अर्धांग

नोकरीने शोषलेले,
प्रवासाने शिणलेले
ते आमचे अर्धांग,
न्याहाळत असतो मी,
पैलतीरावरुन !

अधुन मधुन ओळख दाखवतं,
सटीसहामाशी,
कधी वाट्याला येतं
चिपाड बनून!

तेंव्हा डोळ्यांखालच्या काजळीत
शोधू लागतो मी काजळमाया
आणि शुष्क ओठांतली
उरली सुरली थरथर
प्रयत्न करुन!

मग जाणवतात
यंत्रवत प्रतिसाद,थंड गात्रे
एक उरकून टाकण्याची भावना
बहुतकरुन!

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

मला नक्की कसं आयुष्य नकोय, असा एकेकाळी विचार करायचे तेव्हा हे असंच मागच्या पिढीतल्या स्त्रियांचं चित्रं समोर यायचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.