शिरोरेखा

जर तुम्ही तीसचाळीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या मराठी पुस्तकाचं एखादं पान अाणि अलीकडच्या पुस्तकाचं पान पडताळून पाहिलं, तर एक फरक स्पष्ट जाणवतो. पूर्वी शब्दांवरची शिरोरेखा दोन अक्षरांमध्ये तोडली जात असे, तर अलीकडे ती एकसंध असते. हा फरक अर्थात typesetting संगणकांवर होत असल्यामुळे उद्भवलेला अाहे. नेटवर जिथेजिथे मराठी पहायला मिळतं, तिथे कुठेही शिरोरेखा तोडलेली मी पाहिलेली नाही, अाणि माझ्या समजुतीप्रमाणे सध्या उपलब्ध असलेल्या कुठल्याही editor मध्ये ती तशी तोडण्याची सोय नाही.

माझ्या डोळ्यांना जुना टाईप बरा वाटतो, तर नवा टाईप जास्त गिचमिड वाटतो. नव्या टाईपमध्ये शब्द जर लांबलचक असेल तर ही गिचमिड जास्तच जाणवते (उदा. एकसमयावच्छेदेकरून) अाणि मोडी वाचत असल्यासारखं वाटतं.

हा विषय काढण्याचा हेतू असा की हा त्रास फक्त मलाच होतो का, अाणि इतरांना या फरकाबद्दल काय वाटतं (तो जाणवलेला नाही, किंवा जाणवला अाहे पण त्याचा त्रास होत नाही) हे मला समजून घ्यायचं अाहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (2 votes)

मला वाचताना काही त्रास होत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा अनुभव उलट आहे - एकच सलग शिरोरेखा असली की वाचायला सोपे जाते. कदाचित सवयीचा भाग असावा. तुटक शिरोरेखेचा त्रास असा होत नाही, पण सलग जास्त आवडते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमुळे डीटीपीचे तंत्र बहरले आणि "कंपोझिंग" पद्धतीतील खिळे जुळवणीने केव्हाच 'राम' म्हटला असल्याने शिरोरेखांचा मुद्दा (प्रश्न किंवा प्रॉब्लेम नव्हे) केवळ चर्चेचा विषय होऊ शकते हे मान्य. त्यातही जुन्या पुस्तकांच्या नवीन आवृत्त्या बाजारात आल्या तर त्या नवीन तंत्रानेच येत असतात. पण श्री.चिपलकट्टी यांच्या या धाग्याच्या निमित्ताने मी माझ्या संग्रहातील 'कंपोझ' पद्धतीची पुस्तके पाहिली (उदा.माधव जूलियन यांचे 'सुधारक' हे पुस्तक जे १९२८ चे आहे). इथे शिरोरेखा दोन अक्षरांमध्ये तोडली तर गेली आहेच, पण त्यामुळे वाचनाला काही बाधा येते असे वाटत नाही. (दोन पाने वाचली, या दृष्टीकोनातून). फक्त त्रास होतो तो पॅराग्राफ "जस्टिफाय" करण्याच्या (वा न करण्याच्या) रितीमुळे. उदा. पेजमेकरमधे डीटीपी सेट करताना Compromise असा शब्द आला तर जस्टिफिकेशन सोयीमुळे ओळीत तो शब्द बसत नसला तर शेवटी Compro- असे आणि नव्या ओळीत "mise असे शब्दाचे विचित्रीकरण न होता Forced Alignment सोयीमुळे Compromise अशारितीनेच तो शब्द अवतरतो.

मात्र शिरोरेखाच्या काळात असे होत नव्हते असे दिसते. 'सुधारक' च्याच एका पानात मला "संबोधण्याची" हा शब्द एका ओळीत "संबोध-" तर दुसर्‍या ओळीला "ण्याची" असा कंपोझ झालेला दिसला. यामुळे (कदाचित) वाचनात रसभंग होऊ शकतो. [कोल्हापूर महानगरपालिकेच्या एका स्मरणिकेत ते नाव "कोल्हापूर महानगरपा-" आणि मग पुढे "लिका" असे छापले गेले होते, पण यावर सभेत एखाद्या नगरसेवकाने प्रश्न उभा करावा इतपत त्यांचा बुद्द्यांक असेलच असे नाही.]

(चांगला विषय आहे, मुद्रण कलेच्या इतिहासाबाबत छान चर्चा होऊ शकते.)

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मराठी पुस्तके फार वाचलेली नाहीत पण मला तर सन्गणकावर आपण मराठीतून लिहु वाचु शकतो ह्याचाच इतका आनन्द झाला कि शिरोरेखा कशी आहे ह्याकडे लक्षच गेले नाही ! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- दिलतितली
ज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी!

मला वाटते की शिरोरेखा तोडलेली असणे ही जुन्या तंत्रज्ञानाची 'मर्यादा' होती 'फायदा' नव्हे. त्याकाळच्या मुद्रकांनासुद्धा शिरोरेखा एकसंध ठेवायला आवडले असते.

जुन्या काळात मोडी लिहिताना तर दोन शब्दांच्या मधील स्पेसमध्येही शिरोरेखा तोडलेली नसे,

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मला वाटते की शिरोरेखा तोडलेली असणे ही जुन्या तंत्रज्ञानाची 'मर्यादा' होती 'फायदा' नव्हे. त्याकाळच्या मुद्रकांनासुद्धा शिरोरेखा एकसंध ठेवायला आवडले असते.

असेच वाटते.
मला सलग शिरोरेखा जास्त आवडत असली तरी तुटकही चालून जाते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी हेच म्हणायचे होते.
लिहिताना दोन शब्दांतली 'स्पेस' बर्‍यांचदा कमीजास्त होते. तेंव्हा, शब्द 'डिफाईन' करण्यासाठी, तो अक्षरसमूह 'टोपी' देऊन जोडावा असं आम्हाला आमच्या दगा काळू मास्तरांनी ४थी च्या स्कॉलरशिपच्यावेळी सांगितलं होतं ब्वा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

हाताने लिहिताना संपूर्ण शब्द लिहून त्यावर एक सलग रेषा देण्याची पद्धत असे. रेषा तुटायची ती ध, श, श्र, किंवा क्ष यांची डोकी कापली जाऊ नयेत म्हणूनच. सध्याच्या छपाईत तेवढं भान ठेवलेलं असतं. हस्तलेखनाच्या माझ्या सवयीच्या जवळ जाते म्हणून मला नवीन पद्धतच आवडते.

दुसरा एक मुद्दा असा की पूर्वीच्या छपाईत विशिष्ट अक्षराची विशिष्ट रुंदी हे नाईलाजाने स्वीकारावं लागत असे. दोन अक्षरांमधलं अंतर हे त्यानुसार 'कायम' असायचं. म्हणजे क ला काना दिला की ते अंतर नेहमी तेवढंच येणार. मात्र सौंदर्याच्या दृष्टीने कदाचित कारखाना मधला का आणि कात्यायन मधला का हे दोन्ही सूक्ष्मपणे वेगळे दिसण्याची गरज असू शकते. कॅलिग्राफी करताना हे जाणवतं. नव्या पद्धतीमध्ये ही सोय करता येते. खरोखर कोणी केलेली आहे की नाही कल्पना नाही. तत्त्वतः जुन्या पद्धतीतही करता येईल, पण कष्ट प्रचंड वाढतील. रोमन लिपीत अक्षरांमधली अंतरं ही आसपास कुठची अक्षरं आहेत त्यावरून ठरतात असा माझा समज आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खिळ्याची (टाइपची) जाडी ही अक्षराप्रमाणे सर्व भाषांमध्ये बदलते. खिळे जुळवताना दोन अक्षरांच्या मध्ये कुठलीही स्पेस नसते.

टाइपरायटरमध्ये एकाअक्षराचा ठसा उमटल्यावर कॅरेज विशिष्ठ अंतर पुठे सरकते. मॅन्युअल टाईपरायटरमध्ये हे अंतर बदलणे शक्य नसते त्यामुळे सर्व अक्षरांचे ठसे (टाइप) एकाच जाडीचे असतात. त्यामुळे millimeter हा शब्द टाइप केल्यावर एम हे अक्षर गिचमिड दिसते आणि i l l i हे खूप दूर दूर दिसतात. इलेक्ट्रॉनिक टाइपरायटर आल्यावर हा प्रश्न सुटून गेला. अक्षर टाइप झाल्यावर कॅरेज किती पुढे जाणार ते अक्षरानुसार ठरवता येऊ लागले.

ही सुधारणा सर्व लिप्यांमध्ये उपलब्ध झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

या विषयावर अालेली सर्वसाधारण प्रतिक्रिया मला अगदी अनपेक्षित अशी निघाली, कारण याबाबतीत माझी अावडनिवड विशाल जनसमुदायाच्या इतकी विरुद्ध अाहे याचा मला बिलकुल अंदाज नव्हता. असो. De gustibus non disputandum est.

पण जर एखाद्याला संगणकावर लिहिताना शिरोरेखा तोडायची असेल तर तसा पर्याय editor मध्ये उपलब्ध असावा, या बाबतीत दुमत होऊ नये. (मला computer programming मध्ये विशेष गती नाही, पण अशी सोय करणं फार अवघड असेल असं वाटत नाही.) एकेकाळी संगणकावर देवनागरी लिहिता येतच नसे, तेव्हा अाता ती लिहिता येते हे चांगलंच अाहे. पण इतक्यावरच संतुष्ट राहण्याचं कारण नाही.

समजा एक पान देवनागरीत छापलेलं अाहे. त्यातल्या काळ्या भागाचं प्रमाण 'क' इतकं असेल, तर 'क' चं मूल्य नक्की किती ठेवलं म्हणजे वाचणं सगळ्यात सोपं जातं याचा काही अभ्यास व्हायला हवा. शिरोरेखा सलग असेल तर त्यामुळे 'क' चं मूल्य थोडंसं वाढेलच. अर्थात ही अगदी ढोबळ कल्पना म्हणून मांडली अाहे; प्रत्यक्षात छपाई चांगली किंवा वाईट दिसणं हे बाकी अनेक घटकांच्या परस्परसंबंधांवर अवलंबून असणार हे उघडच अाहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)

>>मला computer programming मध्ये विशेष गती नाही, पण अशी सोय करणं फार अवघड असेल असं वाटत नाही.

सोय करणं मुळीच अवघड नसणार. पण ती सोय करावीच का हा प्रश्न आहे.

कागदावरील काळेपणा कमी करण्यासाठी बिना-शिरोरेखावाला फॉण्ट असेल तर पहावा.

अवांतर: एडिसनचा विजेचा बल्ब सुरुवातीला लोक घेत नसत कारण तो कंदिलासारखा दिसत नसे त्याची आठवण झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मुळात पूर्वी (मराठी मोडी मधे लिहित असताना) सबंध वाक्याला एकच शिरोरेखा असे.:) पुढे देवनागरी स्वीकारल्यावर केवळ छपाईच्या सोयीसाठी ती अक्षराला तोडण्यात आली जे तुमच्या डोळ्यांना सरावाचे झाले असले तरी चुकीचे वाटते.. आहे..

कम्प्युटर आल्यामुळे हा दोष दुर झाला आहे असे वाटते. अश्या चुका पुन्हा वर आणायची गरज वाटत नाही!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तर नवा टाईप जास्त गिचमिड वाटतो.

डॉक्टर लोकं वैद्यवाणी(प्रिस्क्रिप्शन) सोडुन इतरही वाड़मय लिहायला लागल्यापासून असे वाटत असावे काय? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वैद्यवाणी वाचन्यासाठी पेशल वाचक मेडिकल स्टोर्सं उघडून बस्लेले अस्त्यात की. हितं गिच्मीड ल्याह्ची सोय न्हाय. नैतर दाव्ल अस्तं कशी अस्ते वैद्यवाणी त्ये Wink

(तुम्हास इनोदी श्रेणी देन्यात येत हाये)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

व्हय त्ये हायेचं व्हो..पन ह्यो योकच परसंग असा अस्तुया कि शिक्ल्या सवर्ल्या मान्साला बी वाटताया कि "वाच्तासुदिक" येयना म्हुन. Smile

इनोदी श्रेणी साठी धन्यवाद आणि श्रेणी देण्यास मी असमर्थ असल्याने क्षमस्व(श्रेणी देताच येत नाहिये!!).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

De gustibus non disputandum est हे ठीक आहे, पण माझ्याही डोळ्यांना जुने टाईप बरे वाटतात. इंटरनेटवर पर्याय नसतो म्हणून मी वाचतो, पण संगणकावर डीटीपी करून छापलेल्या सध्याच्या बहुतेक मराठी पुस्तकांमधला (अनेकदा sans serif असलेला) टाईप दृश्यसंवेदनेच्या पातळीवर निकृष्ट वाटतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ल्याटीन भाषा वापरून पब्लीकला गंडवायची मक्तेदारी पेशल डाक्टर लोक्स साठी राखीव हाये!
तुमी ल्याटीन वाक्य इदाऊट भासांतर लिवल्या बद्दल निसेद!
*
De gustibus non est disputandum is a Latin maxim. It means “there is no disputing about tastes”. The implication is that opinions about matters of taste are not objectively right or wrong, and hence that disagreements about matters of taste cannot be objectively resolved.
*
पिंडे पिंडे मतिर्भिन्नः (आता आम्ही सोन्स्क्रूत झाड्नारः विकट हास्य)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

ऋषिकेश म्हणतो ते बरोबर आहे. शिरोरेखा सलग असली पाहिजे. कालांतराने तेच सवयीचे होईल. कागदावर लिहीतांना थोडीच आपण तुटक रेषा द्यायचो? अन तुम्ही अगदीच ओढूनताणून काहीतरी सॉफ्टवेअर वापरून तुटक लिहीले पण ते लिखाण दुसर्‍यांसाठी असते ना? त्यांना नाही चांगले वाटणार, मग?
तुम्हाला अगदीच वापरायचे असेल तर श्रीलिपी वापरावी लागेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही