मेडीटेशन

मेडीटेशन
अध्यात्म बिध्यात्म
पापण्यांच्या भिंतीत डोळे दडवून घेण
ती मेडीटेशन शिकवत होती
चित्त एकाग्र वगैरे
डोळे झाकले , मिटले , उपटले
तरीपण आतमध्ये काहीतरी दिसत राहत
अंतःचक्षु
तिथे दिसतो
जख्ख सुरकुत्या पडलेला म्हातारा
खांद्यावर काळ घोंगड घेऊन मेंढरानां फिरवणारा
हिरवटलेल्या टेकड्या
उतरत्या कौलांची घर
सगळी मनातली भकभक बंद
बाष्कळ मेडीटेशन
हळूच डोळे किलकिले करून बघतो
ती तिच्या गळ्यातल्या matching गुलाबी माळेसोबत
खेळत असते
ती कसलातरी जप करते
डोळे बंदच असतात तिचे
थोडाफार उपजत प्रामाणिकपणा आठवून
मीही डोळे बंद करतो
मेडीटेशन
हळूच श्वास घ्या , हळू श्वास रोखा , हळू श्वास सोडा
श्वासावर लक्ष केंद्रित
नदी
नितळ स्वच्छ काठावर इमारती नसलेली
पण नदीच्या पाण्यात प्रतिबिंब दिसत आहेत
सिमेंटच्या इमारतींची
आता ताजमहाल पडायला आला लेका
आणि ताजमहाल बांधून त्यात थोडेच कोण राहायला जाणार आहे?
2BHK,3BHK बास
फारतर लोखंडी गेट आणि काम्पौंड असलेल घर
खिडकीतून वारा न येण्यासाठी काचा
आंतमध्ये फुल्ल ए.सी.
आणि ए.सी.
ध्यानमंदिरामध्ये मेडीटेशन
मेडीटेशन.....लक्षच लागत नाही आहे
हि विचारांची माळ सगळ्यांच्या मेंदूत सुरु आहे कि मी वेडा झालोय
आणि वेडा झालो तरी शहाण असल्याच नाटक झख्ख वटवतो
डोळे बंद असूनही जाणवत
तिची नजर माझ्यावर आहे
ती म्हणते बुबुळांची हालचाल बंद कर
डोळे बंद करून बुबुळ फिरवली म्हणजे मेडीटेशन नाही
ती चमत्कारिक आहे
मेडीटेशन पुन्हा सुरु
आता देव
विठठला पांडुरंगा
तुम्ही का नाही बसत सोन्याच्या सिंहासनावर
या फालतू विटेवर उभे राहून आयुष्य बरबाद करून घेतलं
चंद्रभागा तरी कोठे निर्मल राहिली आता
You can have settled life
देवा तुमच्या काळ्या मूर्तीवर काळा गोगल घातलाय का ?
थांब मेडीटेशन संपल्यावर तिलाच विचारतो
डोळे चांगलेच अडकले आहेत एकमेकात
हलकेच डोळे उघडतो
सगळ स्थिर आहे
सगळ दिसतंय
नॉर्मल आहे याची खात्री झाली
आता हे डोळे झाकणे
अगदीच अशक्य झाल आहे
time travel?
जड पुस्तक ,जड कांदबरी
जड दप्तर
नाकावरचा चष्मा
चश्म्यावरचे ओरखडे
माझे डोळे त्या ओरखाडयामधून काय पाहतात?
ती दटावते डोळे उघडू नकोस म्हणून
काहीतरी सुंदर आठव
समुद्र
बाग-बगीचा
मोर
गुलाब फुलांचे ताटवे
मी हलका होतोय
आणखीनच हलका
ती म्हणते ढगांचे आकार आठव
ढगांइतका हलका हो
स्वर्ग बिर्ग म्हणे
सगळा धूरच दिसतोय समोर
खाडकन डोळे उघडतो
निसटतो तिच्या कचाट्यातून
जड जड होत
पुन्हा काळी शांतता अंधारी!
उघड्या डोळ्यातून अनुभवत!

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

हाण्ण तेजायला!! भारी जमलीये Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कशी कोण जाणे ही कविता वाचायचीच राहिली होती. आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१
मस्तंय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मस्त!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रोचक!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काल संध्याकाळी कॉफी झाल्याने झोप लागेना मग खूप वेळ बेचैन या कुशीवरुन त्या कुशीवर करत करत शेवटी "सोहम" मंत्र म्हणत श्वासावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. याला म्हणतात स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारुन घेणं.
मंत्र सुरु नाही केला तोच पहीली २ मिनीटं या खलात गेली की सः (श्वास आत) अहम (श्वास बाहेर) म्हणू की सो (श्वास आत घेऊन) हम (श्वास बाहेर टाकून)??????
बराच वेळ प्रश्नचिन्हांकीत घालवल्यावर "सोहम" शब्द ठरला.
सो - हम
सो-हम
सो-हम
पायांनी एकदम आपली आपण स्वयंस्फूर्त हालचाल सुरु केली न एक पाय , दुसर्‍या पायाची नखांसकट आऊट-लाइन गिरवू लागला Smile
मग लक्ष अर्थातच उडालं.
ते परत आणून
सो-हम
सो-हम
तोच रजा मिळेल का-भारतवारी नीट होईल का वगैरे प्रश्नांची सरबत्ती मनात सुरु झाली Sad
त्यात २ मिनीटं वहावल्यानंतर,
परत ...
सो-हम
सो-हम
सो-
इतक्यात उठून पाणी पिऊन आले, अन आल्यावर मंत्रजप विसरुन सी डी प्लेयर चालू केला Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान आहे कविता. हुकली होती वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान आणि समजणारी कविता.
---------------------------
मेडिटेशन वैगेरेची माणसाला गरज नसावी. हजारो वैचारिक घोळ असलेला माणूस किंबहुना मेडिटेशन करू शकणार नाही. परीक्षेचा ताण असतो. आणि अशा मनाची सतत परीक्षा चालू असते. हे चांगलं का ते? हे योग्य का ते? आपण बरे वागलो कि वाईट? लोक ठिक आहेत कि अपाथेटिक? यावेळी असं झालं, त्यावेळी तसं. याचा अर्थ असा होतो, त्याचा तसा. अंत:स्फूर्त सन्मूल्ये आणि जगरहाटीसोबत आपला केलेला स्वार्थ दोघेही मीच योग्य म्हणून आपल्या मनात थयथयाट करत असतात. त्यांना तीच बरी जागा मिळते. स्वतःचं सगळं पॅचअप केलं तरी मग लोकांचा हिशेब उरतो. कोण कसा आहे? दुसरा कोण कसा आहे? आपली त्यांचेशी कोणती स्पर्धा आहे? मेडिटेशन करून फक्त चांगले विचार आणायला (किंवा नच आणायला)सगळा विचार करून झालेला असायला हवा. हा विचार करायला अख्खं आयुष्य असताना, आणि विचार संगणकाच्या गतीने प्रोसेस होत असताना सुद्धा गणिते सुटत नाहीत. असं थेटच मेडिटेशन कसं करता येईल? सभोवतालच्या जगाशी काँसोनान्स ही लाईफ लॉंग प्रोसेस आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

Sundar

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0