आजोबा तुम्ही पुअर आहात का?

(माझ्या एका मित्राने सांगितलेली खरी घटना, त्याचाच शब्दात).

माझी लेक आपल्या ४ वर्षाचा लेकी सहा जवळपास दीड-एक वर्षांनी परदेसाहून परतली होती. म्हणतात न दुधा पेक्षा साय केन्हाही प्रिय. उन्हाळ्याचे दिवस आणि सुट्ट्या. गोंडस नाती बरोबर दिवस भर दंगा मस्ती करत वेळ कसा निघत होता कळतंच नव्हत. दिवस भर अविरत चालणारी तिची बडबड ऐकून मी तिचे नाव टाकिंग बर्ड ठेवले. लेकीने इशारा दिला, आजोबा फार डोक्यावर घेता आहात, तिला, पण सावधान राहा, वेळ मिळताच ‘बिन पाण्याची हजामत करेल, तेंव्हा तुम्हाला कळेल, ‘टाकिंग बर्ड’ काय चीज आहे ते. पण मी लक्ष दिले नाही, मला वाटले पोरीच्या मनात असूया निर्माण झाली असेल, अखेर तिच्या हक्काच्या वडलांचा ताबा आता तिच्या पोरीने जो घेतला आहे. पण एकमात्र खरं, तिचे निरीक्षण कमालीचे होते, तिने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देता देता नाकी नऊ यायचे.

रविवारचा दिवस होता, सौ. म्हणाली लेकीला ‘गुलाब जाम’ आवडतात. हिमालय सागर (हलवाईचे दुकान) जाऊन गुलाब जाम घेऊन या. कुर्ता-पाजामा घालून, ‘टाकिंग बर्डला’ सोबत घेऊन गुलाब जाम आणावयास निघालो. पहिल्या माल्या वर घर असल्या मुळे, जिने उतरणे भाग होते. टाकिंग बर्ड हात पकडून जिने उतरू लागलो. अचानक एखाद्या वेगवान गोलंदाज प्रमाणे, तिने पहिला चेंडू फेकला, आजोबा, तुम्ही जीन्स का नाही घालत? जीन्स नाही का तुमच्या कडे? मॅाम-डैड बाहेर जाताना नेहमीच जीन्स घालतात. मी म्हणालो, जीन्स नाही आपल्या कडे बुआ. तिने लगेच दुसरा चेंडू फेकला, तुमच्या बिल्डिंगला लिफ्ट का नाही? आता काय म्हणणार, तरी ही उत्तर दिले, बिल्डिंग छोटी आहे म्हणून लिफ्ट नाही. ‘म्हणजे तुम्ही छोट्या बिल्डिंग मध्ये राहतात’ आमचा न 17th फ्लोरवर फ्लेट आहे. आजपर्यंत कधी जिना चढला नाही. मनात म्हंटले, च्यायला, या बायका बालपणा पासून दुसर्याला तुच्छ लेखण्याचा मौका सोडत नाही. खाली उतरल्या वर स्कूटर काढली. लगेच तिने लगेच गुगली टाकली, आजोबा,तुमच्या कडे कार नाही का? मी म्हणालो, स्कूटर आहे ना! कारपेक्षा जास्त मजा येते चालवायला. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून असे वाटले ‘तिला काही माझे उत्तर पटलेले दिसत नाही’. खैर, हलवाईच्या दुकाना जवळ पोहचलो. स्कूटर थांबतच, तिने मलिंगा सारखा यार्कर आपटला, आजोबा इथे मॅाल नाही आहे का? आम्ही तर भाजी सुद्धा मॅाल मधून आणतो, आजोबा, मॅाल म्हणजे मोठ्ठे दुकान असते, आपले चिमुकले हात मोठ्ठे करत तिने म्हंटले. (जसे काही आजोबाना मॅाल म्हणजे काय, माहित नसावे). मी म्हणालो, या दुकानात, मॅाल पेक्षा मस्त ‘गुलाब जाम’ मिळतात, तुला आवडतात न. तिने मान हलवत होय म्हंटले. मला ही हायसं वाटले. ‘गुलाब जाम’ घेतले, आणि हलवाईला देण्यासाठी खिशातून पर्स काढताना तिने विचित्र नजरेने माझ्या कडे बघितले होते.

अखेर दुकानातून बाहेर पडलो, स्कूटर जवळ येताच तिने शोएब अख्तर पेक्षा ही वेगवान बाउन्सर टाकला, आजोबा, तुमच्याकडे क्रेडीट कार्ड नाही आहे का? आता काय म्हणणार, आज पर्यंत कधी क्रेडीट कार्डची गरज भासली नव्हती. मुकाट्याने म्हणालो, नाही. या वेळी तिच्या चेहऱ्यावर काहीच भाव उमटलेले दिसत नव्हते. पण तिची बडबड थांबली. घरी येत पर्यंत ती एकदम शांत होती. घरी आल्या-आल्या, ती हळूच पुटपुटली, जिव्हारी लागणारा बीमर त्रिफळा उडवून गेला, आजोबा तुम्ही पुअर आहात का?

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

उत्क्रांतीचे घेऊ
इं- सजीवांचे जेगेटिक्सच्या आधारावर हे हे क्लासिफिकेशन्स आहेत. त्यांच्या क्ष क्ष ब्रँचेस बनतात. यात या या त्रुटी असू शकतात.
वि- १. पहिला सजीव प होता. २. फ होता ३ ... ५ ६
हो हो, त्यापूर्वी
इं - अबायोजेनिक इवोल्यूशन झाले. असे म्हणण्यात प्रचंड गृहितके आहेत. ती सुसंगत नाहीत. शोध चालू आहे.
वि. - अबायोजेनिक इवोल्यूशन या सात पैकी एका पद्धतीने झाले.
इं - सातपेक्षाही जास्त पूर्वीच्या ३-५ पद्धती खोडून काढण्यात आल्या आहेत.

आता विज्ञानात
१. जगात प्रत्येक क्षणाला अनंत ब्रह्मांडे निर्माण होत असतात, ते
२. सामान्य माणसाला जे जग फील होते तेच एक वास्तव नाही, ते नाहीच.
अशा चिकार थेरी आहेत.

त्यामुळे वैज्ञानिक माझे कोणतेही म्हणणे खोडू शकतो. म्हणून मी अगोदरच हार स्वीकारतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

व्याख्येबद्दल बुद्ध्याच घोळ घालताहात.

विज्ञान आणि इंजिनिअरिंगच्या व्याख्या द्या अगोदर. मग पाहू कोण कधी अन काय म्हणते ते. व्याख्येशिवाय हे सब झूट आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

समजा , विज्ञान नि अभियांत्रिकीच्या व्याख्या मी देईन. त्यात दोन चार संकल्पना, एक दोन संदर्भ असतील. पैकी काहींचा आपण दोघे पुन्हा वेगवेगळा अर्थ काढू. मग तिथे पुन्हा त्यांच्या व्याख्या असं ते न संपणारं लष्टक आहे. म्हणून मी अ‍ॅडवान्समधे हार मानली आहे.

इथे मी उदाहरणाने व्याख्या केली आहे. त्यापेक्षा जास्त क्षमता नाही. किमान टंकता येणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मेडिकलला सोडू नका.
मेडिकलचीपण (व्याख्या तुमच्या यादीत ) घ्या एकदाची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आता कळ्ळं का लोक तुमच्यापुढे हार का मानतात ते Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अशाही विजयात मला आनंदच आहे. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

धन्यवाद ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मेडिकल - वैद्यकीय क्षेत्राबद्दलही आपलं बहुप्रभावी , स्वयंभू मत जाणून घेण्यास उत्सुक आहे.
( भादरायचीच असेल तर बिग ब्यांग वगैरे कशाला, आख्ख्या मेडिकल क्षेत्राचीच mba करा.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माणूस असल्यावर संस्कार म्हणून माकडिणीऐवजी स्त्री असती तर कदाचित बुडून मेली असती. >> कदाचीत. पण तरी मला वाटत की जिथे काही सेकंदात जीवनमरणाचा निर्णय घेण्याचा प्रश्न येतो तिथे स्वतःला वाचवणे हाच प्रयत्न शक्यतो कोणीही करेल. सुपरहिरोच्या चित्रपटात नाही का इमारतीला आग लागल्यावर 'मेरे बच्चेको कोइतो बचाओ' असे ओरडत आई खालीच थांबलेली असते Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शेवटच्या वाक्यासाठी टाअळ्या आणि त्रिवार मुजरा मॅडम

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सुपरहिरोच्या चित्रपटात नाही का इमारतीला आग लागल्यावर 'मेरे बच्चेको कोइतो बचाओ' असे ओरडत आई खालीच थांबलेली असते (डोळा मारत)

- या जोरदार निरिक्षणाबद्दल टाळ्या!

पण "जिथे काही सेकंदात जीवनमरणाचा निर्णय घेण्याचा प्रश्न येतो तिथे स्वतःला वाचवणे हाच प्रयत्न शक्यतो कोणीही करेल" - याबद्दल असहमती व्यक्त करू इच्छिते.
"द अदर पर्सन इन क्वेश्चन" जर अगदी जाम प्रेमाचे (अपत्य सोडून) कोणी असेल तर कदाचित असे होऊ शकते (नक्की नाही पण टक्का नक्कीच थोडा जास्त असेल) पण तेच जर आपले मूल असेल तर स्त्री मुल वाचवण्याची शक्यता सर्वात जास्त आहे.

संस्कार की अजून काही वात्सल्य नामक केमिकल लोच्यामुळे ---- ते कारण जाऊ दे चुलीत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

वरील प्रतिसाद मला असा दिसला

सुपरहिरोच्या चित्रपटात नाही का इमारतीला आग लागल्यावर 'मेरे बच्चेको कोइतो बचाओ' असे ओरडत आई खालीच थांबलेली असते (डोळा मारत)

आई खालीच थांबलेली असते (डोळा मारत)
ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आई डॉळा मारते ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पाने