नवचंदीतला अर्धा तास

साऊंड बंद करा. बंद करा साऊंड. आराधी चिडल्यात. आरे बंद करना भो! आयकाय यायना कायच. आरं थांबना हेवडं गाणं होव दे. नको नको बंद कर तु.

ए नामरे सबसे बडा तेरा नाम ओ शेरोवाली उचे डेरोवाली बिगडे बना दे ... बना दे वर गाणं गचकन् थांबलं.

गर्भा डान्सवाले डान्सपार्टनर बाई असेल तर बाईबरोबर आणि पोरगी असेल तर पोरीबरोबर हासत खिदळत खिदळत हसत गप्पा मारु लागले. टिंगला करु लागले. घाम पुसू लागले. परस्परात आवडलेल्या एकमेकांची केअर करु लागले. गाणं चालू होण्याची वाट पाहू लागले. रोमान्स गर्भागँगच्या रुपानं देवीसमोर लडिवाळ रुंजी घालू लागला. देवी स्माईल करत बघू लागली. आता आराधी, हिजडे, मंडळ कार्यकर्ते आणि गर्भावीर यांचा कालवा जरा नीट ऎकू यायला लागला. कवापास्नं चाल्लाय मनचंदपणा आस्ली भक्ती आस्ती व्हय?

आवो आमी देवीच्याच गाण्यावर नाचतोय की. होय गाणं मोप दिवीचं हाय. तुमीबी भक्तीच करताव. नाचताव. ढुंगणाला ढुंगण लावू लावू चेकाळताव. बरी वाटतीय शेवा दिवीला. आवो तुमी तुमचं तुमचं बगा ना.

चला चला जाव द्या सोजरमावशी सुरवात करा. होय की शेवा कराय आलेत पाचवी माळ हाय आज रोजच्चं चाल्लय उद्या आबाच्या कानावरच घाल्ताव आरतीला येत्यालच की. नायतं लाव गं मोबायील. ब्यालन्स उडलाय ? बरा उडतोय गं येळवक्तालाच. बघू उद्याच. बास की आता करा सुरुवात. आमाला नेम घालून दिलाय नव दिवस आमचाबी टायीम पाळा. अय उरका रं नादाला पाद न् सा म्हयनं वाद. बळीराम मांड बैठक ठिव पानसुपारी. त्योक दिशीच्या बाटल्याच काढायलाय खिश्यातनं. आगं पान सुपारी देवय बायकडं हाय. देवयी कुठं हाय. आता ? तिकडं कोपर्यात काय करायलीय? सुद्याला का आवळलय? (हिजड्यांना गर्भ्यात दुर्लक्षिले असल्याने आराधी पार्टीत सामील होऊन गर्भ्यातल्या सामील सभासदांना चिरक्या बायकी आवाजात त्यांच खौट शिव्या देणं चालू आहे. ) गर्भ्यातल्या एका हिरोनं डाऊन इंप्रेशनच्या फिलनं एकाला गपय छक्क्या म्हटलेलं त्यानं डायरेक्ट त्याच्या गोट्यालाच हात घातलेला. कळीच्या जागेवरच कळ आल्यानं हा व्याकुळ कळवलेला. पाच मिनिट साईड बाय साईड कहर मातलेला. बाया पोरींचं खि खि ख्वा ख्वा चालूच. छक्या म्हणतोय, शेमनंच बाद करील भाड्या. बशीव मग बायलीच्या उरावर शेजार.

सुद्या आईक नकू वाढवू मिटलय. अय सरा मागं आगं सोड देवय बाय (हिजड्यांचा सेनापती देवयबायनी आवळून धरलेला.) गप सुद्या चल आरती मांड. आयला सुद्याला लै मजा वाटत आसल राव. हैट तसल्याला काय वाटत नाय. आरे उठतच नाय त्यांच. हा. तु झोपला होता त्याच्याबरं तुला म्हायती हे. ऎ पोरांनो व्हा रे बाजूला. हं बळीराम मांड रं. दोनच मिन्टात आलो. उरक लौकर (मंडपाच्या मागं बळीराम शेसाबाय आणि भिमाआबा गपागप देशीचे दोन ग्लास वढतात. विदाऊट चकणा टॉप टू बॉटम)
बैठक सजते.

परडी पोत झांजा कवड्याच्या माळा पानसुपारी हाळद कुकवाचा सरंजाम जाणती सोजरबाय देखण्या देवयबायच्या संगतीने तपासते. एक स्थिर माईक आणि दुसरा भ्रमण माईक दिमतीला हजर होतात. तुणतुण्यांचं टांग टांग टांग टांग... झांजाची छळणंग छळणंग छळणंग आणि हालगीची कडकड दिडमिनिट जोरदार घुमते. आई राजा उदे उदेची आरोळी माईकवरुन वातावरणात जोरदार भिनते. हिजडे निऱ्या, पदर, ब्लाऊजची बटनं, कृत्रीम थानं, पदराच्या पिना चेक करु लागतात. लंबे हातवारे करु लागतात. कुठल्याही गाण्यावर खतरनाक नाचायला सज्ज होतात.
टाँग टाँग टाँग टाँग टुंग टुंग टुंग टुंग
धिनांगडा धिनांगडा धिनांगडा धिनांगडा धिनांगडा . .

नवचंद गाजू लागते. सुबक बांध्याची लालचुटूक ओठाची देखणी देवी आराधी सेवा स्वीकारु लागते.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

जरा आरामात वाचुयात म्हणून बाजुला ठेवतोय.. तुर्तास पोच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मुळीच आवडलं नाही. मुद्दाम वाचणं अवघड व्हावं असं लिहिलं आहे असं वाटून अर्ध्यातून ठेऊन दिलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.