उभारी देणारे असे काही

struggle शब्दाचा एक लोचा आहे . आपल्याकडे हा शब्द आर्टस ला admission घेणाऱ्या , नाटक -चित्रपट क्षेत्रात career करू इच्छिणार्यां आणि दहा ते पाच ची चाकोरी सोडून वेगळी वाट चोखाळणार्या लोकाना उद्देशुन वापरला जातो . मुळात मला अस वाटत की प्रत्येकजण हा त्याच्या / तिच्या पातळीवर एक struggle करतच असतो. म्हणजे बापाशी बिघडलेले संबंध पुर्ववत करण्यासाठी धडपडणारा पोरगा हा एक struggle च करत असतो . नौकरी मध्ये बॉस आपली ठासत आहे हे कळत असून पण नौकरी टिकवण्यासाठी धडपड करणारा मध्यमवर्गीय माणूस पण रोज संघर्ष करीतच असतो. पण कधी कधी हा संघर्ष खुप लांबतो . इतका लांबतो की आता याला शेवटच नाही अस वाटायला लागत . खुप लोक अशावेळेस Give Up करतात . आणि आयुष्यभर 'काश …' च मधुन टोचणी देणार फिलिंग घेऊन जगतात . काहि लोक मात्र याला अपवाद असतात . ते टिकून राहतात , लढतात आणि जिंकतात पण . अशीच एक हृदयस्पर्शी संघर्षाची कथा आहे आंग ली ची . इंग्रजी चित्रपट पाहणाऱ्या लोकांसाठी हे नाव अपरिचित नाही . Brokeback Mountain , नुकताच येउन गेलेला आणि गाजलेला life of pie असे अनेक चित्रपट आंग ली ने दिग्दर्शित केले आहेत . आज जगातल्या आघाडीच्या दिग्दर्शकांमध्ये त्याचा समावेश होतो . पण इथपर्यंत मजल मारण्यासाठी त्याने जो भावनिक , आर्थिक संघर्ष केला त्याची हि कुठलाही आव न आणणारी , melodramatic नसणारी पण हृदयस्पर्शी कहाणी त्याच्याच शब्दात :

१९७८ मध्ये मी Illinois University मध्ये चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेण्याचा निर्णय पक्का केला . माझ्या वडिलांचा या माझ्या निर्णयाला तीव्र विरोध होता . त्यांनी माझ्या तोंडावर काही आकडेवारी फेकून मारली .: ' दरवर्षी तुझ्यासारखे ५०००० लोक हे असल कुचकामी शिक्षण घेऊन कॉलेज च्या बाहेर पडतात आणि त्यांच्यासाठी नौकर्या किती असतात , तर फ़क़्त २००. ' तरी त्यांचा हा सल्ला ठोकरून मी अमेरिकेला जाणाऱ्या विमानात बसलो . पण त्यामुळे पिता - पुत्राच्या नात्याला कधीही न भरून येणारा तडा गेला . पुढच्या दोन दशकात आम्ही शंभरहून कमी वाक्य एकमेकांशी बोललो असू .

पण जेंव्हा मी माझ शिक्षण संपवून बाहेर पडलो तेंव्हा माझ्या वडिलांनी व्यक्त केलेली भीती किती खरी होती हे मला पदोपदी जाणवायला लागल . एक चिनी वंशाचा माणूस hollywood मध्ये काहीतरी करून दाखवेल असे कुणालापण वाटत नव्हत . कॉलेज मधून बाहेर पडल्यानंतरची पुढची सहा वर्ष हि कधीही संपणार नाही असे वाटणाऱ्या अनिश्चिततेने भरलेली होती . या सहा वर्षांमधला बहुतांश वेळ मी अनेक दिग्दर्शक व संकलक यांचा सहायक म्हणून छोटी मोठी किरकोळ काम करण्यात व्यतीत केला . सगळ्यात वेदनादायक भाग हा मी लिहिलेलं स्क्रिप्ट घेऊन निर्मात्यांचे उंबरठे झिजवणे हा होता . त्याकाळात मला साधारणतः ३० निर्मात्यांकडून नकार मिळाला .

त्याच वर्षी मी ३० वर्षाचा झालो . एक जुनी चीनी म्हण आहे : तिशीत माणूस त्याच्या स्वतःच्या पायावर ठाम उभा असतो अशा अर्थाची . पण मी तर अजूनही धड स्वतःच्या प्राथमिक गरजा पूर्ण करू शकत नव्हतो . या अशा पडत्या काळात माझ्यासमोर फार कमी पर्याय शिल्लक होते . एक तर काही घडेपर्यंत वाट बघत बसायचं अथवा चित्रपट बनवण्याचं माझ स्वप्न सोडून द्याच .

या अनिश्चिततेच्या अंधाराने भरलेल्या काळात मला माझ्या बायकोने पाठबळ दिल . तिने तिची पदवी जीवशास्त्र या विषयातून घेतली होती आणि ती एका प्रयोगशाळेत नौकरी करत होती . पण तिच्या नौकरी मधून मिळणारे उत्पन्न आम्हाला पुरेल एवढे नव्हते . त्याचकाळात आम्हाला एक पुत्ररत्न झाले आणि आमच्या जबाबदाऱ्या अजून वाढल्या . घरात मी पैसे आणू शकत नाही या अपराधी भावनेतून मी घरकामांची जबाबदारी घ्यायला सुरुवात केली . जेंव्हा बायको कामावर जायची तेंव्हा मी स्वयंपाक , साफसफाई आणि आमच्या मुलाच संगोपन अशी काम करत असे . फावल्या वेळात वाचन आणि संहिता लेखन चालूच होते . रात्रीच जेवण बनवून झाल की मी आमच्या मुलाला , घेऊन घरासमोरच्या पायऱ्यांवर बसून राही . मी माझ्या बायकोची आणि तो त्याच्या आईची वाट बघत .

हे असल आयुष्य कुठल्याही पुरुषासाठी मानहानीकारक च . माझ्या सासू सासर्याना हे डाचत असाव . त्यांनी माझ्या बायको ला काही पैसे देऊ केले . त्यांच्या मते मी या भांडवलातून एखाद चायनीज हॉटेल सुरु कराव जेणेकरून माझ स्वतःच काही उत्पन्न सुरु होईल . माझ्या बायकोने हे पैसे घ्यायला इन्कार केला . जेंव्हा मला याबद्दल कळल तेंव्हा मी सुन्न झालो . अनेक रात्री जागून काढल्यावर शेवटी मी निर्णयाप्रत आलो : माझ चित्रपट बनवण्याचं स्वप्न हे पूर्ण होणार नाही . सत्याला सामोरे जाण्याची वेळ आली आहे

जड अंतकरणाने मी जवळच्या एका कॉलेज मध्ये मी Computer Course ला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला . हा निर्णय घेतल्यावर मी निराशेच्या गर्तेत बुडून गेलो . माझ्या बायको ला हा माझ्या स्वभावातला फरक जाणवला . Computer Class च वेळापत्रक तिने माझ्या bag मध्ये पाहिलं . त्या रात्री ती काहीच बोलली नाही .

दुसऱ्या दिवशी ती तिच्या कामाला जायला निघाली . मी सुन्न पणे बसून होतो . ती घराबाहेर पडली . पण अचानक तिच्या मनात काय आल कुणास ठाऊक . घराबाहेरच्या पायऱ्यांवर असताना ती पुन्हा वळली आणि एवढच म्हणाली , "आंग , तुझ्या स्वप्नांचा विसर पडू देऊ नकोस ." तिच्या या एका वाक्याने जादूची कांडी फिरली . निराशेच्या गर्तेत गटांगळ्या खाणार माझ स्वप्न पुन्हा जिवंत झाल . त्याचा पुनर्जन्म झाला .

मी ते computer class च वेळापत्रक bag मधून बाहेर काढल . त्याचे हळूहळू बारीक बारीक तुकडे केले आणि कचऱ्याच्या डब्यात ते फेकून दिले .

अर्थातच एका रात्रीत परिस्थिती बदलली नाही . पण काही दिवसांनी मला माझ्या स्क्रिप्ट साठी finance मिळाला . मी माझ्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली . नंतर माझ्या कामाला काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार पण मिळाले . नंतर माझ्या बायको ने माझ्याशी बोलताना कबुली दिली ,' मला नेहमीच असा विश्वास होता कि तुझा जन्म हा चित्रपट बनवण्यासाठी च झाला आहे . संगणक क्षेत्रात आधीच खुप लोक काम करत आहेत आणि त्यांना तुझी गरज पण नव्हती ."

(http://whatshihsaid.com/2013/02/26/ang-lee-a-never-ending-dream/) मुळ लेख इथे आहे .

स्वप्नांना वयाची , लिंगाची , धर्माची बंधन कधीच नसतात . त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी कुठल्याही मुहूर्ताची गरज नसते . आंग लि ने २०१३ मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा Oscar पुरस्कार जिंकला .

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

फार कंटाळा येतो आजकाल असे काही वाचायला. प्रचंड बायस असतो आपल्यात, एखाददुसरा चमत्कार बघून तोच सगळ्यांच्या बाबतीत होऊ शकतो असे म्हणायचा.
ऑप्टिमिझम बायस, सर्व्हाय्वरशिप बायस सगळे नुसते बायस.
एक माणूस खरेच यशस्वी होताना त्यामागे हजारो अपयशी लोक अज्ञातात गडप झालेले असतात. पण ते अपयशी असल्याने कोणाला त्यात रस असतो?
उलट ते अपयशी म्हणजे त्यांच्यात हुन्नरच नव्हता किंवा त्यांची स्वप्ने, त्यांचे झपाटलेपण खरे नव्हतेच, त्यांचे प्रयत्न कमी पडले असे म्हणून टाकता येते सहजच.
"लाईफ इज नॉट फेअर" हे स्वीकारणे आपल्याला इतके अवघड का असते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१
तंतोतंत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

+१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"लाईफ इज नॉट फेअर" हे स्वीकारणे आपल्याला इतके अवघड का असते?

अहो वर्षानुवर्षे कित्येक लोक ह्याच मुद्द्यावर डोके आपटत आहेत. स्वीकारणे सोपे असते तर फार बरे झाले असते, पण नाही ते सोपे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे असल आयुष्य कुठल्याही पुरुषासाठी मानहानीकारक च

यापुढचं काहीही वाचलं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उत्सुकता म्हणून एक प्रश्न विचारतो.
तुला आंग ली यांचे पुढचे चित्रपट आवडणे किंवा न आवडणे यावर आंग ली यांच्या वरील विधानाचा प्रभाव पडेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

पुरुष या शब्दामुळे ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

काही अपेक्षा:

१. मी हा दावा केला नाही, स्पष्टीकरण देणार नाही- असे शाळकरी विधान.

२. खवचट, भडकौ, इ.इ. श्रेण्यांचा मारा.

येऊद्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

यापुढचं काहीही वाचलं नाही.

एखाद्या व्यक्तीची आत्मकथा किती प्रभावी आहे हे त्या व्यक्तीचे विश्वास कोणाच्या नजरेतून बरोबर आहेत की चूक आहेत यापेक्षा त्या त्या परिस्थितीत, त्या विचारसरणीच्या पगड्याखाली होणारी तिची कुचंबणा आणि तीतून बाहेर येण्यासाठी दिलेला लढा कितपत खरा आहे यावर ठरतं. त्यामुळे अशा बाबतीत आपला विचारसरणीचा चष्मा बाजूला ठेवून पुढे वाचायला हरकत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"पुढे वाचायला हरकत नाही"च. पण मला हे थोडं मॉर्बिड (मराठी शब्द? फाजील?) कुतूहल वाटतं. म्हणजे अमेरिकन वृत्तपत्रांमधे, प्रचंड जाड लोकांनी काय केल्यामुळे त्यांचं वजन प्रमाणाबाहेर वाढलं आणि मग पुढे काय करून कमी झालं याच्या गोष्टी येतात. ज्यांना त्यातून प्रेरणा मिळते त्यांना मिळू देत, त्याबद्दल काहीच आक्षेप नाही; उलट ते चांगलंच आहे. पण त्यातून माझ्यासाठी घेण्यासारखं काय हे मला समजत नाही. शिवाय वाचण्यासारख्या असंख्य गोष्टी राहिलेल्या दिसत असताना, नेमकं असं लिखाण का वाचावं याचं उत्तर माझ्याकडे नाही. म्हणून मला ते वाचावंसं वाटलं नाही.

(तरीही वाचायला ना नाही, पण मग कंटेंटकडे लक्ष न राहता फॉर्मकडे जातं. आणि मग पुन्हा ...)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रचंड जाड लोकांनी काय केल्यामुळे त्यांचं वजन प्रमाणाबाहेर वाढलं आणि मग पुढे काय करून कमी झालं याच्या गोष्टी येतात. ज्यांना त्यातून प्रेरणा मिळते त्यांना मिळू देत, त्याबद्दल काहीच आक्षेप नाही;

आंग ली आणि या जाड्यारड्यांच्या गोष्टींची तिरकस तुलना इ.इ. वाचले की मग इथेही कंटेंटऐवजी फॉर्मकडे लक्ष जाते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुला आंग ली यांचे पुढचे चित्रपट आवडणे किंवा न आवडणे यावर आंग ली यांच्या वरील विधानाचा प्रभाव पडेल का?

गेली बरीच वर्ष 'ब्रोकबॅक माऊंटन' पहायचा, पहायचा म्हणत असूनही राहिला होता. तो मुद्दाम आज पाहिला. आणि मला तो आवडला.

पुरुष या शब्दामुळे ?

नाही, फक्त तेवढंच नाही. "घरात मी पैसे आणू शकत नाही या अपराधी भावनेतून मी घरकामांची जबाबदारी घ्यायला सुरुवात केली." हे पण. ही दोन वाक्य एकत्र आणि सुटी-सुटीही पाहता, या माणसाचे जेंडर रोल्स ५०-६० वर्ष जुने आहेत, आणि त्या 'माचिस्मो' वृत्तीने स्वतःच स्वतःवर बंधनं घालून घेतली होती हे दिसल्यावर, पुढची गोष्ट मलातरी वाचावीशी वाटत नाही. कदाचित ५०-६० वर्षांपूर्वी दिसली असती तर वाचलीही असती.

अवांतर - आमच्या ओळखीची एक आजी होती. ती अगदी बोहारणींनासुद्धा "तू चार दिवस बाहेर बसतेस का?" असं विचारायची. 'चार दिवस बाहेर बसणं' म्हणजे नक्की काय हे समजल्यापासून मला त्या आजीबद्दल करूणा वाटायला लागली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्या आज्जी होत्या, हे लक्षात घेतलं तर फार वेगळं, विचित्र किंवा करुणा वगैरे वाटलं नाही.
मूल्यव्यवस्था ह्या कालसापेक्ष असतात असं काहीतरी कुरुंदकरांचं वाक्य आहे.
("जो तो महापुरुष आपल्या काळानुसारच असतो. " असं काहीतरी; नेमकं आता आतह्वत नाही, व्याख्यानात ऐकलं होतं.
तर सांगायचं म्हणजे, महापुरुष व थोर लोकच नव्हे तर सामान्य माणसेही त्या त्या काळाला सुसंगत अशीच वागत असावीत.)
आता काळाला सुसंगत म्हणजे काय? तर चार चौघांसारखं!

मराठा साम्राज्य प्रभुत्वाकडे वाटचाल करु लागल्यावर त्या काळच्या सत्ताधार्‍यांनी कुठे काही तुळजाभवानीला बळी वगैरे दिले असल्याचे वाचले, तर आश्चर्य वाटत नाही. त्या त्या काळापेक्षा ते फार काही वेगळं नव्हतं; इतकच.
आता मागे वळून पाहताना त्यांना खुळचट म्हणणं सोपं आहे. पण व्यक्ती वाधली, राहिली तिथल्या एकूण परिस्थितीकडे
पाहिलं जावं असं वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आता मागे वळून पाहताना त्यांना खुळचट म्हणणं सोपं आहे.

आगापिछा न पाहता हेच करतात लोक. त्याबद्दल त्यांना मायोपिक म्हणणे रास्त आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> त्या आज्जी होत्या, हे लक्षात घेतलं तर फार वेगळं, विचित्र किंवा करुणा वगैरे वाटलं नाही.
मूल्यव्यवस्था ह्या कालसापेक्ष असतात असं काहीतरी कुरुंदकरांचं वाक्य आहे.

करुणा ह्या भावनेचं तुम्ही काय मूल्यमापन करता? बुद्धाच्या किंवा इतर अनेकांच्या मते माणसाला इतरांविषयी करुणा वाटणं चांगलं आहे. मला माझ्या आधीच्या पिढीतल्या अनेकांविषयी करुणा वाटत आली आहे. त्यांच्या पूर्वग्रहांमुळे किंवा अंधश्रद्धांमुळे त्यांचं आयुष्य जसं कडवट किंवा दु:खात किंवा इतरांना त्रासदायक ठरण्यात गेलं त्यापेक्षा ती माणसं थोड्या नंतरच्या परिस्थितीत वाढली असती, तर ती अधिक आनंदी जगू शकली असती, इतरांनाही ती सुसह्य झाली असती आणि त्यांच्यात मला दिसणारे चांगले गुणधर्म कदाचित घराबाहेरच्या जगालासुद्धा दिसू शकले असते अशा जाणिवेतून ही करुणा किंवा कणव येत असे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मूल्यव्यवस्थेचा काही भाग कालसापेक्ष असतो या विधानाबद्दल काय मत आहे? की तीही भूतकाळातल्या चुकांवर पांघरूण इ. घालण्यासाठीची मखलाशी इ.इ. आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मूल्यव्यवस्था स्थल-काल-संस्कृतीसापेक्ष, इतकंच काय, व्यक्तिसापेक्षसुद्धा असतात; त्यामुळे ज्यांच्याशी माझी मूल्यं जुळत नाहीत अशांशी परिस्थितीनुरूप जमेल तितकं जुळवून घ्यायला माझी ना नसते. पण (कदाचित म्हणूनच) त्या व्यवस्थेत राहूनही इतरांशी चांगलं वागणारे लोक आवडणं आणि जे (मूल्यव्यवस्थेत अडकल्यामुळे) तसे वागत नाहीत त्यांच्याविषयी (कोणत्याही काळात किंवा संस्कृतीत) कणव वाटणं नैसर्गिक वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ओके

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पण (कदाचित म्हणूनच) त्या व्यवस्थेत राहूनही इतरांशी चांगलं वागणारे लोक आवडणं आणि जे (मूल्यव्यवस्थेत अडकल्यामुळे) तसे वागत नाहीत त्यांच्याविषयी (कोणत्याही काळात किंवा संस्कृतीत) कणव वाटणं नैसर्गिक वाटतं.

इथे मूल्यव्यवस्था नामक प्रकारावर अ-प्रायरी पासवलेले सिलेक्टिव्ह जजमेंट रोचक वाटले. चालू द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> इथे मूल्यव्यवस्था नामक प्रकारावर अ-प्रायरी पासवलेले सिलेक्टिव्ह जजमेंट रोचक वाटले.

खरं तर एकदा मूल्यव्यवस्थेची स्थळ-काळ-संस्कृती-व्यक्तिसापेक्षता मान्य केली की दोन व्यक्तींची मूल्यव्यवस्था समसमान असणं क्वचितच घडत असणार असं त्यावरून म्हणता येतं. एकदा दोन व्यक्तींच्या मूल्यव्यवस्थेत एकतानता नसणं मान्य केलं की इतरांशी चांगलं वागणं हे आपल्या मूल्यव्यवस्थेत राहूनही करणं, त्याची गरज, ते करण्याची क्षमता किंवा अक्षमता आणि त्याचं महत्त्व वगैरे स्पष्ट होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चांगलं वागणं

चांगलं म्हणजे काय हे मूल्यव्यवस्थेवर ठरत असेल काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

>> चांगलं म्हणजे काय हे मूल्यव्यवस्थेवर ठरत असेल काय?

अर्थात, म्हणूनच माझं हे खाली उद्धृत केलेलं विधानसुद्धा सापेक्षच आहे. त्यामुळे त्यातली नैसर्गिकता कमी होऊ नये -

त्या व्यवस्थेत राहूनही इतरांशी चांगलं वागणारे लोक आवडणं आणि जे (मूल्यव्यवस्थेत अडकल्यामुळे) तसे वागत नाहीत त्यांच्याविषयी (कोणत्याही काळात किंवा संस्कृतीत) कणव वाटणं नैसर्गिक वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

म्हणजे १०० वर्षांनी आजच्या पुरोगाम्यांची सुद्धा कोणीतरी कीव करेल असं काहीसं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

>> म्हणजे १०० वर्षांनी आजच्या पुरोगाम्यांची सुद्धा कोणीतरी कीव करेल असं काहीसं?

१. कीव आणि करुणा ह्यांत माझ्या मते फरक आहे.
२. मूल्यव्यवस्थेतली व्यक्तिसापेक्षता मान्य केली तर १०० वर्षं पुढे जाण्याची गरज नाही. आजच त्यांच्याविषयी काहींना करुणा वाटत असणं शक्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

इतरांण्ची करुणा करणार्‍यांची करुणा कुणाला वाटत असेल हे शक्य आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

करुणा की कीव?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> इतरांण्ची करुणा करणार्‍यांची करुणा कुणाला वाटत असेल हे शक्य आहे का?

१. ते शक्यच नाही असं म्हणायला मला काही कारण दिसत नाही.
२. साने गुरुजींना इतरांविषयी अपार करुणा होती असं मला वाटतं. गांधीहत्या आणि आपल्या आणि इतरांच्या समाज सुधारण्याच्या प्रयत्नांना आलेल्या अपयशातून त्यांना नैराश्य आलं आणि त्यांनी अखेर आत्महत्या केली असं म्हणतात. मला त्यांच्याविषयी करुणा वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

एकदा दोन व्यक्तींच्या मूल्यव्यवस्थेत एकतानता नसणं मान्य केलं की इतरांशी चांगलं वागणं हे आपल्या मूल्यव्यवस्थेत राहूनही करणं, त्याची गरज, ते करण्याची क्षमता किंवा अक्षमता आणि त्याचं महत्त्व वगैरे स्पष्ट होतं.

दोन मूल्यव्यवस्थांत फरक असला म्हणून एक चांगली अन एक वाईट असणे अन चांगले वागणे हे त्यातल्या कुठल्यातरी एका व्यवस्थेच्या डिस्पाईट होणे इ.इ. जजमेंट रोचक वाटले.

हां आता अ-प्रायरी जजमेंट पासवणे हे मूल्यव्यवस्थेत बसत असेल तर मात्र डिस्पाईट धिस, देअर इज होप असा आशावाद व्यक्त करावासा वाटतो एवढे नक्की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या आजीने ज्या काळात बोहारणीला (माझ्यासमोर) प्रश्न विचारले, त्या काळात, आजीच्या समाजात काही दशकं आधीच बाहेर बसणं ही प्रथा नामशेष झाली होती. आजीबद्दल खरोखरच करुणा वाटावी अशी परिस्थिती त्यापुढे काही वर्षांत आलीच, विभक्त, शहरी कुटुंबांमधे आजीसोबत आख्खा दिवस घालवू शकतील अशा स्त्रिया मोलकरणी, परिचारिका अशाच स्वरुपाची कामं करणाऱ्या होत्या. आजीच्या मुलींनी (आणि त्या पिढीनेच बंडखोरी करून) बाहेर बसणं स्वतःच्या पायावर उभं राहिल्यावर बंद केलंच होतं, पण आजीसोबत महिनेच्या महिने घरात काढणंही त्यांना शक्य नव्हतं.

आजही जातिव्यवस्था (हे मूल्य) मानणारे लोक आजूबाजूला दिसतात. पण एकेकाळी जेव्हा जातिव्यवस्था हे खरोखरच मूल्य होतं तेव्हाही आपल्या घरात आलेली भाजी कोणी पिकवली आहे, आपले सोवळ्यासकट इतर कपडे कुठे बनले आहेत, घरासमोर असणारा रस्ता कोणी बनवला आहे वगैरे चौकश्या लोक करत नसत. त्यावर काही मंत्रादी उपाय काढणे किंवा तत्सम लवचिकता हे लोक दाखवायचे. याच समाजातल्या इतर काही आजी-आजोबांनी बाहेर बसणं, या जुन्या गोष्टी आम्हां मुलामुलींना 'एकेकाळच्या गमतीजमती' या नावाखालीच सांगितल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, आजीने 'बाहेर बसणं' मागे न टाकणं हे तर पारच 'संस्कृतीबाहेरचं' वाटतं.

मुख्य धाग्याबद्दल - गतकालीन मूल्यं कवटाळून धरल्यामुळे स्वतःला दुःखात लोटणाऱ्या मनुष्याबद्दल करुणा वाटली.

आंग ली च्या चित्रपटांबद्दल - त्याची मूल्यं मला पटत नाहीत तरीही त्याने बनवलेल्या कलाकृतींकडे साफ चष्म्याने पहायची लवचिकता असणं महत्त्वाचं. लिंगभावासंदर्भात स्वतःच्या आयुष्यात गतकालीन मूल्य जपणारा माणूस एक चित्रपट बनवतो त्यात समलिंगी पुरुषांकडे मात्र व्यक्ती म्हणूनच पाहिलं जातं. स्वयंपाक करणं, कपडे धुणं ही कामं करणाऱ्या पुरुषाला कमी लेखलेलं नाही. यातही बंडखोर, धाडसी माणूस मरतो असं दाखवून सनातनीपणा किंचित जपला तरीही चित्रपट जुन्या काळातली आणि बायबल बेल्टातली (=सनातनी समाजातली) गोष्ट म्हणून समोर येतो. उलट प्रचलित मूल्यांमुळे त्याचं आयुष्य कसं होरपळतं याची करुण कहाणी 'ब्रोकबॅक माऊंटन'मधे आहे. व्यक्तिगत आयुष्यात लिंगभावाबद्दल हा माणूस प्रगत नसला तरीही त्याला मनुष्यांबद्दल करुणा, प्रेम, आपुलकी आहे हे त्याच्या चित्रपटात दिसू शकतं. हे मान्य करायला काहीच अडचण नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रतिसादातील पहिल्या आणि दुसर्‍अय प्रतिसादाबद्दल :-
ओके.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

"जो तो महापुरुष आपल्या काळानुसारच असतो. "

सहमत. काही थोड्या महान व्यक्ती त्या काळाच्याही फार पुढे असतात. मात्र त्यांच्यातही, काही बाबतीत पुढारलेपण आणि दुसर्‍या बाबतींत काळानुसार असेही असते. शिवाजीमहाराजांनी सात राण्या करणे किंवा कन्येस उत्तराधिकारी/ तत्सम दृष्टीने न घडवणे हे त्यांच्या मोठ्या राजकीय कतृत्वाला उणेपणा आणत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही प्रतिक्रिया मला जास्त योग्य वाटली. पुरुषांनी कमाई न करण्याबद्दल सोशल स्टिग्मा आहे आणि तो नष्ट करण्यात प्रगत देशातल्या बहुसंख्य "मुक्त" स्त्रियांनाही फारसा रस नाही असे दिसते.
http://www.prnewswire.com/news-releases/social-stigma-for-unemployed-men-75-of-women-are-unlikely-to-date-them-160378575.html
त्यामुळे आंग ली लिंगभेदाच्या बाबतीत कसेही असेनात त्यांची बायको फार चांगली आहे यात दुमत नसावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पूर्ण सहमत. पण टाळी एकाच हाताने वाजते असे म्हणून गळे काढणार्‍यांना त्याचे काय होय!

(आणि हो, त्या विशिष्ट श्रेण्याही येऊद्यात.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खरंतर मग, जेन लिन (आंग ली यांची पत्नी, त्यांचा उल्लेख नावाशिवाय करणं अयोग्य वाटलं म्हणून विकीपीडियावर पाहिलं) यांची, व्यक्तिगत आयुष्याबद्दल मुलाखत प्रकाशित करणं मला अगत्याचं वाटेल.

"प्रगत" देशातल्या स्त्रिया मुक्त असतीलच असं काही नाही; लिंगभेद (= gender gap) कमीतकमी असणाऱ्या पहिल्या दहा देशांमधे अमेरिकेचं नाव नाहीये. (दुवा. आणि अमेरिकेतलं धर्मवेड पाहता त्यात फार आश्चर्य वाटतही नाही.) पण वरच्या दुव्यातलं एक वाक्य मला फार आवडलं, "Even at my age, 75, and dating if you can believe it," she says, "if a man is not employed, volunteering, involved in life it's a deal breaker."

पण टाळी एकाच हाताने वाजते असे म्हणून गळे काढणार्‍यांना त्याचे काय होय!

हे असं ऐसीवर कोणी, कधी, कुठे केलं त्याचे काही दुवे वगैरे दिले तर ठीक. नाहीतर उगाच अवांतर प्रतिसाद देणं बंद करावं अशी विनंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे असं ऐसीवर कोणी, कधी, कुठे केलं त्याचे काही दुवे वगैरे दिले तर ठीक. नाहीतर उगाच अवांतर प्रतिसाद देणं बंद करावं अशी विनंती.

दमनाचा हजारो वर्षांचा इतिहास इ. सांगणार्‍यांचे दृष्टिकोन समराईझ तेवढे केले. ते यत्र तत्र सर्वत्र वाचावयास मिळतील. इच्छुकांनी आपापल्या मगदुराप्रमाणे शोधावेत.

ऐसीवरच्या चर्चांमध्ये गावभरच्या लिंकांचा पाऊस पडतो, सबब अमुक एका विधानास ऐसीचाच संदर्भ पाहिजे या म्हणण्यामागचा आग्रह अस्थानी आणि म्हणूनच रोचक वाटला.

तदुपरि आमच्या एका क्षुद्र वाक्यास इतके महत्त्व दिलेले पाहून रोचक वाटले खरेच.

असो, चालू द्या.

(आन्दो.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे लेखन ठिकठाक आहे. त्यापेक्षा चित्रपट बरेच चांगले असतात.

बाकी, मुळ लेखकाची भाषांतरासाठी परवानगी घेतली आहे काय? नसल्यास हे भाषांतर कॉपीराईटेड आहे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

परवानगी घेतली आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

तैवानीज्/चायनीज भाषा इथे कोणाला येते का?

हे असल आयुष्य कुठल्याही पुरुषासाठी मानहानीकारक च .

असे भाषांतर धागाकर्त्याने केले आहे. ज्या लेखाचे भाषांतर केले आहे त्यातील ओळ अशी;

This kind of life felt rather undignified for a man.

गुगल ट्रान्सलेटचा वापरकरून मी मिळवलेले इंग्रजी भाषांतर खालील प्रमाणे (अधोरेखन माझे). संपूर्ण परिच्छेद.

Such a life for a man who is very hurt self-esteem. There was a time, her parents let his wife give me money, so I take to open a Chinese restaurant, good for their families, but a good strong wife refused to return the money to the elderly. I know this after several nights tossing think, finally decided: Maybe this life movie dreams are too far away from me, or face it.

धागाकर्त्याच्या अर्थाच्या छटेत आणि इंग्रजी भाषांतरातील अर्थाच्या छटेत मला फरक जाणवला.

This kind of life felt rather undignified for a man. At one point, my in-laws gave their daughter (my wife) a sum of money, intended as start-up capital for me to open a Chinese restaurant – hoping that a business would help support my family. But my wife refused the money. When I found out about this exchange, I stayed up several nights and finally decided: This dream of mine is not meant to be. I must face reality.

हे असल आयुष्य कुठल्याही पुरुषासाठी मानहानीकारक च . माझ्या सासू सासर्याना हे डाचत असाव . त्यांनी माझ्या बायको ला काही पैसे देऊ केले . त्यांच्या मते मी या भांडवलातून एखाद चायनीज हॉटेल सुरु कराव जेणेकरून माझ स्वतःच काही उत्पन्न सुरु होईल . माझ्या बायकोने हे पैसे घ्यायला इन्कार केला . जेंव्हा मला याबद्दल कळल तेंव्हा मी सुन्न झालो . अनेक रात्री जागून काढल्यावर शेवटी मी निर्णयाप्रत आलो : माझ चित्रपट बनवण्याचं स्वप्न हे पूर्ण होणार नाही . सत्याला सामोरे जाण्याची वेळ आली आहे

इंग्रजी भाषांतरात, मिळकत कमी होत असल्याने वाटणारी 'गिल्ट' दिसते तर मराठी भाषांतरात 'मी कमवत नाही म्हणून आलेला कमीपणा' दिसतो.

त्यामुळे, आंग ली बद्दल काही बोलण्या अगोदर खात्री करून घेतलेली बरी. (गुगल ट्रान्सलेटचीही, अर्थातच, खात्री नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0