अनैतिकता , संगीत दिग्दर्शक आणि Nostalgia चे उमाळे

मी अशात ऐकलेली नवीन वैचारींक पिंक :

headphone वर गाणे ऐकत बसलो होतो .

बाजुच्या डेस्क वरचे काका ," काय रे ? काय ऐकत आहेस ? "

"आतिफ अस्लम ."

त्यांनी माझ्याकडे सहानुभूती पूर्वक कटाक्ष टाकला . त्याला माझा आक्षेप नव्हता . पण ते जे काही बोलले त्यामुळे मी पार भंजाळून गेलो . इतका की ते वाक्य पूर्ण पणे quote करण्याचा मोह आवरत नाही .

"तुमच्यासमोर दुसरे काही चांगले option नाहीत का रे ? हे आजकालची पोर (संगीत दिग्दर्शक ?) इंग्लिश गाणी चोरतात आणि तुम्हाला ऐकवतात . तुम्हाला पण जे काही बाही पाश्चमात्य ते सगळ गोड वाटत . आमची पिढी त्याबाबतीत खूप नशीबवान . काय ते दिग्गज एकेक संगीत दिग्दर्शक होते त्याकाळी . ओपी , बर्मन साहेब , सलिल चौधरी . वा वा ! देवाघरची माणस सगळी . त्यांनी या मातीतल संगीत दील . काय त्या रसाळ चाली . काय ती melody !आणि हे सगळ original बर का. तुमच्या अनु मलिक आणि प्रीतम सारख्या चोऱ्या नाही केल्या त्यांनी. "

असे कुणी पिढीचे हिशेब द्यायला लागले की टाळके सरकते . भारतीय चित्रपटा च्या इतिहासात मला रस असल्याने मी त्यावर थोड फार वाचन केल होत . त्यामुळे मला हे माहित होत की भारतीय चित्रपट हा plagiarism चा इतिहास अंगावर भरजरी दागिना बाळगावा त्याप्रमाणे वागवतात . अगदी सुरुवातीपासून . मग च्यामारी ह्या ५०, ६० आणि ७० च्या दशकातल्या म्युझिक directors एकदम कसे काय गुणवत्तेची खाण निपजले की त्याकाळातले लोक आज पण त्यांच्या नावाने उसासे टाकत असतात ? अशी कशी bollywood रुपी चिखलात हि कमळ उगवली ? दाल मे जरूर कुछ काला है म्हणून थोड अधिक संशोधन केल . मग कळल की पूर्ण दालच काली आहे .

म्हणजे अस बघा . आजा सनम मधुर चांदनी मे हम हे राज कपूर च्या चोरी चोरी मधल शंकर -जयकिशन च मधुर गाण एका गाण्यावरून (http://www.youtube.com/watch?v=U-xsosv6uM0) सरळ सरळ ढापल आहे हे कळाल्यावर धक्का नाही बसणार ? दिल तडप तडप के कह रहा है आ भी जा हे सलिल चौधरी च रसाळ गाण सही सही नक्कल (http://www.youtube.com/watch?v=jLijXZBsdbo) आहे हे कळाल्यावर धक्का नाही बसणार . आर ड़ि बर्मन आणि ओपी ची अख्खी कारकीर्द चोरलेल्या इंग्लिश गाण्याच्या पायावर उभी आहे हे कळल्यावर भारतीय म्हणून वस्त्रहरण झाल्याचा फील नाही येणार का ? आमच्या पिढीच एक ठीक आहे हो पण 'सुवर्ण काळाच्या ' आठवणी काढून उसासे टाकणाऱ्या व आजकालच्या संगीताला उठसुठ नाव ठेवणार्या बाजूच्या डेस्क वरच्या काकासार्ख्या लोकाना काय वाटेल ? ज्या nostalgia च्या आपण दिवसरात्र ढेकरा देतो तोच अनैतिक पायावर उभा आहे हे कळल तर पायाखालच जाजम काढून घेतल्यासारख feeling नाही येणार त्यांना ?

वस्तुस्थिती हि आहे की या तथाकथित 'सुवर्ण कालामधली ' अनेक गाणी ही त्याकाळच्या हिट इंग्रजी गाण्यावरून चोरलेली होती . त्यासाठी आपल्या गुणवान संगीत दिग्दर्शकांनी मुळ गाण्याची मालकी ज्यांच्याकडे होती त्यांच्याकडे परवानगी घेण्याची तोशीस पण घेतली नाही हे तर उघडच आहे . दुसऱ्या शब्दात सांगायचं तर हि शुध्द चोरी होती . या चोरी चे अनेक तपशील तुम्हाला इथे सापडतील .
http://mrandmrs55.com/2012/08/24/plagiarism-in-hindi-film-music-is-imita...

http://www.itwofs.com/hindi-opn.html

nostalgia चे उमाळे काढणाऱ्या लोकांचे आद्य सरदार जे की शिरीष कणेकर याना याबाबत कुणीतरी भर कार्यक्रमात प्रश्न विचारला . कणेकर काही क्षण नक्कीच गडबडले असतील पण त्यांनी जी मखलाशी केली ती मुळातून वाचण्यासारखी आहे . कणेकर म्हणतात ," त्यांनी गाणी चोरली हे अमान्य करण्यात अर्थ नाही पण त्यांनी या गाण्याचं 'भारतीयकरण ' केल आणि त्यात जी melody आणली त्याच श्रेय या संगीत दिग्दर्शकाना द्यायला हव ." म्हणजे चोरी ते चोरी वर सिनाजोरी ?

या निमित्तान काही प्रश्न उपस्थित होतात .
१) अन्नु मलिक , प्रीतम , ओपी आणि बर्मन पितापुत्र हे संगीत शर्विलक या एकाच श्रेणीतले म्हणून गणले जाणार का ?

२) आता सगळाच मामला चोरीचा आहे हे कळल्यावर तरी nostalgia चे उमाळे थांबतील का ?

३) ओपी नय्यर आणि तत्सम संगीत दिग्दर्शक चोर आहेत हे कळल्यावर त्यांच्या भक्तांच्या भावना बदलणार आहेत का ?

मी जमा केलेला संगीत चोरीचा डाटा बाजूच्या डेस्क वर च्या काकाना मेल करणार होतो . पण नाही केला . ज्याचा त्याचा nostalgia . हल्ली मी माझ्या डेस्कवर आमच्या रहमान च्या rockstar ची गाणी फुल आवाजात ऐकतो .

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

आमच्या लहानपणी (१९७०चे दशक) गाजत असलेल्या "पप्पा सांगा कुणाचे" या सुप्रसिद्ध आणि अजरामर गीताची चालसुद्धा कोण्या इंग्रजी गाण्यावरून ढापलेली आहे, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

===========================================================================================
If you're happy and you know it, clap your hands
If you're happy and you know it, clap your hands
और जो तन-मन में हो रहा है
यह तो होना ही था!

(असो चालायचेच.)
===========================================================================================

पूर्वीही ढापूगिरी होत असेच. परंतु त्या काळी इंग्रजी/पाश्चात्य गाणी फारशी कोणाला माहीत नसल्याने "ही चोरी आहे" हे कळत नसे, इतकेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण ती ढापूगिरी होती हे आता कळल्यावरसुद्धा जर....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

... लिंक गंडलीयशी वाटते. (चूभूद्याघ्या.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वारी.
ही लिंक चालावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'आजा सनम मधुर चांदनी' साठी जी धुन तुम्ही दिली आहेत ती पुढील गाण्याच्या अधिक जवळ जाते.
'चाहे होई खुश हो चाहे गालियाँ हजार दे' - चित्रपट : टॅक्सी ड्रायव्हर, संगीत : सचिनदेव बर्मन.
याच गाण्यावरून मराठीत 'धुमधडाड धुमधडाड तोफ धडधडे, अरे मस्तवाल दुश्मनास चारुया खडे' हे गाणे आले असावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनु मलिक आणि राजेश रोशनकडे वडलांच्या जुन्या, लोकांसमोर न आलेल्या वह्या आहेत. हे लोक गरजेनुसार त्यातून माल काढतात अशीही एक थिअरी(!) ऐकलेली आहे. त्यावर विश्वास ठेवावासा वाटतो कधीमधी.

nostalgia चे उमाळे काढणाऱ्या लोकांचे आद्य सरदार जे की शिरीष कणेकर ...

Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे गाणं सरदार मलिकांच्या डायरीतूनच चोरलेलं आहे, असा माझा वहीम आहेच मुळी. http://www.youtube.com/watch?v=FfY504bogjU

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी अगदी. राजेश रोशनला मात्र बहुतेक वडलांच्या 'रफ वही'वर काम मारून न्यावं लागत असावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बदलणार नाहीत.
कारण भारतीय कानांवर ही 'चोरलेलीच' पडतात हो.
मुद्दाम कोणी मूळ गाणी ऐकायला जाणार नाही. शिवाय गाणं म्हणजे काही फक्त चाल नव्हे. त्याचे शब्दही मला आवडतात.
मी गाणं ऐकतो ते कानाला, मनाला छान वाटतं म्हणून. ते कुणाचंही असो.

- शेखर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'छाया' ह्या १९६१ सालच्या सिनेमातल्या 'इतना ना मुझसे तू प्यार बढा…' ह्या गाण्याचा मुखडा म्हणजे मोझार्टच्या सिम्फनी नंबर ४० ची हुबेहूब कॉपी आहे(इथे प्रत्यक्ष ऐका). परंतुही अशी चोरी उघड करण्यामुळे ना त्या हिंदी गाण्याची गोडी कमी होते, ना मोझार्टच्या त्या रचनेची, नाही का? ...माझ्या मते कोणच्याही निर्मितीच्या बाबतीत मुळात 'ओरिजनल' असं काही खरंच असतं का, ह्या प्रश्नावर विचार होणं जास्त गरजेचं आहे. आणि 'कॉपी केली' ह्याहीपेक्षा ती 'कशी केली' ह्याला कलेच्या क्षेत्राततरी अधिक महत्त्व द्यावं असं मला वाटतं. म्हणजे प्रीतम कॉपी करतो हे मान्य - पण काहीवेळा तो त्या मूळ गीतावर/ रचनेवर स्वतःची खूप सुंदर 'स्वरकल्हई' चढवतो. मग तिथे कॉपी हा मुद्दा महत्त्वाचा उरत नाही. कारण मूळ रचना आणि तिची कल्पना ढापून बनवलेली नवी रचना दोन्ही आपापल्या ठायी सुंदर, श्रवणीय झालेल्या असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

You have not yet discovered that you have a lot to give, and that the more you give the more riches you will find in yourself.
- Anaïs Nin

प्रश्न नैतिकतेचा पण आहे . नाही ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

- हो, आहे ना! पण हा प्रश्न इतकाही सोपा-सरळ नाही की चोरीचे आरोप करण्याने सुटू शकेल, नाही का? इतकं नियंत्रण जर कलानिर्मितीवर आणायचं ठरवलं तर एकमेकापासून प्रभावित झालेल्या अनेक कलाविष्कारांना आपल्याला मुकावं लागेल. आणि बाय द वे, 'मुळात 'ओरिजनल' असं काही खरंच असतं का?' हा प्रश्नही कलानिर्मितीच्या नीतिशास्त्रातला महत्त्वाचा पेच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

You have not yet discovered that you have a lot to give, and that the more you give the more riches you will find in yourself.
- Anaïs Nin

बरोबर...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

नैतिकता वैग्रे १२ गडगड्यांच्या व्हिरीत घाला.

पण सगळे भामटे आजच उपटले असा काङ्गावा चूक आहे हे मान्यच.

तरीही मी म्हणेन- पूर्वीही चोरी चालायची पण उस मे कुछ दम जरूर था. फक्त व्हर्बॅटिम चोरी नव्हती. थोडे ट्वीकिंगही असावे. पण जे काही होते ते ऐकायला आजही उत्तम वाटते. नैतर अलीकडे पहा, थोडे अपवाद वगळले तर गाणी श्रवणीय नसतात-चोरी ऑर नो चोरी.

तस्मात अलीकडच्यांना शिव्या घालायच्या तर चोरतात म्हणून नाही तर डोके वापरत नाहीत म्हणून घालायला हव्यात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तरीही मी म्हणेन- पूर्वीही चोरी चालायची पण उस मे कुछ दम जरूर था. फक्त व्हर्बॅटिम चोरी नव्हती. थोडे ट्वीकिंगही असावे. पण जे काही होते ते ऐकायला आजही उत्तम वाटते. नैतर अलीकडे पहा, थोडे अपवाद वगळले तर गाणी श्रवणीय नसतात-चोरी ऑर नो चोरी.

वेल... पूर्वीचे ज्याची चोरी करायचे ते मुळात सुश्राव्य असायचे, उत्तम असायचे (नाहीतर आताचे...), असे चटकन म्हणून जाण्याचा मोह क्षणभर अनावर झाला होता खरा, पण तेही तितकेसे खरे नसावे.

पण 'If you're happy and you know it, clap your hands' या काहीशा कॉमनप्लेस बालगीताची चाल अगदी किंचितच (अगदी एका ओळीपुरतीच) ट्वीक करून ती 'एक मैं, और एक तू' या एनीथिंग-बट-बालगीताच्या मुखड्याला (श्रोत्यांच्या अज्ञानामुळे का होईना, पण) बेमालूमपणे खपवून देण्यासाठीसुद्धा एका प्रकारची अचाट कल्पकता लागतेच, हे मान्य करावयास हवे, नव्हे, त्याची दाद द्यावयास हवी.

आणि म्हणूनच,

तस्मात अलीकडच्यांना शिव्या घालायच्या तर चोरतात म्हणून नाही तर डोके वापरत नाहीत म्हणून घालायला हव्यात.

याच्याशी शतशः सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण 'If you're happy and you know it, clap your hands' या काहीशा कॉमनप्लेस बालगीताची चाल अगदी किंचितच (अगदी एका ओळीपुरतीच) ट्वीक करून ती 'एक मैं, और एक तू' या एनीथिंग-बट-बालगीताच्या मुखड्याला (श्रोत्यांच्या अज्ञानामुळे का होईना, पण) बेमालूमपणे खपवून देण्यासाठीसुद्धा एका प्रकारची अचाट कल्पकता लागतेच, हे मान्य करावयास हवे, नव्हे, त्याची दाद द्यावयास हवी.

कुडंट अग्री मोर!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तस्मात अलीकडच्यांना शिव्या घालायच्या तर चोरतात म्हणून नाही तर डोके वापरत नाहीत म्हणून घालायला हव्यात.
प्रचंड सहमत. कान किटेपर्यंत पंजाबी संगीत आणि आता अतिभडीमाराने तिडिक बसायला लागेल असं वाटायला लावणारं सूफी संगीताच्या नावाखलचं काहितरी ह्याबद्दल ही पर्फेक्ट कमेंट आहे.
पॅरिस नामक पात्राला शिव्या घालायच्याच असतील तर एका पोरीसाठी युद्ध सुरु केलं ह्यापेक्षा हेलनसारख्या बेवफा,अप्पलपोट्या आणि बेभरवशाच्या स्त्रीसाठी युद्ध सुरु केलं म्हणून शिव्या घालाव्यात.
बादवे, हल्ल्लीच्या गाण्यांत "ओय बंदेया", "खुदा या खै़र" , "कुडी सोणी मॅन्यू लगन्दि" ह्या सर्वांच्या वापरास बंदी घालण्यासाठी भारतीय दंडविधान, IPC मध्ये दुरुस्ती करुन एक कलम टाकावे असे वाटते.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पंजाबबंदी लागू करावयास हवी बॉलीवुडात फॉर अ चेञ्ज.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कूड़ा -कुड़ी / मुंडा-मुंडी च्या कानाखाली वाजवावीशी वाटते. अन टी मल्होत्रा/खन्ना/वर्मा नावही बन्द करा @$%#$%

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रेरणा सरसकट पश्चिमेकडून येत नसाव्यात..
असं म्हणतात की, सी. रामचंद्र चाली सुचत नसल्या तर आषाढी वारीत चक्कर टाकून येत..
उदा. कितना बदल गया इन्सान = दत्ता दिगंबरा या हो..

बाकी, "nostalgia चे उमाळे काढणाऱ्या लोकांचे आद्य सरदार जे की शिरीष कणेकर" +१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१) अन्नु मलिक , प्रीतम , ओपी आणि बर्मन पितापुत्र हे संगीत शर्विलक या एकाच श्रेणीतले म्हणून गणले जाणार का ?

शर्विलक ही श्रेणी एकच, पण त्यातही शर्विलककौशल्याच्या, आणि स्वतःच्या गुणवत्तेच्या उपश्रेणी असतातच. कुणा एका संगीतकाराने, बहुतेक अन्नू मलिक, स्वतःच्या संगीतचौर्याबद्दल खुलासा दिला होता- अहो मी तरी काय करणार, सातच तर स्वर असतात!
चोरी किती बेमालूमपणे आपल्या नावे खपवता येते या कौशल्यावर आदरणीयता अवलंबून असते.

२) आता सगळाच मामला चोरीचा आहे हे कळल्यावर तरी nostalgia चे उमाळे थांबतील का ?

मुळीच थांबायचे नाहीत. एका विशिष्ट काळातल्या संगीताबद्दल बहुतेकांना मृदू कोपरा असतो. मृदू कोपरा असला की वर कणेकरांनी केलेल्या सारवासारवीसारखे करण्याची प्रवृत्ती असते. तोच एक काळ म्ह्णजे संगीताचे सुवर्णयुग असे मुळीच नसते. पण ते जेव्हा ऐकले तो काळ बहुतकरून ह्या ऐकणार्‍या व्यक्तीचे सुवर्णयुग (= तारुण्य) असते. त्यामुळे उमाळे थांबायचे नाहीत.

३) ओपी नय्यर आणि तत्सम संगीत दिग्दर्शक चोर आहेत हे कळल्यावर त्यांच्या भक्तांच्या भावना बदलणार आहेत का ?

नाही बदलायच्या. चोरीकडे एक तर दुर्लक्ष केले जाईल किंवा ' ते एक सोडा, पण इतर......थोर्थोर....थोर्थोर.....' असले युक्तिवाद केले जातील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हम्म. काही म्हणा जुनी गाणी जास्त मधुर, श्रवणीय वाटतात खरी.
आणि 'जुन्या गाण्यांचे रिमिक्स करुन वाट लावली' म्हणणारे पण बरेचजण असतात, त्याबद्दल काय मत? मला काही रिमिक्स फार आवडतात. उदा. शैतान मधल खोया खोया चांद किँवा ये वादा रहा च रिमिक्स.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सरदार मलिकांचं नाव ऐकलं आणि मला (कणेकरांच्या च्या भाषेतच सांगायचं तर) बाष्पगद्गदीत व्हायला झालं.

बाकी सिन्ड्रेला मेन यांच्या धाग्याच्या गाभ्याशी सहमत आहे. अनेक गाणी अशीच "प्रेरणा घेऊन" बनवण्यात आलेली आहेत. हजारो सुश्राव्य, सुमधुर गाणी. व हेच माहीती नाहिये की त्यातली किती "मूळ कलाकारांच्या मालमत्तेच्या अधिकाराची पायमल्ली करून" बनवण्यात आलेली आहेत.

---

माझा असा दावा आहे की या मुद्याच्या मुळाशी enforce-ability of contracts/rights ही संकल्पना आहे. एक कलाकाराने बनवलेली संगीत रचना ही अनेकदा non-rivalrous AND Non-excludable असते. व म्हणून ती पब्लिक गुड बनते.

---

अनैतिकतेबद्दलच बोलायचे तर यात नैतिकतेचे जी तत्वे आहेत (अध्याहृत) ती अशी - (This is not an exhaustive list)

१) की मूळ कलाकाराच्या परवानगीशिवाय व मोबदला दिल्यापूर्वी दुसर्‍या कलाकाराने मूळ कलाकाराची कलाकृती वापरायची नाही.
२) ज्यांना ती नक्कल करून विकत आहात (श्रोते) त्यांना पूर्वकल्पना द्यायची की मी अमुक अमुक कलाकाराच्या तमुक कलाकृतीमधून प्रेरणा घेतलेली आहे.

ह्याला तुम्ही अनैतिकता म्हणू शकता किंवा मालमत्तेच्या अधिकाराची पायमल्ली म्हणू शकता.

---

प्रश्न -

आज जे लोक मालकंस गातात ते मालकंसाची संरचना करणार्‍या कलाकारास किती रॉयल्टी देतात ?
अभंगांची गाणी बनवणार्‍यांनी तुकारामांना किती रॉयल्टी दिली होती ?
हृदयनाथांनी ज्ञानेश्वरांना किती रॉयल्टी दिली ?
गालिब च्या शायरीवर लाखो कमवणार्‍यांनी गालिब ला किती रॉयल्टी दिली ?
आपल्याइथे लोकशाही राबवली तेव्हा ती राबवण्यापूर्वी ज्याने लोकशाहीची संकल्पना आणली (जो कोणी असेल तो) त्यास रॉयल्टी दिली होती का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज जे लोक मालकंस गातात ते मालकंसाची संरचना करणार्‍या कलाकारास किती रॉयल्टी देतात ?
अभंगांची गाणी बनवणार्‍यांनी तुकारामांना किती रॉयल्टी दिली होती ?
हृदयनाथांनी ज्ञानेश्वरांना किती रॉयल्टी दिली ?
गालिब च्या शायरीवर लाखो कमवणार्‍यांनी गालिब ला किती रॉयल्टी दिली ?

एखादी साहित्य/कला/बौद्धिक कृती किती वर्षांनंतर पब्लिक डोमेनमध्ये येते?

(ग़ालिबची केस बॉर्डरलाइन असू शकेल.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

साहित्यकृती त्या त्या देशाच्या प्रताधिकार कायद्याप्रमाणे विशिष्ट काळानंतर जनतेसाठी मुक्त होतात. त्यामुळे ज्ञानदेवाचे ओव्या किंवा तुकारामाचे अभंग वापरताना नक्कीच वंशजांना मानधन देण्याचा प्रश्न येत नाही. पण तरीही ते वापरताना हे आपले नाही असे जाहिर करणे नैतिकदृष्ट्या योग्य ठरते. अन्यथा ती (प्रताधिकारमुक्त असली तरी) साहित्याची चोरीच ठरते.

मंगेशकरांनी हे काव्य आपलेच आहे असे भासवले असते किंवा एखाद्या गायकाने आपण घडवलेला नवा राग म्हणून मालकंस गायला असता तर ती लबाडी झाली असती. (रागांवर आधारित संगीतरचना केली तरी श्रेय मिळते ते रागाच्या सुरावटीच्या निर्मितीचे नव्हे, तर बाकीच्या रचनेच्या कौशल्याचे.)

अर्थात ही उदाहरणे तितकीशी समर्पक नाहीत, कारण मालकंस आणि ज्ञानेश्वरी जाणणारे इतके लोक आहेत की असे खोटेच दडपून देणे कोणी ठरवले तरी शक्य होणार नाही. परंतु कमी माहितीच्या रचना बेमालूमपणे आपल्या रचनेत गुंफणे किंवा तशाच उचलणे हुशार आणि रचनाकुशल शर्विलकांना सहज शक्य होते. बॉलीवूड संगीतातच काय, पण मराठी आंतर्जालाच्या छोटया जगातही हे खूपदा आढळते.

फार दूर कशाला, इथेच ऐसीवर एका नवीन सदस्यांचा लेख जसाच्या तसा इतर दोन ठिकाणी चोरला गेल्याचे काही दिवसांपूर्वी उघडकीला आले होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शहराजाद व नवीबाजू यांचे प्रतिसाद यथार्थ आहेत.

ते प्रश्न विचारून मी एक चर्चा सुरु करु इच्छित होतो. Although I knew and anticipated(&&) these points/counterpoints, I was trying to stoke a conversation about property rights.

हे का महत्वाचे/लक्षणीय आहे ? जे एनफोर्स केले जाऊ शकत नाही वा एन्फोर्स करणे अतिखर्चिक असते त्याचे रुपांतर नैतिक मूल्यात होते. (प्रत्येक वेळा असेच होते असे नाही.) व त्या दृष्टिकोनातून पाहिलेत तर नैतिक मूल्ये ही काँट्रॅक्ट ला पर्याय म्हणून जन्मास येतात. (विधान धाडसी आहे. पण....)

मालमत्तेचा अधिकार हे एक प्रकारचे काँट्रॅक्ट आहे.

-----

(&&) - Gabbar thinks he is too smart.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मालमत्तेचा अधिकार हे एक प्रकारचे काँट्रॅक्ट आहे.

कसे?

म्हणजे, मुद्द्याचे खंडन म्हणून नाही, तर विचारधारा समजून घेण्यासाठी म्हणून प्रश्न: अगदी प्राथमिक स्वरूपात, "ही जी समोर दिसणारी जमीन / झाड / डबके जे काही आहे, ते मी माझे म्हणून घोषित करतो. त्यावर पूर्वी अशा प्रकारे कोणी हक्क सांगितलेला नाही, किंवा सांगितला असला, तरी यापुढे त्याची माझ्याशी गाठ आहे. आणि तू या जमिनीला / झाडाला / डबक्याला हात जरी लावलास (अ‍ॅज़ इन वापर केलास), तर त्या बदल्यात मी तुझ्या टाळक्यात हा समोर दिसतोय तो दगड घालीन", हे काँट्रॅक्ट?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मालमत्तेचा अधिकार हा काँट्रॅक्ट आहे तो असा -

( हे माझे इंटरप्रिटेशन आहे.)

१) कोणत्याही व्यक्तीस आपली मालमत्ता रेकग्निआईझ करून घ्यावी लागेल. व सरकारकडे नोंदणीकरून हे होऊ शकते.
२) व्यक्तीस इतरांची मालमत्ता विकत घेता येईल. पण विकत घेता येणे हा अधिकार नसेल. मालमत्तेचा मालक कोणत्याही संभाव्य ग्राहकास (तो कितीही मोबदला द्यायला तयार असला तरी) आपली मालमत्ता विकण्यास बांधील नसेल.
३) व्यक्तीस स्वतःची मालमत्ता विकण्याचा व्/वा तिच्यात बदल करण्याचा अधिकार असेल.
४) एका व्यक्तीला दुसर्‍या व्यक्तीची मालमत्ता परवानगीविना वापरण्याचा अधिकार नसेल. परवानगी मिळवण्यासाठी मोबदला दिला जाऊ शकतो.
५) व्यक्ती जेव्हा स्वतःची मालमत्ता नोंदणीकरते तेव्हा व्यक्ती असे मान्य करते की मी इतरांच्या मालमत्तेस हानी पोहोचवणार नाही. व त्याबदल्यात इतर लोक ही तसेच मान्य करतील.
६) नोंदणी करण्याचा उद्देश रेकग्निआईझ करून घेणे (क्लॅरिटी) व वरील अधिकार राबवण्यासाठी बेसिस बनवणे हा असेल.
७) व्यक्तीस आपली मालमत्ता इतरांना कशी वापरायला द्यायची याचे काँट्रॅक्ट करायचा अधिकार असेल. व रेकग्निआईझ करून घेण्याची प्रक्रिया ही याचा बेसिस असेल.
८) Government will be responsible for protecting the property and ENFORCING the contracts so designed as a result of २ - ७ above. Government's job is NOT to undermine contracts.
९) Govt will receive a certain amount in the form of a fee for carrying out the responsibilities as they pertain to 8 above.
१०) Government will have sole authority to use force if necessary (subject to pre-legislated laws) in order to ENFORCE contracts.

----

ह्या बाबी कायद्याच्या बेसिस बनतात. म्हंजे "कायद्याचा कायदा". दिवंगत अर्थशास्त्री जेम्स ब्युकॅनन हे ह्या संकल्पनेचे ("कायद्याचा कायदा") जन्मदाते आहेत असा माझा दावा आहे.

----

आता तुम्ही विचाराल की ह्या सगळ्याचे बेसिस काय. अंशतः उत्तर इथे आहे - http://wikisum.com/w/Demsetz:_Toward_a_theory_of_property_rights

----

अधिक माहीतीसाठी - http://www.amazon.com/Property-Rights-Cooperation-Conflict-Law/dp/069109...

----

मालमत्तेचा अधिकार हा संकुचितपणा आहे असा दावा अनेकांनी केलेला आहे. पण ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिवंगत अर्थशास्त्री जेम्स ब्युकॅनन...

हा 'अर्थशास्त्री' शब्द वाचतांना नेहमी क्रिकेटचे समालोचन किंवा काही निष्पक्षपाती न्यायनिवाडा होत आहे असे वाटते. अर्थशास्त्रज्ञ असे लांबलचक टंकायचे नसल्यास अर्थतज्ज्ञ वगैरे वापरता आले तर पहा बॉ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अर्थशास्त्री हा शब्द अमोल पालेकरांच्या गोलमाल मधून उचललेला आहे. Smile

चार्टर्ड अकाऊंटंट रामप्रसाद दशरथप्रसाद शर्मा हे उद्योगपती भवानी शंकर यांच्याकडे नोकरीच्या मुलाखतीसाठी जातात तेव्हा - प्रसिद्ध अर्थशास्त्री रेळे यांच्या शोधग्रंथ क्वोट करतात. The per capita income of the backward tribes of Maharashtra - पढनेयोग्य है.

भवानी शंकर हे पेले बद्दल विचारत असतात व हे महोदय रेळेंबद्दल उत्तर देतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अर्थशास्त्री हा शब्द हिंदी भाषेत वापरला जातो याची कल्पना होती पण मराठीत वापरात असल्याचे पाहण्यात नसल्याने वारंवार अडखळायला होते. विशेषतः नेहमीच्या वापरातले शब्द असतांना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद. हे वरकरणी ठीक वाटते. पण...

(१) हे नेमके कोणा(कोणा)तील काँट्रॅक्ट झाले?

(२) प्रत्येक मालमत्तेचे नोंदणीकरण शक्य आहे काय? ज्या मालमत्तांचे नोंदणीकरण करणे/ठेवणे/जपणे शक्य नाही, त्यांचे काय? (ट्रिवियल उदाहरण: समजा, मी शेजारच्या ग्रोसरी स्टोअरमधून कोथिंबीरवडी बनविण्यासाठी कोथिंबीर आणली. ज्या अर्थी मी ती विकत आणली, आणि ज्या अर्थी ग्रोसरी स्टोअरवाल्याने ती मला विकली, त्याअर्थी आता हस्तांतरण होऊन ती माझी मालमत्ता आहे.

मात्र, ही मालमत्ता मी शुक्रवारी संध्याकाळी अवगत केली, शनिवारी सकाळी त्यावर मूल्यवर्धन होऊन त्या मालमत्तेचे 'कोथिंबीरवड्या' या (माझ्याच) नव्या मालमत्तेत रूपांतर होणार आहे, शनिवारी दुपारी ही नवी मालमत्ता माझ्या पचनसंस्थेच्या एका टोकात शिरणार आहे आणि शनिवारी संध्याकाळपर्यंत ती माझ्या पचनसंस्थेच्या दुसर्‍या टोकातून बाहेरदेखील पडणार आहे. (त्यापुढे त्या 'मालमत्ते'चा हिशेब नेमका कसा लावायचा, मला ठाऊक नाही, परंतु माझ्या पचनसंस्थेच्या एका टोकात शिरल्या क्षणापासून ती माझी - किंवा बहुधा कोणाचीच - मालमत्ता राहिली नसावी, अशी माझी शंका आहे. पण ते एक असो.)

आता, हे सगळे इतक्या भरभर होते, की विकत घेतलेली कोथिंबीर किंवा बनवलेली (किंवा खाऊन विल्हेवाट लावलेली) कोथिंबीरवडी यांपैकी माझ्या कोणत्याही 'मालमत्ते'ची सरकारदरबारी नोंद करणे माझ्यासाठी व्यवहार्य नसते. मात्र तरीही, या माझ्या 'मालमत्ता' आहेत, हे नाकारता येत नाही - मी कोथिंबीर दुकानातून घरी आणताना पेंढार्‍यांनी माझ्यावर हल्ला करून ती लंपास करू नये, किंवा मी कोथिंबीरवड्या बनवल्यावर गब्बरसिंगांनी त्या चोरून खाऊ नयेत, या माझ्या अपेक्षा तर राहतातच.

हे सर्व तुमच्या वरील व्याख्येत नेमके कोठे बसते?)

(३) व्याख्येत 'मालमत्तेचा स्वतः उपभोग घेण्याचा हक्क' आणि 'मालमत्तेची स्वतःस हवी तशी विल्हेवाट (ही 'विल्हेवाट' म्हणजे विक्री किंवा अन्य प्रकारचे हस्तांतरणच असेल, असे नाही, हे वरील कोथिंबीरवडीच्या उदाहरणावरून स्पष्ट व्हावे.) लावण्याचा हक्क' हे दोन मुद्दे अंतर्भूत करावयाचे राहून गेले असावेत, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

आता सगळाच मामला चोरीचा आहे हे कळल्यावर तरी nostalgia चे उमाळे थांबतील का ?

तुम्ही तर कित्येकांची दुकाने बंदच करायला निघालात
नॉस्टॅल्जिआ वगळलात तर मराठी आंतरजालीय साहित्यात उरेलच किती आणि काय? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Hahaha!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>तुम्ही तर कित्येकांची दुकाने बंदच करायला निघालात

हो ना..... आणि दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमात निवेदन काय करणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मी म्हातारी होईन तेव्हा दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमात हे असं काही सापडेल काय?

आमच्या काळी अनु मलिक विजु शाहशी भांडायचा, "'माकारेना' हे गाणं हिंदीमधे मी पहिले आणलं. तेव्हा तू तर डब्बल चोरी केली आहेस." आताशा एवढा तडफदारपणा राहिला नाही हो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तू म्हातारी "होणार"? ऐकावं ते नवलच !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

"होणार"?

@ नितीन तथ्ये, आपलं, थत्ते
खीक्कः)

@चिरनवयौवना अदितीताई
थत्तेचिच्यांचे बेजबाबदार आणि अपमानास्पद वक्तव्य आपण खपवून घेणार काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हातारवयाचे फायदे मिळतात ते हे असे. वेळ येईल तेव्हा मी ही म्हातारी होईन म्हणते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

(काड्या मोड ऑन)
अहो ते काय म्हणताहेत बघा ना- 'होणार?' , म्हणजे अध्याहृत, 'आता अजून काय म्हातारी व्हायची बाकी आहे?'
केवढा उपमर्द!!!
(काड्या मोड ऑफ)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'उपमर्द' हा शब्द मूळचा 'उपऔरत' असा असून पुढे (हल्कत) पुरुषांनी आपल्या सोयीसाठी तो बदलला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उपमर्द करणे = मर्द पेक्षा काहीसा कमी म्हणणे (उप = Sub) अशा अर्थी असावा काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हे येणार ही अपेक्षा होतीच. अदितीबैंना तुमच्या प्रतिसादातला अपमान चांगला झणझणावा म्हणून खास तो शब्द वापरला आहे. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणजे खालच्या लोकांपेक्षा आणखी खालचे असा शब्द आहे हा होय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मिर्ची अलर्ट!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काड्या मोड हे काडीमोड चे अनेकवचन आहे काय ? Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते काड्यामोड असू शकेल. पण नाहीच. एक फोड, जोड, द्वाड आणि अनेकही फोड, जोड, द्वाड. त्याप्रमाणे अनेकवचन काडीमोडच होईल. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कंटाळवाण्या नैतिकतेपेक्षा श्रवणीय अनैतिकता श्रेष्ठ आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कंटाळवाणी नैतिकता, एक्सायटिंग अनैतिकता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझ्या मते लेखकाचा मुद्दा असा की इतर गाण्यांवरून चाली बेतण्याची परंपरा कायमच चालत आलेली आहे. सर्वांनीच ते केलेलं आहे. अशा चाली 'प्रेरणा' म्हणून घेणं आक्षेपार्ह किंवा कसं हे स्वतंत्रपणे ठरवावं. पण आवडत्या संगीतकारांनी ते केलंच नाही, कारण ते थोर होते आणि आजकालचे तसलं करतात म्हणून ते कमी दर्जाचे असं म्हणण्यात एक दुटप्पीपणा आहे.

पूर्वीच्या संगीत दिग्दर्शकांनीही चोऱ्या केल्या. मूळ गाणं ऐकल्यानंतर एस डी बर्मनने 'हम थे वो थी और समा रंगी, समझ गये ना' हे गाणं ढापलेलं नाही असं जर कोणी म्हणत असेल तर त्यांच्याशी चर्चा करण्यात काही अर्थ नाही. चोरीला सरळ चोरी म्हणावं आणि चांगल्या गाण्याला चांगलं गाणं म्हणावं. दोनमध्ये गल्लत करू नये. जुन्यातलंही काही कचकड्याचं सोनं होतं हे मान्य करावं. त्यामुळे आपल्याला माहित नसताना चोरून सादर केलेल्या गाण्याने जो आनंद मिळाला तो हिरावला जात नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण आवडत्या संगीतकारांनी ते केलंच नाही, कारण ते थोर होते आणि आजकालचे तसलं करतात म्हणून ते कमी दर्जाचे असं म्हणण्यात एक दुटप्पीपणा आहे.

तो तर आहेच.

'हम थे वो थी और समा रंगी, समझ गये ना'

हे कशावरून ढापलेले बुवा? (कुतूहल.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'हम थे वो थी और समा रंगी, समझ गये ना' हे कशावरून ढापलेले बुवा? (कुतूहल.)
.................हे कलिंगड घ्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0