इंग्रजी शब्दांचे/संज्ञांचे संस्कृतीसापेक्ष अर्थ

चर्चाविषय तसा ओळखीच्या विषयाचा.

काही गोष्टींकरता असलेला इंग्रजी शब्द अमुक देशात हा असतो तर तमुक देशात तो असतो. उदाहरणार्थ, उंच इमारतीच्या पाळण्यांना भारतात लिफ्ट म्हणतात तर अमेरिकेत एलिव्हेटर. किंवा रस्त्यावरच्या गाड्यांच्या इंधनाला भारतात पेट्रोल म्हणायचं तर अमेरिकेत गॅसोलीन ऊर्फ गॅस. मोटरगाडीच्या मागील कप्प्याला भारतात डिकी म्हणतात तर अमेरिकेत ट्रंक असा शब्द आहे.

या उलट, काही इंग्रजी शब्दांचा अर्थ अमुक देशांमधे असा तर तमुक देशांमधे तसा असतो. म्हणजे उदाहरणार्थ "पास आउट"चा भारतातला अर्थ म्हणजे शाळा/कॉलेजातून पदवी मिळवून बाहेर पडणे, तर अमेरिकेतला अर्थ भोवळ येऊन बेशुद्ध होऊन पडणे. या विभागात मग "रबर", "गिव्हिंग मी अ रिंग" "मेकींग आऊट" अशा संज्ञांच्या वेगळ्या अर्थांच्या गमतीजमती येतात.

वरीलपैकी बर्‍याच गोष्टी तुम्हाआम्हाला ठाऊक असलेल्यापैकी. हे सर्व अलिकडे पुन्हा आठवलं याचं कारण अलिकडे मला एक अशी गोष्ट समजली जी याआधी माहिती नव्हती. ही संज्ञा आहे "४२०".

"४२०" (किंवा चारसो बीस) या प्रकाराचा भारतातला अर्थ काय हे निराळं सांगायला नको, त्यात भारतीय दंड विधान येतं, राज कपूरचा तो सिनेमा येतो. त्यातला "अगर मैं चारसो बीस हूं, तो तुम्हारे जैसे लोग हैं..." असं म्हण्टल्यावर "८४०" असा नंबर असलेली (व्हिलनची !) धूळ उडवून जाणारी गाडी येते.

"४२०" चा अमेरिकन संदर्भातला अर्थ आहे, गांजा सेवन करण्याच्या संदर्भात. हे काय प्रकरण आहे ? गूगल केल्यानंतर कळलं की म्हणे १९७१ साली कॅलिफोर्नियातल्या सान राफाएल भागातल्या गांजेकसांच्या एका टोळक्याने आपल्या "कार्यक्रमाची" वेळ ४ वाजून २० मिनिटांची ठरवली. तेव्हापासून "डूईंग ४२०" हा त्यांचा परवलीचा शब्द ठरला. लवकरच हा प्रकार जवळपासच्या तरुण लोकांमधे पसरला. आणि मग हळुहळू अमेरिकाभर. अशी एकंदर आख्यायिका.
(वरील माहिती येथून : http://en.wikipedia.org/wiki/420_%28cannabis_culture%29 )

अलिकडे अमेरिकेच्या कोलोरॅडो राज्यात गांजा ओढणं कायदेशीर बनवण्याचं विधेयक पारित झालं. याचा अर्थ त्या राज्यात (अन्न प्रशासनाच्या ष्ट्यांडर्ड मधे बसण्याइतपत) गांजा बनवण्या/विकण्याची अनुमती आहे. हे झाल्यावर आढळलेली एक गोष्ट अशी की ठिकठिकाणचे , निनिराळ्या रस्त्यांवरचे ४२० मैलांचं निदर्शन करणारे खांब गांजेकसांकडून चोरीला नेण्याच्या घटना अलिकडे घडल्या. (बातमी : http://gawker.com/colorado-stoners-keep-stealing-mile-marker-420-1499672... )

हे वाचल्यावर जाणवलं की अरे, अशा इतरही गमतीजमती असतील. ऐसी करांना असलं काही नवं माहिती असलं तर जरूर कळवा.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

भारतात ज्याला ४२० म्हणतात, त्याला नायजेरियात ४१९ म्हणतात. (कारण तेच: त्यांच्या दंडसंहितेमध्ये कलम ४१९ हे फसवाफसवीशी संबंधित आहे.) उदाहरणार्थ, कोट्यवधी डॉलर्सची लालूच दाखवणाऱ्या ज्या बनावट इमेल्स अधूनमधून येतात, त्यांना '419 scam' म्हणतात. दोन्हीकडचा पीनल कोड इंग्रजांकडून आलेला असल्यामुळे खूपच सारखा असण्याची शक्यता आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)

४१९ बद्दल आलेला हा छोटेखानी लेख.
http://www.nytimes.com/2014/01/05/magazine/who-made-that-nigerian-scam.h...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(म्हटले तर काहीसे धाग्याच्या विषयाशी समांतर आहे, म्हटले तर अवांतर.)

हे झाल्यावर आढळलेली एक गोष्ट अशी की ठिकठिकाणचे , निनिराळ्या रस्त्यांवरचे ४२० मैलांचं निदर्शन करणारे खांब गांजेकसांकडून चोरीला नेण्याच्या घटना अलिकडे घडल्या.

ऑस्ट्रियामधील या गावाच्या नावाच्या पाट्याही (बहुतकरून ब्रिटिश पर्यटकांकडून) चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत.

(टीप: उपरोद्धृत विकीदुवा पूर्णपणे वाचून काढावा. विशेषतः, त्यातील Name and notoriety हा भाग, व त्यापुढे. मनोरंजनाची ग्यारण्टी.)

फार कशाला, गावाच्या नावावरून पुढे कोणीतरी एक बियरही काढली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इंग्लडची इंग्लिश - अमेरिकी इंग्लिश जशी भावंडं, तशीच हिंदी - मराठी ही देखील. त्यांच्यातही अशा गमतीजमती दिसतात, विशेषतः संस्कृतोद्भव शब्दांमध्ये. गर्व आणि अभिमान या दोन शब्दांचा वापर बरोब्बर उलट्या प्रकारे दिसतो.

कुठच्याही भाषेत एखादा शब्द जाताना त्यावर नवीन भाषेत नवीन संस्कार होतात. टाइम प्लीज या शब्दाचं टैम्प्लीस होतं. आणि 'नाही, नाही, मी आउट नाही. मी टैम्प्लीस घेतली होती.' असं नामात रूपांतरही होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कचेरीत काम करणार्‍याला इंग्रजीत while collar कर्मचारी असे संबोधले जाते. (कारखान्यात काम करणार्‍याला blue collar). शर्ट हे पाश्चिमात्य समाजाचा अभिवाज्य पोषाख असल्यामुळे कॉलरशी संबंधीत शब्द हे त्यांच्या संस्कृतीला साजेसेच आहेत.

White collar ला मराठीत "पांढरपेशे" असा शब्द आहे. अनेक वर्षे मी त्याला इंग्रजी संज्ञेचे भाषांतर/रुपांतर समजत होतो. (भाषांतर, पण निर्बुद्ध नव्हे! "धवल गळपट्टी" हे निर्बुद्ध भाषांतर झाले असते!)

नंतर आत्रे यांचे गावगाडा वाचले आणि पांढरपेशे ह्या शब्दाचा उलगडा झाला.

गावातील काळ्या (शेतीसाठी उपयुक्त) जागेत काम करणारा तो शेतकरी/कुणबी. आणि पांढर्‍या (शेतीसाठी फारशी उपयुक्त नाही) अशा जमिनीत (गावातील वस्तीत) काम करणारा तो पांढरपेशा (लोहार, सोनार इ. बलुतेदार).

White collar आणि पांढरपेशा हे दोन्ही शब्द स्वयंभु. आपापल्या संस्कृतीतूनच उपजलेले!

(पांढरपेशा) सुनील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

junta हा शब्द पहिल्यांदा इंग्लिश लेखनात पाहिला तेव्हा गुरु-अवतार सारखाच "इकडून तिकडे" गेला असावा असं वाटलं.
पण दोन्ही शब्द स्वयंभू आहेत असं बॅट्या म्हनाला तेव्हा आश्चर्य वाटलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

>>> junta हा शब्द पहिल्यांदा इंग्लिश लेखनात पाहिला तेव्हा गुरु-अवतार सारखाच "इकडून तिकडे" गेला असावा असं वाटलं.

तसं वाटत नाही. त्याचा उच्चार मुळी "जनता" किंवा "जन्ता" असा नसून "जुंटा" असा आहे.

पहा : https://www.google.com/#q=junta+meaning

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

फुल्ल हाऊस : पोकर खेळताना आलेला पत्त्यांचा विशिष्ट प्रकारचा सीक्वेन्स असा अमेरिकन (ब्रिटीश सुद्धा ?) अर्थ. या नावाची टिव्ही सीरीज ९० च्या दशकात आली. ती लोकप्रिय ठरली होती.

"हाऊस फुल्ल" : हा शब्दप्रयोग (म्हणे) अनंत हरी गद्रे यांचा. या जुन्या पिढीतील नाटककाराच्या एका नाटकाचा प्रयोग मुंबईच्या ऑपेरा हाउसमध्ये प्रचंड गर्दीत झाला होता. पुढे त्या नाटकाची जाहिरात करताना "ऑपेरा हाउस फुल्ल' अशी ओळ टाकण्यात आली. अशा रीतीने "हाउस फुल्ल'चा जन्म आपल्या महाराष्ट्रात झाला, अशी आख्यायिका.

या शब्दसंहतीचा वर केल्याखेरीज काही दुसरा अर्थ किंवा व्युत्पत्ती असल्यास जाणकारांनी प्रकाश टाकावा.

याखेरीज पत्त्यांच्या पानांच्या संचाला "कॅट" फक्त भारतात म्हणतात का ? की इंग्लंडातही ? (कारण अमेरिकेत "डेक ऑफ कार्ड्स" आहे.)
गंजीफ्रॉक (याला लहान करून "गंजी असेही म्हणतात. पहा : "मेल्या गंजी फाटला तुझा" ) आणि बनियन हे शब्द केवळ भारतातच आहेत की अन्यत्रही ? (याच अंतर्वस्त्राला "बॉडी" असेही काही घरांमधे म्हण्टलेलं पाहिलेलं आहे. आणि टी शर्टला जर्किन.)

याखेरीज, स्वीमींग टँक आणि स्वीमींग पूल : अनुक्रमे भारत आणि अमेरिका.

टाईमपास हा खास भारतीय शब्द. (याच्याच आणखी लडिवाळ आवृत्त्या म्हणजे फुल टाईम पास, फुल टू टाईम पास. शिवाय टीपी, एफटीपी इत्यादि लहान मुलांच्या तोंडच्या संज्ञा आहेतच) हा पाश्चात्य देशांत वापरतात का याबद्दल साशंक आहे. माझ्या पाहण्यात आलेलं नाही.

पोस्ट मार्टेम हा शब्ददेखील खास भारतीय संदर्भातला बनला आहे. "पोस्ट मॉर्टेम ऑटोप्सी" मधला "ऑटोप्सी" हा नामवाचक शब्द खरं तर राहायचा. "पोस्ट मॉर्टेम" हे खरं तर विशेषण. पण तेच राहिलं. ऑटोप्सी भारतीय संदर्भात क्वचित ऐकलं. (त्यातही "पोस्ट मॉर्टेम" हा उचार बहुदा पुरेसा बरोबर नसावा. "पोस्ट पार्टम" नि "पोस्ट मार्टम" असे (बहुदा लॅटिन) शब्द असावेत. चूभूदेघे. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

(याच अंतर्वस्त्राला "बॉडी" असेही काही घरांमधे म्हण्टलेलं पाहिलेलं आहे

बॉडी हा शब्द यावरून आला असावा.

गुजराती लोक क्षेरोक्षच लिहितात. गुजराती हा क्ष सारखा दिसत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आमच्याकडे बनियन ला चक्क बनेल असे म्हणायचे. बॉडी हा शब्दही प्रचलित होता. ग्रामीण भागात कोपरी ही बनियनची जागा घेते. मी स्वतः हल्ली कोपरी वापरतो. मुंबई वाल्यांना खर तर लोकल ट्रेन मधे पाकीट मारु नये म्हणुन कोपरी हे अत्यंत उपयुक्त आहे. पण ते का वापरत नाहीत कोणास ठाउक? कोपरी ही शहरात दुर्लक्षित आहे. गावठी व गावंढळ लोक ते वापरतात अशी त्याची प्रतिमा आहे.त्यामुळे वापरत नसावेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

गावाकडे बनेल असे म्हटल्याचे ऐकिवात आहे. सेकंड हँड ऐकला तेव्हा फारच मजा वाटलेली-यद्यपि फर्स्ट हँड नै ऐकला तरी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कोपरी ही शहरात दुर्लक्षित आहे.

ठाणे शहरात कोपरी अशा नावाचा एक भाग आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एस टी डीचा (बहुदा समस्त पाश्चात्य इंग्लीश-स्पीकींग जगतातला) ष्टांडर्ड अर्थ म्हणजे "सेक्शुअली ट्रान्स्मिटेड डिसीज".

"शांताराम" या कादंबरीतला ऑस्ट्रेलियन गुन्हेगार जेव्हा मुंबईत पहिल्यांदा आला नि इथे अनेक वर्षं त्याने काढली त्यावेळी एस्टीडी बूथ्ज़ झालेले होते की नाही कुणास ठाऊक Smile पण कुठल्याही टुरिस्टाने भारतात आल्यानंतर काळ्यापिवळ्या अक्षरांतल्या "झेरॉक्स" आणि "एस्टीडी" ही आद्याक्षरं लिहिलेल्या पाट्या पहिल्यांदा पाहून त्याला/तिला काय वाटले असेल याची (गमतीची) कल्पना आता करू शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

झेरॉक्सवरून आठवलं - गुजरातेत "क्षेरॉक्ष" असं लिहितात. तो खरोखर "क्ष" असतो का त्यांचा "झ" तसा दिसतो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अगदी अलिकडेच एका अमेरिकेत राहणार्‍या व्यक्ती कडून दोन नव्या गोष्टी कळल्या. त्या जशाच्या तशा उधृत करतो :

"Spelt" to Americans is a type of wheat, not the past participle of spell. Actually most folks don't know or care about past participles around here.

"Clubbed" in India implies grouped together; here, it means beaten with a club or blunt weapon.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

lol\क्लब करणे कधीकधी धमाल प्रसंगांना निंत्रण ठरु शकते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वांग्याला इंग्रजीत ब्रिंजल म्हणतात, असे लहानपणी शिकलो.

पुढे कळले की, त्याला अमेरिकेत eggplant आणि इंग्लंडात aubergine म्हणतात.

मग ब्रिंजल हा खास इंग्रजीला बहाल केलेला भारतीय शब्द?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भाज्यांची अमेरिकन/इंग्लीश नावं हा एक स्वतंत्र प्रकार आहे.

अमेरिकेत भेंडीला "लेडिज फिंगर" नव्हे तर "ओक्रा" असं म्हणतात.

हे अस्मादिकांना माहिती नव्हतं तेव्हा मी एके ठिकाणी छापून आलेली "तिरामिसु"ची पाककृती वाचत होतो. त्यात म्हण्टलं होतं की यात "लेडिज फिंगर्स" घालतात. मी लगेच सैंपाकघरात जाऊन "अगंऽ या इतक्या सुरेख गोडशा तिरामिसु मधे चक्क भेंड्या घालतात!!?"

शांतपणे उत्तर मिळालं "लेडिज फिंगर्स म्हणजे नळकांड्याच्या आकाराचं चॉकलेट असतंय. ते यात घालतात. भेंडीला इथे ओक्रा म्हणतात. हे असलं कशाला काही वाचतोस तू ? जीए कुलकर्णी वाच पाहू."

असो असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

हे असलं कशाला काही वाचतोस तू ? जीए कुलकर्णी वाच पाहू.

ROFL
ROFL
ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

लेडिज फिंगर्स म्हणजे नळकांड्याच्या आकाराचं चॉकलेट असतंय.

नळकांड्याच्या आकाराचे चॉकोलेट? की लांबुडका, बोटाच्या आकाराचा केक/कूकीसारखा प्रकार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मागे कुठेतरी वाचले होते त्यानुसार ब्रिजल हा केवळ भारतात सहज आढळणार्‍या काटेरी/पांढर्‍या रेषांच्या वांग्याला म्हणायचा शब्द. चकचकीत, प्लेन जांभळी वांगी (दोन्ही लहान व भरताची) मात्र एगप्लांट.

आता कुठे वाचलंय ते आठवेना बघा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

संस्कृत वातंजन->फारसी बरिंजन-> इंग्रजी ब्रिंजल असे वाचल्याचे आठवते. चुभूद्याघ्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'ब्रिंजल' हा खास अँग्लो-इंडियन शब्द आहे, असे कुठेशीक वाचल्याचे आठवते.

तसेच 'टिफिन'.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'प्रिपोन' हापण तसाच अस्सल भारतीय इंग्रजी शब्द. बऱ्याच वेळेला इ-मेलमध्ये हा शब्द ज्याअर्थी वापरला आहे ते अमेरिकनांना न कळल्यामुळे गोंधळ झाले आहे. त्याऐवजी 'Advance' हा शब्द वापरायची सुचवणी मिळूनही सवयीने कधीकधी तो शब्द वापरला जातोच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१०१००!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हाही खास देशी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणखी एक अनुभव मला एका अमेरिकनाशी बोलताना आला. यात प्रादेशिक फरकाऐवजी माझ्या भाषिक अज्ञानाचा भागच आहे. Smile

मला असं म्हणायचं होतं की "आमच्या बरोबर समोर असणारं घर."

तर मी म्हणालो : "The house located exactly opposite to ours".

तो चटकन म्हणाला "You mean the house across the street from yours."

मी : "Yes. They are our neighbors. We are not opposed to them" Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

in front of नेमकं कधी वापरतात आणि opposite कधी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

नागपूरकडील मराठीत "समोर" आणि "पुढे" यांच्या अर्थांची अशीच आलटापालट होतेशी वाटते.

हॉस्टेलवर असताना एक नागपुरी मित्र असाच एकदा कोठल्याशा ठिकाणाच्या "डायरेक्शन्स" देत होता. "अमक्याअमक्या दुकानाच्या खूप समोर आहे", म्हणून.

आता या "खूप समोर"चा उलगडा काही केल्या होईना. अमक्याअमक्या दुकानाच्या "समोर" म्हणजे त्यापासून "रस्त्याच्या विरुद्ध बाजूला", असा अर्थबोध मज पुणेरीबुद्धीस होतो. पण मग "खूप समोर" म्हणजे काय असावे? तीनचार गल्ल्या समांतर??? पण त्या दुकानाच्या रस्त्यास जवळपास समांतर गल्ल्याही तर नव्हत्या. काही केल्या तर्क लढवता येईना.

मग त्यानेच खुलासा केला. "अबे, त्या दुकानापासून खूप समोर चालला जाशील" म्हणून.

असो.

(या नागपुरीतला हा "कर", "जा" वगैरे आज्ञार्थाऐवजी "करशील", "जाशील" वगैरे हा जो बीइंग-टेकन-फॉर-ग्र्याण्टेडार्थ आहे, तोही सुरुवातीस, सवय नसताना, खूप इरिटेटिंग वाटतो. म्हणजे, काही अमेरिकन मंडळी (बहुधा पश्चिम-किनारा-छाप? चूभूद्याघ्या.) "डायरेक्शन्स" देताना "पुढल्या चौकात डावीकडे वळ, नंतर तिसर्‍या सिग्नलला उजवीकडे वळ" अशा अर्थी "You want to make a left turn at the next intersection, then you want to make a right at the third stop light" वगैरे सांगतात, तद्वत. "वाँट टू"? भो@@च्या, मला काय पाहिजे आणि काय नाही, हे तू कोण ठरवणार? मला कुठे, कसे जायचे ते सांग, तिथे, तसा मी तू म्हणतोस तसा जाईन. पण तिथे, तसे जायची मला इच्छा आहे की नाही, एवढे तरी निदान माझ्यावर सोड?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या नागपुरीतला हा "कर", "जा" वगैरे आज्ञार्थाऐवजी "करशील", "जाशील" वगैरे हा जो बीइंग-टेकन-फॉर-ग्र्याण्टेडार्थ आहे, तोही सुरुवातीस, सवय नसताना, खूप इरिटेटिंग वाटतो.

अगदी अगदी. याच कारणावरून एका मित्राशी मेजर भांडणही केलं होतं मी. 'अमुक करशील' म्हणे. म्हटलं, 'वा रे वा, का म्हणून करीन? 'करशील का' वगैरे विचारायची पद्धत नाही का तुमच्यात?' तर त्याला कळेचना. मग हा घोळ कळलेला तिसरा माणूस मधे पडेस्तोवर चाललं ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

संस्कृतातल्या सूचना अशाच असल्याचे आठवते.
"हे रामा, त्या राक्षसांचा नि:पात करणयसाथी तू तिकडे जाशील, तिथे एक जलकुंड लागेल. तिथून पश्चिमेकडे सूर्योदयापूर्वी निघशील आणि रुषी अरिंदम ह्यांचे दर्शन घेशील " अशी ती भाशा आहे.
आय गेस मेघदूतातही ढगाला तो यक्ष असल्याच स्टायलीत बोल्तो.(अर्थात आख्खं मेघदूत नागपुरी प्रभाव असणार्‍या इलाख्यात लिहिलं गेलय हे ही खरच.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अगदी अगदी.

"गन्तव्या ते वसतिरलका नाम यक्षेश्वराणां" सारखे शब्दप्रयोग पाहिले की हे कनेक्शन ठसतं. धन्स मनोबा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मेघदूतातला यक्ष ज्या ठिकाणी क्षापग्रस्त होऊन राहिला होता ते 'रामगिरी' हे ठिकाणही विदर्भातलेच आहे असे मानतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येस्सार, रामटेक!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाटाआ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद. प्रवरापुर/प्रवरपुर याचे अवशेष खच्चून सापडलेत. नागपुराहून ४५ किमीवर मानसर नामक ठिकाणी. त्याचा रिपोर्टही ऑनलाइन पहावयास मिळतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

विसुनाना आपल्याकडिल खजिन्याची हल्किशी झलक मधूनच दाखवतात . त्यांना लिहिण्यास बाध्य करण्यासाठी काय करावे लागेल असा विचार करतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

प्रस्तुत माहितीपूर्ण पाटी हिंदी भाषेत आहे. प्रस्तुत पाटी ही महाराष्ट्र शासनाच्या एका विभागाने महाराष्ट्रातील एका ठिकाणाबाबत महाराष्ट्रात उभारलेली आहे, ही बाब लक्षात घेता, हीच (किंवा किमान इतकी तरी) माहिती मराठीतून देणारी अशीच एखादी पाटी प्रस्तुत स्थळी उपलब्ध आहे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असेच कुतूहल सदर पाटी वाचून आमच्याही मनात उद्भवल्या गेले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नागपुरात घरात मराठी लोक मराठी बोलतात आणि उंबरठा ओलांडला कि हिंदी चालू होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

महाराष्ट्र शासनाची अधिकृत प्रादेशिक भाषा मराठी आहे आणि ती राज्यभर किमान बोललेली कळते हे गृहीतक आहे. तस्मात मराठी पाटी कुठाय हा प्रश्न चूक नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नागपुरातील स्वतःस 'मराठी' म्हणवून घेणारे लोक आपापल्या घरांत जे काही बोलतात, त्यास 'मराठी' असे संबोधण्याचा नागपुरात प्रघात आहे. (असे वाटते. चूभूद्याघ्या.)

बाकी चालू द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रघात कसला?? ती मराठीच आहे-विथ हेवी हिंदी अ‍ॅडमिक्श्चर. पुणेरी मराठीपासून वेगळी असली म्हणून तिचे मराठीपण कमी नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

...तंजावरी मराठी हीदेखील मराठीच आहे. पुणेरी (किंवा तमाम महाराष्ट्रातील इतर कोठल्याही) मराठीपेक्षा प्रचंड वेगळी (अनाकलनीय होण्याइतकी) असली तरी. आक्षेप तो नाहीच.

तसेही, आम्ही अमेरिकन जी कोणती भाषा (स्थानिक बोली धरून अथवा वगळून) बोलतो (वा लिहितो), तीसही आमचे येथे 'इंग्लिश' असेच संबोधण्याचा प्रघात आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.तंजावरी मराठी हीदेखील मराठीच आहे. पुणेरी (किंवा तमाम महाराष्ट्रातील इतर कोठल्याही) मराठीपेक्षा प्रचंड वेगळी (अनाकलनीय होण्याइतकी) असली तरी. आक्षेप तो नाहीच.

भाषाशास्त्रीय दृष्ट्या तसेच क्लासिफिकेशन आहे. तुमच्या प्रतिसादात "खरे तर मराठी नाही, पण समजण्याचा प्रघात आहे म्हणून चाललंय" वैग्रे सूर दिसला म्हणून म्हणालो, बाकी काही नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"मराठीच आहे, पण ती कशी बोलली जावी याबद्दल उभयपक्षी जोरदार तात्त्विक मतभेद आहेत" यावर तडजोड करू या का?

("सामायिक भाषेने विभागलेले दोन प्रदेश"च्या धर्तीवर काहीसे?)

( अवांतर: 'इर्रीकन्सीलिएबल' करिता पर्यायी मराठी प्रतिशब्द कोणता?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा हा, चालेल. Smile

इर्रीकन्सीलिएबल साठी नेमका प्रतिशब्द माहिती नाही. इंग्रजीचे मराठीच्या तुलनेत हे वैशिष्ट्य जाणवते खरे-खूप बारीकसारीक अर्थच्छटांसाठी एकेक शब्द असतो. मराठीत शब्दाच्या जागी वाक्य असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सामासिक शब्द चालत असतील तर "अवश्यविसंधित" चालू शकेल. थोडा विस्तारित अर्थ घेतला तर "विनासमेट" चालू शकेल. (पण विनासमेट म्हध्ये "समेट शक्य होती पण झाली नाही" आणि "समेट शक्यच नव्हती" हे दोन्ही अर्थ येतात.)

पण एक लक्षात घेऊया, की "इर्रिकन्साइलेबल" हा लांबलचक शब्द आहे.
Their differences were irreconcilable.(उच्चारी १२ सिलॅबले)
आणि
त्यांचे मतभेद तडजोडीपलीकडचे होते. (उच्चारी १३ सिलॅबले)

ही दोन्ही वाक्ये ढोबळमानाने समान लांबीची वाटतात. मराठीत एका कल्पनेकरिता लांब उपवाक्य लिहावे लागले, असे भासत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'तडजोडीपलीकडचे' हा पर्याय चांगला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुणेरी (किंवा तमाम महाराष्ट्रातील इतर कोठल्याही) मराठीपेक्षा प्रचंड वेगळी (अनाकलनीय होण्याइतकी)

वरून आठवलं,
विदर्भात आकोट जवळ अडगाव नावाच एक गाव आहे तिकडे,

येथे = अठी
तिथे = तठी
येथल्यायेथे = अट्टुल्याअठी

"अट्टुल्याअठी" ही मराठी कुणाच्या बापाला कळेल काय Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अठीतठीचा सामना करावा लागेल तर म्हणजे इथे Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हिंदी पाटीस आक्षेप नाही. मात्र, त्याचबरोबर मराठी पाटी आहे किंवा कसे (आणि नसल्यास का नसावी), याबद्दल कुतूहल निश्चितच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

समोर अन पुढे याचा किस्सा आठवला. विदर्भी मित्र म्हंटो 'हे घड्याळ समोर आहे', आम्ही म्हंटो 'समोरच आहे, त्यात काय विशेष?' तर नै म्हणे समोर आहे. मग बरीच बाचाबाची झाल्यावर समोर अन पुढे चा उलगडा झाला.

करशील-जाशील मध्ये काही लोकं करशीन-जाशीन असेही म्हणतात.

अवांतरः म्हणतात च्या जागी बोलतात असा वापर पाहिला की कैच्याकै वाटतं. बोलणे, म्हणणे अन सांगणे याच्या सीमारेषा लै काही धूसर नसाव्यात मराठीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जरा सोदाहरण विस्तार कराल काय? बोलणे, म्हणणे आणि सांगणे यांचा? प्लीज.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तेवढा आमचा अभ्यास नाही. अन प्रमाण मराठी + दक्षिण महाराष्ट्रातली मराठी इथवरच कक्षा मर्यादित आहे. त्यामुळे कचकून उणिवा असणार. तरी ट्राय मारतो.

मला जसे वाटते त्याप्रमाणे, बोलणे, सांगणे, म्हणणे ही तीन क्रियापदे, इंग्रजीतील से, स्पीक आणि टेल यांच्याशी वन टु वन म्याप व्हायला अडचण नसावी.

से/स्पीक आणि टेल आणि बोलणे/म्हणणे व सांगणे यांमध्ये काहीएक फरक आहे हे बहुतेकांना मान्य व्हावे.

आता उरला प्रश्न बोलणे व म्हणणे यांतील फरकाचा. प्रमाण बोलीत तरी मला वाटते त्याप्रमाणे 'मी त्याला म्हणालो' हेच बरोबर आहे. यद्यपि 'तो त्याला खूप वाईट बोलला' हा शब्दप्रयोगही बरोबर आहे. बोलणे हे क्रियापद प्रमाण बोलीत प्रथमपुरुषी फारसे वापरत नसावेत. त्याउलट द्वितीयपुरुषी प्रयोगात बोलणे हे क्रियापद जास्त येते. तृतीयपुरुषी प्रयोगांत मात्र दोन्ही येतात. प्रथमपुरुषात बोलणे हे क्रियापद 'घालूनपाडून बोलणे' याच अर्थी जास्तकरून वापरत असावेत.
तृतीयपुरुषी प्रयोगांत म्हणणे अन बोलणे यांच्या डिस्ट्रिब्यूशनबद्दल मात्र सध्या सुचत नाहीये काही प्याटर्न.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बोलण्याच्या क्रियेविषयी पुढे प्रत्यक्ष वचन येत असेल, तेव्हा 'म्हणणे' - मी म्हटले, "तू गाढवच आहेस." (काय बोलले ते अवतरणात आले.)

बोलण्याच्या क्रियेबद्दल सांगून प्रत्यक्ष वचन नसेल, तेव्हा 'बोलणे' - असल्या आचरट वागण्याबद्दल मास्तर तिला बोल बोल बोलले. (काय बोलले ते अध्याहृत.)

बोलण्याच्या हेतूबद्दल/टोनबद्दल नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे असल्यास 'सांगणे' - बॅटमनने मनोबाला निरोप सांगायला सांगितला आहे की... (हे मला स्पष्ट करता येईना. :()

असं म्हणता (!) येईल का? अर्थातच या तिन्ही वापरांना पुन्हा अपवाद आहेतच. शिवाय से, स्पीक आणि टेल यांचं परफेक्ट मॅपिंग होईल असं मला वाटत नाहीय. पण ही साधारण जवळची उदाहरणं आहेत, हे मान्य.

हे जाम रोचक आहे राव. कुणीतरी अजून जाणकारानं लिहिलं यावर तर बरं हुईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सांगण्याबद्दल कै मला 'सांगता' येईना Wink

ते एक असो.

बोलणे अन म्हण्णे यांतील फरक साधारणरीत्या पटतो आहे.

जाणकारांना पाचारण. अरविंद कोल्हटकर, धनंजय आणि अजून जे कोण असतील ते सर्व.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सांगणे क्रियापदाला द्वितीया का चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असावी.
म्हणजे कुणी एकटाच खोलीत उभे राहून मुख ध्वनी काढत असेल तर "सांगितले" हे क्रियापद तिथे चूक ठरेल.
एकटा माणूस "बोलू" शकतो.
शिवाय "बोल" क्रियापद सप्तमी विभक्ती सोबतही चालू शकतं. अमुक अमुक त्याच्या"शी" बोलला.
तिथे द्वितीय चतुर्थी मधे येत नाही.
"म्हणणे" हे सुद्धा एकट्याने करायचे काम नाही. तिथेही द्वितीय्-चतुर्थी विभक्तीची अपेक्षा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सभेत "बोलत" असावेत.

मी काल संध्याकाळी त्याच्याशी "बोललो". असा शब्फप्रयोग होईल. इथे म्हणालो चालणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सहमत आहे.

मेघनान सांगितलेला निकष बरोबर वाटतोय. काय 'बोलले' हे सांगायचे असेल तर प्रमाण बोलीत 'म्हणतात'. उदा. 'सभेत मोदी म्हणाले की राहुल इ.इ.इ.'.

आणि फक्त वक्तव्य आहे असे सांगायचे असेल तर बोलले, उदा. 'सभेत मोदी बर्‍याच विषयांवर बोलले.'

कुणीतरी कसलंतरी वक्तव्य केलं इतकंच सांगायचं तर बोलणे, नैतर म्हणणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

सहमत आहे.
'सांगणे'मध्ये रिसेप्शन मँडेटरी असावे. बोलणे, म्हणणे मध्ये ते उतरत्या क्रमाने ऑप्शनल होत जाते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

म्हणजे "आमच्याकडे बनियनला बनेल 'बोलतात" असं का? हे आमच्या बोंबेत असंच बोलतात.

तुला कधी हरवलेली वस्तु भेटली नाय्ये का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'आत' या अर्थाने 'मध्ये' हा शब्दही अनेक ठिकाणी ऐकला आहे. उदा. '(बाहेर नको,) आत ये' ऐवजी 'मध्ये ये' असा. पहिल्यांदा ऐकला तेव्हा 'कशामध्ये' असा प्रश्न पडला होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नागपूरच्या एक काकू आमच्या कडे आलेल्या तेव्हा त्यांनी एकदा डबा 'मधे' ठेवायला सांगीतलं तेव्हा डबा नक्की कुठे ठेवायाचा ते न समजून मी सरळ टेबलावर 'मध्यभागी' ठेवला. नंतर मी कसा कुचकामी आहे .. मला एकूणच अक्कल कशी कमी आहे वगैरे ऐकवलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-------------------------------------------

इफ आयॅम नॉट राँग तो शब्द 'मधात' असाही वापरल्या जातो. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काये की इदर्भात सम्वाद प्रेझेन्ट कन्टिन्युअस असतात . कुठे जाऊन राहिला बे ? तू जेवून राहिला का बे ?
येऊन राहिला/ राहिली , बसून राहिला/ राहिली , काय मस्त गाऊन राहिला वगैरे .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संवाद प्रेझेन्ट कन्टिन्युअस नसतो, तुम्ही दिलेली उदाहरण प्रेझेन्ट कन्टिन्युअसच आहेत,
पण सगळं हिंदी च्या प्रभावामुळे/मध्यप्रदेश लागुनच असल्यामुळे होत असाव.

कुठे जाऊन राहिला बे ? ==> कहा जा रहा हे बे ?
तू जेवून राहिला का बे ?==> खाना खा रहा है क्या बे?
गायन सुरु असेल तरच -> काय मस्त गाऊन राहिला?
गायक भारी असले तर -> काय गाणं म्हन्ते बे तो? असं बोलल्या जात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत. हा हिंदी प्रभाव आहे.

दक्षिणेकडे कन्नडचा प्रभावही दिसून येतो. उदा. "तू आणि काय करायलास तिकडे?" - हे सरळ सरळ कन्नडमधल्या 'नी मत्तु येन माडती अल्ले?' सारखेच आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आमच्या उदगीरच्या भाषेत - आर का करलालुस तिक्डं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अन जण्रल विचारणा असेल तर शीओईपीतले मराठवाडियन्स म्हणायचे "का करालालाव?" पण "जाताव", "घेताव", "खाताव" वाले लोक सोलापुरी जास्त पाहिले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सांस्कृतिक दृष्ट्या अर्धा सोलापूर जिल्हा मराठवाड्यातच पडतो.

पण जगात राजकीय वादंगांची वाणवा नसल्याने मी काही बोलत नाही. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

असेल की. ओव्हरलॅप किती आहे हे मला माहिती नाही इतकेच. Smile

अन देश व कोकण हा वादंग आहे असे म्हणून नवीन वादंगाला सुरुवात करू नका ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शक्यता आहे.
दक्षिणेकडे काही दिवस होतो म्हनुन नी मत्तु येन माडती अल्ले? याचा अर्थ माहीती होता पण लकब "तू आणि काय करायलास तिकडे? हे माहीती नव्हत.धन्यवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता विषय काहीसा विस्तारलाय (आणि आमचं भाषिक अज्ञान बरंचसं आधीच उघडं पडलंच आहे ) तर हाही एक अवांतर किस्सा :

हापिसात आमचा बॉस एका मीटींगला येणार नव्हता, तेव्हा त्याच्या ऐवजी मला कामाचं स्टॅटस द्यायचं होतं. हे त्याला सांगताना मी म्हणून गेलो : "I will fill you up during the meeting."
तेव्हा बॉसेश्वर मिस्किल हसत म्हणाले "You mean, you will fill in for me during that meeting. Because you see, you cannot fill me up with anything as I will not be in that meeting. Later, maybe you can fill me up with a drink or two."

असो. असो, राजहंसाचे चालणे /जगी झालिया शहाणें/म्हणोनी काय कवणे/चालोचि नये. इत्यादि इत्यादि ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

अमेरिकेतले वाक्प्रचार :
१. 'देअर इज़ नो ज्यूस इन द मशिन' = त्या यंत्रासाठी इलेक्ट्रिसिटी उपलब्ध नाही.
२. 'गेट द डोअर प्लीज़' = कृपया दार लाव / बंद कर. (आणि कृपया दार उचलून आणू नको Lol
३. कोथिंबीर = सिलांट्रो. कोरिअ‍ॅन्डर म्हटलेत तर त्याचा अर्थ फक्त धने.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>>'गेट द डोअर प्लीज़' = कृपया दार लाव / बंद कर. (आणि कृपया दार उचलून आणू नको )

याचप्रमाणे,
"पुट युअर टॉईज् अवे" : म्हणजे खेळणी आवरून ठेव. खेळणी फेकून दे असे नव्हे Smile
डोअर वरून आठवलेले : "गेटींग आउट द डोअर". "गेटींग आउट ऑफ/फ्रॉम द डोअर" नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

खालील दोन वाक्यांचे क्रिकेट खेळणार्‍या, पाहणार्‍या कोणत्याही संस्कृतीच्या दृष्टीने, व अमेरिकन दृष्टीने होणारे अर्थ पाहा: Smile
he is a compulsive hooker
if you want to flash, flash hard

पी जी वुडहाउसच्या पुस्तकातील एका प्रसिद्ध वाक्याचा - जे मूळच्या तत्कालिन इंग्रजीत इन्सल्टिंग असले तरी अमेरिकन अर्थापेक्षा बरेच सौम्य आहे- अर्थ अमेरिकन इंग्रजीत भलताच होईल Smile
he is a pigheaded ass

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरोबर आहे! पण काही काही (रवी शास्त्री सारखे)समालोचट बेसबॉलमधल्या "बॅटर", "पिंच हिटर" वगैरे संज्ञा वापरतात तेव्हा डोक्यात जातं...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

'समालोचट'करता टाळ्या!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

बॅटर वापरलेलं ऐकलं नाही कधी. पिंच हिटर ही संज्ञा बरेच लोक वापरतात. पण रवी शास्त्रीला शिव्या घालायला काही हरकत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

फार लहानपणी वाचलेल्या 'का ?' नांवाच्या एका मराठी पुस्तकात एक मुलगा रवी शस्त्रीला 'टुक्या' म्हणतो. कारण बॅटिन्ग् करताना रवी शास्त्री पायांची कात्री करत पुढे सरसावतो आणि बॉल उचलून तडकावण्याऐवजी (शेपूट घालून) फक्त 'टुक्' करून चेंडू 'प्लेड करतो'.
--
प्लेड् म्हणजे खरे तर प्ले चा भूतकाळ. पण भारतियांनी त्याचे 'प्लेड करणे' असे क्रियापद बनविले आहे. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्हीही लहानपणी "प्लेड-प्लेड खेळ रे, बॉलर डेंजर आहे" वगैरे असे म्हणायचो.

'हाऊ इज दॅट'ला आवाज-द्ये! म्हणायचो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि आमच्याकडे एक 'कट-की-रन' असायचं. बॉल बॅटला लागला तर निदान एक रन काढलीच पाहिजे, असं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

समालोचट साठी खच्चून टाळ्या!!!!! तुस्सी ग्रेट हो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

समालोचट उच्च आहे :). बॅटर माझ्याही डोक्यात जातो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

समालोचट

हे मस्तच

बॅटर शब्द मीही फार जास्त ऐकलेला नाही, पण लिंगनिरपेक्ष शब्द असल्यामुळे 'पोस्टपर्सन' प्रमाणे आजकालच्या काळासाठी तो जास्त योग्य वाटतो. रंगीत कपडे, पांढरा चेंडू इ सोयीप्रमाणे बदलले आहेत. हाही शब्द रुळेल कदाचित.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते डोशाच्या पीठाला म्हण्तात की वो लोकं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

युअर व्होकॅब इझ बॅटर दॅन अस ! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

'समालोचट' हा शब्द जबरदस्त आवडल्या गेल्या आहे!

बाकी बेसबॉलमधल्या ह्या आणि इतर काही संज्ञांचा ("three strikes and you're out" or "stepping up to the plate") मुख्य प्रवाहातील इंग्रजीत चंचुप्रवेश हा ब्रिटिशांनाही खुपतो, असं दिसतं. सांस्कृतिक जेत्यांची 'सॉफ्ट पॉवर' झिरपत भारतीय इंग्रजीतही शिरली आहे, याचेच हे (अजून एक) लक्षण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बीबीसीच्या लिन्कवरचा लेख मस्त. 'स्टिकी विकेट' हे याच्या उलटे असावे, अमेरिकन्स वापरतात पण कोठून आले माहीत नाही. 'डिफरण्ट स्ट्रोक्स' ही त्यातलेच बहुधा.

अपार्टमेण्ट चा भारतात वापर कोणत्याही रेसिडेन्शियल इमारतीच्या नावाकरता होतो (घरे लोकांच्या मालकीची असली तरी), तर अमेरिकेत भाड्याचे फ्लॅट्स असलेली बिल्डिंग (न्यू यॉर्क डाउनटाउन मधे लोकांचे 'फ्लॅट्स' असल्याचे ऐकले आहे. ते बहुधा 'ओनरशिप' वाले असावेत Smile )

फायर करणे म्हणजे अमेरिकेत नोकरीवरून काढून टाकणे, पण निदान काही वर्षांपूर्वी भारतात फायर केले म्हणजे हापिसातील कामावरून झापले असा वापर पाहिलेला आहे.

भारतात रेस्टॉरंट्स ना रेस्टॉरंट बरोबरच हॉटेल म्हणणेही कॉमन आहे. उसगावात खायचे ते रेस्टॉरंट व राहायचे ते हॉटेल. हॉटेल मधे खायला गेलो हा प्रकार नाही.

बॅटरी म्हणजे अमेरिकेत फक्त 'सेल्स', तर भारतात सेल पासून ते सेल घातलेली व प्रकाश देणारी वस्तू सुद्धा 'बॅटरी' Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या बॅटरी अन टॉर्च वरून आमच्या बालमनात वेगळंच कन्फूजन झालं होतं.

आम्ही 'माझं लंडन' वाचत होतो. त्यात एके ठिकाणी 'बेबी-बॅटरिंग' अशी संज्ञा आहे. म्हणजे आईबाबांनी मिळून बाळास त्रास देणे, मारहाण, इ.इ. तर पुढे असं म्हटलंय की हे बॅटरिंग नसून टॉर्चरिंग आहे.

तेव्हा तर्खडकरी इंग्रजीपुढे गाडं सरकलं नव्हतं. मग डोकं चाललं की टॉर्चरिंग म्हणजे बॅटरिंगच्या पुढचा प्रकार आहे असं म्हणताहेत ते टॉर्च हा बॅटरीपेक्षा प्रखर उजेड देणारा असतो त्यातून आलं असेल. "टॉर्चचा प्रखर उजेड" वैग्रे वाचून माहिती होते अन रोजच्या वापरातली बॅटरी होती, तिचा कै प्रखर उजेड पडत नसे.

पुढे कैक वर्षांनी खरे अर्थ कळाले तेव्हा हहपुवा झाली-यद्यपि संदर्भ परमकरुण असला तरीही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भारतात फूटपाथ तर तिकडे साइडवॉक.
काही वर्षांपूर्वी भारतीयांना 'रेस्ट रूम' किंवा 'रेस्ट एरिया' हा शब्द माहीत नव्हता तेव्हा सुरुवातीला एकदोनदा फार पंचाईत झाली होती. विमानतळ वगैरेसारख्या ठिकाणी चिह्नयुक्त मोठ्या पाट्या असतात आणि त्या लांबूनही दिसतात. पण हॉटेलमध्ये (हाही खास भारतीय शब्द)वगैरे विचारायची वेळ आली तेव्हा अवघड झाले होते. भारतात 'तसले' ठिकाण आणि 'रेस्ट' यांची सांगड स्वप्नातही कोणे घातली नसती. आम्हांला आपली 'शुद्ध शाकाहारी हिंदू विश्रांतिगृह' किंवा 'अवधप्रसाद पांडे विश्रांतिगृह' याचीच सवय होती. फारफार तर 'सेहतखाना' (मराठीत शेतखाना), स्वच्छतागृह वगैरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारतात 'तसले' ठिकाण आणि 'रेस्ट' यांची सांगड स्वप्नातही कोणे घातली नसती.

'तसले' ठिकाण??? उगाच 'मी नाही त्यातली, नि कडी लावा आतली'???

(की कडी न लावताच?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारतात (आणि उत्तर अमेरिकेत) ज्याला केरोसीन म्हणतात त्याला इंग्लंडमध्ये पॅराफिन म्हणतात.

महाराष्ट्रात वापरला जाणारा रॉकेल/राकेल हा शब्द बहुधा कुठेच वापरत नाहीत. तो खोबरेल (खोबर्‍यापासून मिळणारे) प्रमाणे रॉकपासून मिळणारे अशा अर्थाने आला असेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मग घासलेट कुठून आला असेल? घासलेट

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कदाचित गॅसतेल वरुन घासतेल आले असावे (shooting in the dark)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/philologic/getobject.pl?c.16:576.date

घासलेट—न. केरोसीन तेल; घास्तेल; रॉकेल. [गेंसतेलचा अप. इं. गॅस = वायु; + म. तेल]

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमेरिकन गॅसलाईट कंपनीच्या अब्राहाम गेसनरने १८५४ मध्ये केरोसीन शब्द ट्रेडमार्क केला होता, आणि काही वर्षांपर्यंत फक्त तीच कंपनी "केरोसीन" नावाने दिव्याचे तेल विकू शके.

गॅसलाईट कंपनीचे तेल ते घासलेट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नेमके!!!!

धन्यवाद धनंजय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गॅसलाइट चा अपभ्रंश होऊन घासलेट झाल्याचे कुठेतरी वाचल्याचे आठवते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घासलेट, घास्लेट असाही एक शब्द आहे मराठीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

रॉकेलची व्युत्पत्ती बहुत रोचक आहे. पण मग त्या न्यायाने पेट्रोलसुद्धा रॉकेलच म्हटले पाहिजे, नैका? पेट्रोल अन रॉकेल हे शब्द वेगवेगळे आहेत त्यावरून वाटते की मूळ बहुतेक वेगळे असावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रॉकेल हा "रॉक ऑइल" चा अपभ्रंश आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रॉक ऑइल म्हणजे शब्दशः पेट्रोलिअम. रॉक ऑइल असा शब्दहि १६६८ मध्ये अस्तित्वात असल्याचे वेब्स्टर कोशात दाखविले आहे. १९व्या शतकाच्या मध्यात जमिनीतून पेट्रोलिअम काढणे सुरू होण्याच्या खूप पूर्वीपासूनच भूगर्भातून वर येऊन पसराणारा हा पदार्थ माहीत होता पण त्याचा 'रॉकेल'असा अपभ्रंश आपल्याकडे मराठीत झाला किंवा कसा झाला ह्याबाबत काही निश्चित बोलता येत नाही असे वाटते.

१८५०च्या पुढेमागे पेट्रोलिअम जगाला माहीत होण्यापूर्वी खोबरेल आणि एरंडेल हे शब्द मराठी भाषेत होते कारण मोरेश्वरभटांनी तसा उल्लेख १८३१त केला आहे. बहुधा एरंडेल हा शब्द एरंड तेल ह्याचा अपभ्रंश असावा आणि त्यातूनच खोबरेलचीहि उत्पत्ति झाली असावी. खोबरे हा शब्दहि मलयालम 'कोप्रा'पासून १५व्या वा १६व्या शतकात पोर्तुगीजांच्या मदतीने आला असावा. खोबरे हा शब्द तुळपुळे-फेल्डहाउस ह्यांच्या जुन्या मराठीच्या कोशात नाही. (तेल-तैल म्हणजे तिळातून निघणारा द्राव. प्राचीन भारतीय हेच तेल मोठया प्रमाणात वापरत असत आणि त्यामुळे कशातूनहि निघणार्‍या द्रावाला तेच नाव मिळाले.)

एरंडेल-खोबरेल मराठीत १८३१ ला रूढ होते तरी रॉकपासून निघणारा द्राव म्हणजे रॉकेल हा शब्द उत्पन्न झाला असावा असे नसावे. कारण ज्या प्रकाराने एरंडामधून एरंडेल आणि खोबर्‍यामधून खोबरेल निघते तसेच 'रॉक'मधून रॉकेल निघते हे १८५०च्या काळातील आपल्याकडची जगाची जाणीव बघता कोणास माहीत नसावे. रॉक-ऑइल हा शब्द इंग्रजांकडून कानावर पडल्यामुळे त्याचा अपभ्रंश रॉकेल असा झाला असावा. हिंदीमध्ये ह्याला 'मिट्टी का तेल' म्हणतात. रॉकेल ह्या शब्दाचे एरंडेल आणि खोबरेल ह्यांच्याशी असलेले ध्वनिसाम्य केवळ योगायोग असावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणखी व अजून हे दोन शब्दसुद्धा काहीजण इंटरचेंज करतात.

तो अजून आला नाही ऐवजी तो आणखी आला नाही म्हणतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

फक्त अजून यासाठीच आणि/आणखी हा शब्द वापरत नाहीत.

सांगली-कोल्हापूर भागात हा शब्द पादपूरक म्हणूनही वापरला जातो, उदा. "तो आणि कधी गेला तिकडं?" "तू आणि काय करतोयस इकडं?" इ.इ. हा कन्नड प्रभाव असण्याची शक्यता आहे असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आणखीसाठी अजून वापरणे हे जास्त पाहिले आहे. आणखी राशीदर्शक तर अजून हा कालदर्शक आहेत. लहान मुलाला वाटीत दिलेला खाऊ संपला की मोठी माणसे सुद्धा त्याला अजून हवंय? असेच चुकीचे विचारतात. तो आणखी आला नाही सारखी वाक्ये कधी ऐकली नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>>> आणखीसाठी अजून वापरणे हे जास्त पाहिले आहे. आणखी राशीदर्शक तर अजून हा कालदर्शक आहेत.

हे वाचलं आणि केव्हाही (अवचित) भेटल्यावर "अजून सांग, काय न्यूज आहे ?" अशी पृच्छा करणार्‍या एका स्न्हेह्यांची आठवण येऊन बाष्पगद्गदित झालो.. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

हालिवूडच्या कृपेने कळलेले क्रियापद : "एटी सिक्स्ड् " (To eighty-six) : एखाद्या/एखादीला "बॅन" करणे, काढून टाकणें (पहा : नाईल हे सदस्य. ऐसीवर नव्हे तर अन्यत्र.)
हेच क्रियापद हॉलिवूडीय माफियापटांत "एखाद्याचा गेम करणे"/"गेम बजाना" "किसीको ऑफ कर देना" या अर्थानेही वापरतात.

जाता जाता : व्यक्तीचा मृत्यू झालेला असणे , याकरता "ऑफ होना" हे मी हिंदीत वापरलं जाताना पाहिलं : "उसके डॅडी परसों ऑफ हो गए हैं" इत्यादि.

"एक्स्पायर" : भारतामधे सभ्यतापूर्वक म्हणावयाच्या गोष्टींकरता अर्थातच विंग्रजी वापरतात.(पहा : "मासिक पाळी" आणि "पिरियड्स चालू असणे") परंतु तेथेही हा "संस्कृतीसापेक्ष" पाठभेद येतोच. एखादा माणूस मृत्यू पावल्याची खबर "कुळकरणी म्येला" अशा नामूपरीट-वजा "असभ्य" भाषेत द्यायच्या ऐवजी "कुलकर्णी एक्स्पायर झाला" असे भारतात म्हणण्यात येते. (चूभूद्याघ्या). अम्बेरिकेत आल्यावर कळलेली गोष्ट : औषधे, खाद्य-पदार्थ विकत घेण्याची/वापरण्याची "एक्सपायरी डेट" असते. हे (निर्जीव) पदार्थ एक्स्पायर होतात. एखादी व्यक्ती गेलेली असल्यास ती "पासेस अवे" किंवा "हॅज डाईड".
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अवांतर : "एटी सिक्स्ड् " वरून आठवले. बाकी अंक/आकडे या प्रकारावरूनचे वाक्प्रचार हा एक स्वतंत्र विभाग ठरावा. नेहमीचे "सतराशे साठ", "छत्तीस चा आकडा" हे तर आहेतच. पण इतर काही रोचक :

तेंडुलकरांच्या "सखाराम बाईंडर"मुळे कळलेला प्रकार : "पावणे आठ" असणे. हा प्रकार मग पुढे जयवंत दळवी, मेघना पेठे यांच्या कादंबरीमधेही दिसला. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

अवांतरः 'वारणे' हा शब्द अलीकडे कमी वापरात आहे. तो मरण्यापेक्षा बराच सभ्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अधिक धार्मिक वर्तुळांमधे : "देवाघरी जाणें"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

हा शब्द बोलीभाषेत वापरलेला कधीच ऐकला नाही. जे कोणी देवाघरी गेले ते पुस्तकांत अन पिच्चरांतच. प्रत्यक्षात मात्र वारले, मेले, खपले, गचकले, इ.इ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

निधन झाले हा त्यातल्या त्यात सभ्य शब्द.(गचकले वगैरेपेक्षा)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

किंवा नुस्तेच 'गेले'. देवाघरी गेले चा शॉर्टफॉर्म जास्त वापरात आहे, आत्ता लक्षात आलं मुसु सर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"ऑफ होणे" हा याच अर्थाने वापरतात हे कळायला मला बराच वेळ लागला होता

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा शब्द मी अजूनही प्रत्यक्ष संभाषणात ऐकलेला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नशीबवान आहेस. मी पहिल्यांदा ऐकला होता तेव्हा फिसकन हसलो होतो. बेंबीत किंवा कुठेतरी आयुष्याचं बटण असेल आणि ते "ऑफ" केलं की माणूस ऑफ होतो - असं काहीसं शब्दचित्र डोळ्यांसमोर आलं होतं. ज्याच्याशी बोलत होतो तो माणूस चांगलाच भडकला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ROFL

अगदी असंच वाटतं खरं तो शब्द पाहताक्षणी!!!!

@ऋषिकेशः पारशी ढंगाचाच शब्द वाटू राहिलाय खरंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा शब्द मुंबई व परिसरात बराच कॉमनली वापरला जातो. लहानपणापासून ऐकत आलो आहे, काही गटांत बोलताना वापरलाही आहे.
पारशी किंवा अँग्लोइंडीयन मराठी ढंगात तो चपखल बसतो. ("साला तेची मदर काल ऑफ झाली ने")

पुढे सगळ्याच हुंबईकरांत रुळला असावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'पाकिस्तान खप्पे' या 'पाकिस्तान ज़िन्दाबाद'ला पर्याय म्हणून सुचवण्यात आला होता, असे वाचले होते.

आश्चर्य आहे.
==============================================================================================
उच्चाराची चूभूद्याघ्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थोडक्यात एखादी आवडती/लाडकी व्यक्ती खपली तर वाईट.
पण पाकिस्तान किंवा बाजारपेठेत आलेल्या कुठल्याही वस्तू "खपल्या" तर मात्र (संबंधितांना) आनंद. भलतीच मज्जाए. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

उच्चार 'खपे' असा होतो. दुव्यावर दिलेल्या अर्थाव्यतिरिक्त 'पापड खपे?' (म्हणजे पापड हवाय का?) असाही शब्दप्रयोग नात्यातील सिंधी कुटुंबात योजलेला ऐकला आहे.

(अजून/आणखी :))अवांतर - 'आहे' हे क्रियापद सिंधीत मराठीप्रमाणेच चालते. 'समोसा गरम आहे' हे वाक्य सिंधीतही 'खपून' जाते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उच्चार 'खपे' असा होतो.

धन्यवाद.

अवांतर - 'आहे' हे क्रियापद सिंधीत मराठीप्रमाणेच चालते. 'समोसा गरम आहे' हे वाक्य सिंधीतही 'खपून' जाते.

हो, कल्पना आहे. फारा वर्षांपूर्वी आकाशवाणीच्या सिंधी बहिर्दिक सेवेवर 'ही ऑल इंडिया रेडियोची सिंधी सर्विस आहे' किंवा 'ही ऑल इंडिया रेडियो आहे' अशासारखी ऐकू येणारी निवेदने ऐकून हादरलो होतो.

================================================================================================================

, 'ही' आणि ('रेडियोची'मधली) 'ची' यांबद्दल शंभर टक्के खात्री नाही. पण त्या खरखरीतून पहिल्या बाबतीत 'ही' आणि 'ह्य' यांच्या मध्ये कोठेतरी जाणारा ध्वनी ऐकू आला खरा. 'ची'बद्दल बोलायचे, तर तो त्या खरखरीतून मला 'ची'सारखा ऐकू आलेला ध्वनी हा बहुतकरून 'जी' असण्याची शक्यता विचाराअंती अधिक वाटते. सिंधीतज्ज्ञ (असल्यास) खुलासा करतीलच.

पाकिस्तानात कोठेही प्रक्षेपण सहजगत्या पकडले जावे अशा रीतीने बेतलेला आणि बहुतकरून कच्छमध्ये कोठेतरी३अ बशिवलेला मीडियमवेव ट्रान्समिटर वापरणार्‍या केंद्राचे प्रक्षेपण पुण्यात बसून संध्याकाळी पाच वाजता पकडण्याचा प्रयत्न केला, तर परिणामी हाती लागणार्‍या गोंधळातून जितपत ऐकू येऊ शकतात, तितपत.

३अ अशी अटकळ आहे; चूभूद्याघ्या.

फारा वर्षांपूर्वी मीडियमवेववर साधारणतः १०४०-१०५० किलोहर्ट्झच्या आसपास दुपारच्या वेळेस ऑल इंडिया रेडियो उर्दू सर्विस आणि रात्रीच्या वेळेस त्याच फ्रीक्वेन्सीवर काही वेळ पुन्हा ऑल इंडिया रेडियो उर्दू सर्विस आणि काही वेळ ऑल इंडिया रेडियो पुश्तू सर्विस लागत असे. दोहोंवर जुन्या हिंदी गाण्यांचे फर्माइशी/बिगरफर्माइशी कार्यक्रम लागत. म्हणजे, निवेदने (सर्विसप्रमाणे) उर्दू/पुश्तूतून, आणि गाणी जुनी हिंदी फिल्मी. गाण्यांच्या रेकॉर्ड्स प्रथेस अनुसरून घिश्यापिट्या असत, हमखास अडकत तरी किंवा स्किप तरी मारत, असे काही झाले तर अनेकदा ड्यूटीवरचा अनाउन्सर बह्धा शांतपणे, तोंडातून चकार शब्द न काढता पिनचा आर्म उचलून त्याच गाण्यावर इतरत्र कोठेतरी ठेवून तेच गाणे दुसर्‍या कुठल्यातरी र्‍याण्डम पॉइण्टापासून सुरळीतपणे सुरू करून देत असे - सगळे प्रकार चालत. पण त्यांचे जुन्या हिंदी गाण्यांचे कलेक्शन अप्रतिम होते. (आता ही केंद्रे अस्तित्वात आहेत की नाहीत, कल्पना नाही.)

तर अशाच एका संध्याकाळी सुमारे पाच-साडेपाचाच्या सुमारास (म्हणजे या उर्दू/पुश्तू सेवांची प्रक्षेपणाची वेळ नसताना) पुण्यात बसून रेडियोशी खुडबूड करत होतो, तर योगायोगाने याच फ्रीक्वेन्सीवर४अ ऑल इंडिया रेडियो सिंधी सर्विस ऐकू आली, केवळ या कारणास्तव ऐकली. अन्यथा मला सिंधीचा शष्प गंध४ब नाही.

सिंधी सर्विसवर मात्र गाणी नव्हती. त्यामुळे, त्या खरखरीतून आणि अगम्य बडबडीतून उपरोल्लेखित दोन मराठीसदृश सिंधी वाक्येच तेवढी काय ती सुधरल्यामुळे पुरता भंजाळलो होतो, त्यामुळे पुन्हा त्या नादाला लागलो नाही. असो.

४अ बहुधा तोच ट्रान्समिटर आलटूनपालटून वापरत असावेत.

४ब कृपया हे दोन शब्द सुटेसुटे वाचावेत. अन्यथा, निर्माण होणार्‍या अनर्थास मी जबाबदार राहू शकत नाही. आगाऊ आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अतिअवांतर ऐकीवः वारणे याचा कोळ्यांच्या भाषेतला अर्थ 'बोलावणे'

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

याच्या बरोब्बर उलटा अर्थ पण असतो - "माश्या वारणे" म्हणजे माश्या हाकलणे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

xyz is no more हे वाक्य
xyz passed away किंवा
xyz died ह्या वाक्याला पर्यायी म्हणून वापरता यावं का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माझ्या मते होय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

एखादा माणूस मृत्यू पावल्याची खबर "कुळकरणी म्येला" अशा नामूपरीट-वजा "असभ्य" भाषेत द्यायच्या ऐवजी "कुलकर्णी एक्स्पायर झाला" असे भारतात म्हणण्यात येते.

'व्यक्ती आणि वल्ली'मधलाच 'घोसाळकर मास्तर आहे का डाइड झाला रे?' हा बबडूचा प्रश्न आठवला. 'म्येला'च्या पलीकडे जायचे आहे, पण एक्स्पायर ठाऊक नाही अशा मधल्या अवस्थेत फायन इंग्लिश बोलणार्‍या मास्तराप्रती दाखवलेला आदर दर्शवणारे क्रियापद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'मेला' अशा अर्थाने 'चचला' हा जुना शब्द क्वचितच दिसतो असे जाणवले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दामू नेन्याबरोबरच हा शब्दही निजधामास गेला असावा Smile

थोडा शोध घेतला असता, हे क्रियापद तेलगूतून मराठीत आलं, असं दिसतं. (अवांतर - दुर्दैवाने या पानावर अनेक शुद्धलेखनाच्या आणि टंकलेखनाच्या चुका आहेत). गूगल ट्रान्स्लेटर सध्याच्या तेलगूत मरणे याला (చనిపోయే) Canipōyē हा प्रतिशब्द दाखवतो. त्या शब्दापासून 'चचणे'चा प्रवास शोधायला हवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अंतरीम आणि सर्वेक्षण या शब्दांचे ज्या बेमालूमपणे भारतीयकरण झाले आहे त्याला तोड नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अंतरिम ठीके.

पण सर्वेक्षण = सर्व+ईक्षण. ईक्ष् हा धातू 'बघणे' या अर्थी वापरतात. तस्मात उच्चारसाधर्म्य असले तरी हा शब्द टेलरमेड का होईना, भारतीयच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

समितीचं कमिटी झालंय तसं..... Wink

पु ना थत्ते

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पुत्रकमेटी यज्ञ आठवला ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

to resign या अर्थाने to put down the papers हा भारतीय वर्किंग क्लासमध्ये प्रचलित असलेला शब्दप्रयोगही इतरत्र फारसा ऐकलेला नाही.

पेपर खाली ठेवणे हे शस्त्रे खाली ठेवण्याप्रमाणे वाटते.
(खास संक्रातीच्या निमित्ताने हे आठवले)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारतात आपण ज्याला वेफर्स म्हणतो, ते ब्रिटनमधे क्रिस्प्स असतात. (हा शब्द उच्चारायला कठीण पण समजायला सोपा म्हणून आवडावा का न आवडावा असा प्रश्न पडतो.) अमेरिकेत हे चिप्स.
ब्रिटीशांचं आवडतं फास्ट फूड 'फिश अँड चिप्स'; त्यातले चिप्स म्हणजे अमेरिकेत ज्यांना फ्रेंच फ्राईज म्हणतात ते, बेल्जममधे उत्पत्तीस्थान असणारे तळलेले बटाटे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माझा एक अमराठी मित्र ऐकून ऐकून मराठी शिकायचा प्रयत्न करत होता. त्याला 'नाही' कधी वापरायचं आणि 'नको' कधी वापरायचं के कळत नव्हतं. मी पण व्यवस्थीत असं उत्तर देऊ शकलो नव्हतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

नाही हा जस्ट नकार आहे.

नुस्ता नको म्हणजे अमुक एखादी गोष्ट पाहिजे का? या प्रश्नाचे नकारार्थी उत्तर.

अमुक एक करू नको इ.इ. म्हणजे ती ती क्रिया न करण्याबद्दलचे आज्ञार्थी क्रियापद आहे.

अनुक्रमे नहीं, नहीं चाहिये आणि मत कर या हिंदी इक्विव्हॅलंट्स घेऊन शिकवता यावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नहीं आणि मत अशी उदाहरणं घेउनच समजवलं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

"मोमेन्टरीली" हा शब्द अमेरिकेत वेगळ्या अर्थाने वापरतात. विमान प्रवासात विमान आता थोड्याच वेळात उतरेल ह्या अर्थी सूचना देताना अमेरिकेत मोमेन्टरीली म्हणतात. मोमेन्टरी म्हणजे थोड्या वेळासाठी असा अर्थ मला माहीत होता त्याचा अर्थ अमेरिकेत आल्यावर थोड्याच वेळात असा अर्थ होतो हे लक्षात आले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओव्हरसाईट हा शब्द तसाच दिसतो. पूर्वी भारतात "दुर्लक्ष" या अर्थाने (ओव्हलुकिंग प्रमाणेच) वापरलेला पाहिला आहे. अमेरिकेत मॉनिटरिंग या अर्थाने.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एका मित्राला एकदा चुकून 'आय विल गिव्ह यु मिस्ड कॉल.' असं म्हणालो होतो. तेव्हा बराच वेळ बिचारा मिस्ड कॉल शब्दावरच अडकला होता... तरी नशीब 'आय विल गिव्ह यु रिंग' असं नाही म्हणालो!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-------------------------------------------

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

भाषिक अडचणीचा भाग सोडला तरी तंत्रज्ञानाचा चकटफु उपयोग करून घेण्याची संकल्पना अभारतीयांना समजणे अंमळ कठिणच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त धागा आहे. सवडीने वाचतो. तूर्त आमचा पावशेर.
कानडीत 'द्वड्ड' म्हणजे मोठा / मोठे. 'तोर्स' म्हणजे दाखवणे. 'ब्याडा' म्हणजे गावठी कानडीत 'नको'. पण 'द्वड्डस्तना' या शब्दाचा अर्थ मोठेपणा, बडेजाव असा आहे. एखाद्या/दी ला हा अर्थ माहिती नसेल आणि त्याला/ तिला कुणी चिडून 'फार शहाणपण दाखवू नको, पुरे तुझा तोरा' या अर्थी 'द्वड्डस्तना तोर्स ब्याडा' असे म्हटले तर त्यातून काय अर्थ निघेल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

कधीकाळी (अर्धवट कळत्या वयात) 'दोस्त दोस्त ना रहा' हे गाणे ऐकून 'दोस्तना' हा 'बारहसींगा'सारखा काहीतरी प्रकार असावा, अशी काहीतरी आमची धारणा झाली होती, ते आठवले. असो चालायचेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाने