प्रथमोपचार पेटी - First Aid Box

प्रथमोपचार पेटी - First Aid Box
प्रथमोपचार पेटीत काय काय असावे असा शोध आंतरजालावर घेतला. मराठीमध्ये असले काही आढळून आले नाही. मी काही औषधांची यादी केली आहे. यातील काही औषधे भारतात ओव्हर द काउंटर OTC मिळतात. (तसी सगळीच औषधे येथे मिळतात. ते चांगले की वाईट हा मुद्दा येथे नाही. गुण येण्याशी मतलब.)
जाणकारांनी त्यात भर घालावी हि विनंती.
१. Combiflam - ताप, अंगदुखी
२. Crocin - ताप, डोकेदुखी
३. Disprin - डोकेदुखी
४. Alerid - D - सर्दीसाठी
५. Coldact - सर्दीसाठी
६. Cetrizane - सर्दीसाठी
७. Strepsil - घशात जळजळ
८. Pudin Hara - अ‍ॅसिडीटी
९. Eno - अ‍ॅसिडीटी
१०. Gelusil - अ‍ॅसिडीटी
११. Zinetac - अ‍ॅसिडीटी
१२. Cyclopam - पोटदुखी
१३. Bl - Qulnol - जुलाबासाठी
१४. Iodex - गुढगेदुखीसाठी
१५. Soframycin - मलम - जखमेवर
१६. Avomine - प्रवासात होणारी वांती
१७. डोकेदुखीवरचा बाम
त्याचप्रमाणे इमर्जन्सी फोन नं, चिकटपट्टी, बँडेज, कात्री, न वापरलेले ब्लेड, सेफ्टी पिन्स, साबण, वरील औषधे कसे वापरावयाचे त्याची माहीती आदी गोष्टीही या पेटीत असाव्यात.

त्याचप्रमाणे आंतरजाळावर खालील संज्ञेची काही औषधे दिसली. त्या संज्ञा काय आहेत?

Non-Steroidal Anti-Inflammatory Drugs (NSAIDs) ibuprofen, aspirin, and naproxen to relieve
Loperamide – Imodium used to slow down bowel movement, used in diarrhoea
Metronidazole, a broad spectrum antibiotic for amoebic, protozoan infections
Antihistamines – diphenhydramine (Benadryl) for allergic reactions

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

उपयुक्त माहीती आहे पण जर एखाद्याला एखाद्य औषधाची अ‍ॅलर्जी असेल तर त्याचा विचार त्यांनी स्वत:च्या फर्स्ट एड बॉक्स करता करावा नाहीतर दिलंय तेच घेतलं अन नै झेपल तर पुन्हा ठणाणा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चांगली यादी!

या व्यतिरिक्त औषधांची केमिकल नावे माहित असल्यास द्यावी. जसे पॅरसिटामॉल. यामुळे उगाच ब्रँडेड औषधांच्या ब्रँडनेम साठी पैसे वाया न जाता तीच गोळी स्थानिक उत्पादकांची असल्यास बर्‍याच स्वस्त मिळते.

डॉ.नी गोळी दिल्यावरही स्थानिक उत्पादकांची तीच गोळी आहे का हे जरूर विचारा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

याला फार्मॅकॉलॉजिकल नेम असे म्हणतात.
ही सांगण्याचे तोटे अनेक आहेत.

स्थानिक उत्पादकः तुम्हाला बहुधा जनरिक नावाने तयार होणारी औषधे म्हणायची आहेत. यांत औषधाला ट्रेड नेम नसते. (म्हणजे डालडा, सूर्यमुखी इ. न म्हणता वनस्पती तूप म्हणून ही मिळतात) अन अशी औषधे कमालीची स्वस्त असतात. पण, ही औषधे नामांकित कंपन्यांनीच बनविलेली असतात.

औषधांत एक 'बॉम्बे मार्केट' नामक प्रकार असतो. यात अन्न व औषध प्रशासनास गंडवून कमी प्रतीची औषधे विकली जातात. स्वस्त असतात, पण बहुतेकदा निरुपयोगी, व क्वचित त्रासदायक.

दुसरा तोटा हा, की त्या काउंटरवरल्या पोर्‍याला त्या औषधाची माहिती असतेच असे नाही. तो त्याच्या समजूतीने तिसरेच काही देऊन टाकतो. (हे जास्त धोकादायक.) लायसेन्स्ड फार्मसिस्ट दुकानात हजर असेलच असे नसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

तुम्हाला बहुधा जनरिक नावाने तयार होणारी औषधे म्हणायची आहेत. यांत औषधाला ट्रेड नेम नसते. (म्हणजे डालडा, सूर्यमुखी इ. न म्हणता वनस्पती तूप म्हणून ही मिळतात) अन अशी औषधे कमालीची स्वस्त असतात.

मला दोन्ही म्हणायचे होते. Smile
जनरिक नावांची औषधे अतिशय स्वस्त मिळतात

पण, ही औषधे नामांकित कंपन्यांनीच बनविलेली असतात.

आता अ‍ॅन्टीएन्फेमेटरी औषधे घ्या. रॅनबॅक्सीचे एक औषध ७० रु ला १० गोळ्या होत्या. त्याच कंपोझिशनच्या स्थानिक वेंडरच्या (ठाण्याची कंपनी होती) गोळ्या १२ रु ला १० गोळ्या होत्या. (केमिस्ट म्हणाल्यावर डॉक्टरांकडून फोनवर खात्री करून मगच औषध घेतले)

माझ्या एका मित्राच्य वडीलांचा औषधाच्या गोळ्या बनवायचा कारखाना आहे. अनेक प्रतिथयश ब्रँडसाठी ते गोळ्या बनवून देतातच शिवाय स्वतःही वेगळ्या नावाने ते गोळ्या विकतात. मात्र त्यांचे ब्रँडनेम नसल्याने त्यांना तितकी किंमत ठेऊन चालत नाही. त्याच कंपनीत बनलेल्या त्याच गोळ्यांसाठी मोठे ब्रँड काह पट किंमत लावतात.

अर्थात अशी औषधे स्वतःच्या मर्जीने न घेता दागदरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत याच्याशी सहमत,.

बॉम्बे मार्केट विषयी ऐकून आहे. याविषयी चे अनुभव येऊ द्यात!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छान आणि तितकीच उपयुक्त माहिती, विशेषतः माझ्यासारख्या (नोकरीनिमित्य) सदोदित प्रवासातच असलेल्या व्यक्तीसाठी अशा चटकन हाती येऊ शकणार्‍या आणि ओ.टी.सी.गटातील या गोळ्यांची फार गरज भासते. (अर्थात व्यसन म्हणून नव्हे तर आपल्या किटमध्ये अमुक एक गोळी वा मलम आहे हीच बाब कित्येकदा मानसिकतेमुळे समाधान देणारी ठरते, हे स्वानुभावाने सांगतो.)

श्री.पाषाणभेद यानी दिलेल्या यादीत खालील भर घालू इच्छितो :

१. IMOL : अत्यंत गुणकारी गोळी आहे ही. अनॅसिन, अ‍ॅस्प्रो या सम काम करते. पण डोकेदुखी, अंगदुखी, सर्दी, ठणका या सर्वांवर एकत्रित उपयोगी असल्याचे मला जाणवले आहे. [४०० एमजी ची क्षमता असल्याने कृपया उपाशी पोटी अजिबात घेऊ नये. प्रवासात असताना गरज भासलीच तर एखाद्या बस स्टॅण्डवर उतरून किमान दोन केळी खावून वरतून एक ग्लास पाणी रिचवूनच मग गोळी घ्यावी. अ‍ॅसिडिटीचा त्रास होत नाही. झोपही फार छान येते.]

२. Sriderm Cream : परत प्रवासात असताना उपयुक्त ठरणारे एक मलम. डास, चिलटे, गाजर गवत, जिथे मुक्काम तेथील खोलीतील बंदिस्त दर्प आणि अन्य जळमटे यामुळे त्वचेला खाज सुटण्याचे प्रकार (अ‍ॅलर्जीमुळेही) घडत असतात, त्यावेळी या मलमाचा एक बिंदूदेखील ती खाज थांबविण्यास मदत करतो.

३. कित्येक वेळा बाहेरगावी असताना स्थानिक खानावळीतील जेवण घेणे गरजेचे असते. तेथील जेवणाचा दर्जा तपासणे शक्यही नसते. पण जेवण तर घेतले जातेच जाते. अशावेळी जर अपचनामुळे सोबत असलेल्या मुलांना डायरियाचा त्रास संभवतो (काही वेळा मोठ्यांनाही), त्यासाठी 'पिवळ्या रॅपर' मध्ये अगदी टिकलीएवढ्या गोळ्या (ज्या दोन रुपयाला मिळतात) सोबत ठेवाव्यात. एका गोळीने काम भागते. (नाव विसरलो.)

४. डेटॉल साबण : स्नानासाठी घरी तुम्ही कोणता साबण वापरता हे गौण. पण बाहेरगावी असल्यास (अगदी सहल असली तरी) सोबत Dettol Soap च घ्यावा. [हॉटेल रूममध्ये दिला जात असलेला चुकूनदेखील वापरू नये. एकजात उल्हासनगर मेड असतात. हे अनुभवाचे बोल आहेत.]

५. फर्स्ट एड बॉक्समध्येही डेटॉल लिक्वीडची एक छोटी बॉटल असावी. काही कारणास्तव कुठे खरचटले तर तो भाग डेटॉल द्रवाने पुसून काढणे हिताचे ठरते.

(एरव्ही कवितेच्या प्रांगणात रमणार्‍या या कवीने एक चांगला आणि व्यवहारी विषय इथे मांडला आहे. त्याबद्दल श्री.पाषाणभेद अभिनंदनास पात्र आहेत. संबंधित स्मायली कशी द्यायची हे समजत नसल्याने, थेट वाक्यानेच ती भावना व्यक्त केली आहे.)

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खोबरेल तेलाची. झालेच तर एक छोटी पुडी हळदीची. जखम कोरडी राहण्यास व मग बरी होण्यास हळदीचा मलमापेक्षा जास्त उपयोग होतो काही प्रसंगी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

श्री आडकित्ता यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

फर्स्ट एड बॉक्स मधे काय असावं हे सांगायला डॉ. कशाला हवा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे आले लगेच आंतरजालावरचे ट्रोल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

कोणत्याही गोष्टीस 'फर्स्ट एड' देण्या आधी, त्या आजाराचे निदान होणे अत्यावश्यक असते. अन्यथा, अनपेक्षित रितीने नको ती गुंतागुंत उद्भवू शकते. याप्रकारच्या 'प्रिस्क्राईब' न केलेल्या औषधांनी त्रास झाल्यास स्वतःच जबाबदार आहात हे ध्यानी असू द्यावे. ज्या औषधांनी सामान्यत: नुकसान होऊ शकत नाही, अशीच औषधे 'ओटीसी' (ओव्हर द काऊंटर) विकावीत अशी परवानगी असते.

वर दिलेल्या यादीतील, पहिल्या ५ नांवांत, NSAID आहेत. ही सगळी 'पेन किलर' प्रकारात मोडतात, अन त्यामुळे अ‍ॅसिडीटी होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. तेंवा, या प्रत्येक गोळी सोबत, एक अ‍ॅसिलॉक किंवा झिनेटॅक ची गोळी जरूर घ्यावी.

त्याचप्रमाणे आंतरजाळावर खालील संज्ञेची काही औषधे दिसली. त्या संज्ञा काय आहेत?
Non-Steroidal Anti-Inflammatory Drugs (NSAIDs) ibuprofen, aspirin, and naproxen to relieve
Loperamide – Imodium used to slow down bowel movement, used in diarrhoea
Metronidazole, a broad spectrum antibiotic for amoebic, protozoan infections
Antihistamines – diphenhydramine (Benadryl) for allergic reactions

NSAID : ही औषधे दुखणे व सूज कमी करणे, ताप उतरविणे, संधीवात, रक्त पातळ करणे इ. गोष्टींसाठी वापरात असतात. (अँटीइन्फ्लमेटरी म्हणजे सूज कमी करणारी.)
Loperamide : पाटील सरांची पिवळी गोळी बहुधा लोमोटिल असावी. (लोपेरामाईड.)
मेट्रोनिडाझोल : अमिबाची डिसेंट्री झाली की वापरतात. चिकट जुलाब. ही गोळी खाल्ली तर चुकुनही दारू पिऊ नका. जोरदार रिअ‍ॅक्शन येइल.
Antihistamines : एविल, सेट्रिझिन इ. इ. सर्दीच्या गोळ्यांत असे औषध असते. अ‍ॅलर्जीसाठी वापरात येणारी औषधे.

फर्स्ट एड बॉक्स मधे बँड एडच्या वेगवेगळ्या साईझच्या पट्ट्या ठेवलेल्या बर्‍या.

जखमेस साबण-पाण्याने स्वच्छ धुणे व नीट कोरडे करणे हा उत्तम प्रथमोपचार आहे. भाजल्यास थंड पाणी. कोणत्याही केमिकलमुळे त्रास झाल्यास केमिकलच्या संपर्कात आलेला भाग भरपूर पाण्याने धुणे. थोडक्यात, एक बिसलरीची बाटली हा उत्तम प्रथमोपचार ठरू शकतो.

मोठ्या अपघातांत, कुणी बेशुद्ध पडल्यास इ. - ABC ध्यानी ठेवा. हे बहुधा थोडे ट्रेनिंग घेतलेल्यांनीच करावे. फ्रॅक्चर वाटत असेल तर तो भाग हलवायच्या फंदात पडु नका.
(A एयरवे - श्वसन मार्ग. पेशंटला मोकळी हवा मिळणे गरजेचे. घट्ट कपडे सैल करा. तोंडात कवळी वगैरे असेल तर काढून घ्या, मान एका कुशिवर वळवा. B ब्रीदिंग - कृत्रीम श्वास देणे. C सर्क्युलेशन - वाहते रक्त थांबविण्याचा प्रयत्न करा.)

अ‍ॅम्बुलन्स बोलवा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

उपयुक्त माहिती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

वर मी मुद्दामच कोणत्या गोळ्या/औषधे 'फर्स्ट एड' म्हणून ठेवाव्या या बद्दल बोललेलो नाही. कोणतीही औषधे शक्यतो स्वतःच्या सल्ल्याने घेऊ नयेत असे माझे मत आहे. (अगदी डॉक्टर म्हणून मी देखिल स्वतःची ट्रीटमेंट -माझी स्पेशालिटी सोडल्यास- करीत नाही. योग्य त्या तज्ज्ञास दाखवून घेतो. एक न्हावी दुसर्‍याची हजामत फुकट करतो, अन स्वतःची स्वतःला करता येत नाही असे काहीसे)
१०० पैकी ९९ वेळा अपेक्षित फरक जरी पडत असला, तरी डॉक्टर म्हणून पेशंट न तपासता मी असा "ब्लँकेट" सल्ला देऊ शकत नाही. ही माझी मर्यादा कृपया समजून घ्यावी.

वर उल्लेख करायचा राहिला ते हे :
पाण्यासोबत सहज उपलब्ध असलेले दुसरे फर्स्ट एड 'औषध' म्हणजे शेव्हिंग किट मधील आफ्टर शेव्ह (छोट्या कापण्यावर निर्जंतुकीकरणासाठी) व तुरटी. (परत कापल्यावर इलाज व अशुद्ध पाणी शुद्ध करण्यासाठी.) कुठे दुर्गभ्रमणास वगैरे जात असाल तर पाणी शुद्ध करायला क्लोरीनचे ड्रॉप्स मिळतात ते वापरा. अन्यथा बिसलरीचा सुकाळ सगळीकडे आहेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

उपयुक्त माहिती.

१०० पैकी ९९ वेळा अपेक्षित फरक जरी पडत असला, तरी डॉक्टर म्हणून पेशंट न तपासता मी असा "ब्लँकेट" सल्ला देऊ शकत नाही. ही माझी मर्यादा कृपया समजून घ्यावी.

अहो निदान क्रोसीन/कॉम्बिफ्लॅम वगैरे तरी गोळ्या चालत असतिल ना? अगदिच डोकेदुखिसाठी डॉक्टर गाठायचा म्हणजे डोकेदुखि होउ शकते. अन्यथा अशा गोळ्यांच्या जाहिराती तरी बंद व्हायला हव्यात.

तसेच २ शंका -
१. रक्तस्त्राव होत असल्यास प्राथमिक उपचार काय करावेत?
२. माणूस बेशूद्ध पडला असल्यास काय प्राथमिक उपचार करावेत?
३. इथे सल्ला दिल्याबद्दल तुम्ही फी आकारणार काय ;)? (ह्.घ्या.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

याला म्हणतात जेणो काम तेणो थाय
डाँक्टर चांगली माहिती दिलीत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

(माहिती टाळलीत असे म्हणा:))

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

पाषाणभेदांचेही आभार
उपयुक्त धागा
श्री पाटील यांचाही प्रतिसाद माहितीपूर्ण आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

काही ब्रँड्स राहीलेत का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROFLROFLROFLROFLROFL
प्रभु मास्तर की जय! अगदी माझ्याही डोक्यात हेच आले होते... Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो. चपटी नावाचं औषध राहिलं. ते बहुपयोगी आहे. बधीरता घालवतं, दुखणं विसरायला लावतं, जखम धुण्यासही उपयुक्त असतं वगैरे... बरोबर?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही लागलं तर जखम स्वच्छ करुन अँटीबॅक्टेरीअल क्रीम लाउन डॉ. कडे जाणे, भाजले तर गार पाण्यात तो भाग धरुन त्यावर अँटीबॅक्टेरीअल क्रीम लाउन डॉ. कडे जाणे, बाकी अ‍ॅसिडीटीच्या गोळ्या, आयबोप्रोफेन वगैरे मामुली बात.
मुलांना औषध देताना मुलांचेच औषध वय -डोस इ. खात्री करुन द्यावे...त्यातही फार फार तर मॉर्फीन च्या पुढे मी जात नाही.
सीपीआर योग्य त्या प्रशिक्षणाशिवाय न केलेला बरा.
बाकी प्रथमोपचार म्हणजे डॉक्टरकडे जाण्याआधिचा उपचार ही आमची समजुत होती त्यामुळे त्यात्पुरत्या रीलीफसाठी घेतल्याच तर गोळ्या घ्याव्या लागतात असं वाटलं होतं. काय ओ डॉक्टर?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यातही फार फार तर मॉर्फीन च्या पुढे मी जात नाही.

मॉर्फिन काय असतं, अन केंव्हा देतात? अन तुम्हाला मॉर्फिन मिळतं कुठे नक्की? :-ss
शिल्पा ताई, डेन्जर्स समज्लीत का सेल्फ ट्रीटमेंटची?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

इथे (अमेरीकेत) लहान मुलांचे वेगळे अन मोठ्यांचे वेगळे मॉर्फीन ऑन द काउंटर मिळते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओ तै तुम्हाला मॉटरिन तर म्हणायचे न्हवते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो, मॉट्रीन म्हणायचं होतं (आयबुप्रोफेन)..टायपो..सॉरी. मॉर्फीन माझ्या सर्जरीनंतर हाताला नळी जोडुन दिलेलं आठवतंय..ते काही ऑन द काउंटर मिळत नै..का ओ डॉक्टर?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तेवढिच मझ्य ज्ञानात भर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

बॉक्सशी थेट संबंध नाही. पण भारतात बरेच लोक मुका मार लागल्यानंतर लगेच गरम पाण्याने शेकतात. तसे न करता लागल्यानंतर लगेच बर्फाने शेक द्यावा. नंतर मात्र गरम पाण्याने (किंवा आलटून पालटून, थंड गरम) असा शेक देतात. (ही माहीती अनेक डॉ./फिजिओथेरपिस्ट लोकांना विचारून लिहली आहे. चूकीची असल्यास इतर डॉ. लोकांनी तसे दाखवून देणे, धन्यवाद.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाय्लोबा
गरम पाण्याने/पिशवीने इ. शेकल्यास त्या भागातील रक्ताभिसरण वाढते. नुकताच मुका मार लागलेला असल्यास या शेकामुळे सूज वाढेल. म्हणून बर्फाचा शेक. याने रक्तवहिन्या अकुंचन पावून सूज कमी होते. नंतर मात्र गरम शेक केल्यास रक्ताभिसरण वाढल्याने दुखावलेल्या भागास 'रिपेअर' होण्यासाठी लागणारी सामुग्री, औषधे इ. तिथवर पोहोचणे सोपे जाते. तसेच दुखापतीने त्या ठिकाणी निर्माण झालेली विषद्रव्ये तिथून वाहून नेली जाऊन दुखणे कमी होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

प्रत्येक वेळी थंड शेकासाठी बर्फ उपलब्ध असेलच असं नाही. विशेषत: प्रवासात, ट्रेकिंगला जाताना, खेळाच्या मैदानावर प्रशिक्षकांजवळच्या प्रथमोपचाराच्या साहित्यात तर हे आवश्यकच आहे. हे पाकीट जोरात दाबलं की आतले दोन कप्पे फुटून गारवा देण्याची प्रक्रिया चालू होते. एरवी प्लॅस्टिकच्या छोट्याशा डब्यात खूप काळ चांगल्या स्थितीत राहतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0