ट्रक धिना धिन!!

.

आपल्याला सगळ्यांना हे माहीतच असेल कि आपल्याकडे ट्रक चालक स्वताच्या ट्रकमागे काहीना काही लिहित असतात. मी या अशा लिखाणाचे खूप निरीक्षण करायचो. मला ते खूप आवडायचे. एकदा गोव्याला मित्रांबरोबर जाताना रस्त्यात एक ट्रक दिसला. त्यामागे ट्रकमधल्या साहित्यिकाने बरेच काही लिहिले होते. वरती तो फोटो लावला आहे. मला स्वताला हा ट्रक चालक नेहमीच एक भावनिक, विचारवंत आणि एक कवी मनाचा वाटत आला आहे. स्वताच्या भावना तो आपल्या ट्रक मागच्या ब्लॉगद्वारे दुसऱ्यांना सांगत असतो.

त्याला स्वताच्या ट्रकवर खूप प्रेम असते. आपल्या ट्रकला तो एक जीवनाच्या साथीदराप्रमाणे जपत असतो. कारण त्याचा बराचसा जीवनाचा काळ या ट्रकबरोबरच घालवत असतो. जीवनामधील अंतर तो लांब अशा रस्त्यामधून आक्रमित असतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मालवाहतूक करणे हे त्याचे मुख्य काम. सजवलेला ट्रक पाहताना खूप मजा वाटते. त्या पुढे लावलेल्या झिरमिळ्या, लायटिंग, ते रियर विव्यू मिररवरचे लाल वैष्णव देवीचे कापड जे वाऱ्याबरोबर हेलकावे खात असते किंवा छोटी कोल्हापुरी चप्पल लटकलेली सारे काही ट्रकच्या सौंदर्यात भर घालतात. पण सगळ्यात भारी काम असते ते ट्रकच्या मागे लिहिलेली ग्राफिटी!!

तर या ग्राफिटीमध्ये नेहमी काहीना काही संदेश, विनोद किंवा मागील येणाऱ्या गाड्यांना उचकवण्याचा प्रयत्न केलेला असतो. मला माहित असलेले काही लिखाण इथे टाकतो, तुम्हीही त्यात भर घाला.

नेहमीची एक विनंती असते " Horn Ok please " ती का असते ते नेहमीच कोडे आहे. कदाचित ट्रकच्या आणि मोठ्याने लावलेल्या गाण्याच्या आवाजात ऐकू यावे म्हणून असेल.
काही ठिकाणी " मेरा भारत महान " असा अभिमानी संदेश नाहीतर अगदी उलटे " सौ मेसे अस्सी बेईमान, फिर भी मेरा देश महान " असा खवचट सल्ला.
बाकी काही उचकावणारे संदेश म्हणजे खालीलप्रमाणे
"बुरी नजर वाले तेरा मु काला"

“बुरी नज़र वाले, तेरे बच्चे जियें,

बड़े होकर, देसी शराब पियें”

"नाद करायचा नाय!!"

"दम है तो क्रॉस कर नही तो बर्दाश्त कर"

“चलती है गाड़ी, उड़ती है धूल,

जलतें हैं दुश्मन, बिखरतें हैं फूल.”

कधी कधी तो रोमांटिक होतो आणि म्हणतो:-

“चल हट, कोई देख लेगा”

“देखो मगर प्यार से”

“दुल्हन वही जो पिया मन भाये,

गाड़ी वही जो नोट कमाए”

वैचारीक संदेश खालीलप्रमाणे :-

"समय से पहले और भाग्य से जादा कभी नही मिलता"

“छोटा परिवार, सुखी परिवार”

“एक या दो, बस”

"कंडोम कब कब, यौन संबंध जब जब"

काहीजण आपली कृतज्ञता व्यक्त करतात:-

"आई वडिलांचा आशीर्वाद", "नानांची कृपा", "दादा वहिनींची कृपा"

अशी हि सगळी ग्राफिटी नेहमीच आकर्षक असते. ते वाचण्याचा, एक लांबच्या प्रवास करत असलेल्या प्रवाशाला काही क्षण का असेना विरंगुळा असतो. तुम्हीही कुठे पहिली असेल अशी ग्राफिटी तर या ट्रक साहित्यात भर घाला. Wink

(प्रेरणा आणि संदर्भ:- ट्रकमागील ग्राफिटी)

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

प्रतिक्रिया

सर्व वाक्ये साभारः गुगल बझ

' मेरा भारत महान '

" बघतोस काय ? मुजरा कर .....! "

बघतोस काय रागाने , ओव्हरटेक केलंय वाघाने!

" बघ माझी आठवण येते का ?"

" पाहतेस काय प्रेमात पडशील "

"साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस."

अं हं. घाई करायची नाही.

तुमच्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही

" गपगुमान माझ्या मागं मागं सांग-लीला येतीस का ?"

" तुच आहेस तुझ्या जेवणाचा शिल्पकार.. "

" अहो , इकडे पण बघा ना... "

" हे ईश्वरा सर्वांचं भलं कर..... पण सुरुवात माझ्यापासुन कर".

"थांब लक्ष्मी कुंकू लावते!"

"तुमचे लक्ष आमच्याकडे का ?"

" लायनीत घे ना भाऊ"

"चिटके तो फटके!"

"राजे तुम्ही पुन्हा जन्माला या"

"अयोध्या , बेळगाव , कारवार् , निपाणि , इंदौर् , गुलबर्गा , न्यू जर्सी , ह्युस्टन , सॅन्टा क्लारा , सनिव्हेल , फ्रिमॉन्ट् , हेवर्ड , बिजिंग ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे."

"१३ १३ १३ सुरूर !"

" नाद खुळा"

" हाय हे असं हाय बग"

"आई तुझा आशिर्वाद."

" सासरेबुवांची कृपा " -----

" आबा कावत्यात!"

पाहा पन प्रेमाणे

नवतीचा नखरा , गुलजार पाखरा , खरा न धरा , भैरोबा-भैरोबा स्मरा.

" हे तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही फार जवळ आलेला आहात!"

"अच्छा , टाटा , फिर मिलेंगे."

"हरी ओम हरी , श्रीदेवी मेरी..."

"योग्य अंतर ठेवा वाहनामध्ये ...आणि ...मुलांमध्ये.."

"वाट पाहिन पण एस टी नेच जाईन."

"गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी"

"हेही दिवस जातील"

"नाद नाही करायचा ढाण्या वाघाचा"

"घर कब आओगे ?"

"१ १३ ६ रा"

"सायकल सोडून बोला"

"हॉर्न . ओके. प्लीज"

"नानाचा जोर...पप्पु , पिंकी , छोटी , चिंटु , ताई , अमोल , बबलु"

एका एस. टी. च्या मागे (बहुधा ट्रक ड्रायव्हर्स ना उद्देशून)

"तुमच्या वाहनात ऊस , कापूस , कणसं माझ्या वाहनात लाख मोलाची माणसं याचा विचार करून गाडी चालवा "

बाकईच्या मागे सापडलेली काही वाक्ये--

सुसाईड मशिन

मिसगाईडेड मिसाईल

मॉम सेज नो गल्स

बाई(क) च्या मागे नका लागु...माझ्याशी गाठ आहे...

एका ट्रक च्या मागे लिहले होते: राजू , चिंटू , सोनू ....!

अणि खाली लिहले होते .....

बैंक ऑफ़ महाराष्ट्र याच्या सौजन्याने !

एका टेम्पोच्या मागे लिहिलेले: "माझ्याशी पैज लावू नका लय भरी पडेल " आणि खाली लिहिले होते....

" ड्रायवर शिकत आहे" (बारीक़ अक्षरात)

अजस्त्र डंपरच्या पाठीमागे

उगीच हॉर्न वाजवू नये

तुला चिरडायला एक सेकंद पुरेल

एका टेम्पोच्या मागे..

आलात आनंद , बसलात अत्यानंद , उतरलात परमानंद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यशवंतराव तुम्ही तर बुवा कमालच केली आहे!! धन्यवाद!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आशीर्वाद कधीच नसतं बरं का ..... आशिर्वाद किंवा आर्शिवाद असते. पण अशा किरकोळ शुद्धलेखनाच्या चूका दुर्लक्षायच्या Wink भावना महत्त्वाची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो,
तो शब्दच आर्शिवाद असा आहे.
ट्रकवाल्यांचा स्पेशल शब्द आहे तो. Tongue

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

वोके, वोके

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी बुरी नजर्...ची आणखी एक आवृत्ती पाहिली आहे- 'बुरी नजर वाले तेरे बच्चे जियें, बडे हो कर तेरा खून पियें'

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0