रजा आणि विश्रांती

थकलात ? कंटाळलात? जरा विश्रांती घ्या. रजा घ्या.
विश्रांती घेउन थकला असाल तरी विश्रांतीमधून विश्रांती घेउ नका.काम करायला लागू नका.
फक्त अधिक विश्रांती घ्या. आराम करा. काम करुन लवकरच थकणार आहात.
कामातील बदल ही विश्रांती असते असं गांधीजी म्हणतात. असं काही वाचण्यात आलं तर सर्वप्रथम तुमच्या वाचनाच्या सवयीत बदल करा.
वाचनातून विश्रांती घ्या. मिळेल तिथून घ्या. ती फार काही केवढ्याला मिळेल असं नाही. तिची वेगळी थेट किंमत द्यावी लागत नाही.
किंवा किंमत देउन विकत नेहमीच घेता येत नाही. तुम्हाला जे मिळताहेत ते सोडणं म्हणजेच विश्रांती.
कामातून विश्रांती घेता तशी खाण्यातूनही घ्या. खाणं हीसुद्धा एक विश्रांतीच आहे, असं मानत असाल तर असं मानणं सुरु ठेवा. म्हणजे तुमची विश्रांती सुरुच राहिल.
सुरु राहण्यावरनं आठवलं , गाडी सुरु राहते ते ती अधून मधून थांबल्यामुळेच. त्यामुळे थांबत थांबत जा. किंवा नुसतेच थांबा . जाउच नका.
जाउन जाउन जाणार कुठे? तीच तीच स्टेशनं गाठून पुन्हा पहिल्याच स्टेशनाला यायचं असेल तर मुळात जायचं कशाला ?
जाण्यापेक्षा थांबणं चांगलं. गाडी चालत राहिल्यामुळे तिच्यावर प्रचंड खर्च होतो. गाडिनं चालायचच नाही म्हटलं की खर्चही नाही.
शांत, निवांत ती पडून राहू शकते. थंडगार स्थितप्रज्ञ लोखंडी रेल्वेचा डबा हा तुमचा आदर्श हवा.
अर्थात आदर्श हवा हे मुंबैत मोठ्यानं म्हणू नका. सी एम असाल तर खुर्ची जाइल. नसाल तर प्रमोशन होइल.
पण प्रमोशन केल्यावर काम करावं लागेल. विश्रांती गमावून बसाल.
तस्मात् , श्शsssss
शांत बसा.
निवांत बसा.
मला धरुन हाणायची इच्छा सोडून द्या आणि चार घटका आराम करा ; मलाही करु द्यात.
शुभप्रभात.
Wink

--मनोबा

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

काय रे? काय झालंय नक्की? घरी सगळं ठीक आहे ना? काळजी घे हो...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

BiggrinBiggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उगी उगी.......
Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

चांगले मनोगत. बर्ट्रांड रसेलचा लेख "In Praise of Idleness" जरूर वाचावा, असे सुचवावेसे वाटते.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रोचक आहे खरा.
जागतिक मंदिच्या अनुषंगानं लिहिल्यासारखा वाटतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मा.श्री. जृंभणश्वान यांचा कंटाळा ब्लॉग वाचावा अशी शिफारस करतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

किंवा कुत्र्याचाच बाष्कळ बडबड हा ब्लॉग वाचावा. विशेष करून 'राजपुत्र धृमणाचा धर्वणाश्रम'. कंटाळ्याचे हरण होईल याची ग्यारण्टी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अगदी अगदी!!!

किंवा गोविंदा प्रभृतींची गाणी ऐकावीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

झकास ब्लॉग आहे. धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

गाडी सुरु राहते ते ती अधून मधून थांबल्यामुळेच.

अलिस लाल राणीला म्हणते 'या देशात सगळे लोक सारखे धावत का असतात?'
लाल राणी 'अगं, या देशात जागाच हलत असतात. त्यामुळे आपल्याला एकाच जागी राहण्यासाठीही धावत रहावं लागतं. कुठे जायचं असेल तर दुप्पट वेगाने धावावं लागतं'
अलिस 'हे फारच चमत्कारिक आहे. आमच्या देशात तर बुवा धावलं तर होतो त्यापेक्षा कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जायला होतं'
मला हे वाचून तर वाटायला लागलं आहे की समजा धावत्या जगात आपण धावलोच नाही, तर कुठेतरी दुसरीकडे जाणं नाही का होणार? रिलेटिव्ह मोशन! आणि मागे जातोय असं वाटू नये म्हणून सरळ मागेच तोंड करून उभं रहायचं. म्हणजे मग काय चिंता नाय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अलिस इन वंडरलेंड पुन्हा पहावा म्हणतोय.
ह्यापूर्वी कार्टून पाहिलं तेव्हा इतकं लक्षात राहिले नाहित संवाद. नुसती गंमत जंमत वाटत राहिली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अ‍ॅलिस इन वंडरलँड बघण्यापेक्षा वाच.
कित्येक संवाद मुलांनी वाचले तर मजा वाटावी आपण वाचले तर विविध गोष्टींचं गमक हाती लागावं असे आहेत. विकत घे खरंतर!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

रजेपेक्षा मजा श्रेष्ठ.
मजा करता येते रजा करता येत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ठ्ठो!
ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हॅ हॅ हॅ.. आम्ही नेहमीच असेच असतो
आजच वर्क फ्रॉम होम नावाची रजा दोघांनी घेतली होती. मुलीला पाळणाघरात ठेऊन उन्हाळी सुट्टीची बुकिंग्ज, रिझर्वेशन्स करणे आणि "अ रेनी डे" नावाचा टुकारपट बघणे ही कामे मन लाऊन केली. चेंज ऑफ वर्क म्हणजे आराम हे पटलं Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

ह्या मौनाचं भाषांतर कसं करायचं ब्वा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हो हो कळ्ळं! इतकं रबिटिन करायला नकोय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनोबा टंकण्यातून रजा/विश्रांती घ्यायला काही तयार नाहीत ! Wink
----
कंटाळ्यावरून एक अवांतर आठवले. अनेक वर्षांपूर्वी शफाअत खानांनी लिहीलेल्या 'क' नांवाच्या नाटिकेचे सादरीकरण आठवले. अद्वैत दादरकर आणि वीणा जामकर या कलाकारांनी केवळ अर्ध्या - पाऊण तासाच्या त्या नाटिकेत जबरा धमाल आणली होती. ( क = कंटाळा )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Biggrin
आजच कामाला रजा टाकून रांजण खळग्याला जाऊन आलो. आणि येताना अमानोरा टाऊन मध्ये सोकाजीच्या रीपोर्टवरून टीजे'ज ब्रुअरी मध्ये सन्ध्याकाळ घालवून आलेलो आहे. बाकी वृतांत उद्या Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हजम नही हुवा.
अवो, संध्याकाळी येक बियर घालवली की लोकं कीबोर्ड आपटु आपटू टंकतात. आन तुम्ही ब्रुवरित संध्याकाळ घातली म्हंतात, आन व्रुत्तान्त उद्या? छ्या!
हाय रे कम्बख्त, तुमने सिर्फ ब्रुवरी देखी ऐसी शंका आ रेली हय.
काय पिल्ली बिल्ली का नय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

हॅहॅहॅ. फक्तं वृत्तांत टंकला नाय. बाकी बरच टंकन केलं Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

वृत्तांताची वाट बघतो आहे द्येवा, येऊ द्या लवकर!

- (विश्रांतीच विश्रांती घेत असलेला) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ढेरे सर ,तुम्ही बिअर प्यायली ? आणि वृत्तांत पण नाही लिहिला ? चांगलं नाही हो हे.
बिअर तर नाही पाजणार तुम्ही ,
निदान वृत्तांत तरी लिहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टीजे जागा फस्क्लास आहे. म्हणजे होती तेव्हा तरी. नंतर नाही गेलो. पण दुलाली वगैरे टीजे समोर लैच बोर.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अर्रे इतका छान धागा कसा मिस झाला? एकदम खणखणीत Smile

कामातील बदल ही विश्रांती असते असं गांधीजी म्हणतात. असं काही वाचण्यात आलं तर सर्वप्रथम तुमच्या वाचनाच्या सवयीत बदल करा.

ROFLROFL फु-ट-ले!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

करा करा आराम करा.
सारखं तेचतेच वाचायचा कंटाळा आलेला म्हणून ऐसीपासून रजा घेतली (कोणी काय विचारलंच नाही कुठेयस म्हणून Sad ) विश्रांतीचा कंटाळा आला म्हणून आले तर हे रजा आणि कंटाळ्याचेच धागे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

करा करा आराम करा.
सारखं तेचतेच वाचायचा कंटाळा आलेला म्हणून ऐसीपासून रजा घेतली (कोणी काय विचारलंच नाही कुठेयस म्हणून Sad ) विश्रांतीचा कंटाळा आला म्हणून आले तर हे रजा आणि कंटाळ्याचेच धागे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दोनदा प्रतिसाद टाकायला कंटाळा नै का आला? (हलके घ्या).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हा हा हा . माउसवरचं बोट उचलायचा कंटाळा एल्यानं दोनदा गेला प्रतिसाद. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विश्रांतीत बदल म्हणजे काम

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

" मनोबा, हल्ली लिहीत नाहीस?"
मनोबा : "खूप कामं आहेत."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0