स्त्रीवाद, फायनॅशियल सेक्युरीटी वैगेरे

धागा असंबद्ध होत नाहिये याची काळजी संपादिकेने नघेता धागा वेगळा काढल्यामुळे आणि "मुलगी बघायाला जाणे-->लग्न होणे --> मग ते मोडणे" हाप्रवास अवांतर कसा याचे उत्तर न मिळाल्यामुळे प्रतिसाद काढुन घेण्यात आलेला आहे. क्षमस्व!

(व्यवस्थापकांची नोंद - मूळ धाग्यातली अवांतर चर्चा इथे हलवली आहे. सिफर यांनी हवंतर चर्चाविषयातच अधिक भर घालावी किंवा प्रतिसादांमधून भर घालावी.)

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

>> कितिही स्त्रीवादी, भुक्कड व्यक्तीस्वातंत्रवादी म्हण्ट्लं तरीही स्त्रियांना लग्न करुन फायनॅशियल सेक्युरीटी वैगेरे लागतेच ना?

मुद्दा कळला नाही. स्त्रिया आर्थिक स्थैर्यासाठी लग्न करतात हे गृहितक कशावरून?

>> हनिमुन साठी नवीन घेतलेली अंतवस्त्र फाटायच्या आधी लग्न फाटणे हे काही नविन नाही आजकाल.

जर आर्थिक स्थैर्यासाठी लग्न केलं जात असेल, तर ते इतक्या पटकन मोडलं जाईल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

>>स्त्रिया आर्थिक स्थैर्यासाठी लग्न करतात हे गृहितक कशावरून?

स्त्रिया 'प्रोव्हायडर' च्या शोधात असतात असं या संस्थळावर स्त्रीवादी आयडीजकडून बोललं गेलं आहे असं आठवतंय. (उत्क्रांतीची प्रेरणा वगैरे)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आणि त्यांनी तसे करण्याचे दाबून समर्थन वगैरे केले गेले होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नक्की काय दाबून?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आम्ही दाबलेले नाही, सबब स्पष्टीकरण देणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हायला!
मला वाटलं की गळे दाबायपर्यंत परिस्थिती पोहोचली होती की काय...

बाकी ऐसीवर फ्रस्ट्टाईम बाफ पेटलेला पहातोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

ही ही ही Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हीच ती चर्चा. आणि हाच तो प्रतिसाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

फक्त आर्थिक स्थैर्यासाठी लग्न करतात असं नव्हे पण त्याला स्त्रीवादी/व्यक्तीस्वातंत्रवादी दुट्ट्पीपणा असं म्हणायचं होत, त्यामुळेच लग्न मोडातात असं ही नव्हे.

वरती पुरषी दुट्ट्पीपणा बद्दल पण प्रतिसादत म्ह्ण्ट्लेल ते पण वाचावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा प्रतिसाद इथे ज्याबद्दल चर्चा सुरु आहे त्याबद्दल नाही. हा चिंजंबद्दल आहे.
चिंज एक तर प्रतिक्रिया द्यायला भाव खातात.
लोक लिहून्--भांडून वगैरे थकले की मग येउन ते एकत्रित सगळ्या प्रतिसादांबद्दल किंवा त्यातल्या एखाद्या नेमक्या खटकलेल्या/आवडलेल्या प्रतिसादाबद्दल बोलतात.
बरं, कैकदा ते तेवढच, त्या प्रतिसादापुरतच बोलतात.
म्हणजे त्या धाग्यावर ते येउन गेले आहेत हे सरळ दिसतं.
तो धागाही त्यांनी पाहिलेला आहे हे दिसतं.
पण त्यांनी धाग्याबद्दल काहीही मत नोंदवललेलं नसतं.
म्हणजे धागा पाहूनही त्यावर प्रतिक्रिया नाही; हे काहिसं "मी तुमच्याकडे दुर्लक्ष करतोय" असं शांतपणे एखाद्याला सांगण्यासारखं आहे.
ते असं का करत असावेत ?
आपल्या उंचीसमोर इतर खुजे वाटले म्हणून असं होत असावं.
किंवा इतर काही प्राधान्याच्या कामात ते खरच व्यस्तही असतील.
देव जाणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

या भावनेशी मी पूर्णपणे सहमत आहे. आपलं मत स्वत:शीच ठेवणारी माणसं मलासुद्धा अगदी आवडत नाहीत.

'ऐअ' च्या प्रत्येक सदस्याने प्रत्येक धाग्यावर प्रतिसाद दिला पाहिजं असा नियम करता येईल का? (अॉस्ट्रेलियात मतदान सक्तीचं आहे तसंच काहीसं.) हे जर व्यवहार्य नसेल तर मी अशी जाहीर घोषणा करू इच्छितो की एखाद्या धाग्यावर मी काहीच प्रतिसाद दिलेला नसेल तर माझी भूमिका अॅरिस्टॉटलच्या विरुद्ध आहे असं by default समजून चालावं. जगातल्या बहुतेक विषयांवर त्याने काहीना काही मत दिलेलं असल्यामुळे जवळपास सगळेच धागे अशा प्रकारे कव्हर होतील.

अर्थात चिंजंचा प्रश्न त्यांना स्वत:लाच सोडवावा लागेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)

धन्यवाद चिंज !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

जर आर्थिक स्थैर्यासाठी लग्न केलं जात असेल, तर ते इतक्या पटकन मोडलं जाईल का?

षटकार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जर आर्थिक स्थैर्यासाठी लग्न केलं जात असेल, तर ते इतक्या पटकन मोडलं जाईल का?

अशी अनेक असंख्य उदाहरणे डोळ्यापुढे आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कितिही स्त्रीवादी, भुक्कड व्यक्तीस्वातंत्रवादी म्हण्ट्लं तरीही स्त्रियांना लग्न करुन फायनॅशियल सेक्युरीटी वैगेरे लागतेच ना?

मलाही मुद्दा समजला नाही. स्वतः आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ पाहणाऱ्या स्त्रियांनी peer marriage (मराठी शब्द?) करण्याचा प्रयत्न केला तर त्यात काय चुकलं? लिंगभेद खूप कमी असणाऱ्या समाजातली बहुतांशी लग्न peer marriage असतात; सगळ्या समाजांमधे, अमेरिका आणि अगदी भारत, चीनमधेही यांचं प्रमाण वाढतं आहे. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ पाहणाऱ्या किंवा असलेल्या स्त्रियांचा मुद्दा अशासाठी की या स्त्रिया समाजातल्या सगळ्यात जास्त मुक्त स्त्रिया असण्याची शक्यता बरीच जास्त. (म्हणून या स्त्रिया विचारांनी मुक्त म्हणता येतीलच असं नाही, यांची पर्सेंटाईल मुक्तता जास्त.)

ज्या स्त्रिया विचारांनी मुक्त नाहीत, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नाहीत, त्यांनी स्वतःच्या आणि भविष्यात होतील त्या अपत्यांच्या उदरनिर्वाहाचा विचार करणं हे नैसर्गिक असणं उत्क्रांतीने सिद्ध केलं आहे. त्यातही आश्चर्य वाटत नाही.

मला आश्चर्य वाटतं ते बायकोला नोकरी करू न देणाऱ्या पुरुषांचं. या पुरुषांना (आणि इतरही अनेकांना) पीअर मॅरेज नको असतं; बायको करियर, पगार यात पुढे गेलेली चालत नाही. आणि पुन्हा बायका घरी कशा त्रास देतात, दारू पिऊ देत नाहीत, बॅचलरचं आयुष्य सुखाचं होतं वगैरे तक्रारीही दिसतात. (माझ्या परिसरात ऐकलेल्या आहेत. Hen-pecked husband वगैरे शब्दप्रयोग आजचे नाहीत. लग्न करून फसलो, वगैरे म्हणणारे हिंदी चित्रपटही निघतात आणि भरपूर गल्ला कमावतात.)

पुरोगामी विचार ठेवुन पुरुषांनी स्त्रीवादी बायको केली तर काही दिवसांनी ती अर्धवट/रेडिक्युलस फेमिनिस्ट असण्याची शक्यता नाकारता येत नाही परिणामी हनिमुन साठी नवीन घेतलेली अंतवस्त्र फाटायच्या आधी लग्न फाटणे हे काही नविन नाही आजकाल.

"स्त्रीवादी बायको केली तर हनिमुन साठी नवीन घेतलेली अंतवस्त्र फाटायच्या आधी लग्न फाटलं" यातला कार्यकारणभाव मला फारसा समजला नाही. शिवाय हे वाईट झालं का चांगलं झालं, याबद्दल प्रतिसादकर्त्याचं मतही समजलं नाही.
समाजाचा किंवा इतर काही दबावापोटी न झेपणारी लग्न रेटत राहिलेले लोक पाहिले की काही लग्न वेळेत मोडली याचा मला आनंद होतो. दोघांनाही आपापलं आयुष्य वेळेत सुरू करता येतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तै मोबइलहुन लिहीता येत नाही. सोमवारी प्रतिसाद देतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ज्या स्त्रिया विचारांनी मुक्त नाहीत, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नाहीत, त्यांनी स्वतःच्या आणि भविष्यात होतील त्या अपत्यांच्या उदरनिर्वाहाचा विचार करणं हे नैसर्गिक असणं उत्क्रांतीने सिद्ध केलं आहे. त्यातही आश्चर्य वाटत नाही.

स्वार्थीपणा उत्क्रांतीने सिद्ध झाला तर तो पुरुषांच्या बाजूनेही सिद्ध करता येणं शक्य आहे, आश्चर्य न वाटणे ठीक आहे पण त्याचे समर्थन करताना पुरुषांच्या काही वागण्यावर आक्षेप घेणं अवघड होऊ शकतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वार्थीपणा उत्क्रांतीने सिद्ध झाला तर तो पुरुषांच्या बाजूनेही सिद्ध करता येणं शक्य आहे, आश्चर्य न वाटणे ठीक आहे पण त्याचे समर्थन करताना पुरुषांच्या काही वागण्यावर आक्षेप घेणं अवघड होऊ शकतं.

मार्मिक अन नेमके!!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मलाही मुद्दा समजला नाही. स्वतः आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ पाहणाऱ्या स्त्रियांनी peer marriage (मराठी शब्द?) करण्याचा प्रयत्न केला तर त्यात काय चुकलं?
मुद्दा समजुन घ्यायचा असतो काय?
peer marriage मध्ये काहीही चुकिचं नाही. पण हा मुद्दा आला कुठुन ? किति टक्के भारतीयांनी peer marriageस केलेली आहेत? कायम मुद्दा सोडुनच चर्चा अपेक्षित आहे का?

लिंगभेद खूप कमी असणाऱ्या समाजातली बहुतांशी लग्न peer marriage असतात; सगळ्या समाजांमधे, अमेरिका आणि अगदी भारत, चीनमधेही यांचं प्रमाण वाढतं आहे.
किति टक्के भारतीयांनी peer marriageस केलेली आहेत? माझ्या ओळखीचपण कुणी नाही?
"अगदी भारत, चीनमधेही" हे वाक्य "वडापाव पुण्यात काय अगदी पिंपरी-चिंचवड्ला ही मिळतो" असं भासतं. अमेरिकेत सोडा पण चिन मध्ये हॉटेलच्या बाहेर निघाल्या-निघाल्या, मिसि-मसाज, मिसि-मसाज करत मुली जवळ येतात, त्या सेक्स वर्कर पण असतात . भारतात अजुन ही संस्क्रुती यायला बराच वेळ आहे. अगदी पुढायल्या पुण्या-मुंबई ला पण वेश्या वस्तीत काय अवस्था आहे याची माहीति ठेवावी. कॉन्टेक्ट सोडुन चर्चा.

ज्या स्त्रिया विचारांनी मुक्त नाहीत, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नाहीत, त्यांनी स्वतःच्या आणि भविष्यात होतील त्या अपत्यांच्या उदरनिर्वाहाचा विचार करणं हे नैसर्गिक असणं उत्क्रांतीने सिद्ध केलं आहे. त्यातही आश्चर्य वाटत नाही.
आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नाहीत त्यांनी उदरनिर्वाहासाठी फायनॅशियल सेक्युरीटी चा विचार केल्यास हरकत नाही पण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणार्या फायनॅशियल सेक्युरीटी बघत नाहीत असं आपलं मत आहे का? याला दुट्ट्पीपणा म्हणावं का? (पुरुष दुट्ट्पी असतात हे मान्य करुन)
पुरुष उत्क्रांत झाले नाहीत काय?

मला आश्चर्य वाटतं ते बायकोला नोकरी करू न देणाऱ्या पुरुषांचं. या पुरुषांना (आणि इतरही अनेकांना) पीअर मॅरेज नको असतं; बायको करियर, पगार यात पुढे गेलेली चालत नाही. आणि पुन्हा बायका घरी कशा त्रास देतात, दारू पिऊ देत नाहीत, बॅचलरचं आयुष्य सुखाचं होतं वगैरे तक्रारीही दिसतात. (माझ्या परिसरात ऐकलेल्या आहेत. Hen-pecked husband वगैरे शब्दप्रयोग आजचे नाहीत. लग्न करून फसलो, वगैरे म्हणणारे हिंदी चित्रपटही निघतात आणि भरपूर गल्ला कमावतात.)

नोकरी करू न देणाऱ्या पुरुषांना पीअर मॅरेज नको असतं हे कश्यावरुन सिध्द झालं? पगार यात पुढे गेलेली चालत नाही तर किती स्त्रिया आपल्या पेक्षा कमी पगार आसणार्या पुरुषांना वरतात? भारतात स्त्रिया peer marriage साठी तयार असतात काय?
नवर्याने दारु पिल्यास तो दारुडा आणि तिच दारु स्त्रियांनी पिल्यास त्या Wow! look at her how 'मुक्त ' she is ? हा रेडिक्युलस फेमिनिझम नाही का?

पुरोगामी विचार ठेवुन पुरुषांनी स्त्रीवादी बायको केली तर काही दिवसांनी ती अर्धवट/रेडिक्युलस फेमिनिस्ट असण्याची शक्यता नाकारता येत नाही परिणामी हनिमुन साठी नवीन घेतलेली अंतवस्त्र फाटायच्या आधी लग्न फाटणे हे काही नविन नाही आजकाल.
या वाक्याचा अर्थ इडीयॉटिक/रेडिक्युलस फेंमिनिस्ट,
"स्त्रीवादी बायको केली तर हनिमुन साठी नवीन घेतलेली अंतवस्त्र फाटायच्या आधी लग्न फाटलं" हा असा लावतात Smile
त्यांना कायम कॉन्टेक्ट सोडुन चर्चा अपेक्षित असते. लग्न मोड्ण्याचा यांना आसुरी आनंद होतो पण लग्न मोडल्यावर पुढे काय हे त्यांना सांगता येत नाही. मग एकाकीपणा घालवायला, निव्वळ रडायसाठी, झोपेसाठी ह्या सायकोलॉजिस्ट कडे एका सेशन चे रु ५००/१००० मोजातात.

समाजाचा किंवा इतर काही दबावापोटी न झेपणारी लग्न रेटत राहिलेले लोक पाहिले की काही लग्न वेळेत मोडली याचा मला आनंद होतो. दोघांनाही आपापलं आयुष्य वेळेत सुरू करता येतं.
राष्ट्रसंत तु़कडोजीनीं नवरा-बायको ला "भिन्न स्वभावाचे प्राणी" म्ह्ण्ट्ल्या प्रमाणे एकत्र आल्यावर मतभेद होणारच.
न झेपणारी लग्न रेटु नये पण विचार करुन लग्नं करावीत आणी थातुरमातुर कारणांसाठी तरी निदान मोडु नये. अगदी ६ महिन्यात मोडु नये, थोडी वेळ द्यावी.
"आयुष्य वेळेत सुरू करता येतं" या वाक्यावर जरा चिंतन सॉरी इन्ट्रोस्पेक्ट करा.

अर्धवट/रेडिक्युलस फेमिनिस्ट, भुक्कड व्यक्तीस्वातंत्रवादी लोकांना जागतीक स्त्रिंयाचे प्रोब्लेम्स ची उत्तरे/सोल्युशन ही उत्कांती, लैगिकता आणी व्यक्तीस्वातंत्र या तीन शब्दांपासुन तयार केलेल्या (संस्क्रुती सापेक्ष नव्हे)'ग्लोबल' समीकरानांमध्ये सापडले असं वाटतं.

स्त्रिवादी कार्यकर्त्यांबद्दल मला प्रचंड आदर असुन दर १५ दिवसांत मी अश्या काहींना भेटतो, त्याच्याबद्दल वाचतो. त्या उत्कांती, लैगिकता आणी व्यक्तीस्वातंत्र च्या समीकरणांबद्दल बद्दल क्वचितच बोलतात कारण त्या "बुद्धी आणि वाणी"विलासरुपी वांझत्वाच्या पुढे गेलेल्या आहेत. सुनीता क्रिष्नन , रेणुताई गावस्कर
या स्त्रिवाद्याच्या पायाचं पाणी तिर्थ म्हणुन घ्यायला पण तयार होउ.

The things you own, end up owning you one-day. हे वाक्याबद्दल आपणास काय वाटतं?
रॅडीकल/अर्धवट/रेडिक्युलस/ भुक्कड व्यक्तीस्वातंत्रवादी लोकांबद्दल वाचायचं/बघायचं असल्यास दुवा१ / दुवा२

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही मुद्द्यांशी सहमत आहे.

===
अवांतरः१,२
स्त्रीवाद्यांशी भांडायला बॅटमॅन यांना 'सिफर' यांच्या रूपाने खंदा साथी मिळालेला दिसतोय. तरी सिफर यांनी आपला आयडी बदलून 'रॉबिन' हा आयडी घ्यावा ही विनंती.

१. विरोधी पक्षनेते आणि आमचे स्फूर्तिस्थान 'न'वी बाजू यांना स्मरून.
२. आणि अवांतर विरोधी राजेश घासकडवी यांची माफी मागून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

फेमिनिस्टांनी जोकर आयडी नावाचा घ्यावा. Wink
डार्क नाइट मधिल रेडिक्युलस जोकरचं एक वाक्य आठवलं,

I'm a dog chasing cars. I wouldn't know what to do with one if I caught it! You know, I just... *do* things. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा हा, अगदी अगदी Wink

त्याच जोकराचा ड्वायलॉक आठवला: "डू आय लुक लैक अ गाय विथ अ प्लॅन????" Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

डू आय लुक लैक अ 'गाय' विथ अ प्लॅन?

ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मराठी गाय म्ह. गरीब इ.इ.इ. असेल हो Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आम्ही मारक्या म्हशीच जास्ती बघीतल्या आहेत Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा हा Wink किती तो रेसिझम WinkROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्या उत्कांती, लैगिकता आणी व्यक्तीस्वातंत्र च्या समीकरणांबद्दल बद्दल क्वचितच बोलतात

उत्क्रांतीविषयी न बोलणं ही स्त्रीवादाची कमतरता आहे असं मी मानतो. किंबहुना स्त्री ही स्त्री का झाली, स्त्री-पुरुष यांच्या विचारसरणीत नैसर्गिक फरक काय आहेत याचा पुरेसा विचार न करता निव्वळ 'स्त्रीची सद्यस्थिती पुरुषप्रधान संस्कृतीमुळेच्च झाली आहे, आणि समानता म्हणजे सग्गळं सग्गळं समान असलं पाहिजे' ही टोकाची मांडणी येऊ शकते. ही एकांगी मांडणी सोडून अधिक स्पष्ट चित्र मिळवण्यासाठी उत्क्रांतीचा विचार होणं आवश्यक आहे. भारतीय स्त्रीवादाच्या मांडणीत तो पुरेसा झालेला नाही असं माझं निरीक्षण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अर्थात विचार आवश्यक आहे पण उत्क्रांतीत स्त्री-पुरुष दोघांचाही विचार करणे गरजेचे आहे, एककल्ली नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा मुद्दा असा आहे की उत्क्रांतीशिवायची, केवळ सामाजिक कारणांवर आधारलेली मांडणी ही एककल्ली ठरताना दिसते. स्त्री-पुरुष वेगळेपण केवळ जननेंद्रियात, बाकी सब झूट असा टोकाचा विचार होऊ शकतो. उत्क्रांतीतून आलेल्या मेट सिलेक्शन स्ट्रॅटेजीजचा विचार केला तर स्त्री-पुरुष काही वागणुकी, प्रवृत्ती इत्यादीमध्ये वेगळे कसे व का असतात याचा अर्थ लावता येतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी संपूर्ण धागा वाचलेला नाही, फक्त या मुद्द्याबद्दल थोडासा खुलासा: नेचर पेक्षा नर्चर/कल्चर वर स्त्रीवाद भर देत आला आहे हे खरंय. आता कटिंग एज जेनेटिक्स किंवा उत्क्रांतीवरच्या जीवशास्त्रीय संशोधनाचा मला तेवढा परिचय नाही, पण स्त्रीवादाचा उदय झाला तेव्हा स्त्रियांच्या मूळ स्वभावाबद्दल, स्त्री-पुरुष विषमतेबद्दल, इव्हन वैदिक शास्त्रात, संशोधनात स्त्रियांच्या प्रवृत्तींबद्दल, एकूण लिंगभेदावर जे "जीवशास्त्रीय" तर्क मांडले जायचे, ते देखील बर्‍याच प्रमाणात सामाजिक-सांस्कृतिक पूर्वग्रहांतून, धार्मिक, पितृसत्त्ताक विचारांवद आधारित होते. यावर अनेक ज्ञानशाखांच्या इतिहासावरच्या संशोधनाने तपशीलवार मांडले आहे. या पूर्वग्रहांचा उलगडा करण्याचे श्रेय आरंभीच्या स्त्रीवादी इतिहासालाच जाते. (तसाच, वैद्यकीय, जीवशास्त्रीय, मानववंशशास्त्रात श्वेतेतर, युरोपेतर लोकांबद्दल च्या पूर्वग्रहांचा उलगडा वसाहतोत्तर इतिहासकारांनी केला.) न्यायव्यवस्थेत, एकूण सामाजिक तत्त्वे बांधण्यात, मांडण्यात अशा "सामाजिक कारणांचा" हात असला तरी वैज्ञानिक, जीवशास्त्रीय (म्हणजे अपरिहार्य, नैसर्गिक गुणांच्या) वस्तुनिष्ठ भाषेत त्यांना सजवले जाते असा स्त्रीवादाचा मुद्दा राहिला आहे.

यात विशिष्ट जीवशास्त्रीय प्रश्नांना, खासकरून नवीन शोधांना, सामोरं जाणं जमलं नसेल ही. पण स्त्रियांना (तसेच पुरुषांनाही) ठराविक कामांत आणि सामाजिक दर्ज्यात अडकवून ठेवण्यासाठी उत्क्रांतीची "नैसर्गिक" भाषा बहुकाळापासून वापरली गेली आहे, अजूनही जाते. पिंकी प्रामाणिक ही व्यक्ती बलात्कार करू शकते की नाही याचा निकाल तिच्या स्त्री अथवा पुरुष असण्यावर बेतलं गेलं. ती "पुरुषी" आहे, खेळाडू आहे, म्हणजे खरी स्त्री आहे का पुरुष आहे याची वैद्यकीय चाचणी झाली (जिचा विडियो चाचणीकारानेच पब्लिक केला). क्रोमोसोमल लेवेल वर देखील लिंगभेद स्पष्ट न झाल्यावर स्त्री बलात्कार करूच शकत नाही अशा "वैज्ञानिक" निष्कर्षावर तिच्याच वकिलांनी बलात्काराच्या आरोपाचा सामना केला! आणि तिचं हे "स्त्रीत्व" सगळ्या पेपरांमधून कसं दर्शवलं गेलं? घरी आईबरोबर तिला स्वयपांक करताना तिचा फोटो छापला! झालं तर - स्वयंपाकाच्या आवडीइतका वस्तुनिष्ठ आणि नैसर्गिक पुरावा काय असू शकतो? कास्टर सेमेन्या ची केस ही प्रसिद्ध आहे.

मुद्दा एवढाच, की टोकाची वाटत असलेली "सांस्कृतिक/सामाजिक" पक्षाची भूमिका कुठल्या इतिहासातून तयार झाली आहे, हे ही लक्षात घ्यायला हवं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकंदर प्रतिसादाबद्दल मत नाही.

>>न झेपणारी लग्न रेटु नये पण विचार करुन लग्नं करावीत आणी थातुरमातुर कारणांसाठी तरी निदान मोडु नये. अगदी ६ महिन्यात मोडु नये, थोडी वेळ द्यावी.

स्त्रिया लग्न मोडतात ह्यावर काही विदा आहे काय? अन्यथा वडा-पावच्याच धर्तीवर हे वाक्य खपेल काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"भिन्न स्वभावाचे प्राणी" हे दोघांसाठी आहे पण एकंदरीतच लग्न मोडण्याच प्रमाण थातुरमातुर कारणांसाठी वाढत आहे. त्याचा विदा मिळु शकेल.
आम्ही कोणत्याही कारणाने लग्न मोडु अस असेले तरीही दुसरं लग्न भारतात तरी फार सोप्प नाहीये खास करुन स्त्रियांसाठी, परत लग्न मोडल्यामुळे दारु च्या आहारी जाणे, डीप्रेस होउन आत्महत्या करणारे पुरुष स्त्रियांपेक्षा तिप्पटीने जास्ती आहेत. (विदा)
माद्यांना पिल्लांची काळजी घ्यावी लागते म्हणुन असेल कदाचित पण पुरुषांसारखं भरकटण्याचे एकुणच प्रमाण कमी आहे.
नियम स्त्रियांकडे झुकते माप घेनारे जास्ती आहेत ,खोट्या कौंटुंबीक हींसा च्या केसेस (section 498A) पण वाढत आहेत, कुणी आपल्यावर खोटी section 498A लादु नये म्हणुन पण काही पुरुष भिती पोटी लग्नं टिकवायची इच्छा असुन देखिल लवकर मोडायला भाग पडतात, कुणी विवाह समुपदेशक/वकील/माहीतीगार असल्यास थोडी भर घाला.

या दोघांबद्दल काही नाही पण दुसर्या लग्नांमुळे किंवा सिंगल पॅरेंट मुळे मुलांची होणारी आबाळ, मुली वडील नसल्यामुळे पुरषी मायेचा ओलावा शोघत असतात परीणामी लहानपणी लैंगिक शोषणाच्या बळी पण होण्याची शक्यता वाढते त्यामूळे होनारे मानसिक मानसिक परिणाम जे अ‍ॅड्ल्ट स्टेज मध्ये/लग्न झाल्यावर दिसुन येतात ते भिषण आहेत. बरेचदा औषधोपचारांने ठिक पण होत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मग काय करायचं म्हणता? लग्न होता होईतो टिकवायची, असं?

लग्नात आर्थिक, मानसिक, सामाजिक गुंतवणूक पुष्कळ असते. त्यामुळे तितकं असह्य झाल्याशिवाय लग्न मोडायला लोक सहसा तयार होत नाहीत असं दिसतं. (कधीकधी तर बाहेरून पाहणार्‍याला असंही वाटतं, की एकत्र राहण्याच्या अट्टाहासापायी ही दोन माणसं स्वतःचाच किती छळ करून घेताहेत, त्याहून वेगळं का होत नाहीत?)तरीही भले भले लोक लग्न मोडायला बिचकतात. लग्न मोडण्यात पुष्कळच गैरसोय होत असावी.

असं असताना मोडणार्‍या लग्नांची संख्या वाढत असेल, तर त्यातून लग्नसंस्थेतला एखादा अन्यायकारक भाग मोडून पडतो आहे असंच मानलं पाहिजे. ज्यांना लग्नं मोडल्यामुळे होणारे त्रास टाळायचे आहेत, त्यांनी तडजोडी कराव्यात (वेगळ्या शब्दांत सांगायचं, तर इतकी वर्षं गृहीत धरलेले हक्क आणि सोईस्कर विभागण्या सोडून द्यायला तयार राहावं) आणि टिकवावीत लग्नं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मुळात लग्न ही गोष्ट इतकी किचकट, कुटुंबसापेक्ष, त्या दोन व्यक्तींसापेक्ष अशी काहीतरी आहे; की त्यावर एकत्रित चर्चा करणेच काय कमेंट देणेही चूक ठरावे.
हल्ली कह्रं तर सगळ्याच चर्चांबाबत असच वाटत.
चर्चा करण्यात काहिच तथ्य नाही असं वआटतं.
पण आपल्याला तसं वाटतं हे ही कुणाला तरी आवर्जून सांगावं वाटतं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

असं असताना मोडणार्‍या लग्नांची संख्या वाढत असेल, तर त्यातून लग्नसंस्थेतला एखादा अन्यायकारक भाग मोडून पडतो आहे असंच मानलं पाहिजे.

लोक एखादी कंपनी धडाधडा सोडत आहेत, तर त्यातून कंपनीतला एखादा अन्यायकारक भाग मोडून पडतो आहे असंच मानलं पाहिजे असं काही नाही. लोकांची संन्यास घेण्याची प्रवृत्तीही वाढलेली असू शकते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बरोबर. मुळात लोक महत्त्वाचे आहेत याबद्दल दुमत आहे का? लोकांना नको वाटतेय कंपनी, तर गेली खड्ड्यात. बिघडलं कुठे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

समजा एक रहदारीसंस्था आहे, ती लोकांना रस्त्यावर नीट चालायला, वागायला, चालवायला बाध्य करते, प्रेरणा देते, इ इ. लोक ही संस्था धडाधडा सोडत आहेत तेव्हा ती खड्ड्यात जाऊ द्या म्हणणे बरोबर आहे का? लोकांना आवडो नावडो, काही गोष्टी त्यांच्यासाठी इष्ट असू शकतात. एखादी गोष्ट इष्ट नाही हे "स्वतंत्रपणे" सिद्ध झाले तर ती सोडणे चांगले म्हणू. पण एखादी गोष्ट सोडली जात आहे म्हणून ती अनिष्ट आहे हा "पर्याप्त" वाद होऊ शकत नाही. थोडक्यात, मोकाट सोडले तर लोक कसेही वागतात, वागू शकतात. म्हणून कोणती व्यवस्था कशी असावी हे ठरवायचे असेल तर "त्यांची आवड नावड" हा मुद्दा प्रथम/प्रधान नसावा. इष्ट व्यवस्थेमधे बर्‍याच नावडणार्‍या गोष्ह्टी असू शकतात. मुलांनी शाळेत जाणे, नवर्‍याने ऑफिसात जाणे आणि बायकोने भांडी धुणे हे या तिघांनाही सहसा आवडत नाही, पण ते त्यांना इष्ट असावे म्हणून व्यवस्था त्यांच्याकडून ते करवून घेते. आता या सर्वांनी हे करणे सोडून दिले आणि एका पर्यायी व्यवस्थेचा आसरा घेतला. आता ज्यांना या दोन्ही व्यवस्थांबद्दल काही मत नाही त्यांना दोन्ही व्यवस्थांची प्लस मायनस बाजू कळली पाहिजे. "१० पैकी २ फुलपाखरे क्ष फुलावरून य फुलावर गेली" या वाक्यातून या दोन्ही फुलांची फुलपाखरांसाठीची उपयुक्तता नीटशी कळत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुमची तुलना मुळातच चुकते आहे.

एका व्यक्तीनं लग्नसंस्थेतून बाहेर पडायचं ठरवल्यामुळे त्या व्यक्तीचं आणि तिच्यासोबत स्वखुशीनं त्या करारात शिरलेल्या व्यक्तीचं नुकसान (हेही होतं का हा वादग्रस्त मुद्दा आहे) होतं. याउलट एका व्यक्तीने रहदारीचे नियम मोडायचे ठरवले, तर तिचं आणि तिच्यासोबत कोणताही करार न केलेल्या कितीही व्यक्तींचं नुकसान होतं.

या दोन्हीची तुलना कशी काय शक्य आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

परत लग्न मोडल्यामुळे दारु च्या आहारी जाणे, डीप्रेस होउन आत्महत्या करणारे पुरुष स्त्रियांपेक्षा तिप्पटीने जास्ती आहेत

दुव्यावर आत्महत्येचं कारण(विदा) हेच आहे असं सापडलं नाही, त्यामुळे दुव्यावरील सांख्यकी आणि मोडलेलं लग्न ह्यातील कोरिलेशन तुम्ही मांडलेलं आहे असं म्हणावं लागतं. पुरुष स्पर्धात्मक युगात स्त्रियांच्या मानाने अधिक वावरत असल्याने असंख्य व्यवहारिक कारणे आत्महत्येस प्रवृत्त करु शकतात, त्यात 'मोडलेल्या लग्नाची' टक्केवारी 'अमुकच' आहे असं खात्रीने म्हणण्यासाठी तसा विदा हवा. तुम्ही आसपास(शहरी/निमशहरी)जे बघता त्यावरुन असे निष्कर्ष मांडत आहात काय? कारण मग त्यात इतर कारणांचा समावेश होणं अवघड होईल, जसे शेतकर्‍यांच्या आत्महत्या हे प्रामुख्याने ग्रामीण पुरुषांच्या आत्महत्येचे कारण ठरु शकेल पण त्यावरुन 'पुरुषांबद्दल' निष्कर्ष काढणे गैर ठरेल.

नियम स्त्रियांकडे झुकते माप घेनारे जास्ती आहेत

National Crime Records Bureau reveal that a crime against a woman is committed every three minutes, a woman is raped every 29 minutes, a dowry death occurs every 77 minutes, and one case of cruelty committed by either the husband or relative of the victim occurs every nine minutes.

बरोबर, आणि त्याचे कारण बघता ते असे का हे सहज लक्षात येते आणि ह्या नियमांचे कोलॅटरल डॅमेज असणारच ते प्रत्येकच नियमांचे असते, पण त्याचे प्रमाण हे मुळ कौटुंबिक हिंसेच्या(स्त्रियांबाबत घडणार्‍या) किती प्रमाणात आहे हे तपासले पाहिजे.

या दोघांबद्दल काही नाही पण दुसर्या लग्नांमुळे किंवा सिंगल पॅरेंट मुळे मुलांची होणारी आबाळ, मुली वडील नसल्यामुळे पुरषी मायेचा ओलावा शोघत असतात परीणामी लहानपणी लैंगिक शोषणाच्या बळी पण होण्याची शक्यता वाढते त्यामूळे होनारे मानसिक मानसिक परिणाम जे अ‍ॅड्ल्ट स्टेज मध्ये/लग्न झाल्यावर दिसुन येतात ते भिषण आहेत. बरेचदा औषधोपचारांने ठिक पण होत नाही.

ह्यासाठी दोघेजणही जबाबदार आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उर्वरित र्‍याण्ट सोडून देऊ, पण...

अमेरिकेत सोडा पण चिन मध्ये हॉटेलच्या बाहेर निघाल्या-निघाल्या, मिसि-मसाज, मिसि-मसाज करत मुली जवळ येतात, त्या सेक्स वर्कर पण असतात . भारतात अजुन ही संस्क्रुती यायला बराच वेळ आहे.

अमेरिकेत आजवर दोन दशकांहून अधिक काळ राहिलो, तर्‍हेतर्‍हेची हॉटेलेही करून झाली (मोटेल सिक्सापासून ते एम्बसी स्वीट्सापर्यंत; कधी स्वतःच्या पैशांनी, कधी कंपनीच्या, तर कधी क्लायण्टाच्या), पण आजवर असा अनुभव कधी मिळाला नाही बुवा!

नेमक्या कोठल्या अमेरिकेबद्दल आपण बोलत आहा? युनायटेड स्टेट्सच का? कारण, मी ज्या अमेरिकेत राहिलोय, त्यात कोठेही कोठल्याही कोपर्‍यात क्वचितसुद्धा असे कधी घडतच नाही, असे जरी छातीठोकपणे म्हणू शकत नसलो, तरी हा नॉर्म निश्चितच नाही. (चीनबद्दल कल्पना नाही.)

आणि, समजा अमेरिकेत कोठेतरी कोठल्यातरी कोपर्‍यात कोठल्यातरी हॉटेलासमोर असे घडते, असे जरी मानले, तरी नेमकी अशीच हॉटेले आपल्या वाट्यास कशी येतात बुवा (जी आमच्या वाट्यास चुकूनही कधी येत नाहीत)? आय मीन, व्हॉट्स युअर फॉर्म्युला / विनिङ्ग ष्ट्र्याटेजी / द सीक्रेट ऑफ युअर सक्सेस?

('परमेश्वर केवळ भक्तांनाच दर्शन देतो' / 'खर्‍या भक्तांना परमेश्वरास शोधत जावे लागत नाही; परमेश्वरच त्यांच्या मागेमागे येतो' / 'शोधा, म्हणजे सापडेल' (रादर, शोधल्याशिवाय सापडणार नाही) अशातला काही प्रकार आहे काय?)
------------------------------------------------------------------------------------------------

ते काय म्हणतात ना, की 'अ‍ॅब्सेन्स ऑफ प्रूफ डझ नॉट इम्प्लाय प्रूफ ऑफ अ‍ॅब्सेन्स'. बोले तो, आजवरच्या अठ्ठेचाळीस वर्षांच्या आयुष्यात माझी आणि परमेश्वराची समोरासमोर गाठभेट कधीही जरी झालेली नसली, तरी ज्या विश्वात मी राहिलोय, त्या विश्वाच्या कोठल्याही कानाकोपर्‍यात क्वचितसुद्धा परमेश्वर अस्तित्वात नाहीच, असे ज्याप्रमाणे मी छातीठोकपणे सांगू शकत नाही, त्याचप्रमाणे.

म्हणजे, विश्वाच्या कोठल्यातरी कोपर्‍यात कोठेतरी परमेश्वर असू शकेल, असे मानता येण्यास हरकत नसावी, त्याचप्रमाणे.

'पुंडलिकाभेटी परब्रह्म आले'३अ, 'मुहम्मद जर पर्वताकडे गेला नाही, तर पर्वतास मुहम्मदाकडे यावे लागेल' वगैरे पौराणिक / कौराणिक दाखल्यांस अनुसरून.

३अ हे श्री. पुंडलिक आणि परब्रह्म३ब जे कोणी असतील ते.

३ब पुंडलिक हे पुरुष असावेत, असे मानावयास जागा असल्याकारणाने त्यांच्यामागे 'श्री.' असा उपसर्ग लावणे सोपे गेले. परब्रह्म हे उघडउघड नपुंसकलिंगी३क असल्याकारणाने त्यांच्यामागे नेमके काय लावावे, याचा निर्णय अथक प्रयत्नांतीदेखील होऊ न शकल्याने पंचाईत झाली. मराठीत पुरुषांस संबोधण्याकरिता 'श्री.' असा उपसर्ग उपलब्ध आहे. स्त्रियांस संबोधण्याकरिता 'श्रीमती' असा उपसर्ग उपलब्ध आहे; शिवाय इतरही अनेक उपसर्ग उपलब्ध आहेत, जे वैवाहिकस्थितिनिदर्शक असल्याकारणाने, ते वापरणे आजकाल फारसे प्रशस्त समजले जात नाही. (जे ठीकच आहे; केवळ, (१) असे उपसर्ग उपलब्ध आहेत, आणि (२) असे उपसर्गही उपलब्ध आहेत, हेही नसे थोडके, एवढेच मांडण्यापुरता त्यांचा हा ओझरता उल्लेख. असो.) मात्र, नपुंसकलिंगी एंटिटींस संबोधण्याकरिता असा कोणताही उपसर्ग आजतागायत अस्तित्वात नाही, ही सरासर नाइन्साफ़ी आहे. ऐसीचे संपादकमंडळ३ड (आणि/किंवा संबंधित अधिकारी) डुलक्या काढावयाचे३ई सोडून देऊन या समस्येकडे त्वरित लक्ष देऊ शकतील काय?

३क किमानपक्षी व्याकरणदृष्ट्या तरी (पहा: 'ते परब्रह्म' किंवा 'परब्रह्म आले'.); परब्रह्माची आणि आमची कधी गाठभेट न झाल्याने, प्रत्यक्ष लिंगनिदान करता येऊ शकलेले नाही. कदाचित श्री. पुंडलिक (वरील ३अ पहावे.) याबाबत काही खुलासा करू शकतील, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

३ड वस्तुतः, 'ऐसी'च्या संपादकमंडळाचा या समस्येशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही, याची आम्हांस नम्र जाणीव आहे. मात्र, या निमित्ताने यासंंबंधीच्या आमच्या एका पूर्वप्रकाशित मतास उजाळा देऊन३फ त्याकडे लक्ष वेधू इच्छितो.

...जनतेच्या कोणत्याही बाबतीत मत किंवा अपेक्षा असण्याचा आणि किमानपक्षी ते व्यक्त करावेसे वाटण्याच्या गरजेचा आदर करणार्‍या कोणत्याही समाजव्यवस्थेत सहसा "वाचकांच्या पत्रव्यवहारा"ची एक परंपरा असते. रूढीप्रमाणे अशी "वाचकांची पत्रे" ही संपादकास उद्देशून लिहिली जावीत असा संकेत आहे. या "वाचकांच्या पत्रव्यवहारा"त व्यक्त केलेली मते अथवा अपेक्षा या नेहमीच रास्त असतात असे नाही. तसेच रास्त असल्याससुद्धा त्यातील बाबी या नेहमीच संपादकांच्या कार्यकक्षेत असतातच, असेही नाही. अनेकदा त्यात मध्यपूर्वेतील परिस्थिती किंवा भारताचे पडखाऊ परराष्ट्रीय धोरण यांवरील टीका किंवा कोठल्यातरी गल्लीतील फुटलेल्या पाण्याच्या नळामुळे नागरिकांना होणार्‍या त्रासाच्या समस्येकडे त्वरित लक्ष दिले जाण्याबद्दलची अपेक्षा अंतर्भूत असते. आणि मध्यपूर्वेतील परिस्थितीबद्दल अथवा भारताच्या पडखाऊ परराष्ट्रीय धोरणाबद्दल संपादकास वैयक्तिकरीत्या जबाबदार धरणे अथवा फुटलेल्या नळाच्या समस्येकडे त्वरित लक्ष दिले जाण्याची अपेक्षा वैयक्तिकरीत्या संपादकाकडून करणे हे कोणत्याही निकषाने तर्कसुसंगत नसले, तरी अशी पत्रे ही प्रसिद्धीकरिता संपादकासच उद्देशून लिहिली जावीत, ही सर्वमान्य परंपरागत प्रथा आहे. किंबहुना अशा पत्रांचे नाममात्र उत्तरदायित्व हे संपादकपदाबरोबर आपोआपच येते, असे म्हणता येईल.

('पर्स्पेक्टिव' या आयडीखाली अन्यत्र पूर्वप्रकाशित.)

३ई 'उपसंपादकाच्या डुलक्यां'बद्दल ऐकलेले आहे. कोणताही संपादक हा (वशिल्याने डायरेक्ट लागलेला असल्याखेरीज) कधी ना कधी उपसंपादक होऊन गेलेला असणारच, असा सामान्य तर्क. जुन्या सवयी सहजासहजी (तसेच जित्याच्या खोडी मेल्याखेरीज) जात नाहीत, हेही सर्वश्रुत आहे. 'ऐसी'च्या संपादकमंडळात (व्याख्येनेच) संपादक आहेत. एर्गो, ऐसीचे संपादकमंडळ झोपा काढते, हे सहजसिद्ध आहे. (सॉक्रेटिस मर्त्य आहे, आणि सॉक्रेटिस हा मानव आहे, सबब मानव हा मर्त्य असलाच पाहिजे, या न्यायाने. बट द्याट्स अ डिस्कशन फॉर अनदर डे.)

३फ इंग्रजीत या प्रक्रियेस regurgitation असे संबोधण्यात येते. मराठीत याकरिता 'शिळ्या कढीला ऊत'पासून ते 'दावू गाउनि आमुच्याच कविता आम्हींच रस्त्यामध्ये'३गपर्यंत वाटेल ते पर्याय सुचतात.

३ग यातील 'कविते'चा अर्थ 'शिमग्यानंतरच्या कवित्वा'मधील 'कवित्वा'प्रमाणे घ्यावा. (बोले तो, वाच्यार्थ घेऊ नये, एवढेच सांगायचे आहे.) अन्यथा, ही 'कविता' नव्हे, याची आम्हांस नम्र जाणीव आहे, इ.इ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमेरिकेत सोडा पण चिन मध्ये हॉटेलच्या बाहेर निघाल्या-निघाल्या, मिसि-मसाज, मिसि-मसाज करत मुली जवळ येतात, त्या सेक्स वर्कर पण असतात . भारतात अजुन ही संस्क्रुती यायला बराच वेळ आहे.

अमेरिका बद्दल सांगता येणार नाही पण चीन मध्ये तरी हॉटेल Shangri-La पुढे असतात.
पण सांगयचा मुद्दा एवढाच की बाकी ठिकाणी सेक्स वर्कर्स थोडफार का होइना पण मानाचं स्थान आहे अजुन भारतात नाही. भारतात त्यांना नविन आयुष्य सुरु करायचं तर सोडा पण आपली नविन पिढी या धंद्यात पडु नये (हमाली केली तरी चालते) हेच एकमेव स्वप्न मायांच असतं (बापांच नसतं, बाप कोण हे बरेचदा माहीती असत ते कुठ्लीही जवाबदारी घेत नाहीत) आणी तेही पुर्ण होत नाही.

त्या मुळे जसे अमेरीकी रिटेलचे, सेफ्टी चे नियम भारतात काम करीत नाहीत तसेच उत्कांती, लैगिकता आणी व्यक्तीस्वातंत्र हे पण अमेरिकन नियम जसेच्यातेसे भारतात लावु नयेत (संस्क्रुती सापेक्षता पाळावी) हेच सुचवायचे होते.

द सीक्रेट ऑफ युअर सक्सेस?
अजुन तरी हा पुंडलिक कुठ्ल्याही सेक्स वर्कर शी माई-ताई शिवाय बोलला नाही. म्हणुनच जरा मागे आहे Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्कांती, लैगिकता आणी व्यक्तीस्वातंत्र हे पण अमेरिकन नियम जसेच्यातेसे भारतात लावु नयेत (संस्क्रुती सापेक्षता पाळावी) हेच सुचवायचे होते

तुर्तास असहमती व्यक्त करतो.
एकतर या कल्पना नाहीत, लैंगिकता ही 'असते' जगाच्या प्रत्येक कोपर्‍यात, व्यक्ती असतो व त्याला त्याच्यापुरत्या निवडीचे स्वांतंत्र्य असावे असे म्हणण्यात आम्रिकन काय आहे? तेव्हा हे आम्रिकन वगैरे नाहितच. आणि दुसरे जरी असा समज असेल, तरी निव्वळ बाहेरचे आहे म्हणून जसे स्वीकारण्यात अर्थ नाही तसेच ते केवळ बाहेरचे आहे म्हणून नाकारायचे लॉजिकही तितकेच अगम्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> उत्कांती, लैगिकता आणी व्यक्तीस्वातंत्र हे पण अमेरिकन नियम जसेच्यातेसे भारतात लावु नयेत (संस्क्रुती सापेक्षता पाळावी) हेच सुचवायचे होते

लैंगिकता ही गोष्ट विज्ञानाच्या कक्षेतही येते. वैज्ञानिक संशोधनातून लैंगिकतेविषयी वैश्विक सत्यं सापडली, तर तीदेखील संस्कृतीसापेक्षतेच्या मुद्द्यावर रद्दबातल ठरवावी असं तुम्हाला अभिप्रेत नसावं. स्पष्टीकरणाच्या प्रतीक्षेत.

शिवाय, peer marriageबद्दलच्या पृच्छेबद्दल स्पष्टीकरणाच्या प्रतीक्षेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

लैंगिकता ही गोष्ट विज्ञानाच्या कक्षेतही येते. वैज्ञानिक संशोधनातून लैंगिकतेविषयी वैश्विक सत्यं सापडली, तर तीदेखील संस्कृतीसापेक्षतेच्या मुद्द्यावर रद्दबातल ठरवावी असं तुम्हाला अभिप्रेत नसावं.

पुर्णपणे नाही पण काहीअर्थी अभिप्रेत आहे कारण मुळात यांची उत्तरं बायनरी नसतात.
जरी लैंगिकता ही विज्ञानाच्या कक्षेत आली तरीही गणितीय सिध्द्दांता प्रमाणे ते अखिल माणवजातीसाठी लावता येत नाही. मानव हे पॉलिगॉमस प्रजाती असली तरीही भारतात आणी काही इतर ठिकाणी सुद्धा लग्न करतांना मॉनोगॉमी ही ठेवाविच लागले आणी परत लैंगिकतेविषयी एडिपस इलेक्ट्रा कॉप्लेक्स सारखे गुण नॅचरल असुन कॉप्लेक्स(गंड) नाही अशी वैश्विक सत्ये सापडली तरीही व्यक्तीस्वातंत्राच्या नावावर मुलाचं आईशी आणी वडिलांच मुलीशी लग्न करुन देणे हे मान्य करु देता येणार नाहीत.
नियम हे संस्कृतीसापेक्ष नसतात असं म्हणायचये का तुम्हाला?
ज्या ठिकाणी, वातावरणात, धर्मात, जातीत जन्माला येतो त्यांचे काही जनुक असतात म्हणतात शरीरामध्ये, उत्क्रातीत पण सापडते हे मग यांना किती वैश्विक म्हणावं ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> नियम हे संस्कृतीसापेक्ष नसतात असं म्हणायचये का तुम्हाला?
ज्या ठिकाणी, वातावरणात, धर्मात, जातीत जन्माला येतो त्यांचे काही जनुक असतात म्हणतात शरीरामध्ये, उत्क्रातीत पण सापडते हे मग यांना किती वैश्विक म्हणावं ?

एक ताजं उदाहरण. सर्वोच्च न्यायालयानं ३७७ कलमाबद्दलच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला रद्दबातल ठरवलं. त्याविषयी एका निवृत्त न्यायाधीशानं ह्या खुल्या पत्रात असं म्हटलं आहे -

Further, rather than following medical, biological and psychological evidence , which show that homosexuality is a completely natural condition, part of a range not only of human sexuality but of the sexuality of almost every animal species we know, the judgment continues to talk in terms of 'unnatural' acts, even as it says that it would be difficult to list them.

तुमच्या मते समलैंगिकतेला संस्कृतिसापेक्षतेचा मुद्दा लावत अनैसर्गिक मानणं चुकीचं आहे की बरोबर?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तुमच्या मते समलैंगिकतेला संस्कृतिसापेक्षतेचा मुद्दा लावत अनैसर्गिक मानणं चुकीचं आहे की बरोबर?
हे अनैसर्गिक नाही पण नैसर्गिकता प्रुव्ह झाली म्ह्णुन नियम करता येत नाहीत अखिल मानवजातीसाठी सगळीकडे हेच म्हणत होतो.
समलैंगिक विवाह व्हावेत असं मत आहे.

भारतातील सगळे सारखे ही नैसर्गिकता पुढे ठेवुन आरक्षण बंद करता येतील का?
नैसर्गिकता आणी नियम वेगळे असतात, संस्क्रुती सापेक्ष असतात, हेच सांगत होतो.

एडिपस व इलेक्ट्रा कॉप्लेक्स सारखे गुण नॅचरल असुन कॉप्लेक्स(गंड) नाही अशी वैश्विक सत्ये सापडली तरीही व्यक्तीस्वातंत्राच्या नावावर मुलाचं आईशी आणी वडिलांच मुलीशी लग्न करुन देणे हे मान्य करु देता येणार नाहीत.

याबद्द्ल आपल काय मतं कळवलं नाही ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> हे अनैसर्गिक नाही पण नैसर्गिकता प्रुव्ह झाली म्ह्णुन नियम करता येत नाहीत अखिल मानवजातीसाठी सगळीकडे हेच म्हणत होतो.

वाक्याचा अर्थ समजला नाही.
१. समलैंगिकता, गुदमैथुन, मुखमैथुन अनैसर्गिक नाही असं विज्ञान सांगतं.
२. भारतात कायद्यानुसार वर उल्लेखलेली कृत्यं अनैसर्गिक आहेत.
३. तुमच्या म्हणण्यानुसार विज्ञानापेक्षा अधिक वरचढ काही तरी आहे. (संस्कृतिसापेक्षता?) त्यामुळे वैज्ञानिक सत्य सापडूनही कायदा बदलता येत नाही. हे कशाच्या जोरावर ते कळलं नाही.

>>समलैंगिक विवाह व्हावेत असं मत आहे.

असेलही. मी वैज्ञानिक सत्याबद्दल बोलत होतो. समाजात विवाह (भिन्नलिंगी) असावेत हे कोणत्या वैज्ञानिक सत्यावर आधारलेलं आहे का? नसेल तर हा मुद्दा गैरलागू ठरतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

१. बहुसंबंधांबद्दलः

मुळात 'लग्न'नी पॉली/मोनोगॅमीचा थेट संबंध नाही. (संबंध नाहीच असं नाही पण लग्नाचा तो उद्देश नाही - अनेक अपेक्षित परिणामांपैकी एक आहे म्हणा हवंतर)
दुसरं असं की भारतीय संस्कृतीत (सर्व धर्मियांमध्ये) पॉलिगॅमी अत्यंत कॉमन गोष्ट होती, अगदी लग्नसंस्था टिकलेली असूनही. उलट इंग्रजांच्या आगमनानंतर अधिकृतरित्या एकच पत्नी ठेवता येत असली तरी अनधिकृत अंगवस्त्रे तर आता-आतापर्यंत असत - अजुनही असतात. तेव्हा आपली संस्कृती वगैरेंचा आधार घेत काही सिलेक्टिव्ह लोकांना मोनोगॅमस संबंध ठेवायला भाग पाडणे ही दांभिकता झाली हे तर नाकारता येऊ नये?

२.
आई वडीलांचे अपत्यांशी संबंधही भारतात येऊन गेले आहेतच. भारतीय विवाहसंस्थेच्या इतिहासात याचे उल्लेख सापडतील.

तर हे तपशील झाले - यात चुका पुरवण्या संभवतीलही. सांगायच मुद्दा हा की मुळात प्रत्येक गोष्ट एकाच संस्कृतीत कायम सारखी/ठाम राहु शकत नाही. तेव्हा कितीही काळासाठी संस्कृतीसापेक्ष असं काही नसतं. आपणच संस्कृती असतो. काळाप्रमाणे आपण बदललो की संस्कृती बदलते. ५००० वर्षांपूर्वीच्या संस्कृतीत असणार्‍या तथाकथित नियमांनुसार आपण वागत बसायचे नसते इतकेच. नवे नियम/मतप्रवाह कुठून येताहेत यापेक्षा ते किती पटतात त्यानुसार वागावे.

नी अधिकृत कायदे/नियमांचे म्हणशील, तर भारताची संस्कृती म्हणजे असे एक काही आहे असे मला वाटत नाही. प्रत्येक जातींत/धर्मात/प्रान्तात या प्रत्येक प्रश्नावर वेगळी मते आहेत, वेगळे पतप्रवाह आहेत. कायदे नियम बनवतेवेळी शक्य तितका शास्त्रीय आधार घेणे योग्य ठरावे. काही वेळी शास्त्रीय आधार घेतल्याने सामाजिक अहित होत असेल (जसे आईवडील व अपत्य संबंधांमुळे होणारी अपत्यप्राप्ती सदोष असण्याचा धोका वाढतो हे ही वैज्ञानिक सत्यच आहे) तरच ते टाळणे योग्य.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'आपणच संस्कृती असतो.'

पर्फेक्ट.

@संपादक
टाळ्या वाजवणारी स्मायली चालत नाहीय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ऋषिदा, तुस्सी खरंच ग्रेट्ट हो !!!

हायेक ने हेच सांगितले होते. Institutions evolve.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लैंगिकतेविषयी एडिपस व इलेक्ट्रा कॉप्लेक्स सारखे गुण नॅचरल असुन कॉप्लेक्स(गंड) नाही अशी वैश्विक सत्ये

वरील फ्रॉईडियन संकल्पना वैश्विक सत्य म्हणून केव्हाच मागे पडलेल्या आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्त्रीवादी बायको केली तर हनिमुन साठी नवीन घेतलेली अंतवस्त्र फाटायच्या आधी लग्न फाटलं

कदाचित माझ्या 'भारताची प्रगती' या लेखमालिकेत 'आजकालची आंतर्वस्त्रं टिकाऊ असतात, लग्नापेक्षा जास्त काळ टिकतात.' किंवा 'आजकाल दरडोई (दरस्तनी, दरनितंबी किंवा इतरही काही म्हणणार होतो पण नकोच) आंतर्वस्त्रांमध्ये प्रचंड वाढ झालेली असल्यामुळे एक आंतर्वस्त्र खूप कमी वेळा वापरलं जातं. म्हणून ती लग्नापेक्षा अधिक काळ टिकतात' असे युक्तिवाद घेता येतील. Smile

पण गंभीरपणे - बायकोचा स्त्रीवाद बाजूला ठेवला तरी आजकाल घटस्फोटांचं प्रमाण वाढलेलं आहे हे निश्चित. आता याकडे काळजीने बघावं का? कदाचित असंही म्हणता येईल की शंभर वर्षांपूर्वीचा घटस्फोटाचा दर हा पुरेसा नव्हता. म्हणजे त्या काळी लग्नाच्या नात्याचा कितीही त्रास होत असला तरीही त्यातून बाहेर पडणं इतकं त्रासदायक होतं, आणि बाहेर पडल्यानंतरचं आयुष्य इतकं खडतर होतं (विशेषतः स्त्रियांसाठी) की लेसर इव्हल या न्यायाने लग्न टिकवलं जायचं. आता लग्नाबाहेरचं आयुष्य तितकं खडतर नाही (विशेषतः स्त्रियांसाठी) त्यामुळे घटस्फोटांचं प्रमाण योग्य पातळीवर आलेलं आहे, असं म्हणता येईल.

या पार्श्वभूमीवर स्त्रीवादी बायको म्हणजे तुम्हाला 'लग्न मोडलं तरी स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल' अशी बायको म्हणायचं आहे का? अशा बायकांचं प्रमाण वाढलेलं आहे हे निश्चितच. त्यांच्याशी लग्न करताना पुरुष 'लग्न मोडलं तरी' हा मुद्दा बाजूला ठेवून 'स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल' हा भाग आकर्षक समजतात - कारण संसारात पोळ्या-भाजी बायकोने करण्यापेक्षा नवीन घराचा इएमआय भरायला तिची मदत होण काही पुरुषांना जास्त महत्त्वाचं वाटतं. आता असा केक मिळत असताना लग्न कधीच न मोडण्याच्या खात्रीचं स्वातंत्र्य खायलाही मिळावं ही अपेक्षा दुटप्पी नाही का? किंवा भारतीय म्हण वापरायची झाली तर बायकोच्या उत्पन्नाचं घी जिभल्या चाटत बघायचं, पण तिला अपेक्षित स्वातंत्र्य दिलं नाही तर काय होईल याचा बडगा बघायचा नाही, ही चूक कोणाची?

मला वाटतं 'स्त्रीवादी' या शब्दाच्या माझ्या इंटरप्रिटेशनमध्येच घपला असावा. तुम्ही काय अपेक्षित आहे ते सांगाल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही नाही. नोकरी आणि घरचं असं दोन्ही बघणारी बायको हवी असा मुद्दा नाहीये बहुदा. गृहिणी या सदरात बसणार्‍या बायकोची अपेक्षा ठेवणं हा नालायकपणा आहे किंवा नाही असा मुद्दा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

गृहिणी या सदरात बसणार्‍या बायकोची अपेक्षा ठेवणं हा नालायकपणा आहे किंवा नाही असा मुद्दा आहे.

मला वाटतं याला कोणीच नालायकपणा म्हणणार नाही. मग प्रश्न कुठे येतो? ही अपेक्षा पुरुषाने स्पष्टपणे आधीच मांडून त्याप्रमाणे दोघांनीही यावर सहमत असल्यास - मिया बीबी राजी तो क्या करेगा काझी? आक्षेपार्हता येते ती गृहिणीपण अध्याहृत धरण्यात. ही अपेक्षा जर आधी स्पष्ट केली नसेल, आणि ती पुरी झाली नाही तर तक्रार करणं किंवा मागाहून ती लादण्याचा प्रयत्न करणं हे योग्य नाही. की याहीपेक्षा काही वेगळा मुद्दा आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दरस्तनी, दरनितंबी किंवा इतरही काही म्हणणार होतो

रोचक, पण दर नितंबी- स्तनी कसे? अंतर्वस्त्र वरीलपैकी दर दोनांसाठी एक असते. ते हिशेबात धरावे लागेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही, जर तुम्ही कायमच दरस्तनी किंवा दरनितंबी असा हिशोब केला तर चालतं. कुठची एककं वापरता हे महत्त्वाचं नाही. समान एककं कायम वापरावीत. यु जस्ट हॅव टु बी कन्सिस्टंट. आता तुम्ही म्हणाल की पुरुषांचं काय? तर पुरुषांना का स्तन नसतात? पुरुषांना का नितंब नसतात? आणि सुदैवाने स्त्रियांइतकेच असतात. त्यामुळे हिशोब बरोबर होतो. असल्या गोष्टी योग्या प्रकारे कराव्या लागतात म्हणूनच आम्हा शास्त्रज्ञ-इंजिनियरांना नोकऱ्या मिळतात. कुठलेतरी भुक्कड नासाचे सायंटिस्ट इंच आणि सेंटीमीटरांत घोळ करतात आणि मग सगळ्यांनाच बदनाम करतात. पण आमचा हिशोब स्वच्छ आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कितिही स्त्रीवादी, भुक्कड व्यक्तीस्वातंत्रवादी म्हण्ट्लं तरीही स्त्रियांना लग्न करुन फायनॅशियल सेक्युरीटी वैगेरे लागतेच ना?

वरील दाव्याचा नक्की काय अर्थ घ्यावा हा विचार करतो आहे. दावाकर्त्याने विशद करावे.

मुळात, स्त्रीला फायनँशिअल सिक्युरीटी करता लग्न करणे हा जर 'सर्वोत्तम' पर्याय असेल तर स्त्रीवर्गाचे ऑप्रेशन होत आहे याचीच ही पुस्ती आहे. जर स्त्री, पुरुषाशी लग्नाशिवाय, फायनँशिअली सिक्युअर सहज होऊ शकली तर तर लग्न करण्याकरता फायनँशिअल सिक्युरीटी हा (प्रमुख, दाव्यात आल्याप्रमाणे) क्रायटेरीअन उरणार नाही.

उद्धृत वाक्य खरे आहे असे मानून चाललो आहे. तरीही, अशी परिस्थिती कोठे आहे असा दावा आहे? या विशयी अधिक जाणून घ्यायला आवडेल. (भारत, की एकंदरीत मनुष्य जात?)

काही महिन्यांपूर्वीच अमेरीकेबद्दल ही बातमी वाचली; Pew Study Shows Women Leading Breadwinners in 40 Percent of Households माझ्या मते अमेरीकेतील समाजात गेल्या पन्नास वर्षातील स्त्रीवादी आणि 'भुक्कड व्यक्तीस्वातंत्र्यवादी' लोकांच्या कष्टाचे चीज होत आहे हे स्पष्ट आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बातमी प्रचंड दिशाभूल करणारी आहे असे मला वाटते. सर्वसाधारणपणे स्त्रियांना अजूनही पुरुषांइतके मानधन(!) मिळत नाही हे सर्वविदितच आहे अशा परिस्थितीत ४०% घरांमध्ये स्त्रिया लिडिंग ब्रेडविनर आहेत याचा अर्थ काय घ्यावा?
एलिझाबेथ वॉरन यांच्या "The Two Income Trap" मध्ये याचे उत्तर सापडेल असे वाटते. गेल्या ३० वर्षांत अमेरिकेत मध्यमवर्गीय पुरुषांचे चलनवाढनिरपेक्ष उत्पन्न ८०० डॉलर्सनी घटले आहे.
स्त्रियांनी नोकरी करण्यातच त्यांचे स्वातंत्र्य सामावलेले आहे या मीमचा फायदा कॉर्पोरेटॉक्रसीला वाढीव मनुष्यबळ आणि कमी वेतन यातून किती झाला आहे आणि डबल इन्कमचा मध्यमवर्गाला काय तोटा झाला आहे ते तितकेसे सकृत्दर्शनी नाही आणि सकृत्दर्शनी नसलेल्या गोष्टी अस्तित्वातच नसतात बहुतेकांसाठी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बातमी प्रचंड दिशाभूल करणारी आहे असे मला वाटते. सर्वसाधारणपणे स्त्रियांना अजूनही पुरुषांइतके मानधन(!) मिळत नाही हे सर्वविदितच आहे अशा परिस्थितीत ४०% घरांमध्ये स्त्रिया लिडिंग ब्रेडविनर आहेत याचा अर्थ काय घ्यावा?

सदर प्रतिसाद हा, फायनॅन्शिअल सिक्युरीटीकरता स्त्रीया पुरुषावर अवलंबुनच असतात, या प्रकारच्या विधानावर दिलेला होता. स्त्री-पुरुष वेतन असमानतेबाबत इथे मुद्दा उपस्थित केलेला नाही. दुव्यावरील उद्धृत;

In 1960, only 4 percent of women made more than their husbands; it's now 23 percent. That translates into 5.1 million married "breadwinner moms."

स्त्रियांनी नोकरी करण्यातच त्यांचे स्वातंत्र्य सामावलेले आहे या मीमचा फायदा कॉर्पोरेटॉक्रसीला वाढीव मनुष्यबळ आणि कमी वेतन यातून किती झाला आहे आणि डबल इन्कमचा मध्यमवर्गाला काय तोटा झाला आहे ते तितकेसे सकृत्दर्शनी नाही आणि सकृत्दर्शनी नसलेल्या गोष्टी अस्तित्वातच नसतात बहुतेकांसाठी.

कॉर्पोरेट कंपन्या स्वतःचा फायदा कशा ना कशाने करून घेतच असतात. म्हणून, स्त्रीयांनी आपले स्वातंत्र्य बासनात गुंडाळून ठेवावे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्त्रीयांनी आपले स्वातंत्र्य बासनात गुंडाळून ठेवावे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

लग्न झालेल्या स्त्री/पुरुषाने नोकरी केली म्हणजे ती/तो स्वतंत्र आणि ती/तो अर्थार्जनाचे काम करत नसेल तर परतंत्र असे नाही एवढेच मला म्हणायचे आहे.
पण कुटुंब असूनही ते सोडून व्यक्तीच्याच पातळीला विचार करण्याचा अट्टाहास असेल तर नाईलाज आहे.
नोकरीही पाहिजे, लग्नही पाहिजे, मुलंही पाहिजेत या सुपरवुमन/सुपरमॅनगिरीला साध्या भाषेत हावरटपणा म्हणतात आणि असा हावरटपणा करूनही अपेक्षित फायदा होत नाही असा निष्कर्ष वाॅरन बाईंनी गेल्या तीस वर्षांतल्या प्रत्यक्ष माहितीवरून काढला आहे.
६०% लोकांचे उत्पन्न अगदी किरकोळ प्रमाणात वाढलेले असताना स्त्रिया पुरुषांना मागे टाकत आहेत यात फक्त स्त्रियांची प्रगती आहे की पुरुषांची अधोगतीही आहे हे तपासलेच पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्या बात है. मस्त प्रतिसाद; @ संपादकः टाळ्या वाजवण्याची स्मायली चालत नाही. Wink

लग्न झाल्याझाल्या पुरुषाचे स्वातंत्र्य विसर्जित होते हे ही एक वैश्विक सत्यच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नेमके अन मार्मिक!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>६०% लोकांचे उत्पन्न अगदी किरकोळ प्रमाणात वाढलेले असताना स्त्रिया पुरुषांना मागे टाकत आहेत यात फक्त स्त्रियांची प्रगती आहे की पुरुषांची अधोगतीही आहे हे तपासलेच पाहिजे.

स्त्रियांचे ब्रेड विनिंग नंबर्स वाढत असतील तर ती पुरुषांची अधोगती कशी ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

स्त्रियांचे ब्रेड विनिंग नंबर्स वाढत असतील तर ती पुरुषांची अधोगती कशी ?

गेल्या पन्नासेक वर्षांत लेबर मार्केट बदललेलं आहे. पन्नासच्या दशकात त्यातल्या पुरवठ्यावर पुरुषांची मक्तेदारी होती. त्यानंतर स्त्रिया अधिकाधिक प्रमाणात लेबर फोर्समध्ये आल्या. अर्थातच कॉंपिटिशन वाढली. या कॉंपिटिशनमुळे स्त्रियांचं सरासरी ताशी उत्पन्न प्रचंड प्रमाणात वाढलं. पुरुषांचं फारसं वाढलं नाही किंवा कमी झालं. या अर्थाने अधोगती म्हणता येईल.

एकाधिकारशाही, किंवा मोनोपोली नष्ट होताना प्रवास अधिक न्याय्य व्यवस्थेकडे होतो. मात्र तुम्ही जर मोनोपोली असणाऱ्या गटाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर ती अधोगती वाटू शकते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लग्न झालेल्या स्त्री/पुरुषाने नोकरी केली म्हणजे ती/तो स्वतंत्र आणि ती/तो अर्थार्जनाचे काम करत नसेल तर परतंत्र असे नाही एवढेच मला म्हणायचे आहे.

अर्थातच, फक्त नोकरी करणे म्हणजे स्वातंत्र्य मिळाले आहे असे नाही. पण, तसा दावा मी अथवा त्या लेखात केल्याचे मला तरी दिसत नाही.

नोकरीही पाहिजे, लग्नही पाहिजे, मुलंही पाहिजेत या सुपरवुमन/सुपरमॅनगिरीला साध्या भाषेत हावरटपणा म्हणतात आणि असा हावरटपणा करूनही अपेक्षित फायदा होत नाही असा निष्कर्ष वाॅरन बाईंनी गेल्या तीस वर्षांतल्या प्रत्यक्ष माहितीवरून काढला आहे.

नक्की काय केल्याने 'अपेक्षित फायदा' होतो हे समीकरण सोडवणे इतके सोपे नाही. पण ज्याला ही सुपरमॅन्/वुमन गिरी करायची आहे त्याला ते करता येण्याचे स्वातंत्र्य आहे ना हे पाहणे महत्त्वाचे.

६०% लोकांचे उत्पन्न अगदी किरकोळ प्रमाणात वाढलेले असताना स्त्रिया पुरुषांना मागे टाकत आहेत यात फक्त स्त्रियांची प्रगती आहे की पुरुषांची अधोगतीही आहे हे तपासलेच पाहिजे.

वाढलेल्या किरकोळ उत्पन्नाचे मुख्य कारण काय आहे? ढासळलेली इकॉनॉमी, परदेशी गेलेले मॅन्युफॅक्चरींग कि अजून काही? सामाजिक बदलांचा परिणाम इकॉनॉमीवर होत असेलही, पण म्हणून स्त्रीयांची प्रगती ही पुरुषांच्या अधोगतीमुळे रोखावी असा रोख का आहे ते समजत नाही.

स्त्रियांची प्रगती आहे की पुरुषांची अधोगतीही

बाकी, 'फ्री मार्केटमध्ये' स्त्रीयांच्या प्रगतीमुळे पुरुषांची अधोगती होत असेल तर ते ही अभ्यासण्याजोगेच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नोकरीही पाहिजे, लग्नही पाहिजे, मुलंही पाहिजेत या सुपरवुमन/सुपरमॅनगिरीला साध्या भाषेत हावरटपणा म्हणतात

जीवनात या तीनही गोष्टींची गरज वाटणे आणि त्या पाहिजे असणे हा हावरटपणा कसा काय बुवा? आणि तसे पाहता बर्याच पुरुषांनाही या तिन्हींची इच्छा असते, आणि असत आलेली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुरुषांच्या हावरटपणाचेही समर्थन नाहीच.
कुटुंबाच्या पातळीवर दोघांनीही असा हावरटपणा करणे मान्य नाही.
दोघांपैकी एकानेच करावा एवढेच म्हणायचे आहे.
आजकाल दोघांनी कमाई केल्याशिवाय भागत नाही वगैरे बोलणे म्हणजे हावेचे लटके समर्थन आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुळात स्त्री व पुरुष दोघांनीही बाहेर काम केल्याने कुटुंबाची अधोगती होते असा मुद्दा आहे.
स्त्रिया वर्कफोर्समध्ये आल्याने पुरुषांचे वेतन वाढत नसेल आणि विषमता व कुटुंबाचा एकूण त्रास वाढत असेल तर स्त्रियांच्या प्रगतीपेक्षा एकूण कुटुंबाची व समाजाची आर्थिक अधोगती जास्त होते. पण म्हणून स्त्रियांनी अर्थार्जन करु नये असे मला म्हणायचे नाही. कुटुंबातल्या स्त्रीला बाहेर काम करायचेच असल्यास पुरुषाला घरी राहून घरकाम करण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे.
न वाढणार्‍या उत्पन्नाचे कारण आऊटसोर्सिंग हेही असले तरी ते नंतर झालेले आहे आणि स्वस्त कामगारांसाठी कंपन्या काहीही करायला तयार असतात हेच सिद्ध करणारे आहे.
वर्क-फॅमिली बॅलन्स साधणारी करिअर वुमन हा एक कॉर्पोरेट प्रचारयंत्रणेने निर्माण केलेला स्वतंत्र स्त्रीचा आभास आहे. प्रत्यक्षात अशा स्त्रीच्या कुटुंबाला साधं कोणी ऐनवेळी घरी आलेलंही परवडत नाही, शेजारपाजार्‍यांशी संबंध वाढवायलाही वेळ नसतो आणि मग माणसा-माणसातली दरी वाढत जाऊन स्थानिक कम्युनिटीचा व नात्यांचा नाश होतो. कल्चरल डायव्हर्सिटी कमी होऊन ठोकळेबाज सपाटीकरण होते. निव्वळ कमवा आणि उडवा अशा संस्कृतीचा उपभोक्त्यांचा समाज निर्माण होतो. यालाही प्रगतीच म्हणायचे असेल तर मग काहीच म्हणणे नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वर्क-फॅमिली बॅलन्स साधणारी करिअर वुमन हा एक कॉर्पोरेट प्रचारयंत्रणेने निर्माण केलेला स्वतंत्र स्त्रीचा आभास आहे. प्रत्यक्षात अशा स्त्रीच्या कुटुंबाला साधं कोणी ऐनवेळी घरी आलेलंही परवडत नाही, शेजारपाजार्‍यांशी संबंध वाढवायलाही वेळ नसतो आणि मग माणसा-माणसातली दरी वाढत जाऊन स्थानिक कम्युनिटीचा व नात्यांचा नाश होतो. कल्चरल डायव्हर्सिटी कमी होऊन ठोकळेबाज सपाटीकरण होते.

हा हा हा.. इतकं जनरलायझेशन!

माझ्या घरी गेल्या तीन पिढ्यातील स्त्रिया कमावत्या आहेत. तरीही आमच्या घरी कोणीही कधीही येत-जात असतं, दर विकांताला किमान ८ ते १० मंडळी दोनदा तरी जेवायला असतात, शेजारी पाजारीच सोडा त्यांचे नातेवाईकही आमच्याशी संबंध ठेऊन आहेत, आमच्या नात्यांचा नाश वगैरे काहि झाला नाहीच्चे उलट प्रत्येकाच्या हाफिसातल्या व्यक्तीही नातेवाईकांसारख्या धाऊन आलेल्या आहेत. कल्चरल डायव्हरसिटी तर राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर मित्र/मैत्रीणी असल्याने वाढलेलीच आहे.

मात्र कित्येक घरी राहणार्‍या महिलांच्या घरातही कोणी जाऊ इच्छित नाही, घरी राहुन त्या महिलांचा वेळा टिव्हीवरच्या मालिका बघण्यात जाताना दिसतो. याने कल्चरल डायव्हरसिटी कशी काय वाढते बॉ?

असो. सांगायचा मुद्दा हा की तुम्ही म्हणताय त्या गोष्टींसाठी, स्त्री किंवा पुरूष कमावता आहे की नाही यापेक्षा त्यांची सोशल इन्व्हॉल्व्हमेंटची इच्छा अधिक महत्त्वाची आहे. नाहितर ही सगळी वरवरची सांगायची कारणे झाली.

अन् स्त्री स्वातंत्र्य म्हणजे निव्वळ आर्थिक स्वातंत्र्य नव्हे तर निर्णय स्वातंत्र्य! आपण काय करावं/करू नये, नोकरी करावी/करू नये, कुठे जावं, काय खावं, काय कपडे घालावेत, कोणाशी बोलावं - बोलु नये, पैसे उडवावेत का जपून ठेवावेत, किमान या सगळ्याचं "पूर्ण" स्वातंत्र्य पहिल्या टप्प्यावर अपेक्षित आहे. स्त्रीया पुरूषां इतक्याच हुशार/मठ्ठ असतात त्यांना स्वतंत्रपणे योग्य ते निर्णय घेता येतात, इतकंही अनेकदा काही (कित्येक?) पुरूष मान्य करताना दिसत नाहीत हे संतापजनक आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आपले कुटुंब प्रातिनिधीक आहे याची कल्पना नव्हती!
मी केलेले जनरलायझेशन आणि आपले कुटुंब करते तेच सगळे करतात असे समजणे म्हणजे काय कोण जाणे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझे कुटुंब करते ते प्रातिनिधीक नाहिच्चे. फक्त तुम्ही म्हणताय ते इतके सरळा नाही इतकेच दर्शवायचे होते.
दोन्ही बाजुने इतके सरळधोपट जनरलायझेशन करता येऊ नये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सरधोपट जनरलायझेशन नाही पण असा ट्रेंड आहे तुम्ही अमान्य कराल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(दोघांचेही माहेर नसलेल्या अशा)वेगळ्या व मोठ्या शहरांत काही तरूण जोडप्यांच्या घरात हे दृश्य दिसते. त्या समुहात याला ट्रेंड म्हणता यावे इतकी संख्या असावी.
मात्र कालांतराने एका जागी स्थिरावल्यावर पुन्हा हळुहळू या व्यक्ती (साधारणचाळीशी नंतर) सोशल होताना पाहिल्या आहेत. मात्र दोघांपैकी एकाचे माहेर असणार्‍या शहरात, जोडपे स्वतंत्र रहात असले तरी हे दृश्य इतके सहज दिसत नाही. शिवाय जोडपे परिपक्व झाल्यावरही हे दृश्य दिसणे कमी होऊ लागते.

त्यामुळे माझ्या मते:
१. असा सार्वत्रिक ट्रेंड नाही, मात्र काही प्रकारच्या समुहात आहे.
२. याला कारण दोघांची नोकरी नसून, दोघांनी एका नव्या शहरांत नोकरीसाठी जाणे हे आहे तसेच नोकरीनिमित्त सतत राहती जागा/शहरे बदलणे हे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पुरुषाला घरी राहून घरकाम करण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे.

पूर्ण सहमत. फक्त दोघांपैकी एकाने अर्थार्जन केल्यास दुसर्याने घरी राहून घरकाम करायलाच पाहिजे असे नाही. नवरा- बायको, दोघेही नोकरी करणारी जी जी कुटुंबे माझ्या माहितीत आहेत त्यांचे इतरांशी संबंध मुळीच कमी नाहीत. उलट एकंदरीत पाहता जास्तच आहेत. (आजच्या आणि कालच्या दोन्ही पिढ्यांतले). आणि त्यांच्या मुलांच्या विकासातही काही जगावेगळा फरक पडलेला नाही.
ऐनवेळी घरी आलेले नोकरदार स्त्रीला परवडत नाही तसेच नोकरदार पुरुषांनाही परवडत नाही. पण नोकरदार पुरुष ज्याप्रमाणे इतर सोयीच्या वेळात शेजार्यांशी, मित्रांशी संबंध वाढवतात तसेच या नोकरदार स्त्रियाही करतात. नोकरी- धंद्याच्या ठिकाणी देखील पुरुषांप्रमाणेच स्त्रिया सामाजिक संबंध जोपासतात. उलट ह्या कुटुंबांत फक्त घरी असणार्या स्त्रियांच्या तुलनेने नोकरदारांचा मित्रवर्ग, सामाजिक संबंध बर्याच वेळा जास्त असल्याचे मला दिसते. शेजारपाजारी, कामाच्या ठिकाणी संबंध वाढवणे हे माणसाच्या स्वभावावर अवलंबून असते.

मग माणसा-माणसातली दरी वाढत जाऊन स्थानिक कम्युनिटीचा व नात्यांचा नाश होतो. कल्चरल डायव्हर्सिटी कमी होऊन ठोकळेबाज सपाटीकरण होते. निव्वळ कमवा आणि उडवा अशा संस्कृतीचा उपभोक्त्यांचा समाज निर्माण होतो.

हे ठोकळेबाच सपाटीकरण वाटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> वर्क-फॅमिली बॅलन्स साधणारी करिअर वुमन हा एक कॉर्पोरेट प्रचारयंत्रणेने निर्माण केलेला स्वतंत्र स्त्रीचा आभास आहे.

शाळा-कॉलेजांत शिक्षिका म्हणून, मंत्रालयात आणि इतर सरकारी कार्यालयांत किंवा बँकांत वगैरे नोकरी करून घरही सांभाळताना अनेक स्त्रियांना लहानपणापासून पाहिलेलं आहे. शिवाय मोलकरणी, भाजीवाल्या, कोळणी वगैरेही पाहिल्या आहेत. आताशा महिला बस कंडक्टरही दिसतात. त्या सगळ्यांना वर्क-लाइफ बॅलन्स सांभाळायचा नसतो का? की कॉर्पोरेट प्रचारयंत्रणेच्या त्या बळी आहेत? कळलं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

>> वर्क-फॅमिली बॅलन्स साधणारी करिअर वुमन हा एक कॉर्पोरेट प्रचारयंत्रणेने निर्माण केलेला स्वतंत्र स्त्रीचा आभास आहे.

"वर्क-फॅमिली बॅलन्स साधणारी करिअर वुमन =(म्हणजेच) स्वतंत्र स्त्री" हे समीकरण कॉर्पोरेट प्रचारयंत्रणेने तयार केले आहे असे त्यांना म्हणायचे असावे आणि जे काहि अंशी आहेच असे मला पटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> "वर्क-फॅमिली बॅलन्स साधणारी करिअर वुमन =(म्हणजेच) स्वतंत्र स्त्री" हे समीकरण कॉर्पोरेट प्रचारयंत्रणेने तयार केले आहे असे त्यांना म्हणायचे असावे आणि जे काहि अंशी आहेच असे मला पटते.

त्यानंतरचे त्यांचे हे सगळे मुद्दे पाहता मला तसं वाटलं नाही :

>> प्रत्यक्षात अशा स्त्रीच्या कुटुंबाला साधं कोणी ऐनवेळी घरी आलेलंही परवडत नाही, शेजारपाजार्‍यांशी संबंध वाढवायलाही वेळ नसतो आणि मग माणसा-माणसातली दरी वाढत जाऊन स्थानिक कम्युनिटीचा व नात्यांचा नाश होतो. कल्चरल डायव्हर्सिटी कमी होऊन ठोकळेबाज सपाटीकरण होते. निव्वळ कमवा आणि उडवा अशा संस्कृतीचा उपभोक्त्यांचा समाज निर्माण होतो. यालाही प्रगतीच म्हणायचे असेल तर मग काहीच म्हणणे नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

स्त्रिया(काही) ह्या कॉर्पोरेट प्रचारयंत्रणेचा बळी आहेत व त्यामुळे कुटुंबव्यवस्थेचा नाश होतो आहे असेच त्यांना म्हणायचे आहे, त्यातील पुर्वाधाशी मी काही अंशी सहमत आहे एवढेच.

>> प्रत्यक्षात अशा स्त्रीच्या कुटुंबाला साधं कोणी ऐनवेळी घरी आलेलंही परवडत नाही, शेजारपाजार्‍यांशी संबंध वाढवायलाही वेळ नसतो आणि मग माणसा-माणसातली दरी वाढत जाऊन स्थानिक कम्युनिटीचा व नात्यांचा नाश होतो. कल्चरल डायव्हर्सिटी कमी होऊन ठोकळेबाज सपाटीकरण होते. निव्वळ कमवा आणि उडवा अशा संस्कृतीचा उपभोक्त्यांचा समाज निर्माण होतो. यालाही प्रगतीच म्हणायचे असेल तर मग काहीच म्हणणे नाही.

फक्त स्त्रीला ह्यासगळ्यासाठी जबाबदार ठरवणं एकंदर रोचक आणि पुरुषांसाठी मानहानीकारक वाटलं. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोकांनी आपण होऊन अशा प्रकारची जीवनपद्धती स्वीकारली असेल तर त्याला विरोध करणारे आपण कोण? आपल्याला आवडत नाही, पण त्यांच्या आयुष्यात त्यांना काय करायचंय त्यात आपण ढवळाढवळ कशी करावी? स्पीकरच्या भिंतींचा आपल्याला त्रास होतो, त्याबद्दल तक्रार केलेली समजते. पण नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या कुटुंबाच्या प्राथमिकतेच्या यादीत पाहुण्यांची सरबराई फार वर नाही याबद्दल तक्रार का करावी?

समाजाच्या प्रगती-अधोगतिसाठी व्यक्तींनी आपापली प्राथमिकता बदलावी असं मला वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अहो जान्हवीला नवऱ्याला भेटण्यासाठी सव्यापसव्य करण्याची आवश्यकता असणारे आयुष्य स्वीकारावे वाटते. त्यालाही केवळ आपल्याला पटत नाही म्हणून 'विकृत' असे हिणवणारे आपणच आहोत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जान्हवी कोण काय मला माहित नाही.

मालिकांबद्दल म्हणत असाल तर ही जान्हवी प्रत्यक्षात व्यक्ती म्हणून अस्तित्त्वात नाही. मालिकेतली व्यक्तिरेखा ही विचारसरणीचं प्रतीक आहे; आणि अमकी एक विचारसरणी पाहून व्यक्तीला nausea येण्यात काय आक्षेपार्ह असावं, हे मला समजलं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला काय म्हणायचंय ते सगळंच मला लिहिणे शक्य नाही.
इथे स्त्रीलाच फक्त जबाबदार धरलेले नाही. एक जोडीदार काम करत असताना व त्यातून भागत असताना निव्वळ स्वातंत्र्याच्या नावाखाली घराबाहेर काम करणार्‍या कोणत्याही व्यक्तीला ते लागू आहे.पण प्रचलित पॅटर्नच्या विरुद्ध जाऊन "अशा पुरुषाच्या घरी" असे मी लिहायला हवे होते अशी तुमची अपेक्षा आहे का?
अशा व्यक्तींमुळे खरोखर गरजू व्यक्तींना काम मिळणे अवघड होते व सोशल मोबिलिटीही कमी होते.
पण खाली अदितींनी म्हटल्याप्रमाणे तीच प्राथमिकता असेल आणि दुष्परिणाम माहित असूनही तेच करायचे असेल तर माझा वाद व्यर्थ आहे.
असो. इत्यलम.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> एक जोडीदार काम करत असताना व त्यातून भागत असताना

>> अशा व्यक्तींमुळे खरोखर गरजू व्यक्तींना काम मिळणे अवघड होते व सोशल मोबिलिटीही कमी होते.

ह्यात मानवी स्वभावातल्या काही मूलभूत गोष्टींकडे आणि आपल्या परिसरातल्या आजच्या वास्तवाकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होत आहे असं म्हणू इच्छितो.
१. किती उत्पन्न मिळालं म्हणजे गरजा भागल्या हे कधीच निरपेक्ष नसतं. शिवाय, सर्व सामाजिक स्तरातल्या लोकांना 'अपवर्ड मोबिलिटी' हवी असते. समाजवादानं ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे लोकांना समाजवाद नकोसा झाला. १९९१च्या आर्थिक उदारीकरणानंतर उपलब्ध झालेल्या संधी आज कोणताच पक्ष आणि कोणताही सामाजिक स्तर नाकारणार नाही त्यामागे हे कारण आहे.
२. आजच्या कार्यसंस्कृतीत कामाची शाश्वती नाही. आज नोकरी आहे किंवा व्यवसाय उत्तम चालतोय म्हणून उद्या तशीच परिस्थिती असेलच असं नाही. कमावत्या व्यक्तीला उद्या घरी बसायची पाळी आली तर (आणि ती येते हे अनेक उदाहरणांत दिसतं) कमावता जोडीदार असणं ही टिकाव धरण्यासाठी कळीची बाब ठरते. तद्वत, ही एक भविष्याची तजवीज असते.
३. दोन्ही जोडीदार काम करत असतील तर पाळणाघरं, मोलकरणी आणि इतर सेवा पुरवणारे व्यावसायिक ह्यांच्यासाठी काम उत्पन्न होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पहिला मुद्दा पटला, दुसरा व तिसरा पश्चात बुद्धिने मांडलेला तर्क वाटतो, ते बहुतांशी साइड इफ्फेक्ट्स आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रत्यक्षात अशा स्त्रीच्या कुटुंबाला साधं कोणी ऐनवेळी घरी आलेलंही परवडत नाही

इच्छा असो वा नसो, नवर्‍याचे वा इतर कोणाचेही नातलग वगैरे येतील त्यांची सरबराई करत राहा, स्वयंपाक्घरात खपत राहा - ह्यापेक्षा येणार्‍यांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष पद्धतीने आम्हाला अडचण होतेय हे सांगण्याचे/जाणवू देण्याचे स्वातंत्र्य आलेय असे मी म्हणेन!

आणि प्र्त्येक घरीच लोक (विषेशतः बायका) बिझी झाले तर असे वेळी अवेळी उगवणारे लोकच कमी होतात ना!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

नोकरीही पाहिजे, लग्नही पाहिजे, मुलंही पाहिजेत या सुपरवुमन/सुपरमॅनगिरीला साध्या भाषेत हावरटपणा म्हणतात

प्रत्येक भारतीय पुरूष हावरट आहे हा नगरीनिरंजन यांचा आरोप मला अमान्य आहे! जोरदार असहमती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सर्वसाधारणपणे स्त्रियांना अजूनही पुरुषांइतके मानधन(!) मिळत नाही हे सर्वविदितच आहे अशा परिस्थितीत ४०% घरांमध्ये स्त्रिया लिडिंग ब्रेडविनर आहेत याचा अर्थ काय घ्यावा?

यात दोन परस्परांना छेदणाऱ्या परंतु एकसमान नसणाऱ्या सेट्सची तुलना आहे.

एक गट आहे तो एकसमान काम करणाऱ्या स्त्री-पुरुषांचा. यात पुरुषांपेक्षा स्त्रियांना, सरासरी कमी पगार मिळतो असं दिसतं. पण नोकरी करणाऱ्या सगळ्याच स्त्रियांच्या बाबतीत हे दिसेल असं नाही. दुसरा गट आहे तो दोन्ही लोक कमावतात अशा (लग्न केलेल्या किंवा न केलेल्या) जोडप्यांचा. यातल्या ४०% स्त्रिया त्यांच्या नवऱ्यापेक्षा अधिक कमावता (असं बातमी म्हणते). यात थेट तुलना करायची तर जोडप्यांमधले दोघेही एकच काम करत आहेत असं मानावं लागेल, जे गृहितक आजूबाजूला पाहता अयोग्य वाटतं. उरलेल्या ६०% जोडप्यांमधले पुरुष आणि नोकरी-व्यवसाय न करणाऱ्या स्त्रियांचे जोडीदार जे काही काम करत असतील त्याचा परतावा त्यांना जास्त आणि स्त्रियांना कमी असं असण्याचीही शक्यता आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

यातल्या ४०% स्त्रिया त्यांच्या नवऱ्यापेक्षा अधिक कमावता (असं बातमी म्हणते).

४०% स्त्रिया लीडिंग ब्रेडविनर, की ४०% हाउसहोल्ड्समध्ये स्त्रिया लीडिंग ब्रेडविनर? हा फरक महत्त्वाचा आहे, कारण स्त्रियांचं आयुर्मान अधिक असल्यामुळे अनेक घरं अशी आहेत की ज्यांत केवळ वयस्क स्त्रियाच राहतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शिवाय नवरा कैच करत नै अशी पण हाउसहोल्ड्स असतातच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हे नवर्‍याला "काहिच न करण्याचं " मिळालेलं स्वातंत्र्य समजावं काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माणूस (म्हणजे व्यक्ति) स्त्रीवादी आहे कि नाही हे कसे ओळखावे? (काही बुलेट पॉइंट्स द्या.)
'स्त्रीवादी'च्या विरोधार्थी शब्द कोणता?
स्त्रीवादी नसणे आजच्या कायद्यांप्रमाणे गुन्हा आहे का?
स्त्रीवादी असण्याची अपेक्षा स्त्री व पुरुषांकडून सारखीच असते का? बहुतेक असावी.
स्त्रीवादी चळवळ कोण चालवतात?
या चळवळीची उद्दिष्टे बुलेट पॉइंटस मधे सांगता येतील काय?
समाज स्त्रीवादी असण्याचे जगासाठी फायदे कोणते? तोटे कोणते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अरुणराव, तुम्ही अनेक प्रश्न विचारलेले आहेत. उत्तम प्रश्न आहेत.

मला असे वाटते की स्त्रीवादाची व्याख्या -

Necessary Condition : - Men should just leave women alone and stop dictating terms to them. (म्हंजे नेमके काय असा प्रश्न पडू नये.). If we can achieve that ... women will achieve whatever place they deserve ... on their own.

Sufficient Condition : - Absence of patriarchal society.

----

तुम्ही असे ही म्हणू शकता की वरील व्याख्या ही स्त्रीवादा च्या मूलभूत उद्दिष्टांची बेसिक (but by no means complete.) यादी आहे. व ही उद्दिष्टे का असावीत असा प्रश्न पडू नये. कारण ही व्हॅल्यु जजमेंट आहे.

अर्थात - गब्बर स्वतः पुरुष असल्याने त्याने त्याची व्याख्या स्त्रियांना प्रिस्क्राईब करणेच मुळाच चूक आहे - असे म्हणायला जागा आहे. Women can tell गब्बर to stop prescribing any definition of feminism to them whatsoever.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अर्थात - गब्बर स्वतः पुरुष असल्याने त्याने त्याची व्याख्या स्त्रियांना प्रिस्क्राईब करणेच मुळाच चूक आहे - असे म्हणायला जागा आहे. Women can tell गब्बर to stop prescribing any definition of feminism to them whatsoever.

गब्बर स्वतः पुरुष असल्याकारणाने त्याने त्याची व्याख्या स्त्रियांना (किंवा कोणालाही) प्रिस्क्राइब करू नये, ही अपेक्षा बहुधा रास्तच असावी. परंतु, at the same time, Gabbar certainly has - or should have - the freedom to describe (or explain) the concept of feminism as he understands it.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुळात स्त्रीवाद ही काही एकसंध, एकचएक (monolithic) विचारसरणी नसल्यामुळे प्रत्येक व्यक्ती (स्त्री असो वा पुरुष) आपल्याला समजलेली, पटलेली स्त्रीवादाची व्याख्या, स्पष्टीकरण देणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

व्याख्येबद्दल धन्यवाद. (क्षमस्व, पण अशा व्याख्या मी न वाचताच मान्य करतो.)

पण सामान्य माणसाला व्याख्येचा काही उपयोग नाही. समजा मला वाटले कि माझ्या घरात पुरुषप्रधान व्यवस्था आहे वा तशा पिंडात मी वाढलो आहे. पण समजा मला "सुधरायचे" आहे. तर एक सोपे गाईडबूक पाहिजे. हे करा आणि हे करू नका. इ. इ.

मी तुम्हाला एक केस देतो.
नवरा - "मला या होळीला तुझ्यासोबत तुझ्या माहेरी भेट देणे जमणार नाही."
बायको - "असे असेल तर मी ही तुझ्यासोबत या दिवाळीला तुझ्या आईबाबांना भेट देणार नाही."
१. नवर्‍याला ऑफिसचे काम असू शकते. वा त्याला खर्च कमी करायचा असू शकतो. वा त्याला रस नसू शकतो.
२. हेच बायकोचेही मुद्दे असू शकतात.
३. यांचा दोन वर्षांचा मुलगा आहे जो केवळ आईसोबतच राहू शकतो. दोन्हीकडच्या आजीआजोबांना नातू (वर्षातून किमान एकदा तरी) पाहायची इच्छा आहे.
४. हे आजीआजोबा या तरुण कुटुंबाकडे येण्यास असमर्थ आहेत असे माना.

या केस मधे काय व्हायला पाहिजे. पुरुषप्रधान संस्कृती म्हणते कि बायको ही या घरची आहे तेव्हा तीने माहेरी जावे (एकटीने वा कसे) पण सासरी तीने आलेच पाहिजे. यात कोणती भावनिकता आहत होते? स्त्रीवादी संस्कृती काय म्हणते? त्यात कोणाकोणाची कोणती भावना आहत होते? इतर काही सोल्यूशन.
५. इथे कोणाचाही इगो नाही असे समजा. सगळ्यांचे भले होण्यात सगळ्यांना आनंद आहे.
६. एकाच भेटीचे बजेट आहे असे माना.

या केसचे उत्तर काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

या केसचे उत्तर काय?

कोणत्याही प्रश्नाचे उत्तर हे "उत्तर मिळेपर्यंत चर्चा" असे आहे. याने निर्णय होण्यास वेळ लागतो परंतू स्थायी स्वरूपाचा निर्णय होतो व हेवेदावे होण्याचा सांभव कमी असतो.
केवळ पुरूष किंवा स्त्री/ माहेर किंवा सासर यासारख्या बालीश भांडणांपेक्षा अधिक महत्त्वाच्या मुद्यांवरून, वरील केसचा निकाल, नवराबायकोने प्रत्येक निर्णयाचे फायदे/तोट्यांवर चर्चा केल्याने, घेता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषिकेशजी, उदाहरण महत्त्वाचे नाही. मेथडॉलॉजी महत्त्वाची आहे. ती सर्वत्र वापरता येईल. सध्याला साधी केस सोडवू. नंतर किचकट. हेच उदाहरण नोकरी, इ विषय घालून लिहिता येते. पण त्याचे पॅरामीटर इ अनेक असतात. शिवाय लोक स्वतःची केस त्यात घूसडून आपल्या अनुभवाबद्दलचे मत देतात. पण चर्चा करणारे लोक संवेदनशील असल्याने डायल्यूट करून लिहायचा प्रयत्न केला आहे. मी फालतू/विचित्र विषय निवडला (माहेरी जाणे) असल्याने लोक थंडपणे, तांत्रिक चर्चा करू शकतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

@ अरुणजोशी.

या केसचे उत्तर काय?

म्हणजे काय ? अर्थातच बायकोसोबत तिच्या माहेरी जाणे.

कधीकधी तुमचं खरंच लग्न झालंय ना, अशी शंका येते बुवा..

( निर्णयाचे ऑबव्हियस कारणः बायकोचा नंतरच्या वरकरणी अहिंसक पण भेदक शीतलढ्याचा कालावधी पुरुषाच्या तुलनेत सहस्रपट असतो. पुरुषाला इतकावेळ सन्नाटा अन हवेत पसरलेला ताण सहन करणे किंवा लक्षात ठेवणे जमत नाही. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सिफ़रची परवानगी न घेता त्याच्या नावने त्याच्या नविन धागा सुरु करणे, याला मालकीन बाईची मनमानी/व्यक्तीस्वातंत्रांची गळ्चेपी म्हणता येणार नाही का?
सिफ़रला चर्चा कुठे करावी हे सिफ़र ठरवेल की विक्षिप्त तै?

चर्चा मुळ घाग्यावर का होउ शकत नाही? शक्य नसल्यास नविन चर्चा या धाग्यावरुन का सुरु झाली नाही? कॉन्टेक्स्ट सोडुनच चर्चा अपेक्षित आहे का?

व्यक्तीस्वातंत्रवादी चोराच्या उल्ट्या बोंबा असं मत नोंदवतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मित्रा, शांत हो.

संपादक मंडळी सहसा धागा एवढ्याचकरता वेगळा काढतात, जेणेकरून पुढच्या वेळी वाचताना, नवीन माणसाला सगळी चर्चा विषयानुरूप एके ठिकाणी मिळावी. वाचकाची सोय इतकाच मुद्दा असतो. त्यात संदर्भ सोडून बोलण्याचा काय संबंध आला?
बाकी मागचे संदर्भ तर सगळ्यांनाच ठाऊक असतात. नसले, तर त्यांचे दुवे देता येतात.

वाद होऊ द्यात. पण हमरीतुमरीवर शक्यतोवर न आलो आपण, तर बरं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

एकदा विचारल्यास काय हरकत आहे? किंवा स्वतहः च्या नावने घागा काढावा व सिफ़रची कॉमेन्ट पेस्ट करुन, खाली नाव लिहावे.

मला या धाग्यावर कुणालाही श्रेणी देता येत नाही उपाय सुचवा, कारण यामुळे माझे हक्क कमी झालेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला या धाग्यावर कुणालाही श्रेणी देता येत नाही उपाय सुचवा, कारण यामुळे माझे हक्क कमी झालेत.

ह्म्म.. असं होतं खरं. पण सध्या त्यावर उपाय मिळालेला नाही
तोवर या धाग्यावर एखाद्या प्रतिसादाला श्रेणी द्यायची असल्यास मला व्यनी करा, तुमच्या वतीने मी श्रेणी देईन.
यामुळे तुझी गोपनीयता एका व्यक्तीपुरती कमी होईल याची कल्पना आहे. पण माझ्याहून अधिक व्यक्तींना हे कळणार नाही याची ग्वाही देतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मित्रा, शांत हो.

असंच म्हणतो. तत्त्वतः धागा आणि प्रतिसाद यांमध्ये तसा काही फरक नसतो. चर्चा एखाद्या प्रतिसादावरही होऊ शकते, धाग्यावरही. बऱ्याच वेळा काय होतं, की मूळ धागा लोकांचा वाचून झालेला असतो, आणि त्यावर चर्चा करायची की नाही, हे अनेकांनी ठरवून तो सोडून दिलेला असतो. एखाद्या धाग्यावर नवीन विषय निघाला की जिथून तो विषय सुरू होतो, तो प्रतिसाद आणि त्याला संलग्न असे प्रतिसाद वेगळे काढले की नवीन विषयावर चर्चा होते. ट्रॅकरवर ती चर्चा वेगळ्या शीर्षकाखाली दिसते. मी आधी म्हटल्याप्रमाणे, काही अवांतर पण मूल्यवान लेखन झालं तर ते चुकीच्या धाग्यावर पडून दुर्लक्षित राहू नये हा विचार त्यामागे असतो. मूळ धाग्यावर मूळचा विषय चालू राहू शकतो. तेव्हा असं वेगळं काढणं म्हणजे सिफर किंवा दुसऱ्या कुणाच्या नावे काहीतरी खपवून देणं अशा हेतूने केलं जात नाही.

हा तुमच्या नावचा धागा असल्यामुळे तुम्हाला तो संपादित करून त्यात भर घालायची मुभा आहेच. कुठचाही प्रतिसाद जसा बदलू नये असा संकेत आहे, तसाच या धाग्याचाही मूळ कंटेंट बदलू नये. पण संदर्भ देण्यासाठी, किंवा नवीन तयार झालेला धागा अधिक वाचनीय करण्यासाठी बदल करणं तुमच्या हातातच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वर उत्क्रांतीबद्दल उल्लेख झालेला आहे.

स्वातंत्र्याची आस/बंधनमुक्तीचा सोस, सुखाचा शोध घेण्याची वृत्ती, व (कदाचित) प्रॉपेन्सिटी टू ट्रेड हे मानवाचे एक्स्टेंडेड फिनोटाईप असावेत. प्राणिसंग्रहालयातल्या प्राण्यांनी बंधनमुक्तीसाठी (पिंजर्‍यातून बाहेर काढण्यात यावे यासाठी) आंदोलन्/उठाव केल्याचे आठवत नाही. तसेच एका प्राण्याने दुसर्‍या प्राण्याशी आपले अन्न ट्रेड केल्याचे पाहिलेले/ऐकलेले नाही. काही अपवाद असू शकतील.

दुसर्‍या बाजूला आपल्याला बंधनांचे प्रेम वाटते. मर्यादांचा निक्षेप निर्माण झाला तो सुद्धा बंधनांच्या अनामिक, अव्यक्त आकांक्षेपोटीच असे का कोण जाणे मला वाटते. "अधिकार ये जबसे साजन का हर धडकन पे माना मैने ... मै जबसे उनके साथ बंधी ये भेद तभी जाना मैने ... कितना सुख है बंधन मे..." असे कवी योगेश म्हणून गेलेत. दिवंगत contracterian अर्थशास्त्री जेम्स ब्युकॅनन सुद्धा - Contract, rather than choice, is the mainstay of human life. असे म्हणून गेलेत. Contract/करार (लिखित्/अलिखित) करण्याची आपली वृती ही uncertainty वर मात करून रिस्क ट्रान्स्फर/म्यानेज्/मिटिगेट करण्यासाठीच असे म्हणायला जागा आहे. नाहीतर ना Contract/करार झाले असते ना पॅट्रिक बॉल्टन्/ऑली विल्यमसन जन्मास आले असते.

(रविवारी संध्याकाळी थोडी चढवून बसलेला) गब्बर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी स्त्रीवादी नाही (असलोच तर लिंगनिरपेक्षतावादी आहे). मात्र स्त्रीवाद्यांच्या विरोधकांचे म्हणणे मला नीटसे समजु शकत नाही - शकलेले नाही.
त्यांचा नक्की विरोध कशाला असतो हेच मला सजलेले नाही.

या विरोधकांपैकी काही असे आहेत जे प्रकटपणे पुरूषप्रधानतेचे समर्थक आहेत. त्यांना वेगळे करू. म्हणजे पुरूष हेच सर्वोत्तम आहेत/त्यांनीच कारभार हाकला पाहिजे वगैरे मते नसणारे तरीही स्त्रीवाद्यांचे विरोधक (मात्र जे माझ्यासारखे लिंगनिरपेक्षतावादी नाहीत) त्यांचे म्हणणे मला समजत नाही.

स्त्रीवादाच्या विरोधात चांगले/वाईट कसेही पण मुद्दे उभे करणे इतकेच जर टार्गेट असेल तर मग चालु द्या! Smile

कोणी इस्कटून सांगेल काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१

मात्र स्त्रीवाद्यांच्या विरोधकांचे म्हणणे मला नीटसे समजु शकत नाही - शकलेले नाही.

+१.
मला तर स्त्रीवाद्यांचेही म्हणणे समजू शकलेले नाही.
.
.
एक अवाम्तर :-
इथे जे गप्पा ठोकताहेत त्यातल्या कुणाकुणाच्या डोक्यात "स्त्रीवाद " ही संकल्पना तशीच आहे जी समोरच्याच्या डोक्यात आहे ?
चर्चा स्त्रीवादाबद्दल आहे की स्त्रीवाद्यांबद्दल ?
स्त्रीवाद म्हणजे काय हे नक्की किती जणांना ठाउक आहे ?
बाकी चालू द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

स्त्रीवाद म्हणजे काय हे नक्की किती जणांना ठाउक आहे ?

मला कितीतरी तत्त्वज्ञाने माहिती नाहीत. पुढच्याला मात्र वाटते कि ती माहित असणे जीवनावश्यक आहे. कोणतेच तत्त्वज्ञान माहीत नसणारे लोक सर्वज्ञानी लोकांपेक्षा सुखाने जगत असावीत इतका छलवाद तत्त्वज्ञानांत भरला आहे.

म्हणून वर प्रश्न विचारले. पण असं बुलेट पॉइंटमधे कुणी सांगत नाही हे करा आणि आणि हे नको म्हणून. नोकरीचा करार करताना ऑफिसात सर्व काय करायचं ते पहिल्या दिवशी लिहून देत नाहीत पण ब्रॉड स्कोप देतात. बहुतेक असा "बहुजनौपयोगी सरल स्त्रीवाद " कोणाला माहितच नसावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कितिही स्त्रीवादी, भुक्कड व्यक्तीस्वातंत्रवादी म्हण्ट्लं तरीही स्त्रियांना लग्न करुन फायनॅशियल सेक्युरीटी वैगेरे लागतेच ना?

मुळात हा मुद्दा(ही) मला कळलेला नाही.
लग्न म्हणजे एकमेकांच्या संपत्तीवर वारसाहक्काने मिळणार्‍या अधिकाराची तरतूद व सुरक्षा. लग्नात फायनान्शियल सिक्युरीटी अध्यारूत आहे, नव्हे अंतर्भूत आहे हे एक आनि तशी सिक्युरीटी दोघांसाठी अंतभूत आहे.

पुरूषही लग्न करताना फायनान्शियल सिक्युरीटीकडे काणाडोळा करतात असे वाटत नाही. किंबहुना, अपेक्षित वधुमध्ये आता निव्वळ सुशिक्षित नव्हे तर 'कमावती' हा उल्लेख वाढला आहेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तुले फ्याल्ट घ्याचा म्नजे नौकरी वालीच असन न्हाई? बरं जौदे कोन्त्या कंपनीत हाये ते सांग आघी ... उरफाट्या

पुरुषांच्या तोंडी हे असे वाक्य आले तर काही वाद होत नाही. मात्र स्त्रियाही फायनान्शियल सेक्युरिटी पाहतात ही रियालिटी मांडली तर 'स्त्रीवाद खतरे मे' ची आरोळी का दिली जाते बॉ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मेघना , सिफर, अदिती , बॅटमॅन ही मंडळी प्रत्यक्षात एकत्रित जमली तर हाणामार्‍या करायला लागतील असं वाटतय.
अरुण जोशी स्वतः मारमारी करणार नाहित; पण इतरांनी त्यांच्या अंगावर धावून जावं इतकं ते समोरच्याला नक्कीच उचकावतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पक्षी आम्हा पाचही लोकांचे प्रत्यक्ष आयुष्यतले वर्तन अतिशय सारखे असण्याची प्रचंड शक्यता आहे. म्हणून संस्थळावर असे भांडण वृथा ठरावे.

मी मांडलेल्या केस स्टडीमधे लोकांनी कसे वागतील हे सांगीतली तर तात्विक भूमिका आणि प्रत्यक्ष भूमिका यातला फरक लक्षात येईल. प्रत्यक्ष वर्तनात काहीच फरक नसेल तर तात्विक गदारोळ करण्यात काय अर्थ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

या गोष्टीवरून इथे फार आणि वारंवार वाद होतात म्हणून लक्षात आणू देतेयः

अमुक दावा करणारा माणूस प्रत्यक्ष आयुष्यात त्याच्या विरुद्ध वर्तन करतो आहे की नाही, याचा ठोस पुरावा जोवर आपल्यापाशी नाही; तोवर 'हो, बोलताय खरे... पण प्रत्यक्ष वागाल का?' या मुद्द्याला काय अर्थ आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

चेश्टेने म्हणत होतो. मंडळी खूपच तावातावात बोलत होती म्हणून. विशेषतः सिफर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

चेष्टा चालूच असतेय रे! पण सिर्‍यसली -

समलिंगी संबंधांचा पुरस्कार करणारे, स्त्रीवादी, पुरोगामी, नास्तिक... या सगळ्यांना झोडायला लोक हाच एक मुद्दा प्रामुख्यानं वापरताना दिसतात.

की बॉ - "म्हणताय असं, पण वागाल का? नैच्च ना?"

यावर "हो, अहो... वागू / वागतो." असं किती कळकळीनं सांगितलं, तरी

"नै बॉ, आम्हांला संशय आहे..."

आता या वादाला काय अर्थ आहे? इतकंच ध्यानात आणून द्यायचं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अमुक दावा करणारा माणूस प्रत्यक्ष आयुष्यात त्याच्या विरुद्ध वर्तन करतो आहे की नाही, याचा ठोस पुरावा जोवर आपल्यापाशी नाही; तोवर 'हो, बोलताय खरे... पण प्रत्यक्ष वागाल का?' या मुद्द्याला काय अर्थ आहे?

+प्रचंड मोठा आकडा
या वाक्यासाठी नुसतं मार्मिक पुरेसं वाटेना

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बाकी काही नै झालं तरी सर्वांना उचकावणार्‍या मनोबाला अगोदर २-४ फटके तरी जरूर घालू Wink

काय म्हणता लोक्स Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

(सिफर यांच्या ह्या प्रतिसादाविषयी हा प्रतिसाद आहे.)

>> किति टक्के भारतीयांनी peer marriageस केलेली आहेत? कायम मुद्दा सोडुनच चर्चा अपेक्षित आहे का?

किति टक्के भारतीयांनी peer marriageस केलेली आहेत? माझ्या ओळखीचपण कुणी नाही?

peer marriageमध्ये तुम्हाला नक्की काय अभिप्रेत आहे? माझ्या आसपासचा मेट्रोपॉलिटन शहरांतला मराठी मध्यमवर्ग (स्त्री-पुरुष दोघेही) आता लग्न करताना आर्थिक-सामाजिक पातळीवरची समानता शोधतो. सामाजिक समानता बहुतेक वेळा जातपात आणि घरदार वगैरे पाहून लग्न करण्यातून आपोआप येते. आर्थिक समानतेमध्ये स्त्रीनं नोकरी करणं आणि तिचा पगार पुरुषाहून फार कमी नसणं अभिप्रेत असतं. (जास्त असलेला चालत नाही. पुरुष बाजूकडून नकार येतो.) सध्याच्या कार्यसंस्कृतीमध्ये उशीरापर्यंत काम करणं, घरून काम करणं, सुट्टी असतानाही काम करणं वगैरे अभिप्रेत असतं. त्यामुळे घरातली कामं करायला पती-पत्नी दोघांनाही वेळ पुरत नाही. अशा परिस्थितीत त्या त्या वेळी तडजोडी आवश्यक असतात (आज मला काम जास्त आहे; तू ही जबाबदारी उचल; जेवण बाहेरनंच आणू वगैरे). मी ह्याला peer marriage म्हणतो. किंबहुना अशा दोन व्यक्तींनी केलेलं लग्न दोघांच्या आनंदाचं व्हावं आणि टिकाऊ व्हावं असं वाटत असेल, तर ते peer marriage असावं लागेल. अन्यथा, म्हणजे उदाहरणार्थ अशा दैनंदिन तडजोडी करण्याची जोडीदारांपैकी एकाची तयारी नसली, तर आर्थिक स्थैर्यामुळे आणि करिअर सोडून द्यायची नसल्यामुळे घटस्फोट घेतले जातातही. हे तुम्हाला मान्य नाही का? की तुम्हाला peer marriageमध्ये काही वेगळं अभिप्रेत आहे?

जाता जाता : 'कायम मुद्दा सोडुनच चर्चा अपेक्षित आहे का?' वगैरे टिप्पणी संवाद / मुद्दे पुढे न्यायला बाधक ठरतात. हे माझं व्यक्तिगत मत आहे. ह्याउप्पर तुमचा निर्णय आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बाकी सगळं तंतोतंत. एक लहानसा बदलः

... आणि तिचा पगार पुरुषाहून फार कमी नसणं अभिप्रेत असतं. (जास्त असलेला चालत नाही. पुरुष बाजूकडून नकार येतो.)

यातलं कंसातलं वाक्य अपुरं आहे. फक्त पुरुष बाजूकडूनच नकार येतो असं काही नाही. कित्येकदा मुलींना आपल्याहून कमी पगार असलेला नवरा करणं कमीपणाचं वाटतं, हेही सत्यच आहे. अशा व्यक्ती केवळ लिंगानं स्त्री आहेत, म्हणून आपोआप स्त्रीवादी ठरत नाहीत, योग्य तर नाहीच नाही - इतकं उभयपक्षी मान्य असावं.

हां, या वाक्याचा विपर्यास करून कुणी 'पाहा स्त्रियाचं स्त्रियांचं शोषण कसं करतात.. नि पुरुषांना वृथा बोल..." म्हणणार असेल, तर मात्र वादाला दाही दिशा खुल्या आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

उत्तम प्रतिसाद. ही बाजू एका स्त्रीने विशद केलेली पाहून बरे वाटले. नैतर संस्थळचर्चेचा नियम म्ह. स्वलिंगी दोष कार्पेटखाली सारायचे अन स्वनेत्रीचे मौसलपर्व सोडोन अन्य नेत्रीच्या शलाकाध्यायाचे तारस्वरात पठण करावयाचे.

बाकी झुलवाझुलवीत पुरुषही कमी नसतात. लग्नाआधी सौंदर्याचा मापदंड गगनाला भिडवणारे नंतर मात्र निवळतात त्याची अंमळ मजा वाटते. तशा लोकांस कधी उचकावयास मजा येईल हे खरेच Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अगदी मेघनाचाच मुद्दा लिहिणार होतो. आभार (दोघांचेही)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> कित्येकदा मुलींना आपल्याहून कमी पगार असलेला नवरा करणं कमीपणाचं वाटतं, हेही सत्यच आहे.

शक्य आहे; माझ्या अनुभवात ते नाही. वधूवरसूचक (मंडळ किंवा मध्यस्थ जे कुणी असतील ते) अशी स्थळं परस्परांसमोर येऊच देत नाहीत असंही पाहिलं आहे. म्हणजे नकारापर्यंत बाब जातच नाही, कारण आधीच्या चाळ्णीतच हा निकष असतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

खरंय
स्वतःपुरते जाऊचदेत, इतरांना सल्ले देतानाही "नाकापेक्षा मोती जड नको" म्हणणारे अनेक जण - स्त्री व पुरूष दोघेही- सहज बघायला मिळातात. त्यांना स्त्रीकडे मोत्यासारखी निव्वळ सजावटीची वस्तु यापलिकडे बघता येत नाही हेच तर दु:खय! Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शक्य आहे. मी मात्र अशी अनेक मुक्ताफळं मुलींकडूनही अनुभवली आहेत.

'मला पोसायची ताकद असलेला तरी मुलगा हवा...'
'माझ्या नवर्‍यानं घरी भांडी घासलेली मला नाही आवडणार...'
'माझ्यापेक्षा थोडा उंच तरी हवाच...'

इत्यादी. असो. या मनोभूमिकेत बदल सगळ्यांच्याच व्हायला हवा - मग स्त्री असो वा पुरुष.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

'माझ्या नवर्‍यानं घरी भांडी घासलेली मला नाही आवडणार...'

काय सांगता?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्रेण्यांची मजा वाटते खरीच. श्रेणीदात्यांचा बायस लग्ग्गेच कळून येतो.

वरील प्रतिसादात विनोदी काय आहे हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. वास्तव कार्पेटखाली ढकलायचा प्रकार, दुसरेकाय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या मनोभूमिकेत बदल सगळ्यांच्याच व्हायला हवा - मग स्त्री असो वा पुरुष.

+१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पीयर मेरेज आणी लिव्हीन रिलेशशिप मध्ये का फरक आहेत?

लिव्हीन रिलेशशिप मध्येही भारतात पोटगी द्यावी लागते, पीयर मेरेजचे भारतातील नियम काय आहेत ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> पीयर मेरेज आणी लिव्हीन रिलेशशिप मध्ये का फरक आहेत?
लिव्हीन रिलेशशिप मध्येही भारतात पोटगी द्यावी लागते, पीयर मेरेजचे भारतातील नियम काय आहेत ?

peer marriageमध्ये तुम्हाला नक्की काय अभिप्रेत आहे? ह्या माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोवर तुम्हाला काय म्हणायचं आहे तेच कळत नाही आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तुम्हाला काय समजलं माहित नाही. पण मी peer marriage हा शब्द गूगलमधे टाकला. विकीपीडीयाची लिंकच पहिली आली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वरील दुवा बघितला.
अ)पैसा कमावणे, ब)घरकाम, आणि क)बालसंगोपन अशा तीन्ही जबाबदार्या पार पडणे महत्त्वाचे. अ पुरूषाने आणि ब, क स्त्रीने अशी वाटणी काय किंवा अ, ब, क दोघांनी विभागून घेऊन करणे काय, दोन्ही सारखेच. मग पीअर मॅरेजमध्ये एवढे हानिकारक ते काय?
आपल्या वाट्याची जबाबदारी पार न पाडणे आणि जोडीदाराने जबाबदारी पार पाडण्यात सहकार्य न देणे हे तर दोन्ही प्रकारच्या कामाच्या विभागणीत घडते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माफ करा, समजलं नव्ह्तच. मला peer marriage आणि Cohabitation in India हे (न वाचता)एकच वाटलं. अजुनही पुर्णपणे कळालेलं नाही.

peer marriage चा प्रतिवादात्म्क मुद्दा मागे घेतो.

लिव्ह-इन चे दिसत नाहीत पण पीयर मॅरेज केल्यास पुरुषांना भारतात काय लिगल फायदे होउ शकतात?
(डिसक्लेमरः खवचट पणे हा प्रश्न नाही)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पिअर मॅरेज असा काही लीगल स्टेटस भारतात नाही बहुधा. त्यामुळे काही त्याचे लिगल फायदे पुरुषांना होणार नाहीत. पण आर्थिक फायदे आहेत. (शिवाय बाळंत होणे शेअर करता येत नाही त्यामुळे तो अ‍ॅडिशनल फायदा आहे).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

(शिवाय बाळंत होणे शेअर करता येत नाही त्यामुळे तो अ‍ॅडिशनल फायदा आहे).

ळॉळ ROFL

अहो पण तो फायदा तर कुठल्याही लग्नात असेलच ना ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सगळं शेअर करायचं असलं तरी हे शेअर होणारच नाही ना? [नो किड निर्णय घेतला नाही तर]

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मान्यच. हा फायदा लग्नप्रकारावर अवलंबून नाही इतकेच म्हणायचे होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्त्रिया फायनान्शियल सेक्युरिटीसाठी विवाह करतात हे खरे मानले तर त्यात चूक काय आहे हे समजले नाही. (स्त्रिया चॅरिटीसाठी विवाह करतात असा विरोधी पक्षाचा दावा आहे काय?).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वर म्हटल्याप्रमाणे त्यात चुक काहीच नाही. किंबहुना ते लग्नात अध्याहृत/अंतर्भुत आहे.
मात्र फक्त स्त्रियाच अश्या सिक्युरिटीसाठी लग्न करतात (आणि फक्त पुरूषच सेक्ससाठी किंवा पुरूष हे सेक्ससाठीच लग्न करतात - हे इथे कोणीही म्हटलेले नाही पण अनेकदा ऐकू येते) अश्या प्रकारचे घाऊक मत असल्यास ते चुकीचे आहे हे मान्य व्हावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

स्त्रीया विवाह करतात ते एकतर फायनॅन्शिअल सिक्युरीटीसाठी नाहीतर चॅरीटीसाठी, अशा दोनच शक्यता तुम्हाला दिसतात का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सामाजिक दबाव, सगळे करतात म्हणून, पीअर कॉम्पिटीशन, फ्लाँटिंग अशी अनेक कारणे असतात स्त्री-पुरुष दोघांची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकतर फायनॅन्शिअल सिक्युरीटीसाठी किंवा चॅरिटीसाठी अशा दोनच शक्यता माझ्या प्रतिसादात नव्हत्या. मात्र विवाह करताना फायनान्शियल सेक्युरिटीच्या शक्यता तपासणे हा एक मोठा निकष आहे. स्वतःहून कोणी फायनान्शियल इनसेक्युरिटी (पक्षी दळभद्रीपणा) स्वीकारणार नाही. असा दळभद्रीपणा स्वीकारणाऱ्यांना माझे दंडवत. याच कारणासाठी डेटिंग वगैरे (किंवा भारतात लग्न ठरण्याच्या आसपासचा कोर्टशिपचा काळ) प्रकारांमध्ये मुलांना (मोर पिसारा फुलवतो त्याप्रमाणे) भरपूर खर्च करुन आर्थिक क्षमता सिद्ध करण्याची परीक्षा पास करावी लागते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@सिफर
वर तुझ्या नि जंतूच्या चर्चेत आणिक तिरके प्रतिसाद नकोत म्हणून इथे विचारते आहे. मला धड कळतच नाहीय. तुला नक्की काय म्हणायचं आहे? व्यक्तिस्वातंत्र्य-स्त्रीवाद-मोकळी लैंगिकता या संकल्पना भारतीय समाजासाठी नाहीत, त्यामुळे त्यांनी गप राहावं आणि पारंपरिक चौकटीत झेपेल तेवढंच स्वातंत्र्य घ्यावं - असं? नक्की मुद्दा काय आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

+१
नक्की मुद्दा काय ते मलाही नीटसे समजलेले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुरुषी दुटप्पीपणा किंवा असुरक्षितेची भावना वगैरे वगैरे..
कितिही स्त्रीवादी, भुक्कड व्यक्तीस्वातंत्रवादी म्हण्ट्लं तरीही स्त्रियांना लग्न करुन फायनॅशियल सेक्युरीटी वैगेरे लागतेच ना?

यावरुन मला जशे पुरुष (घर सांभाळुन नौकरी करावी)दुट्ट्पी असतात त्याच प्रमाणे जॉब करुन स्वयंपुर्ण असुनही लग्न करुन नवर्याकडुन फायनॅशियल सेक्युरीटी ची अपेक्षा ही दुट्टपी वाटते.(मुलांसाठी ठिक) ठिक पण लग्न मोडतांना पुरुषांच्या एस्टेटीत हिस्सा मागण्याचा हक्क नसवा किंवा स्त्रियांना असेल तर पुरुषांना ही तो असवा.

राजेश घासकडवी, नगरीनिरंजन, Nile, ऋषिकेश, विक्षिप्त तै ,नितिन थत्ते, मन, अरुणजोशी, गब्बर सिंग,चिंतातुर जंतू,मेघना भुस्कुटे,शहराजाद.
माडलेल्या मुद्द्यांबद्दल आणी जरुरी तिथे माझे बौद्धीक घेतल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. उगाच थोड पेर्सोनल होउन घाऊक/इमोशनल मतांबद्दल परत कुणी दुखावल्या गेलं असल्यास माफी.
"जगण्याची समृद्ध अडगळ" व "समृद्ध जगणं" यात गल्लत झालेला पण ती वादविवाद न करता स्वतः अभ्यास/चिंतन वाढवुन तो तिढा सोडवण्याचा प्रयत्न करु इच्छुक ... सिफ़र

१. अमेरीका, सौदी, भारत इ. ठिकाणी समान नागरी कायदा(संस्क्रुती/धर्म निरपेक्ष) प्रक्टीकली करणे शक्य आहे हे पटत नाही. असो.
२. @बॅट'मॅन' एखाद्या वेळी देवधर्मा/देश/पॉलीटीशियन वर विनोद खपतील पण स्त्रियांवर केल्यास खवचट्/अवांतर/निर्र्थक असु शकतात यात नवल वाटते. असो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बॅट'मॅन' एखाद्या वेळी देवधर्मा/देश/पॉलीटीशियन वर विनोद खपतील पण स्त्रियांवर केल्यास खवचट्/अवांतर/निर्र्थक असु शकतात यात नवल वाटते.

त्याचं काय आहे, दमनाचा हजारो वर्षांचा इतिहास चिकटतो लगेच- मग तुमच्या मनात तो असो वा नसो. धिस इज द न्यू सेक्रेड काऊ. आता पहा, लगेच माझ्या प्रतिसादालाही तशाच श्रेण्या मिळतात की नाही ते. न मिळाल्या तरच आश्चर्य आहे.

बाकी दुटप्पीपणाबद्दलही सहमत आहे. समजा एका उद्योगपतीशी एका स्त्रीचे लग्न झाले अन मोडले. लग्न मोडल्यावर त्याने तिची स्थिती चांगली नसेल तर काहीएक नुकसानभरपाई द्यावी हे ठीक पण त्या भरपाईचा साईझ कैच्याकै असू नये. म्ह. श्रीमंत असला म्हणून त्याने दानधर्म इकडे करू नये.

काडीमोड झाल्यास पुरुषानेच भरपाई द्यावी हा संकेतच मुळात बुरसटलेल्या मनोवृत्तीचा दर्शक आहे. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काडीमोड झाल्यास पुरुषानेच भरपाई द्यावी हा संकेतच मुळात बुरसटलेल्या मनोवृत्तीचा दर्शक आहे

असे नसावे, ह्या दुव्याप्रमाणे निदान 'हिंदू लग्न कायद्यात' पुढीलप्रमाणे सांगितले आहे -

25. Permanent alimony and maintenance.-(1) Any court exercising jurisdiction
under this Act may, at the time of passing any decree or at any time subsequent
thereto, on application made to it for the purposes by either the wife or the
husband, as the case may be, order that the respondent shall pay to the applicant
for her or his maintenance and support such gross sum or such monthly or
periodical sum for a term not exceeding the life of the applicant as, having regard
to the respondent's own income and other property of the applicant, the conduct of
the parties and other circumstances of the case, it may seem to the Court to be
just, and any such payment may be secured, if necessary, by a charge on the
immoveable property of the respondent.

कायदेतज्ञांनी अधिक माहिती द्यावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> काडीमोड झाल्यास पुरुषानेच भरपाई द्यावी हा संकेतच मुळात बुरसटलेल्या मनोवृत्तीचा दर्शक आहे

ह्या दुव्यावरून उद्धृत कायदेतज्ज्ञांकडून माहिती -

In case the wife is working and drawing a handsome salary, the Court will certainly take that into consideration along with the husband's income and then depending on the facts and circumstances of the case decide whether alimony/maintenance is to be awarded to the wife and if yes, then the amount she shall receive from the husband.

As discussed earlier, under the provisions of the Hindu Marriage Act, 1955, even a Hindu husband can claim alimony from his wife if he earns less than her or does not earn at all, though this is rare.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

रोचक. पण आजपर्यंत अशा खटल्यांबद्दल ऐकले तेव्हा पुरुषाला नुकसानभरपाई मिळाल्याचे कधी ऐकले नाही. अधिक माहितीच्या प्रतीक्षेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रत्येक केस स्वतंत्र आहे आणि म्हणूनच हा कायदा अन्यायकारक वाटत नाही. एकच गाईडलाईन घालुन दिली की त्यात लूप होल शोघणे आहे.
पुरूषाला अ‍ॅलमनी मिळतेय पण स्त्रीची कमाई कमी असल्याने उलट तिच्यावर अन्याय झालाय अशा केसेसपासून (इथे बघ)पूर्ण उलट म्हणजे स्त्री चांगले कमावती असूनही पुरूषालाच अ‍ॅलमनी भरावी लागली अश्या टोकापर्यंत केसेस आहेत. त्यापैकी मिडीया दुसरे टोक अन्याय अन्यय असा टाहो फोडत हायलाईट करते. प्रत्यक्षात अनेक (कदाचित बहुतांश) केसेसचे निकाल हे समोरील साक्षी-पुराव्यांवर आधारीत नी योग्यचच लागतात हे काही परिचितांच्या घटस्फोटाच्या केसेसवरून दिसले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्यापैकी मिडीया दुसरे टोक अन्याय अन्यय असा टाहो फोडत हायलाईट करते.

मी तर उलटेच समजत होतो बॉ. मीडिया इतकी पुरुषप्रेमी(ज्याचा एक समानार्थी शब्द काहींच्या मते स्त्रीद्वेष्टी) कधीपासून झाली?

असो. दुवा रोचक आहे. धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मागे कधीतरी अशा निकालांचे दुवे दिले होते. पुन्हा शोधून देतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पाने