व्हॉटेवर असे काहीसे करावे लागेल. पण ते एक असो.) परंतु, कोणत्याही निकषाने का होईना, मराठी ही त्यांच्याकरिता 'आपली भाषा' आहे, हे महत्त्वाचे.

आता, मराठी बोलताना आमच्या चिरंजीवांना अंमळ अवघड जाते/अडचणी येतात, हा मराठी भाषेचा मूलभूत दोष आहे काय? नि या कारणास्तव आमच्या चिरंजीवांनी त्यांच्या सोयीकरिता ('आपली भाषा' म्हणून) मराठी भाषेत त्यांना वाटेल तशा 'सुधारणा' सुचवाव्यात काय?१० नि तमाम मराठीभाषकांनी त्या ऐकून त्या अमलात आणाव्यात अशी अपेक्षा करावी काय?११ तमाम मराठीभाषक त्याप्रमाणे आपली भाषा बदलतील काय? आणि त्यांनी आमच्या चिरंजीवांच्या सोयीकरिता तशी ती बदलावी काय?

कशास करायचे, हा भाग अलाहिदा.

या 'व्हॉटेवर'करिता या ठिकाणी समर्पक असा मराठी प्रतिशब्द ज्यानेत्याने आपापलाच शोधून काढून आपल्याआपण घालून घ्यावा.

'नाचता येईना, अंगण वाकडे' अशा एका मराठी म्हणीची या निमित्ताने आठवण येते. अशाच अर्थाची एखादी म्हण हिंदीतही प्रचलित असावी, असे वाटते. सुनील दत्तच्या कोणत्याश्या ('टिपिकल नॉर्थ इंडियन अटिट्यूड'वाल्या) चित्रपटातील कोणत्याश्या गाण्यात ऐकल्याचे आठवते.

१०, ११ तसे ते करणार नाहीत, हा भाग अलाहिदा. तेवढी अक्कल त्यांना आहे; आमचे चिरंजीव झाले, म्हणून काय झाले?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बहुतांश भारतीय भाषांमध्ये न सापडणारा एक ध्वनी मराठी भाषेत आहे. (हा ध्वनी भारतीय भाषांपैकी मराठीखेरीज केवळ कश्मीरी भाषेत असल्याबद्दल ऐकलेले आहे.) 'चमचा', 'चावट' वगैरे शब्दांत हा ध्वनी आढळतो. देवनागरीत लिहिताना हा ध्वनी 'च' या चिन्हाने दर्शविला जातो, परंतु हिंदीतील 'च'शी याचा काहीही संबंध नाही. (हिंदीतील 'च' हा ध्वनीसुद्धा मराठीत आहे, आणि देवनागरीत लिहिताना तोही 'च' याच चिन्हाने दर्शविला जातो, परंतु ती बाब अलाहिदा.) या ध्वनीचा उच्चार करणे बहुतांश इतरभाषक भारतीयांस करणे कठीणच नव्हे, तर अशक्य होते;

हा दंतमूलीय 'च' कोकणी, तेलुगुतही आहे. तेलुगुमध्ये सी. पी. ब्राऊनने दोन 'च'साठी एकाच्या डोक्यावर १ आणि दुसऱ्याच्या डोक्यावर २ (तेलुगुतील) लिहिण्याची पद्धत अवलंबली होती असे वाचले आहे. मराठीतील हे दंतमूलीय च आणि ज हे तेलुगुमधून आले असावेत अशी थिअरीही वाचली आहे.

अवांतर: बाकी लोकांच्या मराठीतले हिंदीटले (हिंदाळलेले?) शब्द शोधताना तुम्ही मराठीत 'कश्मीरी' लिहू लागलात, हे ढवळ्याशेजारी पवळ्याचे उदाहरण समजावे का? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(हा ध्वनी भारतीय भाषांपैकी मराठीखेरीज केवळ कश्मीरी भाषेत असल्याबद्दल ऐकलेले आहे.) '

उदा. काश्मीरी भाषेत ब्रेड ला चोट म्हणतात आणि च चा चमचावाला उच्चार त्यात असतो. हे पहिल्यांदा वाचलं तेव्हा हसूनहसून कळायचं बंद झालं होतं.

संदर्भ: मुंबै ते काश्मीर सायकल प्रवास, लेखक अरुण वेढीकर.

तेलुगुमध्ये काही केसेसमध्ये हा च असल्याचे वाचले होते पण आजवर जितकी तेलुगु ऐकलीये त्यात हा ध्वनी कधी ऐकायला मिळाला नाही. मराठीत काही एखाददुसर्‍याच जुन्या पुस्तकांत (१९व्या शतकातल्या) हा च नुक्तावाला दाखवल्याचे अर्जुनवाडकरांच्या पुस्तकात नमूद आहे. विनोबांनीही असा फंडा वापरलेला आहे-बहुतेक गीताई/गीता प्रवचने यांपैकी कुठेतरी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कश्मीरीतील 'च' (चमच्यातला) या ध्वनीच्या अस्तित्वाबद्दल भाष्य करताना माझ्या डोळ्यांसमोर नेमके 'चोट'चेच उदाहरण होते. (याचा उच्चार 'भिकारचोट'मधल्यासारखा.)

(किंबहुना, कश्मीरीतील तेवढा एकच शब्द मला माहीत आहे. मात्र, उपरोल्लेखित भाष्य करण्यासाठी तेवढे एकच उदाहरण पुरेसे आहे. वैदिक संस्कृतात 'ळ' हा वर्ण असण्यासंबंधी भाष्य करण्याकरिता 'अग्निमीळे'चे एकच उदाहरण - आणि तेही उडतउडत ऐकून, आग्यापिछ्याविनासुद्धा - माहीत असणे पुरेसे ठरते, तद्वत.)

मात्र, 'मुंबई ते काश्मीर (sic) सायकल प्रवास' हे पुस्तक मी वाचलेले नाही. किंबहुना, अशा नावाचे पुस्तक मराठीत कोणी लिहिलेले आहे, तसेच, लेखक तर सोडाच, परंतु 'अरुण वेढीकर' या नावाचा कोणी इसम अस्तित्वात आहे, हेही आजवर माझ्या गावी नव्हते. 'चोट'चा नि माझा परिचय माझ्या महाविद्यालयीन दिवसांत काहीश्या वेगळ्या प्रकारे झाला.

झाले असे. वसतिगृहावरील सुरुवातीच्या रॅगिंगच्या काळात एका सीनियरांच्या गटाच्या तावडीत सापडलेलो असताना, त्यांपैकी एका कश्मीरी सीनियराने उपरोल्लेखित 'चोट' हा शब्द म्हणून दाखवावयास सांगितले. चांगल्या मापाकरिता त्याच्याबरोबरच्या (बहुतांश उत्तर हिंदुस्थानी/दिल्लीवासी) सीनियरांसही म्हणावयास सांगितले. त्याला जाम खात्री की कोणालाही म्हणता येणार नाही म्हणून. पैकी इतरांनी (त्याच्या अपेक्षेप्रमाणेच) 'च्योट' असा उच्चार केला. मी तो उच्चार बरोबर करू शकलो याचे त्याला प्रचंड आश्चर्य वाटले. मग त्याला सांगावे लागले, की मराठीत हा उच्चार आहे, म्हणून

मग त्याचा पुढचा प्रश्न: मग या शब्दाचा अर्थ माहीत आहे का, म्हणून. मग मीही, 'ज्याअर्थी कश्मीरीत हा उच्चार आहे, मराठीतही आहे, नि इतर भाषांत नाही, त्याअर्थी मराठी-कश्मीरी भाईभाई (किंवा गेला बाजार बहिणीबहिणी) असावयास हरकत नसावी, पक्षी अर्थ साधारणतः सारखाच असावा' असा काही(बाही) तर्क लढवून, तितक्याच आत्मविश्वासाने, 'F**k असाच काहीसा होत असावा ना?' असे उत्तर त्यास दिले, त्यावर त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. शेवटी, काहीसा ओशाळून, त्याने 'नाही, त्याचा अर्थ ब्रेड असा होतो', असे कसेबसे सांगितले.

असो. वसतिगृहस्य कथा रम्या, दुसरे काय?
===============================================================================================================
तळटीपा:

लिहिलेले असू का नये, हा प्रश्न अलाहिदा.

पक्षी: अटलांटात वा पुण्यात.

'फॉर गुड मेझर'.

या वेळी जास्त नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वैदिक संस्कृतात 'ळ' हा वर्ण असण्यासंबंधी भाष्य करण्याकरिता 'अग्निमीळे'चे एकच उदाहरण - आणि तेही उडतउडत ऐकून, आग्यापिछ्याविनासुद्धा - माहीत असणे पुरेसे ठरते, तद्वत.

हा हा हा, अगदी नेमके! मंत्रपुष्पांजलीतील "समुद्रपर्यंताया एकराळिती" हेही एक उदाहरण असेच.

मग त्याचा पुढचा प्रश्न: मग या शब्दाचा अर्थ माहीत आहे का, म्हणून. मग मीही, 'ज्याअर्थी कश्मीरीत हा उच्चार आहे, मराठीतही आहे, नि इतर भाषांत नाही, त्याअर्थी मराठी-कश्मीरी भाईभाई (किंवा गेला बाजार बहिणीबहिणी) असावयास हरकत नसावी, पक्षी अर्थ साधारणतः सारखाच असावा' असा काही(बाही) तर्क लढवून, तितक्याच आत्मविश्वासाने, 'F**k असाच काहीसा होत असावा ना?' असे उत्तर त्यास दिले, त्यावर त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. शेवटी, काहीसा ओशाळून, त्याने 'नाही, त्याचा अर्थ ब्रेड असा होतो', असे कसेबसे सांगितले.

असो. वसतिगृहस्य कथा रम्या, दुसरे काय?

जबरी किस्सा!! वसतिगृहस्य कथा खरेच रम्या हेच खरे. काही वंगदेशीय किस्से आठवले आणि अं.ह. झालो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कश्मीरी भाषेत जर त्या भाषेचं नाव कश्मीरी असंच असेल तर सुसंस्कृतपणाखातर आपली जुनी काश्मीरी सवय सोडून देणं इष्ट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कश्मीरी भाषेत जर त्या भाषेचं नाव कश्मीरी असंच असेल...

(हेही तितकेसे योग्य असेलच, असे नाही, पण तरीही...)

या मुद्द्यावर थोडे अधिक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अवांतर: बाकी लोकांच्या मराठीतले हिंदीटले (हिंदाळलेले?) शब्द शोधताना तुम्ही मराठीत 'कश्मीरी' लिहू लागलात, हे ढवळ्याशेजारी पवळ्याचे उदाहरण समजावे का? (डोळा मारत)

'ढवळ्याशेजारी पवळ्या'पेक्षा, आपण मराठीत लिहिताना 'तेलगू'ऐवजी 'तेलुगु' असे लिहिलेत, त्याच्या थोडाफार जवळ जाणारा प्रकार मानता यावा.

थोडक्यात, ही खूप पूर्वी (आणि जाणूनबुजून लावून घेतलेली) सवय आहे. काहीसा 'डू अंटु अदर्स', , प्रकारचा विचार त्यामागे आहे. (भौगोलिक स्थानाबद्दल लिहितानासुद्धा मी 'जम्मू आणि कश्मीर' असेच - जाणूनबुजून लावलेल्या सवयीने - लिहितो, आणि खूप पूर्वीपासून लिहीत आलेलो आहे.)

हा दंतमूलीय 'च' कोकणी, तेलुगुतही आहे. तेलुगुमध्ये सी. पी. ब्राऊनने दोन 'च'साठी एकाच्या डोक्यावर १ आणि दुसऱ्याच्या डोक्यावर २ (तेलुगुतील) लिहिण्याची पद्धत अवलंबली होती असे वाचले आहे. मराठीतील हे दंतमूलीय च आणि ज हे तेलुगुमधून आले असावेत अशी थिअरीही वाचली आहे.

ही माहिती रोचक आहे. आभारी आहे.
==============================================================================================================
कोणी जर पुण्याला 'पूना' म्हटले, तर आपण तोंड वाकडे करतो, नि मुंबईला 'बाँबे' किंवा 'बंबई' म्हटले, तर त्यास रस्त्यात बदडून काढतो. आपल्या (स्थलवाचक किंवा अन्य) विशेषनामांचा भ्रष्ट अथवा चुकीचा उच्चार केलेला जर आपल्याला खपत नाही, तर इतरांसही तत्सम सौजन्य दाखवावयास प्रत्यवाय नसावा, ही धारणा. (या दृष्टीने, 'चेन्नई', 'तिरुवनंतपुरम', 'कोलकाता', झालेच तर 'तेलुगु', 'कन्नड' अशी रूपे मराठी लेखी वापरात आजकाल रूढ होऊ लागली आहेत, ही आशादायक बाब आहे, त्याचाच विस्तार करण्याचा हा किंचितसा प्रयत्न. याच धर्तीवर, 'ग्वालियर', 'वडोदरा', 'भोपाल', 'झाँसी' अशी रूपे मराठी लेखनात जेव्हा रूढ होतील, तो सुदिन.)

वस्तुतः, 'कश्मीरी' हे त्या भाषेचे त्या भाषेतील नाव नव्हे. तसेच, कश्मीरचे त्या भाषेतील नावही 'कश्मीर' नव्हे. त्या नावांचा उच्चार 'कॉशुर' (भाषेचे नाव) आणि 'कशीर' (स्थलवाचक विशेषनाम) असा काहीसा होतो, असे विकीवरून कळते. तेव्हा, तत्त्वानुसार काटेकोरपणेच जायचे झाले, तर 'कश्मीरी', 'कश्मीर' अशी रूपे लिहिणे हेसुद्धा योग्य नव्हे, असा काही आपला आक्षेप असल्यास तो मला मान्य आहे.

परंतु, 'कश्मीरी'/'कश्मीर' हे बरोबर नसेलही कदाचित, म्हणून 'काश्मिरी'/'काश्मीर' हे धडधडीत चूक आहे, हे माहीत असतानादेखील ते तसेच वापरत राहणे मला योग्य वाटत नाही / माझ्याच्याने होत नाही. भले ही 'माझी' (पक्षी: 'मराठी माणसाची') चूक असेल, पण म्हणूनच, ती चूक माझ्या परीने शक्य तितकी दुरुस्त करणे ही माझी जबाबदारी आहे, असे मला वाटते. आणि म्हणूनच मी 'काश्मिरी', 'काश्मीर' अशी रूपे वापरणे टाळतो. तेव्हा, राहता राहिली गोष्ट त्या नावांच्या योग्य रूपांची.

मात्र, त्या भाषेची (आणि प्रदेशाची) त्या भाषेतील नावे वापरण्यात मला काही अडचणी आहेत. एक तर विकी हा प्रकार 'कोणीही यावे, काहीबाही खरडोनि जावे' वर्गातला असल्याकारणाने, विकीवरील माहितीवर मी चटकन डोळे झाकून विश्वास ठेवू शकत नाही. यात विकीवर त्या (औच्चारिक) नोंदी करणार्‍याची काटेकोरपणाच्या दृष्टिकोनातून विश्वासार्हता२अ, त्या औच्चारिक नोंदींकरिता त्या उच्चारांचे देवनागरीत लिप्यंतरण करतानाचा त्याचा अचूकपणा, असे लिप्यंतरण करताना त्याने वापरलेले संकेत आणि ते लिप्यंतरण समजण्याकरिता मला अभिप्रेत असणारे संकेत यांच्यातील तफावत; शिवाय, त्याच्या देवनागरी संकेतांप्रमाणे कदाचित ती रूपे अचूक आहेत असे जरी मानले, तरी ते संकेत मला माहीत नसल्याकारणाने आणि कदाचित मराठी वाचकांसही ठाऊक नसल्याकारणाने, मी ते मराठीत लिहिताना जसेच्या तसे उतरवून काढल्यास, देवनागरीच्या मराठीकरिताच्या संकेतांप्रमाणे त्यांचा भलताच काही उच्चार तरीही निघण्याची शक्यता२ब, असे अनेक घटक यात कडमडतात. तेव्हा, त्याही परिस्थितीत, त्या नावांचा त्या भाषेतील अचूक उच्चार काय असावा, याबद्दल माझ्या मनातील संदेह तरीही कायम राहतोच.

तेव्हा, चूक सुधारण्याच्या प्रयत्नांत अज्ञानापोटी आणखी एखादी (नवी) चूक करण्यात काय हशील?

शिवाय, प्रयासांती या नावांची त्या भाषेतील योग्य रूपे जरी मी जाणून घेतली, आणि त्यांचे मराठी संकेतांप्रमाणे योग्य असे लिप्यंतरण करून मी ते वापरू लागलो, तर मराठी वाचकांस त्यातून बहुधा काहीही अर्थबोध होणार नाही, ही अडचण आहेच; त्याकरिता, योग्य ती रूपे लिहून त्याबरोबर कंसात मराठी माणसांस समजणारे (चुकीचे) पर्याय लिहिण्याचे दुहेरी कष्ट आले. शिवाय, ते वाचावयासही त्रासदायक (इरिटेटिंग) ठरू शकते, आणि 'इट डिफीट्स द पर्पज़' (मराठी?), याही अडचणी आहेतच. अर्थात, हे समर्थन होऊ शकत नाही, परंतु त्यास माझा आळस या सदरात फाइल करता यावे.

पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे, जम्मू आणि कश्मीरची अधिकृत राजभाषा उर्दू आहे, आणि त्या भाषेत कश्मीरी (भाषा) आणि कश्मीर (प्रदेश) यांची नावे अनुक्रमे 'कश्मीरी' आणि 'कश्मीर' अशी प्रचलित आहेत. ज्या अर्थी कश्मीरमध्ये या नावांच्या योग्य उच्चारांवरून आजतागायत चळवळी झालेल्या नाहीत, आणि ज्या अर्थी कश्मीरी मनुष्य स्वतः या नावांचा उच्चार निदान उर्दूत बोलताना तरी 'कश्मीरी', 'कश्मीर' असाच करतो (मग भले ही स्वतःच्या कश्मीरी भाषेत तो उच्चार तो मनुष्य कसाही करत असो), त्या अर्थी उर्दूपुरता/कश्मीरी भाषा बोलत नसतानापुरता तरी त्याला 'कश्मीरी', 'कश्मीर' या उच्चारांकरिता (निदान आजवर तरी) आक्षेप नसावा, या अर्थी तरी त्यास ही रूपे 'कोशर'२क असावीत, ग्राह्य असावीत. तेव्हा, कश्मीरी माणूस जोवर (उर्दूत बोलताना का होईना, पण) (१) 'कश्मीरी', 'कश्मीर' या रूपांस आक्षेप घेऊन त्यांविरुद्ध चळवळ करीत नाही, आणि (२) अशी रूपे (उर्दूत/इतरभाषकांशी बोलताना) स्वतः वापरतो२ड, तोवर (तात्पुरता पर्याय म्हणून तरी) अशी रूपे वापरण्याचा तडजोडीचा मार्ग स्वीकारण्यात मला काही गैर वाटत नाही. (मात्र, 'काश्मिरी', 'काश्मीर' ही रूपे त्याने स्वतः कोणतीही भाषा वापरताना कधीही वापरलेली नसल्याकारणाने, त्यास ती ग्राह्य असण्याचे काहीही कारण असू नये; सबब 'काश्मिरी'/'काश्मीर' चूक ते चूकच!)

अर्थात, ज्या दिवशी कश्मीरी मनुष्य (प्रसंगी चळवळ करून) स्वतःच (उर्दूतसुद्धा) या रूपांचा त्याग करून त्यांची मूळ कश्मीरी रूपे (उर्दूतूनसुद्धा) अधिकृतरीत्या प्रस्थापित करेल, त्या दिवसाची मीही वाट पाहत आहे. एक म्हणजे, या नावांचा योग्य उच्चार कसा करावा, हे त्या निमित्ताने समजेल, दुसरे म्हणजे, ती रूपे वापरल्यास मराठीभाषकांना ती कळण्याची शक्यता वाढेल. त्या दिवसापासून ती रूपे वापरू लागण्यास मला आनंदच होईल. परंतु तोपर्यंत माझ्याकरिता 'कश्मीरी'/'कश्मीर'च बरे. ('काश्मिरी', 'काश्मीर' नव्हे.)

२अ ग्रिअर्सनच्या कश्मीरी-ते-इंग्रजी शब्दकोशाच्या आंतरजालीय आवृत्तीत ही रूपे देवनागरीत अनुक्रमे 'कोशुरु' आणि 'कशीरु' अशी नोंदवलेली आढळतात. विकीवरील नोंदीत आणि ग्रिअर्सनसाहेबाच्या या नोंदीत किंचितच का होईना, परंतु तफावत आहे. कोण जाणे, कदाचित ही किंचित तफावत ग्रिअर्सनसाहेबाचे संकेत आणि विकीवरील नोंदकाराचे संकेत यांचे म्यापिंग करून 'एक्स्प्लेन अवे' करता येईलही, परंतु त्याकरिता पूर्वावश्यक असलेले ज्ञान माझ्याजवळ नाही, सबब तसे करण्यास मी व्यक्तिशः असमर्थ आहे. शिवाय वरील मधील सर्व अडचणी (ग्रिअर्सनला कळलेल्या उच्चाराचा अचूकपणा - शेवटी बोलूनचालून तो पडला (बहुधा) इंग्रज!, त्या उच्चाराची देवनागरीत नोंद करताना त्यास अभिप्रेत असलेले संकेत, त्या संकेतांच्या ज्ञानाअभावी मराठीकरिताच्या देवनागरीच्या अनुभवातून मला अभिप्रेत होणारे संकेत, या दोन संकेतांमधील तफावत, इ.) ग्रिअर्सनसाहेबाच्या संदर्भातदेखील लागू आहेतच.

२ब उदाहरणार्थ, 'बँक' हा शब्द हिंदीत देवनागरीतून 'बैंक' असा लिहिला जातो. एखाद्या मराठी माणसाने देवनागरीच्या मराठी संकेतांनुसार हा (हिंदीतील) लिखित शब्द वाचल्यास त्याचा उच्चार तो 'बइंक' असा काहीसा करेल. मात्र, एखादा हिंदीभाषक तो शब्द वाचून जो उच्चार करेल, तो 'बँक'च्या बर्‍यापैकी जवळ जाणारा असेल.

२क हा विनोदाचा क्षीण प्रयत्न आहे. हसल्यास फार फार तर दात दिसतील, सबब ते बेढब अथवा पिवळे असल्याखेरीज फारसे काही नुकसान (पाहणार्‍याचे) होऊ नये. सबब, जमल्यास प्रयत्न अवश्य करावा.

२ड 'पूना', 'बाँबे'/बंबई', 'थाना', 'धुलिया', 'शोलापूर', 'कर्की' (मराठीत: 'खडकी'), अशा रूपांचे अधिकृतरीत्या उच्चाटन होऊन त्या जागी मराठी रूपे अधिकृतरीत्या प्रस्थापित होईपर्यंत, अशी (बिगरमराठी) रूपे मराठीव्यतिरिक्त इतर भाषांतून बोलत असताना वापरण्यास खुद्द मराठी माणसास फारसे काही वाटत नसे, असे आठवते.

हे तत्त्व मी सदासर्वदा काटेकोरपणे पाळतोच, असेही नाही. म्हणजे, आजही मी 'पॅरिस', 'मॉस्को', 'लॉस अँजेलिस', 'अटलांटा' असेच लिहितो; 'पारी', 'मोस्क्वा', 'लोस आंखलेस', 'अटलॅणः' असे लिहीत नाही. आमच्या ओबामाबाबूंच्या भाषेत सांगायचे झाले तर, याविषयीची माझी पोझिशन तूर्तास इव्हॉल्व्ह होत आहे. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कश्मीर-काश्मीर ह्या दोन उच्चारातील अधिक ग्राह्य कोणता, तद्देशीय लोक त्या शब्दाचा उच्चार कसा करतात ह्याविषयी मला माहितीअभावी निश्चित काही सांगता येत नाही. तरी इतके नमूद करू शकतो की 'कश्मीर' हा उच्चार १५०० वर्षे इतका तरी जुना असावा.

६व्या-७व्या शतकात लिहिलेल्या मुद्राराक्षस नाटकात १.२० ह्या श्लोकात 'नामान्येषां लिखामि ध्रुवमहमधुना चित्रगुप्त: प्रमार्ष्टु' ( ही नावे मी लिहिली आहेत आणि त्यांचा विनाश आता निश्चित आहे, चित्रगुप्ताला हवे तर त्याने ती पुसावीत) असे दर्पोद्गार चाणक्य ज्या राजांच्या संदर्भात करतो त्या नावांच्या यादीत 'काश्मीरः पुष्कराक्षः' असा एक राजा आहे. 'काश्मीर' म्हणजे 'कश्मीर'चा अशी त्याची उपपत्ति लावता येते. (पुढचे नाव आहे 'सैन्धवः सिन्धुषेणः - सिंधुदेशाचा सिन्धुषेण.)

ह्याउलट मोनियर विल्यम्सने त्या प्रदेशाचे नाव 'काश्मीर' असेच दाखविले आहे, 'कश्मीर' नाही हेहि ध्यानात घ्यायला हवे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगन्नाथ पंडितांच्या भामिनीविलासातला हा श्लोक पाहिला तर उच्चार काश्मीर असा आढळतो.

विश्वाभिरामगुणगौरवगुम्फितानां
रोषोऽपि निर्मलधियां रमणीय एव ।
लोकम्पृणैः परिमलैः परिपूरितस्य
काश्मीरजस्य कटुतापि नितान्तरम्या ॥ ७१ ॥

काळ साधारणपणे १६००-१७०० इ.स. च्या वेळचा असावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जगन्नाथ पंडित हे अकबराच्या दरबारात होते ना? त्यांनी गङ्गालहरी हे काव्य लिहिले आहे असे वाटते.

ऊप्स.... गंगालहरी लिहिणारे पंडित जगन्नाथ तर्कपंचानन हे वेगळे असे विकीपीडिया म्हणतो. यांच्याकरवी ब्रिटिशांनी हिंदू व्यक्तिगत कायद्याचा पाया घातला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हे तर्कपंचानन कोण? नाव पहिल्यांदाच ऐकतोय. गङ्गालहरी लिहिणारे जगन्नाथ पंडित हेच भामिनीविलासवाले होत अशी माझी तरी समजूत आहे. लवंगी नामक मुस्लिम राजकन्येवर (शहाजहानची मुलगी म्हणे) प्रेम केल्यामुळे ब्राह्मणांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला आणि त्यांनी गंगेच्या घाटावर(बहुतेक दशाश्वमेध घाट असावा)उभे राहून ५२ श्लोक रचले-प्रत्येक पायरीस एक याप्रमाणे. आणि नंतर गङ्गामाईने त्यांना आपल्यात सामावून घेतले अशी कथा ऐकली आहे.

हे मूळचे आंध्रदेशातील होत. तर्कपंचानन बंगालातले दिसतात. शहाजहानच्या काळात त्यांनी दिल्लीश्वराची स्तुती करणारा
"दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा मनोरथान् पूरयितुं समर्थः | अन्यैर्नृपालै: परिदीयमानं शाकाय वा स्यात् लवणाय वा स्यात् || " हा श्लोक रचला होता. खुद्द राजाने त्यांना काय पाहिजे असे विचारल्यावर "न याचे गजालिं न वा वारिराजिं न वित्तेषु चित्तं मदीयं कदाचित् " इ.इ. म्हणून "लवंगी कुरंगी मदंगीकरोतु" अशी सरळ राजकन्येचीच याचना केली. नंतर "यवनी नवनीतकोमलांगी" इ. रचनासुद्धा बरीच रचलेली आहे.

मला नीट आठवत असेल तर शेल्डन पोलॉकच्या एका पेपरमध्ये जगन्नाथ पंडितांनी आपल्या मुलावर/बायकोवर लिहिलेल्या संस्कृत विलापिकांवर पर्शियन काव्याचा प्रभाव दिसतो असाही उल्लेख आहे.

बाकी सोडा, पण ती लवंगी शहाजहानची मुलगी असावी हे काही पटत नाही एकुणात. पाहिले पाहिजे काय ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काश्मीर वरची आम्ची ऑथॉरिटी...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

याच कल्पनेचा पुढे विस्तार करायचा झाला, तर नुकत्याच जन्माला आलेल्या अर्भकापासून ते काही महिन्यांपर्यंतच्या बाळांना तर भाषाही येत नाही. सबब, उर्वरित आयुष्यही केवळ 'तॅ पॅ च्यॅ ग्यॅ वँऽऽऽऽऽ' अशा काही मूलभूत ध्वनींनिशी गुजारायला१ हरकत नसावी. 'भाषेच्या उच्चारविषयक सुधारणे'ची ही कल्पना मस्त आहे.

या धाग्यावरची सगळी चर्चा 'शब्दांची संख्या आणि आशयाची अचूकता' या एकाच बाबीवर केंद्रित झाली होती. 'इतरही विषय आहेत' असे मला म्हणायचे होते. म्हणून मी आशयाची अचूकता हा प्रकार मधे आणताच येत नाही असे हे एक उदाहरण दिले.

धाग्याचा संदर्भ लक्षात न घेता ळ च्या उदाहरणाचा आपण अर्थ लावला आहे. उच्चारांबाबत अनेक उदाहरणे देण्याचा मी प्रयत्न केला आहे. आय पी ए च्या चार्टची लिंकपण मी वर दिली आहे. हे ळ संबंधित वाक्य लिहिण्यापूर्वी ध्वनी आणि उच्चार यांच्यासंबंधी कितीतरी विधाने, प्रतिसाद या धाग्यात आहेत. मनुष्याकडून उच्चारली जाऊ शकणारी 'एकमेकांपासून पूर्णतः भिन्न' असे १०७ अक्षरे आहेत. तरीही उच्चारांचे वर्णन पूर्ण होत नाही. यावर अजून ५२ diacritics, 4 prosodies आणि कितीतरी दीर्घसंस्कार (attributes that cannot be traced if only one letter is spoken out) आहेत. या सर्वांना आपण एकके म्हणू. कोणत्या भाषेत 'किती' आणि 'कोणती' एकके आहेत याचा कशाचा कशाला मेळ नाही. उदाहरणार्थ, इंग्रजीत १०७ पैकी ४० च अक्षरे वापरली जातात.

इथे जशी 'च'च्या उच्चाराची चर्चा झाली आहे तसा प्रकार ज बाबत पण आहे. जठर मधला ज आणि जव मधला ज हे भिन्न आहेत. एक प्रकार श आणि ष चाही आहे. उदाहरण म्हणून आपण श आणि ष पूर्णतः भिन्नपणे उच्चारता आणि ऐकता येणारे दोन जण घेऊ. पैकी एकाला 'षशाला शाशीषिक षैशोशिचे ......' असे एक वाक्य चिठ्ठीवर लिहून देऊ आणि वाच म्हणू आणि दुसर्‍याला ते 'फक्त ऐकून' लिही म्हणू. मला खात्री वाटते कि चिठ्ठीवरचे वाक्य आणि ऐकणाराने लिहिलेले वाक्य यांच्यातले श/ष जुळणार नाहीत. 'एकमेकांपासून पूर्णत: भिन्न' उच्चार कसे ठरवायचे आणि मोजायचे याचा संक्षिप्त आढावा मी वर घेतला आहे.

इथे धागा मराठीत आहे आणि काही उदाहरणे मराठीत आहेत याखेरीज मराठीचा आणि इथे वापरलेल्या 'भाषा' शब्दाचा संबंध नाही. या धाग्यात कोणत्याही भाषाविशेषावर टीका नाही हे अगोदरच सांगितले आहे.

अर्थाचा अनर्थ आणि भागवताच्या चिंध्या कशाला म्हणतात त्याचे आपला हा प्रतिसाद एक उत्तम उदाहरण आहे. शिवाय आपण ज्या प्रकारे आपल्या मुलाची इत्यंभूतपणे पत्रिका मांडली आहे (तो आत्ताच उपवर/उपवधु झाला आहे कि काय अशी शंका मला त्याच्याबद्दलचे वाचन संपवेपर्यंत येऊ लागली होती), ज्या प्रकारे सावरकर, दिल्लीकर, इ ना प्रतिसादात गोवले/उल्लेखले आहे ते पाहता नवी बाजू मांडण्याची सिद्धी आपण कशी प्राप्त केली असावी याची कल्पना आली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

धाग्याचा संदर्भ लक्षात न घेता ळ च्या उदाहरणाचा आपण अर्थ लावला आहे. उच्चारांबाबत अनेक उदाहरणे देण्याचा मी प्रयत्न केला आहे. आय पी ए च्या चार्टची लिंकपण मी वर दिली आहे. हे ळ संबंधित वाक्य लिहिण्यापूर्वी ध्वनी आणि उच्चार यांच्यासंबंधी कितीतरी विधाने, प्रतिसाद या धाग्यात आहेत. मनुष्याकडून उच्चारली जाऊ शकणारी 'एकमेकांपासून पूर्णतः भिन्न' असे १०७ अक्षरे आहेत. तरीही उच्चारांचे वर्णन पूर्ण होत नाही. यावर अजून ५२ diacritics, 4 prosodies आणि कितीतरी दीर्घसंस्कार (attributes that cannot be traced if only one letter is spoken out) आहेत. या सर्वांना आपण एकके म्हणू. कोणत्या भाषेत 'किती' आणि 'कोणती' एकके आहेत याचा कशाचा कशाला मेळ नाही. उदाहरणार्थ, इंग्रजीत १०७ पैकी ४० च अक्षरे वापरली जातात.

लेखात 'ळ'च्या संदर्भात आपल्याला जर काही मुद्दा मांडावयाचा असेलच, तर तो इतक्या गदारोळात हरवून गेलेला आहे, की "'ळ'चा उच्चार लहान मुलांना सहज करता येत नाही" याबद्दल आपल्याला काही vague objection आहे, याउपर काहीही अर्थबोध होऊ नये. (लेखाचेच कशाला, आपल्या या प्रतिसादातील उपरोद्धृत परिच्छेदाबद्दलही हेच म्हणता येईल.)

सबब, इतर काही अर्थबोधाच्या शक्यतेविना, आपल्या या दृग्गोचर होणार्‍या vague objectionच्या आधारावर त्यातून तत्काल अभिप्रेत होणार्‍या (कदाचित आपणांस अपेक्षित नसलेल्याही) अर्थनिष्पत्तीस working hypothesis मानून - आहे त्यात गोड मानून - (प्रतिवादाचे) काम भागवून घेणे अपरिहार्य ठरते.

एक प्रकार श आणि ष चाही आहे. उदाहरण म्हणून आपण श आणि ष पूर्णतः भिन्नपणे उच्चारता आणि ऐकता येणारे दोन जण घेऊ. पैकी एकाला 'षशाला शाशीषिक षैशोशिचे ......' असे एक वाक्य चिठ्ठीवर लिहून देऊ आणि वाच म्हणू आणि दुसर्‍याला ते 'फक्त ऐकून' लिही म्हणू. मला खात्री वाटते कि चिठ्ठीवरचे वाक्य आणि ऐकणाराने लिहिलेले वाक्य यांच्यातले श/ष जुळणार नाहीत. 'एकमेकांपासून पूर्णत: भिन्न' उच्चार कसे ठरवायचे आणि मोजायचे याचा संक्षिप्त आढावा मी वर घेतला आहे.

(१) वाक्य वाचणार्‍याच्या औच्चारिक मर्यादा आणि वाक्य ऐकण्याच्या कानाच्या मर्यादा यांच्या संयुक्त परिणामांचा या प्रयोगावर प्रभाव पडण्याची शक्यता पुष्कळ आहे. थोडक्यात, यात 'श' आणि 'ष' यांतील (निकटसान्निध्यातील) साधर्म्याबरोबरच distortion in communicationचाही (कानगोष्टीचा) भाग यावा. या दोन उच्चारांचे भिन्नत्व/स्वतंत्र स्थान खोडून टाकण्याकरिता हे पुरेसे नसावे.
(२) 'चटईला टाचणी टोचली' या वाक्यावर असा काही प्रयोग केल्यासही बहुधा अशीच प्रचीती यावी. बरे मग? 'च' आणि 'ट' यांपैकी नेमक्या कशाला चाट द्यावी म्हणता?

अर्थाचा अनर्थ आणि भागवताच्या चिंध्या कशाला म्हणतात त्याचे आपला हा प्रतिसाद एक उत्तम उदाहरण आहे. शिवाय आपण ज्या प्रकारे आपल्या मुलाची इत्यंभूतपणे पत्रिका मांडली आहे (तो आत्ताच उपवर/उपवधु झाला आहे कि काय अशी शंका मला त्याच्याबद्दलचे वाचन संपवेपर्यंत येऊ लागली होती), ज्या प्रकारे सावरकर, दिल्लीकर, इ ना प्रतिसादात गोवले/उल्लेखले आहे ते पाहता नवी बाजू मांडण्याची सिद्धी आपण कशी प्राप्त केली असावी याची कल्पना आली.

Smile आदाब अर्ज़ है, मियाँ|

अवांतर:

आपण ज्या प्रकारे आपल्या मुलाची इत्यंभूतपणे पत्रिका मांडली आहे (तो आत्ताच उपवर/उपवधु झाला आहे कि काय अशी शंका मला त्याच्याबद्दलचे वाचन संपवेपर्यंत येऊ लागली होती)

आपल्याकडील एखाद्या उपवर मुलीचे स्थळ सुचविण्याचा पुढेमागे इरादा असल्यास, 'यंदा कर्तव्य नाही' 'पत्रिका जुळत नाही' हेही आत्ताच (कायमस्वरूपी) बजावून ठेवतो.
==========================================================================================================
असाच काही अनुभव आमच्या लिखाणातून इतरांस आल्यास आम्हांस त्याबद्दल काहीही प्रत्यवाय नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरुणजोशींना काय करायचे आहे हे आता लक्षात आल्यासारखे वाटते...

म्हणजे गेली काही लाख वर्षे चालू असलेल्या नैसर्गिक प्रक्रियेतून जी 'भाषा' नामक संस्था निर्माण झाली तिच्यात दोष आहेत आणि ते काढून टाकून पूर्णतः 'निर्दोष' अशी काही वस्तु त्यांना बनवायची आहे आणि आपण काहीजण मिळून ती बनवू शकतो असे त्यांना वाटत आहे.

अशी मागणी करणे जरा अवास्तव वाटत नाही काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशी भाषा बनवली तरी ती वापरणार कोण, तिचा प्रसार करणार कसा वगैरे व्यावहारिक प्रश्न पडले आहेत.

आणि अशी काही "निर्दोष" भाषा बनवलीच तर काव्य, शास्त्र, विनोदाचं भविष्य धोक्यात येईल अशी भीती वाटते. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आणि अशी काही "निर्दोष" भाषा बनवलीच तर काव्य, शास्त्र, विनोदाचं भविष्य धोक्यात येईल अशी भीती वाटते.

असंच कै नै. गणितावरही जिथे लोक कविता करू शकतात तिथे अशी भीती निराधार आहे. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

संदिग्धता संपल्यावर या मजेशीर कवितेचं भविष्य काय असेल याचे किडे वळवळल्याने मी चिंतातुर झाल्ये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या धाग्यावर भाषेतील संदिग्धता नष्ट झाली तर तिचे सौंदर्य आणि तद्विषयक अनुभव नष्ट होतील अशी भिती वारंवार प्रकट करण्यात येत आहे.

त्याच्या करिता मी एक उदाहरण देऊ इच्छितो. सगळ्या electrical circuits मधे थोडा फार resistance असतो. तो म्हणजे संदिग्धता. जर सुपरकंडक्टर वापरले तर पावर प्लांटचे, तारांचे, उपकरणाचे नुकसान होईल का?

संदिग्धता म्हणजे भाषेतील undesired element. ती संपली तर आपण जोक सांगीतला आणि आपल्याला अपेक्षित असूनही कोणी हसले नाही असे होणार नाही. (conditions apply) नको तिथे विनोद होतात , इ परिस्थिती तव्हाही चालू असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

संदिग्धता संपल्यास 'मेरी ह्याड अ लिट्ल ल्यांब' या कवितेतून निघणार्‍या मनोरंजक अर्थांनाही जग मुकेल, ही त्याहीपेक्षा मोठी भीती आहे.

(त्याशिवाय, गडकर्‍यांची - की गडकर्‍यांच्या नावावर कोणीतरी खपवून दिलेली, याची नक्की कल्पना नाही - कदाचित आजच्या जमान्यात पोलिटिकली तितकीशी करेक्ट ठरू शकणार नाही अशी, कदाचित एका पंक्तीविषयी जातिवाचक नामोच्चाराचा आरोप लागू शकेल अशी, परंतु तरीही मनोरंजक अशी एक चतुष्पदी ऐकलेली आहे, तिचाही बट्ट्याबोळ होईल.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

न्यूस्पीक वापरली पाहिजे! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही अंशी ती आत्ताही वापरल्या जातेच, नैका Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'निर्दोष अशी काही वस्तु' असे म्हणायची गरज नाही. वस्तु ऐवजी पुन्हा भाषा म्हटले तर चालेल. बोलणे, ऐकणे, लिहिणे, वाचणे हे चालत राहिल म्हणून वस्तू न म्हणता भाषा म्हणणेच योग्य.

आपण काहीजण मिळून काही करणे अभिप्रेत नाही. ते नक्कीच अवास्तव आहे. ते CDAC ला करू द्या.

(ऊदा. मराठीपुरता विचार करायचा झाला तर मराठीत १६ स्वर आहेत. त्यातले ४ काढून टाकणे. ऋ, ॠ ,लॄ, लॄ. तीन जोडणे - अ‍ॅ, ऑ, अं (केलं, उचललं). अ: पण काढून टाकावा. कः, कह, क्ह हे तीन भिन्न उच्चार आहेत का? किती अडगळ घेऊन चालावी? ई आणि ऊ पण काढावेत असे मला कधी वाटते. आणि त्यांना ठेवायचेच असेल तर लांब अ पण असतो. लांब अ म्हणताना आ होत नाही. अनुस्वारांचं काय? त्यांचा सातत्याने उच्चार होतो आणि बिनासातत्यानेही होतो.) किंवा (भाषेत प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष असे पुरुष नसावेतच, त्यांचा उपयोग नाही. म्हणजे मी, तू, तो असणारच पण आलो, आली, आले, इ नसावे.) किंवा ( संस्कृतमधे आत्मनैपदी आणि परस्मैपदी हे क्रियांपदांचे प्रकार बेसलेस आहेत. सगळी क्रियापदे एकाच प्रकारे चालवावी) किंवा (षष्ठी विभक्ती अत्यंत सदोष आहे. प्रत्येक गोष्टीचा संबंध फार थोड्क्यात गुंडाळला आहे. तिच्यात सरसकटीपणाचा अतिरेक आहे. जसे माझा शत्रू कोणत्याही अर्थाने 'माझा' नसतो, माझा लाडू खर्‍या अर्थाने माझा असतो हा फरक ही विभक्ती ओळखतच नाही.) अशा प्रकारचे प्रश्न मांडायचा फोरम हा धागा आहे.

आणि (आपण शहाणपणाने संवादाचा नीट अर्थ काढतो. हा शहाणपणा, शहाणपणा नसून सवय/स्किल असू शकते) असेही विचार मांडायचा हा धागा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वरचा प्रतिसाद वाचून प्रा. मिलिंद मालशे यांनी वेगळ्या संदर्भात श्री. शुभानन गांगल यांना लिहीलेलं पत्र आठवलं. त्या पत्राचा दुवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

व्याकरणानुसार वाक्यांचे ४-५ प्रकार आहेत. १. सामान्य विधान २. प्रश्नार्थ ३. आज्ञार्थ ४. विस्मयार्थ . (यांची या प्रतिसादात चर्चा आहे म्हणून प्रतिसादाचे नाव अर्थ ठेवले आहे.) उदाहरण म्हणून ती अनुक्रमे १. तू आला आहेस., २. तू आला आहेस का?, ३. तू ये., ४. तू आलास!, अशी मांडता येतील. शिवाय विध्यर्थ हाही एक प्रकार आहे - तू यावेस. या प्रकाराला इच्छावाचक असेही म्हणता येईल.

मानवाच्या कितीतरी प्रकारच्या भावना असल्या तरी प्रश्न, आज्ञा, विस्मय आणि इच्छा असे चार विचार पारंपारिक भाषेत वाक्याच्या रचनेने महत्त्वाचे मानले गेले आहेत. 'हे चयन पुरेसे आहे का? हेच चयन योग्य आहे का?' यांची इथे चर्चा आहे.

खालील उतारा वाचा.
१९६२ च्या भारत चीन युद्धात भारताची चांगलीच पिछेहाट झाली. चीनने संपूर्ण अरुणाचल प्रदेशावर कब्जा केला होता. उत्तर नागालँडचा बराच भाग चीनच्या अधिपत्याखाली आला. आसामात खोल दक्षिणेपर्यंत चीनचे सैन्य घुसले होते. इतके की आसामातल्या महत्त्वाच्या तेजपूर शहराच्या ते सीमेवर येऊन ठेपले. भारतीय लष्कराचा वादातीत अजिंक्यतेचा दावा संपुष्टात आला.

ऐसी अक्षरे नामक मराठी संकेतस्थळावर अरुणजोशी नावाच्या भारतीय व्यक्तिने हा उतारा लिहिला आहे. इथले सगळे वाचक भारतीय आहेत. या उतार्‍यात नक्कीच कुठेतरी विषाद, इ दडला आहे असे वाचणारास वाटेल. (नसेल तर कृपया अरुणजोशीची आपल्या लेखनाने विषाद निर्माण करण्याची क्षमता आहे असे क्षणभर माना. Biggrin )

पण हा उतारा कोण्या चीनी माणसाने अतिशय आनंदाने आणि गर्वाने लिहिलेला निघाला तर? उतार्‍याचा सुर उतार्‍यात कुठेच प्रगट होत नाही. उतार्‍याचा सुर हा भाषेने कॅप्चर होणार्‍या आज्ञा, प्रश्न, इच्छा, विस्मय यांच्या कक्षेत येत नाही हे याचे मूळ कारण आहे. समजा हा उतारा स्पॅनिश मधे आहे आणि कोणी चिलीचा नागरीक वाचत आहे. त्याला या उतार्‍यात कोणता सुर गवसेल? याचा अर्थ असा होतो कि अपुरी माहीती किंवा पार्श्वभूमी असलेला माणूस लेखनाचा आपलाच असा नवा अर्थ काढतो. नेहमीच असे होते कि लेखनाचा स्रोत आणि इतर माहितीच लिहायचा सुर काय होता हे ठरवत असते.

'वेद पाकिस्तानात निर्माण झाले. संस्कृतचा जन्म अखंड भारताच्याही बाहेर झाला.' असे लिहिणारास 'भारतीय संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान असणाराससुद्धा' केवळ ऐतिहासिक, भौगोलिक माहिती द्यायची आहे कि काही खोड काढायची आहे हे कसे कळेल? जसे प्रश्नास ? आणि विस्मयास ! अशी चिन्हे आहेत तसे मला फक्त माहिती द्यायची आहे (खोड काढणे अपेक्षित नाही) याला एक चिन्ह असते तर?

पूर्णविरामाने शेवट होणारे प्रत्येक वाक्य वेगवेगळ्या पट्टीत बोलले तर त्याचा वेगवेगळा अर्थ होतो. 'तो खूप हुशार आहे' असे खरोखरीच आणि उपरोधाने म्हणता येते. आणखी बर्‍याच प्रकारे म्हणता येत असावे. नक्की काय म्हटले आहे हे कळून घ्यावे लागते किंवा स्पष्ट लिहावे लागते. म्हणून आपण लेखी भाषेत प्रत्येक वेळी त्याने आनंदाने म्हटले, रागाने म्हटले, तटस्थपणे म्हटले इ इ लिहितो. पण आता अशा प्रत्येक भावनेसाठी/सुरासाठी एक नवीन चिन्ह काढावे किंवा वाक्यरचनेत फेरबदल करावा म्हटले तर हा प्रकार पून्हा किचकट होईल. भीक नको पण .... नावाचा प्रकार होईल. पण याचा अर्थ असाही होत नाही कि भाषेतील विद्यमान अर्थ अगदी योग्य प्रकारे निवडलेले आणि योग्य संख्यने आहेत. एका विशिष्ट सुरात बोललेली भाषा आणि ती तशास तशी लिहिली असता तिचे निघणारे वेगवेगळे अर्थ (कारण सुर लिहिता येत नाही) यांच्यामधे खूप अंतर आहे. हे कमी करण्याकरता अर्थांचे चयन आणि संख्या यांची पुनर्रचना करण्याची आवश्यकता आहे.

प्रश्नार्थाची भाषेने फार उत्तम काळजी घेतली आहे असे दिसते. वेगळी सर्वनामे, वेगळे चिन्ह, वाक्यातल्या शब्दांची वेगळ्या क्रमाने मांडणी हे सर्व प्रश्न प्रकट करण्यासाठी वापरले जाते. प्रश्नार्थ हा एक महत्त्वाचा अर्थ आहे आणि त्याचे वेगळे अस्तित्व कायम ठेवल्याशिवाय गत्यंतर नसावे. पण केवळ एकच भाव प्रगट करण्यासाठी भाषेत इतकी सारी प्रावधाने असणे याला मी 'भाषा वाया घालवणे' म्हणेन. उदाहरणार्थ, प्रश्नचिन्ह काहीही कामाचे नाही. 'तू कोण आहेस' पुरेसे आहे, 'तू कोण आहेस?' ची गरज नाही. आता तुम्ही म्हणाल की 'खरेच.' आणि 'खरेच?' मधे फरक आहे. इथे प्रश्नचिन्ह कामाला येते. पण याच 'खरेच' मधे शंका, उपरोध, ठिय्या इ भावना असतात तेव्हा त्या तशा सवत्या लिहाव्या लागतात. मग प्रश्नालाच चिन्ह का? सुदैवाने मराठीत प्रश्नांसाठी क्रियापदाची सवती रुपे नाहीत. वाक्यातला शब्दांचा क्रम न बदलताही प्रश्न उपस्थित करता यायला हवा. पण या क्रम नावाच्या डोकेदुखीने पाश्चात्य भाषा क्लिष्ट केल्या आहेत.

आज्ञार्थ देखिल महत्त्वाचा मानला गेला आहे आणि त्यासाठी क्रियापदाचे वेगळे रुप वापरले गेले आहे. प्रश्न हा संकल्पनांच्या चौकशीकरता असतो म्हणून त्यात वेगळी सर्वनामे (कोण, इ) वापरतात तर आज्ञार्थ क्रियेसंबंधीत आहे म्हणून क्रियापदाचे वेगळे रुप वापरले आहे. 'तो म्हणाला, "जा." ' ऐवजी 'त्याने जाण्याची आज्ञा केली' किंवा 'त्याने जाणे आज्ञिले' असे लिहून क्रियापदाचे वेगळे रुप गाळले तर फरक पडू नये. विद्यर्थ हाही आज्ञार्थाचाच उपप्रकार आहे. खरे पाहिले तर आज्ञार्थाचे जितके वेगळे वेगळे भाव आहेत ते नेहमी स्पष्ट लिहून व्यक्त करावे लागतात. जसे इशारा, विनंती, आज्ञा, हुकुम, आर्जव, मनभरणी. मानवाच्या व्यवहारात आज्ञेचा उपयोग (usage) प्रचंड आहे म्हणून तो एक वेगळा 'अर्थ' बनवला आहे अन्यथा त्याला काही अर्थ नाही. लक्षात घ्या या जशा आज्ञेच्या छटा आहेत तशा प्रश्नाच्या छटा नसतात. 'तू कोणता सिनेमा पाहिला?' मधे हा प्रश्न कोणत्याही 'भावा'ने जरी विचारला तरी प्रत्यक्ष प्रश्नाची छटा/अर्थ एकच आहे. Technically speaking, a sentence is either a question or not. Imperative sentences may have to convey a mighty range of actions.

पण विद्यर्थ, विस्मय हे replaceable आहेत असे प्रथमदर्शनी वाटते. आनंद, दःख, शांती, क्रोध, उपरोध, माहिती, तटस्थता, ठामपणा, निर्विकारपणा, तिडिक, विनोद, गांभीर्य इ इ ही तितकेच महत्त्वाचे अर्थ आहेत. सध्याला वाक्यांत लिंग, पुरुष, वचन, काल घट्ट आणि नि:संदिग्धपणे पकडायची सोय आहे. 'बाबू मेला' म्हटले कि तो पुरुष होता, आपण आणि मी यांपैकी नव्हता, तो एकच होता, आणि तो भूतकाळात मेला हे लगेच कळते. पण 'बाबू मेला' हे कोणत्या भावाने (आनंदाने, शोकाने, इ)म्हटले आहे याचा काहीच पत्ता लागत नाही. हे महत्त्वाचे नाही का? हे जाणण्याचे प्रावधान नसल्याने 'कोण्या महाभागाने नक्की काय लिहिले आहे' हे माहित असले तरी 'त्याला नक्की काय म्हणायचे होते' याचा प्रत्येकजण वेगळा अर्थ लावतो. कधी कधी हा नवा लावलेला अर्थ इतका वेगळा असतो कि तो कदाचित मूळ लेखकाला अभिप्रेतच नसावा. आणि असेही कोणी ठामपणे म्हणू शकत नाही.

आता प्रश्न येतो हे भाव संवादन साधावे कसे? भाषेत जास्त अर्थ घालावेत? विशिष्ट भाववाचक शब्दांचा वापर, चिन्हे, क्रम, शब्दांच्या रुपातील विशिष्ट दिशेने केलेला बदल, क्रियापदांचे लिंग्/वचन यांचे नाते ठेऊन/तोडून भावाशी लावणे....any wild thoughts?

अनुभूतीचा आवाका अगदी नीट प्रकट नाही झाला तरी चालेल, पण मला जे म्हणायचेच नव्हते तेच मला म्हणायचे अशा 'सुरात' कोणी माझे म्हणणे वाचू शकते, याची नीट वाट लावणे गरजेचे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वाक्याचा सुर पारंपारिक भाषेत अस्तित्वात असलेल्या अर्थांनी पर्याप्तपणे व्यक्त होत नाही यासाठी इंटरनेटवरील भाषेत स्माइलीज आल्या आहेत. वाक्यापुढे स्माइली वापरुन लेखक आपला सुर स्पष्टपणे प्रगट करतो आणि पारंपारिक भाषेतील उणिव दूर करतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

स्मायल्या औपरोधिक की सरळमार्गी ते कसे कळणार Smile
तुलनात्मक
स्मायल्या औपरोधिक की सरळमार्गी ते कसे कळणार Smile

या दोन वाक्यांचे भावनिक अर्थ आणि निर्देश वेगवेगळे आहेत. पहिल्या वाक्याचा निर्देश असा आहे, की "कळणारच नाही", तर दुसर्‍या वाक्यचा असा निर्देश आहे, की फक्त "बळेच अनर्थ करायला गेले तर कळणार नाही, नाहीतर कळेल." परंतु दिसायला दोन्ही वाक्ये अगदी एकसारखी दिसतात. दिसलीच पाहिजेत. मी संगणकावरची "कॉपी-पेस्ट" सोय वापरून ही दोन वाक्ये लिहिली आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपल्याला अभिप्रेत असलेली भावना व निर्देश गृहित धरल्यास आपले पहिले वाक्य नकारार्थी आहे. ते केवळ प्रश्नाच्या रुपात मांडले आहे. मी स्मायली तज्ञ नाही, पण प्रयत्न करून पाहतो.
स्मायल्या औपरोधिक की सरळमार्गी ते कसे कळणार ? Sad

स्मायल्या औपरोधिक की सरळमार्गी ते कसे कळणार ? (हे वाक्य कोणत्या सुरात वाचले तर त्याचा अर्थ "स्मायल्यांचा बळेच अनर्थ करायला गेले तर त्या उपरोधात आहेत कि सरळ आहेत हे कळणार नाही, नाहीतर कळेल" हे मला कल्पता येत नाहीय. 'कसे' शब्दात 'बळेच अनर्थ काढायला जाणे, नाहीतर' इतका अर्थ ओतताच येत नाही असे वाटत आहे. आपण दुसरा असा सोपा प्रश्न आणि असाच त्यातून निघणारा निर्देश मला कळवायचा प्रयत्न करू शकता.) पण सध्याला मला हा एक प्रश्न आहे ज्यात कळण्याच्या मार्गाचे उत्तर अपेक्षित आहे असे वाटते. यासाठी प्रश्न, चिंता याची स्मायली वापरता येते.

स्मायल्या औपरोधिक की सरळमार्गी ते कसे कळणार ? :-S

एकाच वाक्यात आपल्याला दोन भावना अभिप्रेत असतील आणि तशा दोन स्मायली चार्ट मधे उपलब्ध असतील तर त्या वापराव्यात.

स्मायल्या औपरोधिक की सरळमार्गी ते कसे कळणार ? असे म्हणून आपण एक स्मित हास्य करता तेव्हा त्याचा अर्थ आपल्याला 'कळणारच नाही' किंवा 'कसे कळेल हे सोडवू पाहू' असे म्हणायचे आहे असे होत नाही. जितकी relevant स्मायली वापराल तितके योग्य. एकच स्मायली वापरून दोन पराकोटीचे भिन्न, संबंध नसलेले भाव प्रकट कसे होतील? नुसती स्मायली टाकली कि मनातले काय ते कळते असं कुठं म्हटलय मी? A language with smileys conveys feelings better than a language without smileys.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

http://www.lokprabha.com/20120622/maymarathi.htm
मराठी भाषेची (म्हणजे केवळ तिच्या देवनागरी लिपीबाबतची) स्वतःची कितीतरी दौर्बल्ये अविनाश बिनिवाले यांच्या या लेखात आहेत. त्यांनी ती खूप समर्पक शब्दांत समराईज केली आहेत - जगातल्या सर्व भाषा (चे उच्चार) मराठीत लिहिता येत नाहीत, उदा. जर्मन. म्हणजे आज जर मी जर्मन माणसाशी जर्मन मधे १ तास बोललो आणि नंतर आम्ही काय उच्चारले/बोललो हे मला मराठीत लिहून ठेवायचे असेल तर ते १००% अचूकपणे अशक्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

देवनागरीच नव्हे तर जगातील प्रत्येक लिपी ही तुटपुंजी आहे. कारण लिपीचा विकास हा ठराविक भाषेला किंवा भाषांच्या संचाच्या सोबत होत असतो. लिपि ही भाषे नंतर तयार होते. जर्मन कशाला अगदी भारतातील उत्तरेत 'ळ' किंवा 'अतिर्‍हस्व ल'‍ गरजेचा नसल्याने तमिळ किंवा मल्याळम मधील काही अक्षरे देवनागरीत लिहिण्याची सोय नाही तसेच तमिळ-मल्याळी लिपींमध्ये देवनागरी लिपीतील काही व्यंजने नाहीत.

किंवा देवनागरी वापरतानाही आपण ती ठोस नियमाबरहुकूम न वापरता सवयीने वापरतो (उदा दिव्या (दिपत्कार म्हधला असो वा मुलीचे नाव लिहिले दिव्याच जाते) )

पण हे सगळे दोष म्हणा लिमिटेशन्स म्हणा किंवा प्रॉपर्टिज म्हणा लिपिच्या आहेत - भाषेच्या नव्हे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला या काही गोष्टी या म्हणायच्या आहेत -
१. जगातील प्रत्येक लिपी ही तुटपुंजी आहे.
२. लिपी हा भाषेचा भाग आहे (त्यांच्या विकासाचा क्रम महत्त्वाचा नाही).

आपल्याला जे म्हणायचे आहे त्यापेक्षा विशेष वेगळे मला काही म्हणायचे नाही असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

१ बद्दल अर्थातच सहमत आहे.

दुसर्‍याबद्दल अधिकाराने बोलायइतका अभ्यास नाही मात्र लिपी ही भाषेसोबत अनेकदा तयार-विकसीत- होत असली तरी भाषेचा भाग नाही असा माझा समज आहे. लिपी नसलेल्या भाषा असतात, भाषा लिपी बदलतात वगैरेकडे पाहिले की आपले दुसरे विधान धाडसी वाटते. त्याबद्दलचे मत/अधिकचे स्पष्टीकरण विस्ताराने वाचायला आवडेल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

असे म्हणेन कि लिपी नसलेल्या भाषा असतील, पण ज्या भाषांची लिपी आहे त्या भाषेचा लिपी हिस्सा आहे.
निर्गुण निराकार देव असतो, पण सगुण साकार देवाच्या शरीराचे वर्णन केल्यावर 'देवाला शरीर नसते' वा 'शरीर देवाचा भाग नसतो' असे सांगणे योग्य वाटत नाही.

I think we are talking a non-issue.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पण ज्या भाषांची लिपी आहे त्या भाषेचा लिपी हिस्सा आहे.

पंजाबी ही उर्दू, गुरुमुखी आणि देवनागरी या तिन्ही लिप्यांतून लिहिली जाते.

कोंकणी ही देवनागरी, रोमन आणि कन्नड या तिन्ही लिप्यांतून लिहिली जाते.

सिंधी ही देवनागरी आणि अरबी या दोन्ही लिप्यांतून लिहिली जाते.

कश्मीरीबद्दल नक्की ठाऊक नाही, परंतु बहुधा उर्दूबरोबरच आणखीही किमान एका लिपीत (शारदा?) किंवा कदाचित आणखी दोन लिप्यांत (शारदा आणि देवनागरी?) लिहिली जात असे / लिहिली जाते, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

मराठी ही एके काळी देवनागरीव्यतिरिक्त मोडी लिपीतही लिहिली जात असे.

(तेव्हा, नक्की काय प्रतिपादायचे आहे, हे कळले नाही.)
==========================================================
बोले तो, उर्दूकरिता वापरली जाणारी लिपी. त्या लिपीच्या नावाबद्दलच्या अज्ञानापोटी 'उर्दू लिपी' अशी संज्ञा वापरली आहे. चूभूद्याघ्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आजकाल मराठी, हिंदी, बंगाली या भाषाही रोमन लिपीत लिहील्या जातात असं दिसतं. -- जै इंटरनेट.

भौतिकशास्त्र आणि गणितासाठी रोमन, देवनागरी, आणि ग्रीक अशा लिप्याही एकसमयावच्छेदेकरून वापरल्या जातात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

(तेव्हा, नक्की काय प्रतिपादायचे आहे, हे कळले नाही.)

दिलेल्या लेखाच्या लिंकमधे लेखकाने लिपीमधे असे सुधार करावेत कि जेणेकरून भाषा 'आपल्या लिपीत नसलेले उच्चार लिहू शकतील' असे काहीसे सुचवले आहे. त्यात बरेच तथ्य आहे असे म्हणायचे होते. किती भाषा किती लिप्यात परंपरेने लिहितात हा विषय नव्हता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

इंग्रजी, फ्रेंच, जर्मन आणि नॉर्डिक भाषा यांच्याकरिता वापरल्या जाणार्‍या रोमन लिपीच्या फ्लेवर्समध्ये फरक आहेच की. ज्यांना गरज होती, त्यांनी आपापल्या गरजांप्रमाणे लिपी वाढवून घेतलीच. पण केवळ 'कधीतरी कोणालातरी लागू शकेल म्हणून' जगातल्या तमाम भाषांतल्या तमाम ध्वनींसाठी चिन्हे आपल्या नेहमीच्या वापरातल्या लिपीत आणण्याचा अट्टाहास कशासाठी?

बरे आणली, तरी बहुसंख्यांचा त्या अधिकच्या चिन्हांशी संबंध न आल्याने बहुसंख्यांकरिता ती चिन्हे अवापरात (आणि म्हणून विस्मरणात) जाणार, किंवा अपरिचित राहणार. मग अगदी समजा तुम्हाला असा एखादा ध्वनी आपल्या लिखाणात दर्शवण्याची गरज पडली, आणि त्याकरिता अधिकचे चिन्हही उपलब्ध झाले, तरी वाचणार्‍या मला जर ते (माझ्याच लिपीतले) चिन्ह जर परिचित नसेल, तर उपयोग काय झाला?

बरे, माझ्यासारख्या अजाण वाचकाला हे चिन्ह मारूनमुटकून जर शिकवायचेच झाले, तरी कसे शिकवणार? (कोण शिकवणार, हा फार पुढचा प्रश्न.) म्हणजे, चिन्हाची व्याख्या 'अमूकअमूक ध्वनीकरिता असलेले चिन्ह' अशी असेल, आणि तो ध्वनीच मुळात माझ्या भाषेत प्रचलित नसल्याने मला परिचित नसेल, आणि माझ्या आजूबाजूच्या बहुसंख्यांनाही जर तो परिचित नसेल, तर तो ध्वनी मला मुळात कसा समजावून सांगणार? 'या अमूकअमूक चिन्हाने दर्शविलेला ध्वनी' म्हणून? ही व्याख्या काहीशी चक्रीय होत नाही काय?

नाही, मी म्हणतो, ज्यांना हा ध्वनी आपापसातल्या लिखित संभाषणांत दर्शविण्याची तशीच खास गरज असेल, ते आपापसात ठरवून काही तोडगा काढतीलच. पण ज्यांना अशी गरज नाही, अशा बहुसंख्य सामान्यजनांवर असे भिन्नभिन्न नि असंख्य तोडगे लादून नेमका काय फायदा व्हावा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोंकणी ही तीन वेगवेगळ्या लिपींमध्ये लिहिली जाते, पंजाबी दोन लिपींमध्ये लिहिली जाते, आणि हिंदुस्तानी सुद्धा दोन लिपींमध्ये लिहिली जाते.

लिपी असलेल्या भाषांचा सुद्धा लिपी हा अविभाज्य भाग नसतो. आणि एकच लिपी वेगवेगळ्या भाषा लिहायला कामी येते. (उदाहरणार्थ, देवनागरी लिपी वापरून नेपाली, हिंदी, मराठी, कोंकणी लिहितात; सिरिलिक लिपी वापरून रशियन, उक्रेनियन आणि सर्बियन लिहितात, वगैरे).

म्हणजे सलिपिभाषांतही अनेकास-अनेक असे परस्परसंबंध असतात.

मुद्दा १ "प्रत्येक लिपीत त्रुटी असतात" निरर्थक आहे. लिपीमध्ये सर्व उच्चार लिहिता यावेत, हा लिपीचा हेतू आहे, असे सर्वमान्य आहे काय? चिनी भाषांमधील चिन्हे थेट शब्दघटक चिन्हित करतात. एकच उच्चार असलेल्या वेगवेगळ्या शब्दांकरिता वेगवेगळी चिन्हे असतात.
話 (उच्चार : हुआ, उतरता सुर) अर्थ : भाषा, बोलणे
畫 (उच्चार : हुआ, उतरता सुर) अर्थ : चित्र

दोघांचाउच्चार उतरत्या पट्टीसकट तंतोतंत एकसारखा आहे, परंतु चिन्हे वेगवेगळी आहेत.

-------
बासरीतून वारे फुंकून शेगडीतील निखारे फुलवता येत नाहीत, ही बासरीची त्रुटी म्हणावी काय?
बासरीत वारे फुंकण्याची सोय असते, फुंकल्याशिवाय सुर उमटण्याचे कार्यच होत नाही. (देवनागरीसारख्या काही लिपींमध्ये ध्वनी चिन्हित करण्याची सोय असते, ध्वनी चिन्हित केल्याशिवाय संदेश उतरवून घेता येत नाही, की मोठ्याने वाचून दाखवता येत नाही.)
यावरून प्रामादिक हेतू असा काढता येत नाही, की बासरीचा हेतू "वारे फुंकणे" आहे. (यातून असा हेतू काढता येत नाही, की ध्वनी चिन्हित करणे हा देवनागरी लिपीचाचा हेतू आहे.)

-----
ते भाषांचे सोडा. "त्रुटी"म्हणजे काय, ते वाचकाला समजावे म्हणून नगण्या-त्रुटी-असलेल्या कुठल्यातरी वस्तूचे उदाहरण देता येईल काय? बासरीने नाही संगीतातला "षड्ज-पंचम" एकत्र वाजवता येत नाही. विमान हे वाहन म्हणावे, तर विमानाने मला रस्ता नेटकेपणे ओलांडता येत नाही - म्हणजे या पदपथावरून सुरू होऊन त्या पदपथावर थांबता येत नाही. (उडत असताना अनेक रस्ते ओलांडले आहेत, पण अलीकडच्या पदपथावर रेंगाळता येत नाही, की पलीकडच्या पदपथावर थांबता येत नाही.) "ज्ञानेंद्रिय" म्हणवून घेणार्‍या माझ्या डोळ्यांत ही त्रुटी की मला त्यांतून नीट ऐकू येत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विमान हे वाहन म्हणावे, तर विमानाने मला रस्ता नेटकेपणे ओलांडता येत नाही

हा बग नसून, हे फीचर आहे. काही विशिष्ट योजनेने ते अंतर्भूत करण्यात आलेले आहे.

विचार करून पहा. विमानाने जर रस्ता ओलांडता येत असता, तर राईटबंधूंच्या जमान्यापासून ते आजपर्यंतच्या दीर्घकाळात "व्हाय डिड द एअरप्लेन क्रॉस द रोड?" असा जाब विचारू पाहणारा किमान एक तरी दीडशहाणा पैदा झाला नसता काय?

तरी बरे, डुकरांना आजतागायत उडता येत नाही. पण तरीही, "पिग्ज़ मे फ्लाय"दुवा १, दुवा २ असा काहीबाही दावा करू पाहणारे भेटतातच ना? त्यापासून धडा घेऊन, पुढील कटकटी टाळण्याच्या दृष्टीने अत्यंत खबरदारीपूर्वक ही "सोय" करण्यात आलेली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुद्दा १ "प्रत्येक लिपीत त्रुटी असतात" निरर्थक आहे. लिपीमध्ये सर्व उच्चार लिहिता यावेत, हा लिपीचा हेतू आहे, असे सर्वमान्य आहे काय? चिनी भाषांमधील चिन्हे थेट शब्दघटक चिन्हित करतात. एकच उच्चार असलेल्या वेगवेगळ्या शब्दांकरिता वेगवेगळी चिन्हे असतात.
話 (उच्चार : हुआ, उतरता सुर) अर्थ : भाषा, बोलणे
畫 (उच्चार : हुआ, उतरता सुर) अर्थ : चित्र
दोघांचाउच्चार उतरत्या पट्टीसकट तंतोतंत एकसारखा आहे, परंतु चिन्हे वेगवेगळी आहेत.

अरे हो! चिनी लिपीबद्दल अंमळ विसरलोच होतो.

यात आणखी एक गंमत अशी आहे, की याच चिनी चित्रलिपीची एक आवृत्ती जेव्हा जपानीसाठी वापरली जाते, तेव्हा एकच अर्थ असलेल्या एकाच शब्दाकरिताच्या एकाच चिन्हाचा उच्चारदेखील दोन वेगवेगळ्या संदर्भांत पूर्णपणे वेगळा होऊ शकतो. ('यामाशिता' आडनावातला 'यामा' - अर्थ: 'पर्वत' - आणि 'फुजीसान' - याला 'फुजीयामा' असेदेखील म्हणतात - यातला 'सान' - अर्थ: पुन्हा, 'पर्वत' - चिन्ह एकच, अर्थ एकच, उच्चार वेगवेगळे.) (गरजूंनी 'ओनयोमी' आणि 'कुनयोमी' गुगलावे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा संपूर्ण धागा वाचून डोळ्याला फोड आले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROFL
जब्राट उपमा

अवांतर :-
तुम्हाला जी ए किंवा दळवींचं लिखाण आवडत असावा असा अंदाज आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

'मन'कवडे दिस्ता तुम्ही... Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0