शावीचा दिप्या

पंधरा वीस वर्षापूर्वीचा काळ जरा वायला होता. आता दहावीतच पोरं गळतात. जरा भाग्याची बारावीत गळतात. आता झोपटपट्टीत केबलचा फार काव राहिला नाही. घरटी डिश टेव्ह्या आल्या आहेत. शान मधे माय मावल्या दोन रिमोट हातात घेऊन देवयानी, सत्यजीत ,राधाच्या स्टोर्यात गुंगतात. माल धक्क्यात दमलेले , कुल्पीच्या गाडीवरुन शिणलेले , शिपवाले रिक्षाचालक बाप लोक हातगाडी वरचे चविष्ठ मुंडी पाय देशी बरोबर घेऊन, आपापला फलाफुला संसार देखत , घासटुकडा खाऊन लेकरांना कोरडं आरडंत ओरडंत झोपी जातात. कुल्पीच्या गाडीवाल्याची पोरं चायना , आणि रिक्षावाल्याची पोरं सँमसंग मोबाईलवर बिझी राहून. राँकस्टार बनत, एखाद्या इमाने इतबारे शिकणार्या पोरीच्या मागावर राहात , एकतर्फी प्यार करत दहावी बारावीचं वर्ष तिच्यावर कुर्बान करतात. भिकू म्हात्रे बनू पाहतात , पोत्याभाई बनू पाहतात. बापाचा जीव खात खरिदलेल्या हफ्त्या वरच्या पल्सर गाड्या आता वस्तीत दाटी करु लागल्यात. तुमच्या माझ्या लेखीची झिरो भौतिक संपन्नता झोपडपट्टीत टुकीनेच नांदतेय. पण तिथल्या घाम आणि रक्ताच्या काल्यात नित् न्हाणार्या जिवंत बाँड्यांना मात्र गाढ गुंगी आणतेय. पोरं सैरावैरा वाढतात. दणकून वळणातनं सुटतात. अशा वातावरणात घरात स्वतःची लाइट नसलेला , बाप मेलेला , म.न.पाच्या शाळेत शिकणारा पारध्याचा दिप्या पहिल्या झटक्यात दहावी पास झाला ७८ टक्के मिळवून! त्याच्या आईने शावीने घरी बोलावले .
पुढच्या शिक्षणाची चौकशी करायला. दोन दिवस जायला उशीर झाला असल्याने आणि परत जरा लवकर फिरायचं असल्याने , वस्तीतले नमस्कार चमत्कार टाळीत गडबडीत फाँरम्यालिट्या उरकीत बोळकांड ओलांडून मी धाड धाड पुढे चालत गेलो. शावीचं घरं म्हणजे खादानीच्या कोपरभर तुकड्यात भर घालून ठोकलेले पत्रे. सगळी खादान गेली. म्हाडामुळे सगळ्यांचे पत्रे गेले. पण म्हाडाने किरकोळ कारकोळ कागदावाचून शावीचं घरं केलं नाही. त्या पत्राशेड पुढं पोचलो. आणि म्हंगाव पारधीनीने मुतायच्या जागेकडं हात दाखवत मला ओरडून विचारले , "आरा भाड्या बगुन बगुन काय बगतोस ही मुतायचा डबा ?" घराच्या बाहेर असलेल्या , पोत्याच्या ओडाश्याच्या न्हाणीत थेट एकबाजू पुरी उघडी टाकून म्हंगाव लघवीला बसलेली. माझं लक्षंच नव्हतं. मला आजू बाजूला वळायला चान्स नसल्याने जागेवर तोँड वळवून शरमिँदा होत मी चार आठ पावलं परत आल्या वाटेनंच चालू लागलो. म्हंगावच्या शिव्या जोरदार चालू झाल्या. आवाजाने घरातून शावी बाहेर आली. पाठमोर्या मला तिने ओळखलं ओ सत्येस दादा या तुम्ही. त्या रांड कडं नका लक्ष दिवू . पितीय हेवडी का पडदा टाकायचं बी कळत नाय तिला. चाचरत आत गेलो. ओल्या परवरावर पोतं टाकून मला बसवलं. म्हंगाव आणि शावी ह्या सासू सुना ! शावी दोन वर्षापूर्वी लिवर फुटून वारलेल्या इवर्याची बायको . दिप्याची आणि शोभीची आई ! आता तिचा मुलगा काँलेजला जाणार आहे. कुठली साईड घ्यावी काय काय कसं कसं करावं हे विचारण्यासाठी तिने मला
बोलावलेलं. मी सोप्या भाषेत तिला सांगत गेलो. कुठली साईड घेतल्यावर काय काय होता येतं ते. हे ऎकूण शावी आनंदानं फुलून येत होती. मुलाकडं पाहत होती. मी उभा करत असलेली नोकरदार चित्रं ती तिच्या पोराच्या अंगावर चढवत होती. डोळ्यासमोर क्षणाक्षणाला बदलणारं वेगवेगळ्या रुपातल्या तिच्या पोराचं चित्र बघून जाम खूष होत होती . मला गंमत वाटंत होती. दिप्या माझ्या पांढर्या शर्टाकडे बघत होता लाजून खुष होत होता. शावीला म्हटलं तुला आता खर्च करायची बी जरुर नाही . नुस्तं दोन टाईम लेकराला खाऊ घालायचं. चट् सरकार त्याला फुकट शिकिवणार ! आगं आता उलट दिप्यालाच काँलेजातनं पैशे भेटणार आहेत. शावी हारकली . मग कितीकबी शिकविते म्हटली..चहा पिता पिता ती म्हटली कि तिने विचारलं मला नीट कळलं नाही बाबासाहेबानी आमच्या साटीबी कायकी केलंय म्हणायचं ! निघताना जातीचा दाखला आहे का त्याचा विचारलं. उत्तर मिळालं नाही. मला पुन्हा विचारावं वाटलं नाही. खाली वाकून बुट घालताना शावी मला कौतुकाने पाहात होती.
आणि मला उगीचच पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या एक खिडकी योजना कार्यालयात अँफेडेव्हिट घेऊन शावी आणि दिप्या येड्याबागड्या सारखे इकडून तिकडे घुमताना दिसत होते.

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (6 votes)

प्रतिक्रिया

नेहमी काय लिहायचं कळतही नाही आणि छान म्हणवतही नाही Sad
काही काळ खिन्न वाटत रहातं मग असं पुन्हा वाचे पर्यंत त्याचाही विसर पडतो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

थोडा विद्रटपणा करावासा वाटतो. सत्येस दादा आणि त्यांच्यासारख्या लोकांमुळे फरक पडत असणार; त्याची सांख्यिकी नोंदतरी होते का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आता शंका आली म्हणूनच हा, दहावी पर्यंत जातीचा दाखला लागत नाही का? मनपा शाळेतुन तो मिळत नाही? वस्तीत दरवर्षी दहावी-बारावी निकाल लागण्यापुर्वी विद्यार्थ्यांना काय कागदपत्रे लागणार आहेत त्याचे मार्गदर्शन वेळेवर करणारे असतील ना सत्येस दादा व मित्रमंडळ!
दुवा १ -

दुवा २

बाकी लेख नेहमीप्रमाणे प्रभावी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहज राव धन्यवाद !
मनपा शाळेत दाखला लागत नाही. तुम्हाला अपेक्षित कागदपत्रे जमवण्याचे सुंदर नियोजन करण्या इतके सुंदर आयुष्य शावी सारख्यांच्या वाट्याला आलेलं नाही. त्यामुळे हे लोक तहान लागल्यावरच विहिर खोदतात हे खरं असलं तरी त्यांना दोष देता येत नाही. सत्येसदादा आणि मित्रमंडळ सक्रिय आहेच ! आमच्यात तुम्ही कधी सामील होणार होणार ? Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सतीशभाऊ, नेहमीप्रमाणेच विषण्ण करून सोडलं!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

दादा...छान,..आवडले

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडले...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिप्याबद्दल कौतुक आहेच. दाखला मिळालेले काही जण ठाउक आहेत; दाखला मिळणार नाहीच असे नाही.
त्याच्या अडचणी सुटाव्यात असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हे सुटलेच होते Sad खरच उदास करुन सोडलं या लेखाने. दिप्याच्या अयुष्याचा शेणकाला होऊ नये. त्याचं चांगलं व्हावं Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0