बाबा

एका उन्हाळ्या गुरुवारी भर दुपारी अंधार्या खोलीतील घरच्या मंदिरा सारख्याच असलेल्या , घरच्या दर्ग्यात पोचलो. कडक उग्र धुपारा , हिरव्या ब्ल्बचा हिरवा उजेड , दोन फुट उंचीचा लाकडी घोडा जंजीर स्टायलीत उधळलेला, त्यावर फुलांच्या चादरीची लदबद , पाय मोडलेला बाबा खुर्चीत बसून भक्तांचा अंदाज घेत प्रोग्रामला सुरुवात करतो. प्रोग्राम करणी करणार्याला धरणे , भूत असेल तर खिचके बुलावून आणणे , जमलेल्या भक्तांसमोरच त्याला खिजवणे आणि नंतर वाजवणे !
प्रोग्राम चालू.. खणखणीत मोठ्ठा आवाज दिवे की तरफ देखो, हा देखते रहो , ए बाय हात खोल.. ए तात्या बोल नुको.. ए बाय...
या मेरे मौला शहावली बाबा मिरा दातार, ए पहाड के भगवान जय काली कलकत्तेवाली.. जय बजरंगबली सव्वा मन लोखंडकी तोड नली.. या मेरे विठ्ठल..या मेरे..मौ.. ए बाय दिव्यात बघ डोला उगडा ठेव..मेरे मौला.. जोरजोरात मान हालवत दम खात पाँझ घेत बाबा सवाल करु लागला. आज्ञा देऊ लागला. दरबार सर्द होऊन पराक्रम पाहू लागला.
च्यलो.. च्यलो...
आन्दे..आन्दे...
आवो ...आवो..
कोण है रे तू ?
माद्दरचोत कोण है तू ?
कोण है ?
आरे कोण है तू ?
चल बता ...जल्दी बता
यहा का हय कि बाहर का ?
यहा का कि बाहर का ?
चल बोल..
आदमी कि औरत ?
अरे आदमी कि औरत ?
देख मैने अभी पैछाना...
अरे पैछाना मैने..!
चल अपने मुहसे बोल..
हा बोल..
अभी तेरेकू आनाच पडेगा..
आज्जा आज्जा..
च्यलो च्यलो..
च्यलो..
जातवाला की बाहर वाला रे ?
रिश्तेदारमे है कि बाहरवाला ?
हरिजन है ?
मुसलमान है ?
कोण है भैँचोत ? चल उल्टा कर..
हा उल्टा कर..मुझ मैं घूस..
हा घूस मुझमे...
बाईच्या आकाळावरच्या दोन्ही बाजूच्या बटा खसकन ओढून बाबाने बाईची मान वाकवली. बाई उम्म उम्म उम्म...करु लागली..विशिष्ट काठीचे दणके दाण् दाण् पाठीवर पडले बाई फक्त ओरडू लागली..जोरदार कण्हू लागली...
ए मुह बांद दियेला इसका नाम नै बतायेगी. करणीच है , हाजरी मे पुछो...
हा अभी किसको दिवे पे बैठना ?
हां देख रे मुजावर...पैसा लेके नाडा बांद...उतारे का आडव्हान्स दे के जाव तोभीच फलेगा...आरे सविता बाय तू परत आली ? परत तरास दिला का तेने..तेच्या आयला आज् घोडाच लावतो...बघ दिवे मदी..या मेरे मौला शहावली बाबा मिरा दातार ए पहाड के भगवान जय काली
कलकत्तेवाली.. जय बजरंगबली सव्वा मन लोखंडकी तोड नली.. या मेरे विठ्ठल... मेरे मौला..
च्यलो च्यलो....
अरे मी आलोरे बाबा..पण मला मारु नको..
अरे आयिघाल्या तूच हेस का परत..च्यल तुला पायजेल ते दिल्ता ना माझ्या आदमीने ? परत कशाला आला ?
अरे मी चुकलो रे..
चल भाग भैँचोत भाग...
सविताच्या पाठीत काठीचे दणके...सर्वाँसमक्ष भूत फरार ! घामाघूम सविता निपचीत. भक्तात कौतुकी कुजबूज, नाड्याला गर्दी. बाबाच्या हाजरीचा टायम..आणि पोलीस यायचा टायम गाठ पडला ! बाबाला उचलून न्हेला. मेरी इल्लम को च्यालेन्ज मत कर बच्चा म्हणुन बाबा चार तासात परत आला.
आता इथून पुढे आमच्यावर कधीही करणी होऊ शकत होती. मित्र म्हटला नापास झालो तर ढकलू भेँचोत बाबावर ह्याने करणी केली म्हणुन ! आयला सत्या तू नापास होच तुझ्या बापाला नाय पटलं तरी ह्या कारणानी का व्हयना बाबाला सडकील तुझा बाप ! च्यायला इजी गुंडाळलं भडव्यानी..पोलीसालाबी अंगारा देऊन आला असं कळलं राव...

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

या बाबांच्या खोल्यांमध्ये काय चालत असावं असा अंदाज असला तरी असे ड्वायलाग माहिती नव्हते. (असं चित्रपटात दाखवतात पण ते फिल्मी वाटायचं)

बाकी, हे लेखन घाईत केल्यासारखं वाटलं. तुमच्या आधीच्या लेखनाइतकं परिणामकारक नाही Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!